Friday, 27 October 2017

समग्र तटकरे ३ : पत्रकार हेमंत जोशी


समग्र तटकरे ३ : पत्रकार हेमंत जोशी 
शरद पवारांचे कार्यकर्ते आणि माझी दोन्ही मुले, आम्हाला म्हणजे पवारांना राजकारणातून आणि मला पत्रकारितेतून निवृत्तच होऊ देत नाहीत, मग तरुण राहण्यासाठी तरुण दिसण्यासाठी तरुण असण्यासाठी तुम्ही आम्हाला तरुण म्हणण्यासाठी, आम्हाला काय काय करावे लागते या वयातही, उगाच त्यातून चावट अर्थ काढू नका, अहो, तरुण राहण्यासाठी आम्हाला औषधे गोळ्या घ्याव्या लागतात, पथ्यपाणी करावे लागते, नेमका आहार घ्यावा लागतो, सकाळी उठून बदामाचा शिरा खावा लागतो आणि रात्री झोपतांना कपाळाला झंडू बाम चोळून घ्यावा लागतो, हे मला म्हणायचे सांगायचे होते. उगाच गम्मत केली, माझी मुले अजून खूप नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी कर्तबगार निघालेत. मी तर नेहमीच सांगत आलो कि शारदरावांना राजकारणातून केव्हाच निवृत्त होता आले असते कारण अजित पवार त्यांच्याही दहापट पुढे होते पण ऐन मोक्याच्या वेळी अजितदादांनी काहीही गरज नसतांना माती खाल्ली मस्ती केली सरकारी तिजोरीवर दरोडा टाकला त्यातून एवढेसे तोंड करून घेतले आणि कर्करोगानंतरही पित्याप्रमाणे असलेल्या शरद पवारांना कमला लावले ते आजतागायत.....

बघा आता जसे देशात तशी राज्यात अलिकडल्या सहा महिन्यात अचानक राजकीय वातावरण बदललेले आहे, जिएसटी आणि नोटबंदी हे दोन विषय भाजपच्या अंगलट आल्याने येथे राज्यातही मागल्या तीन चार वर्षात तुकड्यातुकड्यात विभागलेले मुस्लिम आणि बौद्ध मते जे मोठ्या प्रमाणावर मतदानाच्या दिवशी बाहेर पडतात ते पुन्हा एकगठ्ठा मतदान भाजपा विरोधात करू लागले असल्याने विशेषतः या राज्यातही भाजपासाठी हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय ठरलेला आहे, या राज्यात या एकगठ्ठा मतदानाचा मोठा फायदा काँग्रेस ला होऊ शकतो, त्याचा मोठा फटका आणि झटका राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेना भाजपा युतीला देऊ शकतात, हि वस्तुस्थिती आहे. त्यादृष्टीने शरद पवार पुढल्या काही महिन्यात नक्कीच सुनील तटकरे यांना बदलून त्या जागी दिलीप वळसे पाटलांना आणून बसवतील अशी माझी माहिती आहे, त्यांच्या मनात जयंत पाटलांना देखील प्रदेशाध्यक्ष करायचे होते पण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने जयंत पाटलांनी अलीकडे काही महिन्यांपूर्वी भाजपामध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता, ते पवारांना रुचले नाही, आणि जयंत पाटलांनी ठेवलेल्या शर्ती आणि अटी भाजपा नेत्यांना विशेषतः देवेंद्र फडणवीसांना मान्य नसल्याने त्यांच्या पक्ष प्रवेशाचे भिजत घोंगडे ठेवण्यात आले. शिवाय जयंत पाटलांना शरद पवारांनी मोठ्या अपेक्षेने मुंबईचे पालक मंत्री केले होते, मुंबईत अगदी सहज शक्य असतांना जयंत पाटलांनी महापालिकेत आणि मुंबईत राष्ट्रवादी बळकट करण्यापेक्षा ते स्वतःचे विविध व्यवसाय मोठ्या खुबीने विविध मार्गांनी आणि मंत्री पदाचा वापर करून मोठे करण्यात गुंतले, त्यांच्या तिजोरीत त्यातून नक्कीच मोठी भर पडली पण त्यांचा पक्ष कमकुवत झाला आणि त्यांचे स्वतःचे कुटुंब देखील....

मंत्री असतांना ना जयंत पाटलांनी राज्यातले कार्यकर्ते त्यांना सहकार्य करून जोडले ना त्या सुनील तटकरेंनी, या दोघांना कधीही आर आर पाटील होता आले नाही, याउलट अजितदादा एवढे मिळवितात काय मग आपणही तेवढे मिळवू या स्वार्थी वृत्तीने ते जगले आणि शरद पवारांना या अशा दुसऱ्या फळीतल्या साऱ्याच खादाड मंडळींनी फसविले गंडविले बदनाम केले अडचणीत आणले, राज्याचेही मोठे नुकसान केले, अजित पवार एकटे जरी खमके असते करप्ट भ्रष्ट नसते तरी वेगळे चित्र आज दिसले असते कारण दुसऱ्या फळीतले सारेच्या सारे नेते या अजितदादांसमोर चळाचळा कापताना मी अनेकदा बघितले आहे, विशेष म्हणजे सुरुवातीला दादांची हि दादागिरी बघून शरद पवारांचे देखील उर अभिमानाने भरून यायचे पण हीच दादागिरी जेव्हा शारदरावांना देखील डोईजड ठरली त्यानंतर मात्र पवारांनी आपल्या या लाडक्या पुतण्यालाही जमिनीवर आणले, गप बैस तुझ्या गळ्याभोवतीचे फासे माझ्याच हातात आहेत हे अप्रत्यक्ष आणि खुबीने वेळोवेळी सांगून टाकले. थोडक्यात नको ते उद्योग करून म्हणजे अशा विचित्र विक्षिप्त वागण्यातून पुढे लवकरच अजितदादांनी स्वतःचा शोले मधला असरानी करून घेतला, माझा एकेकाळचा अतिशय आवडता नेता असा वाया गेल्याने निदान मला तरी खूप रडू आले होते....

मिस्टर सुनील तटकरे तुम्ही मंत्री असतांना रोहा विधानसभा किंवा रायगड , रत्नागिरी जिल्ह्यातले तेवढे मोजके कार्यकर्ते आणि नेते सोडून राज्यात इतरत्र राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्यासाठी कसे कुठे किती कोणते कार्यकर्ते त्यांना सहकार्य करून जोडले, असा सवाल करून जर शरद पवारांनी त्यांना पुरावे मागितलेत तर हे तटकरे काठावर देखील पास होणार नाहीत हे खात्रीने सांगू शकतो. आणि रोह्याव्यतिरिक्त त्यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात यासाठी रस घेतला होता कि त्यांना वरचढ ठरू शकणारे भास्कर जाधव आणि शेकापचे जयंत पाटील नेतृत्वात वाढू देणे अडचणीचे होते म्हणून या दोन जिल्ह्यात मात्र कधी उदय सामंत यांना हाताशी धरून तर कधी जयंत पाटलांच्या घरात खानदानात फूट पाडून, भास्कर पाटलांना सतत अडचणीत आणून मंत्रिपद असेपर्यंत आपले महत्व तटकरे यांनी कधीही कमी होऊ दिले नाही, हि वस्तुस्थिती आहे आणि तटकरेंच्या मैत्रीच्या नादात अजित पवारांनी कार्यकर्ते राज्यभर जोडण्याची ताकद ठेवणारे भास्कर जाधव यांचे महत्व कमी करणे, आता तेच नेमके राष्ट्रवादीला अडचणीचे ठरले आहे...
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Wednesday, 25 October 2017

हे करून बघा : पत्रकार हेमंत जोशी

हे करून बघा : पत्रकार हेमंत जोशी
इतरत्र जे सहसा आढळत नाही ते आपल्याकडे वारंवार सतत दरक्षणी बघायला, अनुभवायला का मिळते, नेमके काळत नाही. म्हणजे जगात असे कोठेही नाही कि हॉटेलात शिरलेले ग्राहक इतरांच्या ताटाकडे प्लेट कडे बघत आपली जागा पकडते आणि वेटरला ऑर्डर देतानाही चक्क त्या तमुक टेबलावरला पदार्थ कोणता, हमखास विचारून मग ऑर्डर सोडते, किती हे लाजिरवाणे, पण तरीही आम्ही मराठी आणि भारतीयही हे असे करतो, मॅनर्स सोडून वागतो..
खाजगी आयुष्यात मी सांगतो ते सोडून तर बघा म्हणजे दुसऱ्याला टोमणे मारणे किंवा घरी दारी लहान मोठा न बघता समोर आलेल्यांना घालून पाडून बोलणे. दुसऱ्यांच्या कायम चुका काढण्यात स्वतःला धान्य समजणे, विशेष म्हणजे दुसऱ्याला यश मिळाले रे मिळाले कि आपल्या पोटात दुखते, त्याने दहा मिळवलेत का मग आपण वीस मिळविण्याचा प्रयत्न करू हा साधा सरळ सकारात्मक विचार का म्हणून आपल्या डोक्यात घोळत नाही...कायम आपण बघतो अनुभवतो कि दुसऱ्याच्या संपत्तीवर आणि परस्त्रीवर सतत आपण घारीसारखी नजर ठेवून असतो, चान्स मिळाला रे मिळाला कि दुसऱ्याची संपत्ती व स्त्री भारतीयांनी पळवलीच म्हणून समजा. दुसऱ्याची कागाळी करणे किंवा दुसऱ्यांच्या दुख्खात कायम आपले सुख मानणे किंवा दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात डोकावणे किंवा दुसर्यांशी सतत स्वतःची तुलना करणे, अत्यंत चुकीचे आहे...
साधे सोपे सरळ असे आयुष्याचे हे गणित आहे कि अमुक एखादी गोष्ट आपल्याकडे कमी असते दुसर्यांकडे ज्यादा दिलेली असते, पण जे अधिक मिळालेले आहे त्यावर समाधान न मानता कायम दुसऱ्यांविषयी असूया बाळगणे त्याने आपलेच नुकसान होते,प्रकृती स्वास्थ्यावर मनातल्या द्वेषातून मोठा परिणाम होऊन अनेक व्याधी विनाकारण आपण लावून घेत आलो आहे असे माझे मत आहे, तुमचेही तेच मत नक्की असेल....दुसऱ्याच्या ताटातला लाडू भारतीयांना हमखास मोठा वाटतो, मग आपण स्वतःला दुसऱ्याच्या ताटातला लाडू हिसकावून घेण्यासाठी गुंतवून घेतो, मात्र हे लक्षात ठेवा, आपण जेव्हा दुसरीकडे गुंतवून घेतो, अशावेळी आपल्याही ताटातल्या लाडूकडे एखाद्याचे मन गेलेले असते, पश्चाताप होतो कारण आपली ती मनोवृत्ती नाही कि दुसर्यांचा लाडू आपण खाणे आणि आपला लाडू दुसऱ्याला देणे, समझ गये ना आप? दुसर्याशी सतत स्पर्धा नसावी, आपला दर्जा वाढवावा. दुसऱ्यांशी स्वतःशी तुलना करू नये आणि सतत स्पर्धा देखील करू नये. हृदयविकार असलेला माणूस कसे म्हणून पी. टी उषाच्या पुढे मी धावायलाच हवे हा विचार करतो. अहो, जे सनी लिओनीला जमले ते विनोद तावडेंना नक्कीच जमणार नाही आणि जे लपून छपून समजा विनोद तावडेंना जमेल ते उद्या नक्कीच सनी लिओनीला जमणार नाही. अनेक वाईट गोष्टी माणसाने व्यक्तिगत आयुष्य जगतांना सोडून द्याव्यात. इतरांच्या सतत फालतू चौकशा करणे किंवा दुसऱ्याला कमी लेखून मीच फक्त कसा श्रेष्ठ हे इतरांना सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे तसे. चुकीचेच आहे. माझा आवाज डिट्टो लता सारखा आहे हे आपणहून सांगून लोकांना आपल्यावर हसण्याची संधी दिल्यापेक्षा, लोकांना म्हणू द्या कि तुम्ही डिट्टो लता किंवा आशा किंवा उषा आहात...
अहंकार गर्व उर्मट स्वभाव खोटा अहंकार स्वतःविषयीच्या भ्रामक कल्पना, इतरांविषयी त्यांच्या पाठी वाईट बोलणे, कागाळी करणे, खोटे नाटे सांगणे हे सारे सोडून द्या, नेमकी वस्तुस्थिती सांगून मोकळे व्हा, खोटे सांगून मिळणारे यश हमखास क्षणभंगुर ठरते हे कायम लक्षात ठेवा. माझ्यासारखा फक्त मीच असेही सांगत सुटणे सोडून द्या, हे सोडले नाही तर लोक मान वाळवून तुमच्यासमोरून निघून जातात. इतरांना वेड्यात काढणे किंवा मीच तेवढा कसा हुशार सतत सांगण्याचा प्रयत्न करणे हे सारे दुर्गुण शरीरातून तडकाफडकी काढून टाका त्यातच साऱ्यांचे हित आहे, असते...घरात बाहेर मित्रपरिवारात नातेवाईकांमध्ये बोलतांना केवळ मीच ज्ञानी हुशार बुद्धिमान आहे, मी लोकांना वेड्यात काढू शकतो थोडक्यात सभोवतालच्यांना कमी हीन दर्जाहीन लेखणे किंवा भोवताली असलेल्या प्रत्येकाला वेड्यात काढणे चुकीचे आहे. सुरुवातीला तुमची हि अशी अतिहुशारी लोकांची करमणूक करते पण एकदा का लोकांच्या हे लक्षात आले कि हा बसता उठता समोरच्यांना वेड्यात काढतो, घालून पडून बोलतो, मुर्खात काढतो, मीच तेवढा शहाणा समजून सभोवताली उद्धट वागतो, या अशा वागण्याने माणसे दूर जातात, मोस्ट व्हिमजिकल अशी समजूत करवून घेऊन कायमचे दूर होतात. मित्रांनो, चांगले द्या चांगले मिळेल. वाईट दिले तर वाईट होईल, थोडक्यात जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर..
अमुक एखादी व्यक्ती चतुर बुद्धिमान बोलकी मेहनती तल्लख अभ्यासू जाणकारबहुगुणी सावध माणसे जोडणारी चुणचुणीत गुणाढ्य कुशाग्र बुद्धीची असली कि काय घडू शकते त्यावर अलीकडेच प्रशासकीय अधिकारी म्हणून बढती मिळालेल्या राजेश नार्वेकर या प्रशासकीय अधिकाऱ्याचे उदाहरण देतो. नार्वेकर अगदी अलीकडे माननीय मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून रुजू झाले आहेत, सिनियर मोस्ट पद त्यांना त्यांच्या वागणुकीतून पदोन्नती मिळताच पटकन मिळाले आहे. परमेश्वराने त्यांना जणू हि दिवाळी-दसर्याची भेट पाठविली आहे. या पोस्टवर येण्यासाठी अनेक सिनियर्स प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात होती, स्पर्धेत होती, नार्वेकर म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांमधले कालचे पोर तरीही त्यांना हे महत्वाचे आणि मानाचे पद मिळाले आणि त्यांना हे मिळलेले पद इतर कोणत्याही स्पर्धकांच्या डोक्यात गेले नाही कारण नार्वेकर यांचे सर्वांशी सभयतेने आणि आश्वासक वागणे.  पूर्वी ते याच मुख्यमंत्री कार्यालयात उपसचिव म्हणून काम करीत असतांना प्रवीण परदेशी किंवा मिलिंद म्हैसकर इत्यादी मान्यवर अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्य शैलीतून भावले होते, मी तर असे ऐकले आहे कि दस्तुरखुद्द मिलिंद म्हैसकरांनी राजेश नार्वेकर या पदासाठी कसे योग्य आहेत, मनापासून मुख्यमंत्रीनां सांगितले, अर्थात मुख्यमंत्र्यांचे तेच मत होते त्यामुळे प्रशासकीय अधिकारी म्हणून पदोन्नती मिळताच केवळ वर्षभराच्या आत नार्वेकर या अशा उच्चस्थानी सर्वगुण संपन्न असल्यानेच जाऊन बसले....
खरोखरी प्रशासकीय अधिकारी हे अनेकदा माझ्या कौतुकाचे आणि कुतूहलाचे विषय असतात. या राज्यात सर्वाधिक आव्हानात्मक पद पोस्ट कोणती असेल तर ते आहे मुंबई महापालिकेचे ' यशस्वी' आयुक्त म्हणून काम करणे, जे सध्याच्या अजोय मेहतांना तंतोतंत जमले आहे. सतत, अगदी २४ तास या पदावर काम करणाऱ्यांना आव्हान असते. अजोय मेहतांचे उदाहरण द्यायचे झाल्यास त्यांना एकाचवेळी साऱ्याच्या सार्या राजकीय पक्षांचा या पक्षात काम करणाऱ्या विशेषतः गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांचा त्रास होतो, काम करवून घेण्यासाठी सतत दबाव येतो त्यात हाताखाली काम करणारे महापालिकेतले बहुतेक सारेच अति भ्रष्ट नालायक आणि हलकट, फार कमी देव माणसे महापालिकेच्या वर्तुळात आपल्याला आढळतात. अत्यंत आणीबाणीचे मुंबई महापालिकेचे वातावरण असते तरीही अजोय मेहता किती कुल राहून कामे करतांना ड्युटी निभावताना आपण सारे बघतो, एखादा भडक डोक्याचा असेल तर जागच्या जागी हृदयविकाराच्या झटक्याने देवाला बिलगून मोकळा होईल, चौफेर अभ्यास असणार्यांचेच हे काम आहे, अजोय मेहता येथे सर्वांना पुरून उरले आहेत, कौतुक वाटते. अधून मधून ज्यांच्याविषयी जाणून घेणे तुमचे औस्युक्य असते त्या प्रशासकीय अधिकार्यांविषयी मी नक्की आगळी माहिती देऊन मोकळा होईल. गुणांचा गौरव आयुष्यात कसा होतो, त्यावर हि दोन उदाहरणे येथे मांडली, खास तुमच्यासाठी वाचकांनो....
तूर्त एवढेच.
पत्रकार हेमंत जोशी 

Tuesday, 24 October 2017

समग्र तटकरे २ : पत्रकार हेमंत जोशी

समग्र तटकरे २ : पत्रकार हेमंत जोशी 
नुकत्याच बाळंत झालेल्या मांजरीसारखी शरद पवारांची त्यांच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी अवस्था करून आवडली आहे. मांजर बाहेर पडते, चार घरी जाऊन दूध पिऊन येते, पिल्लांजवळ येते, त्यांना जवळ घेऊन दूध पाजते. पिल्ले काहीच करीत नाहीत, कारण पिल्लाना काही उमजत नाही. त्यांना फक्त एवढेच ठाऊक असते, आई घरी आली कि तिला लटकायचे नंतर दिवसभर इकडे तिकडे फक्त हुंदडायचे, आईच्या जीवावर पिल्लांचे छान सुरु असते. शरद पवार सक्रिय आहे तोपर्यंत त्यांच्या या राज्यातल्या तमाम पिल्लांना फारसे काही करायचेच नाही कारण पवार म्हणतात, मैं हू ना...

खोटे वाटत असेल तर चला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांसंगे त्यांचा तेवढा रोहा मतदार संघ सोडून फिरुया, त्यांना सभा घ्या सांगूया. त्यांच्या सभेला उत्स्फूर्त चार श्रोते जरी जमले तरी ते पावन झाले, सांगून मोकळे होऊ या. स्वतः पवार चुकले कि त्यांना ताटाखालचे मांजर प्रदेशाध्यक्ष हवे होते, नेमके लक्षात आलेले नाही पण तटकरे यांचा अजिबात प्रभाव नाही, असून देखील अडचण आहे आणि ते नसलेत तरी खोळंबा नाही, जो काय तो त्यांचा तेवढा आता रोहा विधान सभा मतदार संघापुरता तेवढा थोडाफार प्रभाव कायम आहे, तेथेही त्यांना त्यांचे बंधू अनिल आणि पुतणे अवधूत उरून पुरले आहेत, उरून पुरणारे आहेत, समग्र पुस्तकात या बंधू आणि पुतण्याचा अभावानेच उल्लेख आहे, तटकरे जेव्हा येथे मंत्रालयात बसून पैसे जमा करीत होते तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना मतदार संघात ताकद देणारे हेच ते अनिल आणि अवधूत होते. ज्यांच्या कुबड्यांवर सुनील उड्या मारून पुढे आले त्यांना काळाच्या ओघात बाजूला सारून तटकरेंनी पोटच्या मुलीस म्हणजे आदिती आणि चिरंजीव अनिकेत यांना पुढे नेण्याचा संकल्प सोडला, दोघांमधली कुस्ती म्हणूनच रंगते आहे...

माहीम परिसरातील दर्ग्याजवळ भर रस्त्यात जे भिकारी बसलेले असतात, त्या रांगेत एखादी देखणी तरुणी भरजरी महागडे कपडे घालून चुकून बसल्यानंतर ते जे दृश्य असेल तसे सुनील तटकरे यांच्यावर काढलेल्या कि काढून घेतलेल्या समग्र या महागड्या चकचकीत कागदांवर काढलेल्या रंगीत पुस्तकाचे झाले आहे. केवळ तटकरे यांच्यासारख्या डाकू मंत्र्यांनी आम्हाला जे लुटले लुबाडले आणि राज्य भिकारी केले त्यातून हि माहीम दर्ग्याजवळ बसणाऱ्या भिकाऱ्यांची उपमा येथे दिली म्हणजे यांनी करून ठेवलेली भिकारी जनता आणि त्या मधोमध सुनील ताटकरेंचे महागडे पुस्तक, असे दृश्य नजरेसमोर तरळून गेले. समजा एखादे तसे निमित्त असते म्हणजे तटकरे यांनी अमुक एखादी अफलातून कामगिरी केली ज्यातून त्यांचे चौफेर कौतुक होते आहे किंवा त्यांचा वाढदिवस आहे, असे एखादे निमित्त असते आणि समग्र निघाले असते तर त्याचे काही कोणाला वाटले नसते पण येथे असे काही नाही, तटकरेंना आली लहर म्हणून त्यांनी हा केला कहर एवढेच काय ते या पुस्तके निमित्ते म्हणता येईल, किंवा ताटकरेंच्या जागी पुढला कोण, हे जे वादळ सध्या राष्ट्रवादी परिसरात तुफान घोंगावते आहे, त्यातून हे घडले असावे म्हणजे तटकरे यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने हे पुस्तक तडकाफडकी ओढूनताणून काढल्या गेले असावे, वादग्रस्त भ्रष्ट तटकरे महान श्रेष्ठ ग्रेट बलवान ताकदवान कसे हे जेव्हा मधुकर भावे यांच्यासारख्या अनुभवी आणि माहितगार ज्येष्ठ पत्रकाराने लिहिले तेव्हा मधुकर भावेंना लालूच दाखविली कि ते काहीही करू शकतात अशी जी त्यांच्या विषयी पत्रकारितेच्या वर्तुळात अनेकदा चर्चा रंगते, ते आज मनाला पटले, खरे वाटले कारण पूर्वी लोकमत मध्ये असतांना ज्या सुनील तटकरे यांची बिन पाण्याने जे भावे भादरून ठेवायचे तेच भावे समग्र मध्ये याच तटकरेंची न थकता न थांबता तारीफ करून मोकळे झाले, तेव्हा हेच वाटले हि अशी माणसे केव्हा आमच्या पत्रकारितेतून निवृत्त होतील....


पत्रकार हेमंत जोशी 

Monday, 23 October 2017

तटकरेंचे समग्र १ : पत्रकार हेमंत जोशी

तटकरेंचे समग्र १ : पत्रकार हेमंत जोशी 


मुले मोठी झाल्यानंतर मी नेहमीच त्यांना सांगत आलोय कि माझाही तुम्ही शरद पवार करू नका म्हणजे मुलांनी नालायक निघायचे आणि बापाने त्यांची उतार वयातही लफडी निस्तरता निस्तरता घाम गाळत भिका मागत फिरायचे. पवारांचे हे असे झाले आहे म्हणून त्यांना पवारांचे उदाहरण देतो.राष्ट्रवादी म्हणजे पवारांचे कुटुंब, या कुटुंबातले जवळपास सारेच सदस्य नालायक निघाले, त्यांनी पक्ष संपविला आणि स्वतःचे तेवढे भले केले, सारेच अजित पवार निघाले, आर आर आबा, गुरुनाथ कुलकर्णी असे चार दोन तेवढे बरे होते पण तेही मेले. सुंदर बायको चालू असली कि तिचा नवरा हातचे काम सोडून दिवसभरात उगाचच चार दोन वेळा घरात डोकावून जातो, पवारांचे हे असे चालू बायकोच्या नवऱ्यासारखे झाले, पक्षातले जवळपास सारेच नेते भयंकर चालू लबाड भ्रष्ट व्यसनी राज्यद्रोही, लुटेरे निघाल्याने चालू बायकोच्या नवऱ्यासारखे पवारांना तिकडे दिल्लीतले दुकान मस्त सुरु असतानाही येथे या राज्यात वारंवार यावे लागत असे, आणि सत्ता गेल्यानंतर तर शरद पवारांचा दिल्लीशी, देशाशी जणू काही संबंधच नाही एवढी अवघड बिकट अवस्था त्यांच्या हाताखालच्या नेत्यांनी त्यांची करून ठेवली आहे, वाईट वाटते....

शरद पवारांचा त्यांनी ज्यांना घडविले, मोठे केले, सत्ता दिली, पैसे मिळविलेले,त्या सर्वांनीच सुलोचना, प्रदीपकुमार, भारत भूषण करून ठेवला आहे, ज्या वयातत्यांनी घडविलेल्या वाढविलेल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचे कौतूक कार्य बघावे त्या सर्वांचे केलेल्या लफड्यांचे निस्तरने एवढेच काम त्यांना उरले आहे. एक मात्र नक्की भुजबळांना तटकरे अजितदादा किंवा तत्सम नेत्यांसारखे वागणे जमले नाही त्यामुळे आज त्यांची वाट अधिक बिकट झाली, अन्यथा जसे विजय गावित सुनील तटकरे अजितदादा तुरुंगाबाहेर राहून मजा मारताहेत तशी मजा भुजबळ काका पुतण्यांनाही मारता आली असती, मी त्यांना माझे नेहमीचे वाक्यही म्हणालो होतो कि पवारांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करणे म्हणजे गाढवाच्या ढुंगणाला बाम चोळण्यासारखे आहे, अशी लाथ बसेल कि अख्खे त्रिभुवन तुम्हाला आठवेल आणि तेच घडले, भुजबळांनी नको ते विनाकारण केले, पवारांना आव्हान देण्यासाठी म्हणून त्यांनी उभ्या केलेल्या महात्मा समता परिषदेचे आधी दिल्लीत अधिवेशन घेतले नंतर पाटणा मध्ये त्यांनी आपली ताकद काय आहे ते पवारांना दाखवून दिले, तेथूनच शारदरावांचे डोके फिरले, पुढे लवकरच भुजबळ यांचे आणि त्यांच्या समता परिषदेचे बळ संपले, आता भुजबळ राजकारणातून नो व्हेअर झाले, कायमसाठी आणि भुजबळांच्या पश्चात समता परिषदेची देखील घडी पार विस्कटली, आता ती आठवतही नाही...

येथे मात्र भुजबळ किंवा तत्सम नेत्यांचा राग येतो आणि पवारांची परखड बाजू यासाठी घ्यावीशी वाटते कि ज्या पवारांनी या अशा नेत्यांना घडविले, सर्वार्थाने मोठे केले त्याच पवारांना राजकारणातल्या तुमच्या मसिहाला जर तुम्ही संपवायला किंवा तुमचे महत्व वाढवून त्या पवारांनाच तुम्ही शह द्यायला निघालात तर ते शरद पवार आहेत, राजकारणातले डॉन आहेत, शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःचे महत्व आणि अस्तित्व टिकवून ठेवणारे आहेत मग हे महागुरू का म्हणून तुम्हाला त्यांच्यापुढे जाऊ देतील, प्रसंगी अजित पवार जरी अति शहाणे व्हायला लागलेत तरी, होय ! एक वेळ तर अशी आली होती कि ज्या अजितदादांना शरद पवारांनी डोक्यावर बसविले त्याच काकांच्या डोक्यावर मुतून ठेवण्याची हिम्मत दादांनी केली होती, तेथूनच पुढे सुप्रिया राजकारणात उतरल्या, घरातल्या अन्य अभिजित पवारांसारख्या नातलगांनाही याच शरदरावांनी मग ताकद देण्यास सुरुवात केली होती, बरे झाले अजितदादा चार पावले मागे आले अन्यथा त्यांचा केव्हाच भुजबळ झाला असता....आणि हे असे कठोर वागतांना शरद पवार चुकले हे म्हणणेही व्यर्थ ठरवले. अहो, माझा राजकारणाशी तसा काय संबंध पण जो आयुष्य घडविताना कुठेतरी आपल्यासाठी धावून आलेला असतो त्याचे ऋण जपावे असे मला वाटते. येथे मुंबईत आल्यानंतर हे विश्व उभे करतांना जी काही माणसे माझ्यासाठी वेळोवेळी धावून आलीत त्यातलेच एक शरद पवार होते, आधी मी त्यांच्या खूप जवळ होतो, नंतर त्यांनी मला दूर केले, बाजूला केले, अर्थात मला त्याचे काही वाटले नाही, वाईटही वाटले नाही, आपणच कुठेतरी काहीतरी चूक केली अशी मनाची समजूत मी करवून घेतली आणि पुढल्या कामाला लागलो पण अनेकदा पवारांना अडचणीत आणू शकतील अशा कित्येक भानगडी माझ्याजवळ पुरावे असतांनाही मी त्या उघड केल्या नाहीत कारण नेमके तेच होते आपण पवारांचे खाल्ले आहे, त्यांना नागडे करणे योग्य ठरणार नाही, त्यांनी मला केलेलं सहकार्य अगदीच फुटकळ होते पण असे कितीतरी आहेत ज्यांना शरद पवार यांनी अतिशय उत्तमरीत्या उभे केले आहे. अगदी अलीकडे "एकच वादा अजितदादा" अशा भरभक्कम जाहिराती करणारे अमळनेर येथील साहेबराव पाटील आणि कुटुंब जेव्हा भाजपाला बिलगून मोकळे झाले, तोंडात बोटे घालणे तेवढेच आमच्या हाती उरले, अर्थात अमळनेरच्या पाटील हे तसे फुटकळ उदाहरण पण खूप मोठे झालेले असे कितीतरी जे बाहेर पडले आहेत, पवारांना ठेंगा आणि वाकुल्या दाखवून....

शीट ! विषय आहे सुनील तटकरे यांनी यांच्यावर यांच्यासाठी यांचे अलीकडे निघालेले काढलेले काढून घेतलेले, लिहून घेतलेले ' समग्र' हे श्रीमंत पुस्तक, त्यावर लिहिणे राहिले बाजूला आणि विषय भलतीकडेच भरकटला म्हणजे मधुचंद्राला बायकोला नेण्याऐवजी शेजारच्या शीला काकूंना नेण्यासारखे किंवा मनाचे श्लोक म्हणता म्हणता मध्येच कोकशास्त्र वाचायला घेण्यासारखे. 
खरी मजा पुढल्या भागात....
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Monday, 16 October 2017

पापांचा विळखा : पत्रकार हेमंत जोशी

पापांचा विळखा : पत्रकार हेमंत जोशी 
अगदी अलीकडे वरळीवरून कुठल्याशा सावंत आजींचा फोन होता. कितीतरी बोलत होत्या. मनापासून मनातले सांगत होत्या. वाचनाची आवड असल्याने कोणीतरी ओळखीच्यांनी त्यांना ऑफ द रेकॉर्ड चा कुठलासा अंक आणून दिला होता, अंक वाचून झाल्यानंतर त्यातला भ्रमणध्वनी शोधून मला थेट फोन केला, म्हणाल्या, मी ७८ वर्षांची आहे, लिखाणाच्या एकंदर ढाच्यावरून तुम्ही माझ्या नातवाचे वयाचे असावेत.( इश्य ! अशी वाक्ये ना मला खूप सुखावून जातात, मग दिवसभर मी आनंदाच्या भरात स्वतःभोवती गोल गोल गिरक्या घेत सुटतो) तुमचे लिखाण अतिशय आवडले, कधी नव्हे ते हे वर्तमानपत्र तीन वेळा वाचून काढले. असेच लिहीत राहा, असेच मंत्रमुग्ध करा, तुमचे काहीही होणार नाही, माझे स्वामी समर्थ तुमच्या सदैव पाठीशी आहेत, असतील. अर्थात हि अशी कौतुकाची थाप आजतागायत किमान लाखभर वेळा कधी प्रत्यक्ष तर कधी लिहून पाठवून, कधी फोनवरून पडली आहे. मी परवा कुठल्याशा वाहिनीवर अमीर खान आणि विराट कोहलीची एकत्र मुलाखत बघत होतो, त्यात अमीर म्हणाला, कुठलाही पुरस्कार मी स्वकारात नाही कारण ते कसे मिळतात आणि मिळविल्या जातात, मला ठाऊक आहे, एक मात्र खरे आहे, दर्शकांची माझ्या सिनेमाला मिळणारी दाद हाच पुरस्कार मला सर्वाधिक महत्वाचा वाटतो. मी अमीर खान नाही पण वाचकांचे हे असे जगभरातून मिळणारे प्रेम मला पुरस्कारांसारखेच असते, म्हणून इतरांसारखे अनेकदा मॅनेज केलेले पुरस्कार मला मिळत नाहीत किंवा मिळाले नाहीत, याचे कधीही दुःख नसते, वाईट वाटत नाही किंवा पत्रकारांच्या कुठल्याही घाणेरड्या राजकारणात मी सहभागी होत नाही कारण सारेच पत्रकार मला माझ्या कुटुंबासारखे आहेत, बहुसंख्य पत्रकार उत्स्फूर्त जेव्हा मुंबईत अलीकडे पार पडलेल्या मुलाच्या विवाह स्वागत समारंभाला वेळात वेळ काढून सहभागी झाले, तो क्षण मला अतिशय आनंदाचा होता. नावे ठेवणे आम्हा पत्रकारांचे कामच असते, अगदी जगातल्या सुंदरींपैकी एक माधुरी दीक्षितला देखील प्रसंगी आम्ही ती कशी तिरळी बघते, लिहून सांगून मोकळे होऊ पण माझ्या कडल्या स्वागत समारंभाचे जमलेल्या पत्रकारांनी पत्रकार असूनही जे गावभर कौतुक केले, मन आनंदाने भरून आले....

मुलाच्या विवाह समारंभानंतर पुढल्या काहीच दिवसात माझ्या लहान नातवाचे अचानक सतत तीन दिवस पोट दुखत होते, सारे करून झाले पण पोट थांबेना, अर्थात देवाचा धावा सुरु होता, देव म्हणजे अदृश्य शक्ती, जी हे जग चालवते. त्या अदृश्य शक्तीची मनापासून प्रार्थना केली, कारण अगदीच क्षुल्लक निघाले, त्याला बरे वाटले. येथे हे सांगण्याचे कारण म्हणजे जेव्हा तुम्ही कसेही करून दारिद्र्य रेषेतून बाहेर पडून सुखवस्तू आयुष्याकडे वाटचाल करता तेव्हा आपण श्रीमंत होत असतांना कुठे चुकतोय का, याचा दर दिवस सम्पल्यानंतर दर रात्री विचार करणे आणि केलेल्या चुका भविष्यात होऊ न देण्याची शपथ घेणे अतिआवश्यक असते कारण पापांची प्रक्रिया जर पुढे सतत अतिश्रीमंत होण्यासाठी सुरु ठेवली तर पैसे येतात पण घर संपते, घरातले घरपण हरवते, जी पापे मी केली, त्याची मी मोठी किंमत मोजली आहेच आणि मोजावीही लागणार आहे पण जेव्हा केव्हा तुमचे कुटुंब एखाद्या जीवघेण्या संकटात सापडते तेव्हा आड येते ते तुमचे पुण्य. महत्वाचे म्हणजे संकटातही मन स्थिर ठेवणे तेव्हाच शक्य असते जेव्हा तुमच्याकडे पुण्याचा साठा असतो. आपले मुख्यमंत्री तीन तीन वेळा जेव्हा मृत्यूच्या दारातून परत येतात, मिळालेल्या आशिर्वादातूनच असे चांगले घडते. 

श्रीमंत होतांना, नाव मिळविताना, मोठे होताना, लोकाभिमुख होतांना इतरांना मागे हटवून आपण जे त्वेषाने पुढे सरकत असतो, तेव्हा अनेक पापे हातून घडतात, लक्षात येते त्यानंतर असे मी करणार नाही, ठरवावे लागते तरच ती अदृश्य शक्ती तिचा विविध रूपात धावा केल्यानंतर मदतीला धावते, घरोघरी मधुमेहाचा विळखा, हे आपण केलेल्या पापांचेच बक्षीस आहे, पुण्याचा साठा वाढवा, नक्की देव मदतीला येतो....

अलीकडे मनाला भावलेला एक प्रसंग सांगतो. श्रीमान राज ठाकरे यांच्या निवास स्थानी दसऱ्याच्या काही दिवस आधी धाकट्या मुलाच्या विवाहाचे निमंत्रण करायला गेलो होतो. राज यांना खोलीतून बाहेर यायला अवधी होता, मी आणि विक्रांत वाट पाहत बसलो होतो तेवढ्यात राज यांचे चिरंजीव तडफेने दोन वेळा इकडून तिकडे स्माईल देत गेले, ते जीवघेण्या आजारातून बाहेर पडले, असे अजिबात वाटले नाही, टच वूड...सांगण्याचा हेतू हाच, कुठलेसे पुण्य राज यांना आडवे आले आणि ते या जीवघेण्या संकटातून सहीसलामत पटकन बाहेर पडले. माणसाला आणखी काय हवे, राज अनेक राजवाडे बांधतील पण राजवाड्यातला राजकुमार सहीसलामत हवा, तरच आयुष्य सार्थकी लागले, म्हणता येईल. पुण्य आपल्या प्रत्येकाच्या आड यायलाच हवे. घरा घरातले घरपण टिकायला हवे...
तूर्त एवढेच.

पत्रकार हेमंत जोशी 

पोहणे म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणे : पत्रकार हेमंत जोशी


पोहणे म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणे : पत्रकार हेमंत जोशी 
अलीकडे मी आणि माझा मित्र नेहमीप्रमाणे जुहू चौपाटीच्या त्या हॉटेलात पोहत होतो. पुढले लिहावे किंवा नाही, थोडा विचार करतोय, कारण लिहिले तर बायकोचे नेहमीप्रमाणे बोलणे खावे लागणार आहेत, पण तरीही हिम्मत करतोच. तुम्ही हेच बघायला जाता का, तुमची नजरच चांगली नाही, समोरचे चाचा बघा कशी बायकांसमोर खालची मान वर करीत नाहीत ( चाचा म्हणजे वय वर्षे ८०, डोळ्याच्या खाचा झालेला आणि नाजूक अवयवाचा खिमा झालेला माणूस ) वगैरे वगैरे नेहमीप्रमाणे ऐकून घ्यावे लागणार आहे. फार कमी पुरुष असे असतात नाही का कि जे भाग्यवान असतात कारण त्यांच्या बायका संशयी नसतात. विशेष म्हणजे अशा संशय न घेणाऱ्या बायकांना नवऱ्याविषयी उगाचच वाटत असते कि माझा नवरा कुठल्याही तरुण स्त्रीकडे बहिणीसारखे बघतो, हो, बघतो पण मामे बहीण असल्यासारखे. अगदी सनी लिओनीकडेही...

तर मी व मित्र पोहत असतांना साधारणतः वय वर्षे १६ च्या आसपास, दोन खूप श्रीमंत घरातल्या अतिशय देखण्या मुली त्यापैकी एकीचे पिताश्री देशातले नामांकित फॅशन डिझाइनर, काठावरच सर्वांसमक्ष कपडे बदलवून पाण्यात उतरल्या. त्यातली एक बॉय कट केलेली होती, मी त्यांना बघताच मित्राला म्हणालो, या लेस्बियन आहेत, तो म्हणाला, काहीही....पण काही क्षणात माझे बोलणे खरे ठरले, त्या पाण्यात उतरल्यानंतर पोहत कमी होत्या, त्यांचा परिणय, प्रणय मात्र बिनधास्त सुरु होता, पोहणारे आणि काठावरचे सारेच भारतीय, अधाशासारखे म्हणजे डोळ्यांचे काचेच्या गोट्या करून म्हणजे पापणीही हलू न देता त्यांच्याकडे बघत होते, त्या दोघींचे मात्र इतरांकडे लक्षही नव्हते, त्या दोघींचे चाळे नक्कीच नवपरिणीत जोडप्यालाही लाजवणारे होते, लेस्बियन सेक्स कसा करीत असावेत याचे जणू प्रात्यक्षिक सुरु होते. तसेही लेस्बियन्स माझ्या क्षणार्धात लक्षात येतात, त्यांच्यातल्या एका स्त्रीचा पेहराव आणि हेअर स्टाईल नेहमी पुरुषांसारखी असते. स्वातंत्र्य म्हणजे स्वइराचार नव्हे.वास्तविक सर्वांसमक्ष, सर्वांदेखत आपण कसे ओंगळ देहदर्शन आणि प्रदर्शन करतो याचे भान साऱ्यांनी ठेवायलाच हवे, मनुष्य प्राणी हा कुत्रा मांजर नव्हेत कि कसेही आणि कुठेही काहीही केले तरी चालते...

सभोवताली त्यांना बघणारे तोंडात पाणी आणून बघत होते, माझ्या मात्र डोळ्यात पाणी आले, मनात आले, एवढ्या अप्रतिम देखण्या मुली, काय वाटत असेल त्यांच्या आई वडिलांना, कल्पनाही करवत नव्हती. दुर्दैव त्या दोघींच्याही कुटुंबाचे, हे सारे त्यांना उघड्या डोळ्यांनी सहन करावे लागते. म्हणून नेहमी सांगतो, पाप पुण्याचा सतत विचार करून लोकांनी पैसे घरी आणावेत, नाही पचत असे पैसे, हे असे तुमच्या आमच्या घराचे लवकरच वाटोळे होते. होणारे वाटोळे पैसे खाणारे लपवून ठेवतात, पण देवाची न वाजणारी काठी दरदिवशी अंगावर वळ काढीत असते, खोलीभर पैसे डॉक्टरांना मोजण्याची ताकद असतानाही राज्य विकून श्रीमंत झालेले गढीवरले देशमुख वर्षभर आपला मृत्यू प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी बघत होते, पैसे खाणारे तुम्ही आम्ही सारेच गढीवरले देशमुख, पाप करणारे ' विलासी ' आयुष्य दरदिवशी जगण्यासाठी....

पंचतारांकित हॉटेलातले स्विमिंग पूल म्हणजे एक भन्नाट अनुभव असतो, मागेही एकदा मी तुम्हाला सांगितले होते कि माझ्यासारखे असे फारच थोडे, जवळपास नसतातच कि जे पोहता पोहता मुतण्यासाठीं पुलाबाहेर येतात, बुडबुडे दिसलेत कि समजावे पोहणाऱ्यांनी कार्यभाग उरकला आहे. नेमक्या एक मारवाडी भाभी माझ्या वेळेत पोहायला येतात, आधी भरपूर पाणी पिऊन पाण्यात उतरतात नंतर लागोपाठ दोन तीन वेळा त्यांच्या भोवताली मोठमोठाले बुडबुडे बाहेर पडतात, लहान मुले साबणाच्या पाण्याचे तोंडात प्लास्टिक पाईप घेऊन जे बुडबुडे हवेत सोडतात ना, ते या बुडबुड्यांसमोर एकदमच पिटुकले वाटतात...

तसेही मग तो पुरुष असो कि स्त्री, अगदी बोटावर मोजण्याइतके पोहताना किंवा अंघोळ करतांना बाजूला होऊन मुतणे पसंत करतात, बहुतेकांचे कुक्कुल्या बाळा सारखे असते म्हणजे चड्डीतल्या चड्डीत... आता समजले का तुम्हाला स्वीमींग पूल मधले पाणी हे समुद्राच्या पाण्याखालोखाल खारट का असते ते. आणि हो, भारतातील कोणत्याही पंचतारांकित हॉटेलात किंवा कुठल्याही तलावात पोहायला उतरणार्या आपल्या भारतीय तरुणी, स्त्रिया पूर्वीच्या काळी पुस्तकातला किंवा सिनेमातला काळा पहाड कसा काळा गॉगल लावून आणि संपूर्ण अंग कपड्यांनी झाकून रस्त्यावर उतरायचा ते तसे आपल्या भारतीय तरुणींचे असते, शोधूनही त्यांचे शरीर समोरच्यांना दिसत नाही. पंचतारांकित हॉटेल मध्ये जाऊन सुद्धा अशी सभयता केवळ भारतीय स्त्रीच सांभाळू शकते.परदेशातल्या तरुणींचे मात्र हे असे प्रेतासारखे शरीर झाकून ठेवलेले नसते, त्यांच्या कमरेच्या वर आणि कमरेच्या खाली त्यांनी जणू चार चिंध्या रस्त्यावर गोळा करून तेथे चिटकवल्या आहेत, एवढे तोकडे त्यांचे स्विमिंग कॉस्च्युम असते, जे त्यांच्यातले सौंदर्य संपविते आणि बघणाऱ्या सुसंस्कृत भारतीयांना ते हिडीस आणि ओंगळ वाटते...
तूर्त एवढेच....

पत्रकार हेमंत जोशी 

Friday, 13 October 2017

चव्हाण आणि मुसलमान : पत्रकार हेमंत जोशी


चव्हाण आणि मुसलमान : पत्रकार हेमंत जोशी 
पादण्याचा घाण वास किंवा एखाद्या उदबत्तीचा सुवास क्षणभर जाणवतो, नंतर जैसे थे, वातावरण असते. केवळ एक नांदेड महापालिका जिंकली म्हणून राज्यातल्या काँग्रेसने विशेषतः पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी हुरळून जाण्याचे अजिबात कारण नाही आणि भाजपा नेत्यांनी अस्वस्थ विचलित होण्याचेही कारण नाही पण भाजपा नेत्यांना नक्कीच विचार करायला लावणारी हि निवडणूक आहे. विशेष म्हणजे या देशातले मुसलमान तसेही एखाद्याचे होत नाहीत त्यामुळे ते धर्माच्या नावावर काढलेल्या धर्मांध मुस्लिम पक्षांचे आणि त्यांच्या जहाल नेत्यांचीही झाले नाहीत पण मुस्लिमांनी यावेळी नांदेड महापालिकेत घेतलेला निर्णय नक्कीच शहाणपणाचा म्हणावा लागेल, देशातल्या मुसलमानांची भूमिका मशिदीत ठरत असते, म्हणजे नांदेड मध्ये घेतलेली त्यांनी काँग्रेस ला मतदान करण्याची घेतलेली भूमिका हि केवळ नांदेड च्या महापालिका निवडणुकीपुरती मर्यादित नाही किंवा नव्हती तर राज्य आणि देशपातळीवर त्यांनी त्यांची हि घेतलेली भूमिका आहे अशी माझी पक्की माहिती आहे. भाजपाला यापुढे कायमस्वरूपी मुसलमानांचा विरोध असेल आणि हा विरोध रिझल्ट ओरिएण्टेड ठरण्यासाठी भाजपा बिरूद्ध प्रबळ ठरू शकतो अशा काँग्रेस पक्षाला मतदान करणे हेच या देशातल्या मुसलमानांचे पुढील काही वर्षे धोरण असेल, तीच त्यांची भूमिका असेल कारण प्रादेशिक किंवा जात्यंध मुस्लिम संघटनांना किंवा राजकीय पक्षांना मदत मतदान करून आपले भले साधल्या जाणार नाही हे त्यांच्यातल्या चाणाक्षांनी ओळखल्यानंतर अख्य्या मुस्लिम कोमने घेतलेला हा निर्णय आहे थोडक्यात पूर्वी म्हणजे राजीव गांधी होते तोपर्यंत जशी मुस्लिमांची एकगठ्ठा मते काँग्रेसला मिळायची, यापुढे पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे, आणि हेच भाजपाचे मोठे अपयश आहे, त्यांना या देशातल्या मुसलमानांची मते आणि सहानुभूती मिळविणे शक्य झालेले नाही अर्थात भाजपा नेत्यांनी त्यावर वाईट वाटून घेण्याचेही कारण नाही, देशातला राज्यातला मुस्लिमांचा वाढता प्रभाव आणि चढता त्रास याशी कंटाळून सारे हिंदू मोठ्या प्रमाणावर एकत्र आले आणि त्यांनी देशात, विशेषतः या राज्यात कडव्या हिंदुत्ववादी शिवसेनेला आणि भाजपाला गादीवर बसविले. दुर्दैव हेच कि एकवटलेले हिंदू आणि मराठी युतीपासून झपाट्याने दूर जाताहेत, हे चित्र अतिशय गंभीर आहे...

विशेषतः ज्या हिंदूंनी मराठींनी सेना भाजपाला येथे या राज्यात सत्ता दिली, हि सत्ता म्हणजे माकडांच्या हाती कोलीत दिले, पुन्हा एकदा मागचेच यांनीही पुढे नेण्याचे काम केले किंवा करताहेत हे जे आज सेना भाजपा युतीच्या मंत्र्यांकडून चित्र किंवा कार्य बघायला मिळते आहे, त्यामुळे नक्कीच हळूहळू राजकीय वातावरणात बदल घडतोय, पूर्वीचेच बरे होते, हे लोण धीरेधीरे पसरू लागलेले आहे, जे चित्र नक्कीच नजीकच्या भविष्यात सेना आणि भाजपाला त्रासदायक ठरणार आहे, ठरू शकते.तातडीने आत्मचिंतन करणे सेना आणि भाजपाच्या नेत्यांना तसेच मंत्र्यांना अत्यंत अत्यंत गरजेचे आहे, आवश्यक आहे. विशेषतः राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी या राज्यात रस्त्यावर हागुन ठेवलेहोते त्याच पद्धतीने सेनाभाजपाच्या बहुतेक मंत्र्यांनी हागुन ठेवायला सुरुवात केली तर तेच, मी जे वर सांगितलेय म्हणजे पूर्वीचेच बरे होते,मतदार म्हणतील आणि नांदेड ची पुनरावृत्ती या राज्यात सर्वत्र होण्यास फारसा वेळ लागणार नाही. थोडक्यात जे बबनराव पाचपुते किंवा विजयकुमार गावित यांनी त्यांच्या खात्यात दर दिवशी घाण पाद मारून घाणेरडे हागुन ठेवले त्याच पद्धतीने विष्णू सावरा यांचेही घाण हागुन ठेवणे आणि घाण पाद मारणे सुरु आहे, तेच धोकादायक नक्की ठरणारे आहे. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी सर्वात मोठी केलेली चूक म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी आघाडीच्या मंत्र्यांशी इमान राखून त्यांना अमाप कमाई करून दिली आणि आपणही नवश्रीमंत झाले तेच सरकारी अधिकारी आणि कर्मचारी पुन्हा त्याच मोक्याच्या पदावर फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खुबीने बेवकूफ बनवून यांच्या सभोवताली जमा झालेले आहेत, विशेष म्हणजे या तमाम दलालांची अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची लॉयल्टी अजिबात फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी नाही त्यांची शंभर टक्के लॉयल्टी फक्त आणि फक्त आघाडीच्या नेत्यांशी असल्याने युतीचे कोणतेही रहस्य पुढल्या पाच मिनिटात शरद पवार किंवा अजित पवारांकडे पोहोचलेले असते, भयंकर प्रकार म्हणजे हे सारे आघाडीच्या काळात या राज्याला लूट लूट लुटत होते आणि आजही तेच पुढे सुरु आहे, दुर्दैवाने युतीला हा भ्रष्टाचार अजिबात रोखता आलेला नाही, युतीचे सारेच मंत्री आणि मुख्यमंत्रीही पार उल्लू बनलेले आहेत. आहे का हिम्मत आजही या झारीतल्या शुक्राचार्यांनी दूर करण्याची युती सरकारमध्ये, माझ्याजवळ त्या तमाम मंडळींची यादी तयार आहे, हाकला या अशा बदमाशांना दूर आणि लावा त्यांच्या पाठी चौकशीचे लोढणे...

अशोक चव्हाण हे काय लायकीचे नेते आहेत, हे या भ्रष्ट आणि लफडेबाज नेत्याचे यश नाही किंवा ज्या केवळ नांदेड शहरात त्यांचे काम आहे ती महापालिका जिंकणे म्हणजे अशोक चव्हाण इज ग्रेट म्हणणे म्हणजे एखाद्यावेळी महागडा मेकअप करून छान दिसलेल्या तरुणीला मधुबाला म्हणण्यासारखे. नशीब बलवत्तर भ्रष्ट अशोक चव्हाणांचे, त्यांनी नांदेड महापालिका निवडणूक जिंकली अन्यथा पुढल्या काही दिवसात त्यांच्याही ढुंगणाखाली फटाके लागणार होते, त्यांचे अध्यक्षपद हिसकावून घेणे हि काळ्या दगडावरची रेघ होती, पक्षश्रेष्ठी पर्याय शोधायला लागले होते, या विजयामुळे चव्हाणांची प्रदेशाध्यक्षवरून हकालपट्टी तूर्त टाळली असे फारतर म्हणता येईल. एक मात्र नक्की नांदेड मध्ये समस्त मुसलमान एकवटले वरून सेना भाजपा युतीच्या कारभारावर मोठ्या प्रमाणावर नाराज झालेले हिंदू देखील येथे काँग्रेसकडे झुकले आणि सेना भाजपाने नांदेड मध्ये स्वतःला अपमानित करून घेतले...

रस्त्यावर उतरून एकमेकांची डोकी फोडणे तेवढे बाकी आहे, एवढे टोकाचे मतभेद सेना भाजपा नेत्यांमध्ये आहेत, सामान्य कार्यकर्त्यांना हि युती अगदी मनापासून आवडते पण वाट्यावरून आपापसात भांडणारे सेना भाजपा नेते, त्यांचे हे टोकाचे मतभेद देखील जसे नांदेड मध्ये वाटोळे होण्यास कारणीभूत ठरले आहे हे असेच पुढे सुरु ठेवले तर राज्याचेही नांदेड होण्यास वेळ लागणार 
नाही, वाट्टोळे होईल...

एक चुटका सांगतो. एका उमेदवाराला कुठल्याशा निवडणुकीत फक्त तीन मते पडतात. निकाल बघून तो शासनाकडे झेड प्लस सुरक्षेची मागणी करतो.जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक त्याला विचारतात, तुम्हाला फक्त तीन मते मिळाली आहेत, तुम्हाला झेड प्लस सुरक्षेची आवश्यकता का...? उमेदवार त्यावर म्हणतो, विचार करा साहेब, ज्या शहरात माझ्या विरोधात एवढे लोक असतील तेथे मला सुरक्षेची आवश्यकता आहेच...अशोक चव्हाण यांचे या नांदेड महापालिका निवडणुकीतील मिळालेल्या यशाने चुटक्यातल्या उमेदवारासारखे झाले आहे, मी केवढा मोठा, त्यांना वाटू लागले आहे, हे महाशय स्वतःला विनाकारण या राज्यातले आदर्श समजू लागले आहेत....

पत्रकार हेमंत जोशी 

ठाण्यात शिवशाही नव्हे शिंदेशाही : पत्रकार हेमंत जोशी


ठाण्यात शिवशाही नव्हे शिंदेशाही : पत्रकार हेमंत जोशी 
गेले दोन महिने मी स्वतः सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री श्रीमान एकनाथ शिंदे यांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी आटोकाट प्रयत्न करतोय. त्यांची आर्थिक बाजू मी पण भरभक्कम करण्याचा नेहमी प्रयत्न करतो असे एकदा मला भय्यू महाराजांचे बंधू ज्यांनी वादग्रस्त पद्धतीने विधान भवनात मोठे कंत्राट मिळविलेले आहे, सध्या ते त्या उत्पन्नावर मजा मारताहेत ते सत्यजित देशमुख मला शिंदे यांच्याशी असलेल्या जवळकीविषयी अनेकदा म्हणाले होते, म्हणून त्यांनाही मी दोन वेळा प्रत्यक्ष भेटून सांगितले, मला एकनाथ शिंदे यांना भेटायचे आहे, काही महत्वाचे विचारायचे आहे, पण त्यांनीही माझी शिंदे यांच्याशी भेट घालून दिली नाही....

नेमके सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना काय विचारायचे आहे, होते, तेही सांगतो. तुम्हाला माहित आहे, समृद्धी महामार्ग म्हणजे विविध भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आणि काही नेत्यांनीही तयार होण्या आधीच पोखरून ठेवलेला महामार्ग, या महामार्गाच्या लगत ज्यांनी ज्यांनी जमिनी घेतल्या आहेत, ती नावे मी नक्की तुम्हाला सांगणार आहेच पण शिंदे यांना मला असे विचारायचे होते कि या महामार्गासाठी गरज नसतांना दोन दोन वेळा निविदा का काढण्यात आल्या, दुसऱ्यांदा निविदा काढतांना नेमके कोणाला लाभार्थी ठरवायचे होते, पण भेटच होत नाही आणि त्या समृद्धी महामार्गाच्या ठिकाणी एका वादग्रस्त प्रशासकीय अधिकाऱ्याचे खास किरण कुरुंदकर ठाण मांडून बसलेले, त्यामुळे न्याय मिळेल याची मला खात्री नव्हती. अर्थात पुढल्या काही दिवसात मी संबंधित खात्याला माहितीच्या अधिकारात त्या निविदांच्या नेमके काय घडले हे विचारणार आहेच शिवाय मंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात किती वेळ आणि केव्हा केव्हा होते हेही विचारणार आहेच....

पावसाळी अधिवेशनात शिंदे यांना भेटण्याचा आटोकाट प्रयत्न केला, हा प्रयत्न सुरु असतांना म्हणजे शिंदे यांची भेट थेट विधान भवनात घेण्याच्यामी प्रयत्नात असतांना माझ्या असे लक्षात आले कि ठाणे जिल्ह्यातलेच एक आमदार त्यांना सतत भेटण्याचा प्रयत्न करताहेत, शेवटी न राहवून मी त्यांना विचारले असता ते म्हणाले मला त्यांच्याकडून अमुक अमुक रक्कम परत घ्यायची आहे, पण त्यांनी भेट देणे आवाक्याबाहेर करून ठेवल्याने हे असे सतत फेऱ्या मारतोय शिंदेंची भेट घेण्यासाठी, मी आर्थिक अडचणीत आहे, आणि शिंदे यांच्याकडून भेट होत नाही, त्यांचे काम असले कि मी मात्र सदैव त्यांच्यासाठी माझी व्यक्तिगत कामे बाजूला ठेवून धावत पळत आलेलो आहे, नंतर एक युवा बिल्डर पण भेटलेत, त्यांच्या फसवणुकीची कहाणी तर फारच वेगळी, ते हातापाया पडून म्हणाले, कृपया लिहू नका, माझे ठाण्यात जगणे त्यांची माणसे मुश्किल करून सोडतील. हे बघा, जेव्हा एखाद्या नेत्याच्या कामांचा फाफट पसारा वाढतो, तेव्हा हे असे घडत असते, पण का कोण जाणे, एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत पार मातोश्री पासून तर थेट ठाणे जिल्ह्यातील तळागाळापर्यंत विरोधातले स्फोटक वातावरण तयार झालेले आहे, फक्त ठिणगी चेटवण्याचा, पेटवण्याचा, लावण्याचा कोणी प्रयत्न किंवा हिम्मत केलेली नाही, ठिणगी पडण्याचा अवकाश, मला वाटते, एकनाथ शिंदे यांचे ठाणे जिल्ह्यातील साम्राज्य लयास जाण्या नक्की वेळ लागणार नाही, आपल्या तोडीचा ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत दुसरा कोणीही नाही याची जणू धास्ती दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांनीही घेतली असल्याने, आपल्या साम्राज्याला तडा जाणे कदापिही शक्य नाही असे शिंदे यांना नक्की वाटत असावे, आणि त्यांना हे असे वाटणे निदान आज मितीला त्रिवार सत्य आहे, शिंदे यांना आव्हान देणारा पर्यायी नेता शोधून त्याला ताकद देऊन तयार करणे मातोश्रीला अत्यावश्यक आहे, असे घडायला हवे. आज ठाणे शहरात किंवा ठाणे जिल्ह्यात फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे एक ते दहा क्रमांकावर आहेत, इतर सर्वपक्षीय नेत्यांची गणना दहा नंतर सुरु होते, हेही एक सत्य आहे पण वाढलेल्या ताकदीचा फायदा नव्हे गैरफायदा शिंदे यांच्या गटातून मोठ्या प्रमाणावर सतत सदैव उचलल्या जात असल्याने अख्ख्या ठाणे जिल्ह्यात त्यांच्याविषयी पक्षात आणि पक्षाबाहेरही अस्वस्थता आहे, ब्र शब्द त्यांच्या 
विरोधात बोलण्याची कोणतंही हिम्मत नाही, हि अशी दहशत निदान महाराष्ट्रात तरी निर्माण होणे तसे धोकादायक आहे, पण हा असा राजकीय दहशतवाद कायम टिकत नसतो, प्रमुख नेत्याचा मग सुरेशदादा जैन व्हायला फारसा वेळ लगत नाही, एकनाथ शिंदे यांची आजमितीला जरी टोकाची लोकप्रियता या ठाणे जिल्ह्यात असली तरी उभ्या राज्यात किंवा ठाणे जिल्ह्याबाहेर त्यांनी पाऊल ठेवल्यास ते जवळून जरी गेलेत तरी त्यांना ओळखणारे सेनेतही नसतील, एक मात्र खरे आहे, एकनाथ शिंदे यांना आव्हान देणे जर आवश्यक वाटत असेल तर भाजपाने ठाणे जिल्ह्यातील या गचाळ राजकारणात दंड थोपटून सर्व ताकदीनिशी उतरणे अत्यावश्यक आहे किंवा उद्धव ठाकरे यांनीच पर्यायी नेता तयार करणे खूप खूप गरजेचे आहे, कदाचित हे असे घडते आहे...
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Thursday, 12 October 2017

नाथा तो ' आनंद ' मिळेल का..पत्रकार हेमंत जोशी

नाथा तो ' आनंद ' मिळेल का..पत्रकार हेमंत जोशी 

नाथा म्हणजे काल परवा पर्यंत एक सच्चे पण कफल्लक शिवसैनिक म्हणून आनंद दिघे यांच्या सभोवताली वावरणारे मात्र आजचे अतिशय खूप श्रीमंत राजकारणी आणि या राज्याचे सार्वजनिक बांधकाम ( उपक्रम ) मंत्री. ठाणे जिल्ह्यातले उद्धव ठाकरे यांनाही खूपसे डोईजोड ठरलेले शिवसेना नेते. हे एकटेच सत्तेच्या राजकारणात पोटच्या पोरासहित खूप पुढे गेले, बाकी सारे जणू काही सतरंज्या उचलण्यापुरते, कानाखालचे असतील तरच यांच्या अधिपत्याखाली काहीतरी पदरात पडून घेता येते, इतरांचा मात्र अनंत तरे होतो, झुरुन झुरुन कसेबसे दिवस कुंठतो. नाही म्हणायला अनेकांनी शिंदे यांच्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न केला, पण अशांचा लवकरच प्रताप सरनाईक झाला. जोपर्यंत सरनाईक यांच्या कानाखालचे होते तोपर्यंत त्यांचा दबदबा होता, पण यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करताच, त्यांचाही मीरा भायंदर महापालिका निवडणुकीत मामा केल्या गेला, सरनाईक आता कसेबसे अस्तित्व टिकवून आहेत...

अर्थात असे अनेक सरनाईक, तरे किंवा नरेश म्हस्के ठाणे जिल्ह्यातल्या शिवसेनेत आहेत. असे वाटले होते आज जे जे भरभक्कम एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे ते त्यांच्या पुढे ठाणे जिल्ह्यातली शिवसेना भरभक्कम करण्यात कित्येक पाउल पुढे असलेल्या नरेश म्हस्के यांना मिळेल. पण कसचे काय आणि कसले काय, जेव्हा केव्हा म्हस्के यांना आता खूप मिळेल असे वाटत होते तेव्हा तेव्हा त्यांचा असा काही गणपती बाप्पा केल्या गेला कि ते अनुभवी धाडसी नरेश म्हस्के यांच्या स्वतःच्या देखील लक्षात आले नाही. पण लक्षात आल्यानंतर मात्र नरेश म्हस्के त्यांच्या स्वभावाला जागून ते असे काही चिडले कि शिंदे यांना वाटले आता आपले काही खरे नाही, मग तडजोड झाली असावी आणि म्हस्के यांना संघटनेत प्रमोशन देऊन पुन्हा केवळ ठाण्यातच ठेवण्यात आले, कित्येक ऐरेगैरे, ठाणे जिल्ह्यात, आमदार म्हणून शिवसेनेच्या भरवशावर आणि दिघेंच्या पुण्याईवर थेट मंत्रालय, विधान सभा, विधान परिषद गाठून मोकळे झाले पण तळहातावर प्राण  घेऊन लढणार्या लढवय्या नरेश म्हस्के यांची मात्र कायम सतत सदैव आजतागायत झाली ती केवळ उपेक्षा आणि अवहेलनाही...

पक्ष सोडून गेले नाहीत तो भाग वेगळा पण सरनाईक किंवा म्हस्के यांच्यावर हि वेळ नक्की येऊन ठेपली होती, आजही फारसे वेगळे चित्र नाही पण पर्याय नसल्याने अपमान गिळून कधी कधी एखाद्या नेत्याला वाट पाहावीही लागते.असा एखादा भ्रमण ध्वनी अस्तित्वात आहे का कि जो फिरवल्यानंतर थेट शिंदे यांच्याशी संपर्क साधणे आमच्यासारख्या सामान्य माणसाला सहज शक्य होते, कृपया त्यांनी असा भ्रमण ध्वनी असलाच तर कळवावा. अर्थात आम्ही ना बिल्डर आहोत ना व्यापारी, ना भ्रष्ट अधिकारी आहोत ना कानाखालचे पदाधिकारी त्यामुळे शिंदे आम्हाला म्हणजे सामान्य लोकांना, मतदारांना, किंवा सतरंज्या उचलणार्या शिवसैनिकांना त्यांच्याशी थेट संपर्क साधण्याचा भ्रमण ध्वनी देतीलच असे नाही. पक्षांतर्गत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांचे नेमके स्वरूप कोणते हे सांगण्याची तयारी जेथे दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांच्यात नाही तेथे इतरांना स्वतःचा नरेश म्हस्के अनंत तरे प्रताप सरनाईक करवून घेणे शक्य नाही पण एक घडू शकते, तुमच्या मनातले नेमके जर आम्हाला सांगितले तर आम्ही एकनाथ शिंदे यांच्याशी थेट लेखणीतून पंगा घेण्यास नक्की तयार आहोत, बघा प्रयत्न करून...
क्रमश :

पत्रकार हेमंत जोशी 

Monday, 9 October 2017

एका लग्नाची गोष्ट : पत्रकार हेमंत जोशी

एका लग्नाची गोष्ट : पत्रकार हेमंत जोशी 

पैशांचे नियोजन, आपल्याकडे जे काय थोडे बहुत आहे त्याचा आनंद घेणे, इतरांनाही देणे, हाती घेतलेल्या कामांचे नियोजन करणे, वेगळे काहीतरी करून दाखविणे, अमुक एखाद्यासाठी मी तमुक केले आहे हे शक्यतो बोलून न दाखवणे, शत्रू असो कि मित्र, राग तेवढ्यापुरता, लगेच विसरून जाऊन सर्वांविषयी ममत्व बाळगणे, ज्यांच्याशी ओळखी आहेत त्या सर्वांना कायम वाटत राहावे कि हा माणूस जणू आपल्या घरातला एक सदस्य आहे, या अशा काही गुणांच्या भरवशावर मी जगात आलो आहे, मुलांनीही तसेच जगावे त्यांना सांगत आलो आहे, त्यामुळेच अलीकडे थेट दसऱ्याच्या मुहूर्तावर नागपुरात पार पडलेला मुलाचा विवाह त्यानंतर ३ ऑक्टोबरला येथे मुंबईत ठेवलेला स्वागत समारंभ या दोन्ही कार्यक्रमांची राज्यभर चर्चा झाली, चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे लग्न ठरल्यानंतर आमच्या हाती केवळ ३०-४० दिवस होते त्यात प्रचंड पाऊस आणि पितृपक्ष पण या साऱ्या अडचणींवर मात करत हा दिमाखदार सोहळा परमेश्वर कृपेने यथासांग पार पडला...


याचे सर्वाधिक श्रेय जाते ते अर्थात पत्रकार विक्रांतला, माझ्या अति उत्साही मुलास आणि त्याच्या तीन मित्रांना, या चौघांनी हे कार्य कमी पैशात छान पार पडले कारण विक्रांत व्यतिरिक्त तिघेही मला विक्रांत सारखेच होते, अगदी घरातले होते. पार्ल्यातल्या सुप्रसिद्ध तोसा या उपहारगृहाचा मालक आणि या देशातील अग्रणी तृप्ती कॅटरिंगचा संचालक मिथुन सूचक तसाही जोशी कुटुंबीयांचा लाडका त्यामुळे विनीत चे लग्न हे त्याच्या घरातले कार्य होते, त्यामुळेच स्वागत समारंभ जमलेल्या लहान थोर सर्वांच्या मनात कौतुकाचे बाण रुतवून गेला. तेथे असलेला प्रत्येक पदार्थ हा जणू फक्त आपल्यासाठी तयार केला आहे हे प्रत्येकाला वाटत होते, विशेष म्हणजे तो स्वागत समारंभ वाटत नव्हता, वाटत होते एकाच कुटुंबाचे एकत्र जमणे, होय, दिवाळी आधीच सर्वांनी एकत्र येऊन दिवाळी साजरी केली. प्रशासकीय अधिकारी, शासकीय 
अधिकारी, मंत्रालय, नेते, मंत्री, पत्रकार, उद्योगपती या सर्वांच्या रांगेत आज आपणही, हे आमच्याकडे आलेल्या लग्नातील आणि स्वागत समारंभातील सर्वसामान्य पाहुण्यानाही वाटत होते, सारे देहभान विसरून आनंद घेत होते...

नागपुरातल्या नानिवडेकरांनाही महिनाभरापासून हेच वाटत होते कि विनीतचे हे शुभ कार्य आपल्या घरातलेच आहे आणि ते तसेच तयारी करीत होते. बघा जे केटरर असतात, त्यांच्यासाठी लग्न उरकणे हि नित्याचीच बाब असते पण मिथुन आणि नानिवडेकर कुटुंबाला तसे न वाटणे हे आमचे भाग्य आहे, होते. विशेष म्हणजे लग्नासाठी जे जे लागत होते, त्यातली सारी महान मंडळी हे तर आपल्या कुटुंबाचे एक सदस्यच आहेत, हे या विवाहानिमित्ये आमच्या लक्षात आले म्हणजे कपडे शिवणे असोत कि मुंबई ते नागपूर प्रवासाचे नियोजन असो, असे एकही क्षण जाणवले नाही कि आम्ही कुठे एकटे आहोत किंवा आमचे अमुक एका क्षेत्रात घराचे संबंध नाहीत. सर्वांनी आमच्या कडल्या लग्नपत्रिका म्हणे संग्रही ठेवल्या आहेत, या पत्रिका देखील घडवतांना या राज्यातल्या एका नामवंत कुटुंबाची म्हणजे कालनिर्णय चे जयराज साळगावकर आणि त्यांच्या गुणवान बुद्धिमान कन्येची शक्ती साळगावकर यांची मोठी मदत झाली. विशेष म्हणजे द ग्रेट साळगावकर दाम्पत्य वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी चक्क रांगेत उभे होते. किंवा काँग्रेस मधले खऱ्या अर्थाने गांधी, श्री उल्हासदादा पवार थेट पुण्याहून आले होते. कोणी काहीही आणू नये आणि कोणालाही काहीही द्यायचे नाही हे आमचे आधीच ठरलेले होते तरीही काही मंडळींच्या बाबतीत नाईलाज झाला. आमच्या फिरोज खान नामक मित्राने विनिताला गणपतीची सुबक मूर्ती दिली आणि श्रीमान पुरुषोत्तम खेडेकर यांनी त्याला काही दुर्मिळ पुस्तके दिलीत, हे असे न विसरता येणारे प्रसंग. प्रशासकीय अधिकाऱ्यांना जवळून बघणे हे एखाद्या हिरोला बघण्यापेक्षा कमी नसते, एवढी त्यांची या समाजात क्रेझ असते, येथे त्यांना जवळून बघणे सहज शक्य झाले, पत्रकार एखाद्या पत्रकाराच्या विवाह सोहळ्याला फारसे जाणे पसंत करीत नाहीत, येथे तसे घडले नाही, पत्रकारांची लक्षणीय उपस्थिती डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि पत्रकार, मोठा आनंद देऊन गेले. प्रख्यात पत्रकार अशोक वानखेडे थेट दिल्लीवरून आले, भेटले आणि पुन्हा त्याच पावली दिल्लीला निघून गेले, डोळ्यात आनंदाश्रू दाटले, चला, माणसे छान जोडल्या गेलीत. प्रशांत बाग म्हणालेत, गिरीश महाजन यायला विसरले होते, घेऊन आलो, हे असे प्रेमापोटी घडते किंवा राज ठाकरे यांचे स्वागत समारंभाला येणे त्याचे क्रेडिट माझा आवडता 
पत्रकार उदय तानपाठक यास द्यायलाच हवे...

नागपुरातही, मुख्यमंत्र्यांची केवढी मोठी क्रेझ, ते जेव्हा आशीर्वाद द्यायला नागपुरात व्यासपीठावर आले, जमलेला असा एकही व्यक्ती लहानांपासून तर थोरांपर्यंत नसावा, ज्यांनी त्यांचे फोटो काढले नाहीत. विशेष म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वांसंगे मुक्तपणे फोटो काढू दिले, वेळ दिला. अविस्मरणीय सोहळा दिमाखात पार पडला, काहींना घाईगर्दीत निमंत्रण द्यायचे राहून गेले, ते मात्र मनाला खटकले, त्यांची माफी मागतो. आयुष्यात सहजगत्या सहज मिळत असते, ओरबाडून, डावपेच खेळून काहीही मिळवायचे नसते, मग मित्र आपोआप जोडल्या जातात, अशा शुभ प्रसंगी मग हि मित्रांची श्रीमंती उपभोगायला मिळते. कर्क रोगाशी सामना करणारे प्रदीप भिडे आणि त्यांच्या पत्नी किंवा त्याच रोगाशी सामना करणाऱ्या उद्योगपती प्रणेश  धोंड यांच्या पत्नी त्रास बाजूला ठेवून सजून धजून येतात, जमलेल्या सर्वांचे आभार कसे मानावेत, शब्द सुचत नाहीत. ऐन दसऱ्याच्या दिवशी, तब्बल ३००-३५० कुटुंबे, तेही नागपूरला लग्नाला येतात, तेही दसरा हा मोठा सण बाजूला ठेवून, मी कसे आभार व्यक्त करू, शब्द नाहीत...

आमचे भाचे पत्रकार विशाल राजे आणि माजी पत्रकार ऍडव्होकेट जयेश वाणी या दोघांनी विवाह सोहळ्याचे केलेले वर्णन सदैव स्मरणात ठेवावे असे, त्यांचे मनापासून आभार, ज्या अनेकांनी तोंडभरून कौतुक केले त्यांचेही शतश: आभार...

ना हुंडा ना कसली देवाण घेवाण, त्यामुळे मुलीकडले खुश होते. मुलीच्या आई वडिलांना लुटायचे, त्यांना कर्जबाजारी करून सोडायचे, आम्हाला ते ना आधी जमले ना यावेळी, मुलाकडल्यांनी हे असेच धोरण राबवावे, मला मनापासून वाटते, शक्यतो साध्या सरळ सामान्य घरातल्या मुलींना मोठ्या घरच्या मंडळींनी सून करून घ्यावे असे आवाहन मी यानिमीत्ते सर्वांना करतो...

पत्रकार हेमंत जोशी