Monday, 13 November 2017

मंत्र्यांची समांतर यंत्रणा ३ : पत्रकार हेमंत जोशी

मंत्र्यांची समांतर यंत्रणा ३ : पत्रकार हेमंत जोशी 

अमुक एखाद्या वेश्येला एड्स आहे माहित असतांनाही कोणतेही साधन न वापरता तिला गर्भवती ठेवण्याचा प्रयत्न जर एखाद्याकडून होत असेल तर काय होईल, वेगळे सांगण्याची गरज नाही. जसे ज्यांच्या स्वतःच्या या राज्यात शिक्षण संस्था आहेत त्यांनाच शिक्षण खाते सोपविण्याचा तद्दन मूर्खपणा त्या त्या वेळेच्या मुख्यमंत्र्यांनी, पक्षश्रेष्ठींनी केला मग ते अमरीश पटेल असतील, पतंगराव कदम असतील किंवा अन्य, हेही त्याच प्रकारातले म्हणजे चोराच्या हाती तिजोरीच्या किल्ल्या, जो मित्र बाहेरख्याली आहे त्याला विविध स्त्रिया उपभोगायचा आहेत हे माहित असतांना देखील अनेकदा अनेक पुरुष घरातल्या एखाद्या तरुण सुंदर स्त्रीला प्रसंगी स्वतःच्या बायकोला देखील या अशा स्त्रीलंपट पुरुषांशी वागण्या बोलण्याची मोकळीक देतात, पुढे काय घडते हे सांगायला कोणत्याही भविष्यवाल्याची गरज नाही किंबहुना भय्यू महाराज, उपाध्येंसारख्या तमाम वादग्रस्त मंडळींभोवती आपल्या घरातल्या तरुण देखण्या टंच स्त्रियांना अशांच्या पायाशी पाठविणे म्हणजे हे त्या त्या घरातल्या पुरुषांचीच मानसिक विकृती आहे म्हणणे अधिक योग्य ठरेल. मला भय्यू महाराजांची तंतोतंत माहिती पुरविणारा खबऱ्या अलीकडेच सांगत होता, त्यांच्या नवोदित पत्नीचे आणि आईचे क्षणभर एकमेकींशी पटत नसल्याने आणखी काही महिने थांबा, या नवोदित पत्नीचं काही महिन्यानंतर, महाराज नेमके कसे सांगून मोकळ्या होतील...

वर दिलेली उदाहरणे याही मंत्रीमंडळाला तंतोतंत लागू पडतात म्हणजे आधीच्या मंत्र्यांनी जे केले तेच हेही करताहेत, पार मुख्यमंत्र्यांपासून तर थेट शेवटच्या राज्यमंत्रीपर्यंत बहुतेकांनी तिजोरीच्या किल्ल्या चोरांच्या हाती दिलेल्या आहेत थोडक्यात हेही मंत्रिमंडळ अशा मूर्ख पुरुषासारखे जो पुरुष एड्स झालेल्या बाईशी संभोग करून तिच्याकडून निरोगी अपत्याची अपेक्षा करतो आहे. फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले एक सद्गृहस्थ असे आहेत कि त्यांना अनेकांनी सांगून झाले कि तुम्ही नको त्या दरोडेखोराच्या हाती तिजोरीची किल्ली सोपविलेली आहे तरीही हे मंत्री महाशय सावध व्हायला तयार नाहीत जे एकनाथ खडसे यांच्याबाबतीत घडले तेच उद्या म्हणजे अगदी नजीकच्या काळात या देखील बुजुर्ग मंत्र्यांचे होणार आहे. खडसेंच्या बाबतीत माझा रोख त्यांचे जे खास होते त्या शांताराम भोई यांच्याकडे अजिबात नाही, अन्य जमा झालेलं नातेवाईक, सभोवतालचे दलाल, इंदिसेसारखे महाचोर अधिकारी इत्यादी जवळच्यांनी खडसे यांना घेरले, वरून हीच संधी आहे घ्या सावटुन, घरच्यांनी धरलेला आग्रह, खडसे नको त्या लोभाने पछाडले आणि त्यांनी आपली राजकीय माती करून घेतली, डोळ्यात आजही पाणी येते, खडसे मागे पडले, प्रचंड ताकदीचा पैलवान आमच्या राजन पारकर कडून पराभूत व्हावा असे खडसे यांचे झाले. खडसे यांच्याच पावलावर पाऊल त्या बुजुर्ग प्रभावी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बघणाऱ्या मंत्र्यांचे म्हणजे त्या मंत्र्याला देखील माहित आहे कि माझ्या कार्यालयातल्या या सरकारी माणसाचे दररोजचे उत्पन्न दोन कोटी रुपये आहे, महिन्याकाठी किमान पन्नास कोटी रुपये आहे तरीही हे मंत्रीमहोदय अक्षरश: गोचिडाने कुत्र्याला चिटकावे तसे चिकटून बसले आहेत, हे तर असे झाले कि एकनाथ शिंदे यांना मध्यंतरी अडचणीत आणणारे सचिन जोशी उलट त्या प्रकारानंतर शिंदे यांना अधिक बिलगले आहेत. हे असे विकृत बापासारखे झाले म्हणजे पोटाची मुलगी शेजारच्या बंड्याबरोबर संभोग करतांना रंगेहात पकडल्या गेली का, चला तर मग आपली सोया झाली हा असा विचार करणाऱ्या विकृत बापासारखे शिंदे यांचे झाले. असो, मी फक्त वाट बघतोय माझ्या मनाचा उद्रेक कधी होतो ते, असे पुरावे देईन कि ते मंत्रीही घरी जातील आणि त्यांच्या हाताखालचे ते अधिकारी थेट तुरुंगात....

जे भुजबळ किंवा खडसे यांचे झाले तेच उद्या तुमचेही होईल असे अनेक पुरावे देऊन त्या मंत्र्याला सांगणारे अनेक मला माहित आहेत पण त्या मंत्र्यालाच जर एड्स झालेल्या बाईशी संभोग करणाऱ्या पुरुषासारखे वागायचे जगायचे असेल तर सांगूनही उपयोग नाही. मला आठवते श्रीयुत छगन भुजबळ हे मंत्री असतांना त्यांना अनेकांनी सांगितले कि तुमच्या भोवताली जमलेले समीर सारखे नातेवाईक काही दलाल किंवा संदीप बेडसे यांच्यासारखे केवळ खादाड कर्मचारी अतिशय कठोर होऊन त्यांना दूर करा, घरातल्यांच्या फाजील अपेक्षा वाढवू नका, त्यांना सांगणार्यात मीही एक होतो, विशेष म्हणजे भुजबळांच्या डोळ्यात धूळ फेकून मालामाल होणाऱ्या मंडळींना तात्विक विरोध त्याकाळी करणाऱ्या त्यांच्या खाजगी सचिवांनाच म्हणजे पोपट मलिकनेर यांनाच संदीप बेडसे आणि त्याच्या गॅंग ने बाहेर काढण्याची व्यूह रचना आखली होती, शेवटी मी स्वतः मध्ये पडून भुजबळ यांना पटवून दिले, मलिकनेर तुमच्यावर निरपेक्ष प्रेम करणारे आहेत, निदान हा अधिकारी तरी दूर करू नका, घालवू नका अन्यथा तुमचे मोठे राजकीय आर्थिक नुकसान होईल, शेवटपर्यंत मलिकनेर भुजबळ यांचे खाजगी सचिव म्हणून कार्यरत होत, ते वादग्रस्त ठरले नाहीत कारण भुजबळ यांचे राजकीय भले व्हावे या भावनेने मलिकनेर लढत होत, काम करीत होते. आज भुजबळ तुरुंगात आहेत आणि संदीप बेडसे यांच्यासारखे संधीसाधू, भुजबळांचे त्यावेळेचे अनेक दलाल, मस्तीत जीवन जगताहेत, ना त्यांची चौकशी झाली ना त्यांचे कुठलेही नुकसान झाले...
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment