Sunday, 2 July 2017

फेसबुक तुम्ही आणि आम्ही ४ : पत्रकार हेमंत जोशी


फेसबुक तुम्ही आणि आम्ही ४ : पत्रकार हेमंत जोशी 
मी जे आधीच्या लिखाणात सांगितले त्यासंदर्भात नेमके मलाहेच तुम्हाला सुचवायचे होते कि शासनात किती परस्पर विरोधी विचारांचे अधिकारी असतात, प्रशासकीय अधिकारी असतात. एक अधिकारी ज्याला काळ्या कमाईला अजिबात शिवायचे नाही, नव्हते आणि दुसरे ते प्रभाकर देशमुख, ज्यांनी निवृत्तीच्या शेवटच्या क्षणापर्यंत या राज्याला ओरबाडले, लुटले, लुबाडले. वाईट पवारांच्या वृत्तीचे वाटले कि त्यांनी एखाद्या आयुष्यभर भ्रष्ट कमाई न करणाऱ्या वयाच्या केवळ ३५-३६ व्या वर्षी प्रशासकीय सेवेतून बाहेर पडून अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना 
निर्माण करणाऱ्या अविनाश धर्माधिकारी यांच्यासारख्या देशभक्त व्यक्तीला, तत्सम अधिकाऱ्यांना राजकारणात येण्याचे आवाहन केले असते तर पवारांना जनतेने पुन्हा एकदा डोक्यावर घेतले असते पण पवार सुधारणे अशक्य, त्यांनी आणखी एका करप्ट निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्याला अजितदादांच्या शेजारी आणून बसविण्याचे ठरविले. दुर्दैव हेच कि या राज्यात, या देशात भ्रष्टाचारविरोधी वारे जोरात वाहत असतांना पवारांसारखे म्हातारे निवृत्त व्हायचे नावही घेत नाहीत...शी...!! 

असो, पुढल्या लिखाणाला हात घालतो...
सदाशिव पेठेत फळे विकणारा मोहम्मद इदेच्या दुसरे दिवशी आपल्या दहाही मुलांना सारस बागेत फिरायला न्यायचे म्हणून बस मध्ये चढला, बस सुटायला अवकाश होता, मुलांच्या मस्त्या, गोंगाट सुरु, मोहम्मद फार वैतागला होता, तेवढ्यात सदुकाका गोखलेही काठीचा ठक ठक आवाज काढीत बसमध्ये शिरले....काका, काठीला खालून रबर लावून घेतले असते तर ठक ठक आवाज आला नसता, कानांना केवढा त्रास होतो, मोहम्मद खवचटपणे गोखल्यांना म्हणाला...सदुकाकांनी आधी शांतपणे जागा पकडली, हसणाऱ्या प्रवाशांकडे कटाक्ष टाकीत ते शांतपणे म्हणाले, अरे मोहम्मद...हेच तू केले असते तर...म्हणजे योग्य वेळी योग्य जागी तूच रबर वापरले असते तर आज हे एवढे तुला वैतागावे लागले नसते...!! चल, हम दुसरी बस पकडेंगे, मोहम्मद बायकोला म्हणाला आणि खाली उतरला...

हसलात ना मित्रहो, हसायलाच पाहिजे. हसत हसतच जगायला पाहिजे. अलीकडे मी तुम्हाला म्हणालोही होतो कि आमच्या एका पत्रकार मित्राने माझ्या तोंडात शेण घातले होते, म्हणाला उठसुठ तुम्ही फक्त टीका तेवढी करता, कधीकधी चांगलेही लिहीत चला, मला ते पटले म्हणून माझ्या तिन्ही फेसबुक अकाउंटवर जे विविध वैविध्यतेने नटलेले मित्र आहेत, त्यांच्यावर टप्प्याटप्प्याने लिहायचे ठरविले आहे....

अत्यंत महत्वाचे म्हणजे फेसबुक फ्रेंड्स सारेच जवळून ओळखीचे असतात असे नाही, पण हेमंत जोशी यांनी आपलेही कौतुक करावे असं तुम्हाला वाटत असेल तर कृपया माझ्या ईमेल वर तुमच्याविषयी तुमच्या आयुष्यातील वाटचालीविषयी लिहून पाठवावे, मी ते माझ्या शब्दात नक्की चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करेल...माझे राजकीय पाक्षिक जगातले लाख दोन लाख वाचक ऑन लाईन वाचतात, त्यावर बऱ्या वाईट प्रतिक्रियाही मोठ्या प्रमाणावर येतात, अशा प्रतिक्रिया इतरांना काळत नाहीत पण कौतुक त्या फेसबुक फ्रेंड्सचे जे अतिशय बेधडकपणे माझ्या लिखाणावर अजिबात भय मनात न बाळगता प्रतिक्रिया किंवा मत किंवा स्वतःचे अनुभव व्यक्त करतात, जेव्हा माझ्या लिखाणावर राजेश नार्वेकरांसारखे शासकीय प्रशासकीय अधिकारीही लाईक करतात किंवा विलास शिंदे यांच्यासारखे अधिकारी उघड थेट 
प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात, क्षणभर मलाही धडधडायला होते....सध्या मी इंदोर स्थित भय्यू महाराज नेमके कसे फसवे आणि भोंदू, त्यावर टप्प्याटप्प्याने लिहायला घेतल्यानंतर अति आश्चर्य म्हणजे असे आता अनेक पुढे आले आहेत कि ज्यांची अतिशय नियोजनपूर्वक 
फसवणूक भय्यू महाराज आणि त्यांच्या कंपू कडून वेळोवेळी करण्यात आली होती, आलेली आहे. पोळून भय्यू महाराजांपासून दूर झालेले त्यांचे हे एकेकाळचे भक्त त्यांना साक्षात परमेश्वर म्हणून बघत होते, पूजत होते, पण साक्षात अनुभव त्यांना अति भयंकर आलेले आहेत, त्यावर सावकाश लिहितो आहेच...

येथे भय्यू महाराजांचा विषय यासाठी कि मी अलीकडे जेव्हा भय्यू महाराज यांच्यावर लिहिले, ते वाचल्यानंतर माझ्या बुजुर्ग अशा फेस बुक फ्रेंड पूनम राऊत यांनी जो अतिशय बेधडकपणे त्यांना एका अशाच बुवाकडून जो अनुभव त्यांना स्वतःला आला, त्यांनी तो जसाच्या तसा मांडला आहे, राऊतताईंच्या या हिमतीला सन्मानपूर्वक सलाम....पुढल्या भागात पूनम राऊत यांचे लिखाण त्यांच्याच शब्दात 
मांडतोय, अवश्य वाचा...

No comments:

Post a comment