Thursday, 2 November 2017

फडणवीस सरकार : पत्रकार हेमंत जोशी


फडणवीस सरकार : पत्रकार हेमंत जोशी 

अलीकडेच तुम्हाला सांगितले होते कि मी खूप भाग्यवान यासाठी आहे कि मला माझ्या पाक्षिकाला कोणीही स्पर्धक नाही, प्रतिस्पर्धी नाही म्हणजे माझ्यापेक्षा कितीतरी पटीने कित्येक पटीने प्रचंड मोठे होण्याची क्षमता असतांना अनिल थत्ते यांनी गगनभेदी बंद केले, कैलास म्हापदी यांनी दैनिक काढून ठाण्यात स्वतःला जेरबंद केले, शरद पाटील वाड्याच्या पुढे सरकलाच नाही, अनिकेत जोशींचे साप्ताहिक म्हणजे पुण्यातल्या श्रेयस ची मिळमिळीत गुळगुळीत सात्विक थाळी, महत्वाचे म्हणजे पुढारीच्या जाधवांनी जसे लोणीकर यांनी शांताबाईंना ठेवून घेतले होते तसे उदय तानपाठक यांना ठेवून घेतले असावे कारण जेव्हा केव्हा जाधवांचा विषय निघतो तेव्हा तेव्हा उदय त्यांचा आमचे मालक असा लाजून उल्लेख करतो, थोडक्यात अतिप्रचंड क्षमतेच्या तानपाठक यांना जाधव यांनी ठेवून घेतल्याने आम्हाला देव पावला, महत्वाचा स्पर्धक बाजूला पडला आणि अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे एक आणखी मोठा होऊ शकणारा स्पर्धक कधी पत्रकार झालाच नाही, पत्रकारितेत उतरलेच नाही, तो स्पर्धक थेट या राज्यात मोठा प्रशाकीय अधिकारी झाला.हे महाशय पत्रकार झाले असते तर नक्की मला माझे गाव गाठून तेथे भिक्षुकीत उतरावे लागले असते, भटजी व्हावे लागले असते...

शितावरून भाताची परीक्षा होते, पारखी माणसाची नजर घारीसारखी असते. मला ते क्षणार्धात लक्षात आले कि हे प्रशाकीय अधिकारी चुकून पत्रकारितेत आले असते तर भल्याभल्या पत्रकारांची त्यांनी छुट्टी केली असती, ते उत्तम लेखक आणि संपादक झाले असते, त्यातही प्रचंड यशस्वी ठरले असते. मी श्रीमान मिलिंद म्हैसकर यांच्या विषयी हे सांगतोय. त्यांचे मराठीतले लिखाण अलीकडे वाचण्यात आले, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर त्यांनी किस्त्रीम या मासिकात लिहिलेला लेख माझ्या वाचण्यात आला, तो एकदा वाचून समाधान झाले नाही म्हणून आणखी २-३ वेळा वाचला, मग मी देवाचे आभार मानले कि म्हैसकर यांना त्याने पत्रकार केले नाही, पत्रकारितेत आणले नाही. देवेंद्र फडणवीसांच्या सान्निध्यात सहवासात आल्यानंतर त्यांनी जे फडणवीसांच्या विशीनंतर तर आजतागायत जे बारकावे टिपून ठेवले नंतर ज्या खुबीने लिहून काढले त्या निमित्ते मला व्यक्तीश: त्यांच्यात मोठा लेखक आणि पत्रकारही दिसला. दोन तीन महिने झाले असतील श्रीमान मिलिंद म्हैसकर यांनी किस्त्रीम मध्ये एक प्रदीर्घ वाचनीय अत्यंत माहितीपूर्ण लेख देवेंद्र फडणवीस यांच्या २०-२२ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीवर लिहून काढला आहे, शबँकां अप्रतिम आहे. विशेष म्हणजे किस्त्रीम च्या गिरीश दाबके यांनी तो साभार परत न करता छापला आहे त्यावरूनच तुमच्या ते लक्षात आले असेल कि म्हैसकरांची लेखणी किती प्रगल्भ आणि खुसखुशीत असेल. फार पूर्वी मी आमच्या शेजारी राहणाऱ्या नीना वहिनींच्या कविता अशाच देहभान विसरून त्यांच्या तोंडून ऐकत असे. देहभान विसरणे त्यांच्या कवितेला अर्थातच नसे, पुढचे सांगत नाही, घरी मार खावा लागतो तर दाबके यांचेही या म्हैसकरांच्या बाबतीत नीना वाहिनी झालेली नाही म्हणजे म्हैसकर प्रशासकीय अधिकारी आहेत वरून मिस्टर अँड मिसेस म्हैसकर दोघेही महत्वाच्या पदावर आहेत म्हणून दाबके यांनी म्हैसकर यांना खपवून घेतले असे अजिबात अजिबात नाही, म्हैसकर दाम्पत्याकडून विविध शासकीय फायद्याची कामे करवून घेणारे ते दाबके आमच्यातले नालायक ' अरविंद ' नाहीत, खरोखरी प्रशासकीय अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी देवेंद्र फडणवीसांवर लिहिलेला लेख संग्राह्य आहे, आवडलेल्या सिनेमासारखा पुनःपुन्हा वाचावासा वाटणारा आहे, जपून ठेवावा असा आहे, स्वतः फडणवीसांनी हा लेख वाचल्यानंतर मिलिंद म्हैसकर यांना चार चौघात आनंदाच्या भरात फ्लायिंग किस द्यावा किंवा घट्ट मिठी मारून बोटे मोडून तेथल्या तेथे नजर काढावी एवढा छान आहे....

हा लेख लिहीत असतांना फडणवीस सरकारला तीन वर्षे पूर्ण झालेली आहेत, त्यानिमीत्ते अनेकांनी पानेच्या पाने आणि रकानेच्या रकाने फडणवीसांवर लिहून काढलेली आहेत, मी मात्र माझ्या पाक्षिकात म्हैसकर यांचा हा लेख त्यांच्या कारकिर्दीला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत म्हणून पुनर्प्रकाशित करण्याचे ठरविले आहे. आपण साऱ्यांनी तो शांतपणे वाचावा आणि तंतोतंत उभे केलेले फडणवीस नेमके, हुबेहूब कसे, म्हैसकरांच्या लिखाणातून अवश्य समजून घ्यावेत....


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment