Thursday, 31 August 2017

बुवाबाजी : पत्रकार हेमंत जोशी


बुवाबाजी : पत्रकार हेमंत जोशी 
ज्या वेगाने बुवा बाबा महाराज तुरुंगात चालले आहेत म्हणजे आसाराम गेले, राम रहीम गेले, उद्या शासनाच्या आणि लोकांच्या मनात आले तर अनिरुद्ध बापू, नरेंद्र महाराज, भय्यू महाराज असे अनेक जातील मग आस्था वाहिनीचे, सिधा प्रसारण जेल से ही होगा...

अनिरुद्ध बापू उच्चशिक्षित आहेत, डॉक्टर आहेत, त्यामुळे नेमके काय करावे काय करू नये कुठे पुढे जावे कुठे मागे यावे कुठे थांबावे त्यांना तंतोतंत कळते, अलिकडल्या चार दोन वर्षात बुवा बाबा चले जाव, चळवळीला जोर आल्याने या अनिरुद्ध बापूने आपले मांडलेले दुकान आणि थोतांड बऱ्यापैकी मागे घेतले, अन्यथा चळवळीतल्या लोकांनी ठरविले होते, बापूंचा गणपती बाप्पा मोरया करायचाच. अमुक एखादा बुवा बाबा नकळत अज्ञानातून जमलेल्या भक्तांना कितीपट उल्लू बनवू शकतो त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अनिरुद्ध बापू, त्याने आपल्या भक्तांवर अशी काही जादूची कांडी फिरविली होती कि पूर्वी कसे एका पाठोपाठ ज्युबिली सिनेमे देणारा राजेंद्रकुमार वास्तविक दिलीपकुमारच्या अभिनयाची हुबेहूब नक्कल करणारा, पण पुढे पुढे तो दर्शकांच्या गळ्यातला असा काही ताईत झाला कि दर्शकांना वाटू लागले होते, दिलीपकुमारच त्या राजेंद्रकुमारची नक्कल करतो. बापूंच्या बाबतीत नेमके तेच घडले म्हणजे त्यांच्या भक्तांना पुढे पुढे असे वाटू लागले होते बापू हे शिर्डीच्या साईबाबांचे अवतार नसून शिर्डीचे साईबाबा हेच बापूंचे अवतार आहेत. उल्लू बनविणारा तेवढ्या ताकदीचा पाहिजे, मग असे भोळे भक्त या बुवा बापू महाराजांना परमेश्वराचा अवतार नव्हे साक्षात परमेश्वर मानून मोकळे होतात...

मला अशा पुरुषांची मनापासून कीव येते कीव यासाठी करावीशी वाटते कि ते आपल्या घरातल्या तरण्या आणि सुंदर स्त्रियांना या अशा बुवा महाराजांच्या दरबारी कुठलाही विचार न करता पाठवून मोकळे होतात, नंतर पश्चाताप करून उपयोग नसतो, मुकाट्याने झालेला अत्याचार आणि झालेली फसवणूक सहन करावी लागते. तो बापू किमान उच्च शिक्षित असल्याने भेटणाऱ्याशी विविध विषयांवर डिबेट तरी करण्याच्या लायकीचा आहे, अर्थात लायकी असूनही आपल्या बुवाबाजीवर आमच्यासारख्यांशी डिबेट करण्याची त्याची हिम्मत होत नाही तो भाग वेगळा पण नरेंद्र किंवा भय्यू तर तेथेही कमी पडतात कारण नरेंद्र तर एकदम अडाणी जेमतेम शिकलेला आहे आणि भय्यू महाराज आपण स्वतः काय बोलतो, त्यांचेच त्यांना काळात नाही, मार्केटिंग फंडा मात्र या साऱ्यांचा एवढा जबरदस्त कि राम रहीम यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालणार्या या अशा तद्दन बदमाश बुवांच्या पायाला जेव्हा या देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती स्पर्श करून मोकळे होतात, अंगाची अशावेळी रागाने लाही लाही होते...

अलीकडे गौरी ब्रम्हे नामें माझ्या एका फेस बुक फ्रेंड ने पोस्ट केलेला एक किस्सा दाद द्यावा असा किंवा डोळ्यात अंजन घालणारा. ती लिहिते, ' कराडला आमच्या शेजारी पाटील आडनावाचे कुटुंब राहायचे. त्यांच्या पूर्ण कुटुंबावर नरेंद्रमहाराजांची कृपा होती. त्यांच्यावर या नरेंद्रमहाराजांचा एवढा पगडा होता कि त्यांनी बंगल्याचे आणि नातवाचेही नाव नरेंद्र ठेवले होते. एके रात्री या महाराजांचे बिंग फुटले आणि काय आश्चर्य पुढल्या एक दोन दिवसात, पाटलांनी अक्षरांमधला सु काढला, बंगल्याचे आणि नातवाचे नव्याने नामकरण करून सुरेंद्र ठेवले..." 

मी तुम्हाला नेहमीच सांगत आलोय कि मला या असल्या बुवा बाबांची कधीही भीती वाटत नाही, भीती वाटते ती त्यांच्या भक्तांची. ते त्यांना देव मानतात, आणि कोणत्याही भक्ताला आपल्या देवाचा झालेला अपमान सहन होत नाही, मी समजा गणपती भक्त असेल आणि उद्या जर गणपतीची एखाद्याने टिंगल टवाळी केली तर....तेच या बुवा बाबांच्या नदी लागलेल्या अजाण आणि अज्ञानी भक्तांचे, मोठे कठीण असे काम असते त्यांना यांच्या मगर मिठीतुन सोडविण्याचे...प्राध्यापक राजा आकाश यांनी एके ठिकाणी फार छान लिहून ठेवले आहे, ' एखाद्या व्यक्तीला असलेल्या चिंता, अडचणी, दुःख सुरुवातीला तो आपल्या जवळच्या लोकांशी, मित्रांशी, कुटुंबाशी शेअर करतो पण ते त्याला या 
समस्यांमधून कसे बाहेर पडायचे, हे सांगायला असमर्थ ठरतात. शिवाय एखाद्याचे रडगाणे वारंवार ऐकून घ्यायला कुणाला आवडत देखील नाही. त्यातून त्या व्यक्तीची हतबलता वाढते व तो मार्ग शोधू लागतो. बुवा, बाबांच्या मार्केटिंगमुळे त्याच्या सहज जाळ्यात अडकतो. ' आकाश म्हणतात तेच शंभर टक्के सत्य आहे. येणारे किंवा आलेले नैराश्य या अशा भंपक बिलंदर बदमाश बुवा मंडळींकडे व्यक्त न करता, उलट कोणतीही लाज न बाळगता जर आपण मानसोपचार तज्ज्ञांचा वेळीच सल्ला घेतला तर नालायक बुवा मंडळींकडून होणारी फसवणूक सहज टाळता येते. अत्यंत महत्वाचे म्हणजे अलीकडे यांच्यातल्याच एका भामट्या बुवाच्या मुलीला बापाच्या विविध विकृत कृत्यातून नैराश्य आल्यानंतर तिने सरळ मानसोपचार तद्न्य असलेल्या माझ्या एका मित्राला गाठले, त्याच्याकडून उपचार करवून घेतले, मार्गदर्शन घेतले, आज ती सुखी आहे, जे तिने केले ते तसे आपणही करायला हवे...
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Tuesday, 29 August 2017

What a day it was yesterday...

What a day it was yesterday...

For the first time since 1987, my house was welcoming Goddess Gauri with the help of mobile torches. Nearby stores where I managed to reach for basic necessities in waist height water were sold out on candles...Mumbai was lashed with rains rumours, and how!

I particularly live in one of the plush areas of the city, but to experience electricity failure for such a long (6 hours to be precise), was my first experience too..My kids who are born in the YOYO generation didn't believe in hand-fans or newspaper fanning.They demanded to be shifted to a nearby 5 star hotel or were even ready to sleep in the car with the air-condition on...I think I need to make my kids more grounded & "indian" from now on...Will make sure to prepare at least my kids to face the harsh realities of life every now & then looking the direction we are headed to.. 

Admits all the chaos & mood swings of family members,one look on the face of Maa Gauri we all forgot the hardships & the pain we faced to welcome them....My mother and wife did the unimaginable from fulfilling the smallest requirement to getting up today at 4am today to make the food (It's a tradition) .

I was frivolous to know my fellow journalists condition in the trains, especially the women. The self claiming people's party Shivsena or even the BJP, Congress or for the matter of fact any politician or party-men, no one except a few enthusiasts were to be seen on the roads for helping people. The ones who were of help were not Hindus, Marathas, Muslims or Christians...They were true Mumbaikars, like you & me...

One of my friend who was fetching her two toddlers along with her driver from a nearby school couldn't even cross a stretch of 5 kms. The traffic constables (hats off to them) had closed the roads due to clogging & she decided to go to a nearby hotel to stay the night...The arrogant receptionist refused to budge to give the room as my friend did not carry her ID...Thought of running to the hotel and just slapping him left right & centre. But good sense prevailed & my friend managed to find a tiny ID in her purse and was checked-in. Have promised her to take the matter to the management...

The Western & Eastern Express highways were as usual, a nightmare...To cross a distance of 2 kms my friends were stuck for an unimaginable 5 hours in their cars. But those who were at home were making merry by spending time with their beloved, but yet expressing their anger on Social Media..

For me the worst was people arriving at the airports. For the ones whose flights were cancelled, they had already checked-in at all the nearby hotels...But the ones who arrived late in the night were stranded at the airports..There were no taxis or rickshaws and the private operators refused to switch on their numbers...I last reported CM about passengers sitting on conveyor belts as even the lounges & sofas of the plush airport were occupied for which he replied "trying something"...

But 3 cheers to every Mumbaikar/Temple/Organisation who opened his heart & doors to everyone..Even to put up a message on social media about his/her location and asking nearby people to contact them, meant a lot..Some of them even welcomed the pets...Meanwhile if no one knows, CM Fadnavis personally took control of the situation till early morning today from the DG when rest of his MLA's & corporator's slept...

Now from today every channel & paper will be absuing & bashing the administration & politicians & the ones who are responsible for a day like this yesterday ...with that we should not forget that nature also played its evil role yesterday ...In a house of 1000 sq. only 3 to 5 people can use the facilities & amenities, if I insert 50 people in that space, there will be only MADNESS...Such is our Mumbai...The town planners & the administration ...wake up!!

One true Mumbaikar,

Vikrant Joshi

Monday, 28 August 2017

राऊतांचे सामनायन : पत्रकार हेमंत जोशी


राऊतांचे सामनायन : पत्रकार हेमंत जोशी 
संजय राऊत उद्या कोणालाही काहीही म्हणून मोकळे होतील, त्यांच्या हाती लेखणीही आहे आणि वृत्तपत्र देखील..जैन मुनींना ते देशद्रोही झाकीर नाईक म्हणून मोकळे झाले, उद्या ते खुश होऊन डहाळे यांना डोहाळे म्हणतील, मित्रवर्य शरद पवारांना संत तुकारामाची उपमा देऊन मोकळे होतील, आशिष शेलार यांना सुशांत शेलार किंवा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना संत गोरा कुंभाराची उपमा देतील.उद्या ते पत्रकार अनिकेत जोशी यास आधुनिक दारासिंग ठरवून मोकळे होतील आणि राज्यमंत्री संजय राठोड यास म्हणतील, केवढा सुकलास रे...

एक मान्य कि शिवसेनेची, थेट उद्धव ठाकरे यांची चारही बाजूंनी राजकीय कोंडी भाजपा करते आहे पण सेनेसारखा आक्रमक आणि सतत मराठी माणसांसाठी झगडणारा प्रादेशिक पक्ष, अन्य कुठल्याही राजकीय पक्षाची कितीही मोठी लाट आली तरी संपणारा नाही पण उठता बसता सेनानेते या असल्या उथळ बोलण्यातून किंवा लिखाणातून स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेऊ लागले तर मात्र सेनेचे खाली येणे, कदाचित इतिहास जमा होणे सहज शक्य होऊ शकते...

एखाद्या जैन मुनीने संताप व्यक्त करणे म्हणजे मानसी नाईक या अभिनेत्रीने अभिनयही करण्यासारखे किंवा प्रशासकीय अधिकारी किरण कुरुंदकर यांनी नोकरी सोडून चार्ली चॅप्लिनच्या भूमिकेत शिरण्यासारखे किंवा निखिल वागळे यांनी दररोज सकाळी संघ शाखेवर जाण्यासारखे पण हे असे घडले आहे, जैन मुनी सूर्यासागरजी देखील संजय राऊत आणि शिवसेनेवर आग आग ओकले आहेत, एरवी मिच्छामी डुक्कडम म्हणणारे म्हणजे काही चुकीचे घडले असेल तर माफ करा म्हणणारे सारेच्या सारे जैन संजय राऊत यांच्यावर कमालीचे चिडले आहेत, राज्याच्या दृष्टीने केवळ एका क्षुल्लक ठरलेल्या मीरा भायंदर पालिका निवडणुकीत यश मिळाले नाही किंवा ते मनी आणि मुनींच्या भरवशावर भाजपा ने तुमच्यापासून यश खेचून नेले म्हणून एखाद्या मुनीला तुम्ही थेट पाकिस्थानी विचारांच्या झाकीर नाईक याच्या म्हणजे देशद्रोहाच्या रांगेत आणून ठेवता, त्यामुळे हे घडले एरवी तोंडाला पट्टी बांधून रस्त्याने फिरणारे जाईन मुनी देखील आग ओकून मोकळे झाले, जहाल स्टेटमेंट देऊन त्यांनी राऊतांचे वस्त्रहरण केले...

आम्ही जी संजय राऊत यांच्या संदर्भात व्हिडीओ क्लिप ऐकली आहे, विशेष म्हणजे त्यात सूर्यासागरजी चक्क मराठीत आगपाखड करून मोकळे झाले आहेत, अमुक एखाद्याची माय बहीण काढणे कसे असते, हे बघायचे ऐकायचे असेल तर दूर कुठेही जाणे नाही, सूर्यासागरजी तेवढे ऐका. अत्यंत महत्वाचा मुद्दा असा कि जैन मुनी यांनी संजय राऊत यांना अगदी उघड टार्गेट केल्यानंतर सेना नेते किंवा शिव सैनिकांच्या तोंडून निषेध करणारा ब्र शब्द बाहेर पडलेला नाही याचा सरळ अर्थ असा, राऊतांचे ते तसे वागणे आणि बोलणे शिवसेनेत कोणालाही रुचलेले दिसत नाही अगदी उद्धव ठाकरे यांना सुद्धा. यापुढे एरवी बऱ्यापैकी शिवसेनेला सहकार्य करणार जैन समाज पुन्हा एकदा आपल्याकडे खेचणे, सेनेला ते नक्की जड जाईल, हि काळ्या दगडावरची रेघ आहे...

जैन मुनी सूर्यासागरजी ज्या पद्धतीने संजय राऊतांना आडवे तिडवे घेऊन मोकळे 
झाले आहेत, ते ऐकण्यासारखे...
" संजय राऊत तु हे असे लिहून शिवसेनेला शवसेना करून मोकळा झाला आहेस. जैन मंदिरासमोर तुम्ही मास मटण शिजवून खाल्ले, अरे तुमच्यात ताकद असेल तर मशिदीसमोर डुक्कर शिजवून दाखवा. सर्वाधिक आयकर भरणारा जैन समाज आहे, तुम्हाला कुठे उखडून फेकू, सेनेला ते कळणार देखील नाही. बाळासाहेब स्वर्गातून तुमचे हे असे कृत्य बघून नक्की अस्वस्थ होत असतील, केव्हा मी एकदा खाली जातो आणि या अशा मंडळींना थोबाडात मारतो, हे त्या बाळासाहेबांना वाटत असेल. राऊत तुझी औकात आहे का, आम्हाला ठेचून काढण्याची, असेल तर पाठव त्या मंडळींना आमच्या कडे, गुटखा खाऊन राजकारण होत नसते...संजय राऊत नामक जोकरने जैन मुनींची जी झाकीर नाईक शी तुलना केली आहे, त्याचा मी निषेध करतो, तुम्ही आम्हाला छेडू नका, अन्यथा आम्ही तुम्हाला सोडणार नाही. या संजय राऊत ला कोण ओळखते? तू एक लहान माणूस आहे. अरे मूर्खांनो, तुम्हाला काय वाटते मुंबई तुझी आहे, अजिबात तुझी नाही. तुझ्या आईने तुला संजय संस्कार दिले नाहीत काय, एका मुनीला तू जोकर म्हणून मोकळा होतो, तुला कोणीही माफ करणार नाही. तंबाखू खाऊन कॅमेरासमोर येणारा संजय राऊत, आमच्या समोर तुझी गुंडागर्दी अजिबात चालणार नाही..." 

राजकीय कलह, भांडणे, कुरापती, झिगझिग, धुसफूस, बाचाबाची, टीका, बदनामी, भुणभुण, किरकिर राजकारण्यांना नवीन नसते, त्यांच्या पाचवीला पुजलेली असते, आलेले राजकीय संकट किंवा अपयश अतिशय नियोजनबद्ध म्हणजे आधी शांततेने नंतर तयारीनिशी आक्रमकतेने परतवून लावायचे असते, संजय राऊत तुमच्या या अपशब्दातून तुमची एकट्याची नव्हे तर अख्ख्या शिवसेनेची त्या जैन मुनींनी बिना पाण्याने भादरून ठेवलेली आहे आणि त्यांना प्रत्युत्तर देणे निदान या विषयावर तरी तुम्हाला अजिबात शक्य नाही किंवा तसा प्रयत्न देखील आपण करू नये, माणसे कणाकणांनी जोडायची असतात, माणामणांनी दूर फेकून द्यायची नसतात...
तूर्त एवढेच.

पत्रकार हेमंत जोशी 

Saturday, 26 August 2017

मुख्यमंत्र्यांचे मित्र २ : पत्रकार हेमंत जोशी


मुख्यमंत्र्यांचे मित्र २ : पत्रकार हेमंत जोशी 
आपला मित्र आणखी खूप खूप पुढे जावा त्याचे हात आज आभाळाला टेकले आहेत उद्या ते आकाशाला टेकावेत हीच मनीची सदिच्छा ठेवून मुख्यमंत्र्यांचे हे अतिशय जवळचे मित्र, बालमित्र श्रीयुत आल्हाद राजे स्वतःला त्यांच्यापासून चार हात दूर यासाठी ठेवतात कि आपल्या कुठल्याही वागण्याने, बोलण्याने त्यांना त्रास होऊ नये, त्यांच्या प्रगती मध्ये बाधा येऊ नये पण जेव्हा केव्हा ते दोघे एकमेकांना भेटतात, तो क्षण म्हणे बघण्यासारखा असतो, दोन मित्रांमधली खरी उत्स्फूर्तता त्यावेळी तेथे दिसते अन्यथा शायना एन सी किंवा प्रकाश मेहता यांच्या सारखे असे कितीतरी कि झालाय ना आपला मित्र या राज्याचा मुख्यमंत्री, मग लाटून घ्या जेवढे फायदे लाटून घेता येतील, त्यातून फडणवीस यांना जेवढे त्यांच्या विरोधकांपासून सावध राहावे लागत नाही तेवढी अधिक सावधगिरी त्यांना या अशा संधीसाधू स्वार्थी हलकट वृत्तीच्या सहकारी किंवा मित्रांपासून बाळगावी लागते....

अर्थात जे असे आल्हाद राजे यांच्यासारखे साधे सरळ भोळे सीधे साधे मित्र असतात त्यांची गणना त्यागात नव्हे तर येड्यात केली जाते, हा माणूस कसा मूर्ख आहे असे त्यास कधी तोंडावर सांगितल्या जाते तर कधी पाठीमागे अशांना हिणविल्या जाते, आल्हाद यांना हि अशी टीका अनेकदा सहनही करावी लागते पण तरीही मित्राच्या पोझिशनचा गैरफायदा घेणे निदान या जन्मी तरी मला शक्य नाही ते स्पष्ट सांगून मोकळे होतात, असे फार कमी असतात ज्यांना आल्हाद राजे यांच्या सारखे निरपेक्ष मनाचे मित्र लाभतात...

आपण ज्यांच्या निकट आहोत, ज्यांचे निकटवर्ती आहोत, त्यांचे आपल्यामुळे फायदा सोडा पण नुकसान होणार नाही याची वास्तविक प्रत्येक मोठ्या माणसाच्या जवळच्या नातलगांनी आप्तांनी मित्रांनी काळजी घ्यावी. हि अशी काळजी श्रीमान उद्धव ठाकरे यांचे एक निकटवर्ती सहकारी खासदार आणि सामना वृत्तपत्राचे दैनिकाचे संपादक श्रीमान संजय राऊत अजिबात का घेत नाहीत हे मला न पडलेले कोडे आहे आणि उद्धव हे देखील त्या जाहिरातीप्रमाणे, दाग अच्छे लागते है पद्धतीने कायम काही त्रासदायक मंडळींना किंवा ज्यांच्यामुळे अनेकदा मानसिक त्रास होतो अशा संजय राऊत यांच्या सारख्या मंडळींना खुले आम बिलगून चिपकून बसले आहेत, डोक्यावर घेऊन बसले 
आहेत, अर्थात आपल्या सूचनांना महत्व दिले जाईल असे अजिबात नसते, जी माणसे सेनेला त्रासदायक हानिकारक आहेत असे आपणास वाटते ते त्यांना वाटत नाही, अंतर्गत काही राजकीय किंवा भावनिक बाबी अशा असतात ज्यामुळे संजय राऊत हे बोट पुढे केल्यानंतर त्यावर फुंकर न मारता उलट कडकडून चावणार आहेत हे उद्धव यांना माहित असूनही ते आपले बोट प्रेमाने पुढे करतात, नक्की त्यात अनेक राजकीय भावनिक गुपिते दडलेली असतात...

अलीकडे सामना वृत्तपत्रातून जैन समाज किंवा जैन मुनी आणि मनी हा मीरा भायंदर महापालिका निवडणुकीनिमित्ते गाजलेला विषय असो, सामना वृत्तपत्रातून संजय राऊत यांनी घेतलेल्या कोणत्याही भूमिकेवर उद्धव नाराज झाले, कधी कानावर पडले नाही. राऊत लिहून मोकळे झाले कि मीरा भायंदर महापालिका निवडणुकीत भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी मनी आणि मुनीचा वापर करून सत्ता काबीज केली, त्यांच्या या लिखाणावर आक्षेपार्ह असे नक्कीच काही नाही, नसावे पण जे राऊत भाजपाकडे किंवा मेहता यांच्याकडे बोट दाखवून मोकळे झाले आहेत त्या राऊतांच्या माणसांनी विशेषतः आमदार प्रताप सरनाईक यांनी निवडून आणलेल्या २२ जागा केवळ तिळगुळ वाटून किंवा हातावर खाडी साखर ठेवून निवडून आणल्या आहेत असे राऊतांना सांगायचे असेल तर या पद्धतीला दुसऱ्याची ती रांड आणि आपली ती कीप, हे एखाद्या वेश्येच्या आईने केलेल्या स्टेटमेंट सारखे आहे. पार पडलेल्या मीरा भायंदर महापालिका निवडणुकीत प्रताप सरनाईक यांचा अक्षरश: बळीचा बकरा त्यांच्याच पक्षातल्या एकनाथ शिंदे यांनी केल्याचे हळूहळू बाहेर पडू लागले आहे. जो उठायचा सकाळी सकाळी पैसे घेण्या प्रताप सरनाईक यांना गाठून त्यांना सलाम ठोकून मोकळा व्हायचा, शिंदे यांनी या निवडणुकीत फारशी आर्थिक रसद पुरविली नाही उलट काही स्थानिक धनाढ्य मंडळींना या निवडणुकी निमित्ते सरनाईक यांना आर्थिक सहकार्य करायचेही होते पण त्यांना खुणेने ठाणे जिल्ह्यातील एका प्रभावी नेत्याने सांगून टाकले, गरज नाही, प्रताप यांच्या पाठी उभे राहण्याची, आणि हा सर्वाधिक प्रभावी नेता कोण, हे वेगळे सांगण्याची येथे आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. या निवडणुकीनिमित्ते सरनाईक यांची जी आर्थिक कोंडी झाली किंवा जो काय महाकाय खर्च झाला, आता म्हणे ते खाजगीत सांगताहेत कि भविष्यातल्या माझ्या एखाद्या स्वतःच्या निवडणुकीवरही यापुढे मला उभे राहणे शक्य होईल, वाटत नाही, त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना नेमके हेच हवे होते, म्हणजे सरनाईक आर्थिकदृष्ट्या डबघाईला यायला हवेत हे त्यांना मनोमन वाटत होते, तेच घडले. ठाणे जिल्ह्यात एकहाती शिवसेना ठेवणार्या एकनाथ शिंदे यांना पर्याय ठरवा म्हणून नक्कीच उद्धव ठाकरे यांचा प्रताप सरनाईकांवर वरदहस्त असतो पण जे अनंत तरे यांचे झाले तेच आता सरनाईक यांचे होते आहे, तरे त्या दिवंगत आनंद दिघे यांच्यासमोर टिकले नाहीत, कायम अडगळीत पडले, कदाचित हे असे नजीकच्या काळात प्रताप सरनाईक यांचेही होईल, राहून राहून वाटते...

असो, येथे विषय प्रताप सरनाईक किंवा त्यांचे पक्षांतर्गत विरोधक मंत्री एकनाथ शिंदे हा नाही, विषय मित्र सहकारी सखा हा असा आहे आणि उद्धव यांचे एक सहकारी खासदार आणि पत्रकार संजय राऊत अनेकदा कित्येकवेळा नको तेवढी चुकीची भूमिका घेऊन त्यांच्या नेत्याला किंवा शिवसेनेला कसे अडचणीत आणून सोडतात, हा आहे. मनीचा आधार पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेनेही घेतला म्हणजे तीन बोटे स्वतःकडे असतांना संजय राऊत यांनी सोडलेले टीकास्त्र विनाकारण डोकेदुखी ठरले. सारे जैन भाजपा संगे असे अजिबात नाही किंवा नव्हते, असे कित्येक होते जे आपल्या या जैन समाजाला निक्षून सांगायचे, शिवसेनेपासून दूर जाणे नको, पण आता नको ते घडले, सामनातले लिखाण जैन समाजाला अपमानित करून गेले, काहीतरी नक्कीच गंभीर घडले आहे...
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

मुख्यमंत्र्यांचे मित्र : पत्रकार हेमंत जोशी


मुख्यमंत्र्यांचे मित्र : पत्रकार हेमंत जोशी 
नेता आणि अभिनेता आदेश बांदेकर यांच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमात एक असे दृश्य असते जे वारंवार पाहायला मिळते. म्हणजे प्रेम विवाह करणाऱ्या जोडप्यांमध्ये त्यांचे सूत जुळवून आणणारी एक व्यक्ती असते मग तो भाऊ असतो, मित्र असतो, मैत्रीण असते, बहीण असते वगैरे वगैरे..माझीही मुख्यमंत्र्यांच्या त्या मित्राशी ओळख अशाच एका मध्यस्थामार्फत, मित्रामार्फत झाली. नागपुरात गेलो कि अनेकदा ज्यांच्याकडे मुक्काम करतो किंवा करावासा वाटतो त्या नानिवडेकर कुटुंबामुळे माझी त्या मुख्यमंत्र्यांच्या मित्राशी आधी ओळख झाली नंतर मैत्रीत रूपांतर झाले...

आपल्या आसपास अशी काही गोंडस गॉड हसतमुख लाघवी गुबगुबीत छोटीशी मुले असतात कि जो तो त्यांना लाडाने पटकन कडेवर उचलून घेतो, फडणवीस यांचे वागणे बोलणे दिसणे हे असेच त्या लहान लाघवी मुलांसारखे, देवेंद्र म्हणजे सुरुवातीपासूनच गॉड गुबगुबीत हसमुखलाल, त्यामुळे जो कोणी त्यांच्याकडे एकदा कटाक्ष टाकतो, हे हसमुखलाल मग एकदा का त्यांच्याकडे बघून हासलेत कि समोरचा मग तो कोणीही असो आपोआप देवेंद्रमय होतो, आणि असे या राज्यात, नागपुरात, नागपूर जिल्ह्यात, विदर्भात खूप खूप आहेत कि जे सांगत असतील मी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आहे, नागपुरात तर हातगाडीवर पोहे आणि तर्री विकणारा देखील सांगत असतो कि मी देवेंद्रच्या एकदम घरातलाआहे पण त्यात फारसा अर्थ नसतो, असे विनाकारण अनेकांना वाटत असते कि मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, हे असे शरद पवार यांच्याही बाबतीत नेहमी घडत आले आहे म्हणजे रस्त्याने फिरतांना तुम्हाला जागोजाग पायलीचे पन्नास असे आढळतील कि ते छाती ठोकून सांगतील, होय, मी पवारांच्या अगदी जवळचा आहे. अलीकडेच मी तुम्हाला सांगून टाकले आहे कि फडणवीस हे शरद पवार यांच्यापेक्षाही एकदम डेंजरस, सो ते साम्य येथे त्या दोघात आहेच कि ज्याला त्याला वाटत राहते कि आपण फडणवीस यांच्या जवळचे आहोत, वास्तविक हे असे वाटणे चुकीचे आहे, असते किंवा तो असतो केवळ त्यांचा भ्रम....

पण तो एकमेव असा माणूस आहे, मित्र आहे कि तो अगदी बालवयापासून म्हणजे पहिल्या वर्गापासून तर आजपर्यंत देवेंद्र यांचा बेंचमेट    असूनही किंवा कुटुंब सदस्य असूनही त्याला आम्ही कधी कुठेही सांगतांना बघितलेले नाही किंवा ऐकलेले नाही कि तो मुख्यमंत्र्यांच्या अतिशय जवळचा आहे, त्यांचा खर्या अर्थाने सखा आहे, जिवलगा आहे, किंवा तो हे उठता बसता सांगत सुटला नाही कि तो फडणवीसांना अतिशय जवळचा आहे, नाय नो नेव्हर आणि हे नाव आहे श्रीमान आल्हाद राजे. श्रीयुत आल्हाद आणि त्यांच्या पत्नी शीतल हे जोडपे देवेंद्र फडणवीस यांना अतिशय जवळचे कारण आल्हाद आणि देवेंद्र पहिल्या वर्गापासून तर साधारण बारावीपर्यंत वर्गात, शाळेत एका बेंचवर बसायचे आणि शाळा सुटल्यानंतर म्हणजे त्यांचे मार्ग वेगवेगळे झाल्यानंतरही ते एकमेकांशी पूर्वीचेच संबंध ठेवून आहेत, जपून आहेत, दोघांचे एकमेकांशी अतिशय सख्य आहे. विशेष म्हणजे हे फारच कमी लोकांना माहित आहे, असावे कि ते एकमेकांशी अति अति क्लोज आहेत, याचे श्रेय नक्की आल्हाद राजे यांनाच द्यायला हवे यासाठी कि त्यांनी कधीही आपल्या या सख्याच्या नावाचा साधा उल्लेख कधी केला नाही किंवा फडणवीस यांचे नाव कुठेही वापरले नाही...

जे देवेंद्रच्या बाबतीत तेच वागणे आल्हाद राजे यांचेही, माणूस त्याच्या व्यवसायात अतिशय मोठा, नामवंत पण अजूनही जमिनीवर, यशाची हवा अजिबात डोक्यात न गेलेला, साधे सरळ दिलदार आणि बोलके असे हे राजे आडनावाचे आडनावाला शोभणारे जोडपे पण वागणे ते तसेच, एकदम साधे त्यामुळे जोडल्या गेलेला माणूस आपोआप आल्हादमय होतो, त्यांच्याशी जवळीक निर्माण होते हे विशेष. आल्हाद राजे हे या देशातले नामवंत असे आर्किटेक्ट, मोठमोठाली स्टार हॉटेल्स बांधणे किंवा त्यांची अंतर्गत सजावट हे राजे यांच्या हाताचा मळ, पण आमचा हा मित्र गर्विष्ठ नाही, मैफिल जमली कि गप्पांमध्ये आकंठ बुडून जाणारा मस्तकलंदर. अलीकडे मी ते, हेमंत नानिवडेकर नागपुरात नानिवडेकर यांच्या घरी गप्पांमध्ये रंगलो होतो, रमलो होतो, बोलण्याच्या ओघात मी त्यांना विचारलेही कि असे अनेक आहेत जे तुमच्याएवढे त्या फडणवीसांशी क्लोज नसूनही त्यांचा फायदा गैरफायदा घेऊन मोकळे होतात, तुमचा तर त्यांच्यावर जवळचा जुना जाणता मित्र म्हणून हक्क आहे, पण तुम्ही कधीही असे काम केले नाही ज्यातून मुख्यमंत्र्यांच्या ओळखीचा तुम्हाला आर्थिक किंवा अन्य फायदा झाला किंवा तुम्ही तो करून घेतला, ते पटकन म्हणाले, एकतर मला या अशा पैशांची गरज नाही किंवा गरज असो अथवा नसो, आपण हे असे काही करून उंची गाठलेल्या आपल्याया मित्राला त्रास द्यावा असे मनातही कधी येत नाही, पण जेव्हा केव्हा मी आणि मुख्यमंत्री भेटतो, दोघांच्याही डोळ्यातले आनंदाश्रू लपता लपता नाहीत, संपता संपत नाहीत....
क्रमश:

Monday, 21 August 2017

मोपालवारांवर गोटे २ : पत्रकार हेमंत जोशी


मोपालवारांवर गोटे २ : पत्रकार हेमंत जोशी 
वर्हाडी भाषेत गोटे म्हणजे दगड. हा शब्द १९८६ मध्ये राज्यमंत्री असतांना येथे मुंबईच्या पत्रकारांसमोर डॉ. श्रीकांत जिचकार यांनी जेव्हा एका पत्रकार परिषदेत उच्चारला होता, पत्रकारांची त्यांच्यासमोरच हसून हसून मुरकुंडी वळली होती. सध्या हि गोटेफेक आमदार गोटे प्रशासकीय अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यावर करताहेत म्हणून या लेखमालेला मथळा दिला, मोपालवारांवर गोटे...

पुन्हा हेच सांगतो, मोपलवार आणि गोटे या दोघांच्या चाललेल्या घनघोर युद्धात,माझ्यासारख्यांना म्हणजे पत्रकारांनीही पडण्याची गरज नाही, जेव्हा अनिल गोटे राधेश्याम मोपालवारंवार आरोप करतात तेव्हा त्या आरोपांना पुराव्यांसहित उत्तर मोपालवारांनी तयार करून ठेवलेले असते. कारण मोपालवारांजवळ बसून त्यांचा विश्वास संपादन करून प्रसंगी त्यांच्या घरी प्रवेश मिळवून जी माणसे अनिल गोटे यांना ढीगभर पुरावे आणून देण्याचे काम करतात, त्याचवेळी अनिल गोटे यांच्या संपर्कात असलेले देखील, गोटे पुढे काय करणार आहेत, ह्याची मोपालवारांना माहिती देऊन मोकळे होताहेत. त्यामुळे जे घडते आहे ते फक्त दुरून बघावे, फारतर दोन अश्रू डोळ्यात आणून यासाठी मोकळे व्हावे कि काळा पैसे कसे अराजक निर्माण करतो. काल एक मित्र म्हणाला, हेमंत तू नेत्यांविरुद्ध, पत्रकारांविरुद्ध किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील नामवंतांविरुद्ध लढा देतो, भीती वाटत नाही पण जेव्हा केव्हा तुझी अतिशय सुप्त पद्धतीने या राज्यातल्या काही खतरनाक अधिकाऱ्यांविरुद्ध लढाई सुरु असते, संघर्ष सुरु असतो, भीती वाटते, हि माणसे तुझ्या जीवाचे काही बरे वाईट करतील म्हणून, मित्रहो, खरे आहे ते, पण मनातले सांगतो, हे असे वाईट अधिकारी जीवनातून उध्वस्त व्हावेत असे कधीही वाटत नाही उलट तुम्ही यातून बाहेर पडा किंवा त्यांनी या जीवघेण्या मिळकतीतून बाहेर पडावे म्हणून अक्षरश: जीवाचे रान करून मी त्यांच्या भेटीगाठी घेतो, त्यांना पोटतिडकीने समजावून सांगतो. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे, अलीकडे या काळ्या पैशांच्या लढाईतून एक अतिशय निंदनीय प्रकार घडतो आहे म्हणजे आपले बोलणे किंवा संभाषणाचे एकतर टेपिंग करून घेणे किंवा भेटीचे गुपचूप चित्रीकरण करून घेणे, हा प्रकार एवढी खतरनाक पत्रकारिता करून देखील एकदाही आम्ही उपयोगात आणलेला नाही, त्यामुळे हे कधी ध्यानीमनीही नसते कि आपले बोलणे किंवा संभाषण एखादा जतन करून ठेवणार आहे, अर्थात मला त्याची यासाठी भीती नसते कि एखाद्याला समजावून सांगतांना त्यात कुठलाही आर्थिक स्वार्थ नसतो, ब्लॅक मेलिंग करणे तर स्वप्नातही नसते, आमच्या आक्रमक पत्रकारितेला आमचे काही हितशत्रू आम्हाला ब्लॅक मेलर ठरविण्याचा प्रयत्न करतात, नंतर त्यांनाच पश्चाताप होतो कि असे हेमंत जोशी यांच्याबाबतीत काहीही नाही. कशासाठी दहशत किंवा दादागिरी किंवा ब्लॅक मेलिंग, चार चांगले मित्र पाठीशी उभे असलेत कि आपण आपोआप आर्थिक दृष्ट्या कणखरपणे उभे राहतो, असे मला याठिकाणी जर कोणी ब्लॅक मेल करत असेल तर त्यांना सांगणे आहे....

खरे आहे ते, इतर कोणाशीही पंगा घेतांना कधी भीती मनाला शिवत नाही अगदी खतरनाक गुंडांविरुद्ध लढतांना देखील कधी भीती वाटली नाही पण शासकीय किंवा शासनातल्या अधिकाऱ्यांविरुद्ध लढतांना त्याची पोहोच किती आणि कशी खतरनाक, याचा मी आधी बारकाईने अभ्यास करून ठेवतो, हे मात्र तितकेच खरे आहे. एक जुना किस्सा सांगतो, आत ते अधिकारी जिवंत नाहीत पण ते महाशय रामराव आदिक मंत्री असतांना त्यांच्या कार्यालयात होते, बाईलवेडे आणि भ्रष्ट देखील होते म्हणून मी एक दिवस त्यांच्याविरुद्ध लिहून मोकळा झालो, आश्चर्य म्हणजे मला त्यानंतर दोन तीन दिवसांनी एका गँगस्टरचा निरोप, त्यांच्याविरुद्ध लिखाण केले तर महागात पडेल, आधी मी ते ऐकून घेतले आणि तडक त्या अधिकाऱ्याला गाठले, म्हणालो, हरामखोरा, यानंतर जर हा प्रकार घडला तर थेट पत्रकार परिषद घेऊन मी मोकळा होईल आणि जे घडले ते आदिकांनाही सांगून मी मोकळा झालो, त्यानंतर अनेकदा त्या अधिकाऱ्यावर लिहिल्याने ते महाशय पुढे युती सरकार सत्तेत आल्यानंतर सहज शक्य असूनही ते कोणत्याही मंत्री आस्थापनेवर रुजू झाले नाहीत किंवा मी वारंवार लिहूनही कधी मला त्यांचा त्रास झाला नाही....

पत्रकारिता म्हणजे सतीचे वाण आहे, येथे तुमच्या बाबतीत काहीही घडू शकते, तुमची कोणतेही येणारे संकट झेलण्याची मानसिकता पाहिजे, ती आमच्या कुटुंबात आहे म्हणून आधी मी आमच्या बंधूंना पत्रकारितेत आणले नंतर पोटच्या पोराला. अलीकडे आमदार अनिल गोटे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन राधेश्याम मोपलवार आणि त्यांच्या कंपूविरुद्ध पुरावे त्याठिकाणी सादर केले, विशेष म्हणजे प्रिंट मीडियाने त्या गंभीर आरोपांची विशेष दाखल घेतली नाहीच पण वाहिन्यांनी तर हे प्रकरण हि परिषद पूर्णतः दुर्लक्षित केली. असे का घडले असावे, म्हणजे गोटे यांच्या पुराव्यांवर पत्रकारांचा विश्वास नाही कि हे पुरावे बाहेर पडू नयेत म्हणून गोटे ज्यांच्याविरुद्ध लढताहेत त्यांचे प्रयत्न कामाला आलेत, नेमके काय घडते आहे, घडले आहे, हेही समोर आले पाहिजे...

आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगतो, आपल्या या राज्यात भ्रष्ट मार्गाने पैसे मिळविण्याच्या शासनात दोन पद्धती ठरलेल्या आहेत त्यातली एक पद्धत अशी कि योजनामग ती कोणतीही असो, शासकीय फंड्स उपलब्ध झाले रे झाले कि त्या पैशांवर संबंधित साऱ्यांनी तुटून पडायचे आणि लुटून न्यायचे, गावित किंवा पाचपुते यांच्यासारखे नेते, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार या अशा पद्धतीचा स्वीकार करणारे, पैसे खाण्याची दुसरी पद्धत एकदम खतरनाक आहे पण फारसे नुकसान करणारी नाही त्याला मी टी. चंद्रशेखर पद्धत म्हणतो, म्हणजे अमुक एक योजना आखायची, अमलात देखील आणायची पण त्या योजनेमागे विशिष्ट हेतू ठेवून संबंधितांनी अलोट संपत्ती मिळवून मोकळे व्हायचे, फार डोके खाजवू नका, स्पष्ट सांगायचे झाल्यास समृद्धी महामार्गाचे उदाहरण देतो, हि योजना एकदम कडक, मोठा विकास त्यातून साधल्या जाणार आहे पण हा महामार्ग बांधतांना दोन ऐवजी जो दहा रुपये खर्च होणार आहे त्यातून अनेकांचे आर्थिक भले होणार आहे, विशेष म्हणजे हा महामार्ग सुरु होण्यापूर्वी अतिशय नियोजनपूर्वक अनेक अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी, दलालांनी या मार्गाच्या आड येणाऱ्या जमिनी विकत घेऊन ठेवलेल्या आहेत, विशेष म्हणजे हे सारे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील अंधारात ठेवून हे घडले आहे, त्यांना जेव्हा हे कळले, नक्की त्यांनी कपाळावर हात मारून घेतला असावा. 
पुढे यावर कधीतरी, आणखी बरेच काही...

पत्रकार हेमंत जोशी 

Sunday, 20 August 2017

मोपालवारांवर गोटे : पत्रकार हेमंत जोशी

मोपालवारांवर गोटे : पत्रकार हेमंत जोशी 
नक्की घडलेला किस्सा येथे सांगतो, तो एक शासकीय सेवेतला अधिकारी होता, जातीच्या भरवशावर आणि शासकीय नोकरीत मोक्याच्या जागेवर, पैशांनी आणि अधिकारांनी भराभर मोठा होत गेला, अशा मराठी माणसांच्या बाबतीत हमखास घडते तेच त्याच्याही बाबतीत घडले म्हणजे नोकरीत लागला तेव्हा तो जेमेतेम पदावर असल्याने त्याला मिळालेली बायकोही काहीशी खेडवळ पण उफाडी, गावरान मिरची होती, त्याकाळी तिचे इंग्रजीचे अर्धवट ज्ञान ऐकून खूप खूप हसायला यायचे, एकदा ती या नवऱ्याला म्हणाली, संध्यकाळी येतांना उन्दिर्स मारायचे औषध घेऊन या...नियम्स, परवडेबल,अचानकली असे मराठीतले अनेक इंग्रजी शब्द तिच्या बोलण्यातून अगदी सहज डोकवायचे...ह्याला या ना त्यानिमीत्ते कायम टूरवर जावे लागे.एकदा तो तिला म्हणाला, उद्यापासून ८/१० दिवस मी नाही, विदर्भात जातोय....त्यावर ती म्हणाली, हरकत नाही, मी पण विचार करतेय, कुठेतरी, एखाद्या नातेवाईकाकडे जाऊन येईन म्हणते..वास्तविक लागोपाठ सुटट्या होत्या म्हणून हे महाशय कार्यालयातल्या खास फटाकडीला घेऊन महाबळेश्वरला गेले, तीन चार दिवसांनी बायकोने फोन करून विचारले, कुठे आहेत, महाशय म्हणाले, अगं हे काय बसलोय काम काढून, पार वैतागलोय, खूप खूप थकलोय, तुझी आठवण येतेय, आणि हे तो बायकोला सांगतांना कुठल्याशा हॉटेलात बसून, त्या फटाकडीच्या केसांवर हात फिरवून फिरवून सांगत होता...आणि हो, तू कुठेय..महाशयांनी विचारले, क्षणाचाही विलंब न लावता, जिला तो गावरान, येडी, भोळी समजत होता, ती म्हणाली, हे काय तुमच्या चार टेबल सोडून मागे बसली आहे, आमच्या गावातला मांगीलाल बिनसाले मला घेऊन आलाय कि...

आणि हे अनेक घरातून खूप कॉमन दृश्य आहे. काळ्या पैशांची रेलचेल आली कि अनेकांच्या घरातून हे असे घडणे आपसूक येते, तू तुझी मजा मार, मी माझे बघतो, नवरा बायकोचे हे असे बिनधास्त वागणे अनेक घरातून घडते. बिनधास्त जीवनशैलीचा मोठा वाईट परिणाम पोटच्या मुला मुलींवर होतो, मात्र हे फार उशिरा त्या बिनधास्त जीवन शैली अंगिकारलेल्या आईवडिलांच्या लक्षात येते, तोपर्यंत त्यांची मुले मोठी होऊन त्यांच्या कितीतरी पावले पुढे गेलेली असतात, बिघडलेली असतात..अत्यंत महत्वाचे म्हणजे, आता आमची मुले मुली मोठी झालेली आहेत हे सांगून जेव्हा असे अर्धवट इंग्रजाळलेले मायबाप त्यांच्या मुलांना आपणहून न समजणाऱ्या पौंगडावस्थेतल्या वयात हमखास ड्रिंक ऑफर करतात किंवा पोटच्या लहान मुलांना घेऊन दारू पार्ट्यांना जातात, असे घर हमखास बिघडले आहे हे नक्की, अशा कुटुंबांचे बारा वाजायला वाजायला पुढले काही वर्षे पुरेशे ठरतात...

मला अतिशय राग येतो अशा मंडळींचा, जे विनाकारण नाकाने कांदे सोलतात, विशेषतः पुढारी, पत्रकार, सरकारी अधिकारी, मंत्री, आमदार, खासदार हे असे पदोपदी आढळतात, मी मात्र अशा मंडळींना अगदी ठरवून टार्गेट करतो, स्वतःची नसलेली आदर्श इमेज निर्माण करून लोकांना वरून ज्ञानाचे डोस पाजता काय, थोडे थांबा, बघा तुम्ही नेमके कसे, लोकांना सांगून मोकळे होतो, हे असे मी अनेकदा अनेकांच्या बाबतीत मनातल्या मनात म्हणतो, आणि अगदी ठरवून त्यांची लफडी लोकांना सांगून, लिहून मोकळा होतो. मला आता तो जुना झालेला विषय येथे पुन्हा उगाळायचा नाही पण आम्ही मीडिया पर्सन जेव्हा केव्हा प्रशासकीय अधिकारी असलेल्या जयराज फाटकांना भेटत असू, बाप बाप, हा माणूस आपण कसे साधे आणि सरळ, सांगून सांगून आम्हाला बेजार करीत असे, हे महाशय म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली, पद्धतीचे आहेत, आम्हाला, अनेकांना ते ठाऊक होते त्यामुळे जेव्हा त्यांची लफडी बाहेर आलीत, मीडियाने त्यांना असा काही धुतला, तुम्हाला ते आठवतच असेल. अर्थात असे अनेक जयराज  फाटक, किरण कुरुंदकर विविध क्षेत्रात आहेत म्हणजे पुढारी आहेत, पत्रकार आहेत, मंत्री आहेत, समाजसेवक आहेत शासकीय अधिकारी आहेत जे नाकाने कांदे सोलतात, उगाच सभयतेचा आव आणतात, तोंडात विष्ठा असते पण श्रीखंड चघळतोय सांगतात म्हणजे त्यांची वृत्ती हमखास भ्रष्ट असते, त्यामुळे हे असे दुसर्या सांगे ब्रम्हज्ञान, पद्धतीचे मोठी धेंडे अलगद जाळ्यात अडकण्याची मी वाट पाहत असतो, एकदा का अशांची परफेक्ट माहिती जमा झाली कि मग मात्र त्यांचा धोबीघाट करतोच करतो...

प्रशासकीय अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याविषयी मला यापुढे अधिक काही लिहावे वाटत नाही कारण त्यांचे कट्टर दुश्मन आमदार अनिल गोटे यांनी जे काय त्यांच्याविषयी शोधून काढले आहे, अद्याप बाहेर आलेले ते केवळ हिमनगाचे एक टोक आहे, ते दोघे एकमेकांशी टक्कर घ्यायला समर्थ आहेत, मी त्यांच्यासमोर फार लहान माणूस आहे म्हणून मध्ये न पडलेले बरे, किंवा न लिहिलेले बरे. मोपलवार चुकले म्हटल्यापेक्षा ते काही लोकांसमोर झुकले नाहीत म्हणून गोटे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अनेकांनी मोपालवारंवार चाप ओढला आहे, ओढता आहेत, हि वस्तुस्थिती आहे पण कुरुन्दकरांसारखे जे अनेक मोपालवारांच्या ताकदीवर आर्थिक दृष्ट्या मोठे झाले, त्यातले बहुतेक सारे, जणू आम्ही मोपलवार यांना ओळखतच नाही, पद्धतीने वागू लागले आहेत, त्यांना एकटे पडण्याचा मोठा प्रयत्न सुरु आहे, आम्हाला माफीचे साक्षीदार करा, असे त्यांच्या वरिष्ठांना सांगू लागले आहेत, आमचा समृद्धी महामार्गावर व्यापलेल्या जमिनींशी काडीचाही संबंध नाही असे जर उद्या कल्याणकर यांच्यासारखे अधिकारी सांगून मोकळे होऊ लागले तर हसावे कि रडावे, असे त्यातल्या आमच्यासारख्या जाणकारांना म्हणावे लागेल. एमएसआरडीसी मध्ये मोपलवार यांच्या पाठोपाठ कुरुंदकर यांच्यासारखे त्यांचे जे पाठीराखे तेथे पोस्टिंग घेऊन मोकळे झाले होते हे असे जेव्हा आता बदली करवून घेण्याची भाषा वापरू लागले आहेत, बघून ऐकून हसायला येते, बदली झाली म्हणजे लफड्यांमधून सुटका होणार आहे, अशी कदाचित त्यांची भोळी समजूत असावी. मित्रहो, पळ काढू पाहणाऱ्या मंडळींना सोडून कसे चालेल, हि लढाई आम्ही मेलो तरी आम्हाला लढावीच लागेल, एवढेच याठिकाणी सांगतो...
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Thursday, 17 August 2017

मनातली खदखद : पत्रकार हेमंत जोशी

मनातली खदखद : पत्रकार हेमंत जोशी 
श्रावणातला प्रसन्न सोमवार...
नवरा बायको दोघेही सत्यनारायणाच्या 
पूजेला बसलेले..
गुरुजी म्हणाले हाताला हात लावा, 
प्रेमाने हात लावत बायकोने अगदी गंमतीने 
सहज म्हणून विचारले, 
आरती आठवते का...? 
हो...खालच्या मजल्यावर राहायची, 
ती गॅलरीत आली रे आली कि मी वरून एकटक 
तिच्या.....
कारण ओढणी हा शब्द देखील तिला 
ठाऊक नव्हता...
का, काय झाले तिचे....? 
....
....
....
....
पूजे आधीच प्रसाद...!!
...
...
सत्यनारायण पूजेनंतर...
तुला प्रसाद आवडतो का,
नवऱ्याने विचारले.
समोरच्या गोखल्यांचा ना..
हो, आजही आवडतो, 
आणि आधीही..
त्याचे त्याच आरतीशी जमले, 
आणि मिस्टर टकलोबा,
माझ्या खडूस बापाने तुमच्याशी 
लावून दिले...!! 
बायको म्हणाली...

फार कमी जोडपी अशी असतात, ज्यांना आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत वाटत राहते कि त्यांचे एकमेकांशी नुकतेच लग्न झालेले आहे. बहुतेकांचे वर सांगितलेल्या चुटक्याप्रमाणे वाद असतात, वाद होत राहतात, सतत एकमेकांकडे एकतर संशयाने किंवा खुन्नस ठेवून एखादा शत्रू असल्यासारखे असंख्य जोडपे एकमेकांकडे पाहतात, संसार पार विस्कटलेला असतो...

येथे अतिशय वेगळ्या विषयावर मला काही सांगायचे आहे. जे तुमच्या आमच्या सर्वांच्या घरात हमखास घडते, नेमके तेच तुम्हाला सांगायचे आहे. मनातली खदखद, मळमळ, तळमळ तुमच्याकडे व्यक्त करायची आहे. विक्रांत आणि विनीत, माझी दोन्ही मुले दोन टोकाची, मोठा धाडसी, छोटा शांत, मोठ्याच्या मनातले पटकन कळते, विनीतच्या मनातले समजावून घ्यावे लागते. दोन्ही मुले स्वभावात दोन टोकाची, असामान्य, त्यामुळे येथपर्यंत व्यवसाय, पत्रकारिता आणि त्या दोघांनाही सांभाळतांना माझी झालेली ओढाताण, कुत्तरओढ मलाच ठाऊक, दोघांचाही ते विशिष्ट वय पार करेपर्यंत त्यांचे पाय घसरू नये, नको ते नाद व्यसने त्यांना लागू नयेत, त्याजकडे लक्ष देता देता मोठी कसरत करावी लागली. पण त्याचा नको तेवढा परिणाम झाला असा कि, त्या दोघांचे लग्न ठरवितांना, म्हणजे मला ठाऊक असूनही त्यांना सहजच विचारले, तुमचे कुठे काही असेल तर सांगा, म्हणजे पुढले पाऊल उचलता येईल. तुमचे लग्न तुम्ही पसंत केलेल्या मुलीशी रीतसर लावून देता येईल मात्र त्यावर ते दोघेही नाही म्हणाले आणि मी कपाळाला हात लावून घेतला कारण अलीकडे स्थळं बघून जोडी जमविणे, मोठ्या जिकरीचे काम, मात्र ११-१२ वर्षांपूर्वी विक्रांतला जे पहिलेच स्थळ सांगून आले, आम्ही पसंत केले आणि उरकून टाकले, पसंती माझी होती, डोळ्यात तेल घालून मी सारे बघितले आणि स्थळ पसंत केले, कारण मनासारखी पत्नी मिळाली नाही तर ज्याचे मन हळवे असते त्याला आयुष्यभर किती जबर किंमत मोजावी लागते, मी आमच्या घरातून अनुभवले होते, टच वुड, विक्रांत किंवा आमच्यावर गेल्या दहा बारा वर्षात पश्चातापाची वेळ आली नाही...

विनीतच्या बाबतीत देखील तेच घडले, तो देश परदेशातून ज्या महाविद्यालयातून शिकला, विक्रांतप्रमाणे तेथेही सुंदर आणि श्रीमंत मुलींचा अक्षरश: खच पडलेला, नंतर तो ज्या व्यवसायात आला आहे, तेथे देखील सुंदर आणि श्रीमंत मुलींचा सतत भरणा, पण त्यानेही तेच सांगितले, नो अफेअर, तुम्ही पसंत कराल तिथे मी लग्न करून मोकळा होईल, पुन्हा कपाळावर हात, यावेळी मात्र मी त्याचे रीतसर मुंबई आणि पुण्यातल्या त्या दोन ब्राम्हण महिलांकडून चालविल्या जाणाऱ्या प्रसिद्ध विवाह मंडळात नाव नोंदविले, आणखीही दोन ठिकाणी त्याचे नाव नोंदविले होते, पण अनुभव अतिशय वाईट, थोडक्यात आपण जाहिरातींना भुलून अमुक एखाद्या विवाह मंडळात नाव नोंदवून मोकळे होतो पण भरमसाठ पैसे मोजूनही होते ती फसवणूक, तुम्ही सावध असावे, म्हणून येथे हे मुद्दाम नमूद केले आहे, कदाचित मी या अशा विवाह मंडळांवर काही दिवसात फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करायला कमी करणार नाही...

शेवटी मी माझ्या दांडेकर आणि कुलकर्णी आडनावे उद्योगपती मित्रांना विचारले, नाव कुठे नोंदवायला हवे, त्यांनी मग एका प्रसिद्ध अमराठी विवाह मंडळाचे नाव सांगितले, जेथे त्या दोघांचे जमले होते, मीही नाव नोंदविल्यानंतर पुढल्या केवळ महिन्याभरात त्या विवाह मंडळाने आमची नेमकी पसंती लक्षात घेऊन जी विविध जगभरातली स्थळे आमच्यासमोर मांडलीत, त्यावर कौतुक करावे तेवढे कमी, विशेष म्हणजे त्या अमराठी विवाह मंडळातला स्टाफ ज्या पद्धतीने फॉलो अप घ्यायचा ते तर आणखी खास होते, पैसे भरल्याचे समाधान वाटले कारण विवाह मंडळांचे पिक आलेले आहे आणि ते मोठी रक्कम प्रसंगी सामान्य कुटुंबांकडूनही वसूल करून मोकळे होतात पण हवी ती सेवा देताना करतात ती केवळ शुद्ध फसवणूक...

या अमराठी विवाह मंडळातून दरदिवशी अतिशय चांगली स्थळे येत होती पण माझी मोठी सून मुंबईतली, इच्छा होती नव्याने येणारी सून आमच्या विदर्भातली असावी, त्यांनी तेही काम माझ्यासाठी केले आणि मनासारखे स्थळ लगेच महिनाभरात चालून आले, जमलेही. वाचकहो, तुम्ही मात्र एक काम करा, हल्ली लग्न ठरवून करणे मोठ्या जिकिरीचे काम, तुमच्या मुलांना आता पासूनच सांगा, तुम्ही तुमचे ठरवून मोकळे व्हा रे बाबानू...

अर्थात, माझ्या मुलांच्या वैवाहिक आयुष्याचे मातेरे होऊ नये असे मला मनापासून वाटत होतेम्हणून मी डोळ्यात तेल घालून होतो कारण पती असो किंवा पत्नी, त्यातले एक कोणीही बिलंदर भांडखोर हलकट हेकट निघाले कि आपल्या आयुष्याचे मोठे नुकसान होते, तुमच्याकडे 
कदाचित सगळे असते किंवा येते पण नसते ते सुखी वैवाहिक जीवन, ज्यामुळे तुम्ही भोगता ते फक्त आणि फक्त नर्कमय आयुष्य, अशावेळी तुमच्या डोळ्यातले आसवे थांबत नाहीत, ज्यांचे मन कठोर असते ते मात्र घटस्फोट घेऊन मोकळे होतात, पण ज्यांचे मन आपल्या मुलांमध्ये अडकलेले असते ते पोटच्या मुलांच्या सुखासाठी मग आयुष्यभर हे असे नर्कमय जीवन जगणे वेचणे पसंत करतात, त्यात मुले पुढे चांगली निघालेत तर ठीक, अन्यथा डोळ्यात असतात दाटतात ते केवळ दुख्खाश्रू...

पुरुष किंवा स्त्री, यापैकी कोणाच्याही वाटायला दुष्ट किंवा व्यसनी वृत्तीचे जोडीदार यायला नकोत, थोडक्यात जोडायला जोडा हवा, त्यावर डोळ्यात तेल घालून लग्न करतांना निर्णय घ्या. चांगला जोडीदार वाट्याला येणे हे मला वाटते मागच्या जन्मीचे पुण्य असेल तरच घडत असेल, जेथे नवरा बायकोत समन्वय नाही, एकमेकांना समजावून घेण्याची मानसिकता नाही किंवा पोटच्या मुलांसाठी त्याग कारण्याची वृत्ती नाही ते घर असते केवळ एक सांगाडा...

Wednesday, 16 August 2017

चोरावर मोर २ : पत्रकार हेमंत जोशी


चोरावर मोर २ : पत्रकार  हेमंत जोशी 
अलीकडे कुठेतरी वाचण्यात आले कि आम्ही पुरुष स्त्रियांच्या बाबतीत नेहमी यासाठी गोंधळतो कि त्यांना नेमके काय म्हणायचे आहे हेच समजत नाही,जसे, बायका नेहमी म्हणतात कि पुरुष मूर्ख आहेत पण बायका हेदेखील म्हणतात कि, आम्ही पुरुषांपेक्षा काही कमी नाही. थोडक्यात जो तो दुसऱ्याकडे बोट दाखवून मोकळा होतो पण त्याचवेळी उरलेली तिन्ही बोटे स्वतःकडे आहेत, हे आपण नेहमी विसरतो. अलीकडे फेसबुक व्हाट्सअप वरून भाजपा नेते श्री किरीट सोमय्या यांना अगदी घालून पाडून हेच खिजवल्या जाते आहे कि विरोधकांच्या भानगडी चव्हाट्यावर आणणारे, भुजबळांसारख्या नेत्यांना थेट खाडी फोडायला पाठवणारे सोमय्या आता कुठे लपून बसले आहेत? किंवा सोमय्या कुठे हरवले आहेत ? महाराष्ट्र युती सरकारचे नवनवीन घोटाळे बाहेर येत असतांनाही जनसामान्यांसाठी सदैव झटणारे घोटाळ्यांच्या विरोधात सदैव आवाज उठवणारे भाजपाचे धडाडीचे नेते सोमय्या हरवले आहेत त्यांच्याबद्दल माहिती देणार्यास किंवा त्यांना शोधून देणार्यास योग्य ते इनाम दिले जाईल...प्रिय किरीट तुला विनंती आहे कि जिथे असशील तिथून परत ये, तुला कोणी काही बोलणार नाही, अरे वेड्या आपलेच सरकार आहे, आणि मतदार तर मूर्खच आहेत, प्रकाश मेहता, वगैरे आपलीच माणसे आहेत, तू जसे भुजबळांविरुद्ध ओरडत होता तसाच प्रकाश मेहता विरुद्ध ओरडलंस तर तुला फडणवीस, मोदी कोणीही काहीही बोलणार नाहीत, तेव्हा घरी ये हं किरीट बाळा, इथे सध्या सरकारच्या घोटाळ्यांविरोधात बोलण्यासाठी तुझी फार गरज आहे रे सोन्या, लवकर ये...तुझेच, अखिल भारतीय स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून संघटना...इत्यादी इत्यादी...

हे असे उद्वेगातून सोमय्या यांच्या विषयी छापून येणे लिहून येणे अपेक्षित होते, आहे, पण एकटे सोमाय्य्याच का, सारेच नेते यापद्धतीचे कि ते स्वतःचे झाकून ठेवतात आणि दुसऱ्यांवर अगदी बिनधास्त शिंतोडे उडवून मोकळे होतात, एवढे कि त्यांना हेही भान नसते कि जे आरोप आपण विरोधकांवर करतो ते मुळात आपलेच पाप आहे, अनेक उदाहरणे त्यावर देता येतील जसे पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात अजित पवार मनोरा आमदार निवासात आमदार सतीश पाटील यांच्या खोलीत कोसळल्या छताचा तुकडा घेऊन सभागृहात आले, युती सरकारवर टीका करून मोकळे झाले पण ते हे विसरले कि हे सारे त्यांच्या किंवा त्यांच्या काकांच्या काळातलेच पाप आहे, मुळात आघाडीच्या काळात बांधल्या गेलेले मनोरा आमदार निवास इमारतीचे बांधकाम दर्जाहीन झालेले असतांना त्यावर कधीही पवार साहेबांनी आवाज उठवल्याचे ऐकिवात नाही, विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे गेल्या वीस वर्षात या इमरतीच्या देखभालीवर जो खर्च करण्यात किंवा दाखविण्यात आलेला आहे, त्या खर्चातून मनोरा पेक्षा अधिक दर्जेदार इमारती बांधता आल्या असत्या, महत्वाचे म्हणजे मनोरा आमदार निवासावर या तिन्ही इमारतींशी संबंधित विविध पदावरील बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी जो खर्च दाखविला आहे, त्यातील २५ टक्के एवढी रक्कम जरी आघाडीच्या काळात या अभियंत्यांनी त्यावर खर्च केली असती तरी आज हि इमारत मोडकळीस आली नसती पण जातीपातीच्या राजकारणात आकंठ बुडालेले या बांधकाम खात्यातले भ्रष्ट अभियंते अजिबात आमदारांनाही न घाबरता पैसे खाऊन मोकळे झाले, मोकळे होताहेत, ना त्यांना आमदारांची भीती, ना जनाची लाज ना मनाची...

www.offtherecordonline.com
www.vikrantjoshi.com

एखाद्या आमदाराने चुकून आवाज उठवलाच तर त्याला आर्थिक रसद पुरवून शांत करायचे आणि आहे ते धंदे सुरु ठेवायचे हेच येथल्या मोनोपली असलेल्या म्हणजे वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी केले आणि ते पाप नेमके सतीश पाटलांच्याच डोक्यावर पडता पडता राहिले. नेमके हेच गेली तीन वर्षे मी जीव तोडून तोडून या खात्याच्या मंत्र्याला म्हणजे श्री चंद्रकांत पाटलांना खाजगीत ओरडून ओरडून सांगतो कि दादा, अहो तुमचे ते नितीन गडकरी जे जगभर त्यांच्या कामातून गाजताहेत ना, ते याच बांधकाम खात्यात आगळी कामगिरी करवून दाखविल्याने, फडणवीस सरकार देखील चंद्रकांत दादा यांच्यामुळे अधिकाधिक देशभर नामवंत ठरले असते जर पाटील यांनी गडकरी यांचे अनुकरण केले असते, दुर्दैवाने ते घडले नाही आणि आता वेळ निघून गेली आहे, पुढल्या विधान सभा निवडणुकीला जेमतेम दोन वर्षे उरले आहेत. चंद्रकांत पाटील वाईट आहेत असे मी म्हणणार नाही पण विविध खात्यांच्या फाफट पसाऱ्यात दादा अडकले आणि बांधकाम खात्याचे यावेळीही मातेरे झाले. थोडक्यात, हमाम मे ये सब नंगे है, फक्त आघाडीचे मंत्री दरोडेखोर ठरले असतील तर युतीचे महाचोर, हाच काय तो फरक, पैसाच साऱ्यांना हवा आहे, प्रगती गेली खड्ड्यात, त्यामुळे किरीट सोमय्या यांना येथे मी अजिबात दोष देणार नाही याउलट किरीट सोमय्या यांच्यासारखे खानपाटीस बसणारे, गैरव्यवहार बाहेर काढणारे नेते या राज्याची गरज आहे, त्यांना देखील स्वतःचे राजकीय भवितव्य टिकवून ठेवायचे असते त्यामुळे सोमय्या किंवा तत्सम नेते आपल्या पक्षातल्या भानगडींवर मूग गिळून बसणे स्वाभाविक आहे, त्यात त्यांची अजिबात चूक नाही....

आज एवढेच सांगतो, दरदिवशी जे घडते आहे ते बघून सांगतो, ज्यांनी खाल्ले किंवा ज्यांना खायचे आहे त्यांना आणखी खाऊ द्या, फक्त ते मोदी पुढले दहा वर्षे आणखी जिवंत राहायला हवे आणि सत्तेत राहायला हवेत, ते जे सांगताहेत कि ना खाऊंगा ना खाणे दूंगा, तेच सत्य आहे, या देशातल्या प्रत्येक भ्रष्ट माणसाच्या भोवतालीचा फास मोदी घट्ट आवळून मोकळे होताहेत, त्यातून तुमची आमची कोणाचीही सुटका नाही, ज्यांनी वाममार्गाने कमावले त्यांना नजीकच्या काळात नक्की गमवावे लागणार आहे आणि तेच त्रिवार सत्य आहे....

मित्रहो, खाणारे खूप आहेत, ओरडणारे कमी आहेत, ओरडणारेही भ्रष्ट असतील तरी एकवेळ चालेल पण प्रत्येक पक्षात ओरडणारे हवेतच, अन्यथा खाणारे आणखी मस्तवाल होतील आणि हे राज्य अधिकाधिक पोखरले जाईल. आपण किंवा आम्ही सारेच खाणारे पण ओरडणारेही, आमच्या साऱ्यांच्या वृत्तीत आता हे काठोकाठ असे भरले आहे कि खायचे असेल तर आधी किंवा सतत ओरडायचे असते म्हणजे खायला सहज मिळते, मी देखील त्यातलाच एक, आम्ही साsssssssरे खवय्ये....!!

पत्रकार हेमंत जोशी 


Tuesday, 15 August 2017

चोरावर मोर : पत्रकार हेमंत जोशी


चोरावर मोर : पत्रकार हेमंत जोशी 

अलीकडे अचानक शाळेत पाठ केलेल्या अनेक म्हणी आठवल्या, मी नाही त्यातली कडी लावा आतली, लोकांसंगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण, स्वतःचे ठेवावे झाकून दुसऱ्याचे पाहावे वाकून, स्वतःची खरकटी दुसऱ्याची धुवायला निघाला, अशा अनेक म्हणी आठवल्या, निमित्त होते भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचे अलीकडे मूग गिळून बसणं किंवा हाताची घडी आणि तोंडात बोळा, पद्धतीने वागणे त्यांच्या या गुमान बसण्यावर अनेक अतिशय तिखट प्रतिक्रियाही प्रसिद्धी माध्यमातून उमटल्या आहेत, हेच कि भाजपा आणि सेना मंत्र्यांवर जे पुराव्याला धरून आरोप होताहेत, या प्रकारावर सोमय्या एखाद्या जादूगारासारखे कुठे गायब आहेत...

अशावेळी आम्ही जे करतो ते सोमय्या यांनीही करायला हवे किंवा यापूर्वीच करायला हवे होते, माझ्याकडे देखील दरदिवशी भ्रष्टाचाराची, व्यभिचाराची विविध प्रकाराने येऊन पडतात, त्या सर्वांवर लिहिणे शक्य नसते, भ्रष्टाचाराची कीड एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागलेली आहे कि आपल्या भोवताली वावरणारे शेकडा ९०% माणसे हमखास भ्रष्ट लबाड हलकट राज्यबुडवे असतात, त्या साऱ्यांविरुद्ध लेखणी उपसणे शक्य नसते अशावेळी मी एक करतो, ज्यांच्याविरुद्ध गंभीर पुरावे हाती पडतात, त्यांना प्रत्यक्ष भेटून सांगतो, अगदी कडक शब्दात सांगतो, असे वागू नका, या पद्धतीच्या चुका टाळा, एक दोन तीन वेळा सांगूनही जर ते तसेच वागत राहिले तर मात्र एकतर मी स्वतः लिहून मोकळा होतो किंवा ज्यांच्या लिहिण्याने समाज ढवळून निघतो किंवा माहितीचा अधिकार वापरणारे जे शिस्तीचे आहेत, तोड्या करणारे नाहीत अशा मित्रांना ते पुरावे देऊन मोकळा होतो. अगदी अलीकडे मी विनोद तावडेंना भेटून सांगितले कि शार्दूल नावाचा एक भामटा पोलिसांच्या संरक्षणात आणि तुमच्या नावाचे व्हिसीटींग कार्ड वापरून, तुमचे, मुख्यमंत्री कार्यालयातील एका बड्या हस्तीचे नाव वापरून लोकांना आर्थिक फसवून मोकळा होतो, आता हे असे मी फारतर आणखी चार दोन वेळा तावडे यांना सांगून मोकळा होईल पण हा शार्दूल किंवा असे शार्दूल जर सतत त्यांच्या नावाने दुकान उघडून बसले असतील तर मन कठोर ठेवून आणि व्यक्तिगत संबंध बाजूला ठेवून पत्रकारितेचा बडगा उगारणे गरजेचे आवश्यक असते, सतत मुलाहिजा ठेवता येत नाही....

प्रकाश मेहतांच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेकदा हतबल ठरले आहेत. आज जे तुम्ही बोंबा मारून मोकळे होताहेत कि दस्तुरखुद्द प्रकाश मेहता बांधकाम व्यावसायिक असतांना त्यांच्याकडे फडणवीस यांनी गृहनिर्माण खाते का म्हणून दिले म्हणजे चोराच्या हाती तिजोरीच्या किल्ल्या का सोपविल्या, तुम्हाला असे वाटते का कि आपणहून फडणवीस यांनी ते सोपविले असेल, नो, असे त्यावेळी अजिबात घडले नाही, प्रकाश मेहता किंवा चंद्रकांत पाटलांकडे कोणती खाती सोपवायची हे अतिशय स्पष्ट शब्दात त्यांच्या अध्यक्षांनी म्हणजे अमित शाह यांनी सूचना दिल्याने चोराच्या हाती किल्ल्या म्हणजे प्रकाश मेहता यांना गृहनिर्माण खाते आणि रायगडचे पालकमंत्री पद सोपविणे फडणवीसांना भाग पडले....

आणखी एक गम्मत सांगतो, जेव्हा तडकाफडकी ठाण्याच्या जिल्हाधिकारी पदावरून कडक शिस्तीच्या अश्विनी जोशी यांना हटवून तेथे अत्यंत वादग्रस्त अशा डॉ. महेंद्र कल्याणकर यांना बसविले गेले, मला कळले कि हे काम मुख्यमंत्री दरबारी ठाण मांडून प्रकाश मेहता यांनी करवून घेतले, त्यांना त्यात अर्थमंत्र्यांनी म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांनी साथ दिल्याचे समजले, मेहता मुळातच हलकट माणूस त्याच्याशी भांडून उपयोगाचे ठरले नसते पण फडणवीस आणि मुनगंटीवार या दोन सुसंस्कारी पारदर्शी नेत्यांशी मात्र मी कडाकडा भांडलो, मुनगंटीवार म्हणाले, मेहतांचा आग्रह होता आणि कल्याणकर नावाची डोकेदुखी मला चंद्रपुरात ठेवायची नव्हती, म्हणून मी मेहतांच्या आग्रहावर री ओढली. एखाद्या जिल्हाधिकाऱ्यावर मी थेट आरोप तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याची चड्डी आतून केवढी आणि किती फाटकी मला तंतोतंत माहित असते, अन्यथा प्रशासकीय अधिकारी हे पद तसे आमच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेले आहे पण जेव्हा या पदाचा अतिरेक करणारे समोर येतात तेव्हा असे शंभर कल्याणकर समोर लढायला आलेत तरी भीती वाटत नाही. जरा मला उसंत मिळू द्या, ठाणे जिल्हाधिकारी म्हणून कल्याणकर यांनी करून ठेवलेले प्रताप, नक्की मांडून एक दिवस मोकळा होईल....

आता एक गम्मत बघा फडणवीस मंत्री मंडळातली, जसे प्रकाश मेहता बांधकाम व्यवसायिक असतांना त्यांना गृहनिर्माण खाते देण्यात आले तेच नागपुरातल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाबतीतही घडले, ते देखील मंत्री होण्यापूर्वी वीज महामंडळातले बडे कंत्राटदार होते पण मंत्री झाल्यानंतर मेहता यांनी आपल्या खात्याचा जो दुरुपयोग करून स्वतःला आणि सरकारला खड्ड्यात घातले ते बावनकुळे यांच्या बाबतीत अजिबात घडलेले नाही उलट वीज खाते नेमके कसे, तेथले कोण साव आणि कोण चोर, बांधकाम खात्याचा कारभार बावनकुळे यांना तंतोतंत माहित असल्याने ते मंत्री झाल्यावर मेहतांसारखे भ्रष्ट आणि हलकट ठरले नाहीत उलट ते ठरले आहेत वीज खात्यातल्या बदमाशांचे कर्दनकाळ. ज्या पद्धतीने बावनकुळे या खात्यातील बदमाश मंडळींना उभे आडवे घेतात बघून कधी कधी वाटते एखादा तेथे काम करणारा जागच्या जागी मुतून मोकळा व्हावयाचा. मी सांगतो, जसे अमित शाह यांच्या सांगण्यावरून त्या प्रकाश मेहता यांना मुख्यमंत्र्यांनी अनिच्छेने गृहनिर्माण खाते सोपविले होते तेच या बावनकुळे यांच्या बाबतीतही घडले होते म्हणजे नितीन गडकरी यांच्या आग्रहावरून मोठ्या अनिच्छेने मुख्यमंत्र्यांनी बावनकुळे यांना आधी मंत्री केले वरून वीज खाते दिले पण पुढल्या काही दिवसातच फडणवीस यासाठी खुश झालेत कि बावनकुळे हे नागपूरचे पालकमंत्री आणि वीज खात्याचे मंत्री म्हणून त्यांच्या मंत्रिमंडळातले अतिशय यशस्वी मंत्री म्हणून पुढे आले, खरी गम्मत पुढे आहे जेव्हा एकनाथ खडसे मंत्री म्हणून पायउतार झाले त्यानंतर त्यांच्याकडले अतिशय वादग्रस्त ठरलेले उत्पादन शुल्क खाते मुख्यमंत्र्यांनी आपणहून बावनकुळे यांच्याकडे सोपविले, विशेष म्हणजे बावनकुळे मुख्यमंत्र्यांना म्हणाले, भाऊ, हे खाते वठणीवर आणायचे असेल तर आयुक्त म्हणून मला तुकाराम मुंडे यांच्यासारखा अधिकारी द्या, फडणवीसांनी आपल्या या बेधडक मंत्र्यांचे आधी कौतुक केले आणि तातडीने महा धडकेबाज अश्विनी जोशी यांची त्याठिकाणी नियुक्ती केली. महत्वाचे म्हणजे एकनाथ खडसे यांचे मंत्रिपद ज्या चार दोन गंभीर कारणांनी गेले त्यात उत्पादन शुल्क हेही एक खाते होते, स्वतः अमित शाह यांनी अतिशय तातडीने मुख्यमंत्र्यांना सांगतिले होते कि खडसे यांच्याकडले हे राज्य उत्पादन खाते त्वरित काढून घ्या पण ती वेळ आली नाही, पुढल्याच काही दिवसात खडसे यांना भूखंड घोटाळ्यावरून घरी जावे लागले....

मला वाटते, मंत्री होण्यापूर्वी ज्या खात्याचा अमुक एखाद्याला अनुभव असतो त्याजकडे तमुक एक खाते सोपवायला हरकत नसावी पण आपली म्हणजे भारतीयांची मानसिकता अतिशय भ्रष्ट असल्याने आपण अनुभवाचा दुरुपयोग करतो म्हणजे शिक्षण सम्राट पतंगराव कदम यांच्याकडे जेव्हा शिक्षण खात्याची जबाबदारी येते त्यानंतर ते राज्याचे नव्हे तर स्वतःच्या शैक्षणिक संस्थांचे भले करून मोकळे होतात...
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Sunday, 13 August 2017

संजय चौपाने : पत्रकार हेमंत जोशी


संजय चौपाने : पत्रकार हेमंत जोशी 

मी तुम्हाला नेहमीच सांगत आलोय कि माझ्यात आणि गाव न्हाव्यात फारसा फरक नाही, गावातले सारे जसे एकमेव न्हाव्याकडे केस कर्तनाला येतात तेच माझेही, अख्य्या राज्यातून राजकीय वर्तुळात वावरणारे मुंबईत मला अधून मधून भेटून जातात, मग ते कुठल्याही राजकीय पक्षातले असलेत तरी, संजय चौपाने त्यातलाच एक मित्र होता...काल म्हणजे १३ ऑगस्टला त्याचे औरंगाबादजवळ अचानक दुर्दैवी निधन झाले. मृत्यू आला कि तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही, संजयला देखील धडधाकट अगडबंब ताकदवान फॉर्च्युनर वाचवू शकली नाही...

रविवारी संजय गेला, तत्पूर्वी म्हणजे फारतर बुधवारी मी अधिवेशन सुरु होते म्हणून विधान भवनात गेलो होतो, मित्रवर्य आणि विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरेंच्या दालनात सहजच त्यांना भेटायला गेलो, सारे जेवत होते, माणिकरावांच्या ती नेहमीची पद्धत आहे, अधिवेशन काळात ते केबिन मध्ये येतील त्या साऱ्यांना जेवायला घालतात, मी भेटायला गेलो तेव्हा माणिकरावांसहित काही मंडळी तेथे जेवत बसली होती, संजय चौपानेही होता, माझा तसा तो जुना मित्र, ऐन तारुण्यात तो दिवाळी अंक काढणार्या त्याच्या आईसंगे म्हणजे 
तिचे बोट पकडून यायचा तेव्हापासून माझी त्याच्याशी ओळख आणि मैत्री देखील, तसा तो यवतमाळचा म्हणजे विदर्भातला त्यामुळे खायला आणि गप्पा मारायला एकदम मोकळा ढाकळा, हळू हळू तो काँग्रेस पक्षात आणि ठाण्यात रुळला आणि अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसमय झाला, एवढा कि त्याचा मृत्यू देखील काँग्रेसची सेवा करतांनाच झाला, पक्षाने त्याला अविरत सेवा करूनही कधीच फारसे काही दिले नाही पण तरीही त्याने कधीच काँग्रेस सोडली नाही, मिळालेल्या मिळणाऱ्या पक्ष संघटनेतल्या पदावर तो आनंद मानायचा...

संजय मंत्रालयात किंवा त्याच्या पक्ष कार्यालयात भेटला कि तेवढ्यापुरत्या गप्पा व्हायच्या पण लिखाणात एखादा राजकीय संदर्भ लागला कि त्याला फोन करणे व्हायचे मग तो मनसोक्त माहिती देऊन मोकळा व्हायचा. पर्वा माणिकरावांकडे तो जेवतांना भेटल्यानंतर मी त्याला गमतीने म्हणालोही,संजय केवढा रे अगडबंब वाढला आहेस, पुढले किमान सहा महिने तरी जेवू नकोस, आणि तो नेहमीप्रमाणे खळखळून हसला...

आज त्याच्या अपघाती निधनाची बातमी कानावर आली, हसतमुख आणि गप्पिष्ट संजयचे हे असे अचानक निघून जाणे, डोळ्याच्या कडा आपोआप ओल्या झाल्या. देवा येथे काँग्रेस ने अजिबात त्याच्यासाठी काही केले नाही वर तुझ्याजवळ आलाय तर किमान तिथे तरी त्याचे भले कर...

मनापासून श्रद्धांजली..!!

Sunday, 6 August 2017

OFF THE RECORD review on some of todays headlines....

Reshuffle on cards?
Apparently the much talked about news is here. Whenever there is nothing, we journalists have reshuffle news to feed you...So if the grapevine exists, so does our moral duty to tell you whats happening in the corridors of power... The base of the reshuffle as far as I know, if it does, will surely be based only on the performance of the Ministers so far. A lot of people in the current Ministry will be shown the door, claim experts & sources. 

As far as performance is the criteria,without a doubt the first one to get an axe will be MoS Vidya Thakur...Apart from her husband Jayprakash no one else worked in her Ministry. Jayprakash made his money whilst the FDA charge was with his wife in brokering various hearings. Last heard he even left behind a Congress scion son who had this charge briefly in the Cong-NCP government.  It was  Jayprakash who actually controlled the Ministry. 

Second in line would surely be corrupt Prakash Mehta who has left no stone unturned to embarrass Fadnavis on more than one occasion in the current ongoing Assembly session. He has left the ball in Fadnavis's court but Devendra ji might just hit it out of the park...As of now, for me Mehta is a goner!

The performances of Rajkumar Badole, Pandurang Phundkar, Babanrao Lonikar,  Raje Ambrishrao Raje Satyawan's & Pravin Pote  are also not up to the expectations of the CM. They might be shown the door or change in portfolios is also indicated. 

On the other hand, in the ShivSena, Dr. Deepak Sawant & Subhash Desai are the ones whose future as Ministers, will be in the dark. Sources present at a meeting conveyed by party chief Uddhav Thackrey of the MLAs before the assembly session began, many of them have openly showed their displeasure for these two in particular. 

Well, admist of all this, luck may finally swing in favour of Advocate Ashish Shelar who is looking for a birth in the cabinet since 2014. He, but no one in the BJP, is better equipped with all the laws & nitigrities of the housing department or even UD due to his experience in the BMC after Fadnavis. Ashish Shelar might face resistance from the current Mumbai gang of "senior" Raj Purohit, Yogesh Sagar & Atul Bhatkalkar. Believe me, Shelar is way above these people in terms of performance...I don't know why, whatever little I have read, understood & learnt about Sharad Pawar in my 8 years of Journalism only 1 leader comes very close as to whom do I see next Sharad Pawar in...it is Ashish Shelar...He is defiantly Sharad Pawar of the BJP...(in all sense)...But the recent lobbying of him with the LAd's & Darekar's have certainly made his relationship a bit sour with the CM & the party workers say people close to him...But fortune favours the brave ! 

Underrated & low profile Minister Sambhaji Patil Nilangekar might be given PWD (earlier Chandrashekhar Bawankule wanted it desperately but Gadkari was not in favour) or even considered for the post of State President-BJP.. Danve due to his super performance in the ZP & council elections  (yes as a party BJP has flourished right ?) may see his birth in Narendra Modi's cabinet soon or be given a responsibility at the National level in the party. Khadse's comeback is surely postponed. Madan Yerawar might be elevated to the cabinet level given his relationship with Fadnavis & Gadkari both...

Vishnu Savra is on the edge...Due to his caste & background he might be given a chance to prove his mettle again...OFF THE RECORD he is a good man, but his son Hemant & one of the staff's of his   are the real black sheep in the getting Savra's name tarnished...

Now the question comes, there should be another lady in the Ministry if CM decides to send Vidya Thakur home...Who will it be? Surely not Manda Mhatre (import category)..will it be Devyani Farande, Sangita Thomre or will it be a surprise to see Dr. Bharti Lavekar as Minister of State?  She will surely have to thank Vinayak Mete for this one ....

Vikrant Hemant Joshi