Wednesday, 28 February 2018

वृत्तपत्रांचा मृत्युलेख ३ : पत्रकार हेमंत जोशी


वृत्तपत्रांचा मृत्युलेख ३ : पत्रकार हेमंत जोशी 
हे असे प्रत्येक देशात निदान एकदा तरी घडायला हवे, त्याचे असे झाले, बायकोला म्हणालो, आपल्याला दुबईला जायचे आहे, तेथल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्थाही केलेली आहे, त्यावर ती चक्क ' नाही ' म्हणाली...अर्थात माझे हे वाक्य गंमतीने घ्यावे, एखाद्याचा जीव जावा आणि आपले भले व्हावे असे विचार डोक्यात येणेही चुकीचेच...तिने आता आमच्या बाथरूम मधला बाथटब देखील तातडीने काढून टाकला आहे, माझ्या खालच्या माळ्यावर एक शासकीय अधिकारी राहतात, त्यांनी तो चांगली किंमत देऊन विकतही घेतला...

श्रीदेवी गेली त्यादिवसापासून मी गोंधळात पडलोय कारण वाहिनी मग ती कोणतीही असो, दिवसभर सारेच्या सारे श्रीदेवीची गाणी, डान्स आणि तिच्या आयुष्याची बारी वाईट वाटचाल दाखविण्यात गुंतलेले आहेत, उद्या समजा सनी लिओनी गेली तर...बापरे! भारतातल्या कोणत्याही रस्त्यावरून त्यादिवसात पुरुष मंडळी दिसणारच नाहीत...ज्यांच्या लेखणीत दम आहे, श्रम आहेत, अभ्यास आहे, नियमितता आहे, व्यासंग आहे, मला नाही वाटत अशांचे वृत्तपत्र केवळ शासकीय जाहिराती मिळाल्यात तरच जगेल. तमाम अजिबात दर्जा नसलेल्या वृत्तपत्र मालकांनो, अहो, आपले राज्य, आपला देश हा दानशूरांचा आहे, तुमच्या चांगल्या लढ्यात या देशातले तमाम दानशूर मनापासून साथ आणि दाद देतात, हा माझा स्वतःचा अनुभव आहे, तुम्हाला ते कशातही कमी पडू देत नाहीत. म्हणूनच कैलास म्हापदी सारखे लढवय्ये निर्भय लेखणीबहाद्दर पत्रकार नियमितपणे त्या ठाण्यातून दैनिक चालवून, काढून मोकळे होतात पण जिद्द कशी, तर कैलाशला केव्हाही फोन करा, तो फक्त आणि फक्त वर्तमानपत्राशी संबंधित पोटतिडकीने बोलत असतो, आणि या अशा पराक्रमी मराठी पत्रकारांसमोर कुठलाही शेटजी टिकाव धरणे अशक्य असते, लोकमत सारख्या दैनिकांना पुढारी देशोन्नती सामना किंवा सकाळ सारखी दैनिके पुरून उरतात आहेत, जिद्द मोठे काम करते. पन्नास पन्नास वर्षे साप्ताहिके दैनिके पाक्षिके काढणाऱ्यांची वर्तमानपत्रे हातात देखील घ्यावीशी वाटत नाहीत, हे त्यांचे मोठे अपयश आहे, संध्यकाळच्या दारूची सोय झाली, मास मच्छी फुकटात खायला मिळाली, घरी नेण्या शे पाचशे रुपये दिले कि संपली यांची पत्रकारिता वरून या तद्दन भंगार वृत्तपत्रांनी संबंधितांना चिरीमिरी दिली कि वर्षानुवर्षे शासकीय जाहिराती मिळतात, ते उत्पन्न वेगळेच. या पत्रकारांना काहीही करायचे नसते फक्त लाचार भिकारी होऊन शासनाच्या जाहिरातींवर आणि संधी मिळेल तेथे ब्लॅकमेलिंग करून अतिशय भिक्कार पद्धतीने जगायचे असते, बरे झाले किंवा बरे होईल या अशा पत्रकारितेतले कवडीचीही ज्ञान नसलेल्यांच्या शासकीय जाहिराती बंद केल्या गेल्या तर....

एक मात्र शासनाने अवश्य करावे, या तमाम मंडळींना एक संधी द्यावी, वृत्तपत्र नेमके कसे असावे याचे नॉर्म्स ठरवून त्या पद्धतीने जी जी वृत्तपत्रे निघतील, त्यांच्या शासकीय जाहिराती सुरु ठेवाव्यात, कदाचित काहींचे डोळे उघडतील आणि त्यांच्यातले चांगले पत्रकार उफाळून पत्रकारितेचा देशभक्तपर लढा सुरु करतील, बदमाशांच्या नाकात दम आणून सोडतील, पण आज तरी हे असे चित्र धूसर आहे, उकडले तिकडले पाहून दैनिके तीही वेगवेगळ्या जिल्ह्यातून काढायची, शासनाच्या सवलती, जाहिराती लुटायच्या, पर्यायाने जनतेला आणि शासनाला कायम उल्लू बनवायचे, आम्ही पत्रकार आहोत, सांगून, सच्चा पत्रकारांच्या मांडीला मांडी लावून बसायचे, प्रतिष्ठा मिळवायची, त्या प्रतिष्ठेच्या आडून पित्तपत्रकारिता करायची, हे असले उद्योग यापुढे चालू न देण्याचे मोठे काम या शासनाने हाती घेतले आहे, त्यांचे मनापासून अभिनंदन फक्त हे सारे करतांना आमच्यातले सच्चे, कडवे, साधे, श्रेष्ठ पत्रकार किंवा वृत्तपत्रे मरणार नाहीत याचीही काळजी खबरदारी शासनाने अवश्य घ्यायला हवी....
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Tuesday, 27 February 2018

Sridevi-Karma is A Bitch! Anyways--RIP

Sridevi-Karma is A Bitch! Anyways--RIP
Please note: The below article is not for people who don't want us to rattle our brain as to what went wrong in Dubai. We yet copy these actors my friends, if not us, but someone somewhere living in Bhatinda or a Kolkata surely looks up to them & does everything what these actors do....These actors can do hell lot of things to themselves, but if we write on it, since we know it, we can save some lives of people aping them right? And please, We still live in a free country....Let me put by thoughts below...
Steroids (Fat burners) & Alcohol led to a massive cardiac arrest leading to her death. The forehead got cut, as SHE slipped in the bathroom, & unluckily she fell in the bath tub. If drowning was the cause of death mentioned, the bath tub must have been filled with water & thats the reason for her death as certified by the authorities.
Now as per reports, HE was present in the room. After 15 minutes he checked on her and called his friend when he broke open the bathroom door. They (he & the friend) waited for quite sometime before the Doctors and the Police were informed. What were they doing all this while? Were they trained to handle the situation? She was staying at a 5 star. One emergency phone call to the hotel reception, might be...might be...am saying something would have worked out... FYI, all 5 star hotels have staff's trained to perform CPR and whatever it takes to do the first handling of a patient. But situation is such, your brain does not work. It is easy for us to judge someone or the action they do, but someone had lost HIS dearest wife that day.
But again, if he knew the substances taken by HER were harmful, he could have stopped her right? & to top that the correctional surgeries that were performed on her. I mean, I love my wife to death, but if she does some crazy things to herself (even if we are in Glamour business) I shall put my foot down friends to stop her, what say? Won't you too, even if it means to get a low score on your airport looks....
I'm not sure, but generally when a celebrity status person dies in any country usually the clearances and handing of bodies is done pretty swiftly, right? What are the doubts circulating in the authorities mind, that it took them more than 48 hours to hand over the body? What could be the reason? 
Finally, See how Karma plays its meanest role. I personally believe there is no Heaven or Hell. All happens due to your KARMA...Mona, his first wife, was a sweetheart of all they say. She was life of any party and had heart as large as a queen. But then few years of marriage, SHE entered in HIS married life. They say M took this betrayal so much to her heart that she din't even want to fight against a life taking disease that had struck her. Her son was about to make his acting debut...2 months prior to that M died. Now SHE has died too in Dubai...her daughter will make her debut soon in bollywood... Always believe, KARMA IS A BITCH!!

RIP Sridevi!!

Vikrant Hemant Joshi 

वृत्तपत्रांचा मृत्युलेख २ : पत्रकार हेमंत जोशी

वृत्तपत्रांचा मृत्युलेख २ : पत्रकार हेमंत जोशी 
अभिनेता सचिन आजही पूर्वीसारखाच निदान दुरून तरी दिसतो. फोटोत तर कोणीही छान दिसते किंवा बहुतेक मंडळी त्या वंदना गुप्तेसारखे जुने पुराणे डीपी, आजही तरुण आहोत भासविण्यासाठी ठेवतात. तरुण असणे आणि तरुण दिसणे यात मोठी तफावत असते. एकदा मी एका पुणेकर बाईचे नेत्याशी असलेले प्रेमप्रकरण छापले होते, ती भेटून मला म्हणाली, भाऊ नका छापू, दोन पैसे मिळवू द्या कि मला तसेही त्या नेत्याचे विदर्भातल्या पावसारखे आहे, म्हणजे तुमच्या विदर्भात जोराचा पाऊस आता येईल मग येईल असे उगाचच वाटत राहते आणि पाऊस काही पडत नाही, जमीन तृप्त होत नाही, त्यानंतर नाही मी कधी लिहिले त्या दोघांवर...

अभिनेता सचिनची आठवण येथे त्या ' बालिका वधू ' सिनेमावरून झाली. त्या सिनेमातली अभिनेत्री रजनी शर्मा एकदा मी आणि ती एकत्र स्विमिंग करीत होतो, जिच्यासाठी सचिन त्या सिनेमात, बडे अच्छे लागते हो, म्हणतो, तीच रजनी आज कशी हिडिंबा, तिला बघून वाईट वाटले. राज्याचा माहिती आणि जनसंपर्क बहुतेक वेळा रजनी सारखा मी ओबडधोबड बघितलेला आहे पण अधून मधून या खात्यात महासंचालक म्हणून काही चांगली माणसे येतात आणि हे खाते सुंदर करून निघून जातात, पुढला महासंचालक चांगला आला, चांगला निघाला तर ठीक अन्यथा या खात्यात काम करणारे काही बिलंदर, झारीतले शुक्राचार्य पुन्हा या खात्याचे बारा वाजवून मोकळे होतात...

श्री ब्रिजेश सिंग तसे आयपीएस म्हणजे बडे पोलीस अधिकारी पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना येथे आणले, सुरुवातीला आम्हाला वाटले अननुभवी अधिकाऱ्याच्या हाती राज्याचे हे अत्यंत महत्वाचे खाते म्हणजे एखाद्या हिंदी सिनेमात प्रमुख भूमिकेत तेही दीपिका पदुकोण सांगे डॉ. निलेश साबळेला घेण्यासारखे पण माझे निदान चुकले, डॉ. ब्रिजेश सिंग यांनी आतापर्यंत या खात्यात म्हणजे गेल्या तीन वर्षात केलेले काम सदैव ध्यानात ठेवण्यासारखे, त्यांनी खात्यातल्या साऱ्यांना कामाला लावले आणि खाते हिरवेगार केले, ज्याकडे बघून प्रसन्न वाटावे...

ज्या ज्या मुख्यमंत्र्याने चौफेर ज्ञान असलेल्या उत्तम महासंचालकाला या खात्यात आणले त्या त्या मुख्यमंत्र्यांच्या प्रसिद्धीचे काम आपोआप सोपे झाले असे मला नेहमी वाटते. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सर्वप्रथम एक काम केले त्यावेळी त्याकाळी अतिशय चुणचुणीतपणे काम करणाऱ्या दिवंगत अरुण पाटणकर यांना म्हणजे प्रशासकीय अधिकारी मनीषा म्हैसकर यांचे पिताश्री आणि मिलिंद म्हैसकर यांचे सासरे, अरुण पाटणकरांकडे यांच्याकडे माहिती खात्याची जबाबदारी सोपविल्यानंतर त्याकाळी घडले असे कि शरद पवार हे सुधाकरराव नाईक यांच्यासमोर फिके पडले. अर्थात पवारांच्या पुढून आणि गाढवाच्या मागून जायचे नसते हे नाईकांच्या लक्षात न आल्याने नेमके तेच घडले, पराक्रमी नाईक राजकारणात शेवटच्या श्वासापर्यंत बाजूला पडले....

ह्यो मुख्यमंत्री म्हणजे एक अजब रसायन आहे असे मला अनेकदा त्यांनी घेतलेल्या निर्णयावरून वाटते. त्यांनी घेतलेले काही निर्णय, चुकीचे घेतले, असे सुरुवातीला वाटते, नंतर लक्षात येते कि हा माणूस अफलातून आहे म्हणून आज या राज्याचा मुख्यमंत्री आहे. माहिती आणि जनसंपर्क खात्याचे महासंचालक कायम प्रशासकीय अधिकारी असतात पण फडणवीसांनी भलतीच रिस्क घेतली त्यांनी चक्क एका आयपीएस अधिकाऱ्याला आणले, सुरुवातीला म्हणून तेच वाटले कि आपले हे मुख्यमंत्री हेमा मालिनी ऐवजी चक्क निरुपा रॉय च्या प्रेमात पडले पण आमचे हे निदान चूक ठरले, ब्रिजेश सिंग या खात्याची शान वाढवून मोकळे झाले आहेत, त्यांनी या खात्यात जान आणली आहे....

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, श्रीमान ब्रिजेश सिंग आणि माहिती व जनसंपर्क खात्याने अत्यंत अत्यंत चांगला धाडसी दूरदर्शी उपयोगी घेतलेला निर्णय म्हणजे या राज्यातले असे अनेक वर्तमान पत्रे आहेत जी कधी छापल्या देखील जात नाहीत, ज्यांचा अजिबात खप नाही, अनेक विधी अंगांनी जे फाल्तुक आणि वादग्रस्त ठरले आहेत अशा बहुसंख्य वर्तमान पत्रांना यापुढे करोडो रुपयांचे वाटोळे करणाऱ्या शासकीय जाहिराती देणे थांबविले आहे. गम्मत सांगतो, माझ्याकडे राज्यातल्या विविध जिल्ह्यातून, भागातून महिन्याकाठी किमान पन्नास विविध वृत्तपत्रे येतात, त्यात साप्ताहिके, दैनिके, पाक्षिके असतात, यांपन्नासातले फारतर मी २ किंवा ३ त्या नागपुरातून निघणाऱ्या ' विदर्भ मिरर ' सारखी वृत्तपत्रे वाचतो, बाकीची बहुतेक वृत्तपत्रे कोपऱ्यात भिरकावून मोकळा होतो. एक महत्वाचे सांगतो, जी वृत्तपत्रे त्या विदर्भ मिरर सारखी दर्जेदार असतील, अशा वृत्तपत्रांना जर शासनाने जाहिराती देणे बंद केले तर अशांसाठी प्रसंगी मी स्वतः मंत्रालयाच्या दाराशी उपोषणाला बसेल.मायबाप सरकार, तुम्ही हरामखोर आणि चोर पत्रकारांच्या ढुंगणावर अवश्य लाथा मारा पण राम शिवडीकरांसारख्या अप्रतिम दर्जेदार सर्वांगसुंदर वाचनीय संग्राह्य दिवाळी अंक काढणाऱ्या संपादकाला, मालकाला अगदी बोलावून सन्मानाने त्यांना हव्या तेवढ्या किमतीच्या जाहिराती उपलब्ध करून द्या, असे संपादक असे मालक जगायला हवेत. उद्याचा मराठवाडा नावाने राम शेवडीकर जो दरवर्षी दर्जदार दिवाळी अंक काढतात, असे पत्रकार टिकायला हवेत, आर्थिक दृष्ट्या काहीही करून त्यांना जगवायला हवे....
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Monday, 26 February 2018

वृत्तपत्रांचा मृत्युलेख १ : पत्रकार हेमंत जोशी

वृत्तपत्रांचा मृत्युलेख १ : पत्रकार हेमंत जोशी 
अप्रतिम, अद्वितीय, अविस्मरणीय, वाचनीय, संग्राह्य, आणि हो, सुसह्यय देखील, आणि लिखाण कोणाचे तर संजय राऊत यांचे...तरीही...वाचलात का, वाचला नसेल तर मिळवा आणि संजय राऊत यांचा रविवार दिनांक २५ फेब्रुवारी २०१८ चा सामना दैनिकातील उत्सव पुरवणीत, ' ३२४ मराठी वृत्तपत्रांचा मृत्युलेख ' हे रोखठोक लिखाण अवश्य वाचा. कुठे कुठे गडबड आहे, पण त्यातही प्रामाणिकपणा असल्याने लिखाणाची, लेखाची भट्टी मस्त जमून आली आहे. एकदा मी सहजच गप्पांच्या ओघात भाऊ तोरसेकरांना विचारले होते, लिखाण उत्तम कोणत्या पत्रकाराचे त्यावर त्यांनी निखिल वागले आणि संजय राऊत यांचे नाव घेतले होते पण ध्यानात हृदयात मनात ठेवावे असे कधी संजय राऊत यांचे लिखाण माझ्या फारसे कधी वाचण्यात नव्हते. ते नेमके चांगले कसे, त्यांच्या या रोखठोक लेखातून कळले...

आता भाऊ तोरसेकर कोण, निदान हे तरी विचारण्याचा करंटेपणा एखाद्या वाचकाने करू नये, पुण्यातले करतात असे म्हणजे माणूस कितीही मोठा असला आणि तो पुण्याचा नसेल तर ते त्याच्या तोंडावरच विचारतात, तुम्ही नितीन गडकरी म्हणजे कोण, तुम्ही काय करता, इत्यादी इत्यादी, उद्या एखाद्याचा बाप पुण्याबाहेरचा असला तरी पुण्यात स्थयिक झालेला प्रसंगी बापालाही तोंडावर विचारून मोकळा होईल, तुम्ही कोण....

संजय यांनी लिहिले आहे, वृत्तपत्रस्वातंत्र्य ही कुणाचीही वैयक्तिक मालमत्ता नाही, पण राज्यकर्त्यांना या स्वातंत्र्याची मालकी स्वतःकडे हवी आहे. ३२४ मराठी वृत्त पत्रांना सरकारी जाहिरातींच्या यादीवरून सरकारने काढून टाकले आहे आणि इतर ७०० जिल्हा वृत्तपत्रांवर ही कुर्हाड चालविण्याची तयारी सुरु आहे. पाचदहा भांडवलदार वृत्तपत्रांना बळ देण्यासाठीच हे चालले आहे. ३२४ जिल्हा वृत्तपत्रांचा हा मृत्यूलेखच आहे...

राऊतांनी हे असे लेखन चांगले केले आहे पण लिखाणात फारसा दम नाही, त्यांनी केलेले लिखाण अतिशय एकतर्फी वाटले. जाहिराती बंद करण्याची वेळ वृत्तपत्र मालकांनी स्वतःवर ओढवून घेतलेली आहे त्यापुढे जाऊन मी असे म्हणेन कि काहीही न लिहिता येणारे अनेक वृत्तपत्र मालक आणि माहिती व जनसंपर्क खात्यातील जाहिरात विभागातले अधिकारी, कर्मचारी संगनमताने सरकारच्या तिजोरीवर दरोडा घालत होते, या सरकारने म्हणजे फडणवीसांनी हिम्मत दाखविली आणि त्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून चाललेले हे रॅकेट, हे दरोडा सत्र थांबविले, शासनाची अप्रत्यक्ष जनतेची गेल्या कित्येक वर्षांपासून होणारी आर्थिक लूट या सरकारने थांबविलेली आहे त्यात त्यांचे चुकले अजिबात वाटत नाही. अधिक चूक आमच्यातल्या काहीही न करता जाहिरातींच्या माध्यमातून सरकारला लुटणाऱ्या वृत्तपत्रांच्या मालकांची आहे, एकही क्षण अमुक एखादे भरमसाठ शासकीय जाहिराती घेणारे वृत्तपत्र हाती घेऊन वाचावे असे होत नाही पण अशी अनेक वृत्तपत्रे शासनाला लुटून मोकळी झाली आहेत, मोकळी होताहेत. चांगले वृत्तपत्रे काढणाऱ्यांच्या पोटावर हे शासन पाय देईल, मला नाही वाटत असे होईल, इकडली तिकडली कात्रणे जमा करायची, अशी शिळी कात्रणे जमा करून तेच म्हणजे इतरत्र आलेले लिखाण छापून मोकळे व्हायचे आणि असली भिकारडी वृत्तपत्रे सरकारला दाखवून पैशांनी तेही माहिती आणि जनसंपर्क खात्यातील काही भ्रष्ट मंडळींना हाताशी धरून संगनमत करून लुटायचे, चुकीचे होते, त्यावर सविस्तर पुढल्या भागात...


पत्रकार हेमंत जोशी 

Sunday, 25 February 2018

गुड बाय श्रीदेवी : पत्रकार हेमंत जोशी


गुड बाय श्रीदेवी : पत्रकार हेमंत जोशी 
तो एक योगायोग असावा म्हणजे २४ फेब्रुवारीला श्रीदेवी अचानक आपल्यातून निघून गेली कायमची, तेही दुबईत, तीही दुबईत आणि मी देखील दुबईतच होतो. फेब्रुवारी मध्ये दुबईत फूड इंडस्ट्रीशी संबंधित फार मोठे जागतिक स्तरावरचे प्रदर्शन असते, ते बघायला आलो होतो आणि बातमी कानावर आली, श्रीदेवी गेल्याची....

सर्वप्रथम मी श्रीदेवीला बघितले ते जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेल मध्ये मी पोहण्यासाठी जात असे, अनेक सिने स्टार तेथेच पोहायला येतात, कोणाकोणाची नावे सांगू...साधारणपणे १५-१६ वर्षे उलटली असतील, श्रीदेवी तिच्या दोन्ही मुलींना स्विमिंग करण्या घेऊन येत असे, मुली पोहायच्या, श्रीदेवी डोळ्यात तेल घालून त्यांच्याकडे एकटक बघत असे. तशी ती बोलायला साधी सरळ होती, पण या सिने स्टार्स शी बोलायला गेले कि ते उगाच भाव खातात, त्यातले ऋषींकपूर सारखे काही महाभाग पाणउतारा देखील करतात, म्हणून त्यांच्यापासून चार हात लांब राहून गम्मत बघणे योग्य ठरते...

त्यानंतर काही वर्षे उलटलीत आणि श्रीदेवीने मी आधी ज्या सात बंगला परिसरात राहत असे त्या इमारतीला लागूनच बंगला घेतला ज्या बंगल्यात नाग नागिणीचे वास्तव्य असल्याने तो रिकामाच पडलेला होता. हा बंगला घेतल्यावर तिला ते काही महिन्यांनी कळले त्यामुळे त्या बंगल्याचे तिने सुशोभीकरण करूनही तेथे ती राहायला आली नाही. नंतर म्हणे तिने बोनी कपूर साठी त्यावर कर्ज देखील घेतले होते, तसा तो बंगला आजही अशुभ मानल्या जातो त्यामुळेच सहज शक्य असूनही मी तो घेतला नाही. पण अनेकदा ती त्या बंगल्यात सहजच येऊन बसायची, निघून जायची, आम्हाला ती तिथे फिरतांना दिसायची...

असा हा योगायोग, म्हणाल तर माझे अनेकदा श्रीदेवी च्या आसपास वास्तव्य असायचे पण फिल्मी मंडळींपासून चार हात दूर राहणे केव्हाही चांगले म्हणून शक्य असूनही मी तिच्या पासून दूर होतो आणि ती गेली तेव्हा मी देखील दुबैतच होतो, असेल काहीतरी मागल्या जन्माचे नाते. जे दिसायचे त्यावरून ती अत्यंत हळवी असावी म्हणूनच तिने त्या टकल्याशी लग्न केले आणि नटी असूनही शेवटपर्यंत नाते टिकविले...

अलीकडे ' तुमच्यासाठी काय पण ' कार्यक्रमात वयाच्या तिशीतच चार दोन वेळा आडनावे बदलविणारी भार्गवी नावाची नटी, कुठल्याशा नटीविषयी अनुभव सांगत होती कि त्या दोघी दुबई मध्ये असतांना मीना बाजार मध्ये खरेदी करतांना भान विसरल्या आणि त्यांची विमानतळ गाठताना तारांबळ उडाली. या किस्स्यांवरून मला एक चुटका आठवला,हिंदीतला खलनायक म्हणतो, उस पेडके नीचे पचास करोड लेके आना,आणि मराठीतला खलनायक म्हणतो, त्या झाडाखाली पन्नास हजार रुपये घेऊन ये...हे असे कर्मदरिद्री बोलणे भार्गवीच्या बोलण्यातून आले. दुबईतल्या मीना बाजार मध्ये खरेदीला जाणे म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेणे किंवा ज्यांच्या खिशात पैसे नसतात ते तेथे जातात आणि त्या कार्यक्रमात भार्गवी असे सांगत होती जणू त्यांना एमिरेट्स मॉल मध्ये खरेदी करतांना उशीर झाला. आपण मराठी हे असे अर्धवट ज्ञानातून आपले अमराठी लोकांत हे असे हसे करून घेतो. भार्गवीला वाटले असावे, सारे मराठी माणसे उल्लू आहेत, काहीही सांगितले तरी चालते...

पूर्वी नाही का, अमुक एखाद्या घरातला परदेशात गेला कि आपल्याला वाटायचे तो तेथे खूप मोठा माणूस आहे पण असे अजिबात नसते, येथे भारतातली माणसे अनिवासी भारतीयांपेक्षा कितीतरी अधिक सुखाने जगतात, जे तेथे गेले नाहीत त्यांचा तो भ्रम असतो....
श्रीदेवी ला मनापासून श्रद्धांजली..!!

पत्रकार हेमंत जोशी 

Wednesday, 21 February 2018

Municipal Commissioner's of MMR--you are in a spot!!

Municipal Commissioner's of MMR--you are in a spot!!

RSS needs to intervene in BJP's working now--Period. If what RSS flaunts discipline & sacrifice as their sole criteria it's sister concern the BJP karyakarta's in Maharashtra are severely lacking both these qualities. They say a person trained at RSS knows the real meaning of life and lives happily ever after but in case of the BJP whose karyakarta's flaunt of attending shakha's are no where close to what is expected out of them or what is being taught at the Shakha's. Then what is the difference between you & the others, BJP? Why the double standards? I have taken case study of recent setbacks some Municipal Commissioners have taken and the reasons behind it. Let's go it detail...

What I hear, in the RSS there is an absolute discontent for BJP Maharashtra due to the latest imports the party has carried out since last 3 years in power. RSS wouldn't blink an eyelid before declaring the BJP atmosphere as polluted due to these recent imports who are the "non-sacred" one's. One of them a recent MLC is touted as the mini CM and supposed to be the closet to CM Fadnavis. Also the Sangh representative at the CMO has turned into another deal maker, I hear. How will the state progress? How long will the CM continue to hold the fort remains the question? And how long will the able officers work? It will take no time for these officers to loose faith in CM Fadnavis who otherwise is their messiah..Believe me, when I say this...They all have immense respect for Fadnavis, but the corporators and the MLAs are ruining it for the CM. Read on...

Anyway, the same BJP inspired by RSS has given us Atal Bihari Vajpayee & Devendra Fadnavis. Now time has come for RSS chief Mohan Bhagwat to call each & every BJP worker & to make them compulsorily attend SANGH for next 3 months of their lives starting today. I say this, because I see no difference between a hooligan (whom we voted all these years) & BJP. The MLA's & the Corporator's all need to be under strict monitoring at the SANGH SHAKHA. Then only there will be a change. Now such is the time, that these BJP walas are behaving worst then Congress / NCP/ SS. BJP  flaunts about down to earth nature & discipline and all that right wing things right? Where is it these days my friends you see in the BJP? Have sangh waala's too have become businessmen? 

Take Mumbai Metropolitan Region's Corporations-To begin, lets talk about the biggest corporation in Asia -the BMC--In all honesty Ajoy Mehta, it's commissioner should tell me if he goes to perform his duty with absolute No Fear attitude? Earlier Commissioner's were scared of a particular caste or party but now in the last few months I'm sure there is no difference in any of the corporator; just the party symbol has changed to pressurise/blackmail the MC's. Take the case of Sanjeev Jaiswal running the show for Thane Municipal Corporation. Though many would argue that why did Jaiswal get frustrated only after completion of his term, the point remains--lets talk about the development this alone person has made. Thane is such a corporation that all the parties have equal dominance. And dominance in these semi-urban corporation need not be through phone calls coming from the top; it also means hooliganism display at all the meetings, morchas, dadagiri, pressurising MC to get everything signed when & where they want. For these people there is no IAS or IRS. For them the Commissioner's are a doll in their hand whom they have been playing with since years, but the recent crop of officers refuse to budge. 

Jaiswal is one of them. He did not budge. He kept on his good work. Then I read day before about Panvel Corporation's boss Dr. Sudhakar Shinde. The farer you move from Mumbai, the tougher it gets. AN MLA (changed party 4 times, till what I know) who got patted by PM Modi just day before I hear he is the most troublesome of all. He wants everything going his way. Says his father Ramsheth got everything on a platter even I want the same. Then there is closest associate of Nitin Gadkari who is the biggest Dalaal at JNPT again troubling the smooth running of business for the Corporation. Problem is these notorious one's are so thick with the rest of the corporation staff's that the Municipal Commissioner hardly gets any support for his team. OK, if these MC's catch hold of this staff for making some extra bucks or favouring someone, all the MC can do is suspend them. But again such is our code of business, that the appeal is in the hands of the same corporators who have got helped. Obviously, the suspension gets revoked.

Then there is messiah of all Bhiwandi Municipal Corporation headed by Dr. Yogesh Mhase. I always tell him, that your service to Aaba (Late RR Patil) has all this time saved you for either being shot or kidnapped or even a gun to your head for file clearance. 10 lakh people stay in Bhiwandi out of which only 2 lakhs are locals rest 8 lakhs are illegal. yes, the figure is correct. For 17 years now, none of the locals have paid Corporation a dime to get water. Such is the sorry state of affairs that Mhase had to work day in & day out to get it out of its financial mess. Property Tax collected from 8 lakhs is in tune of Rs. 50 crore now because of Mhase. Heard the Mayor of Bhiwandi had himself taken out a Morcha against Mhase as he had stopped issuing new tenders and payment of contractors. 500 people out of 10 lakhs participated with the MAYOR. What more you want. People want change, I'm sure. But again there is MP Kapil patil who is mother of everything. At first he got Ashwini Joshi transferred and now he wants all these officers to go. Similar thing at Ulhasnagar led by Rajendra Nimbalkar and similar story at Mira Bhayander which as led by Dr. Naresh Geete. I mean what was going on in CM's head when he obliged MLA Narendra Mehta by transferring Geete? It surely has given out a wrong message and nothing but the image of BJP gets hampered.

But what I have learnt or rather seen, these MLA's when a good officer is doing something good for the corporation or the city, these MLA's every night throng at Varsha. They pressurise CM so much so that ultimately the CM has to give up on his stand. And believe me the pressure tactics are not any less than blackmailing, emotional I meant. Some transfers happen due to political obligations. Like in the case of Geete at Mira-Bhayandar. 

But what has happened, if we look from the birds eye view, in all this process of honest officers getting the boot CM's image has taken a beating. Like, I'm sure CM knew about the antics of Narendra Mehta and his money making ways, CM could have strictly said no to him for transfer of Geete. Similarly with Tukaram Mundhe at Navi Mumbai, even though he is compensated by coming to Nahsik, almost a year he was given a side posting at Pune. By the way, it is not BJP MLA's doing this nautanki but the corporator's of BJP are doing this too. BJP, I mean, you were born with niti and discipline right ? That's why I mentioned all these people need to attend Shakha's for the next 3 months minimum to understand BJP its function and working style.

The only solace to these Commissioner's are Dr. Pravin Pardeshi, Dr Nitin Kareer & Smt. Manisha Mhaiskar. Like a rock this trio is protecting them from the ire of these conniving MLA's & Corporators'. But how long will these 3 hold the fort? At the end of the day, the only can give a report card when it comes to transfers but the baton lies in the hands of CM. How I miss Narayan Rane & Ajit Pawar who protected their bureaucrats? Shhhhh!! My appeal to Ajoy Mehta, Sanjeev Jaiswal, Yogesh Mhase, Naresh Geete, Sudhakar Shinde, Rajendra Nimbalkar--सर सलामत तो पगड़ी पचास!!

Vikrant Joshi

Sunday, 18 February 2018

संघ आणि भाजपा ६ : पत्रकार हेमंत जोशी


संघ आणि भाजपा ६ : पत्रकार हेमंत जोशी
उत्तम हिंदू संस्कार होण्यासाठी केवळ रा. स्व. संघाच्या शाखेतच जायला हवे असे अजिबात नाही, भाजपा सोडून संघ ज्या विविध प्रांतात काम करतो तेथे कुठेही काम करा, आयुष्यातले काही क्षण तेथे नक्की घालवा किंवा तुमच्या मुलांनाही संघ परिवारात, परिघात पाठविल्यास त्यांना नक्की नेमके हिंदुत्व कळेल. होय, मनावर आपोआप उत्तम संस्कार होऊन आपण बाहेर पडतो. १९९५ नंतर मात्र भाजपा हा अटलजी, दिनदयालजींचा राहिलेला नसून जवळपास सारेच भाजपा नेते मुंडे महाजनांची नक्कल करताहेत, त्यामुळे तेथेही अलीकडे चांगले नेते अभावाने बघायला मिळतात, भाजपाचीही काँग्रेस झालेली आहे, देशाचे किंवा राज्याचे नव्हे कुटुंबाचे आधी भले करावे व्हावे असे आता तेथेही ज्याला त्याला वाटते, त्यांच्यातले अनेक ज्ञानाचे डोस मात्र अगदी खिरापती सारखे वाटून मोकळे होतात....

एक उदाहरण देतो, मी सांताक्रूझ पश्चिमेस असलेल्या माझ्या इमारतीतून जेव्हा बाहेर पडतो, स्वामी विवेकानंद रस्त्यावरून माझ्या माहीम पश्चिमेच्या कार्यालयात जातो, आश्चर्य म्हणजे सांताक्रूझ ते माहीम दरम्यान असा एकही स्पॉट नाही जेथे बदाबदा मुस्लिम वावरतांना दिसत नाहीत, याचा सरळ अर्थ असा मुंबईतील हा पश्चिमेला असलेला अत्यंत गजबजलेला महत्वाचा परिसर, या परिसरातील रस्त्यावर हिंदू अभावाने आढळावेत, मोठे दुर्दैव आहे, आणि पूर्वीची म्हण आता बदललेली आहे, अलीकडे, भटाला दिली ओसरी, असे होत नाही तर भटाऐवजी मुस्लिमाला दिली ओसरी, मुस्लिम हातपाय पसरी, हा बदल त्यांनी घडवून आणला आहे, मुंबई शहरातील महत्वाचा परिसर मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणावर व्यापल्याचे चित्र जिकडे तिकडे बघायला मिळते. मुस्लिमांची दादागिरी आणि संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आम्ही हिंदू केवळ मनातल्या मनात फारतर राग व्यक्त करतो, आम्ही हतबल आहोत कारण आम्ही अजिबात संघटित नाही, आमचे नेते आम्हाला संघटित करायला तयार नाहीत कारण त्यांचे मतदान जातीपातीतल्या दुफळीवर अवलंबून असल्याने त्यांना आम्हाला संघटित करण्यात अजिबात रस उरलेला नाही. त्याचवेळी संघटित आणि आक्रमक ठरलेल्या मुस्लिमांचे करावे तेवढे कौतुक कमी, जे आजतरी अल्प असूनही आम्हाला पुरून उरताहेत, त्यांच्या समोर आम्ही हिंदू कमी पडतो, गांडू ठरतो....

आमचा संपूर्ण परिसर मुस्लिम आणि ख्रिश्चनांनी मोठ्या प्रमाणात व्यापलेला, अशावेळी कौतुक करावे तेवढे कमी त्या आशिष शेलार यांचे, जे शेलार या परिसरातून स्वतः आमदारकीला निवडून तर येतातच वरून ते मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पक्षाचे, भाजपाचे नगरसेवक निवडून आणतात आणि खासदारकीच्या निवडणुकीतही शेलार यांच्याकडे बघूनच मतदार मतदान करून मोकळे होतात, भाजपाचा उमेदवार कोण, त्यांना महत्वाचे नसते....अलीकडे मोहन भागवत यांच्या बोलण्याचा, भाषणाचा, वक्तव्याचा विपर्यास केला गेला. हसू तर तेव्हा आले जेव्हा शरद पवारही म्हणाले कि संघ स्वयंसेवकांना सीमेवर हाफ पॅन्ट घालून पाठवावे, पवारांना अलीकडे वयोमानानुसार विसरायला होते वाटते कारण संघाने हाफ पॅन्ट सोडली आहे आणि ते फुल पॅन्ट घालताहेत, हे ऐनवेळी पवारांना आठवले नसावे. थोडक्यात, संघ नेमका कसा अनेकांना माहित नव्हते किंवा नसावे म्हणून मी या अंकात जसे जमले तसे संघावर बरे वाईट लिहून मोकळा झालो आहे.... 
तूर्त एवढेच.

पत्रकार हेमंत जोशी 

भय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी


भय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी 
आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे पुढे त्या भरवशावर पैसे कामविणाऱ्यांचे लोकांना फसविणाऱ्यांचे प्रमाण फार मोठे आहे. मुंबईतीलाच एक फ्रॉड पत्रकार आहे, त्याने ज्यांना ज्यांना फसविले आहे असे किमान शंभर सत्य किस्से तर माझ्याकडेच पुराव्यांसहित आहेत, म्हणजे हा असा बेरड आणि चीटर पत्रकार कि ज्याने लग्न न करता मूल जन्माला घातलेले आहे, ना तो त्या मुलाचा स्वीकार करायला तयार आहे ना त्या एकट्या पडलेल्या तरुण स्त्रीला तो आधार वाटतो आहे, तरीही हे महाशय ताठ मानेने जगताहेत, कधी शरद पवार त्यांना डोक्यावर घेतात तर कधी या पत्रकार व भामट्या पद्धतीने नेतेगिरी करणाऱ्याला थेट देवेंद्र फडणवीस जवळ घेऊन मोकळे होतात. बड्या धेंडांसोबतचे फोटो लोकांना दाखवून त्यांची आर्थिक आणि शारीरिक फसवणूक करणे त्याला त्यातून सहज शक्य होते. नेत्यांनी, मान्यवरांनी कोणत्याही व्यक्तीसंगे फोटो काढण्यास परवानगी देण्याअगोदर नेमकी माहिती घेणे आवश्यक असते कि समोरची व्यक्ती त्या लायकीची आहे किंवा नाही....

थेट राष्ट्र्पतींपासून तर पंतप्रधानांपर्यंत जो तो त्या भय्यू महाराजांना पाया पडतोय, असे फोटो मुद्दाम व्हायरल केले जातात आणि भय्यू महाराज नेमके देव कसे परमेश्वर कसे युवराष्ट्रसंत कसे, महान कसे, संत महाराज कसे असे मोठ्या खुबीने सांगितल्या जाते आणि पुढे त्यातून घडते ती सामान्यांची फसवणूक, वास्तविक या देशातले मान्यवर का म्हणून भय्यू महाराजांच्या पाया पडून मोकळे होतात हे त्यांनी नेमके लोकांसमोर येऊन सांगायला हवे. असे कोणते चांगले अनुभव या बड्या मंडळींना त्या भय्युजीपासून आले आहेत, ते स्पष्ट व्हायला हवे....एखाद्या मान्यवरासंगे फोटो काढल्या गेला आहे म्हणजे तो माणूस त्या नेत्याशी किंवा अन्य कुठल्याही मान्यवरांशी क्लोज आहे, त्यांच्या जवळचा आहे, असे अजिबात नसते. उद्या मी सई ताम्हणकर संगे फोटो काढून घेतला म्हणजे माझे आणि तिचे सध्या प्रेमप्रकरण सुरु आहे असे अजिबात नसते आणि असे असेल तर उद्या मी पत्रकार राजन पारकर याचे अभिनेत्री सोनाली सांगे फोटो काढण्याची व्यवस्था करून मोकळा होतो, मग बंटी पाटलांसारख्या एखाद्या नेत्याने असा अर्थ काढायचा का कि तिचे राजन पारकर सोबत देखील प्रेमप्रकरण सुरु आहे...थोडक्यात अमुक एखाद्या बड्या व्यक्तीसंगे फोटो काढून घेतले म्हणजे तो फोटो काढून घेणारा देखील खूप मोठा आहे असे नसते उलट काढून घेतलेल्या फोटोंचे भांडवल करणारे नेहमी चीटर असतातच हे गृहीत धरून आपण कायम सावधगिरी बाळगावी....

ज्या इंदोर मध्ये भय्यू महाराजांचा मुख्य आश्रम आहे, निवासस्थान आहे तेथल्या एका पत्रकाराने, संझा लोकस्वामी नावाने वृत्तपत्र चालविणाऱ्या जितू सोनी या पत्रकाराने भय्यू महाराजांचे एक प्रकरण बाहेर काढून सध्या मोठी खळबळ उडवून दिली आहे. किंबहुना सोनी यांनी जे प्रकरण बाहेर काढले आहे तीच भय्यू महाराज यांची सर्वसामान्य देव भोळ्या भक्तांची फसवणूक करण्याची नेहमीची पद्धत आहे असे आता उजेडात येते आहे, ज्यांना हे असे विकृत अनुभव भय्यू महाराजनकडून आले ते हळूहळू बोलायला लागले आहेत, प्रकरण फार गंभीर आहे. मुंबईतील एका श्रीमंत व्यापाऱ्याला इंदोरच्या आश्रमात पैशांनी आणि शरीराने कसे नागडे करून लुटले, ते प्रकरण पुराव्यांसहित संझा लोकस्वामी ने छापले आहे, ' लेटेस्ट आयटम भय्यू अघोरी ' या मथळ्याखाली दिलेल्या माहितीने जे भय्यू महाराजांना आत बाहेर ते कसे ओळखत नाहीत अशा भक्तांमध्ये या लिखाणाने खळबळ उडवून दिली आहे... 

हे प्रकरण जसेच्या तसे येथे देत आहोत अवश्य वाचावे, वाचल्यानंतर भोळ्या भाबड्या मंडळींनी हे लक्षात घेतले पाहिजे कि या पृथ्वीतलावर कोणीही परमेश्वरी अवतार धारण करून आलेले नाही त्यामुळे अशा बुवा बाबांवर अजिबात विसंबून राहू नये, विश्वास ठेवू नये....


पत्रकार हेमंत जोशी 

Saturday, 17 February 2018

संघ आणि भाजपा ५ : पत्रकार हेमंत जोशी


संघ आणि भाजपा ५ : पत्रकार हेमंत जोशी 
शरद पवार यांच्या घरातील घराण्यातील एक किस्सा कायम ध्यानात ठेवण्यासारखा. पवार आणि त्यांची सख्खी सावत्र भावंडे त्या भावंडांची मुले त्या मुलांची मुले अशी एकत्र कुटुंब सदस्य संख्या जवळपास ४००-४५० एवढी आहे. काळाच्या ओघात सारे वेगवेगळे राहतात पण या संपूर्ण पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कुठलाही महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर त्या निर्णयावर अखेरची मोहोर शरद पवार यांचीच असते, अगदी आजही. मग तो नातेवाईक भलेहि जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असला तरी. बहुतेकवेळा तर शरद पवारांनाच बहुतेक सदस्य विचारून मोकळे होतात कि मी पुढे काय करू, मग शरदराव सांगतात, तू अमुक व्यवसायात जा, तू नोकरी, तू राजकारणात जा, इत्यादी इत्यादी. हे असे आपल्या समस्त हिंदूंमध्ये घडले तर म्हणजे ज्याला त्याला आपल्या जातीची रेषा मोठी करण्याचा नक्की अधिकार आहे पण दुसऱ्याची रेषा पुसण्याचा नाही थोडक्यात स्वतःच्या जातीचे नक्की भले करावे पण दुसऱ्या जातींचे नुकसान न करता आणि जेव्हा केव्हा हिंदू हा कॉमन अजेंडा असेल तेव्हा सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून, हात घट्ट पकडून प्रसंग मग तो कोणताही असेल एकत्र सामोरे जायचे, दुर्दैवाने पवारांच्या घराण्यासारखी एकी हिंदूंमध्ये नाही, आपण एकमेकांना विनाकारण खूप खूप पाण्यात बघतो, जातीतल्या जातींमध्ये देखील अनेक वाद त्यामुळे आम्ही सारे हिंदू विखुरल्या जात आहोत, हे चित्र चांगले नाही. प्रत्येकाची जात घराच्या उंबरठ्यापर्यंत ठीक असते, बाहेर पडल्यानंतर आम्ही सारे हिंदू, असा विचार जर प्रत्येकाच्या डोक्यात रुजला तरच कसेबसे टिकून राहणे शक्य होईल. हिंदूंच्या नैसर्गिक हक्कांचा बळी द्यायला तयार असणाऱ्या, केवळ मते पदरात पाडून घेण्यासाठी हिंदूंना कायम वेठीस धरणारे साऱ्याच विचारांचे नीच पुढारी, त्यावर उपाय एकच आहे, आम्ही सारे हिंदू संघटित असे अत्यावश्यक आहे...

वास्तविक कोणत्याही धर्माचे आमच्यावर आक्रमण होणे हे या हिंदुस्थानात सतत घडणे अत्यंत चुकीचे, असे घडले रे घडले कि त्या कृतींवर कडक कारवाई होणे आवश्यक असते पण नको बाबा त्या ख्रिसचनांना किंवा मुसलमानांना उगाच दुखावणे, नेत्यांच्या, राज्यकर्त्यांच्या या गांडू विचारातून आम्ही हिंदूच आता अल्प मतात झपाट्याने येतोय. महत्वाचे म्हणजे जी काही धर्मनिरपेक्षता संविधानात आहे,तिचे उल्लंघन हिंदुहिताला अगदी बिनधास्त ठोकरून होत आहे. हिंदूंचा अगदी उघड कोणीही वाली नाही, हिंदू समाजाला योग्य दिशा दाखविणारे किंवा हिंदूंना थेट जवळ घेणारे कोणीही दिसत नाही अशावेळी रा. स्व. संघ हा एकमेव हिंदूंचा उघड आधार वाटतो, संघातील काही त्रुटी दूर करा, आम्हीही संघाला जवळ घेऊ, जवळ करू, हा विचार मला वाटते पुढे येण्यास हरकत नाही पण संघाने नेमके, अमुक बदल करावेत हे सुचवितांना ' एकत्र हिंदू ' या विचारांना अजिबात तडा जात काम नये....

अगदी आपल्या राज्यातही, घराबाहेर पडल्यानंतर आम्ही सारे हिंदू, हे अजिबात डोक्यात नसते. जातींचा विखार केवळ प्रत्येकाच्या डोक्यात असतो. हा या जातीचा, तो त्या जातीचा या अतिशय संकुचित विचारातून सतत जे एकमेकांकडे बघून काम 
करायचे आहे किंवा नाही हे जे ठरवितो, हिंदूंमधला हा फुटीरवादी विचार तर हिंदूंना अतिशय घातक ठरलेला आहे. हे घडू नये केवळ रा. स्व. संघाला वाटते, ते एकत्र आलेत कि, आम्ही सारे हिंदू, हा एकमेव विचार त्यांच्या डोक्यात असतो आणि हाच विचार पुढे जाणे अत्यंत गरजेचे आहे. येथे या अंकात मी अत्यंत प्रखर आणि स्पष्ट शब्दात हिंदूंच्या ऐक्याचे महत्व विशद करीत असतांना कुठेही इतर धर्मियांना शिव्या घालण्याची गरजच पडली नाही, इतरांचे तसे होत नाही, ते मात्र हिंदूंवर अतिशय जहरी टीका करून आपल्या धर्माचे महत्व वाढविताना सतत दिसतात. त्यांची तशी हिम्मत होते कारण आम्ही आमचे नेते पोकळ विचारांचे आहोत, आम्ही विरोध न करता गप्पा बसतो, त्यांचे फावते, त्यांना वाटते हिंदू गांडू आहेत आणि हे असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे..आताची सध्याची हिंदू चळवळ हा केवळ रा. स्व. संघ आणि संघाशी संबंधित विश्व हिंदू परिषदेसारख्या विविध चळवळींचा अजेंडा आहे असे येथे का दिसते, इतर कोणालाहि फारसे का वाटत नाही कि हिंदूंचे संरक्षण करणे गरजेचे आहे ते. कदाचित तुम्हाला माहित नसेल कि निरनिराळ्या सामाजिक कार्ये करणाऱ्या चाळीस हजाराहून अधिक संस्था संघ परिवाराशी संबंधित आहेत, त्यातल्या अनेकांचे काम वरकरणी अगदी क्षुल्लक वाटत असेल, पण त्या साऱ्या चळवळींचे उद्देश सेम आहेत, दरखे आहेत, हिंदुत्वाचे संरक्षण करणे हेच त्या साऱ्यांचे काम आहे, मग हे काम इतर कोणत्याही हिंदूंनी हाती घेऊ नये याचे आश्चर्य वाटते. काँग्रेसला तर हिंदूंची ऍलर्जी असल्यासारखे ते आमच्याशी वागतात, वास्तविक ते हिंदूंच्याच भरवशावर निवडून येतात. इतर धर्मियांचे लाड करीत असतांना जणू आम्ही हिंदूंच्या गावचेच नाहीत हे असे त्यांचे वागणे घृणा आणणारे असते...

संघाची स्थापना १९२५ साली नक्कीच हिंदुराष्ट्राच्या प्रस्थापनेच्या ध्येयाने झाली, विशेष म्हणजे केवळ सत्ता मिळविण्यासाठी याच रा. स्व. संघाने आज स्थापना होऊन जवळपास शंभरी गाठतांनाही त्यांनी आपल्या भूमिकेत कोणतेही बदल केले नाहीत ते जसेच्या तसे हिंदु विचारांना आणि हिंदूंच्या ऐक्क्यासाठीच्या विचारांना चिटकून चिपकून आहेत, त्यांचे कौतुक वाटते. मंदिरांऐवजी संघ स्थानावर गेल्यानंतर प्रखर हिंदुत्ववादाचे खरे दर्शन तेथे घडते हे विशेष. हिंदूंच्या ऐक्यासाठी संघ विचारांनाच चिटकून बसायला हवे असे अजिबात नाही पण आपल्यातही विचारातून हिंदू ऐक्य दिसावे असे इतर कोणत्याही राजकीय किंवा बिगर राजकीय संघटनांना वाटत नसल्याने केवळ रा. स्व. संघ हा एकमेव उपाय हिंदूंकडे आहे म्हणून संघ शाखा ओस पडूनही संघाची व्याप्ती मात्र वाढतेच आहे...

अगदी आपल्या राज्याचाही विचार करावयाचा झाल्यास प्रत्येक जातीच्या नेत्यांनी त्यांच्या भल्यासाठी नक्की झटावे म्हणजे मराठ्यांनी आरक्षणासाठी लढावे, तेल्यांनी सवलती पदरात पाडून घेण्यासाठी आंदोलने करावीत, ब्राम्हणांनी विविध संमेलने भरववावीत, माळ्यांनी समता परिषदेच्या झेंड्याखाली एकत्र यावे पण हे सारे करतांना आम्ही सारे हिंदू हा महत्वाचा विचार डोक्यात ठेवून स्वतः नक्की मोठे व्हावे पण इतर जातींना शिव्या देऊन कमी हीन लेखून, त्या त्या जातीच्या नेत्यांनी, आम्ही बघा कसे आक्रमक आहोत हे दाखविण्यासाठी, एकत्र हिंदू विचार मागे पडेल असे वागू बोलू नये म्हणजे पुरुषोत्तम खेडेकरांनी नक्की सारे मराठे एकत्र आणावेत पण त्याचवेळी ब्राम्हणांना शिव्या घालून आपण फार मोठे होते, हे डोक्यातून काढून टाकावे, याउलट स्वतःची रेषा मोठी करणारे नेतेच कायम टिकतात, मोठे होतात म्हणून रामदास आठवले टिकून आहेत, ते समाजासाठी झटतांना त्यांनी इतर जातींना टार्गेट केले, कधीही घडलेले नाही म्हणून रामदास आठवले हे असे एकमेव नेते जे इतर जातीतल्या लोकांना देखील अगदी मनापासून आवडतात, असेच साऱ्यांनी वागावे, अहो, जाती फारशा महत्वाच्या नाहीत, हिंदूंचे ऐक्य अति अति महत्वाचे आहे.सहज सुचले म्हणून सांगतो, उद्या समजा रामदास आठवले यांनी एखादी निवडणूक लोकांमधून जर लढविली तर मला खात्री आहे इतरही समाज म्हणजे दुसऱ्या धर्माचे किंवा हिंदू देखील त्यांना अगदी मनापासून मतदान करून मोकळे होतील, त्यांच्याकडे काम घेऊन जाणाऱ्यांची त्यांनी कधीही आजपर्यंत जात विचारलेली नाही, सर्वांनी त्यांच्यासारखे वागावे. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे सरकारी कर्मचारी आणि अधिकारी फार मोठ्या प्रेमावर सरकारी कार्यालयातून जातीधर्माचे विष कालविण्यात आघाडीवर असतात, अशा नालायक मंडळींनी, प्रथम आम्ही हिंदू आहोत हे ध्यानात ठेवून हिंदुत्वाचे रक्षण करायला हवे...


पत्रकार हेमंत जोशी 

Thursday, 15 February 2018

संघ आणि भाजपा ४ : पत्रकार हेमंत जोशी


संघ आणि भाजपा ४ : पत्रकार हेमंत जोशी 
वाचक मित्रहो, आहार म्हणजे अन्न घेणे, झोप, भय आणि मैथुन म्हणजे प्रजा निर्माण करणे या चार गोष्टी माणूस आणि पशु यांच्यात समान आहेत. पण पशूंपेक्षा माणसाजवळ धर्म आणि संस्कार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत म्हणून धर्महीन आणि संस्कारहीन माणूस पशूसारखा असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जे उत्तम आहे ते सांगितलेच पाहिजे आणि जे उत्तम नाही किंवा विस्कटवल्या गेलेले आहे तेही येथे या लेखमालिकेतून सांगणार आहे. रा. स्व. संघातले स्वयंसेवक म्हणजे संघ सदस्य दररोज दोन वेळा एकत्र जमतात, ते ज्या मैदानावर एकत्र जमतात त्याला संघ शाखा असे म्हणतात. सकाळी सहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता संघ शाखा भरते पैकी प्रात: शाखेवर वयस्क सिनियर मंडळी प्रामुख्याने एकत्र येतात, अपवादाने शिशु आणि तरुणांना देखील सकाळी या, सांगितल्या जाते. संध्यकाळी लहान थोर सारेच संघ शाखेवर येतात. उत्तम हिंदू संस्कार आपल्या मुलांवर घडविण्याचे संघ शाखा हे प्रभावी माध्यम आहे दुर्दैवाने याने काळाच्या ओघात शिक्षण पद्धतीतीत आणि नोकरी व्यवसायात अलीकडे आपल्याकडे आमूलाग्र बदल झाल्याने आपल्या राज्यातल्या बहुतेक सायं शाखा एकतर बंद पडल्या आहेत किंवा ओस पडल्या आहेत जर या सायं शाखा बंद पडल्या नसत्या तर रा. स्व. संघाची सदस्य संख्या झपाट्याने आणि मोठ्या प्रमाणात वाढली असती. संघ शाखा बंद पडल्याने वाढण्याचे प्रमाण नक्की कमी झाले आहे...

सकाळच्या शाखा भरतात पण त्यातले बहुतेक निवृत्त असतात, त्यातून त्यांचे फारसे काही साध्य होत नाही. एक अत्यंत महत्वाचे कि संघ शाखा ओस पडल्याने संघात पूर्वी जे जिव्हाळ्याचे प्रेमाचे घरोब्याचे वैक्तिक संबंध सर्व संघ स्वयंसेवकांचे असायचे, जात पात न पाळता त्या परिसरातले संघ कुटुंब सदस्य ज्या एकोप्याने एकमेकांसाठी प्रचंड दारिद्र्य असतांनाही धावून जायचे ते आता राहिलेले नाही, फार फार कमी झाले आहे. नजर आणि नियत साफ ठेवून एकमेकांच्या कुटुंबासाठी धावून जाणारे संघ स्वयंसेवक खरेच विरळे पण ते आता पूर्वीसारखे राहिलेले नाही, कारण त्यांच्यात जिव्हाळा निर्माण करणारे संघ शाखा हे प्रभावी माध्यम जवळपास संपलेले आहे...

सायंकाळची सिनेमा वाहिन्या इत्यादी विविध आकर्षणे, प्रेम प्रकरणे, व्यसने आणि दिवसभराच्या अतिव्यस्ततेमुळे संध्यकाळी तरी कुटुंबात एकत्र बसून चार गोष्टी करू या, बदललेली शिक्षण पद्धती त्यातून सतत शिक्षणाभोवती केंद्रित असलेले विद्यार्थी आणि अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे संघ स्थानावर आजमितीला देखील कालबाह्य ठरलेल्या व्यायाम आणि खेळांचे प्रकार इत्यादी कारणास्तव संघ शाखा ओस पडल्या, बंद पडल्या. संघ शाखांचे कार्य पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीने चालते म्हणजे आजही जर संघात लाठ्याकाठ्यांवर भर दिला जात असेल आणि आधुनिक खेळांना स्थान नसेल तर संगणकाच्या माध्यमातून जग बघणारी आजची पिढी का आणि कशी संघ शाखे वर येणे पसंत करेल. आधुनिकतेकडे आणि स्वतःच्या करिअर कडे अति गांभीर्याने बघणारी तरुण पिढी, आऊट डेटेड ठरलेल्या संस्कृतीकडे आकर्षित होणे अशक्य आहे, त्यातून शहरी भागात तर अशक्य पण ग्रामीण भागातल्या संघ शाखा देखील बंद पडलेल्या आहेत, प्रमाण फार कमी झाले आहे. हिंदू संस्कार तर करणे आवश्यक आहेच पण त्याला आधुनिकतेची जोड जर संघाने दिली असती तर संघ शाखेचे आकर्षण कमी झाले नसते...

मला वाटते कि अमुक एखादा तरुण किंवा शालेय विद्यार्थी जर नियमित संघ शाखेवर जाणारा नसेल किंवा संघाशी संबंधित नसेल तर दरवर्षी मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यात तीन आठवड्यांसाठी जे संघ शिक्षा वर्ग भरविण्यात येतात त्यात संघाबाहेरच्यांना प्रवेश दिल्या जात नाही, हा बदल जर संघाने केला तर मला वाटते त्यानिमीत्ते का होईना संघ स्वयंसेवकांची संख्या झपाट्याने वाढेल, संघांचे कार्य नेमके कसे, हा प्रसार झपाट्याने होईल. पालक आपल्या मुलांवर उत्तम हिंदू संस्कार होण्यासाठी पोटच्या मुलांना नक्की या अशा संघ शिक्षा वर्गात अगदी आग्रहाने पाठवतील. पण हाफ पॅन्ट वरून फुल पॅन्ट वर यायला ज्या संघाने कित्येक वर्षे घेतलीत तो संघ सहजासहजी आधुनिकतेकडे झुकण्यास किंवा काळाच्या ओघात पटकन स्वतःमध्ये बदल करवून घेण्यास राजी होईल वाटत नाही....

संघातले नकळत बदलेले एक अतिशय सूक्ष्म निरीक्षण माझ्या गावातल्या उदाहरणाने सांगतो. आम्ही शाळेत असतांना जेव्हा संघ शाखेत जात असू किंवा संघ स्वयंसेवक होतो, संघातले त्या त्या गावातले अत्यंत महत्वाचे नगर संचालक हे पद असायचे, आजही आहे. ह्या पदाचा मानकरी त्यागावातला अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती त्या पदी आणून बसविल्या जात असे. आमच्यावेळी आमच्या जळगाव जामोद या गावातले नंबर वन श्रेष्ठ आणि वयाने ज्येष्ठ श्री अण्णासाहेब डिडोळकर त्यांच्या हयातीत अगदी अखेरच्या श्वासापर्यंत नगर संचालक या पदावर कायम होते किंवा शेजारच्या मलकापूरमध्ये माझ्या बहिणीचे मोठे दीर श्री प्रमोद डोरले हे होते किंवा खामगावला माझ्या धाकट्या बहिणीचे आजे सासरे भाऊसाहेब गुप्ते हे होते, थोडक्यात हिंदू समाजातले अतिशय मोठ्या दर्जाची व्यक्ती त्या पदावर विराजमान असे. आज याच माझ्या गावात आमच्या जोशी घराण्यातला, मिलिंद जोशी हा होतकरू सुविचारी तरुण नगर संचालक पदावर आहे, नेमके हेच खटकते आहे. म्हणजे डिडोळकर आणि मिलिंद जोशी यांच्या विचारात फरक नाही पण डिडोळकर हे अमिताभ होते तर मिलिंद हे अनिल धवन आहेत, डिडोळकर हे सचिन तेंडुलकर होते तर मिलिंद जोशी हे सलील अंकोला आहेत, अण्णासाहेब डिडोळकर हे हनुमंत होते तर मिलिंद जोशी फारतर हनुमंताच्या सेनेतले एक सदस्य ठरावे. डिडोळकरांमध्ये आम्ही थेट बाळासाहेब देवरस म्हणून बघत असू तर आजचे त्या मिलिंद कडे फारतर वासरात लंगडी गाय शहाणी, पद्धतीने बघून मोकळे होत असतील, थोडक्यात पूर्वीची ती माणसे जी रस्त्याने चालतांना, प्रत्येक गावकरी त्यांना झुकून आदराने नमस्कार करून आदरयुक्त भीतीने बाजूला होणे पसंत करीत असे, ती तशी माणसे आज संघात सर्वत्र त्यात्या पदावर नसल्याने, आदरयुक्त दरारा नक्की कमी झाला आहे, नको ती माणसे नको त्या पदावर आणून बसविल्या गेलेली आहेत. संघाकडे अनेक दर्जेदार विचारांचे देशभक्त पैसे न खाणारे पदाधिकारी असतांनाही तिकडे मंत्रालयात थेट मुख्यमंत्र्यांच्या शेजारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजिबात इच्छा नसतांना जर श्रीकांत भारती याच्यासारखा तद्दन चालू माणूस जर रा. स्व. संघाचा प्रतिनिधी म्हणून भरती केल्या जात असेल, जबदस्तीने घुसविल्या जात असेल तर इतरांनी संघाकडे का म्हणून आदराने बघावे....
अपूर्ण :

पत्रकार हेमंत जोशी 

Monday, 12 February 2018

संघ आणि भाजपा ३ : पत्रकार हेमंत जोशी


संघ आणि भाजपा ३ : पत्रकार हेमंत जोशी 
अगदी क्वचित प्रसंगी, अन्यथा संघ परिवारातले कोणीही जाहीर भाषणं ठोकतांनाकरतांना कधीही दिसणार नाहीत आढळणार नाहीत, केवळ संघ परिवार एकत्र येऊन त्यांचे पदाधिकारी विचार मांडतात संघवाले त्या प्रकाराला बौद्धिक म्हणतात, लहानपणी संघस्थानावर म्हणजे संघाच्या शाखेत किंवा संघातल्या विविध अनेक कार्यक्रमात असे बौद्धिके ऐकणे त्या वयात एकप्रकारे आपल्यावर जुलूम केल्या जातोय असे वाटायचे, बौद्धिके संपल्याशिवाय खायला मिळायचे नाही त्यामुळे तेथे उपस्थिती अनिवार्य असायची. पोटात गरिबीमुळे भूक असायची आणि बौद्धिके समजण्याचे ते वय देखील नव्हते त्यामुळे ते प्रदीर्घ बौद्धिके म्हणजे संकटे वाटायची. आमच्यातले बहुतेक खाली मान घालून झोपायचे, मी तर अनेकदा बसल्या बसल्या जागच्या जागी लुडकलो होतो, मग पुन्हा उठून बसायचे कारण बौद्धिके ऐकणे तेथे अत्यावश्यक असायचे, एकमेकांकडे एरंडेल तेल प्यायल्यासारखा किंवा एनिमा घेतांना जसा आपला चेहरा होतो त्या तशा चेहऱ्याने आम्ही एकमेकांकडे बघत असू...

भाजपा सत्तेत आल्याने भलेही संघ परिवारातले जे राजकारणात उतरले ते नितीन गडकरी यांच्यासारखे अनेक नेते मंत्री म्हणून श्रीमंत झाले आहेत किंवा असतील पण संघाने सत्तेतल्या भाजपाकडून आर्थिक मदत घेतली किंवा ते घेतात असे चुकुनही घडत 
नाही म्हणून जे संघावर टीका करतात किंवा ज्यांना संघ अजिबात समजलेला नाही त्यांनी संघ परिवारातल्या सामाजिक सेवा करणाऱ्या संस्थांचा व्यवस्थित सखोल अभ्यास करून तदनंतर टीका करावी. संघाने हाती घेतलेले जवळपास सारेच प्रकल्प मर्यादित आकाराचे दुर्गम भागात उभारलेले विविध संकटांना सामोरे जाणारे आणि अतिशय लहान क्षेत्रात काम करणारे असतात भारतातल्या बहुतेक आदिवासी भागतून स्थानिक हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केल्या जाते, विशेषतः ख्रिश्चन धर्मगुरू हे असे धर्मांतराचे काम करण्यात पटाईत असतात, गोड गोड बोलून ते आदिवासींचे मतपरिवर्तन करतात शिवाय त्यांना मोठ्या प्रमाणावर परदेशातून आर्थिक रसद पुरविल्या जाते. तुम्हाला वेळ मिळालेला तर ज्या शाळा हे धर्मगुरू किंवा नन्स चालवितात, त्या शाळांचे जर नीट निरीक्षण केले तर तुमच्या ते सहज लक्षात येते कि आर्थिक रकमेशिवाय गहू तेल बिस्किटे तांदूळ कपडे इत्यादी कितीतरी 
आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचे मोठाले गोडाउन्स तेथे उभारले जातात आणि हे सारे आदिवासी भागात धर्मांतर करतांना पद्धतशीर त्याचे वाटप केल्या जाते....

मी आता किंवा समजायला लागल्यापासून कधीही संघात गेलो नाही मी संघ स्वयंसेवक नाही पण मी कट्टर हिंदुत्ववादी असल्याने नेमके काय घडते आहे सांगून मोकळा होणार आहे आणि संघ म्हणजे काय हे जे मला समजले ते तुम्हाला सांगणार आहे. संघाच्या विविध फांद्या शाखा, राष्ट्रीय सेवा भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, विद्याभारती, विवेकानंद केंद्र, दीनदयाळ संशोधन संस्था, इत्यादी माध्यमातून अशा ठिकाणी जाऊन काम करतात जेथे तुम्ही आम्ही चार दोन दिवसांची सहल म्हणूनही जाणे अशक्य आहे, असते. हिंदूंचे फार मोठ्या प्रमाणावर होणारे धर्मांतर ते रोखतात तेथल्या मंडळींना मुख्य प्रवाहात आणण्याचे स्वीकारलेले व्रत यशस्वी करतात, विशेष म्हणजे त्यांच्या या जवळपास सर्व उपक्रमात स्त्री आणि पुरुष दोघेही आपल्या आयुष्याचे बलिदान करून विविध चळवळी ज्या योजनाबद्ध मार्गाने गाजावाजा न करता ते ठरवून दिलेले काम पूर्ण करवून दाखवतात मला वाटते हि अशी माणसे मेल्यानंतर नक्कीच स्वर्गात जात असतील. आणखी एक जमात अशी आहे कि जी हमखास स्वर्गात जाते ती आहे बेवड्यांची म्हणजे खूप खूप दारू ढोसणाऱ्यांची कारण दारू ढोसणारे खूप चढल्याने जेवत नाहीत थोडक्यात त्यांना अनेकदा उपवास घडतो आणि देवाकडे नियमित उपवास करणाऱ्यांना थेट स्वर्गात प्रवेश असल्याने बहुतेक बेवडे थेट स्वर्गात पोहोचतात...
अपूर्ण :


पत्रकार हेमंत जोशी 

संघ आणि भाजपा २ : पत्रकार हेमंत जोशी


संघ आणि भाजपा २ : पत्रकार हेमंत जोशी 
स्त्रिया मोठ्या प्रमाणावर बाहेर पडायला लागल्यानंतर, नोकरी व्यवसाय करू लागल्यानंतर, हि जाऊन जाऊन जाणार कुठे, हे आम्हा पुरुषांनी गृहीत धरणे बंद केले विशेषतः शहरांमधून फार मोठ्या प्रमाणावर वाढलेले घटस्फोटाचे प्रमाण, थोडक्यत स्त्रियांना जसे अंडर-एस्टीमेट करणे आम्ही पुरुषांनी बऱ्यापैकी सोडून दिलेले आहे ते तसेच एकदा रा. स्व. संघातल्या बाजूला पाडलेल्या, टाकलेल्या, दुर्लक्षिलेल्या स्वयंसेवकांच्या बाबतीत देखील घडावे असे जर कट्टर स्वयंसेवकांना वाटत असेल तर त्यांनीही हि अशी एखादी कठोर कणखर भूमिका घेऊन निर्ढावलेल्या सत्तेतल्या मंडळींना झटका दाखविणे आवश्यक आहे. आपले अख्खे आयुष्य रा. स्व. संघासाठी वाहून घेतलेल्या स्वयंसेवकांच्या बाबतीत हे भाजपा संघामधल्या किंवा बाहेरून भाजपा मध्ये आलेल्या नेत्यांना तंतोतंत माहित असते कि काहीही झाले आणि कितीही अन्याय केला झाला तरी कोणताही कट्टर संघ स्वयंसेवक संघ सोडून जात नाही नेमका त्याच्या याच कट्टर बांधिलकेचा फार मोठा गैरफायदा संघ भाजपामधल्या संधिसाधूंनी घेतला आणि याची सुरुवात मुंडे महाजनांनी केली....

थोडेसे विषयांतर करतो, माझ्या ओळखीतल्या घटस्फोट झालेल्या दोन घटना येथे मांडतो, दोन्हीही ठिकाणी घटस्फोट घेण्याचे कारण जरासे वेगळे असले तरी मूळ संदर्भ सेम टू सेम होते, असे मला वाटते. एका स्त्रीने नवऱ्यापासून घटस्फोट यासाठी घेतला कि तिच्या नवर्याच्या तोंडाचा सतत घाणेरडा वास येत असे, आपल्या तोंडाचा घाणेरडा वास येतो हे आपल्याला चांगले कळत असते आणि तोंडाचा घाण वास येऊ न देणे आपल्याला अगदी सहज शक्य असूनही आपण त्याकडे केवळ विकृती म्हणून दुर्लक्ष करतो असे मला वाटते. मुळात त्या माणसाच्या तोंडाला सतत घाण वास येत असूनही वरून त्याला सिगारेट ओढणे आणि दारू पिणे, या दोन्हीही सवयी होत्या, रोमान्स करायला मनापासून आवडत असूनही जर त्या पुरुषाच्या तोंडाला जर कायम दुर्गंधी येत असेल मग का म्हणून त्या स्त्रीने हा दररोजचा किंवा दरक्षणी जाणवणारा त्रास सहन करावा, कोणताही रोमांस तोंडाशिवाय, ओठांशिवाय 
शक्य नाही, त्याला वारंवार सांगून देखील उपयोग झाला नाही शेवटी त्या देखण्या स्त्रीने हा कठोर निर्णय घेतला, मला वाटते पुढे तिने आधी तोंडाचा वास घेऊनच दुसरे लग्न केले असावे....

एका घटस्फोट प्रकरणी तर मीच मध्यस्थी करून तो होऊ न देण्याचे आटोकाट प्रयत्न केले पण ते जमले नाही आणि येथेही तेच, ते दोघेही उच्चशिक्षित अत्यंत देखणे, जोड्याला जोडा पण त्यांचे लग्न यासाठी टिकले नाही कि त्या स्त्रीच्या ज्या मुख्य अवयवाशी पुरुषाचा वारंवार संबंध येतो, अंतर्वस्त्र काढल्यानंतर त्यातून येणारी दुर्गंधी, तो तिचा नवरा मला म्हणाला, मी अगदी हात जोडून सांगूनही तिने त्याकडे दुर्लक्ष केले, मला वाटते ती डॉक्टरांचा सल्ला घेण्यात कमी पाडली, तो पुरुष मला म्हणला, आमच्या लग्नांनंतर असे एक दिवस देखील घडले नाही ज्यादिवशी मला वांती झाली नाही, फार वाईट वाटले, ते दोघे वेगळे झाले, मला वाटते असे अनेकांच्या बाबतीत घडत असावे, पुरुष किंवा स्त्री, दोघांपैकी कोणाच्याही शरीरातून येणारी दुर्गंधी त्यातल्या एकाने का म्हणून सहन करावी,महत्वाचे म्हणजे शारीरिक दुर्गंधी घालविणे अगदी सहज शक्य असूनही, नवरा बायको दोघांपैकी एकाने का म्हणून हे असे विकृत अत्याचार सहन करावेत. विशेष म्हणजे सिगारेट तंबाखू दारू इत्यादींचे व्यसन असलेल्या नवऱ्यांच्या सोबतीने संसार करणाऱ्या स्त्रियांची मनापासून किंवा करावीशी वाटे. दोघेही बेवडे असतील किंवा सिगारेट ओढणारे असतील तर ठीक अन्यथा जिवंतपणी नरक अनुभवणे त्या स्त्रियांच्या नशिबी असते म्हणजे त्यांना त्यावेळी हेच वाटत असावे कि आपण अक्षरश: संडासमध्ये तोंड घालून सेक्स अनुभवतोय.....

मला हे नेहमीच जाणवत आलेले आहे कि रा. स्व. संघ हे या देशातल्या अत्यंत बुद्धिमान हिंदूंनी केवळ हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि धर्मांतर होऊ न देण्यासाठी उभारलेले हे प्रभावी संघटन आहे, त्यातही काही दोष आहेतच पण त्या दोषांकडे दुर्लक्ष यासाठी 
करणे गरजेचे आहे कि अल्पमतात येणार हिंदुत्व वाढले पाहिजे आणि हिंदुत्व संघटित देखील नक्कीच राहायला पाहिजे. इस्लाम नव्हे हिंदुत्व खतरेमे आहे. सुरुवातीला असे वाटायचे कि शाखा म्हणजे संघ पण हे संघवाल्यांनी १९९० नंतर झपाट्याने मोडीत काढले किंवा त्यांच्याही ते लक्षात आले कि केवळ शाखा चालविणे एवढेच जर संघाचे काम दिसले तर संघ आणि संघाशी संबंधित फांद्या वडाच्या झाडासारख्या वाढणे आणि खोलवर रुजणे अशक्य आहे. त्यांनी सुरुवात चांगली केली म्हणजे संघ हा केवळ फक्त ब्राम्हणांचा, हा डाग त्यांनी योजनाबद्ध आधी पुसून काढला, संघाचा विस्तार केला, जगभरात संघ प्रचारक पाठवून हिंदूंना संघाच्या भगव्याखाली आधी एकत्र आणले नंतर त्यांची कुवत ताकद ओळखून त्यांना विविध प्रांतात मोठे केले. संघ परिवारातल्या संस्था मोठ्या केल्या. जनसंघाचे नामांतर भारतीय जनता पक्ष करून त्याला काँग्रेस शी स्पर्धा करू शकेल या पद्धतीने अहोरात्र अक्षरश: सुरुवातीला पै पै जमा करून मोठे केले...
अपूर्ण :


पत्रकार हेमंत जोशी 

Friday, 9 February 2018

संघ आणि भाजपा : पत्रकार हेमंत जोशी


संघ आणि भाजपा : पत्रकार हेमंत जोशी 
जसे दादा म्हणजे एकच दादा, अजितदादा किंवा पवारसाहेब म्हणजे एकच शरद पवार तसे येथे या लेखात संघ म्हणजे एकच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इतर कोणताही संघ नाही भारिप महासंघ, मराठा सेवा संघ वगैरे वगैरे..अख्खा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजावून घेणे तसे मोठे कठीण काम कारण रा. स्व. संघाची विविध क्षेत्रात आणि जगभरात व्याप्ती फार मोठी आहे, संघाच्या कोणत्याही फांदीविषयी विस्तृत लिहावयाचे झाल्यास एक ग्रंथ निघेल, विविध फांद्यांवर कित्येक ग्रंथ निघतील म्हणजे संघाचे आदिवासी भागातले काम किंवा संघाचे देशाबाहेरचे स्वयंसेवक असे कोणतेही विषय निवडलेत तरी त्यावर ग्रंथ निघेल, सुप्त आणि गुप्त पद्धतीने संघाचे जगभर विविध प्रांतात पसरलेले जाळे, भारतीय हिंदूंना किंवा जगातल्या हिंदूंना अभिमान वाटावे असे आहे किंवा हिंदुत्व टिकविण्यात संघाचा मोठा हातभार आहे, संघ नसता तर हिंदुत्व नक्कीच धोक्यात आले असते . मी संघाचा स्वयंसेवक नाही तरीही जे चांगले ते कौतुकाने घेणे मला आवडते म्हणून येथे सांगितले कि हिंदुत्व खऱ्या अर्थाने टिकवून ठेवले किंवा टिकवून ठेवेल रा. स्व. संघ....

ज्यांना आपण हिंदू आहोत याचा अभिमान आहे किंवा ज्यांना वाटते घरात उत्तम संस्कार रुजायला हवेत त्यांनी संघ परिवारात सामील होणे अत्यावश्यक आहे असे अजिबात नाही केवळ त्यांनी कट्टर स्वयंसेवकांशी संबंध ठेवून मोकळे व्हावे जे संघ स्वयंसेवक राजकारणात आले आणि संघ विसरून भलत्याच मार्गाला लागले अशा श्रीकांत भारतीय यांच्यासारख्या संघ स्वयंसेवकांकडून मात्र नेमके संस्कार मिळण्याची अपेक्षा ठेवू नये, असे संस्कार वाटल्यास तुम्हाला अतिशय खोलवर फडणवीसांमध्ये आजही आणि उद्याही बघायला मिळतील, ते मुख्यमंत्री होऊनही फारसे संघ संस्कार विसरलेले नाहीत, नक्कीच नाहीत. येथे मोठ्या जबाबदारीने श्रीकांत भारतीय यांचे नाव घेतले आहे, पुढे, ते आज नेमके कसे नक्की लिहून मोकळा होणार आहे...

एक मात्र अतिशय वाईट असे घडते आहे म्हणजे ज्या संघाने या देशात या राज्यात ज्या भाजपाला जन्माला घालून सत्तेत स्थान मिळविले, सत्ता भाजपाकडे येते आहे बघून बहुसंख्य सत्तालोलुप मोठ्या खुबीने भाजपामध्ये घुसले पण घडले असे कि आज सत्ता हाती आल्यानंतर अगदी या राज्यातही भलतेच मजा मारून मोकळे होताहेत श्रीमंत होताहेत अत्यंत वेदनादायी म्हणजे जे संघ स्वयंसेवक सत्तेत बसले आहेत किंवा सत्तेच्या अगदी जवळ आहेत पुन्हा तेच फडणवीसांसारखा एखादा दुसरा अपवाद सोडल्यास मूळ जो स्वयंसेवक आहे त्यांना हे सत्तेतले कोणीही अगदी थूकी लावूनही विचारात नाहीत त्यातून बहुतेक संघ स्वयंसेवक खूप निराश झाले आहेत पण त्यांची मोठी बांधिलकी संघाशी असल्याने ते उघड नाराजी व्यक्त करीत नाहीत, कट्टर संघ स्वयंसेवकाचे मनावर मोठे नियंत्रण असते त्यांना त्याग करणे तेवढे माहित असते म्हणून ते बोलत नाहीत, राग उघड व्यक्त करीत नाहीत पण हि 
वस्तुस्थिती आहे, संघ स्वयंसेवकांना गृहीत धरून त्यांना डावलणे त्यांना टाळणे सत्तेतल्याचें आता ते अंगवळणी पडले आहे...

म्हणजे प्रसाद लाड जेव्हा आमदार नव्हते तेव्हाही थेट समजा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अँटी चेंबर मध्ये प्रवेश करून आपले काम तेथल्या तेथे करवून घेऊन वरून तासभर गप्पा मारून बाहेर पडत असेल त्याचवेळी कट्टर संघ स्वयंसेवक बाहेर आधी ताटकळत बसून वाट पाहत असेल तदनंतर काम न झाल्याने बाहेर पडत असेल, तर मला फारसे आश्चर्य वाटणार नाही जर उद्या संघ स्वयंसेवकानीच मंत्रालयातून आत्महत्या करणे सुरु केले तर, आणि संघ स्वयंसेवकांच्या बाबतीत हे अलीकडे भाजपाच्या बाबतीत नेहमीच घडते आहे....

अलीकडे मला ठाणे जिल्ह्यातला संघाचा एक मोठा स्वयंसेवक भेटला, त्याने नेमके हे सांगितले कि आमची कोणत्याही भाजपा नेत्याकडे, मंत्र्याकडे, अधिकाऱ्यांकडे कामे होत नाहीत याउलट एकनाथ शिंदे तेथल्या तेथे सहकार्य करतात, म्हणजे आता आम्ही शिवसेनेत जायचे का, महत्वाचे म्हणजे आम्हा संघ स्वयंसेवकांचे कोणतेही मलिद्याचे किंवा खाजगी काम नसते असते ते सार्वजनिक स्वरूपाचे तरीही आमची कामे होत नाहीत, सरकारी अधिकाऱ्यांच्या तर आम्ही कोणत्याही खिसगणतीत नाही, सर्वात 
गांडू आणि निरुपद्रवी माणूस म्हणजे संघ स्वयंसेवक हेच त्यांना वाटत असल्याने ते आम्हाला थेट फाट्यावर मारून बाहेर काढतात पण त्याचवेळी सामान्य शिवसैनिक जरी आत घुसला तरी घाबरून त्याला आधी खुर्ची बसायला देतात नंतर काहीही न स्विकारता न घेता त्याचे काम करून मोकळे होतात. संघ स्वयंसेवकांचे काम झालेच पाहिजे असे आमच्या वतीने सत्तेतले कोणीही सांगणारे नसल्याने सर्वाधिक कोंडी झालीआहे ती केवळ संघ स्वयंसेवकांची...मला त्याचे सांगणे पटले...

मित्रहो, एक कट्टर हिंदू म्हणून सांगतो, मुसलमानांकडून आणि ख्रिश्च्नांकडून अवैध मार्गाने, योजनाबद्ध होणारी हिंदूंची धर्मांतरे रोखण्याचे मोठे काम ज्या संघ स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून केले त्याला तोड नाही, आजही हिंदूंची धर्मांतरे हा विषय संपलेला नाही उलट फोफावतो आहे, आणि मी हे वेगळे सांगतो आहे असे अजिबात नाही, तुम्हाला देखील ते माहित आहे कि हिंदू मोठ्या प्रमाणात बाटवल्या जातो आहे, धर्मांतर मोठ्या प्रमाणात होते आहे. आपण हिंदू धोक्यात आहोत, एकाचवेळी जगभरात आणि अवघ्या हिंदुस्थानातही मुसलमान आणि ख्रिस्ती या दोघांच्या लोकसंख्येचे प्रमाण वाढते आहे आणि मर्यादित कुटुंब संख्या, धर्मांतरे इत्यादींमुळे आम्ही तुलनेत संख्यने कमी कमी होत चाललो आहोत विशेष म्हणजे सरहद्दीवरील हिंदू यापुढे दिसतील कि नाही एवढे तेथे धर्मांतरे जोरात सुरु आहेत त्याचवेळी धर्मांतरे रोखण्याचे काम जे संघ स्वयंसेवक प्रसंगी जीवाची पर्वा चिंता न करता, करताहेत त्यांनाच जर या राज्यात या देशात भाजपाची सत्ता आल्यानंतरही सहकार्य करतांना डावलेल्या जात असेल तर उद्या संघ स्वयंसेवकानी, तुमच्यापेक्षा काँग्रेसवाले बरे,असे म्हणायला सुरुवात केली तर त्यात ते चुकीचे म्हणताहेत असे जाणकारांना अजिबात वाटणार नाही...
अपूर्ण :


पत्रकार हेमंत जोशी