Friday, 13 October 2017

ठाण्यात शिवशाही नव्हे शिंदेशाही : पत्रकार हेमंत जोशी


ठाण्यात शिवशाही नव्हे शिंदेशाही : पत्रकार हेमंत जोशी 
गेले दोन महिने मी स्वतः सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री श्रीमान एकनाथ शिंदे यांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी आटोकाट प्रयत्न करतोय. त्यांची आर्थिक बाजू मी पण भरभक्कम करण्याचा नेहमी प्रयत्न करतो असे एकदा मला भय्यू महाराजांचे बंधू ज्यांनी वादग्रस्त पद्धतीने विधान भवनात मोठे कंत्राट मिळविलेले आहे, सध्या ते त्या उत्पन्नावर मजा मारताहेत ते सत्यजित देशमुख मला शिंदे यांच्याशी असलेल्या जवळकीविषयी अनेकदा म्हणाले होते, म्हणून त्यांनाही मी दोन वेळा प्रत्यक्ष भेटून सांगितले, मला एकनाथ शिंदे यांना भेटायचे आहे, काही महत्वाचे विचारायचे आहे, पण त्यांनीही माझी शिंदे यांच्याशी भेट घालून दिली नाही....

नेमके सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना काय विचारायचे आहे, होते, तेही सांगतो. तुम्हाला माहित आहे, समृद्धी महामार्ग म्हणजे विविध भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आणि काही नेत्यांनीही तयार होण्या आधीच पोखरून ठेवलेला महामार्ग, या महामार्गाच्या लगत ज्यांनी ज्यांनी जमिनी घेतल्या आहेत, ती नावे मी नक्की तुम्हाला सांगणार आहेच पण शिंदे यांना मला असे विचारायचे होते कि या महामार्गासाठी गरज नसतांना दोन दोन वेळा निविदा का काढण्यात आल्या, दुसऱ्यांदा निविदा काढतांना नेमके कोणाला लाभार्थी ठरवायचे होते, पण भेटच होत नाही आणि त्या समृद्धी महामार्गाच्या ठिकाणी एका वादग्रस्त प्रशासकीय अधिकाऱ्याचे खास किरण कुरुंदकर ठाण मांडून बसलेले, त्यामुळे न्याय मिळेल याची मला खात्री नव्हती. अर्थात पुढल्या काही दिवसात मी संबंधित खात्याला माहितीच्या अधिकारात त्या निविदांच्या नेमके काय घडले हे विचारणार आहेच शिवाय मंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात किती वेळ आणि केव्हा केव्हा होते हेही विचारणार आहेच....

पावसाळी अधिवेशनात शिंदे यांना भेटण्याचा आटोकाट प्रयत्न केला, हा प्रयत्न सुरु असतांना म्हणजे शिंदे यांची भेट थेट विधान भवनात घेण्याच्यामी प्रयत्नात असतांना माझ्या असे लक्षात आले कि ठाणे जिल्ह्यातलेच एक आमदार त्यांना सतत भेटण्याचा प्रयत्न करताहेत, शेवटी न राहवून मी त्यांना विचारले असता ते म्हणाले मला त्यांच्याकडून अमुक अमुक रक्कम परत घ्यायची आहे, पण त्यांनी भेट देणे आवाक्याबाहेर करून ठेवल्याने हे असे सतत फेऱ्या मारतोय शिंदेंची भेट घेण्यासाठी, मी आर्थिक अडचणीत आहे, आणि शिंदे यांच्याकडून भेट होत नाही, त्यांचे काम असले कि मी मात्र सदैव त्यांच्यासाठी माझी व्यक्तिगत कामे बाजूला ठेवून धावत पळत आलेलो आहे, नंतर एक युवा बिल्डर पण भेटलेत, त्यांच्या फसवणुकीची कहाणी तर फारच वेगळी, ते हातापाया पडून म्हणाले, कृपया लिहू नका, माझे ठाण्यात जगणे त्यांची माणसे मुश्किल करून सोडतील. हे बघा, जेव्हा एखाद्या नेत्याच्या कामांचा फाफट पसारा वाढतो, तेव्हा हे असे घडत असते, पण का कोण जाणे, एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत पार मातोश्री पासून तर थेट ठाणे जिल्ह्यातील तळागाळापर्यंत विरोधातले स्फोटक वातावरण तयार झालेले आहे, फक्त ठिणगी चेटवण्याचा, पेटवण्याचा, लावण्याचा कोणी प्रयत्न किंवा हिम्मत केलेली नाही, ठिणगी पडण्याचा अवकाश, मला वाटते, एकनाथ शिंदे यांचे ठाणे जिल्ह्यातील साम्राज्य लयास जाण्या नक्की वेळ लागणार नाही, आपल्या तोडीचा ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत दुसरा कोणीही नाही याची जणू धास्ती दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांनीही घेतली असल्याने, आपल्या साम्राज्याला तडा जाणे कदापिही शक्य नाही असे शिंदे यांना नक्की वाटत असावे, आणि त्यांना हे असे वाटणे निदान आज मितीला त्रिवार सत्य आहे, शिंदे यांना आव्हान देणारा पर्यायी नेता शोधून त्याला ताकद देऊन तयार करणे मातोश्रीला अत्यावश्यक आहे, असे घडायला हवे. आज ठाणे शहरात किंवा ठाणे जिल्ह्यात फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे एक ते दहा क्रमांकावर आहेत, इतर सर्वपक्षीय नेत्यांची गणना दहा नंतर सुरु होते, हेही एक सत्य आहे पण वाढलेल्या ताकदीचा फायदा नव्हे गैरफायदा शिंदे यांच्या गटातून मोठ्या प्रमाणावर सतत सदैव उचलल्या जात असल्याने अख्ख्या ठाणे जिल्ह्यात त्यांच्याविषयी पक्षात आणि पक्षाबाहेरही अस्वस्थता आहे, ब्र शब्द त्यांच्या 
विरोधात बोलण्याची कोणतंही हिम्मत नाही, हि अशी दहशत निदान महाराष्ट्रात तरी निर्माण होणे तसे धोकादायक आहे, पण हा असा राजकीय दहशतवाद कायम टिकत नसतो, प्रमुख नेत्याचा मग सुरेशदादा जैन व्हायला फारसा वेळ लगत नाही, एकनाथ शिंदे यांची आजमितीला जरी टोकाची लोकप्रियता या ठाणे जिल्ह्यात असली तरी उभ्या राज्यात किंवा ठाणे जिल्ह्याबाहेर त्यांनी पाऊल ठेवल्यास ते जवळून जरी गेलेत तरी त्यांना ओळखणारे सेनेतही नसतील, एक मात्र खरे आहे, एकनाथ शिंदे यांना आव्हान देणे जर आवश्यक वाटत असेल तर भाजपाने ठाणे जिल्ह्यातील या गचाळ राजकारणात दंड थोपटून सर्व ताकदीनिशी उतरणे अत्यावश्यक आहे किंवा उद्धव ठाकरे यांनीच पर्यायी नेता तयार करणे खूप खूप गरजेचे आहे, कदाचित हे असे घडते आहे...
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment