Friday, 15 December 2017

फडणवीसांचे कारनामे ६ : पत्रकार हेमंत जोशी


फडणवीसांचे कारनामे ६ : पत्रकार हेमंत जोशी 
अलीकडे नागपूरवरून मुंबईला परततांना विमानतळावर एक प्रशासकीय अधिकारी भेटले, गप्पांच्या ओघात आमच्या दोघांचेही एका मुद्द्यावर असे एकमत झाले कि, फडणवीस यांच्या आधी जे जे मुख्यमंत्री झाले त्यांच्यासारखे यांचे वागणे किंवा दिनचर्या का नाही म्हणजे मनोहर जोशी शंकरराव चव्हाण किंवा सुधाकरराव नाईक, पृथ्वीराज चव्हाण तर पुण्यातल्या निवृत्त झालेल्या पेन्शनरसारखे वामकुक्षी,वेळेच्या वेळी जेवण आटोपून कामकाज सांभाळायचे, मला तर वाटते फडणवीस यांनी भलेही अशोक चव्हाण पद्धतीने चिप लेव्हलवर नक्कीच हे मुख्यमंत्रीपद उपभोगू नये पण मुख्यमंत्री म्हणजे या राज्याचा राजा या पद्धतीने त्या विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे स्टाईलने हे मुख्यमंत्रीपद उपभोगावे, ते कसे अंगाला फारसे लावून न घेता त्यांचे मुख्यमंत्रीपद उपभोगून मोकळे झाले, मित्र आणि मैत्रिणिंसंगे धमाल करीत हे दिघे धमाल आयुष्य जगले तेच देवेंद्र फडणवीसांनी करावे, जगावे. कशासाठी जीवाची एवढी ओढाताण, उद्या तुम्ही आजारी पडलात तर हीच सभोवताली जमलेली भुते आपला स्पर्धक बाजूला पडला म्हणून पेढे वाटून मोकळे होतील. असेही नाही कि हे मुख्यमंत्रीपद गेले कि फडणवीस वार्धक्यामुळे काशीला जाऊन निवृत्तीचे जीवन जगणार आहेत, नो, असे अजिबात नाही कारण या राज्यातल्या लोकांना या देवेंद्र यांना उद्याचे पंतप्रधान म्हणून बघणे नक्कीच आवडणार आहे आणि तशी संधी त्यांना जेव्हा केव्हा चालून येईल तेव्हा विरोधक प्रसंगी कट्टर मुसलमान असला तरी तो फडणवीसांना मनापासून पाठिंबा देऊन मोकळा होईल कारण फडणवीस हे असे एकमेव सत्तेतले नेते आहेत कि त्यांच्या पाठी त्यांचे विरोधकही त्यांची होणारी ओढाताण बघून, अरेरे म्हणून मोकळे होतात...

काही माणसे त्या त्या पदासाठीच जणू जन्मलेली आहेत असे अनेकांच्या मनाला वाटत असते. १९९५ दरम्यान जेव्हा या राज्यात भाजपा आणि शिवसेना सत्तेसाठी निवडून आली, सरकार बनविण्यासाठी त्यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणावर निवडून आलेल्या अपक्ष आमदारांची गरज होती आणि अपक्षांनी युतीला पाठिंबा दिला होता हे तुम्ही जाणून आहातच. आमचा तुम्हाला पाठिंबा आहे हे सांगण्यासाठी जेव्हा अपक्षांच्या वतीने त्यांच्यातलेच निवडून आलेले हर्षवर्धन पाटील आणि अनिल देशमुख दादरच्या कोहिनुर मध्ये बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला, सांगायला गेले तेव्हा बाळासाहेब त्या दोघांनाही, त्या दोघांच्याही राजबिंड्या व्यक्तिमत्त्वाकडे बघून पटकन म्हणाले, अरे, तुम्ही येथे कशाला, तुम्ही दोघांनी तर सिनेमात हिरो म्हणून काम करायला हवे. विशेष म्हणजे हा किस्सा मला श्रीमान हर्षवर्धन पाटील यांनी अलीकडे गप्पांच्या ओघात सांगितला. मस्तच दिसतात ते दोघेही अगदी एखाद्या पुरुषाला देखील त्यांना डोळा मारण्याचा मोह व्हावा. थोडक्यात काही माणसे, काही व्यक्तिमत्वे आपल्याला त्या त्या ठिकाणीच बघायला आवडत असतात जसे देवेंद्र फडणवीस, हा नेता ज्या पोटतिडकीने या राज्याच्या बिकासाकडे बघतो, बघून हेच वाटते कि जसे आर आर पाटील या राज्याचे कायमस्वरूपी ग्रामविकास मंत्री म्हणून कार्यरत हवे होते, ते तसे फडणवीस हे देखील येथे पुढे आणखी काही वर्षे मुख्यमंत्री म्हणूनच येथील जनतेच्या सेवेत राहायला हवेत...

आणखी एका महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो, अलीकडे काहीसे थोडेसे वादग्रस्त ठरले आहेत आपले मुख्यमंत्री आणि विषय आहे त्यांनी आग्रहाने प्रसाद लाड यांना आधी विधान परिषदेची उमेदवारी दिली तदनंतर लाड यांना निवडून आणताना आपली राजकीय व्यक्तिगत ताकदही वापरली म्हणून. प्रसाद लाड यांना फडणवीसांनी नको तेवढे जवळ का केले, मित्र म्हणून मिठीत का घेतले त्यावर काथ्याकूट करतांना मी अनेकांना बघतोय म्हणून नेमके लाड हे प्रकरण काय आहे ते जाणून घेतले आणि लाड यांना उमेदवारी देतांना मुख्यमंत्री योग्य होते कि चुकले त्यांनी चूक केली त्यावर देखील मी नेमकी माहिती घेतली. ते येथे टप्प्याटप्प्याने तुमच्यासमोर मांडणार आहे. मला वाटते जेव्हा भाजपा आणि फडणवीस दोहोंनी प्रवीण दरेकर यांना ज्या पद्धतीने भाजपामध्ये मानाचे स्थान दिले, अपेक्षा हीच होती कि त्यांनी येथे या मुंबईत भाजपा ची मराठी मराठा ताकद वाढवावी पण असे अजिबात घडले नाही याउलट केवळ तुरुंगवास टाळण्यासाठी कि काय दरेकर यांना सत्तेत आलेल्या भाजपाचा सहारा घेतला, हे असेच इतर राजकीय जाणकारांना वाटले म्हणजे उद्या जर पुन्हा या राज्याचे सहकार मंत्री म्हणून हर्षवर्धन पाटील पुढे आले तर हेच दरेकर काँग्रेस मध्ये प्रवेश करून मोकळे होतील. थोडक्यात, केवळ आशिष शेलार यांच्या खांद्यावर धुरा ठेवून मुंबईतले मराठी मतदान वाढवावे एवढे मर्यादित विचार न ठेवता फडणवीस यांनी हे असे केले त्यांनी दरेकर अपयशी ठरल्यानंतर थेट प्रसाद लाड यांना पुढे केले, मोठे केले, आमदार केले....
अपूर्ण :


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment