Thursday, 27 December 2018

भानगडी आवडे कार्यालय तावडे २ : पत्रकार हेमंत जोशी
भानगडी आवडे कार्यालय तावडे २ : पत्रकार हेमंत जोशी 

परवा मला नको ते दृश्य मुंबईत बघून फार वाईट वाटले. झाले असे मला एका व्यक्तीकडून काही कागदपत्रे घ्यायची होती म्हणून मी बांद्रा पश्चिमेला लकी हॉटेल च्या सिग्नल नंतर लगेच जे दोन पेट्रोल पंप्स आहेत ते ओलांडून लगेच असलेल्या एका पान टपरीजवळ माझी कार साईडला उभी करून वाट पाहत होतो तेवढ्यात माझे त्या पान टपरीकडे लक्ष गेले आणि आश्चर्याचा धक्का बसला कारण त्या टपरीवर रजनी गंधा नावाच्या गुटक्याचे पाऊच असे काही अगदी समोर टांगलेले होते कि जणू या राज्यात गुटका बंदीच नाही. तसेही उभ्या राज्यात विशेषतः मुंबईत तर गुटका बहुतेक साऱ्याच पान टपऱ्यांवर अगदी सहज उपलब्ध असतो, महागड्या दराने विकल्या जातो. मला वाटते या खात्याशी संबंधितांच्या मोठ्या आणि रेग्युलर हप्त्यांची सोय जणू या गुटका बंदीने करून दिलेली आहे, मंत्री गिरीश बापटांनी लक्ष न घालणे म्हणजे अप्रत्यक्ष या अंधाधुंद अधिकाऱ्यांना पाठीशी घालणे असे आता समजण्यास हरकत नाही...

विनोद तावडे यांच्याशी सलगी असलेल्या कोणकोणत्या ' महान व्यक्तींवर ' लिहावे म्हणजे नेमकी सुरुवात शार्दूल बायस पासून कि अजिंक्य देव पासून, मधू चव्हाण यांच्या पासून कि शिवाजी देबावकरांपासून मनाचा गोंधळ उडाला आहे, माझ्या पुराव्यांची यादी लामलचक आहे, पण शेवटी ठरविले कि शिक्षण मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, म्हणे सध्या फरार असलेले डॉ. चारुदत्त शिंदे यांचे प्रकरण अगदी ताजे आहे, सुरुवात तेथूनच करावी, डॉ. शिंदे नेमके कोण कसे, लिहायला घेतले...

काही मुले मुली जोपर्यंत देशात आईवडिलांबरोबर असतात तोपर्यंत व्यवस्थित वागतात, परदेशात गेली आईवडिलांपासून दूर गेली कि वाम मार्गाला लागतात तसेच काही नेते आमदार असेपर्यंत अत्यंत चांगले असतात, नामदार झाले रे  झाले कि त्यांच्या डोक्यात कोणती हवा जाते कोण जाणे पण ते आपले नाव खराब करून घेतात, अपेक्षाभंग करतात, नको त्या मार्गाला लागून आपले चांगले चाललेले राजकीय करिअर संपवतात, संपुष्टात आणतात, त्यातलेच एक विनोद तावडे आहे, त्यांचे तसे मंत्री झाल्यानंतर वागणे बोलणे बिनसले आहे असे मला वाटते, मनापासून वाईट वाटते, तावडे यांच्यावर कधी टीका करण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते पण तावडे पूर्वीचे न राहिल्याने नाईलाज होतोय, त्यांनी जर विधानसभा निवडणूक लढविली तर मला यावेळी आक्रमक व्हावे लागेल, विनोद तावडे नेमके कसे सांगावे लागेल...

पेशाने शासकीय वैद्यकीय अधिकारी, संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांचे जवळचे नातेवाईक आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे त्यांच्या कार्यालयातले विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. चारुदत्त शिंदे यांच्यावर त्यांच्या सहकाऱ्यांवर धुळ्यातबनावट कागदपत्रांद्वारे दोन कोटींचा गंडा घातला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यापूर्वी देखील डॉ. शिंदे यांचे असेच एक प्रकरण घडले होते ते तावडे यांना ठाऊक असतांनाही त्यांनी डॉ शिंदे यांना आपल्या कार्यालयात स्थान दिले, मानाची जागा दिली, विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमले...

शासकीय योजनेचा बेकायदेशीररीत्या लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने वाहनांची खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून शासनाला सुमारे दोन कोटींचा गंडा घातल्याचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. धुळ्याचे सामाजिक कार्यकर्ते श्री संजय रामेश्वर शर्मा यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे, अन्य शासकीय अधिकारी किंवा व्यावसायिक याप्रकरणी अडकलेले असून २०१३ ते १५ दरम्यान धुळे येथे शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आणि सध्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. चारुदत्त शिंदे हे देखील त्यातले एक प्रमुख आरोपी आहेत, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते म्हणून ते फरार आहेत तरीही तावडे यांनी त्यांना त्यांच्या कार्यालयातून अद्याप काढलेले नाही. डॉ. शिंदे यांच्या विरोधात मोहाडी, धुळे पोलीस स्टेशन मध्ये कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही अद्याप त्यांना आणि सामील झालेल्या अन्य अधिकाऱ्यांना, संबंधितांना अटक झालेली नाही, स्थानिक नागरिकांना जनतेला वारंवार आश्चर्य वाटते आहे. थेट केंद्रीय सौरंक्षण मंत्र्याच्या भाच्यानेच शेण खाल्याने डॉ. चारुदत्त शिंदे यांना अद्याप अटक झालेली नसावी असे दिसते आहे....
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

भानगडी आवडे कार्यालय तावडे १ : पत्रकार हेमंत जोशीभानगडी आवडे कार्यालय तावडे १ : पत्रकार हेमंत जोशी 

माझ्यावर आजतागायत एकही अब्रुनुकसानीचा दावा यासाठी झालेला नाही कि मी जो वाचकांवर दररोज अन्याय करत आलो आहे त्याचे हे मला बक्षीस आहे कि माझा अद्याप खून झालेला नाही आणि अब्रुनुकसानीचा दावा दाखल नाही. वाचक मित्र आणि मैत्रिणींनो, मि जे तुमच्यासमोर मांडतो असतो ते एक,केवळ हिमनगाचे टोक असते आणि तेवढे तर या राज्यातल्या तमाम भ्रष्ट नेत्यांना मंत्र्यांना अधिकाऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दलालांना विधान भवनाशी म्हणजे जनतेच्या या न्यायालयाशी निगडित असलेल्यांना, मीडियाला खपवून घ्यावेच लागते जर ते अमुक एखाद्याने खपवून घेतले नाही तर त्यांच्याविषयी माझ्याकडे नेमकी माहिती कोणती, आणि मी तीही न घाबरता कशी बाहेर काढू शकतो हे या राज्य बुडव्या हरामखोरांना मग त्यात सगळेच आलेत, तंतोतंत माहित असल्याने माझ्याबाबतीत नको तो आगावूपणा ते करीत नाहीत...

पैसे घेणारे वाटणारे कोण तेही माझ्या परिचयाचे, पैसे देणारे कोण तेही माझ्या परिचयाचे विशेष म्हणजे जेथे काळे पैसे गुंतविले जातात ती या राज्यातली माणसे देखील माझ्या परिचयाची, ज्यांनी परदेशात पैसे नेले आणि कुठे गुंतविले तेही मला जसेच्या तसे ठाऊक असतो, या सार्या प्रकारावर लढायचे तरी किती पण आपल्याला हेमंत जोशी त्यांच्या हातून उध्वस्त व्हायचे नाही हे अगदी वाहिन्या आणि वृत्तपत्रात काम करणाऱ्या मंडळींना देखील माहित असल्याने हे सारेच नीच आणि हलकट माझ्या वाटेला येत नाहीत. जसा अमुक एका माणसाचा जीव नेमका कुठे, अशा प्रकारच्या लहानपणी आपण ज्या कथा वाचलेल्या आहेत त्यापद्धतीने जर तुम्ही मला विचारले कि हेमंत जोशी तुमचा जीव कोण घेऊ शकतो, तुमची पत्रकारिता कोण संपवू शकतो तर तेही मला येथे सांगायचे आहे कि अमुक एखादा या गढूळ क्षेत्रात राहूनही निष्कलंक राहिलेला म्हणजे लोकसत्तेतल्या त्या उमाकांत देशपांडे सारखा माणूस, भानगडी न करणारा पृथ्वीराज चव्हाण सारखा नेता किंवा तुकाराम मुंडे यांच्यासारखा एखादा अधिकारी मला नक्की संपवू अगदी सहज संपवू शकतो, अशा मंडळींना माझी सुपारी द्यायला हरकत नाही...

तसेही एकतर स्वतःच्या डोक्यावर स्वतःच्या हातांनी कफन बांधायचे नसते आणि बांधून घेतले तर मृत्यूला घाबरायचे नसते. माझ्या सभोवताली जमणारे आणि हेमंत जोशी नेमका कसा समजलेले माझ्यावर प्रसंगी जीव देखील ओवाळून टाकतात आणि 
तसेही जवळपास सारेच बरेवाईट प्रसंग आयुष्यात येऊन गेल्याने आता तशी संकटाची फार भीती देखील वाटत नाही. मला आठवते जळगावला असतांना एकदा एका गुंडाने माझ्यावर धारदार सुरीने हल्ला केला, क्षणाचाही विलंब न लावता तो खतरनाक वार मेहतर ज्याला हलकट माणसे भंगी म्हणतात त्या समाजातल्या माझ्या सहकारी मित्राने आनंद गोयर याने मध्ये पडून स्वतःवर झेलला. आनंद पैलवान होता म्हणून तो सुरा आरपार जाऊन देखील तो वाचला आणि मला तर त्याक्षणी नवीन आयुष्य मिळाले, जीवनदान मिळाले, असे प्रसंग आठवले कि अंगाचा नक्की थरकाप उडतो, जातपात कधी मानली नाही त्यामुळे त्याकाळी अख्खे मेहतर माझ्यावर जीवापाड प्रेम करायचे, आनंद गोयर तर माझा कुटुंब सदस्य होता...

असाच एक प्रसंग मुंबईत देखील घडला होता तेव्हा कोणी वाचविले त्यावर माझ्या आत्मचरित्रात नक्की लिहीन. बंधुराज यदु जोशी आणि चिरंजीव विक्रांत जोशी या दोघांनाही जेव्हा मी पत्रकारितेत आणले तेव्हाच त्यांना सांगितले होते कि बदनामीला, 
संघर्षाला, मृत्यूला घाबरत असाल तर या क्षेत्रात पाऊल टाकू नका, तुम्ही असे आहात कि जेथे विहीर खोदाल तेथे पाणी काढाल, त्या दोघांनीही सरपे कफन बांधण्याचे वचन त्या त्या वेळी मला दिले म्हणून यदु जोशी सारखा एक लढवय्या पत्रकार या राज्याला मिळाला. अमुक एखाद्याशी पटत नसले म्हणजे त्याविषयी केवळ वाईटच बोलायचे असे माझे नसते त्यामुळे जे चांगले आहे ते यदूंविषयी सांगितले. वाईट प्रवृत्तींविरुद्ध लढणारे, असे किंवा त्यांचे कुटुंब केव्हाही कोणत्याही क्षणी उध्वस्त होऊ शकते पण रक्तात देश भक्ती मुरलेली असली कि लढ्याचे, लढण्याचे काहीही वाटत नाही.लिहिता लिहिता भलतीकडे वळलो आणि शिक्षण मंत्री विनोद तावडेंच्या कार्यालयातल्या भानगडी करणाऱ्या शिंदेशाहीविषयी लिहायचे राहून गेले ते पुढल्या भागात...
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Tuesday, 25 December 2018

पुन्हा भय्यू महाराज २ : पत्रकार हेमंत जोशीपुन्हा भय्यू महाराज २ : पत्रकार हेमंत जोशी 
अमुक एखादे संत अनंतात विलीन झाल्यानंतर देखील त्यांचे भक्त कमी न होता वाढत गेल्याचे दिसते. शिर्डीच्या साईबाबांचे किंवा शेगावीच्या गजानन महाराजांचे किंवा स्वामी समर्थांचे भक्त त्यांच्या पश्चात मोठ्या संख्यने वाढत गेल्याचे वाढत असल्याचे सतत वाढ होत असल्याचे आपण कायम बघत आलो आहोत मात्र भय्यू महाराजांच्या बाबतीत तसे घडलेले दिसत नाही. म्हणजे होते ते देखील त्यांना आता देव मानायला तयार नाहीत आणि नव्याने तयार होणारे भक्त, प्रमाण शून्य टक्के आहे. त्यांचा इंदोरस्थित सूर्योदय आश्रम पूर्वी भक्तांनी नेत्यांनी दलालांनी तरुण बायकांनी कायम गर्दी करून असायचा आता त्या गर्दीच्या दहा टक्के देखील तमाम भक्त आश्रमाकडे महाराजांच्या पश्चात लगेचच न फिरकल्याचे दिसते, आश्रमाला लवकरच कुलूप लागल्यास आस्चर्य वाटणार नाही. मध्यन्तरी झी वाहिनी ने जे दाखवले आहे तेच खरे आहे, सूर्योदय आश्रमावरचा सूर्य केव्हाच मावळला आहे, भक्त आणि भामट्या नेत्यांनी केव्हाच तिकडे पाठ केली आहे...

अर्थात आज महाराज जिवंत असते तर तो दिवस फार दूर नव्हता कि त्यांच्या हयातीत देखील त्यांच्याच भक्तांनी आश्रमाकडे पाठ फिरवली असती कारण भय्यू महाराज संत नव्हते, चांगले गृहस्थ तर अजिबात नव्हते. हे बहुतेकांच्या ते हयात असतांनाच लक्षात यायला लागलेले होते. भय्यू महाराज हयात असतांना या राज्यातले जे जे दिग्गज नेते त्यांच्या पाया पाडण्यासाठी त्यांचे दर्शन घेण्यासाठी सूर्योदय आश्रमात गर्दी करायचे किंवा महाराज महाराष्ट्रात जेथे म्हणून जायचे तेथे रांगा लावून दर्शन घायचे थोडक्यात त्यांना थेट देव म्हणून पुजायचे त्या सर्वांना मग ते मोहन भागवत असतील, उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे असतील, दिलीप वळसे पाटील किंवा राम नाईकांसारखे राज्यपाल असतील, कित्येक शासकीय व प्रशासकीय अधिकारी असतील आजी माजी मुख्यमंत्री असतील, नितीन गडकरी किंवा अनेक कित्येक नेते उद्योगपती असतील त्या सर्वांना आज त्याच भय्यू महाराजांविषयी चार चांगले शब्द वाक्यबोलायला लिहायला सांगा किंवा चार पाने लिहायला सांगा, मला शंभर टक्के खात्री आहे कि एकही तसे करण्यास धजावणार नाही कारण त्यांची देखील एकूण पुरावे बघून खात्री झालेली आहे कि भय्यू महाराज संत नव्हतेच पण ते चांगले गृहस्थ देखील नव्हते. विशेष म्हणजे त्यांना फक्त शरद पवार आणि अजित पवारांनी मात्र नेमके ओळखलेले होते....

भय्यू महाराज तर गेले पण त्यांच्या पाठी उरलेले जे जे म्हणून त्यांचे कुटुंब सदस्य किंवा विनायक, संजय यादव यांच्यासारखे जे उजवे डावे हात आहेत खरे तर या मंडळींची कसून चौकशी व्हायला हवी त्यातून नक्की नेमके सत्य बाहेर येईल कि महाराजांकडे नेमकी संपत्ती किती होती आणि ते नेमके कसे स्त्रीलंपट किंवा विकृत होते. मागेही एकदा मी सांगितले होते कि खऱ्या अर्थाने भय्यू महाराजांच्या जवळच्या नातेवाईकाने म्हणजे इंदोरला सूर्योदय आश्रमा शेजारी राहणाऱ्या शरद पवार या गृहस्थाला जर पोलिसांनी विश्वासात घेतले तर ते महाराजांच्या पश्चात उरलेल्या बदमाश उजव्या डाव्या हातांचे तंतोतंत वर्णन करून सांगतील. महाराजांनी, जेव्हा त्यांचे मावशे शरद पवार यांनी वारंवार सांगून, कि असे तू वागू नको, सांगूनही ऐकले नाही तेव्हाच इंदोर मधले या राज्याचे नेते नव्हेत केवळ नाम साधर्म्य, शरद पवार भलेहि आश्रमाशेजारी राहायला होते पण मनाने मात्र ते भय्यू महाराजांपासून काही महिने आधीच कोसो मैल दूर निघून गेले होते...

याची बदली करून दे त्याला तिकीट मिळवून दे याची फाईल क्लिअर करायला सांगणे त्याला कंत्राट मिळवून देणे हे काम कोणत्याही संतांचे नसते ते दलाली करणाऱ्यांचे काम असते. अमुक एखाद्या प्युअर संताने अशी कामें केल्याचे तुम्ही आम्ही कधीही वाचलेले नाही कारण संत हे आपण परमेश्वराचे रूप मानून त्यांच्या पाय पडतो त्यांना शरण जातो पण येथे भय्यू महाराजांजवळ तर भलतेच घडायचे, पुढे पुढे तर त्यांनी अशी हवा पसरवली होती कि या राज्यातले मराठे मोर्चे केवळ त्यांच्या मार्गदर्शना खाली निघताहेत आणि तेच हे मोर्चे थोपवू थांबवू शकतील, पण एक बरे झाले जेव्हा मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांच्या हे कानावर गेले तेव्हा त्यांनी भय्यू महाराजांची आई बहीण थेट पत्रकारांसमोर घेतली आणि भय्यू महाराज व कंपू त्यातून नागडा झाला उघडा पडला.... 

स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आम्ही कसे भय्यू महाराजांना जवळचे हे सांगणारे या राज्यातले नेते आणि भय्यू महाराज देखील मी कसा यशस्वी राजकीय संत त्यांच्या भक्तांसमोर सांगून जे एक हिडीस वातावरण काही वर्षे या राज्यात त्या त्या नेत्यांनी आणि भय्यू महाराजांनी युती करून निर्माण केले होते, बरे झाले ते दृश्य एकदाचे काळाच्या पडद्याआड गेले आणि भय्यू 
महाराज कोणत्याही अँगलने परमेश्वरी अवतार नव्हते त्यामुळे त्यांच्या पश्चात अगदी तातडीने सूर्योदय आश्रमातली संपलेली ओसरलेली गर्दी आणि भक्तांची गळती हे त्याचेच द्योतक आहे कि भोळे भाबडे असूनही भक्तांच्या ते लक्षात आले कि आपण देव समजून चुकीच्या माणसाच्या पाया पडलो....

अगदीच एखादा दुसरा अपवाद या राज्यात असू शकतो कि त्याला खऱ्या अर्थाने संत म्हणून जगायचे आहे, सद्गुरू म्हणूच मारायचे आहे, पण असे उदाहरण अगदी विरळ त्यामुळे मराठी माणसाने जिवंत असलेल्या आणि स्वतःला सद्गुरू संत महाराज बुवा म्हणवून घेणाऱ्या तद्दन व्यक्तींच्या बाबतीत मोठी सावधगिरी बाळगावी, अलीकडले या राज्यातले बहुतेक महाराज किंवा संत म्हणजे केवळ एक थोतांड हे सर्वांनी लक्षात घ्यावे म्हणजे पुढे पश्चाताप होत नाही. भय्यू महाराज आणि त्यांच्या पश्चात उरलेले त्यांचे वाटेकरी, सध्या जे तुम्ही आम्ही बघतो आहे, वाचतो आहे ते तर केवळ हिमनगाचे एक टोक आहे, माझ्या लिहिण्यावर अनेकदा मला बंधने असतात म्हणून फार टोकाचे पाऊल लिखाण करतांना उचलता येत नाही पण भय्यू महाराज हयात असतांना आणि ते वर गेल्यानंतर देखील मी जे लिहिले सांगितले ते कसे शंभर टक्के सत्य आहे होते हे एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल. महाराज तर संपले पण त्यांच्या पाठी उरलेले राहिलेले जे विनायक सारखे महाबदमाश मलिदा राखून आहेत त्यांची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे...
तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

Monday, 24 December 2018

OFF THE RECORD review on some of todays headlines....

OFF THE RECORD review on some of todays headlines....

Reasons for Transfer of Tukaram Mundhe from Nashik

Just read somedays ago in Hindustan Times that now the Planning Department is also unhappy with  IAS Tukaram Mundhe's style of working. But did he take the charge, still remains a mystery for many. Mundhe's transfer from the Nashik Municipal Corporation to the lonely cabin of Mantralaya though opposed by many has actually all together different reasons attached to it.  

First and foremost, let me put it this way, Mundhe is a clean, strict & aggressive bureaucrat. His commitment to his work is of-course undoubtable. But only one thing comes in his way. He is ARROGANTLY non-corrupt. It is OK to be non-corrupt, but it is not cool to be arrogant. Every bureaucrat whom I have spoken to, his seniors, think that Mundhe is a very good officer. But just as a person suffering from jaundice, for him the whole world seems to be yellow, similar is the case of our Mundhe. He thinks every person approaching him, including that referred by the CM too, is corrupt.  The problem of this attitude results in NO smooth working off the ecosystem, that already exists within us. If the government say, for example, wants to do some good work in Nashik on war footing basis, habit of Mundhe is to look at everything suspiciously. Why these conditions in the tender, why this company or person got the contract, why people above me are calling me so on and so forth...Not good right for development right? He has to learn to be more practical even after being non-corrupt. I know so many officers who don't compromise but they still get the work done. Mundhe has to strike this balance, similar to what Ashwini Joshi has been doing off late. Now for the reasons of his transfer---Well naysayers are saying that in 2009 the Municipal Corporation of Nashik has passed a decision to demolish all the illegal structures in Nashik. Now they say, allegedly, Mundhe wanted to help a few of them... I'm giving a guarantee that no transactions took place here. Just out of friendship or don't know why Mundhe decided to leave some of them from getting their houses axed down? Worst part was when he was questioned about favouring the few, Mundhe in blatant words said--They were done on VERBAL orders of the CM. This was the final nail in the coffin for Mundhe who is yet CM's one of the favourite, mind you...CM decided if Mundhe can turn on me, then it can be anyone. By the way, CM had decided to remove his hand from Mundhe's head when a SMART CITY project's tender that was finalised at the CMO--was questioned by Mundhe. Mundhe then wanted the tender for this work to be done from his end, or at least the tender conditions... but CM again took it with a pinch of salt and remained silent. The same  project of the smart city was delayed for good 6 months. That's when all the MLA's and corporator's complained. CM yet took Mundhe's side, even at the cost of getting questioned by his own party men's people's representatives. But I think the verbal order of CM in regard to unauthorised demolitions was simply the final nail in the coffin for Mundhe to be sidelined and moved to the Mantralaya. If Mundhe has to come out of this, he has to strike the balance, without disturbing the ecosystem. 

2. Hail Dr. Prashant Narnaware & Milind Borikar 
Attended "SARAS" festival 2018 at Palghar ...Had an opportunity to interact with Collector Dr. Prashant Narnaware and ZP Ceo Shri Milind Borikar for the day. Met Project Officers (IAS) Shri Katyal and Ajit Kumbhar who are doing some wonderful work at Jawahar and Mokhada.... Was welcomed with open arms by ex Minister and now MP Shri Rajendra Gavit. What a vision this collector and zp ceo have...Lovely ....People of Palghar (tribals & other backward classes) are in a very bad shape here. "Saras", the exhibition in which a lot of people showcase their skills via making various products, is an opportunity for the buyers to establish business relations with these people and provide them with various opportunities. A fresh example was that of the famous dress designer Anita Dongre who has given job work orders to people here for making of her dresses. Palghar Corporation and the administration is backing these people whole-heartedly...Shall update soon with the details. Drive of nearly 200 kms was every worth it when I saw and met self helped groups of women doing some mind boggling stuff there...


Vikrant Hemant Joshi 


Sunday, 23 December 2018

पुन्हा भय्यू महाराज : पत्रकार हेमंत जोशी
पुन्हा भय्यू महाराज : पत्रकार हेमंत जोशी 

ज्यांच्या मृत्यू पश्चातही भक्तांची संख्या वाढत जाते ते खरे संत जसे शेवगावचे गजानन शिर्डीचे साईबाबा अगदी अलिकडल्या बेळगावच्या कलावती देवी किंवा स्वामी समर्थांसारखे असे कितीतरी. भामट्या लबाड लुबाडू लुच्चा लफंग्या बाबांना गजाआड होण्याची करण्याची एक अप्रतिम लाट या देशात अलीकडे आली पसरली त्यामुळे एक बरे झाले अनिरुद्ध किंवा नरेंद्र सारखे पेव फुटलेले बुवा अचानक दिसेनासे झाले आहेत अगदी गंमतीने सांगायचे झाल्यास, मुंबईत अतिक्रमण विरोधी पथकाच्या महापालिकेच्या गाड्या दुरून जरी दिलेल्या कि फेरीवाले जसे मिळेल त्या वाटेने आणि हातात येईल ते घेऊन पळत सुटतात तसे या बुवांचे निदान या राज्यात तरी झालेले आहे....

या असल्या भंपक बुवांनी हवी तेवढी देवभोळ्या मजबूर भक्तांची लूट केली आहे, हि मात्र वस्तुस्थिती आहे. खऱ्या संतांचे नाव अलिकडल्या या आधुनिक बुवांनी खराब केले आहे कारण या अशा थर्डग्रेड बुवांना फक्त पैसे तेवढे मिळवायचे असतात आणि अडचणीत सापडलेल्या तरुण महिला भक्तांना शारीरिक जुलूम करून त्यांना ओरबाडायचे लुटायचे असते. बहुतेक सारेच आसाराम असतात पण पैसा मिळविणे हा तर नक्की या बुवांचा प्रमुख उद्देश असतो. भय्यू महाराज फार काही वेगळे होते असे नाहीच म्हणजे पैसे आणि ऐय्याशी हेच त्यांचेही ध्येय होते, त्यात त्यांचाही आसाराम झाला, आसाराम तुरुंगात गेले, भय्यू महाराज मात्र तुरुंगात जाण्याआधीच आत्महत्या करून मोकळे झाले....

मुंबईच्या मैत्रेयी ग्रुपच्या सर्वेसर्वा श्रीमती वर्षा सत्पाळकर यांना तर सर्वात आधी पोलिसांनी न्याय मिळवून यासाठी द्यावा कि त्यातून त्या भय्यू महाराज आणि विनायक सारख्या कंपूने त्यांना जे खुबीने करोडो रुपयांनी लुटले, त्यांना किंवा त्यांच्याकडे लोकांच्या असलेल्या पैशांना चुना लावला ते कोट्यवधी रुपये जे महाराजांकडे जमा आहेत किंवा महाराजांच्या माध्यमातून चुकीच्या ठिकाणी गुंतवलेले आहेत ते निदान परत मिळालेत तर वर्षा सत्पाळकर यांना लोकांच्या ठेवी परत करता येतील आणि त्यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेले आर्थिक गुन्हे मागे घेऊन उर्वरित आयुष्य त्यांना आणि त्यांच्या मुलांना सुखाने जगता येईल. अर्थात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या चांगल्या वृत्तीच्या पोलिसांनी त्यासाठी मनापासून लक्ष घालणे गरजेचे आहे....

सहा महिने आधी जेव्हा भय्यूजी यांनी आत्महत्या केली तेव्हा आणि त्याआधी काही महिने काही वर्षे मी जे भय्यू महाराज यांचा बुरखा फडात होतो हळूहळू तेच आता बाहेर येऊ लागले आहे, मी लिहीत असतांनाच जर भय्यूजी यांचीही आसाराम पद्धतीने चौकशी झाली असती तर सामान्यांची झालेली होणारी लूट आणि तरुणींची होणारी मोठी फसवणूक तेथेच थांबली असती. आपल्या येथे अनिरुद्ध किंवा नरेंद्र सारख्या बुवांची देखील वेळीच आर्थिक चौकशी होणे तेवढेच आवश्यक आहे, करोडो त्यांनीही जमा केले आहेत. दुर्दैवाने येथे तर राज्यकर्ते अधिकारी मंत्री किंवा त्या त्या वेळेचे मुख्यमंत्री देखील भय्यू भक्त झालेले असल्याने भय्यूजी यांचा किंवा राज्यातल्या तत्सम बुवांचा आसाराम झाला नाही मग हे काम वर जी अदृश्य शक्ती काम करते जसे त्या अदृश्य शक्तीनेच पुढे भय्यू महाराज प्रकरण हाती घेतले आणि नेमके भय्यू महाराज लोकांसमोर आणले, आले पण त्यांनी तर आधीच आत्महत्या करून घेतली.आता जे उरले आहेत निदान त्यांचे तरी वाभाडे पोलिसांनी बाहेर काढणे खूप गरजेचे आहे, आवश्यक आहे....

www.vikrantjoshi.com

पुन्हा एकदा तेच जे मी आधी अनेकदा सांगितले लिहिले कि भय्यू महाराज जे उठसुठ प्रत्येकाला सांगायचे कि मी कर्जबाजारी आहे ते तसे अजिबात नव्हते हे मी त्यावेळीही पोटतिडकीने सांगत असतांना त्याकडे दुर्लक्ष झाले, भय्यू तर गेले पण आर्थिक नुकसान वर्षा सत्पाळकर यांच्यासारख्या भक्तांचे झाले. भय्यू महाराज मोठे चतुर होते, ते उगाचच दरदिवशी भक्तांची सांगायचे कि मी कर्जबाजारी आहे त्यामुळे ज्या भक्तांना आर्थिक मदतीची महाराजांकडून अपेक्षा होती ते काढता पाय घ्यायचे आणि जे श्रीमंत भक्त होते ते दया येऊन चार पैसे अधिक पाठवून द्यायचे, आश्रमाला दान करायचे. एखादा सामान्य भक्त जर इंदोरच्या आश्रमात दोन वेळा अधिक जेवला तर त्याला जेथे अपमानित व्हावे लगे ते भय्यू महाराज जमा केलेले पैसे सामान्यांना काढून देणे कदापिही शक्य नव्हते. अनिरुद्ध देशपांडे यांच्यासारखा एखादा गळाला लागलेला श्रीमंत भक्त जर परस्पर एखादी योजना राबवत असेल ते तेवढे फक्त भय्यू महाराज आनंदाने स्वीकारायचे आणि हे दान माझ्याच खिशातून कसे इतरांना सांगत सुटायचे. महाराज जेव्हा स्वतः खूप श्रीमंत होत गेले हे बघूनच मग महाराजांच्या काही नातलगांची किंवा विनायक सारख्या उजव्या डाव्या हातांची नियत फिरली, हळूहळू त्यातून महाराजांना जडलेल्या विकृत वाईट सवयीतून त्यांना कसे ब्लॅकमेल केल्या जाईल त्याकडे विनायक सारख्या महाराजांच्या विश्वासू साथीदारांनी हेरले आणि त्यांनी फासे टाकायला सुरुवात केली, महाराज अडकत गेले त्यांनी मग आत्महत्या केली...

महाराजांना सतत घालून पडून बोलणारी त्यांची आधीची दिवंगत पत्नी किंवा दुसरी बायको आयुषी असे का वागत होत्या, मोठ्या खुबीने पोलिसांनी शोध घेतल्यास हेच लक्षात येईल कि महाराजांचे वादग्रस्त आयुष्य, त्या दोघींनाही असुरक्षित असल्याची भावना निर्माण झालेली होती पुढे दिवंगत पत्नी माधवी यांनी तर महाराजांपासून अलिप्त किंवा दूर राहणे पसंत केले, नको त्या कटकटी आणि नको त्या भानगडी उघड्या डोळ्यांनी बघणे त्यातून माधवी आणि कुहू कायमस्वरूपी इंदोर सोडून पुण्याला वास्तव्याला आल्या. विधवा वर्षा सत्पाळकर यांचे नेमके किती कोटी रुपये महाराजांकडे होते किंवा महाराजांच्या माध्यमातून त्यांनी चुकीच्या ठिकाणी गुंतविले ते १०० कि २०० कोटी, हे महाराजांच्या पाठी जे त्यांचे विनायक मनमित किंवा संजय यादव यांच्यासारखे डावे उजवे हात उजळ माथ्याने फिरताहेत त्यांना पॉलिसी खाक्या दाखवून विचारल्या गेले पाहिजे.नेमके हिडीस सत्य बाहेर पडेल....

आज भय्यू महाराजांच्या घरी त्यांच्या पाठी त्यांच्या कुटुंबाची मोठी वाईट अवस्था आहे. जागेवरूनही न उठू शकणारी त्यांची वयोवृद्ध आई, देखणी आणि तरुण पत्नी आयुषी, अतिशय देखणी केवळ १९ वर्षांची तरुण मुलगी कुहू आणि महाराजांपासून आयुषीला झालेली केवळ वर्षा दीड वर्षांची अपंग मुलगी, यापुढे या साऱ्यांच्या ताटात काय वाढून ठेवलेले आहे हे केवळ त्या अदृश्य शक्तीलाच माहित असेल. चुकीच्या मार्गाने अमापसमाप पैसे घरात आणले कि अशा मंडळींचे आज ना उद्या थोड्याफार फरकाने हे असेच होते मग ते घर प्रमोद महाजनांचे असो अथवा स्वतःला देव म्हणवून घेणाऱ्या भय्यू महाराजांचे....


पत्रकार हेमंत जोशी 

Friday, 21 December 2018

ज्योती अळवणी कथा विविधा : पत्रकार हेमंत जोशीज्योती अळवणी कथा विविधा :  पत्रकार हेमंत जोशी 
ज्योती अळवणी या कोपऱ्यावरच्या उत्तम भेळवाल्यासारख्या मज भासू लागल्या आहेत. आपला नेहमीचा आवडता भेळवाला कसे एकाच स्टीलच्या स्वच्छ भांड्यात पटापट मुरमुरे टाकतो, चिवडा शेंगदाणे टाकतो, तिखट आणि गोड चटणी टाकतो, पाणी शिंपडतो, कोथिंबीर व कांदा घालतो, पापडीचा चुरा कुस्करून टाकतो, सारे काही झटपट टाकूनही तुमच्यासमोर त्यातून उत्तम भेळ मांडतो, तुमच्या तोंडाला आधीच पाणी सुटलेले असते, ती भेळ समोर येताच तुम्ही एकही क्षण न दवडता ती भेळ हादडून मोकळे होता....

ज्योती अळवणी त्यांच्या सतत संपर्कात येणाऱ्या मंडळींना आणि त्यांच्या नवर्याच्या म्हणजे आमदार पराग अळवणी यांच्या विधान सभा परीक्षेत्रातील मतदारांना, आम जनतेला किंवा त्यांच्या स्वतःच्या महापालिका परिक्षेत्रातील सामान्य माणसाला, मतदारांना आपल्यातल्याच एक वाटतात, कोपर्यावरल्या भेळवाल्यासारखे त्यांचे आहे म्हणजे जे काय उत्तमोत्तम असेल ते एकत्र करून कुठेही फजिती गडबड गोंधळ न होऊ देता त्या त्यांच्या मतदारांसमोर पेश होतात म्हणून त्यांना तुमच्या आवडत्या भेळवाल्याची उपमा मी दिली आहे....

www.vikrantjoshi.com

अगदी अलीकडे त्यांचा ' कथा विविधा ' हा विविध कथांनी नटलेला उत्तम सजलेला कथा संग्रह प्रसिद्ध झाला त्यानिमीत्ते मला हेच सांगावेसे वाटले कि याच त्या ज्योती पराग अळवणी ज्या एकाचवेळी वेळात वेळ काढून लिखाण करतात, नगरसेविका म्हणून महापालिका आणि त्यांचा मतदारसंघ गाजवून मोकळ्या होतात. जगप्रसिद्ध पार्ले महोत्सव दरवर्षी न चुकता दिमाखात साजरा करतात. बरे, असेही नाही कि त्यांचा नवरा कुठेतरी संघाच्या एखाद्या छोट्याशा खाजगी बँकेत कारकुनी करतो आणि संध्याकाळी व सकाळी बायकोला घरी सारी मदत करून मोकळा होतो. असे अजिबात नाही कारण पराग हेही आमदार आहेत वरून ते कार्य आणि कार्यक्रम सम्राट असल्याने त्यांनी घरी कमी बाहेर स्वतःला खूपच जुंपून घेतलेले आहे या अशा अस्ताव्यस्त आणि व्यस्त नवऱ्याला त्या कायम सहकार्य करतात वरून घरातही लक्ष घालून मुलींकडे एक दक्ष आई म्हणून तेवढेच लक्षही ठेवतात, देतात. हे असे सतत ज्योती पराग यांचे सकाळ पासून तर रात्री उशिरापर्यंत अति व्यस्त आयुष्य आहे तेही एक स्त्री असून...

असे देखील नाही कि इतरत्र लक्ष घातल्याने त्यांनी स्वतःकडे दुर्लक्ष केलेले आहे त्यातून त्या हुबेहूब राज्यमंत्री विद्या ठाकूर दिसू लागलेल्या आहेत म्हणजे केवळ स्त्री म्हणून जन्माला आलेल्या आहेत म्हणून त्यांना स्त्री म्हणायचे. नाय, नो, नेव्हर, आजही ज्योती पराग अळवणी यांनी जर जुहूच्या मिठीबाई कॉलेज मध्ये प्रवेश घेतला तर मला खात्री आहे, त्यांच्या मागे शिटी मारणाऱ्यांचे कॉलेज तरुणांचे मोठे टोळके लागेल आणि क्या खूब लागती हो, हे गाणे अनेक तरुण त्यांच्या पाठींपुढे ते गुणगुणतांना दिसतील. म्हणणारे म्हणतात देखील, हाय परागकाका आणि हाय मिस ज्योती, काही तर अशीही हूल उठवून मोकळे झाले आहेत कि पराग यांनी माजी मंत्री दत्ता मेघे यांच्याप्रमाणे त्यांच्या मुलीच्या मैत्रिणीशी म्हणजे ज्योती यांना पळवून नेऊन लग्न केलेले आहे, खरे खोटे पराग आणि परमेश्वर जाणे....😜😛

कथा विविधा हा त्यांचा पहिलाच कथा संग्रह आणि कथालेखनाचा देखील हा त्यांचा पहिलाच प्रयत्न पण कथा संग्रह वाचल्यानंतर त्यांनी हे साहित्य क्षेत्रात टाकलेले दमदार पाऊल आहे असे कोणीही म्हणेल. म्हणणे माझे फारसे नक्की आगाऊपणाचे ठरणार नाही पण हेच सांगतो कि व. पु. यांच्या कथा जशा वाचतांना भान हरपून टाकायच्या आणि ऐकतांना तल्लीन करून सोडायच्या सेम तेच कथा लेखिका म्हणून ज्योती अळवणी यांच्या बाबतीत वाटते. कथा विविधा हाती घेतल्या नंतर एका दमात वाचून मोकळे व्हावेसे वाटणारे ओघवत्या शैलीचे दमदार शब्दांचे एक छान पुस्तक आहे, हे मनातून मनापासून मनःपूर्वक तुम्हाला सांगतो. एक डोळस सामाजिक कार्यकर्ती मनात काय काय साठवते साचवते आणि त्यातून ती ताकद असेल तर ते शब्दातून केवढे प्रभावी प्रकट करू शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ज्योती पराग अळवणी यांचे कथा विविधा. नक्की वाचावे तेही विकत घेऊन असे हे विविध कथांचे एकत्रित गुंफण, वाचनीय पुस्तक...

जाणून बुजून अपत्यांची मर्यादित संख्या ठेवून एकत्र जनतेला समाजाला समाज कार्याला वाहून घेतलेले अळवणी दाम्पत्य. राजकीय महत्वाकांक्षा असूनही केवळ त्यामागे न धावता आपणही आपल्या घराचे आणि समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून पुढे पुढे धावणारे अळवणी दाम्पत्याचे यशस्वी जीवन, वरून उदरनिर्वाहाचे काहीतरी साधन असावे म्हणून पराग यांचे छुटपूट व्यवसाय, मला वाटते दोघांचे उत्तम नियोजन त्यातून त्यांना यश मिळाले ते यशस्वी ठरले आहेत. पराग म्हणतात ते मनाला तंतोतंत पटते, ' नगरसेविका या नात्याने काम करतांना मिळालेल्या अनुभवातून आणि वाचनातून सुरु झालेला हा प्रवास गेल्या सात आठ वर्षात लेखनापर्यंत पोहोचलेला मी पाहिलेला आहे. घर, मुली, मतदारसंघ अशा जबाबदाऱ्या सांभाळत असतांना एखादा विषय मनाला भिडला तर ती जिद्दीने कधी भल्या पहाटे तर कधी दुपारी, तर कधी मध्यरात्री जागून लिहीत असे. आपल्या मनाला भिडलेल्या विषयाला न्याय देण्याच्या तिच्या प्रामाणिपणामुळे अनेक कथा, कविता तिने लिहिल्या. ' आमदार अळवणी यांचे हे त्यांच्या पत्नीविषयीचे केलेले कौतुक, मला वाटते प्रत्येक नवऱ्याची पत्नी हि अशीच असावी त्याला स्वाभिमान वाटावा अशी आणि सतत काहीतरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द ठेवणारी...
तूर्त एवढेच :

पत्रकार हेमंत जोशी 

Monday, 17 December 2018

वर्ष तावडेंच्या कविता आणि इतर बरेच काही : पत्रकार हेमंत जोशी

वर्ष तावडेंच्या कविता आणि इतर बरेच काही : पत्रकार हेमंत जोशी 

स्त्रियांचे आत्मचरित्र गाजतात, सुनीताबाईंचे आहे मनोहर तरी, माधवी देसाईंचे नाच ग घुमा, मल्लिका अमरशेख यांचे मला उध्वस्त व्हायचे आहे, असे कितीतरी. अमृता देवेंद्र फडणवीस, ज्योती पराग आळवणी आणि वर्षा विनोद तावडे या तिघींवर लिहीत असतांना सहजच मनाला वाटले कि ज्योती यांनी आत्मचरित्र अजिबात लिहू नये, पराग यांना राजकारणात आणखी मोठे व्हायचे आहे म्हणून आणि वर्षा यांनी मात्र त्यांच्या कविता संग्रहातून जसे मनात साचलेले काव्यरूपाने ओकले तेच त्यांनी आत्मचरित्र लिहून आणखी मन मोकळे करावे आणि आत्मचरित्राला नाव द्यावे, मनाचे अस्वस्थ दार...

संदीप खरे यांनी जे सांगितले ते खरे आहे कि कविता करणे म्हणजे कवीच्या संवेदनशील मनाचे लक्षण आहे, थोडक्यात वर्षा नक्की संवेदनशील आहेत,म्हणून त्यांनी मनातले नेमके आपल्या तोडक्यामोडक्या कवितांमधून लिहिले रेखाटले आहे. जशी अजिबात अनुभव नसलेल्या तरुणीची मधुचंद्राच्या रात्री मोठी फजिती होते त्यातून अनेक गंमतीदार प्रसंग उद्भवतात ते तसेच नवकवी चे असते, क्षणार्धात कविता करण्याचे धाडस नवकवींमध्येच आढळते. शब्द आवडले कि मनात साचलेल्या विचारांवर कविता करून मोकळे व्हायचे असे काहीसे नवकवींचे असते. खरे तर कविता वाचून हेच वाटले कि काव्य संग्रह काढायला वर्षा यांनी मोठा कालावधी का घेतला, ८-१५ दिवसात जे अगदी नक्की शक्य होते. समजा सहज शक्य आहे म्हणून शिक्षण मंत्र्याच्या पत्नीची कविता एखाद्या पाठय पुस्तकात घुसडल्या गेली तर, बापरे ! मग मात्र विद्यार्थ्यांचे काही खरे नाही....

मनाला दार असतंच, हा काव्यसंग्रह वाचतांना त्यातली ' सौमित्र ' यांची प्रस्तावना वाचतांना मनात विचार आला कि अलीकडे सौमित्र यांच्याकडे काही काम उरलेले दिसत नाही कारण अशा कविता संग्रहावर एवढी मोठी प्रस्तावना, एखादा रिकामटेकडाच असे दिव्य काम करू शकतो. प्रस्तावना वाचल्यानंतर सौमित्र आयुष्यात मला पहिल्यांदाच खूप खुजे वाटले. एखादा त्यातून हे म्हणेलही कि सांस्कृतिक मंत्र्यांना खुश करण्यासाठी संदीप खरे आणि अभिनेता किशोर कदम उर्फ कवी सौमित्र यांनी असे टोकाचे पाऊल उचलले असावे. तब्बल सहा पाने प्रस्तावना म्हणजे कवितांपेक्षा प्रस्तावनाच मोठी हे म्हणजे असे झाले कि सौमित्र डब्लू डब्लू मध्ये कुस्ती खेळणाऱ्या  चड्डी घालून एखाद्या जाहीर समारंभाला गेले, यालाच चार आण्याची कोंबडी एक रुपयाचा मसाला, असेही म्हटल्या जाते....

जसे एक माणूस विहिरीत बुडताना एका मुलास बाहेर काढतो त्याला वाचवतो, बाहेर आल्यावर विहीरीसभोवताली जमलेले सारे त्याला असंख्य प्रश्न विचारून भंडावून जेव्हा सोडतात तेव्हा तो म्हणतो, मी तुमच्या सार्या प्रश्नांची उत्तरे नक्की देईन पण आधी मला हे सांगा कि मला विहिरीत ढकलले कोणी, माझेही नेमके तेच झाले आहे कि वर्षा यांच्या त्या मैत्रिणी कोण, ज्यांनी त्यांना कविता लिहिण्या आणि काव्यसंग्रह काढण्या भाग पाडले. वर्षा यांच्या अस्वस्थ मनातली आणखी एक कविता येथे लिहून हा विषय पूर्ण करतो....


सुन्या गळ्याला नावं ठेवतील 
म्हणून घालतेय मंगळसूत्र 
खरी मानेल ती तुला तिची 
जेव्हा बनशील सच्चा मित्र ! 
काळ्या मण्यांचं एक ' डोरलं ' 
तिला तसं जड नाही 
पण 
ती शोधते आहे कधीची 
तुझया डोळ्यात छबी तिची ! 
वाट्या, दोरा, मणी 
सगळ्यांची तीच कहाणी 
नुसतं मंगळसूत्र 
कसं ठरवणार 
कोण राजा
आणि कोण राणी ? 
क्रमश:

 पत्रकार हेमंत जोशी 

Sunday, 16 December 2018

कविता तावडेंच्या बायकोच्या : पत्रकार हेमंत जोशी


कविता तावडेंच्या बायकोच्या : पत्रकार हेमंत जोशी 
विनोदजींच्या बायकोची पुढली कविता मला तरी वाटते, विनोदजींनाच उद्देशून असावी, त्यांनाच समर्पित केली असती तर काव्यसंग्रहाची निदान चर्चा तरी नक्की झाली असती...कविता,

 सहजीवन म्हणजे...

सहजीवन म्हणजे 
नाही नुसतं एका घरात राहणं
सहजीवन म्हणजे 
नाही फक्त एका छताखाली निजण
सहजीवन म्हणजे 
दोघांचं मिळून आउटिंग 
सहजीवन म्हणजे 
दोघांचं एकत्र हाऊसकीपींग 
सहजीवन म्हणजे...
बँकेत जॉईंट अकाउंट असणं
सहजीवन म्हणजे 
एकत्र इमेल अकाउंट जपणं 
सहजीवन म्हणजे 
एकमेकांना पासवर्ड शेअर करणं
सहजीवन म्हणजे 
मोबाईल, लॅपटॉप 
बिनधास्त खुला ठेवून जगणं 
सहजीवन म्हणजे 
विश्वास ठेवणं 
आणि 
सहजीवन म्हणजे 
विश्वासाला पात्र ठरणं 

नाशिकला फार वर्षांपूर्वी मी एक बंगला बांधला होता, बांधकामाची देखरेख मिलिटरीतून निवृत्त झालेल्या कुलकर्णी आडनावाच्या गृहस्थाकडे होती, त्यातून त्यांच्या पत्नीचीही चांगली ओळख झाली, त्या म्हणाल्या, येथे आलात कि हॉटेलात न उतरता आमच्याचकडे उतरत चला, मी त्यांचे ऐकले, त्यांच्याकडे उतरलो कि रात्री जेवणापूर्वी त्या त्यांनी केलेल्या रचलेल्या कविता एक पत्रकार म्हणून आधी मला ऐकवायच्या नंतर जेऊ घालायच्या, मला वाटते, भीक नको पण कुत्रा आवर, हि म्हण या अशाच प्रसंगातून जन्माला आली असावी. वर्षा विनोद तावडे यांचा अलीकडे ' मनाला दार असतंच ' हा काव्य संग्रह प्रकाशित झाला, माझ्या हाती आला, कविता वाचून काढल्यानंतर का कोण जाणे खूप वर्षांनी पुन्हा एकदा मिसेस कुलकर्णींची आठवण झाली. विशेष म्हणजे विनोद तावडे मंत्री झाले आणि वर्षा यांनी कविता करायला सुरुवात केली...

मनातल्या भावनांचं व्यक्त होणं म्हणजे काव्य, वर्षा यांचा हा पहिला प्रयत्न नक्की बाळबोध आहे म्हणजे लहानपणी माझ्या शेजारी प्रमोद जोशी नामेंएक मित्र राहत असे, तो तारुण्यात आला आणि एकदम कविता करायला लागला, कुलकर्णी बाई, प्रमोद जोशी आणि आता वर्षा तावडे, झोप येण्या सापडलेले जालीम औषध, माझा साक्षात्कार, असे म्हणता येईल. शिक्षण मंत्र्यांची पत्नी या नात्याने काव्य करण्यापूर्वी वास्तविक नामवंत कवींशी चर्चा करून त्यांचे काव्य अधिक प्रगल्भ ठरू शकले असते. नाही म्हणायला, थेट संदीप खरे यांनी चार वाक्ये लिहून वर्षा यांच्या या काव्यसंग्रहाची समाप्ती केली आहे, अर्थात शिक्षण मंत्राच्या पत्नीने मनात आणले असते तर थेट स्वर्गातून ग्रेस खाली आले असते आणि काव्यसंग्रहाचे कौतुक केले असते....

पण...कविता यथातथाच असल्यात तरी त्यातला भावार्थ नेमका त्यांच्या आणि विनोदजींच्या चंचल आयुष्याभोवती फिरतो, वाचणाऱ्याच्या ते अगदी सहज लक्षात येते, वर दिलेली कविता, हि अशीच त्या दोघांच्या आयुष्याभोवती फिरलेली आहे, का कोण जाणे, मला वारंवार वाटते आहे. इतरही कविता या अशाच आहे. नाही म्हणायला राजकीय महत्वाकांक्षी वर्षा, मंत्री विनोद तावडे यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर बाळासाहेब आपटे यांच्या पत्नी निर्मलाताई यांनी संघ भाजपा माध्यमातून स्थापन केलेल्या ' भारतीय नारी शक्ती ' या संघटनेला हातभार लावत आल्या आहेत पण एवढी लहान त्यांची ताकद नाही त्या देखील ज्योती पराग आळवणी यांच्याप्रमाणे विनोद तावडेंच्या राजकीय पंक्तीला बसू शकल्या असत्या पण ते घडले नाही पुढे विनोदजी मंत्री झाले त्यातून कदाचित आलेले एकटेपण आणि मनात साचलेल्या किंवा मनातल्या एकलकोंड्या विचारांना त्यांनी जमली तशी वाट मोकळी करून दिली असावी...

आणखी एक कविता....आयुष्याच्या उतरंडीला 

आयुष्याच्या उतरंडीला 
एकटं एकटं बरं वाटतं
एकमेकांच्या अपेक्षांचं 
ओझं मनावर नको वाटतं !
तू तिथं मी पेक्षा 
माझं माझं राहावंसं 
बागबान सिनेमापुरतं ठिकाय
घरात त्याचं दडपण भासतं ! 
तरुणपणीचं प्रेम 
तुमचं आमचं सेम असतं 
वयानुरूप म्हातारपणी 
' त्यांचं ' थोडं वेगळं असतं !! 

मला खात्री आहे, वर्षा विनोद तावडे यांनी लोकांच्या नव्हे तर स्वतःच्या आयुष्यातल्या आणि मनातल्या भावना न राहवून कविता करून काव्यसंग्रहातून व्यक्त केलेल्या आहेत. भलेहि कवितांचा दर्जा नव्याने सायकल शिकलेल्या लहान मुलासारख्या असतील पण सांगता येत नाही, हळू हळू वर्षा तावडे देखील मान्यवरांच्या पंक्तीला जाऊन बसू शकतील, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, वन मोअर वन मोअर असे फक्त त्यांना कोणीतरी सांगत राहायला हवे, त्यांच्यातही एक दिवस तुम्हाला बहिणाबाई दिसतील...
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Friday, 14 December 2018

रवी राणाशी पंगा ना लेना : पत्रकार हेमंत जोशीरवी राणाशी पंगा ना लेना : पत्रकार हेमंत जोशी 

धूर्त नेत्यांशी आणि चवताळलेल्या स्त्रीशी कधीही पंगा घेऊ नये, त्यांच्याशी दंगा करण्याचाही प्रयत्न करू नये. तिकडे बडनेरा अमरावती विधान सभा परिक्षेत्रात भाजपाचे स्थानिक नेते आणि मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क प्रमुख श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांनी थेट रवी राणा या अति धूर्त विद्यमान आमदाराची नेत्याची छेड काढलेली आहे अर्थ सरळ आहे पुन्हा एकदा तुषार भारतीय यांना रवी राणा यांच्या विरोधात येत्या विधान सभा निवडणुकीला उभे राहून आपले नशीब आजमावयाचें आहे त्यासाठी प्रसंगी राणा यांच्या विरोधात थेट प्रसंगी रस्त्यावर देखील उतरण्याची मानसिक तयारी भारतीय यांनी केलेली आहे...

भारतीय बंधू भाजपाचे आणि संघाचे कट्टर असल्यानेच श्रीकांत भारतीय यांना थेट मुख्यमंत्री कार्यालयात खुर्ची मिळालेली आहे, स्थान मिळालेले आहे. तुषार भारतीय यांना अमरावती महापालिकेचा तगडा अनुभव आहे कारण ते अमरावती महापालिकेत भाजपातर्फे निवडून आलेले लोकमान्य लोकप्रिय नगरसेवक आहेत शिवाय ते फार कमी मतांनी मागल्यावेळी विधानसभेला पराभूत झालेले असले तरी त्यांना विधानसभा लढविण्याचा तगडा अनुभव आहे पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला तुषार भारतीय यांची उमेदवारी मिळविताना फजिती होणार आहे असे दिसते कारण विद्यमान आमदार रवी राणा हे देखील, मी मुख्यमंत्र्यांना फार जवळचा आहे, अशी वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी ठरले आहेत, त्यात फारसे काही खोटे असावे वाटत नाही कारण रवी राणा यांचा मुख्यमंत्र्यांसभोवताली कायम सहज वावर, त्यामुळे ते खोटे सांगत सुटले आहेत, वाटत नाही...

पण लॉयल्टी रवी राणा यांच्या रक्तात किंवा स्वभावात असावी वाटत नाही, कारण एकेकाळी अमरावती मध्ये अति सामान्य जीवन जगणारे रवी राणा अमरावती आणि मुंबईत अत्यंत वादग्रस्त वादळी व्यक्तिमत्व ठरलेले अजय नावंदर यांचे बोट पकडून मुंबईत आले, त्यांचे उजवे हात म्हणून ओळखल्या जाऊ लागले, एकदा फार पूर्वी मी जेव्हा अजय नावंदर यांना माहिती घेण्याच्या निमित्ताने जुहूला भेटायला गेलो होतो तेव्हा हेच रवी राणा त्यांच्या सभोवताली सांगकाम्या म्हणून मोठ्या अदबीने वावरतांना मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहेत....

www.vikrantjoshi.com

म्हणजे एक काळ असा होता कि जर वादग्रस्त अजय नावंदर यांनी रवी राणा यांना या ठिकाणी तासभर बसून राहा सांगितले तर हेच राणा दोन तास बसून राहायचे, उठ सांगितले कि उठायचे आणि जा सांगितले कि पळत सुटायचे. रवी राणा आधी काय होते आन नंतर कसे मोठे झाले हे अजय नावंदर अधिक विस्तृत सांगू शकतील.अर्थात अजय यांचे बोट पकडून मुंबईत आलेले रवी राणा पुढे त्यांच्याच ओळखीने दुसर्या एका अति वादग्रस्त व्यक्तिमत्वाला चिकटले आणि तेथेच त्यांनी जवळपास अजय यांच्याशी संबंध तोडले. ते अतिवादग्रस्त व्यक्तिमत्व होते किंवा आहे, बिल्डर सुधाकर शेट्टी, म्हणून कधी कधी भीती वाटते जेव्हा ते फडणवीसांच्या सभोवताली फेऱ्या मारतांना दितात, पण त्यावर राणा यांचे हे स्पष्टीकरण असू शकते कि आमदार या नात्याने माझा तेथे वावर असतो किंवा मोठ्या खुबीने मी विद्यमान सरकारातील मंत्र्यांचा अधिकाऱ्यांचा वापर म्हटल्यापेक्षा उपयोग करून घेतो, असेही ते सांगायला कमी करणार नाहीत...

पुढे अजय नावंदर यांच्याकडे पाठ फिरवून सुधाकर शेट्टी यांना बिलगलेले रवी राणा तदनंतर मात्र राजकीय आणि आर्थिक यशाच्या पायर्या भराभर चढत फार फार पुढे निघून गेले, अजय नावंदर यांना हात चोळत बसण्यापलीकडे फारसे काही उरले नाही, म्हणून मी सुरुवातीलाच सांगितले कि धूर्त नेत्यांशी पंगा घेणे त्यांना आव्हान देणे मोठे कठीण असे काम असते, जे काम सध्या किंवा पुन्हा एकदा अमरावती मध्ये भाजपाच्या तुषार भारतीय यांनी हाती घेतले आहे. अजय नावंदर असोत कि सुधाकर शेट्टी, अशा अत्यंत वादग्रस्त मंडळींशी थेट आणि उघड संबंध ठेवणारे रवी राणा हे कच्च्या गुरुचे नक्कीच चेले नाहीत त्यामुळे त्यांच्याशी निवडणुकीत लढा देणे म्हणजे एखाद्याने कुत्र्याच्या ढुंगणात फुंकर मारण्यासारखे आहे. चवताळलेला कुत्रा आणि चिडलेला नेता, खतरनाक ठरतात, समोरच्याला संपवून मोकळे होतात. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे एकीकडे तुषार भारतीय राणा यांच्या विरोधात थेट रस्त्यावर उतरून घोषणाबाजीत मग्न असतांना चतुर रवी राणा मात्र तोंडावर बोट ठेवून गप बसलेले आहेत, असतात याचा अर्थ ते तुषार भारतीय यांना घाबरलेले आहेत असे अजिबात नाही. अहो, जो माणूस थेट तेही मुंबईतल्या गॅंगस्टर मंडळींचे बोट पकडून आपले साम्राज्य निर्माण करू शकतो उभे करू शकतो ते राणा, भारतीय यांना घाबरून चूप बसले आहेत असे अजिबात वाटत नाही कदाचित हि वादळापूर्वीची शांतता असावी..
तूर्त एवढेच : 

पत्रकार हेमंत जोशी 

हमारी अमृता : पत्रकार हेमंत जोशी
हमारी अमृता : पत्रकार हेमंत जोशी 

वर्षा विनोद तावडे, ज्योती पराग आळवणी आणि अमृता देवेंद्र फडणवीस, या तिघी तीन मान्यवरांच्या बायका यापैकी असे वाटले होते कि वर्षा राजकारणात उतरतील आणि पुढेही निघून जातील जसे मधू चव्हाण यांची दुसरी पत्नी खूप पुढे किंवा त्यांच्याही पुढे निघून गेली तशी पण ते घडले नाही, एकेकाळी विद्यार्थी परिषदेची हि आघाडीची नेता पण विनोद यांच्याशी प्रेमविवाह केल्यानंतर त्यांनी अधिकाधिक वेळ चूल आणि मूल सांभाळण्यात घालविला. ज्योती मात्र थांबल्या नाहीत त्या राजकारणात नवऱ्यासंगे अधिकाधिक व्यस्त होत गेल्या, सध्या त्या नगरसेविका आहेतच. व्हेरी व्हेरी ऍक्टिव्ह लेडी...

अमृता देवेंद्र फडणवीस मात्र एक अफलातून व्यक्तिमत्व, फार जवळून त्यांना कधी बघितले नव्हते जरी देवेंद्र यांच्याशी त्यांच्या अगदीच तरुण वयापासून संबंध होते तरी, अलीकडे मात्र दिवाळी निमित्ते मी आणि विक्रांत मुख्यमंत्र्यांनी आमंत्रण दिल्याने वर्षा बंगल्यावर गेलो होतो आणि मुख्यमंत्र्यांनी अमृता यांची ओळख करून दिली, काही मिनिटे छान बोलणे झाले, तेवढीच ओळख पण मध्यंतरी भलतेच घडले, अमृता यांचे ते रूप बघून मी आश्चर्याने तोंडात बोटे घातली....

मुंबईतल्या सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध शाळांपैकी एक, जुहूची म्हणजे जमनाबाई नरसी स्कुल. ऋषितुल्य पिढीजात श्रीमंत, मोठे उद्योगपती, अतिशय स्पष्टवक्ते, बुद्धिमान, आणि शाळेवर नितांत प्रेम करणारे श्रीमान जयराजजी ठक्कर या स्कुलचे जवळपास सर्वेसर्वा, त्यांचे उत्साही आणि उत्सवी कर्तबगार सुपुत्र सुजय ठक्कर देखील शाळेच्या कारभारात त्यांना सहकार्य करतात. दोघा बाप बेट्यांचे आपापसातले फ्रेंडली ट्युनिग, बघायला छान वाटते. स्कुल कशी असावी तर जमनाबाई स्कुल सारखी, आणि मी हे स्वानुभवातून सांगतो कारण माझे दोन्ही नातू आर्यवीर आणि अनमोल या स्कुलचे विद्यार्थी आहेत....

विशेष म्हणजे स्कुल मध्ये जवळपास ९० टक्के विद्यार्थी हे एकतर गुजराथी आहेत किंवा फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या कुटुंबातले आजी माजी विद्यार्थी आहेत जसे अनिल कपूर, अभिषेक बच्चन, आलिया भट आणि असे कितीतरी. आम्ही सोडून बहुतेक सारे गर्भश्रीमंत कुटुंबातून आलेले आहेत. अलीकडे जमनाबाई स्कुल ने सर्वांगसुंदर आधिनिक पद्धतीने तयार केलेल्या खेळाच्या मैदानाचे उदघाटन अमृता देवेंद्र यांच्या हस्ते होते, त्यानंतर अभिषेक बच्चन यांच्या नेतृत्वाखाली एक फूटबॉल मॅच देखील आयोजित करण्यात आली होती. माझे नातू कोणत्या स्कुल मध्ये जातात हे त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर माझ्या नेमके लक्षात आले म्हणजे श्रीमंत आणि उच्चशिक्षित आईवडील तेथे बघायला मिळाले, धन्य वाटले....

www.vikrantjoshi.com

अनेकांची भाषणे झाली आणि अमृता फडणवीस भाषणाला उभ्या राहिल्या, एक नागपूरकर तरुणी जमलेल्या एलिगंट जमावासमोर भाषण करायला उभी राहिली, अमृता यांचा तेथला सहज वावर, विशेष म्हणजे हाती कोणताही कागद न घेता केलेले फाडफाड, इंग्रजीतून भाषण, मिस्टर देवेंद्र उद्या जर तुम्ही अमुक एखाद्या वक्तृत्व स्पर्धेत उतरलात आणि त्या स्पर्धेत अमृता यांनीही भाग घेतला असेल, मला खात्री आहे, प्रथम क्रमांक देवेंद्र पत्नीने पटकावलेला असेल. त्यांच्या त्या उत्स्फूर्त आणि अस्क्खलीत भाषणातील प्रत्येक वाक्यावर जमलेले सारे टाळ्या मारीत होते, कान देऊन ऐकत होते. मला अभिमान वाटला, मन आनंदाने भरून आले.....

अमृता फडणवीस आणि जयराजजी ठक्कर माझ्या पुढल्याच रांगेत बसले होते,अमृता यांना हाय हॅलो करावे किंवा नाही या विचारात होतो, निघतांना जयराज यांना सांगण्यासाठी त्यांच्या जवळ गेलो आणि अमृता यांचे केवळ माझ्याकडे लक्ष गेले नाही तर त्यांनी मला ओळखले देखील, पुढली पाच मिनिटे मी, त्या आणि जयराजजी ज्या पद्धतीने बोलत होतो, जयराज यांच्या चेहऱ्यावरचे कौतुकाचे भाव त्यातून लपले नाहीत आणि अमृता तुमचे हे असे वागणे मला थेट त्या शरद पवारांसारखे वाटले, म्हणजे एकदा ओळख झाली रे झाली कि पवार जसे एखाद्याला नावासहित आवाज देतात, तसे तुमच्या बाबतीत वाटले. 
काय हरकत आहे तुम्हीही राजकीय क्षेत्रात पाय ठेवायला...आगे बढो....
तूर्त एवढेच.

पत्रकार हेमंत जोशी