Tuesday, 1 August 2017

दोन पुस्तके : पत्रकार हेमंत जोशी


दोन पुस्तके : पत्रकार हेमंत जोशी 


मीडिया मध्ये काम करणाऱ्यांची वैचारिक बांधिलकी अमुक एखाद्या राजकीय पक्षाशी नसावी असे मला वाटते किंवा ती असलीच तर अशा मंडळींनी जाहीर करावे कि त्यांच्या विचारांची लिखाणाची बांधिलकी अमुक एका राजकीय पक्षाशी आहे, पण असे फार कमी असतात जे सांगून टाकतात कि ते अमुक एका पक्षाच्या विचारांशी ते बांधलेले आहेत.ढोंग नसावे म्हणजे उद्या समजा पत्रकार प्रताप आसबे जर शरद पवारांच्या पक्षाशी बांधलेले असतील पण ते न सांगता माझी पत्रकारिता कशी धर्म निरपेक्ष ते सांगून मोकळे होत असतील तर हे असे ढोंग नक्कीच लाजिरवाणे असते, पत्रकारितेला काळिमा फासणारे असते, अर्थात येथे प्रताप आसबे हे उदाहरण म्हणून नाव घेतले, ते तसे असतीलच असे नाही. आपला बुवा असा कोणताही पक्ष नाही, कुठल्याही राजकीय पक्षाचा नक्कीच आमच्यावर पगडा नाही पण मी कडवा हिंदू आहे, हे मात्र नक्की आहे, मला हिंदुत्व आवडते याचा अर्थ मी मुस्लिम किंवा इतर धर्मियांची नफरत करतो असा काढू नका...

अलीकडे दोन पुस्तके माझ्या वाचण्यात आली, त्यातले एक पुस्तक आहे, संघाचे कट्टर विश्वास पाठक यांचे ' विश्वासमत ' ज्याचे त्यांनी एकाचवेळी चक्क दोन भाग त्यांनी काढले आहेत, छापले आहेत, लिहिले आहेत, प्रकाशित केले आहेत, विशेष म्हणजे विश्वास पाठक यांनी कधीही लपवून ठेवलेले नाही कि ते रा.स्व.संघ विचारांचे नाहीत म्हणून. त्यांचा हा प्रामाणिकपणा मनापासून भावतो कि ते आपल्या लिखाणातून किंवा वाहिन्यांवरून संघप्रती त्यांची कट्टर भावना ते लपवून अमुक एखादी भूमिका समाजासमोर मांडतात, अर्थात भाजपाचे ते अतिशय प्रभावी अभ्यासू बोलके बुद्धिमान प्रवक्ते असल्याने मोठ्या खुबीने ते आपले विचार कधी मांडतात तर कधी लिहून मोकळे होतात. ज्यांची नजर चौफेर आहे, या राज्यातील त्या सर्वांना विश्वास पथक हे चतुर नाव आता बऱ्यापैकी परिचयाचे झाले आहे. संघाच्या मुशीतून तयार झालेला हा कलंदर माणूस म्हणाल तर अलिप्त असतो म्हणाल तर साऱ्यांमध्ये वावरतही असतो, तेच, म्हणजे या विश्वास पाठक यांचे एखाद्या निष्णात जादूगारासारखे वागणे आणि वावरणे देखील सपुरावा सांगायचे झाल्यास विश्वास पाठक अतिशय नियमित मंत्रालयाच्या संपर्कात असतात, आठवड्यातले महत्वाचे दिवस तर ते जणू ठिय्या मांडून मंत्रालयात असतात पण त्यांचेही ते तसेच एखाद्या कट्टर संघ स्वयंसेवकासारखे वागणे, थोडक्यात निष्णात डॉक्टर जसे इंजेक्शन देतात तसे, म्हणजे असे डॉक्टर ढुंगणाला आरपार सुई तर टोचतात पण पता हि नही चलता...

काही माणसांचे वागणे मात्र इफेक्ट कमी पण आवाज अधिक करणारे असते, नियमित पाद मारणाऱ्या पुरुषासारखे. नियमित पाद मारणारे रात्री नकोसे वाटतात, येथे नाव सांगत नाही पण आमच्यातलेच एक पत्रकार महाशय संध्याकाळी वासरू गोठ्यात परतले नाही कि गाय जशी लागोपाठ हंबरडा फोडल्यासारखी हंबरते ते तसे पाद मारून मोकळे होतात,त्यांच्या या विचित्र आवाजाने मध्यरात्री लहान मुले आपल्या आईला आणि वयाने मोठे आपल्या बायकोला अधिक बिलगून आणि घाबरून मोकळे होतात. खोटे सांगत नाही. म्हणजे हा पत्रकार जर उद्या आफ्रिकेतल्या मसाईमारा जंगलात रात्रीच्या वेळी पादला तर त्या जंगलातले वाघ देखील सैरावैरा धावत सुटतील किंवा हत्तींचा कळप देखील 
बिथरून वाट मिळेल तिकडे पळत सुटेल...

विश्वास पाठक हे व्यक्तिमत्व मात्र एकदम हटके, आरडा ओरड करून ते आपले कार्यालय अजिबात दणाणून न सोडता दिवसभरातून मोठी समाजपयोगी कामे करून निर्णय घेऊन ते मोकळे होतात पण त्यांच्या शेजारी बसणाऱ्यालाही ते कळत नाही कि विश्वास पाठक दिवसभर मंत्रालयातल्या बावनकुळेंच्या कार्यालयात बसून काय करीत होते, विश्वासमत खंड एक आणि दोन तयार करून ते केव्हा मोकळे झाले हे म्हणे त्यांच्या बायकोलाही आत्ताआत्तापर्यंत माहित नव्हते. गमतीने सांगायचे झाल्यास अलीकडे पाटील आडनावाचे एक अधिकारी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या निरोप समारंभात भाषण करतांना एक गरोदर स्त्री अगदी इनोसंटली म्हणाली, पाटीलसाहेबांच्या सहवासात दिवस कसे गेले कळलेच नाही. विश्वास पाठक हे असेच, हाती घेतलेले मिशन ते केव्हा पूर्ण करून मोकळे होतात, शेजारच्या मित्राला देखील ती कल्पना नसते कारण पाठक यांचे वागणे आणि काम करण्याची पद्धत त्या तिरुपतीच्या न्हाव्यासारखी, हे न्हावी एकाचवेळी अनेकांची आधी अर्धवट भादरून ठेवतात मात्र अर्धवट भादरून ठेवलेल्या ग्राहकाच्या नंतर हे लक्षातही येत नाही त्याची अर्धवट केव्हा पूर्ण भादरल्या गेली. विश्वास पाठक एकाचवेळी अनेक ठिकाणी असतात, वावरतात, समोरच्याला उगाच शंका वाटत राहते, पाठकजी हाती घेतलेले मिशन पूर्ण करतील किंवा नाही, पण बघणार्याला तो एक भ्रम ठरतो किंवा असतो कारण पाठक यांचे सारे काही वेळेत पूर्ण होते आणि अपटुडेटही असते. युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर काही चांगली माणसे राज्याचे भले साधण्यासाठी पुढे सरसावलीत त्या कौस्तुभ धवसे किंवा श्रीकांत भारतीय यांच्यासारखी, विश्वास पाठक त्याच रांगेतले एक किंबहुना फार वरची पातळी गाठलेले, बरे वाटते, हे असे मंत्रालयात समोर दिसलेत कि, नकोसे वाटतात नेहमीचे तेच ते दलाल बघतांना पुण्यातल्या त्या बेरक्या ढवळे सारखे...
क्रमश:

No comments:

Post a comment