Wednesday, 13 September 2017

एक हट्टी मुलगा : पत्रकार हेमंत जोशी


एक हट्टी मुलगा : पत्रकार हेमंत जोशी 
काही स्त्रिया किंवा पुरुष वयाने कितीही वाढलेत तरी शेवटपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर निरागस इनोसंट भाव कायम टिकून असतात. काही स्त्रिया आणि पुरुष अगदी तरुण वयात किंवा आपण बघतो, लहानपणापासूनच खूपसे पोक्त भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतात. पत्रकारितेतल्या आजीबाई, काकूबाई, मावशी म्हणण्याचा अवकाश, कोणते बरे नाव तुमच्या ओठावर आले...आले ना लक्षात...राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव आठवतात का...त्यांना नजरेसमोर आणा...हं..आधी त्यांची मिशी काढा, आता त्यांना शाळेचा युनिफॉर्म चढवा, नंतर हनुवटीला छोटीशी काजळी लावा, बघा आता त्यांच्याकडे...झालेना शाळेतले बाळ, बालक तयार...सांगणारे सांगतातही, प्रमोदजी १२-१३ वर्षांचे होईपर्यंत कडेवर बसूनच बाहेर पडायचे...आमचे हे मुख्यमंत्रीही ते तसेच, राजकारणात मोठ्या तयारीचे पण चेहऱ्यावर आजही म्हणजे चाळिशीतही भाव मात्र बालक मंदिररतल्या बालकासारखे, छे...तो जोडा जमलंच नसता, कुठे त्या पोक्त बाई आणि कुठे हे आमचे निरागस चेहऱ्याचे मुख्यमंत्री, आमची हि भावजयी गायिका ताईच त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट...नशीब, चारित्र्य कसे जपायचे हे मुख्यमंत्र्यांना नेमके माहित, अन्यथा त्यांचाही राजकारणातला राजेश खन्ना झाला असता त्या नागपुरात...त्याकाळी नाही का तरुणी काका च्या फोटोशी पण लग्न उरकून मोकळ्या व्हायच्या....फार कमी असतात असे नेते जे लंपट नसतात, ज्यांच्या संगें सेफ सुरक्षित वाटते, असे नेते नेहमी हवेहवेसे वाटतात, फारच कमी असतात असे, या किंवा आधीच्या मुख्यमंत्र्यांसारखे, सुभाष देसाई, सुधीर मुनगंटीवार, इत्यादी बोटावर मोजण्या इतक्या नेत्यांसारखे...देवेंद्र निरागस दिसतात, मग त्यांचे त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे हट्टही रुसून बसणार्या बालकासारखेच असतात. फार विचार करणे नको, अगदी थेट सांगतो. गेले ७-८ महिने मग त्या विविध वाह्यात वाहिन्या असोत किंवा वृत्तपत्रे, आम्ही सोडून जो तो लिहून, बोंबलून मोकळा होतोय कि माजी मुख्यमंत्री नारायण राणे अमुक तमुक दिवशी भाजपा मध्ये जाताहेत...

एखाद्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत या पक्षातून त्या पक्षात जाणे म्हणजे अंडरवेअर बदलण्याएवढे सोपे नसते कि हि ओली झाली का मग ती घाला किंवा हागवणीचा त्रास असतांना थोडे कुठे सावरल्या गेलो नाही म्हणजे थोडी जरी कुठे पिरपिर झाली कि लगेच आपण आतली चड्डी बदलून मोकळे होतो, पक्षांतर हे असे एवढे विशेषतः मोठ्या मान्यवर नामवंत नेत्यांना अमुक पक्षातून तमुक पक्षात जाणे, पक्षांतर सोपे नसते, अनेक स्थित्यंतरे आधी घडतात नंतर घडते ते एखाद्या नेत्याचे पक्षांतर,त्यामुळे ७/८ महिन्यांपूर्वीच जेव्हा नारायण राणे यांचे ठरले कि काँग्रेस सोडून भाजपा मध्ये जायचे तेव्हाच भाजपा मधल्या नेत्यांनीही त्यांचे हे पक्षांतर उचलून धरले विशेषतः भाजपामधले कोकणचे नेते शिक्षण मंत्री विनोद तावडे किंवा प्रभावी नेते नितीन गडकरींनी देखील, पण प्रसंगी पक्षश्रेष्ठींकडे म्हणजे थेट नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्याकडे हट्ट करून बसणार्या वरून त्यांचे लाडके ठरलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या जोपर्यंत हे मनात नव्हते कि राणे यांना सामावून घ्यायचे आहे किंवा नाही, तोपर्यंत भाजपा मधल्या इतर कोणत्याही नेत्याची लुडबुड अजिबात महत्वाची ठरणारी नव्हती. विनोद तावडे यांचे मात्र एक बरे आहे त्या गडकरींसारखे म्हणजे ते आपली रेषा मोठी करण्यात अधिक रस घेतात त्यामुळे कोणेएकेकाळी नवख्या आशिष शेलारांना थेट मांडीला मांडी लावून बसवून घेतांना त्यांनी कधीही आपण हे चुकीचे करतो मानले नाही, आपला मित्र पुढे जातोय हे त्यांना अधिक भावायचे त्यामुळे राणेंच्या येण्याने आपले महत्व कमी होईल, त्यांनी हे असे मनाला कधीही लावून घेतले नसल्याची माझी माहिती आहे. उलट राणेंच्या येण्याने कोकणातली काहीशी कमकुवत भाजपा नक्की बळकट होऊ शकत त्यांनाही वाटते, शेवटी सारे शत्रू त्या शिवसेनेचे, त्यांचे साऱ्यांचे उद्देश सेम आहेत, थेट वरपासून म्हणजे नरेंद्र मोदींपासून तर नारायण राणे यांच्यापर्यंत, पण ते तितके सोपे नाही म्हणून जरी चेहरा केवळ निरागस बालकासारखा असला तर मुख्यमंत्र्यांचे निर्णय घेणे दूरदर्शी, विचाराअंती असते, उठसुठ काहीही करून मोकळे होणे त्यांना ते पसंत नसते, आवडत नाही...

त्यामुळे नारायण राणे यांना तूर्तास भाजपा मध्ये घेऊ नये हा त्यांचा हट्ट अगदी परवा परवा पर्यंत कायम होता, पण राजकारणात आज जे आहे ते उद्या नसते किंवा काल जे होते ते आज नसते त्यामुळे पक्षात आल्यानंतर नारायण राणे आपल्या पक्षाला काहीसे अडचणीचे ठरू शकतात असे मानणारे फडणवीस अलीकडे मात्र गोल गिरकी घेऊन थेट राणेंच्या शेजारी येऊन बसले आहेत आणि क्रेडिट गोज टू श्री नारायण राणे ओन्ली. त्यांनी अलीकडे मराठा मोर्च्याच्या संदर्भात घेतलेली अतिशय उघड कणखर भूमिका किंवा त्यांचे पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनातले भाजपाला किंवा प्रसंगी मुख्यमंत्र्यांना सुखावणारे भाषणातून मांडलेले मुद्दे, माझा अभ्यास सांगतो, राणे हे आता थेट फडणवीसांच्या मनात हृदयात प्रवेश करून मोकळे झाले आहे, त्यामुळे त्यांचा भाजपा प्रवेशही नक्की झाला आहे, पुढल्या काही दिवसात हे नक्की घडणार आहे, राणे यांचे आता भाजपामध्ये आगमन निश्चित आहे, त्यांचा यशवंतराव चव्हाण अजिबात झालेला नाही...

अलीकडे सेनेतल्या कोकणातल्या एका ज्येष्ठ मंत्र्याकडे गप्पा मारीत बसलो होतो, राणेंचा भाजपा प्रवेश नक्की आहे त्यावर ते म्हणाले राणे चूक करताहेत, जे सहज शक्य होते त्यांच्या फायद्याचे होते ते त्यांनी करायला हवे होते, सेनेत यायला हवे होते. राणेंना म्हणावे ब्राम्हणांचा संघ भाजपा वरून जेवढा मवाळ वाटतो, आतून त्यांच्यासारखे खतरनाक मी बघितले नाहीत, गॉड बोलणारी माणसे तसेही अधिक खतरनाक असतात, मी म्हणालो, तुमचा या शेवटल्या वाक्यातला रोख माझ्यावर तर नाही, ते मनापासून हसले....

ते मंत्री जे म्हणाले, ते अधिक भावले, मनाला मनापासून पटले. राणे यांचे भाजपा मध्ये जाणे, का कोण जाणे पण काँग्रेस परवडली, मे बी, राणेंवर हे असे म्हणण्याची वेळ येऊ शकते. संघ भाजपा संस्कृती वेगळी आहे, ती जी वरकरणी दिसते, खोलवर मात्र त्यांची वर्किंग स्टाईल अतिशय वेगळ्या धाटणीची आहे, राणे आणि त्यांच्या दोन्ही चिरंजीवांना अतिशय थंड शांत डोक्याने भाजपा संघ नेमके कसे, आत्मसात 
करणे तसे खूप आवश्यक आहे. भाजपापेक्षा शिवसेना, प्रवेश आणि विचारसरणी, वरून राजकीय फायदे, नारायण राणे पुढल्या काही वर्षात तेथे अधिक शांत चित्ताने राजकीय निवृत्ती घेऊन मोकळे झाले असते आणि तेच वास्तव आहे....

आता एका अतिशय मुद्द्याकडे वळतो. अलीकडे या राज्यात भाजपाने जे काय मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु केले ठेवले आहे, मला हे काळात नाही, व्हाय इट्स सो स्पीडीली....? ज्या भागात पक्ष कमजोर आहे तेथे त्यांनी हे केले असते तर आपण समजू शकलो असतो पण विरोधातला नेता दिसतो छान, बोलतो छान, पैसेवाला आहे, अच्छा खासा दलाल आहे, पुढे पुढे करणारा आहे म्हणून कि काय अशांना घ्या सामावून असे जर सरसकट पोरकट धोरण त्यांनी आखले असेल, तर आपण त्यांच्या या भूमिकेवर हसत खेळात दाद देत मोकळे होऊ पण ते तसे घडतांना दिसत नाही. मुंबई विले पार्ले पूर्वेमध्ये भाजप चे पराग आळवणी जन्मल्यापासून तर आजतागायत संघात आणि भाजपात आहेत, मागल्या वेळी या कट्टर भाजपा नेत्याने त्याच्या ज्या प्रभावी विरोधकाचा म्हणजे काँग्रेस च्या ज्या कृष्णा हेगडे यांचा पराभव केला आणि आमदारकीला निवडून आले, अलीकडे त्याच कृष्णा हेगडे यांना भाजपामध्ये प्रवेश दिल्याने भाजपने त्यांच्याच कट्टर माणसाचे पंख कापले आहेत असे राहून राहून वाटते. जे पार्ल्यात घडले तेच सायन कोळीवाड्यात घडले म्हणजे भाजपाच्या ज्या तामीलसेल्वन यांनी राष्ट्रवादीच्या प्रसाद लाड यांचा विधानसभेला दणदणीत पराभव केला होता, त्याच प्रसाद लाड यांना भाजपा मध्ये प्रवेश देऊन नेमके काय साधले, कळत नाही, वरून भाजपाचा कट्टर आमदार मनातून व्यथित झालाय ते वेगळेच. तोच प्रकार तिकडे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदार संघात घडलाय. तेथे अपक्ष शिरीष चौधरी यांनी ज्या विद्यमान आमदार साहेबराव पाटील यांचा पराभव केला होता आणि विधान सभा निकाल बाहेर येताच ज्या शिरीष चौधरी यांनी कोणत्याही अटि न घालता भाजपाला पाठिंबा दिला, अलीकडे त्याच साहेबराव पाटीलांच्या नगराध्यक्ष पत्नीला भाजपा मध्ये प्रवेश देऊन शिरीष चौधरी यांचे आसन डळमळीत करून सोडले आहे. येथे आळवणी तामील सेल्वन किंवा शिरीष चौधरी माझे मित्र आहेत आणि लाड किंवा हेगडे किंवा साहेबराव पाटील माझे शत्रू आहेत, मला त्यांच्याविषयी राजकीय असूया आहे असे अजिबात नाही,कोणीही सत्तेत असले आणि कोणीही विरोधात बसले, पत्रकार म्हणून आम्हाला 
त्यात काहीही घेणे देणे नसते, पण हे असे विचित्र इनकमिंग भाजपामध्ये का सुरु झाले आहे, मोठे अवघड असे हे कोडे आहे....
तूर्त एवढेच !

Sunday, 10 September 2017

पाजी बुवाबाजी : पत्रकार हेमंत जोशी


पाजी बुवाबाजी : पत्रकार हेमंत जोशी 
१९८७ जून दरम्यान मी कायम वास्तव्यासाठी मुंबईत आलो, आल्या आल्या एका वेगळ्याच पहिल्या वाहिल्या संकटाला सामोरा गेलो, तोपर्यंत पत्रकारितेत येऊन वास्तविक ६-७ वर्षे उलटलेली होती पण मानहानीचा दावा तत्पूर्वी कधी माझ्यावर दाखल झालेला नव्हता. येथे मुंबईतल्या विविध दैनिकातून त्याकाळी जोशी आडनावाचे भविष्य सांगणारे गृहस्थ तुमची कोणतीही समस्या गायत्री मंत्राच्या उपासनेने हमखास दूर करतो, अशी जाहिरात करून खूप पैसे लोकांकडून उकळायचे. मी ते थोतांड बाहेर काढले, जोशींनी जोशींवर लिहिले, मग त्या जोशींनी या जोशींवर मानहानीचा, अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. हा अनुभव नवीन होता. त्यादरम्यान माझ्यावर संकटाच्या मालिका सुरु होत्या, वयाने अगदीच लहान त्यात अत्यंत कटकटीची आणि मोठी कौटुंबिक जबाबदारी खांद्यावर होती, आयुष्यात कोणताही प्रसंग आला तरी घाबरून कोलमडून गांगरून जायचे नाही, ठरविलेले होते. न्यायालयात खटला सुरु झाल्यानंतर एक दिवस माझ्या वकिलाला बाजूला सारून मी नेमके काही सांगू का, न्यायाधीशांना विचारले, ते हो म्हणाले आणि मी बोलायला सुरुवात केली..त्यांना म्हणालो, मी ब्राम्हण आहे, मौंज झाल्यानंतर गायत्री मंत्राची उपासना करण्याचा अधिकार प्राप्त होतो असे मला वडिलांनी सांगितले होते, त्यामुळे मौंज झाल्यानंतर मी गायत्री मंत्राची उपासना सुरु केली नक्कीच त्याचे मला अनेक चांगले अनुभव आले, हा मंत्र इच्छापूर्ती करणारा आहे याविषयी माझ्या मनात शंका नाही. पण ह्या मंत्राच्या उपासनेमुळे मला व्यक्तिगत फारतर माझ्या कुटुंबाला त्याचा फायदा होईल, हे जोशी महाशय तर गायत्री मंत्राच्या भरवशावर सरळ सरळ लोकांचे प्रश्न त्यांच्या अडचणी, समस्यां सोडविण्याचे कंत्राट घेऊन मोकळे होतात आणि हे असे शक्य असेल तर मला माधुरी दीक्षित मनापासून आवडते, मी न्यायालयाकडे एक लाख रुपये जमा करतो, आणि हे मागतील तेवढी मुदत त्यांना देतो, त्यांनी माझ्यासाठी उपासना करावी तेवढी माधुरी दीक्षित मला बायको म्हणून आणून द्यावी. आणि येथे खटला संपला, अर्थात मी निर्दोष सुटलो...

शरद उपाध्ये असोत कि जितेंद्रनाथ महाराज किंवा अन्य कोणीही, या बुवाबाजीच्या नादि लागून आपले आयुष्य अधिक अडचणीचे करून ठेवू नका. आपल्या राज्यात खरे साधू संत महाराज असतीलच तर त्यांनी या राज्यातील फसव्या महाराजांची यादी जाहीर करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. माझ्या एक असे लक्षात आले आहे कि या अशा बुवांच्या भोवती अक्षरश: पेड एजंट्सची यंत्रणा असते. बाबा म्हणजे चमत्कार, बाबा म्हणजे परमेश्वरी अवतार, बाबा म्हणजे अमुक देवाचे थेट अवतार, बाबा म्हणजे साक्षात साईबाबा, बाबा म्हणजे थेट दत्ताचे अवतार असे विविध प्रचार आणि प्रसार हे नेमलेले एजंट भक्तांच्या रूपात विविध माध्यमे वापरून पद्धतशीरपणे करतांना दिसतात, विशेषतः त्यांच्यासाठी विविध वाहिन्या उत्तम मार्ग आहे, तेथून या अशा बुवांना अतिशय झपाट्याने प्रसिद्धी मिळते, भक्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते. या अशा भामट्या बुवांच्या आश्रमातून प्रसारित करण्यात येणारे साहित्य अवश्य नजरेखालून घाला, त्यात अमुक एक बुवा बाबा साक्षात परमेश्वर कसे त्यांचे चमत्कार कोणते, हमखास पटवून सांगितलेले असते, अडचणीत सापडलेल्यांना नेमके हे असे लिखाण वाचायला देतात आणि माणसे भक्त होऊन जाळ्यात अडकतात, परमेश्वरी शक्तीला प्रसंगी बाजूला सारून या तद्दन चालू बुवांच्या नदी लागून अडचणी वाढवून घेतात, आर्थिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणावर नाडले जातात....

हे बघा मी काही बुवाबाजीच्या विरोधात चालविण्यात येणाऱ्या आंदोलनातला एक स्वयंसेवक नाही केवळ पत्रकार आहे. मी श्याम मानव नाही, नरेंद्र दाभोलकर नाही, ज्ञानेश महाराव नाही, राजा आकाश नाही, अनिल अवचट नाही, पुरुषोत्तम आवारे पाटील नाही, मुक्ता दाभोलकर नाही, अतिशय सामान्य पत्रकार आहे पण हे माहित आहे कि या राज्यातली ९० टक्के बुवाबाजी फसवी आहे, लबाड आहे, लुटारू आहे, पाखंडी, बदमाश, हलकट, नालायक आहे त्यात आमचा सामान्य माणूस अडकून पडू नये म्हणून सततचे हे लिखाण सुरु आहे. लोकांकडून सक्तीने वर्गण्या जमा करायच्या आणि गणपतीच्या दहाही दिवसात मध्यरात्र उलटली कि जुगार खेळायला सुरुवात करायची, त्यातून सामान्य माणूस देवापासून दूर होऊन या अशा भामट्या बुवांच्या नादी लागत चाललाय कि काय, शंका मनाला चाटून जाते...

मागेही मी एकदा जाहीर सांगितले होते कि मी आणि माझे कुटुंब आता हयात नसलेल्या पण बेळगाव निवासी कलावती आई यांचे शिष्यत्व पत्करलेले आहे, त्यांच्या चमत्कारावर नव्हे तर विचारांवर आधारित आम्ही सारे वागण्याचा प्रयत्न करतो, त्यातून काही चांगले अनुभव आले आहेत, अगदी मनातले सांगतो, मी उभ्या आयुष्यत माझ्या पत्नीचे काहीही एक ऐकले नाही, त्याला कारणे वेगळी आहेत पण तिने सांगितलेले एक काम तेवढे केले, आम्ही सारे कलावती आईचा गुरु मंत्र घेऊन मोकळे झालो आहोत. पण कुटुंबाच्या शपथेवर सांगतो कि कलावती आई चांगल्याम्हणून इतर सारे वाईट, असे अजिबात नाही, मी अगदी मनापासून शेगाव किंवा शिर्डीला जातो, संत मला वावडे नाहीत, भामट्या बुवांचा मात्र मी नक्की कर्दनकाळ आहे. आश्चर्य म्हणजे कलावती आईचे असे एकमेव मंदिर या जगात असावे जेथे हात जोडायला येणाऱ्यांनी जर पैशांची बात केली किंवा पैसे ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तेथल्या तेथे अडविले जाते....

दाभोलकरांनी जे म्हटले आहे तेच एक सत्य आहे, बुवाबाजी हा बरकीतिला आलेला एक धंदा आहे. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये हे वाक्य बुवाबाजीला फार चपखलपणे लागू पडते. माणसे जणू फसायला बसलेलीच असतात. अत्रे म्हणाले होते तेच खरे आहे, बुवा, बाबा, महाराज म्हणजे वासनांचे स्वार्थाचे लोभीपणाचे लंपटपणाचे व्यभिचाराचे जणू धगधगते कुंडच, परंतु आमची सारी अक्कल जणू त्यांच्यासमोर लुळी पडते..

जाता जाता : अलीकडे असेच एक बुवा मी जेथे पोहायला जातो त्याठिकाणी म्हणजे जुहूच्या पाम ग्रोव्ह हॉटेलमध्ये सहकुटुंब पोहायला त्यांनी सुरुवात केली होती, पोहताना आधी काही दिवस त्यांच्या थापा ऐकून घेतल्या, नंतर एक दिवस माझी खरी ओळख सांगितली, काही अंक त्यांना वाचायला दिले, आणि काय आश्चर्य, दुसर्या दिवसापासून हे बाबा गायब, त्यांचे पोहणे बंद, आमचे त्यांना पाहणे बंद, आजतागायत..
तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

Saturday, 9 September 2017

उदय तानपाठक : पत्रकार हेमंत जोशी

उदय तानपाठक : पत्रकार हेमंत जोशी
पत्रकार उदय तानपाठक हे एक धमाल व्यक्तिमत्व आहे, तो गावमित्र आहे, तो आम्हा सर्वांना सार्यांसमोर वाट्टेलते बोलतो, आम्ही सारेच त्याचे बोलणे ऐकून घेतो, त्याचे बोलणे विनोदातून मर्मावर बोट ठेवणारे असते, आमच्या कडे त्यावर काहीही उत्तर त्याक्षणी नसते. उदयशी बोलायचे असेल तर रांगेत यावे लागते, आपला नंबर लागला कि त्याच्याशी बोलता येते, तो पुढारी दैनिकात सुरुवातीपासून एकाच पदावर आहे, त्याचे ते पद आहे, मालक जाधवांच्या मांडीला मांडी लावून बसणे. जसे पुण्यातल्या पुणेकर बाईला विधान परिषदेतल्या तिच्या मालकाशिवाय मध्यंतरी तीन चार वर्षे करमत नव्हते तसे उदयला त्याच्या मालकाशिवाय करमत नाही आणि मालकांना उदयशिवाय. ज्यांना त्याची थट्टा करता येते ते करू शकतात, पण त्या हिंमतीचे मला वाटते माझ्यासारखे फारतर एखादे दोन असावेत...

का कोण जाणे पण दैनिकातून अधून मधून, या मुलांचे पालक कोण, या मथळ्या खाली जे लहान मुलांचे फोटो छापून येतात, त्यातली जवळपास ९० टक्के बालके शंभर टक्के उदयच्या चेहऱ्यावर का असतात, हे आजपर्यंत आम्हाला न उलगडलेले कोडे आहे, उदय त्याच्या कार्यालयातून निघाल्यानंतर वास्तविक त्याच्या घरी म्हणजे मुलुंडला फारतर एक तासात पोहोचायला हवा, पण कार्यालयातले सांगतात, असे कधीही घडत नाही, घरी पोहोचायला त्याला खूप खूप तास लागतात पण त्या बालकांचे चेहरे आणि उडायचे मधेच गायब होणे, कृपया वाट्टेल तो अर्थ काढू नका. पत्रकार अभय देशपांडे म्हणतो, हात दाखवा गाडी थांबवा, हि संकल्पना परिवहन मंडळाला उदयमुळेच सुचली, कार्यालय ते घर, मित्रांना गाडीत घ्यायचे, गाडीतच गप्पांचा फड नंतर एकेकाला त्यांच्या निवासस्थानी सोडून शेवटी मुलुंडला प्रस्थान, त्याचे हे असे नित्याचेच वागणे. हालत डुलत घरी जाणार्या पत्रकारांना घरी, थेट बेडरूमपर्यंत सेफ सोडणे, तेथेही तो अशांच्या कुटुंबाटल्यांचे आशीर्वाद घेऊन मोकळा होतो. उदयकडे न्याहाळून बघा, मला नाही वाटत, महाविद्यालयात स्त्रीपात्र रंगविताना त्याने कधी पॅड वापरले असतील...

श्रीमान राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेणे तेही प्रकट, म्हणजे मुलाखत घेणाऱ्या पत्रकारांनी बोलणे खाण्याची मानसिक तयारी ठेवणे अतिशय आवश्यक असते, तुम्हाला ते आठवत असेलच कुठल्याशा निवडणुकीदरम्यान राजसाहेबांनी त्या मराठी वाहिनीवर मुलाखत घेणार्याचीच कशी ऐशी तैशी करून ठेवली होती. परवा उदय तानपाठक आणि संदीप प्रधान यांनी त्यांची मुलाखत घेतली, संदीपला आयोजकांनी का निवडले, नेमके कळले नाही, कदाचित ब्राम्हणांसमोर एका सीकेपीची मुलाखत घेतांना किमान एकतारी सीकेपी हवा, हा विचार त्यांच्या डोक्यात आला असावा. पण उदय तानपाठक तेथे असणे आवश्यकच होते, कारण हे व्यक्तिमत्व पत्रकार असूनही साऱ्यांना जसे भावते तसे राज यांनाही मनापासून भावते. उदय याची अमुक एखाद्याशी ओळख करून देतांना सावधगिरी बाळगावी लागते, कारण पुढल्या काही दिवसात उदय ओळख करून दिलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर असतो आणि आपण पायाशी म्हणून उदय आपल्याकडे येतोय असे कळल्यानंतर प्रसंगी माझ्यासहित एखादा फिल्मी हिरो सुद्धा आपल्या प्रेयसीला लपवून ठेवेल, एकदा का उदयने तोंड उघडले किआपले तोंड बंद होते आणि समोरचा क्षणार्धात उदयमय होतो कायमसाठी, आपल्या हाती फक्त हात चोळत बसणे असते...

उदय म्हणजे माहितीचे भांडार आहे, या राज्यात कुठे काय मस्त मस्त खायला मिळते, याची त्याच्याकडे इत्यंभूत माहिती असते, कारण तो ब्राम्हण आहे त्यामुळे उत्तम खवय्या आहेच. असे म्हणतात तो आणि आमचे बंधुराज जेव्हा केव्हा भेटतात, म्हणे बोलणे फक्त खाण्यावर होते आणि तेही एखाद्या उत्तम ठिकाणी खाता खाता, खोटे वाटत असेल तर पत्रकार धर्मेंद्र जोरे यांसी विचारावे, जोरे यांचे मांसाहारी ज्ञान या दोन ब्राम्हणांमुळेच वाढले, असे जोरे मोठ्या कौतुकाने सांगत असल्याचे कळते...

तुमच्या ते लक्षात आलेच असेल, उदय सतत हसतो आणि समोरचा मग अजित पवार असोत कि पृथ्वीराज चव्हाण म्हणजे किंग अंकल मधले त्या जॅकी श्रॉफ सारखे एखादे कधीही न हसणारे किंवा क्वचित कधीतरी स्माईल देणारे कॅरेक्टर जरी असले तरी त्यांना तो हसवतो, हसवत ठेवतो, पोट दुखेपर्यंत सर्वांना हसवतो. मनातल्या मनात उदय अनेकदा रडत असतो पण लोकांना मात्र आपले रडू दुःख कळू न देता त्यांना जगण्याचा आणि हसण्याचा आनंद देतो. त्याचे आई वडिलांवर श्रावण बाळासारखे प्रेम होते, वडिलांची त्याने एकट्याने केलेली सेवा, मला वाटते आजही स्वर्गात ते त्याचे वडील उठल्यानंतर सर्वप्रथम उदय यास नक्की दुवा देत असतील नंतरच पुढल्या कामाला लागत असतील. मनातले सांगतो, आज सत्य ते सांगतो, अमुक एखाद्याची जेव्हा मी खूप खूप तारीफ करतो त्याआधी मोठी किंमत त्याच्याकडून मी वसूल केलेली असते, होय, उदयदेखील त्यांच्यातलाच एक, त्याने माझे यापूर्वी अनेकदा मोठे काम केले आहे, ते म्हणजे मला खूप खूप हसवण्याचे आणि माझया एखाद्या लिखाणावर मला तेथल्या तेथे खडे बोल सुनावण्याचे. तो चुकून जेव्हा केव्हा मला माझ्या लेखांवर दाद देतो, खरोखरी असे त्याक्षणी वाटते कि आपण आयएएस ची परीक्षा पास झालोय...मूल अभ्यास करीत नसेल तर एखादा त्याला शिकवणी आणि बायकोच्या पाठी काही क्षण सोबतीसाठी जशी एखादी पेड मॅडम ठेवतो तसे अमुक एखाद्या घरात जर अमुक एखादे पात्र अजिबात हसणारे नसेल तर उदय सरांची शिकवणी लावून तर बघा, नाही ते पात्र पुढल्या काही दिवसात खदाखदा हसायला लागले तर मला पत्रकार 
म्हणू नका, नालायक पुरुष संबोधून मोकळे व्हा. एक मात्र नक्की मला उदयच्या सुटलेल्या देहाची आणि पत्रकार राजन पारकर याच्या लग्नाची नेहमी काळजी असते. माझ्या ओळखीच्या मुलीशी लग्न कर आणि सार्या चिंता माझ्यावर सोड, हे मी नेहमी राजनला सांगत आलोय, कोणीतरी समजवा रे त्याला...

अगदी अलीकडेच मी त्याला म्हणालो, बरे झाले अनिल थत्ते यांनी गगनभेदी बंद केले आणि तू स्वतःचे पाक्षिक काढले नाही, मला आपोआप बिनबोभाट विनायसे यश मिळाले, स्पर्धक नसल्याने. उदयची पत्रकारिता दुर्दैवाने कोणी फारशी सिरियसली घेतली नाही हे त्याचे दुर्दैव, त्याने दिलेली बातमी वित्तम बातमी ठरते आणि त्याचे लेख, मुलाखती सारेच्या सारे लिखाण पुनःपुन्हा वारंवार अनेकवेळा वाचावेसे वाटते...

उदयच्या ओळखी त्याची लेखणी, त्याचे ज्ञान, हे माझ्याकडे असते तर आज मी किमान पाचशे कोटींचा मालक झालो असतो, अर्थात असे काही पत्रकार त्या मंत्रालयात आहेत ना त्यांचे शिक्षण आहे, ना त्यांच्या दैनिकाला खप आहे ना त्यांनी कधी कुठले गाजलेले लिखाण केलेले आहे, तरीही ते पाचशे कोटींचे मालक यासाठी आहेत कि त्यांची वृत्ती दलाली करण्याचीच आहे, हरामखोरी त्यांच्या नसानसात भिनलेली आहे, असे समोर जरी दिसलेत तरी माझ्या तळपायाची आग मस्तकात पोहोचते, सारे गूण सदगुण असूनही उदय फक्त ' खाऊन पिऊन ' सुखी आहे, माणूस मस्त आहे, जगतमित्र आहे...
तूर्त एवढेच!

पत्रकार हेमंत जोशी 

व्यक्ती तेवढ्या प्रकृती : पत्रकार हेमंत जोशीव्यक्ती तेवढ्या प्रकृती : पत्रकार हेमंत जोशी 
तुम्ही हे करून बघा, म्हणजे कधीही इतरांविषयी वाईट बोलू नका किंवा कोणाचेही विनाकारण वाईट चिंतू नका, निकोप स्पर्धा करून बघा, एखादी भूमिका घेऊन जगणे प्रत्येकाकडून अपेक्षित असते पण भूमिके पलीकडे अमुक एखाद्याविषयी कायमस्वरूप राग द्वेष क्रोध ठेवून जगू नका, प्रत्येकाविषयी ममता आणि बंधुता बाळगून तर बघा, नक्की मजा येईल हा बदल जर स्वतःमध्ये घडविता आला तर....

जाऊद्या उगाच त्या भय्यू महाराजांसारखी येथे न कळणारी भाषा वापरून मी तुम्हाला गोंधळात टाकतो आहे. अनेक डॉक्टर मंडळींचे म्हणे अनेकदा असे होते कि त्यांना त्यांचेच अक्षर कळत नाही, मला वाटते महाराजांचेही असे होत असावे म्हणजे त्यांनी केलेले प्रवचन पुढे त्यांनाच ते काय बोलले हे कळत नसावे. आणि ते जे बोलतात ते तसे स्वतः वागत नाहीत याचे अधिक वाईट वाटते. अनेक वेळा मी विरोधात लिहितो पण भूमिका मांडल्यानंतर हि माणसे भेटलीत किंवा समोर आलीत कि त्यांच्याकडे रागाने बघावे असे कधीही वाटत नाही, उलट आपणहून त्यांच्या जवळ जातो, आदराने प्रेमाने त्यांची विचारपूस करतो कारण ज्यांच्या विरोधात मी लिहिलेले असते तो सामान्य माणूस नसतो असतो तो एक खूप मोठा माणूस...

या राज्यात ज्यांना ज्यांना असामान्य बुद्धिमत्ता आणि अद्वितीय लेखणी लाभलेली आहे त्यात गुरुस्थानी मानावे असे भाऊ तोरसेकर असतील, अनेक असतील पण आजही ज्यांचे कित्येक वर्षे आधी केलेले लिखाण मला जसेच्या तसे आठवते ते पत्रकार अनिल थत्ते, मनातून हृदयातून निघता निघत नाही, वास्तविक त्यांनी पाक्षिक गगनभेदी बंद केले नसते तर मला पुढे जातांना स्पर्धा म्हणून नक्की खूप कठीण गेले असते पण जेवढे त्याचे वाईट वाटले नसते, तेवढे अधिक दुःख त्यांनी गगनभेदी बंद केल्याचे आहे किंवा ग. वा. बेहरे गेल्यानंतर "सोबत" साप्ताहिक बंद पडल्याचे आहे. थत्तेंशी किंवा तोरसेकरांशी फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटल्यानंतर बोलतांना आधी माझ्या डोळ्यासमोर त्यांचे पाय येतात. आणि हो मोठ्या माणसांच्या चेहऱ्याकडे नव्हे तर पायाकडे बघून बोला, अधिक आनंद तुम्हाला त्यातून मिळेल. व्यक्ती म्हणून गुण दोष प्रत्येकात असतात पण गुणांची संख्या तेवढी मोजून मोठ्या माणसांकडे बघावे, आनंद मिळतो...

त्या ऊर्जा मंत्र्यांचे नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, रामदास आठवले, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अमीर खान, नाना पाटेकर इत्यादींसारखे झाले आहे म्हणजे हि अशी मंडळी अमुक एखाद्या ठिकाणी बसली रे बसली कि पुढल्या पाच मिनिटात त्यांच्या सभोवताली गर्दी जमा होते, समजा ते या जागेवरून उठून त्या जागेवर बसलेत कि लगेच गर्दी पुन्हा त्यांच्याकडे सरकते. मी या मंडळींच्या रांगेत थेट त्यांना नेऊन बसवत नाही, पण या राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांचे म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांचे हे असे झाले आहे, त्यांची काम करण्याची सकारात्मक भूमिका आणि या ऊर्जा मंत्र्याला लाभलेली प्रचंड शारीरिक ऊर्जा, खोटे नाही खरे सांगतो, हा माणूस जेथे जेथे पोहोचतो, त्याच्या सभोवताली पुढल्या पाच मिनिटात प्रचंड गर्दी झालेली असते....

बावनकुळे यांचा विषय येथे यासाठी कि कदाचित ते असे एकमेव मंत्री असावेत जे बढत्या बदल्या किंवा अन्य कोणत्याही लाभाच्या कामात त्यांच्या खात्यातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून पैसे घेत नाहीत त्यामुळे त्यांच्या कडे असलेल्या खात्यातील अधिकारी त्यांच्यासमोर येतांना मी चळाचळा कापताना बघितले आहेत, थोडक्यात बावनकुळे यांचा नागपुरात पालक मंत्री म्हणून किंवा या राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री म्हणून आदरयुक्त दरारा आहे आणि हे असे अलीकडे क्वचित घडते. विशेष म्हणजे या मंडळींकडून पैसे खाणे नाही हे त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यादिवसापासून ठरविले आहे, त्यांचे संघ शिस्तीचे सहकारी श्री विश्वास पाठक यांनी हे असे वाचन त्यांच्याकडून घेतले आहे, तसेच घडते आहे, विश्वासाने सांगू शकतो, श्रीमान चंद्रशेखर बावनकुळे बढत्या बदल्यांमध्ये किंवा खात्यातील कर्मचाऱ्यांकडून पैसे न खाणारे मंत्री आहेत. हे बघा, बढत्या बदल्या करवून घेणारे मधले दलाल इतके तयारीचे असतात कि ते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना त्यांना पैसे द्यावे लागणार आहेत, हे त्यांच्यासारख्या करड्या शिस्तीच्या मुख्यमंत्र्यांचेही नाव सांगून पैसे उकळायचे, वास्तविक या अशा प्रकारात चव्हाण दूरदूरपर्यंत सामील नव्हते...

येथे मला कोणालाही कमी लेखायचे नाही, ज्यांचा उल्लेख केला ती माणसे नक्की फार मोठी आहेत. अलीकडे मी विवाह पत्रिका देण्याच्या निमित्ताने माननीय उद्धव ठाकरे यांना भेटलो, हि भेट अर्थात मित्रवर्य हर्षल प्रधान यांनी घडवून आणली. जेव्हा सेना भवनात गेलो, तेव्हा माझे अतिशय लाडके मंत्री दिवाकर रावते, खऱ्या अर्थाने उद्धवजींचे उजवे हात श्री मिलिंद नार्वेकर, माझा एकेकाळचा सहकारी आदेश बांदेकर, श्री विनायक राऊत इत्यादी सेनेची दिग्गज मंडळी बाहेरच्या हॉल मध्ये बसलेली होती आणि आत केबिन मध्ये उद्धवजींबरोबर एकमेव हर्षल प्रधान होते, उद्धवजींच्या काही मिटींग्स सुरु होत्या, पुन्हा सांगतो, या मंडळींना कमी लेखायचे नाही पण हर्षल प्रधान यांचे कौतुक येथे यासाठी कि कामातले डिव्होशन एखाद्याला किती मोठी उंची गाठून देते त्यावर हर्षल प्रधान हे अप्रतिम उदाहरण ठरावे. प्रधान असोत कि नार्वेकर, मातोश्रीवर अमुक एखाद्याचे महत्व उगाच वाढत नाही, मोठ्या कष्टातून ते साध्य होते...

मी चिरंजीव हर्षल यास अगदी जवळून गेली २२-२५ वर्षे जवळून बघत आलोय, त्याने कधी आराम केला केल्याचे कधी आठवत नाही, मला वाटते तो घरी केवळ झोपायला जात असावा, अर्थात पत्नी अंजली आणि एकत्र कुटुंबाची त्याला लाभलेली उत्तम साथ हेही त्याच्या यशाचे नक्की एक गमक आहे, त्याची पत्नी हसत खेळत घर एकत्र बांधून ठेवते, हेही कौतुक करावे असे, त्याचे एक बरे आहे, तो पुढे गेलाय खरा, पण जुन्या सहकाऱ्यांना विसरलेला नाही, ते नेहमी सेनाभवनातल्या त्याच्या केबिन मध्ये अनेकदा तहान मांडून बसलेले असतात...

मित्र मोठे झालेत कि आपण आपोआप मोठे होत जातो, खूप खूप मित्र जोडावेत, असावेत, धम्माल आयुष्य जगणे सहज शक्य होते, तुम्हीही हा प्रयोग करून पहा..

पत्रकार हेमंत जोशी

Tuesday, 5 September 2017

चौधरी चाचा ४२० : भाग २: पत्रकार हेमंत जोशी

चौधरी चाचा ४२० : भाग २: पत्रकार हेमंत जोशी 

श्रीमान विश्वंभर चौधरी यांच्यावर केलेले लिखाण मी फेसबुकवर टाकले, दुसरे दिवशी त्यांचा फोन आला, छान वाटले, त्यांचा फोन आला त्यावेळी मी नेमका मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर स्वतः ड्राइव्ह करत होतो, वरून धो धो पाऊस, फोनवर बोलणे शक्य नव्हते, तरीही चार दोन वाक्ये एकमेकांशी आम्ही बोललो, त्यांना माझ्या लिखाणातले काही मुद्दे खटकल्याचे त्यांनी सांगितले, मी त्यांना म्हणालो, अहो, लेखणी माझी आहे, तुम्ही मला नेमके काय मुद्दे मांडू सांगा, पुन्हा त्यावर लिहिता येईल, पुण्यातली कामे आटोपलीत कि फोन करतो, मी म्हणालो, आम्ही फोन खाली ठेवला. मला दुसरे दिवशी सकाळी वेळ मिळाला, आधी त्यांना मेसेज केला, आपण आता केव्हाही फोन करा, मी मोकळा आहे, त्यांचा फोन आला नाही मग मीच त्यांना फोन लावला, त्यांनी तो घेतला नाही, त्यावर आता चार पाच दिवस उलटले आहेत, यापुढे मला थांबणे शक्य नाही, वाचकांना सांगितलेले असल्याने चौधरी यांचा अपूर्ण राहिलेला लेख आता येथे पूर्ण करणे आवश्यक वाटते...

जे मला वाटते ते मी सांगतो, मी मोठा माणूस अजिबात नाही पण एका सामान्य माणसाला जे वाटते ते येथे सांगतो. समाजसेवकांनी, नेत्यांनी, राजकारण्यांनी सार्वजनिक जीवनात वावरतांना खूप पारदर्शक असावे असे वाटते पण आपल्याकडे हे घडत नाही, हि मोठी माणसे एकमेकांशी सतत डावपेच खेळतात त्यातून विनाकारण डोकेदुखी वाढवून घेतात. सततच्या थर्ड ग्रेड हिंदी मराठी सिरियल्स पेक्षा कितीतरी अधिक पटींनी हि मोठी माणसे सततचे डावपेच खेळून आपले स्वतःचे आणि आपल्यासंगे आपल्या कुटुंबाचे मन:स्वास्थ्य, आरोग्य, घरातले वातावरण बिघडवून मोकळे होतात, ज्याची अजिबात गरज नसते हे मी राजकीय पत्रकारितेतल्या प्रदीर्घ अनुभवावरून सांगतो, सांगत आलो आहे. या साऱ्यांना हे असे का करावे लागते कारण त्यांना आपले खरे हिडीस विकृत भ्रष्ट रूप, स्वरूप लोकांसमोर उघड करायचे नसते, पण ते तसे होत नाही, झाकलेलेकोंबडे आरवल्याशिवाय राहत नाही, त्यापेक्षा आपण जे जसे आहोत ते तसे हुबेहूब समाजा समोर आणून वाटचाल सुरु ठेवावी, त्रास होत नाही अन्यथा एक दिवस या अशा साऱ्यांचा बाबा रामरहीम होतो, नेमके कॅरेक्टर उघड होते...

देव गायकवाड प्रकरणावरून आमदार जितेंद्र आव्हाड चिडले, संतापले, चौधरी यांनी त्यांनाच टार्गेट केले आहे असे आव्हाड यांना वाटल्याने मग आव्हाड यांनीही चौधरी यांची चड्डी सोडली, चौधरी नेमके कसे, ते सांगून मोकळे झाले किंवा विश्वंभर चौधरी नेमके कसे, आव्हाड यांनी थेट आक्रमक, चड्डिसोड शब्द वापरून चौधरी यांची अडचण करून टाकली असावी कारण आव्हाड यांच्या टीकेने खूपसे अस्वस्थ झालेले चौधरी त्यावर खुलासा देऊन मोकळे झाले पण वेळ निघून गेली होती, चौधरी वरून वेगळे कसे आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यांचे प्रत्यक्ष स्वरूप नेमके कसे, तोपर्यंत जितेंद्र आव्हाड मांडून मोकळे झाले होते, थोडक्यात ज्यांची शोध पत्रकारिता आहे, त्यांना आव्हाड नेमका क्ल्यू देऊन मोकळे झाले आहेत, मोकळे झाले होते, म्हणून कदाचित विश्वंभर चौधरी अधिक अस्वस्थ झाले असावेत...

आव्हाड आणि चौधरी तसे दोघेही आक्रमक आहेत, त्यातला एक बेरका राजकारणी तर दुसरा एकदम तयारीचा समाजसेवक, थोडक्यात दोघेही एकमेकांना उरून पुरणारे, त्यामुळे आव्हाडांच्या आरोपांना उत्तर देतांना चौधरी यांनी देखील आक्रमकपणा दाखविणे आवश्यक होते पण ते घडले नाही, स्पष्टीकरणातली भाषा अतिशय नरमाईची होती, ते वाचल्यानंतर मनाला खटकले, शंकेची पाल मनात चुकचुकली, एखाद्या अति संशयी बायकोसारखे का कोण जाणे पण चौधरी यांच्याकडे बघावेसे वाटले, हे असे घडायला नको, वाघ जर मटणाऐवजी उकडपेंडी खायला मागू लागला किंवा सलमान खान सारखा पुरुष जर तरुणींना सोडून विटाळ गेलेल्या एखाद्या बाईला चुम्मा मागू लागला तर कसे व्हायचे..

आव्हाड यांनी चौधरी यांच्यावर केलेले आरोप त्यावर चौधरी यांचा खुलासा, हे सारे माझ्या पाक्षिकाचा पुढल्या अंकात नक्की वाचा, मला नेमके काय सांगायचे आहे, तुम्हाला त्यातून नक्की कळेल. सहजच एक गम्मत सांगतो, एखाद्या बाईला चार पाच मुले असतात, मुलांना खायला देतांना त्यातल्या एखाद्याला कमी मिळाले कि तो असे काही भोकांड पसरतो कि पुढे त्याच्या मनासारखे तर होतेच पण हे असे मूल कुटुंबात आपोआप सेन्टर ऑफ अट्रॅक्शन होते, माझे नेमके हे असेच त्या भोकांड पसरणाऱ्या लहान मुलासारखे होत आले आहे, मी नेमके सत्य लिहितो, जे खरे आहे तेच लिहितो, त्यामुळे पत्रकारितेची वाटचाल करतांना मला यदु जोशी होता आले नाही, बड्या लोकांना मनापासून लिखाणातून झोम्बलो एखाद्या मिर्चीसारखा, त्यामुळे तथाकथित मंडळींनी शेजारी जागा देतांना मनात कायम भीती बाळगली, मग मी काय केले, माझा स्वतःचा जगभर दर्जेदार वाचक वर्ग निर्माण केला, आणि हे तथाकथित आपोआप तोंडावर पडले, या सार्या वाटचालीत अर्थात अनेक नामवंत मंडळींनी अगदी उघड जे कौतुक केले किंवा प्रेमाने पाठीवर दरवेळी कौतकाची जी थाप मारली या अशा मंडळींचे ऋण फिटणे अशक्य, त्यांच्यावर एक दिवस नक्की पुस्तक लिहून मोकळा होईल, थोडेसे विषयांतर झाले खरे पण ते आवश्यक वाटले...

येथे स्वतःविषयी यासाठी सांगितले कि आमच्या क्षेत्रात दरदिवशी माझ्यासारखे अनेक धडपडतांना बघतो पण पुढे त्यांना नैराश्य आले आणि ते संपले हे ही बघत आलो आहे, अशा मंडळींनी अजिबात निराश न होता मन आणि तन शांत ठेवून वाटचाल करावी, नाव कमवावे, खूप मोठे व्हावे, म्हणून मनातले तेवढे सांगितले. स्वस्तुती करणारा तो एक मूर्ख असतो, हो याठिकाणी मी मूर्ख आहे, मी मूर्खपणा केला आहे...

मागल्या वर्षीच्या शिक्षक दिनी मी माझ्या शाळेतल्या आवडत्या पंडितराव पुराणिक सरांना अगदी फोनवर अगदी भावुक होऊन म्हणालो, सर, आज मी जे काही आहे ते तुम्हा शिक्षकांमुळेच आहे...खडूस सर म्हणतात कसे, आम्हाला दोष देऊ नकोस, आम्ही सर्वोतपरी प्रयत्न केले होते, सारीच मुले चांगली निघतील, असे होत नाही...!! 
मित्रांनो, तूर्त एवढेच...

पत्रकार हेमंत जोशी 
LikeShow more reactions
Comment

चौधरी चाचा ४२० : पत्रकार हेमंत जोशी


चौधरी चाचा ४२० : पत्रकार हेमंत जोशी 
मुंबईत आणि मंत्रालयात नवीन, पत्रकारितेत नवखा, विविध तथाकथित मान्यवर पत्रकारांचा त्याकाळी मंत्रालयाला विळखा, मंत्रालयात येणाऱ्या पत्रकारांची त्याकाळी संख्या देखील जेमतेम, आजच्यासारखे पत्रकारितेचे भरमसाठ पीक त्याकाळी आलेले नव्हते, वाहिन्यांचा, इलेक्ट्रॉनिक मीडिया चा जन्म देखील नुकताच झालेला, त्यामुळे मंत्रालयात वावरणारे वार्ताहर आचार्य अत्रे, लोकमान्य टिळकांचे, आगरकरांचे पत्रकारितेतले जणू आम्ही वारसदार या थाटात वास्तवात अक्कल अगदीच जेमतेम असूनही हे पत्रकार अशा मस्तीत वावरायचे, माझ्याकडे तर अनौरस नालायक पोर पद्धतीने बघायचे, तोंडावर तोंड पडले कि असे काही तोंड वाकडे करून घ्यायचे कि जणू काही मी त्यांची पोरगी अंगाखाली घेतली आणि घातली आहे, अर्थात हा अपमान सुरुवातीला मन आणि तन अस्वस्थ करून सोडायचा, मग एक केले, या मंडळींचे चालू धंदे उजेडात आणायला सुरुवात केली, आणि येथल्या पत्रकारितेतल्या बड्या धेंडांवर मी थेट तुटून पडतो, थेट पत्रकारांच्याच भानगडी बाहेर काढायला सुरुवात केली..

हे येथे मुंबईत नवीन होते त्यामुळे आमचे लिखाण वाचल्यानंतर मी हळूहळू आपोआप चर्चेचा विषय ठरायला लागलो. मला त्याकाळी अतिशय पाण्यात पाहणारे एक पत्रकार होते, आता ते हयात नाहीत, पण हेमंत म्हणजे जणू गुंड आणि मवाली आणि आम्ही म्हणजे पत्रकारितेतील संत तुकाराम, या पद्धतीने त्यांचे माझ्याशी अतिशय हलकट बोलणे बघणे आणि वागणे असायचे. पण असे अजिबात नव्हते, तेच घडले, माझ्याकडे बोट दाखवणारे हे महाशय, पुढे त्यांच्या घराचे जे तीन तेरा वाजले, त्यांच्या हयातीतच पोटच्या मुलांनी त्या नवरा बायकोवर जी वृद्धाश्रमात राहायची वेळ आणली, बघून मला फार वाईट वाटले, या ब्राम्हण पत्रकाराच्या मुलीने पुढे एका पाकड्याशी म्हणजे धर्मांध मुसलमानांशी लग्न केले विशेष म्हणजे त्या पाकड्याने पुढे जाऊन त्यांच्या सूनेचेही मूल आपलेच आहे, असे म्हणे भर कोर्टात सांगितले. या पत्रकाराच्या आयुष्यात त्यांच्यासमोरच आणखी काय काय घडले मी येथे सखोल सांगत नाही पण हेच सांगतो, कोणाचा विनाकारण दुस्वास करू नका, उलट आपल्या क्षेत्रात येणाऱ्याला मनापासून सहकार्य करा, त्याला प्रेमाने जवळ घेऊन शक्य असेल ती मदत करा. अर्थात येथे ते दिवंगत पत्रकार हा विषय नाही, विषय आहे, आपले ठेवावे झाकून दुसऱ्याचे पाहावे वाकून! आणि याच मुद्द्यावर मी आयुष्यभर ढोंगी मान्यवरांच्या विरोधात लढतो आहे. बघा, वाईट घटना ह्या तुमच्या आमच्या कोणाच्याही आयुष्यात घडू शकतात, फक्त 
सांगणे हेच, विडी फुंकतांना एखाद्या आंधळ्याला मी शंख फुंकतोय, असे खोटे सांगू नका...

भारतीयांना दुसऱ्यांना ज्ञानाचे डोस पाजताना आपले काळे धंदे किंवा दोष किंवा व्यसने किंवा शारीरिक विकृती लपवून ठेवण्याची जी घाणेरडी सवय जडलेली आहे, तीच या राज्याला किंवा या देशाला अत्यंत घातक आहे, नेमक्या या अशाच लोकांविरुद्ध लढतांना मी कायम आनंद घेत आलो आहे, हि अशी पत्रकारिता मनापासून एन्जॉय करतो आहे. हे सारे येथे यासाठी कि अलीकडे मुंब्र्याचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकातून युवा समाजसेवक विश्वंभर चौधरी यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते वाचून मी खुपसा अवाक यासाठी झालो कि मी त्यांच्यात उद्याचे अण्णा हजारे बघतो आहे नेमके चौधरी हे कसे लफडेबाज, आव्हाड यांनी सांगितल्याने शॉक झालो आहे, पुन्हा तेच, हव्या त्या मार्गाने चौधरी यांनी आपला, आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी पैसे मिळवावेत पण आमचे नेहमीचे सांगणे कि तोंडात विष्ठा ठेवून श्रीखंड चघळतोय, सांगत सुटू नये. होय, मी अमुक मार्गाने पैसे मिळवितो तरीही मला तमुक लढ्यात उतरायचे आहे हे विश्वंभर चौधरी यांनी सांगून टाकावे, आम्ही मराठी आमच्या नेत्यांना त्यांच्या गुण दोषांसहित स्वीकारतो तयामुळे विश्वंभर चौधरी यांना जर असे वाटत असेल कि आपले खरे स्वरूप बाहेर आल्यानंतर माणसे आपल्याला झिडकारतील तर येथे तसे अजिबात घडत नाही, पण लपवून ठेवलेत तर ते आज ना उद्या बाहेर पडेल जे काम आज विश्वंभर यांच्या बाबतीत आव्हाड यांनी केले आहे, तर मात्र अशांची लोकप्रियता आणि विश्वासाहर्ता झपाट्याने खाली येते आणि मान्यवरांचा मग निखिल वागळे होतो. 

ज्यांना विश्वंभर चौधरी गुरुस्थानी मानतात, आरोप त्या अण्णा हजारे यांच्यावर युती सरकार सत्तेत असतांना शशिकांत सुतार किंवा सुरेशदादा जैन यांनीही मोठ्या प्रमाणावर केले होते, काळाच्या ओघात जैन आणि सुतार संपले, बाजूला फेकल्या गेले, सार्वजनिक जीवनातून उध्वस्त झाले पण अण्णा हजारे यांचे महत्व आजही तेवढेच कायम आहे कारण अण्णांच्या ज्या चुका या दोघांनी काढल्या होत्या, अण्णांनी केलेल्या त्या चुका व्यक्तिगत फायद्यासाठी नव्हे तर राळेगण सिद्धीच्या भल्यासाठी आणि समाजहित साधतांना त्यांच्या हातून नकळत घडल्या होत्या, त्यामुळे या समाजाने तरीही अण्णा हजारे परमेश्वराच्या रूपात बघितले आणि ह्या दोन बलाढ्य नेत्यांना कोपऱ्यात फेकून दिले....

काल आज नव्हे तर थेट १९९८ दरम्यान आमचे मित्र, अत्यंत सरळमार्गी, भाषाप्रभू, उत्तम संस्कारातून पत्रकारिता केलेल्या श्री सारंग दर्शने यांनी लिहिलेले ' दुसरा गांधी अर्थात राळेगणचे अण्णा ' हे छोटेखानी पुस्तक जर कुठे मिळाले तर अवश्य वाचून मोकळे व्हा, अण्णा नेमके कसे, त्यांनी त्यातून उत्तमरीत्या रेखाटले आहे. आणि याठिकाणी मला विश्वंभर चौधरी यांना तेच सांगायचे आहे, आम्ही तुमच्याकडे उद्याचे अण्णा हजारे म्हणून बघतो आहे कारण अण्णा आता अगदीच थकले आहेत, त्यांचे कार्य जर चौधरी यांना पुढे सुरु ठेवायचे असेल तर त्यांनी आयुष्यतले काहीही न लपवता समाजाला सामोरे जाणे गरजेचे आहे अन्यथा विविध वाहिन्यांवरून जे अनेक उथळ आणि ढोंगी दरदिवशी दरक्षणी विविध चर्चेतून ऐकायला बघायला मिळतात, त्याच रांगेतले तुम्ही एक, असे चित्र निर्माण होईल आणि तुम्ही थट्टेचा आणि टीकेचा विषय ठरून लोक उद्या तुम्हाला हसण्यावारी नेतील, असे अजिबात घडायला नको....

त्या जितेंद्र आव्हाडांना एकदा का विनाकारण धुरी दिलेल्या मिरच्या झोंबल्या कि मग हा बाबा कोणाचाही नसतो, थेट उठतो आणि आपल्या विरोधकांवर तुटून पडतो, मला नेमका विषय माहित नाही पण अटक झालेल्या देव गायकवाड नामें व्यक्तीशी विश्वंभर चौधरी यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव जोडले आणि आव्हाड चिडले, लिहून मोकळे झाले कि चौधरी यांचे वागणे कसे, मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली, पद्धतीचे आहे, आणि हे वाचूनच आमच्यावर शुद्ध हरपण्याची वेळ आली, असे वाटले आता विश्वास तरी कोणावर ठेवावा, जिला प्रेयसी म्हणून स्वीकारले, तिच्या जवळ जाताच, तिला जवळ घेताच तिनेच सांगावे कि मी यापूर्वी दोन तीनदा गर्भपात करून घेतला आहे, हे असे आम्हाला आव्हाड वाचल्यानंतर चौधरी यांच्या बाबतीत वाटले. 
उर्वरित पुढल्या भागात...


पत्रकार हेमंत जोशी 

Sunday, 3 September 2017

बुवाबाजी २ : पत्रकार हेमंत जोशी


बुवाबाजी २ : पत्रकार हेमंत जोशी 
पुण्यात डेक्कन परिसरात फिरत असतांना एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावर लावलेल्या पाटीने माझे लक्ष वेधून घेतले, येथे वि. द. घाटे राहात होते, अशी ती पाटी होती, बघून छान वाटले. मला वाटते प्रत्येक पुणेकर हे असे काहीतरी वेगळे करून दाखवतो. आता पुढल्या परिच्छेदात मी जे लिहिणार आहे, तुम्हीच मला ते नाव, त्या भामट्या बुवांचे नाव,सांगून मोकळे व्हायचे आहे..

विषय अर्थात बुवाबाजी हाच आहे. याच पुण्यात माझ्या ओळखीच्या एक तरुण महिला उद्योजिका राहतात. स्वतःच्या पायावर त्या उभ्या आहेत. पदरी एक मूल वरून व्यसनी नवरा आणि माहेरची मोठी जबाबदारी तरीही हि उद्योजिका धडपड करून आपल्या व्यवसायात पुढे पुढे जात होती, त्यात तिचा व्यवसाय मंत्रालयाशी संबंधित, काही वर्षांपूर्वी तिला मग कोणीतरी सुचवले, मध्यप्रदेशातल्या त्या बुवांकडे जा, त्यांच्याकडे या राज्यातल्या मंत्र्यांची, अधिकाऱ्यांची, आमदार, खासदारांची, प्रसंगी अगदी थेट राष्ट्रपती किंवा मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची उठबैस आहे. थोडक्यात ज्यांच्यामुळे तुझा व्यवसाय भरभराटीला येतो, त्या सर्वांची उठबैस असते, तुला त्यातून पुढे जाणे शक्य होईल शिवाय, तुझ्यावर असलेली कौटुंबिक जबाबदारी आणि कटकटी, त्यांच्या चरणी लिन हो, आपोआप साऱ्या समस्यांमधून बाहेर येशील, आणि हि त्याचवेळी तिच्या व्यवसायात यशस्वी ठरलेली स्त्री त्या सत्पाळकर बाईंप्रमाणे या स्वयंघोषित राष्ट्र संतांच्या दरबारात दाखल झाली. पुढे या महाराजांनी तिची एकही समस्यां दूर करणे राहिले बाजूला उलट तिला हा बाबा आणखी वेगळ्याआणि विकृत संकटात टाकून मोकळा झाला...

येथे मला आवर्जून एक या राज्यातल्या बड्या मंडळींना सांगावेसे वाटते कि कृपया त्या रामरहिम बाबांप्रमाणे तुम्ही अशा कोणत्याही वादग्रस्त बुवा बाबा मंडळींसंगे आपले फोटो काढू देऊ नयेत, ते अय अशा काढलेल्या फोटोंचा हमखास दरदिवशी गैरवापर करतात, आम्ही प्रभावी कसे, आम्ही परमेश्वराचे अवतार कसे याचे त्यांना त्यानंतर मार्केटिंग करणे अतिशय सोपे जाते...जे तिच्या बाबतीत घडले तेच या मध्य प्रदेशात नावाला ठाण मांडून बसलेल्या स्टईलमपात बुवाच्या नादी लागलेल्या, संपर्कात आलेल्यांचे थोड्याफार फरकाने प्रत्येकाचे होते, प्रत्येकाच्या बाबतीत घडते, पण उगाच या प्रभावी आणि काहीशा गुंड प्रवृत्तीच्या बाबाशी, बुवाशी, पंगा घेणे नको, म्हणून माणसे आधी भोगतात मग बाजूला होतात आणि झाकलीमूठ सव्वा लाखाची, पद्धतीने गप्प बसतात. हा बाबा तिकडे मध्यप्रदेशात आणि इकडे पुण्यात राहणाऱ्या या महिला उद्योजिकेला उठसुठ कामे सांगून आर्थिक लुटून मोकळा व्हायला लागला. ती सांगते, या पुरुष असलेल्या बाबाचे मेकअप साहित्य माझ्यावर विकत घेऊन पाठविण्याची जबाबदारी होती, ते एवढे महाग असायचे कि बिलाची रक्कम अदा करतांना मला घाम फुटत असे, शिवाय बाकीच्या आर्थिक जबाबदाऱ्या पेलता पेलता माझ्याकडले कोटी दोन कोटी रुपये केव्हा कसे आणि कुठे निघून गेले मला माझेच ध्यानात आले नाही, पण तरीही मी मान खाली घालून हे सारे यासाठी सहन करीत होते कि ह्यो बाबा शासन दरबारी सांगून मला एखादी मोठी ऑर्डर मिळवून देईल पण असे एकदाही अजिबात घडले नाही, मी मात्र साक्षात परमेश्वर समजून त्याच्या पायाशी लिन झाले होते, त्याला देव मनात होते, आपला देव आपल्याला कधीही फसविणार नाही, असे मला वाटत होते, मी डोळे झाकून त्याच्या नावाचा जप करीत होते....

आता खरी गम्मत पुढे आहे, या बुवांनी त्यांची मुंबईतल्या एका अतिशय प्रभावी भाजपा भाजपा महिला नेत्याशी तिची ओळख करून दिली, ह्या तुझे काम नक्की करून देतील, सांगितले, थोडक्यात त्यांनी या उद्योजिकेचे एकही काम करून दिले नाही, वरून त्या स्वतःला युवा समजणार्या बुवाने आपली जबाबदारी आधी त्यांना आर्थिकदृष्ट्या लुबाडून या अमराठी महिला नेत्याच्या खांद्यावर टाकली. या जहाँबाज बाईंनी तिला मलबारहिलवर त्यांच्या भव्य बंगल्यात बोलाविले, पुढे कळले त्यांची ती पद्धत आहे म्हणजे आधी आपल्या बंगल्यावर बोलवायचे, मग त्यांच्या रिकामचोट नवऱ्याने त्यांचा बंगला, महागड्या गाड्या दाखवायच्या, थोडक्यात आधी आम्ही खूप श्रीमंत कसे दाखवायचे आणि नंतर पद्धतशीर लुटून मोकळे व्हायचे, काम होत नाही आणि आगाऊ दिलेली मोठी रक्कम लोकांना परतही मिळत नाही. नेमके तेच घडले, येथेही या महिला नेत्याने आमच्या या महिला उद्योजक भगिनींकडून लाखो रुपये आगाऊ घेतले, आज ये उद्या ये परवा नक्की होईल पद्धतीने तिला पुणे ते मुंबई प्रवास करून करून दमविले, काम तर अजिबात झाले नाही आणि जे इतरांच्या बाबतीत घडते तेच मध्य प्रदेशातल्या बुवाच्या नादी लागून उध्वस्त झालेल्या या महिला उद्योजकाचे आगाऊ दिलेले ना पैसे मिळाले ना कुठलेही काम त्या अमराठी भाजपा महिला नेत्याने या मराठी उद्योजक महिलेचे केले...

येथेही तिचे दुर्दैव संपलेले नव्हते. ना बुवांनी काम केले, ना त्या मलबार हिलवर राहणाऱ्या भाजपाच्या त्या महिला नेत्याने. मित्रांनो, या दोघांचीही नावे तुमच्या लक्षात आलेली आहेतच, कृपया तुम्ही या अशा मंडळींच्या नादी लागू नका, अन्यथा समस्यां राहिली दूर, वरून आणखी डोकेदुखी, असे तुमच्याही बाबतीत घडेल. फक्त ५ ऑकटोबर पर्यंत थांबा, वाट पहा, मला एका शुभ कार्यातून बाहेर पडू द्या, अशी आणखी पन्नास गंभीर प्रकरणे या बुवाच्या बाबतीत घडलेली, तुमच्यासमोर मांडली नाहीत आणि तीही नावानिशी तर मला हेमंत जोशी म्हणू नका, वाटल्यास नालायक म्हणा, हरामखोर म्हणा, रामरहीम म्हणा, नरेंद्र म्हणा, भय्यू महाराज म्हणा, वाट्टेल ते म्हणून मोकळे व्हा..

पुण्यातल्या त्या महिला उद्योजकाच्या बाबतीत या विकृत बुवाकडून आणखी एक घडलेला किस्सा तर अतिशय गंभीर आणि अंगावर काटा आणणारा आहे. पुढे थोड्याच दिवसात या तरुण सुस्वरूप श्रीमंत उद्योजिकेचे पती मरण पावले, पुढल्या केवळ पंधरा दिवसात मग या बाबांनी तिला मध्यप्रदेशातल्या आपल्या आश्रमात बोलावून घेतले. म्हणाले, जे घडले ते आता विसरून जा आणि माझ्या आश्रमातल्या या तरुणाशी तू लग्न कर, तुझे भले होईल.आग्रह धरून धरून सांगितले. विशेष म्हणजे त्या तरुणाने आधी त्याच आश्रमात येणाऱ्या एका भोळ्या देखण्या तरुणीशी लग्न केले आणि नंतर तिला सोडून दिले, घटस्फोट घेऊन त्या तरुणीचे आयुष्य उध्वस्त करून या बुवांचा हा नातेवाईक मोकळा झाला होता. हे असे बुवांनी सांगितल्यानंतर, हि नुकतीच विधवा झालेली तरुणी म्हणाली, अहो, माझे पती जाऊन केवळ पंधरा दिवस झाले आहेत, हे असे लगेचच करणे शक्य नाही, मला वेळ द्या, जरी आश्रमात मी येत असल्याने त्याच्याशी ओळख असली तरी मला नेमके समजावून घेतले पाहिजे, ज्याच्या सोबत मला माझ्या अपत्याला आयुष्य काढायचे आहे, नेमके हे महाशय योग्य आहेत का, पुढे तेच घडले, केवळ आश्रमात राहून टाइम पास करणाऱ्या या तरुणानेही तिला पुढल्या वर्षभरात आर्थिक लूट लूट लुटले, एक दिवस तिने याघडलेल्या आणि घडणार्या गंभीर बाबींवर बिचार केला, तो बुवा आणि त्याचा हा असा लफंगा लुच्चा परिवार, साऱ्यांपासून ती दूर झाली, आणि माझ्याकडे आली, हि सत्य कहाणी येथेच संपत नाही, पुढे काय घडले, थोड्याच दिवसात...
बुवाबाजी क्रमश: