Sunday, 30 July 2017

चिरंजीव मन्मथ : पत्रकार हेमंत जोशी

चिरंजीव मन्मथ : पत्रकार हेमंत जोशी 

तो गेल्यापासून त्याच्यावर लिहावे, अगदी मनातले सांगून टाकावे, मनापासून वाटत होते पण लिहायला घेतले कि शब्द आठवत नव्हते आणि डोळ्यातून सारखे पाणी झिरपायचे, आताही तेच होतेय, हे लिहितांना, पण आज थांबणार नाही, लिहून मोकळे व्हायचे हिम्मत करून ठरवले आहे....

श्री मिलिंद आणि सौ. मनीषाताई म्हैसकर या माझ्या अतिशय आवडत्या आयएएस दाम्पत्याचा एकुलता एक मन्मथ अलीकडे अचानक सोडून गेला. मी तर जणू त्या कुटुंबाला आपलेच मानणार्यातला पण जगभरातल्या प्रत्येक मराठी कुटुंबात जशी विश्वास पाटलांची पानिपत कादंबरी हमखास असते ते तसे मन्मथच्या जाण्याने...म्हणजे म्हैसकरांना ओळखणारे किंवा न ओळखणारे पण या राज्यातले असे एकही घर नाही जे मन्मथ च्या दुर्दैवी मृत्यूमुळे हादरले नाही किंवा दुःखी झाले नाही, मग जे त्यांना आमच्यासारखे जवळून बघणारे किंवा ओळखणारे, आमची काय अवस्था झाली असेल, एवढेच सांगतो, शब्द नाहीत या अकल्पित घटनेविषीयी लिहिण्यासाठी...

प्रशासकीय अधिकाऱ्यात दोन अगदी उघड गट दिसून येतात, पहिला गट थेट आयएएस होणाऱ्यांचा आणि दुसरा गट खात्यामार्फत प्रमोट होत होत प्रशाकीय अधिकारी होणाऱ्यांचा. दोघांच्या वागण्या बोलण्यात राहण्यात विचारात प्रचंड तफावत असते, पहिले अतिशय  स्टायलिश बहुतेकवेळा काहीसे खडूस किंवा आखडू असतात आणि प्रमोट होणारे येथे रुळलेले आपल्यातलेच एक आहेत, आपल्याला वाटते. मिलिंद म्हैसकर तसे थेट आयएएस पण तरीही त्या आखडू परिवारातले नाहीत, एकदम मोकळे ढाकळे, कोणीही त्यांच्याकडे गेल्यानंतर हसत हसत त्याला मदत करणारे, मनीषाताई नवर्याच्या एकदम कॉन्ट्रास्ट, महिला प्रशासकीय अधिकाऱ्यातली जणू माधुरी दीक्षित, राहणे बोलणे दिसणे तिचे सारेच काही एकदम हटके, जो कोणी या दाम्पत्याच्या कुठल्याही मध्यमा तुन संपर्कात येतो, आपोआप म्हैसकरमय होतो, मनीषाताईंच्या माहेरच्या बाबतीत देखील तेच, निवृत्त प्रशासकीय अधिकारी अरुण पाटणकर असोत किंवा त्यांचे अत्यंत कर्तबगार आयआरएस चिरंजीव अभिजित पाटणकर असोत, सारे पाटणकर आजही एवढ्या यशानंतर देखील टिपिकल नागपुरी, कोठेही गर्व नाही, अगदी अघळपघळ, आपल्यातलेच एक वाटणारे, त्यामुळे म्हैसकर पाटणकर कुटुंबात घडलेली हि अत्यंत अत्यंत दुर्दैवी घटना, तन आणि मन अतिशय अस्वस्थ करून गेली, आजही अजिबात मी आणि माझे कुटुंब या दुःखातून सावरलो नाही, इतक्या सहजासहजी सावरणे शक्यही नाही...

आधी अरुणजी किंवा त्यानंतर मनीषाताई किंवा अभिजित किंवा मिलिंद, सारेच मोठ्या अधिकारपदावर, पण मनात कधी हा विचारही आला नाही कि वैक्तीतक घरोबा असलेल्या या कुटुंबाचा घ्या काहीतरी फायदा करून, एक मात्र नक्की, त्यांचे यश बघून सुखावणे हि आमच्यासाठी नित्याचीच एक बाब, त्यामुळे कुणा दुष्टाची लागलेली हि नजर, घरातलेच कोणीतरी गेले, एवढे प्रचंड दुःख मन्मथच्या जाण्याने झाले. त्या बेभरवशाच्या परमेश्वराला मी तेच नेहमी सांगतो, अरे, तू आमचे सर्वकाही हिरावून घे पण एखाद्याच्या घरात एखाद्याच्या तारुण्यात यमाला पाठवतांना कृपया शंभर वेळा विचार कर, पण तो काही ऐकत नाही, येथेही त्याने ऐकले नाही आणि एक आनंदी कुटुंब त्याने एका क्षणात उध्वस्त करून सोडले, या अफलातून दाम्पत्याला जीणे त्यानेच नकोसे केले....अति अति वाईट झाले..

आपल्या घरातले काही नोकरचाकर वर्षनुवर्षे आपल्याकडे काम करता करता जणू आपल्यातलेच एक होऊन जातात तरीही जेव्हा केव्हा आपल्याकडल्या एखाद्या समारंभाला सारे गणगोत जमते, नेहमीचे ते नोकरचाकर सहकुटुंब हजेरी लावतात पण एरवी आपल्यातलेच एक वाटणारे ते त्यादिवशी मात्र त्यांचा वावर काहीसा अलिप्त असतो किंवा आपल्यालाही त्यांचे ते तसेच वागणे अपेक्षित असते. माझाही पत्रकार म्हणून वावर अशा ओळखीच्या ठिकाणी बहुतेकवेळा घरातल्या या अशा नोकराचाकरांसारखा असतो कारण माझ्यात भिनलेली आक्रमक सडेतोड स्पष्ट पत्रकारिता त्यामुळे जरी प्रत्येकाशी व्यक्तिगत संबंध असलेत तरी विशिष्ट अंतर राखूनच घरोबा ठेवण्याची सवय लागली आहे आणि लोकांनाही ते तसेच अपेक्षित असते आपले वागणे एखाद्या अछूतासारखे पण चुकून जेव्हा एखाद्या कुटुंबात ते बंधन जाणवत नाही मग अशा एखाद्या पाटणकर म्हैसकर कुटुंबाला आम्ही आपोआप आपले सख्खे मानून मोकळे होतो. आता तुम्हीच कल्पना करा, चिरंजीव मन्मथच्या जाण्याने आमच्या मनाचे काय झाले असेल...

आणखी एक उदाहरण देतो, काही दिवसांपूर्वी औरंगाबादचे सुप्रसिद्ध व्यवसायिक विवेक देशपांडे यांच्या मुलीच्या विवाहानिमित्ते तेथे गेलो होतो, मुद्दाम महाऊर्जाचे संचालक अभिजित देशपांडेंच्याही घरी गेलो, त्यांच्या वडिलांना म्हणजे जयंत देशपांडे यांना भेटायला, ते देखील या राज्याचे प्रशासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झालेले त्यामुळे त्यांच्याशी जुना परिचय, पुढे अभिजीतमुळे कायम संबंध रूढ धृड झाले. त्यांच्या घरी गेलो, पुढ्यात पोहे आले, खूप खूप स्वादिष्ट होते, मी विचारले कोणी केले, अभिजित म्हणाले आमच्याकडे काम करणाऱ्या ताईंनी, त्या नवबुद्ध आहेत पण सारा स्वयंपाक अगदी ब्राम्हणी पद्धतीचा करून वाढतात, पोह्यांचे जाऊ द्या हो, पण एखाद्या नवबुद्धाला ब्राम्हणाच्या घरात थेट चुलीपर्यंत मानाचे, आई गेल्यानंतर आईसारखे स्थान, त्याक्षणी देशपांडे कुटुंब आभाळापेक्षा उंच वाटले. आम्हा आक्रमक पत्रकारांचे हे असेच, एखाद्या कुटुंबात, एखाद्या घरात थेट चुलीपर्यंत प्रवेश मिळाला कि अशा कुटुंबावर आपोआप जीव ओवाळून 
टाकावासा वाटतो, म्हणून मन्मथच्या जाण्याने मन सैरभैर झाले आहे, सावरता सावरत नाही...

मन्मथ तू हे असे का केले, चांगले नाही केलेस...!!

Friday, 28 July 2017

वागले कि दुनिया २ : पत्रकार हेमंत जोशी

वागले कि दुनिया २ : पत्रकार हेमंत जोशी 
पूर्वीच्या आया आपल्या मुलांना श्रावण बाळ 
म्हणायच्या, हल्लीच्या, ' श्रावण पाळ ' म्हणतात.

अलीकडे म्हणे भय्यू महाराजांच्या भक्तांनी ठरवलंय, 
महाराजांचे प्रवचन आटोपले रे आटोपले कि लगेच 
तीन तोफांची सलामी द्यायची...
.....
....
विशेष काही नाही, 
श्रोते जागे व्हावेत म्हणून...!! 

परवा म्हणे मोहिंदर अमरनाथ ची बायको टीव्ही 
बघता बघता बेशुद्ध पडली, डॉक्टर देखील 
अचंबित झाले, असे एकाकी का घडले असावे 
म्हणून...
नंतर लक्षात आले, टीव्ही वर दाखवत होते, 
अमरनाथ का लिंग पिघल रहा है...

चला, चक्कलस पुरे झाली, पत्रकार निखिल वागळे यांच्याकडे वळूया. येथे आता फार काही वागळे यांच्यावर लिहावे असे वाटत नाही कारण श्री उन्मेष गुजराथी, श्री विनोद कापरी शिवाय काही महिन्यांपूर्वी मी जे लिहून ठेवले आहे, ते संदर्भ घेऊन मी पुढल्या ऑफ द रेकॉर्ड च्या अंकात 
निखिल वागले नेमके कसे, हे संदर्भ घेऊन तुम्हाला सांगणार आहे...फक्त राग याचा कि निखिल यांना तंतोतंत माहित असतांना म्हणजे महेश मोतेवार हे कसे विकृत आणि चीटर आहेत, तरीही वागळेंनी महेश मोतेवार यांच्या महाराष्ट्र वन या वाहिनीमध्ये चाकरी केली आणि मोतेवारांना मोठे करून त्यांना एकप्रकारे जणू गुन्हे करण्याला प्राधान्य दिले. अलीकडे मला पुण्यातली एक तरुणी भेटली, आता ती विवाहित आहे, एकेकाळी ती मोतेवार यांची स्वागतिका कम पीए होती, तिने जे सांगितले ते भयभीत करणारे आहे, मोतेवारला केवळ दोन बायका नव्हत्या, कितीतरी होत्या, कितीतरी आहेत, त्यांना मोतेवारची आर्थिक विशिष्ट ऑफर असायची, त्यात त्या अडकायच्या आणि मोतेवारमय होऊन जायच्या, सुदैवाने हि अडकली नाही, ऑफर तिलाही होती. अर्थात अशा कितीतरी विकृत धक्कादायक भानगडी मोतेवारांनी करून ठेवल्या आहेत, विशेष म्हणजे मराठवाड्यातल्या एक जातीयवादी नेत्याने तुला मी वाचवतो, सांगून बदमाश मोतेवार यास ज्या पद्धतीने लुबाडले किंवा या अशा पद्धतीने सामान्य लोकांकडून पैसे गोळा करणाऱ्या वर्ष सत्पाळकर किंवा महेश मोतेवारांना नेहमी प्रमाणे उल्लू बनविणार्या ज्या स्वयंघोषित हिंदी राज्यातल्या मराठी गुरूने विविध प्रकारे लुटले लुबाडले आहे, ते पुरावे वाचून हेच मनात आले, सत्पाळकर बाई किंवा महेश मोतेवारांचेही बाप शोधावेत असे हे स्वयंघोषित युवा बाबा निघाले.जाऊद्या, वर्षा सत्पाळकरांची बाबांकडून प्रचंड आर्थिक आणि मानसिक लूट व फसवणूक, त्यावर मी आत्ता येथे लिहिणे टाळतो कारण आजचा विषय निखिल वागळे हा आहे, त्या बाबांवर नक्कीच पुढे कधीतरी...

निखिल वागळे यांच्याबाबतीत अगदी जीव तोडून पत्रकार भाऊ तोरसेकर हेच सांगत आले आहेत कि निखिल तू तोंडात विष्ठा असतांना श्रीखंड चघळतोय, सांगू नकोस, लोकांच्या ते जेव्हा लक्षात येईल, जेव्हा तुझे ढोंग उघडे पडेल, तुझे चाहते त्यानंतर औषधाला देखील उरणार नाहीत आणि आता हेच झाले आहे, ज्या महेश मोतेवारांनी किंवा तत्सम नेत्यांनी, व्यापाऱ्यांनी या देशाला, या राज्याला, राज्यातल्या सामान्य मराठी माणसांना लुटले लुबाडले फसविले, वागळे नेमके या अशा फसव्या लोकांच्या वाहिन्यांवरून लोकांना उपदेशाचे डोस पाजत होते, हरकत नाही फक्त माणसाने त्या भूमिकेत जगू नये म्हणजे वरून सांगायचे मी साध्वी आहे, संत आहे आणि रात्रीच्या काळोखात विविध पुरुषांशी शय्यासोबत करून मोकळे व्हायचे. वाचकांनो, हल्ली हे असेच ज्याचे त्याचे वागणे आहे, नेत्यांनी, पत्रकारांनी,समाजसेवकांनी, विविध मान्यवरांनी त्या सिनेमा क्षेत्रातील लोकांसारखी भूमिका घेऊन जगायला हवे, त्यांचीही लोकप्रियतातसूभर देखील कमी होणार नाही म्हणजे सिनेमावाले जशी आपली कोणतीही लफडी, प्रेमप्रकरणे, विविध भानगडी लपवून न ठेवता बिनधास्त उघड करतात, त्यातून त्यांची वाढते ती लोकप्रियता, आम्ही मंडळींनी देखील हे असेच वागावे, मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली, पद्धतीने वागले कि अडचण होते मिस्टर वागळे... 

अर्थात येथे मी वागळे कसे वाईट हे सांगण्यासाठी लिहीत बसलेलो नाही, फक्त नेमके तेच सांगितले कि उत्तुंग ठरलेले वागळे का कुठे व कसे चुकले, ज्यातून त्यांनी आपले मोठे नुकसान करून घेतले, पत्रकार म्हणून वागळे नक्कीच मोठे आहेत आणि ते मोठे आहेत म्हणूनच अलीकडे ते चर्चेचा विषय ठरले आहेत, पत्रकारांमधल्या बेडकांवर लिहिल्या जात नाही, पत्रकारिता टायगर छाप महत्वाची ठरते. वागळे नेमके कसे हे आणखी विस्तृत माझ्या पुढल्या पाक्षिकात वाचायला विसरू नका...
तूर्त एवढेच.

Wednesday, 26 July 2017

वागळे कि दुनिया : पत्रकार हेमंत जोशी


वागळे कि दुनिया : पत्रकार हेमंत जोशी 
पत्रकार निखिल वागळे हल्ली हल्ली असे मुतखडा झालेल्या रोग्यासारखे का वागताहेत कळत नाही म्हणजे मुतखडा झालेल्या माणसाला जशी थेम्ब थेम्ब लघवीला होते तसे वागळे आपल्या फेसबुकवरून मनातला त्रागा थेम्ब थेम्ब व्यक्त करताहेत, मुतखडा झालेल्याला लघवीला वारंवार जावेसे तर वाटते पण लघवी थेंबे थेंबे तीही थांबून थांबून होते, वागळे यांचेही तेच म्हणजे त्यांना एका वाहिनीवरून काढल्याच्या संदर्भात खूप खूप लिहावेसे वाटत असावे, ते लिहायला बसत देखील असावेत पण लिहिणे होत नाही म्हणून दोन चार वाक्ये खरडून आणि फेस बुक वर टाकून ते मोकळे होताहेत, वास्तविक एकदाचे काय ते त्यांनी मनात साचलेले, टी व्ही ९ वाहिनीवरून का काढले किंवा नेमके काय घडले सर्वांना सांगून मोकळे व्हावे.कारण त्यांच्या वतीने वागळे हेच नेमके कसे योग्य, सांगणारे असे कोणी त्यांच्याकडे आता उरले वाटत नाही, कारण जे त्यांच्या जवळ आले होते ते वागळेंच्या बायकोसहित काळाच्या ओघात दूर गेले, अशा मंडळींना मग ते आबा माळकर असोत कि कपिल पाटील, मीना कर्णिक असोत कि युवराज मोहिते, बंधुराज लोणे असोत एखादी ज्ञानदा, आयुष्यात त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारी एखादी तरुणी, हे असे अनेक त्यांना घट्ट चिकटले होते पण निखिल वागळे यांनीच कंडोम फेकून देतो तशा या शिड्या यापुढे उपयोगाच्या नाहीत, मग नवनवीन शिड्याच्या शोधात त्यांनी या आधीच्या बाजूला ढकलून दिल्या. म्हणून सांगतोय, आता तेच त्यांचे राज कपूर किंवा मनोज कुमार, सबकुछ ते एकटेच, म्हणून सांगतोय आता त्यांनीच मनातले नेमके आणि घडलेले जसेच्या तसे सांगून मोकळे व्हावे....

तडजोड तोडपाणी न करता पत्रकारिता करणारे या मुंबईत फारच कमी, वाहिन्यांवर तर असे डॉ. निरगुडकर अगदीच अभावाने, पत्रकारितेतही भाऊ तोरसेकर, गिरीश कुबेर अभावानेच त्यात एक नाव निखिल वागळे हेही पण आपण तेवढे चांगले आणि अख्खे जग केवढे वाईट, अशी मनाची समजूत करून घेतली कि माणसाचा निखिल वागळे होतो, माणूस तसा चांगला पण या अशा वेड लागल्यागत स्वभावातून आयुष्यात पुढे एकटा पडत जातो. मधुकर भावे यांचे हे असेच वागळे यांच्यासारखे झाले म्हणजे ते देखील लोकमत मधून बाहेर पडल्यानंतर चारी धाम यात्रा करून आले, कधी लातुरात विलासराव देशमुखांच्या दैनिकात होते तर कधी रामशेठ ठाकूरांच्या रामप्रहर मध्ये तर कधी नारायण राणे यांच्या प्रहार मध्ये, पण टिकले कुठेच नाही, एकदा का हा माणूस आपले वृत्तपत्र किंवा आपली वाहिनी स्वतःसाठी वापरून घेतो, मालकांच्या लक्षात आले कि हे असे भावे किंवा वागळे यांच्यासारखे होते, दर्डा यांच्या ते कधी कधी लक्षात येत नाही कि ते जाणून बुजून दुर्लक्ष करतात कळत नाही पण दर्डांनी जेवढे, काही मंडळींना आपल्या वृत्तपत्रात वापरून घेतले नसेल तेवढे दर्डांचे लोकमत आपल्या प्रचंड फायद्यासाठी मोठ्या खुबीने वापरून घेणारे जोशी कुलकर्णी भावे ह्या तिन्ही ब्राम्हणांचे करावे तेवढे कौतुक कमी. एक उदाहरण सांगतो, मी आणि आमचे बंधुराज यदुजी, आमच्या दोघांचा आमच्याच गावातला देशपांडे आडनावाचा एक मित्र होता, त्याची बायको सुंदर होती, पण हा व्यसनातून कर्जबाजारी झाल्यानंतर त्याला त्याचाच एक वकील मित्र मदतीला धावायचा, या कर्जबाजारी व्यसनी देशपांडेला वाटायचे, या येड्या वकिलाला बघा आपण कसे वापरून घेतो, पण ते तसे नव्हते, पुढे देशपांडे अचानक अकाली मृत्यू पावल्यानंतर त्याच्या पश्चात म्हणा फारतर, त्या वकिलाने देशपांडेच्या बायकोशी लग्न तर केलेच पण बायकोची संपत्ती देखील पदरात पडून घेतली. जेव्हा देशपांडेला वाटायचे आपण या वकील मित्राला वापरून घेतो, तेव्हाही त्याचा तो केवळ एक भ्रम होता, माणसाने पावलोपावली सावध असावे, कोण कोणाला केव्हा वापरून मोकळा होईल, सांगता येत नाही. सभोवताली माणसे फार हरामखोर असतात. दर्डा यांच्या लोकमत वरून हे उदाहरण आठवले कि आजपर्यंत हे लक्षातच आलेले नाही कि हे तिन्ही ब्राम्हण लोकमतला आपल्या फायद्यासाठी वापरून मोकळे झालेत, होताहेत कि दर्डांना वाटते आपण यांना वापरून घेतो, अर्थात बाबूजींच्या पुण्यतिथी ब्यतिरिक्त मधुकर भावे यांना ते लोकमत मधून निवृत्त झाल्यानंतर दर्डा कुटुंबाने कधी फार जवळ केल्याचे दिसले नाही, राजेंद्र दर्डा यांना विधान परिषदेवर जायचे होते तेव्हा त्यांना लोकमत परिवारातलेच मधुकर भावे आड यायला लागले, भावे हे विलासरावांच्या माध्यमातून विधान परिषदेवर येण्यासाठी जेव्हा प्रचंड आटापिटा करीत होते तेव्हाच दर्डांना जवळून ओळखणाऱ्यांच्या ते लक्षात आले होते कि निवृत्ती नंतर दर्डा यांचे ' भावेसाहेब' आमदार होणे तर फार दूर पण लोकमत पासून देखील ते दूर गेलेले असतील. एक मात्र नक्की जोशी, भावे, कुलकर्णी या तिन्ही ब्राम्हणांचे करावे तेवढे कौतुक कमी, कोण कोणाला वापरून घेतो, अजिबात ते कळत नाही...

क्रमश:

Tuesday, 25 July 2017

OFF THE RECORD review on some of todays headlines...

OFF THE RECORD review on some of todays headlines....

1. Cash found on Sr official bribe for IAS promotion--The Times of India..
काय हे?  Talk about table news in India's biggest paper !! By the way, I was the first one to report on senior Co-op officer Vikas Rasaal caught with cash (Rs. 50 lakhs) at the airport and IT sleuths conducting raid at his residence.. (I had blogged about it on 10.7.2017)...It took Times of India some 20 odd days to copy-paste my news literally...I had heard about translating previous days Marathi news to English (Political ones)& they appearing in Times but now this one has crossed all boundaries...By the way, if I give names as to who has become IAS offering bribes at Delhi, all promotee's will be in a soup...Juniors have become IAS whereas seniors are often seeing running from here & there for simple promotions...

2. The truth about on the ongoing EVM machine controversy at Buldhana...
It was absolutely disgusting to see how the media is interpreting an isolated incidence of technical fault in one and only EVM during Zilla Parishad elections in Buldana district during February 2017. By doing so, we are not only creating doubts in the minds of very wise voters of this country but maligning the time tested,globally applauded free & fair election machinery of this country. Thereby, damaging the democracy itself. As per details available in public domain,Elections were held for 60 Zilla Parishad constituencies and 120 Panchayat constituencies. That means, there were 180 constituencies each having a different ballot paper. The sequence of names and symbols printed on each ballot paper was different & decided as per guidelines of State Election Commission.Technical fault was noticed in one EVM being used at a polling station 57/6-Sultanpur from 57-Sultanpur constituency of Buldana Zilla Parishad. One independent candidate Mrs Zore complained about this. The election officers and then Collector Mr.Vijay Zade acted promptly on this and reported matter to State Election Commission.  On SEC directions, Re-poll was held at this polling station on 21 February. Counting was done in entire Maharashtra on 23th February.

The result of this constituency itself really speaks volumes about the fairness of the entire election process.

              Votes secured by various candidates from 57-Sultanpur constituency are as under - 

1 Zore Aashatai Arun (Complainant)       - Independent    2399

2 Doifode Suman Tukaram                      - INC                    311

3 Tejankar Vijaya Sadanand                    - NCP                5238

4 Pise Meena Madan                               - BJP                1655

5 Wagh Renuka Dilip                               - Shivsena         5659

6 NOTA                                                                                182

 Now even you add all the votes secured by the BJP candidate to Smt. Zore's score, it becomes 4054 and she remains on third position. It's a simple logic which the contesting candidates and voters have understood and they have not filed any election petition.Elections were held for 180 constituencies with different sequence of names on ballot paper, there were 1691 polling stations fixed for these 180 constituencies, each polling station was having Separate EVM for Zilla Parishad and Panchayat Samiti Constituencies and finally technical fault was developed in only one EVM used for ZP constituency at polling station no.57/6. Other EVM used for Panchayat Samiti constituency at this same polling had no problem. There was no complaint from rest of the 1690 polling stations. It was simply a technical fault which we must accept. There is no machine in the world which has not developed a fault in it in its lifetime.We all have witnessed recent general elections to various state assemblies where electors have given different mandate in different states.

3. NCP women president Chitra Wagh is upset! 
One of the post on Facebook by NCP's women cell President Chitra Wagh has actually made me think that the current Modi government actually takes older laws, fine touches them, and reinvents them with new names...Like many of the Cong-NCP leaders here in Maharashtra had voiced their similar opinion on introduction of the Jalyukt Shivaar Yojana here in Maharashtra which many claimed, was the brainchild of the Cong-NCP...Anwyay, Chitra Wagh has said that the web portal "SHe Box" which was launched recently by the Centre is nothing but the "Vishakha Law" that was formed in 2013 for women facing sexual harassment at work places. As per the law, wherever there are more than 10 women employees a committee of one senior most in those 10 will be the head  along with an outside member of any NGO...But Wagh says nowhere this Committee seems to be formed and no actions have been taken if any complaints received; and also the SHe Box is nothing but an extension of the Vishakha Law...

Vikrant Hemant Joshi 

Sunday, 23 July 2017

विषय वेगवेगळे ३ : पत्रकार हेमंत जोशी


विषय वेगवेगळे ३ : : पत्रकार हेमंत जोशी 

मीडिया मग त्या विविध वाहिन्या असोत अथवा वृत्तपत्रे, मनात अढी, द्वेष, राग, मत्सर, बदला घेण्याची भावना मनात ठेवून तुम्ही वृत्तपत्रे किंवा वाहिन्या चालवीत असाल तर असा आक्रस्ताळेपणा फार काळ खपवून घेतल्या जात नाही, आपण तेवढे चांगले आणि अख्खे जग वाईट, अशी भूमिका सार्वजनिक जीवनात वावरतांना घेऊन चालत नाही, प्रत्येकाकडे कावीळ झाल्यागत बघणे योग्य नसते. सार्वजनिक जीवनात काम करतांना माणसे चुकतात, केलेल्या चुका अति गंभीर असतील तर त्या चव्हाट्यावर आणणे आमचे ते कामच आहे पण उठसुठ एखाद्या रिंग मास्टरच्या भूमिकेत पत्रकारांनी किंवा मीडिया मध्ये काम करणाऱ्यांनी वागू नये, डोळ्यासमोर मिशन नक्की असावे पण एखाद्याकडून कमिशन घेण्यासारखे दुसऱ्यावर आगपाखड करणे नक्कीच चुकीचे आहे, मग अशा व्यक्तीचा निखिल वागळे होतो, जे मी दोन महिन्यांपूर्वी लिहिले होते तेच खरे ठरले म्हणजे मीडिया क्षेत्रात वागळे यांचा उतरता क्रम ज्या पद्धतीने सुरु झाला, एक दिवस त्यांना आहे ती वाहिनीही सोडावी लागेल, मी लिहिले होते नेमके तेच घडले, मला वाटते निखिल वागळे यांनी जेथून सुरुवात केली होती, तेथूनच ते पुन्हा एकदा आपल्या पत्रकारितेची वाटचाल सुरु करतील किंवा त्यांनी ती तशी सुरुवात करावी म्हणजे त्यांना पुन्हा एकदा चंदेरी किंवा षटकार सारखे पाक्षिक सुरु करावे अर्थात त्यांना हि पाक्षिके सुरु करावी लागतात कि काय अशी त्यांची आजची मीडिया क्षेत्रात अवस्था झाली आहे, अर्थात वागळे यांना आम्ही सल्ला देणे म्हणजे चिखलातून बाहेर आलेल्या म्हशीच्या पाठीवर बसण्यासारखे, आम्हीच धाडकन खाली पडून ढुंगणावर आपटू. निखिल यांनी चुका केल्या म्हणून त्यांच्यावर हि नौबत आली, मी म्हणणार नाही, ते त्यांच्या क्षेत्राशी नक्कीच प्रामाणिक आहेत पण त्यांना त्यांची एकांगी भूमिका आणि आक्रस्ताळा स्वभाव नाडला, भोवला असे म्हणणे नक्कीच चूक ठरणार नाही. आजतरी चित्र असे आहे निखिल यांच्या पत्रकारितेचा साप शिडीचा खेळ झाला आहे म्हणजे त्या खेळात एखादा कसा थेट ९९ पर्यंत पटापट पोहोचतो पण नेमका ९९ वर येतो तो सापाच्या तोंडावर मग खेळाडू थेट खाली उतरतो पुन्हा वर चढण्यासाठी पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, पाठीमागून येणारा प्रतिस्पर्धी जिंकून मोकळा होतो...

येथे निखिल वागळे आठवले ते झी मीडिया चे दिल्लीतील प्रतिनिधी पत्रकार रामराजे शिंदे यांच्यामुळे. अलीकडे रामराजे यांनी ' दिल्ली तखत ' या मथळ्या खाली एक लेख लिहिला होता, ज्यामुळे सेनेच्या गोटात बरीच खळबळ माजली, येथेही तेच घडले शिंदे यांनी भाजपाची तळी उचलतांना शिवसेनेवर विनाकारण तीही जहरी टीका केली, जे योग्य नव्हते म्हणजे एकीकडे तुम्ही भाजपाला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवत असतांना सेनेची त्याच लेखात आई बहीण घेता, ते योग्य नाही, एकवेळ आपण सेनेवर केलेली टीका देखील दुर्लक्षित करू पण चुकीची माहिती पेरून सेना भाजपा मध्ये रामराजे यांनी ज्या पद्धतीने आगीत तेल ओतण्याचे काम केले ते त्यांच्याकडून अपेक्षित नाही म्हणून हा वाक्यप्रपंच. पुन्हा तीच भीती, रामराजे यांनीही वागळे यांच्या पावलावर पाऊल ठेवू नये, एक दिवस मग हाताशी काहीच उरले नाही तर शिंदे यांना देखील गावाकडे निघून जावे लागेल, शिंदे यांच्यासारख्या चुणचुणीत, निर्भय, कष्टाळू पत्रकारावर हि वेळ येता कामा नये...

संदर्भ असा रामनाथ कोविंद यांच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनिमित्ते दस्तुरखुद्द भाजपा प्रदेशाध्यक्ष अमित शाह जातीने मातोश्रीवर गेले, तेथे त्यांचे उद्धव आणि कुटुंबीयांनी मनापासून स्वागत केले, खेळीमेळीच्या वातावरणात ठाकरेंनी लगेच जाहीर करून टाकले कि आम्ही कोविंद यांच्या पाठीशी उभे आहोत. हे असे सुरळीत घडले तिकडे वर्ष बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी सुटकेचा निश्वास सोडला, कारण त्यांना या ताणाताणीचा सर्वाधिक सतत त्रास होत आला आहे, त्यामुळे वरच्या पातळीवर वातावरण निवळले म्हणून फडणवीस जाम खुश होते, त्यांनी त्या दिवशी ख़ुशी ख़ुशी त्यांच्या आवडीची ब्लॅक कॉफी एक कप जादा घेतली, हो ते कॉफी पर्यंतच, त्यांचा कधीही तळीराम झाला नाही आणि होणारही नाही. पण हा आनंद काही क्षण टिकला कारण लगेच रामराजे शिंदे लिहून मोकळे झाले कि अमित शहा असे म्हणालेत कि शिवसेना त्यांचा नंबर एक चा शत्रू आहे आणि यापुढे सेना संपविणे त्यांचे लक्ष्य आहे. इकडे रामराजेंचा लेख प्रसिद्ध झाला आणि उद्धव यांनी पुन्हा उभे राज्य डोक्यावर घेतले, त्यांनी थेट अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांना फोन करून हा काय दगाबाजीचा प्रकार आहे, विचारले. जे घडलेच नव्हते, ते ऐकुन शहा आणि फडणवीस दोघेही अचंबित भयभीत आश्चर्यचकित झाले, त्या दोघांनीही अतिशय शांतपणे उद्धव यांचे सांगणे ऐकून घेतले नंतर लगेच त्यांनी सपुरावा सिद्ध केले कि असे कोणतेही वक्तव्य अमित शाह यांनी केले नाही, उद्धव त्यावर शांत झाले आणि राष्ट्रपतीपदाची अति महत्वाची हि निवडणूक मग शांतपणे आणि बिनबोभाट पार पडली..असे घडता कामा नये, रामराजे त्या लेखात नेमके काय लिहून मोकळे झाले ते पाक्षिक ऑफ द रेकॉर्ड च्या जुलै उत्तरार्ध अंकात वाचायला विसरू नका.

जाता जाता : 
प्रेमाने बघाल तर कचरा पण 
सुंदर दिसेल...
.....
.....
......
.....
.....
फक्त नजर डुकराची पाहिजे...!! 
तूर्त एवढेच :

विषय वेगवेगळे २ : पत्रकार हेमंत जोशी


विषय वेगवेगळे २ : पत्रकार हेमंत जोशी 

त्या दोघात बऱ्यापैकी साम्य आहे, ते दोघेही तब्बेतीने एकदम खात्यापित्या घरचे, त्यांच्याकडे बघणाऱ्या प्रत्येकाला तेच वाटते, पण त्यातला एक सत्तेत आल्यानंतर अमाप समाप संपत्तीचा मालक बनला तर दुसरा उत्तम संस्कारातून आल्याने संपत्तीपेक्षा समाजसेवेला अधिक प्राधान्य देणारा. दोघानांही मांसाहार प्रिय. दोघेही अपत्यांच्या बाबतीत आदर्श असे म्हणजे सारख्याच विचारांचे, एकच अपत्य आणि तीही एकुलती एक मुलगी. दोघेही भाषा प्रभू आणि उच्चशिक्षित. त्यातले पहिले तोंडातल्या तोंडात बोलून, काय बोललो हे बायकोलाही कळू देत नाहीत, दुसरे मात्र सुधीर फडक्यांच्या गाण्यातील स्पष्ट उच्चारांसारखे भाषण करून मोकळे होणारे. ते काल मुख्यमंत्री होते, हे आजचे मुख्यमंत्री आहेत, त्यातले पहिले एकदम डेंजरस,दुसरे तर पहिल्यांपेक्षा अधिक डेंजरस. पहिले राग आला कि खडूस बोलून मोकळे होतात, दुसऱ्यांना राग आला तरी ते मनात ठेवतात, वरकरणी गॉड गॉड बोलतात पण नंतर असे काही करून ठेवतात कि समोरच्याला वाटते, आधीचे बरे होते, हे त्यांचे आजोबा शोभतात. लक्षात आलेच असेल, पहिले आहेत, शरद पवार आणि दुसरे आहेत देवेंद्र फडणवीस. पवारांना राग आला किंवा त्यांना एखाद्याचा बदला घ्यायचा असेल तर ते त्यांच्या देहबोलीतून आणि त्याच त्या बोलण्यातून लक्षात येते, फडणवीसांचे तसे नाही, तुम्ही त्यांना अंडर एस्टिमेट करायला जाता, तुम्ही त्यांना इझी घेता पण जेव्हा तुम्हाला तुमची जागा ते दाखवून देतात, तेव्हा तुमच्या ते लक्षात येते, फडणवीस पवारांच्या कित्येक पावले पुढे, एकदम मोदी यांच्या जवळपास. मनात आले कि समोरचा मग राजकीय दृष्ट्या कितीही बलवान ताकदवान असो, फडणवीस त्याला काही कळायच्या आत त्याला त्याची जागा दाखवून मोकळे होतात, प्रसंगी अगदी घरातला असला तरी. जे सतत भासवतात आम्ही फडणवीसांचे जवळचे, क्लोज, आहोत, त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेऊ नका, उदाहरणार्थ समजा तुम्हाला वाटत असेल कि शायना एन सी त्यांच्या खूप जवळच्या, त्यातून तुम्ही शायना यांना एखाद्या कामाचे आगाऊ पैसे देऊन मनातल्या मनात, आपले काम झाले असे मनोरथ रचून मोकळे होत असाल तर तो असतो तुमचा करून देण्यात आलेला गैरसमज. अर्थात शायना हे एक सहजच उदाहरण दिले, कदाचित ते खरे असेल किंवा नसेलही. जोडलेला, जोडल्या गेलेला एखादा मित्र छुटपूट फायदा घेऊन मोकळा होत असेल तर कदाचित 
फडणवीस दुर्लक्ष करतील, पण अमुक एखादा, मी मुख्यमंत्र्यांच्या ताटात जेवणारा आहे असे सांगून त्यांच्या नावाने उठसुठ गैरफायदा घेणारा असेल तर मग फडणवीस प्रसंगी मोदी यांच्यापेक्षाही लै भारी, म्हणजे बोलतील गॉड, पण तुमच्या नकळत तुमची हवा अशी काही काढून घेतील कि त्या मित्राला वाटेल, अरे आपलाही खडसे झालाय, थोडक्यात हेच महत्वाचे, ऊनसे पंगा ना लेना मेरे भाई. एकच सांगतो, प्रसंगी शरद पवार होणार नाहीत एवढे हे मुख्यमंत्री कठोर निर्णय घेऊन मोकळे होतात, राज्याच्या हितासाठी वाट्टेल ते त्यामुळे सभोवतालचे वाट्टेल ती मोकळीक दिल्यानंतर उद्याचे अजितदादा निर्माण होणार नाहीत हि सोज्वळता मनाशी उराशी बाळगून फडणवीस पुढे पुढे जातात त्यामुळे जे पवारांनी केले ते फडणवीस करणार नाहीत म्हणजे राज्य विकून खा रे, असे ते कोणत्याही तटकरेंना सांगून मोकळे होणार नाहीत. त्यांच्या पार पडलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते नेमके आत बाहेर कसे येथे थोडक्यात तुम्हाला सांगितले, गोड करून घ्या, त्यांना दीर्घायुष्याचा शुभेच्छा 
मनापासून मनातून मन:पूर्वक देऊन मोकळे व्हा...

Friday, 21 July 2017

OFF THE RECORD review on some of todays headlines...

OFF THE RECORD review on some of todays headlines...

1.  IT raids Avinash Bhosale
People in the corridors of power, all my sources right from the BMC to the Varsha Bungalow,  to 6th Floor of Mantralaya, everyone claimed that Avinash Bhosale was just indispensable. No one could even have thought of touching him. Be it any BMC Commissioner, Chief Minister, Chief Secretary or Principal Secretary of CM--only Bhosale had the audacity to get his work done with arrogance that too. If you doubt any of this, ask your informants who were involved in DP preparation of Mumbai & Pune. They will tell you the clout he enjoys everywhere. Anyway,  no one ever thought that at least in this birth would any agency touch Avinash Bhosale. But yes, they did. And mind you, the Income Tax Department of Pune hasn't raided, it was the Mumbai division. Even though it is a Central agency, I have my doubts that the CMO wasn't taken into confidence knowing the "status" of the man.  Hats off PM Modiji /Devendra ji....Vishwajit Kadam is like a small fry who is caught up in the mess because of his infamous father-in-law. But one should never take down anything lying when it comes to Patangrao Kadam's dynasty. Small fry also can be worth some hundreds of crores. Next in line--the  Jadhav's, the Oberoi's,  & the Chudasama's--be extremely careful--for this CM & PM the dialogue of movie Company goes very well, "आम आदमी कभी भी ख़ास हो सकता है, और ख़ास आदमी कभीभी आम"  

2. Lokmat & it's character!
Happiest Birthday CM sir!! By the way--read todays Lokmat--My uncle Yadu (kaka) Joshi as usual has gone all the way to render his /his paper's love for the BJP's CM in his editorial. If anyone of you have forgotten, today is NCP's Ajit Pawar birthday also..Lokmat being a Congress Paper I expected some or the other journalist of Lokmat  to write an editorial on Ajit Pawar too being a partner party but I was disappointed. I always thought Vijaybabu or Rajendrababu are the best players in our Print Media business and they use everyone and anyone to get their way out & work done...But surprise, surprise!! three journalists of the same paper-- Madhukar Bhave, Atul Kulkarni & Yadu Joshi have in fact made Lokmat their tool and used it to their fullest potential...The former two got rewarded financially as well😜😜, but Yadu joshi was able to create "दहशत" because of his non-corrupt ways. Earlier in our Mantralaya circles, everyone thought, that Atul Kulkarni's reign will come to an end when Yadu Joshi was brought from Nagpur, actually that did happen for sometime, hafta from many departments were stopped, and Kulkarni had to fight to regain his control on department by giving pathbreaking news...but now I think they have made peace, divided their yard..

3. My father Hemant Joshi has today actually appreciated the Darda family and its functioning...Click the link below to read the same: 
विषय वेगवेगळे : पत्रकार हेमंत जोशी  http://www.vikrantjoshi.com/2017/07/blog-post_21.html

विषय वेगवेगळे : पत्रकार हेमंत जोशी


विषय वेगवेगळे : पत्रकार हेमंत जोशी 

८० च्या दशकापर्यंत जन्माला आलेल्या जन्माला येणाऱ्या पिढीच्या मनातले नेमके ताड़ता येत होते, ८० चे दशक संपल्यानंतर जन्माला आलेल्या जन्माला येणाऱ्या पिढीच्या मनात नेमके काय आहे हे आई वडिलांना काय, साक्षात ब्रम्हदेवाच्याही लक्षात येत नाही, येणार नाही, अनप्रेडिक्टेबल एवढेच काय त्यांचे वर्णन करता येते, करता येईल. आपल्यातले अनेक पैशांनी श्रीमंत झाले पण कौटुंबिक वातावरण अति झपाट्याने गढूळ झाले, त्यात एक किंवा फारतर दोन मुलं, त्यामुळे माय बाप कायम असुरक्षित, आता तर मीच हेच सांगत सुटलोय, तुम्हीही प्रचार करा आणि तमाम मराठींना सांगा, जेवढी अधिक मुले जन्माला घालता येतील, घालून मोकळे व्हा. मराठी माणूस बाहेरच्या संकटांना किंवा अडचणींना घाबरत नाही, तो खचलाय घरातल्या असुरक्षित वातावरणामुळे, आपली मुले किंवा मुली आपल्याला केव्हा कुठल्या गंभीर अडचणीत, दुःखात,संकटात टाकून मोकळे होतील, या भीतीने तो ग्रासलाय,त्रासलाय, घाबरलाय. एक प्रयोग जाणीवपूर्वक आम्ही सुशिक्षित आणि श्रीमंत झालेल्या मराठी कुटुंबांनी पुन्हा एकदा करून बघायला हरकत नाही, एकत्र कुटुंब पद्धत, काळाची गरज आहे, ते करून बघा, त्यासाठी तुम्हाला लोकमत च्या दर्डा कुटुंबाचे उदाहरण देतो...

वास्तविक दर्डा आणि त्यांची चालूगिरी यावर मी नेहमीच टीका करीत आलोय, पण त्यांच्यात असे नक्कीच अनेक चांगले गुण असतील ज्यातून त्यांची तिसरी, चौथी पिढी देखील प्रगतीकडे झेप घेऊन मोकळी होते आहे, अर्थात त्यांच्या या यशाचे बऱ्यापैकी श्रेय देता येईल राजेंद्र आणि विजय दर्डा यांना. त्यांचे आजही वेगवेगळ्या शहरात राहून एकत्र व्यवसाय एकत्र कुटुंब, कुटुंबातल्या सदस्यांची पुढल्या प्रत्येक पिढीची एकमेकांशी बांधिलकी, घरातल्या थोरांविषयी कमालीचा आदर, वडिलांशी अंतर राखून त्यांच्याशी आदराने बोलणे, मला नाही वाटत, त्यांचे यश हिरावून घेण्याची ताकद देवताही असेल. वास्तविक विजय किंवा राजेंद्र दर्डा यांच्या जागी आपली मराठी पिढी असती तर दोन लग्नें करून मोकळ्या होणाऱ्या बापाला मराठी मुलांनी लाथा बुक्क्या मारून घराबाहेर काढले असते पण राजेंद्र आणि विजय दर्डा यांनी त्यांच्या वडिलांचे दुसरे कुटुंब आणि बाबूजींच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलींनाही सख्या बहिणींचा दर्जा देऊन, घरात घेतले, सारे एकत्र नांदले. आणि याचे श्रेय प्रामुख्याने जाते ते विजय दर्डा यांना, ज्यांनी शेवटपर्यंत जवाहरलाल दर्डा घरी किंवा बाहेर अपमानित होणार नाहीत, एकत्र कुटुंब विभक्त होणार नाही, याची काळजी घेतली आणि अमाप व्यावसायिक यश त्यातून ते मिळवीत गेले. हे असे वृत्तपत्रात जी पोतनीस यांच्यासारखी मराठी कुटुंबे होते त्यांना अजिबात जमले नाही आणि ज्यांच्या घरात कुटुंब प्रमुख भलेही पुढल्या पिढीला नालायक वाटत असेल पण त्याला जर मानसन्मान नसेल, कुटुंब प्रमुखाला बसता उठता पुढल्या पिढीकडून फक्त आणि फक्त अपमानित व्हावे लागत असेल तर अशा कोणत्याही मराठी व्यवसायिक कुटुंबाचा त्याच्या धंद्यात दर्डा होणे अशक्य, पुढल्या काही वर्षात हे असे एकमेकांना लाथा बुक्क्या मारणारे मराठी कुटुंब रस्त्यावर आले, हेच तुम्हाला बघायला मिळेल, तुमच्या घराचाही राजा राणी ट्रॅव्हल्स होतांना वेळ लागणार नाही आणि हे मी स्वतःला, माझ्या कुटुंब सदस्यांना देखील सांगतो आहे, ज्यांनी तुम्हाला यश काय असते हे दाखवून दिले आहे, ज्याने तुमच्या घरात सुबत्ता आणली आहे त्या कुटुंब प्रमुखाला जर पुढली पिढी उठता बसता त्याचे जिणे, जगणे मुश्किल करून सोडत असेल तर, त्यालाच नालायक ठरवून मोकळी होत असेल, थोडक्यात बापाला सेक्स करणे शिकवत असेल तर असे घर, अशी व्यवसायिक मराठी कुटुंबे पुन्हा एकदा रस्त्यावर यायला वेळ लागत नाही...

दर्डा कुटुंबात दोन भाऊ दोन वेगवेगळ्या शहरात, एक औरंगाबादला दुसरा नागपूरला, तरीही बाहेरून बघणार्याला वाटते, हे दर्डा सारे आजही जसेच्या तसे एकत्र, अमराठी व्यापारी कुटुंबे हे असे पिढ्यानपिढ्या एकमेकांना घट्ट बिलगून असतात म्हणून ते कधी संचेती असतात तर कधी दर्डा, यश त्यांच्या पायाशी लोळण घेत असते. व्यवसायिक कुटुंबातल्या प्रमुख तरुणाने या घरातले आपण दुर्योधन नव्हे युधिष्ठिरच व्हायचे आहे हे एकदा मनाशी मनापासून ठरविले कि त्या घराचा उत्कर्ष व्हायला फक्त पुढली काही वर्षे लागतात पण त्याच प्रमुख तरुणाने दुर्योधन व्हायचे ठरविले कि असे घर असे कुटुंब पुढल्या वर्षा दोन वर्षात बरबाद होणार आहे हे सांगायला मग कोणत्याही भविष्य सांगणाऱ्याची गरज नसते...

मला एकदा दिवंगत दिग्विजय खानविलकर म्हणाले होते, यश पचविणे मराठी माणसाला कठीण जाते, त्यांच्यात लगेच भाऊबंदकी सुरु होते, अगदी शिवाजी महाराजांपासून हा इतिहास आपल्यासमोर आहे. आणि खरेही आहे ते, यशाची मस्ती डोक्यात गेली, आपण माजलो कि आपले, आपल्या कुटुंबाचे सारे संपले हे ठरलेले आहे. हेमंत जोशी आक्रमक आहे हे वास्तव पण हेमंत जोशी गर्विष्ठ आहे, माजलेला आहे हे माझ्या पश्चातही माझे विरोधक देखील म्हणणार नाहीत. आणि नेमके हेच मी कुटुंब सदस्यांना सांगत असतो, यश टिकून ठेवायचे असेल तर एकमेकांना घट्ट चिटकून राहा, जमिनीवर राहा आणि घरातल्या थोरामोठ्यांचा, आईवडिलांचा कायम आदर करा. अर्थात मी हे आधी केले म्हणून येथे सांगतिले, मी वडिलांना त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत कधीही उलटून बोललो नाही आणि आजही सकाळची सुरुवात आईवडिलांच्या फोटोला त्यानंतर देवाला नमस्कार करून पुढल्या कामाला लागतो, जणू दर्डांच्या पावलावर पाऊल...
क्रमश:

Thursday, 20 July 2017

विश्वास पाटलांचे काय झाले : पत्रकार हेमंत जोशी


विश्वास पाटलांचे काय झाले : पत्रकार हेमंत जोशी 

हा अंक तुमच्या हाती पडेल तेव्हा मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरु झालेले असेल. या पावसाळी अधिवेशनात मागच्या महिन्यात निवृत्त झालेल्या लेखक आणि प्रशासकीय अधिकारी विश्वास पाटील यांचे काही खरे नाही असे जो तो भेटतो तो मला हेच सांगतो. कारण विश्वास पाटील यांच्यावर एसआरए प्रकल्पात विविध भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यावर मी हेच म्हणतो, पावसाळी अधिवेशनात विश्वास पाटील यांना त्रास होईल, ते चौकशीच्या गंभीर कचाट्यात सापडतील असे अजिबात घडणार नाही, माझे हे वाक्य लिहून घ्या कारण गेली सहा वर्षे म्हणजे आधीच्या दोन मुख्यमंत्र्यांनी आणि त्यानंतरच्या देवेंद्र फडणवीस यांनीही जवळपास सहा वर्षे विश्वास पाटील हे सिनियर मोस्ट प्रशासकीय अधिकारी असूनही त्यांना अडगळीत टाकले होते, विश्वास पाटील यांनी जंग जंग पछाडूनही त्यांना हवे तसे पोस्टिंग मिळत नव्हते, शेवटी त्यांच्या म्हणे विधान परिषदेचे अध्यक्ष श्री रामराजे निंबाळकर मदतीला धावले आणि दस्तुरखुद्द एकप्रकारे न्यायधीशच विश्वास पाटलांच्या मदतीला धावल्याने त्यांना निवृत्त होण्याच्या आधी, साधारण दिड वर्षे आधी जेथे वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पोस्टिंग घेण्या धडपडतात त्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पाठविण्यात आले, त्यांची त्याठिकाणी नियुक्ती करण्यात आली. जे पुरावे इतर कोणाकडेही नसतील ते माझ्याकडे आहेत पण अद्याप ती वेळ आलेली नाही कि प्रसिद्ध न झालेले ते पुरावे मी येथे मांडावेत कारण विश्वास पाटीलांच्या चुका झाल्या नाहीत असे अजिबात नाही पण अत्यंत अत्यंत महत्वाचे असे कि गेली सहा वर्षे अडगळीच्या जागी खितपत पडलेल्या विश्वास पाटलांना प्रकाश मेहता यांच्यासारख्या सत्तेत असणाऱ्या आणि सत्तेच्या अतिशय जवळ असलेल्या नामचीन नेत्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना, राजकीय दलालांना अजिबात दुखवायचे नव्हते, त्यांना कायम भीती वाटायची कि सत्तेशी जवळीक असलेल्या या प्रभावी मंडळींना दुखावले, दूर ठेवले, त्यांच्या मनासारखे वागले नाही, त्यांना दूर ठेवून त्यांच्या मनासारखे निर्णय घेतले नाहीत तर आपली तडकाफडकी उचलबांगडी होऊ शकते हि भीती विश्वास पाटलांना कायम असायची आणि पैशांचे आकर्षण असलेल्या विश्वास पाटलांना झोपू मधून बाहेर पडून पुन्हा एकदा निवृत्त होतांना अडगळीत पडायचे नव्हते, त्यांना शेवटपर्यंत या क्रीम पोस्टवरच चिटकून राहायचे होते त्यामुळे त्यांचा गैरफायदा घेण्यात सत्तेच्या जवळ असणाऱ्या नेत्यांनी, दलालांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हवे तेवढे हात विश्वास पाटलांकडून धुवून घेतले. आणि हीच वस्तुस्थिती आहे. एरवी अतिशय कणखर वागणारा हा मर्द मराठा आमचा हा रांगडा पाटील या साऱ्या प्रकारातून झोपू मध्ये आल्यानंतर अतिशय हळवा झाला होता, त्यांनी स्वतःसाठी काही केले नाही असे मी अजिबात म्हणणार नाही पण यावेळी विश्वास पाटलांनाही झोपूशी संबंधित सर्वांनी खूप खूप वापरून घेतले....

आता राहिला पावसाळी अधिवेशनाचा प्रश्न, तर विश्वास पाटलांच्या मित्रांनी काळजी करावी असे अजिबात घडणार नाही, धनंजय मुंडे असोत कि दस्तुरखुद्द रामराजे निंबाळकर किंवा वादग्रस्त संभाजी झेंडे पाटलांचे बायकोचे भाऊ राधाकृष्ण विखे पाटील असोत कि माणिकराव ठाकरे आणि नेहमीचेच असे असंख्य विधानसभा सदस्य किंवा विधान परिषद सदस्य जे प्रश्न टाकतात नंतर एकतर सभागृहातून गायब होतात किंवा विचारलेल्या स्वतःच्याच प्रश्नाची स्वतःच हवा काढून घेतात, त्यातला एकही विश्वास पाटलांना अडचणीत आणेल असे अजिबात घडणार नाही, हे भविष्य मी आजच तुम्हाला सांगून मोकळा होतोय, चुकून असे घडलेच म्हणजे या सभागृहामुळे विश्वास पाटलांना तुरुंगात जायची वेळ आलीच तर मी कोणत्याही वाहिनीवर येऊन अगदी जाहीर थेट नाक घासून दोन्ही सभागृहाची माफी मागेल...

अहो, विश्वास पाटलांना इतरांसारखे सभागृह सांभाळून घेण्याची अजिबात गरज नाही, सभागृहातल्या ज्यांनी त्यांना लुटले किंवा ज्या ज्या राजकीय दलालांनी त्यांचा गैरफायदा घेतला, तेच त्यांच्या मदतीला सरसावले आहेत, त्यामुळे विश्वास पाटलांची अजिबात काळजी करणे नको. एक मात्र नक्की, विश्वास पाटलांना त्या संभाजी झेंडे पाटलांसारखे बेरकी वागता आले नाही, ते हळवे झाले त्यातून त्यांनी आपले नुकसान करवून घेतले...

जाता जाता : 
मित्रहो, तुम्ही सारे अतिशय सामान्य माणसे. सत्ता फक्त आमच्या हातात आहे, आणि आम्ही आहोत मीडिया, नेते, मंत्री, आमदार, खासदार, विधानसभा आणि विधानपरिषद,सत्तेशी जवळीक असलेले राजकीय दलाल, शासकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी. होय ! सत्ता फक्त आमच्या हाती आहे आणि आम्ही सतत तुम्हाला फक्त आणि फक्त बेवकूफ बनविण्याचे काम करतो, पैसेच खातो. पण होते काय, या अशा सततच्या घरी येणाऱ्या काळ्या पैशातून एक मात्र नक्की आमच्या घरातले वातावरण अतिशय गढूळ झालेले आहे, आम्ही जे तुमच्यासमोर पेश होतो, तो आमचा मुखवटा आहे, आमचा असली चेहरा फक्त आमच्या घरच्यांना पाहायला मिळतो, आमच्या प्रत्येकाच्या घरातले वातावरण अतिशय गढूळ झालेले आहे, येणाऱ्या सततच्या काळ्या पैशांनी आमच्या घरातले कौटुंबिक सुख देवाने केव्हाच हिरावून घेतले आहे. एक उदाहरण देतो. सध्या देशाला पूर्णवेळ सौरंक्षण मंत्री नाही, मनोहर पर्रीकरांनी राजीनामा दिल्याने ती अतिशय महत्वाची जागा अद्याप रिक्त आहे आणि त्याचवेळी पाकिस्थान व चीन या दोन्हीही देशांनी आमची झोप घालविली आहे, अशावेळी दिल्लीत किंवा देशाला संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची अगदी सतत म्हणजे २४ तास गरज असतांना डॉ. भामरे मात्र अतिशय महत्वाच्या दिवसांमध्ये इकडे राज्यातल्या मंत्रालयात एवढ्या येरझाऱ्या घालतात कि त्यांनी स्वतःचे महत्व त्यातून घालविले आहे, अनेकदा डॉ. भामरे हे मुख्यमंत्र्यांच्या किंवा मंत्र्यांच्या केबिन बाहेर ताटकळत बसलेले आम्ही अनेकांनी बघितले आहे, या दिवसात बघतो आहोत. देशाचा संरक्षण राज्यमंत्री येथे मंत्रालयात येतोय कळल्यानंतर अख्खे मंत्रिमंडळ आणि मंत्रालय त्याच्या सभोवताली जमा व्हायला हवे, येथे मात्र नेमके उलटे घडतेय, एखाद्या सामान्य मनासारखे देशाचे हे संरक्षण राज्यमंत्री देशाचे रक्षण करायचे सोडून जेव्हा छुटपूट कामे घेऊन येथे मंत्रालयात फिरतांना दिसतात, मान खाली जाते. उद्या फक्त हे कळू द्या कि नितीन गडकरी मंत्रालयात यायचे आहे, बघा त्यांचे जर मंत्रालयात एखाद्या फिल्मी हिरो सारखे स्वागत झाले नाही तर मला पत्रकार म्हणू नका, वाटल्यास हलकट म्हणा, बदमाश म्हणा, संभाजी झेंडे पाटील म्हणून मोकळे व्हा...
अपूर्ण :

Wednesday, 12 July 2017

कोण कसे : तावडे असे ३: पत्रकार हेमंत जोशी

कोण कसे : तावडे असे ३: पत्रकार हेमंत जोशी 
तुमचं आमचं सेम असतं, आपण सारेच आयुष्याच्या जडणघडणीत नक्की कोणाकडून तरी प्रेरणा घेत असतो, त्याकाळी त्रिशूल मधल्या नायकाचा म्हणजे अमिताभच्या त्या भूमिकेचा माझ्यावर एवढा प्रभाव पडला कि मी खिशात ५०० रुपये, डोक्यावर त्याकाळी दहा लाख रुपयांचे कर्ज आणि जमवलेले एक कोटीच्या घरातले म्हणाल तर रुपये आणि मालमत्ता सबकुछ गमावून मुंबईत आलो होतो, त्रिशूल डोळ्यासमोर ठेवून पुन्हा कामाला लागलो, परमेश्वर नक्की पाठीशी असावा, पुढल्या केवळ वर्षभरात सारे काही परत आले. खूप काही मिळविले त्रिशूल मधल्या अमिताभ सारखे. व्यवसायात पैसे कमविणे जमविणे कठीण असते पण अयोग्य सल्ला देणाऱ्यांच्या कटात कचाट्यात तुम्ही अडकलात कि होत्याचे नव्हते व्हायला काही क्षण पुरेसे ठरतात म्हणून पदोपदी सावध असावे, सावध राहावे...

आमचेही त्या बार टेंडर सारखे झालेले आहे म्हणजे एखाद्या पबमध्ये बार टेंडर म्हणून काम करणारे अनेक असे असतात कि सुरुवातीला ते तेथला साधा सोडा देखील तोंडात घेणे टाळतात पण पुढे पुढे हेच सोवळ्यातले त्या वातावरणाशी एकरूप होतात आणि हळूहळू बॉसचे लक्ष नसतांना आवडीचे मद्य गुपचूप घ्यायला सुरुवात करतात. सतत २४ तास त्या राजकीय पत्रकारितेत डोके खुपसून बसल्याने धीरेधीरे आमच्यावरही या वातावरणाचा एवढा परिणाम झाला आहे कि अलीकडे स्वित्झर्लंड गेलो असतांना तेथल्या रोमँटिक वातावरणातही माझ्या स्वप्नात कधी देवेंद्र फडणवीस यायचे तर कधी अजित पवार, कधी मंदाताई म्हात्रे यायच्या तर कधी भारती लव्हेकर, थोडक्यात हे नेते होलेहोले आमच्यावरही प्रभाव पाडून मोकळे होत असतात, आणि ह्या अशाच एका प्रभावाखाली मी वावरतोय, आणि ते आहेत श्रीमान विनोद तावडे, होय! त्याची पुस्तकाचे गाव हि संकल्पना मला अक्षरश: एवढे बेड लावते आहे कि शासनाची फारशी मदत न घेता मला माझ्या पारखेड या गावात  जवळपास २५ एकर शेतीवर अगदी मनापासून पुस्तकाचे गाव उभारायचे आहे तेही स्वखर्चाने, शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता....

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील एमआयडीसी लगत खेड्यात म्हणजे खामगावपासून फारतर ६-७ किलोमीटर अंतरावर हि बागायती शेती आहे, अडचण अशी कि तेथपर्यंत जाणारा रस्ता अर्धवट बांधून तयार आहे, लालफितीत अडकला आहे, आमचे दोन मित्र हे काम अगदी सहज करू शकतात, तशी विनंतीही मी त्यांना करणार आहे, त्यातले एका आहेत, व्हर्सटाईल जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि दुसरे आहेत राज्याचे कृषी मंत्री श्रीमान भाऊसाहेब फुंडकर, या दोघांपैकी जो कोणी मनात घेईल त्यांच्यासाठी हे काम म्हणजे हातचा मळ, त्यांचे सहकार्य, मी तो अख्खा परिसर बदलवून मोकळा होईन, राज्यातले हे पुस्तकाचे दुसरे गाव असेल...

एकमेकांमध्ये सुसंवाद कोणत्याही मंत्रिमंडळात अतिशय आवश्यक ठरतो, देवेंद्र फडणवीस विकासाच्या कोणत्याही प्रश्नावर पॉझेटिव्ह असतात, हे त्यातल्या त्यात बरे, तावडे म्हणजे कायम अफलातून प्रयोगशील व्यक्तिमत्व, मंत्री, माणूसही, त्यांना इंग्लड च्या धर्तीवर येथे या राज्यातही पुस्तकांची गावे निर्माण करण्याची कल्पना सुचली, त्यांनी ती लगेच गाडणवीसांसमोर मंडळी आणि अमलातही आली, भिलारी,पुस्तकाचे गाव म्हणून जन्माला आले. माझे वाक्य लिहून घ्या, आता हे लोन हळूहळू राज्यात आणि पुढे देशात पसरले नाही तर मला हेमंत जोशी म्हणू नका, नालायक म्हणा, थर्डग्रेड म्हणा, वाटल्यास मला आघाडीच्या सरकारतल्या एखाद्या मोघे यांच्या सारख्या भ्रष्ट मंत्र्याची उपमा द्या. एखादा मंत्री जेव्हा इतिहास निर्माण करतो, त्याचे मनापासून कौतुक व्हायलाच हवे, तावडे त्यास पात्र आहेत...

काय हा अफलातून माणूस, भारतात चक्क पहिल्यांदा पुस्तकाचं गाव हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम फडणवीस आणि तावडे यांनी आकारास आणला आहे, अर्थात अधिक श्रेय नक्कीच तावडे यांनाच द्यायला हवे. होऊन गेलेल्या आर आर पाटलांसारख्या फार कमी मंत्र्यांनी हे असे आगळेवेगळे उपक्रम आणले आणि राबविले, हे असे अफलातून उपक्रम राबविण्यात कायम आघाडीवर असतात या राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते श्रीमान दिवाकर रावते, सलाम या अशा मंत्र्यांना, नेत्यांना, इतरांना या अशा कल्पना का सुचू नयेत, कायम पैसे खाऊन मोकळे व्हावेसे वाटते, याचे अधिक दुःख होते. खरोखरी साहित्य क्षेत्रात हा इतिहास घडविणाऱ्या तावडे यांचे येथे कौतुक करतांना शब्द सुचत नाहीत. पुस्तकाचे गाव या संकल्पनेचे प्रणेते विनोद तावडे, अशी आता त्यांच्या नावाची इतिहासात नोंद होईल. या निमित्ते टुरिझम वाढेल आणि ज्ञानातही भर पडेल वरून हळूहळू गावकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल तो प्रकार तर अधिक कौतुकभरा...

विशेष म्हणजे भिलार मध्ये आजच जवळपास २५ घरांमध्ये १५-१६ हजार एवढी विविध विषयांवरची पुस्तके मोफत वाचण्यासाठी उपलब्ध आहेत, त्यातून या गावाला भेट देणाऱ्यांचा वेग अतिशय झपाट्याने वाढला आहे, येणारे हेच ठरवून येतात कि महाबळेश्वर जायचेच पण भिलार ला अधिक वेळ द्यायचा, अत्यंत कौटुंबिक वातावरण आता त्या भिलार मध्ये बघावयास मिळते आहे, नेमके हेच वातावरण मला त्या छोट्याशा 
पारखेड मध्ये निर्माण करायचे आहे, बघूया कसे जमते ते....

हा लेख संपवितांना मित्रांनो, तुम्हालाही आव्हान, तुम्हीही स्वप्न बघा कि तुमचे गावदेखील पुस्तकाचे गाव बनविण्याचे, कमी तेथे आम्ही, तिथे काही शासकीय अडचण आलीच तर अगदी मनापासून मी तुमच्या संगतीला असेल, चला, उरलेल्या आयुष्यात  
काहीतरी चांगले करूया....

पत्रकार हेमंत जोशी 

Tuesday, 11 July 2017

OFF THE RECORD review on some of todays headlines...

OFF THE RECORD review on some of todays headlines...

1. Housing min OKs windfall SRA proposal for builder-The Times of India 
Front Page story! Lovely exposure, and a must read !! Have time & again written how Prakash Mehta has has gone overboard with his decisions whilst making himself rich...As per what information I possess, there are about 137 files which I think are scrutinised on suspicion grounds for the role retired SRA CEO Vishwas Patil played along with his Cabinet Minister of Housing...Wont be surprised if & when MoS Ravindra Waikar will also be in the net...Anyway, this MP Mill compound file at Tardeo (in todays TOI) is one of those 137 files...Don't be shocked if slowly & steadily all the 137 files stories appear in the papers. The builder in question here is SD Corporation. S stands for Shapoorji Pallonji & D stands for Dilip Thakkar...Before Ajoy Mehta become the Municipal Commissioner, Dilip Thakkar had made BMC Commissioner's office his second home..I'm waiting for someone to expose this Dilip Thhakar who comes in a Rolls Royce and can throw "n" amount of money who are willing to accept it for his work to be done...Kandivali East Samta Nagar is the perfect example of a redevelopment project gone awry...The person who will expose it will be dealt in a severe way...Many liaisioners including a son-in-law of a former MLA had to face dire consequences when he ONLY thought of backing out...They say the whole project of Samta Nagar has been done by SD Corporation in partnership with all the black money an EX CM rotated via this son-in-law of an ex MLA..This Ex-CM who always would smile & work, died a very painful death...

2. Mumbai-Nagpur highway: Probe land grab in Thane, says activist--Hindustan Times
This Baban Harne has become an activist all of a sudden. Good for him...First Mumbai Mirror & then read about him in India Today...he has all the information of all the bureaucrats who have grabbed quite a lot of land banks in and around Thane...Today Harne has claimed that a relative of an officer in the CMO along with 6 other officers have bought land in violation of the Maharashtra Agriculture Land Ceiling Act, 1961...I know who this relative is...If you want to know, you will have to treat me with a "Piyush" at Aswad...

3. "गावोगावी विजय मल्ल्या" A must read how every in every village we have one Vijay Mallya..The said article has appeared in todays Maharashtra Times and is written by BJP spokesperson Keshav Upadhya...Eye-opneer

4 My father Hemant Joshi's blogs on Vinod Tawde--link given below:
कोण कसे : तावडे असे: पत्रकार हेमंत जोशी  http://www.vikrantjoshi.com/2017/07/blog-post_11.html
कोण कसे : तावडे असे २ : पत्रकार हेमंत जोशी  http://www.vikrantjoshi.com/2017/07/blog-post_17.html

कोण कसे : तावडे असे २ : पत्रकार हेमंत जोशी

कोण कसे : तावडे असे २ : पत्रकार हेमंत जोशी 
अलिकडल्या काळात प्राध्यापक वसंत पुरके सोडले तर लक्षात ठेवावेत लक्षात राहतील असे शिक्षण मंत्री झालेच नाहीत, राजेंद्र दर्डा यांच्यासारख्या शिक्षण मंत्र्यांना तर जेवढे लवकर विसरू, तेवढे चांगले. वास्तविक पुरके, नाईक आणि दर्डा हे तिघेही यवतमाळ जिल्ह्यातले, दर्डा आणि पुरके तर खुद्द यवतमाळचे, पण पुरके यांना शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणायचे होते, राजेंद्र दर्डा किंवा पतंगराव कदम यांच्या शिक्षण प्रेमाविषयी मी न बोललेलेच बरे, याच यवतमाळ जिल्ह्यातल्या दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी शिक्षण मंत्री म्हणून दूरगामी आणि आमूलाग्र बदल घडवून आणले, या राज्यात शैक्षणिक क्रांती आणण्याचे श्रेय अर्थात सुधाकरराव नाईक आणि मधुकरराव उर्फ बाळासाहेब चौधरी यांना, चौधरी यांनीच दहा प्लस दोन प्लस तीन हि नवशिक्षण क्रांती या राज्यात तब्बल ४५ वर्षांपूर्वी घडवून आणली. चौधरी यांना गुरुस्थानी मानणारे सुधाकरराव नाईक यांनीहि शेजारच्या कर्नाटक राज्याची भलेही नक्कल केली, अनुकरण केले म्हणजे त्यांनी शिक्षणाचे खाजगीकरण करून उच्च किंवा दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी राज्याबाहेर जाण्याची गरज नाही, हे सिद्ध केले.अर्थात कोणत्याही सरकारी शासकीय योजना चांगल्या असतात पण त्या योजना पुढे लोकांच्या न राहता पुढाऱ्यांच्या दलालांच्या होतात, शिक्षण क्षेत्राचेही खाजगीकरण झाल्यानंतर तेच झाले, या अफलातून कल्पनेचे स्वतःसाठी आर्थिक फायदे घेणारे पतंगराव कदम डी वाय पाटलांसारखे शिक्षण सम्राट जन्माला आले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना लूट लूट लुटून नवश्रीमंत झाले, आजही लुटणे अव्याहत सुरु आहे. अर्थात त्यास अपवाद दिवंगत सुधाकरराव नाईक हेही नव्हते, ते देखील तळे राखी तो पाणी चाखी उक्तीनुसार पुसदचे शिक्षण सम्राट म्हणून पुढे आले, त्यांच्या पश्चात त्याचे चिरंजीव जय यांनी फारसे काही वेगळे केले नाही, आता जय त्या मधुकरराव चौधरी यांच्या चारही मुलामुलींसारखे शिक्षण संस्था चालवतात, मजा मारतात... 

या पार्शवभूमीवर विद्यार्थीमय झालेले शिक्षणमंत्री विनोद तावडे जे म्हणताहेत ते खरोखरी कौतुक करण्यासारखे. तावडे म्हणतात, सर्व स्तरांतील प्रत्येक विद्यार्थ्याला परवडण्याजोगे आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे हे शिक्षण विभागाचे कर्तव्य आहे. म्हणूनच शिक्षण संस्थांमध्ये वाढत असलेले बेकायदेशीर व्यापारीकरण थांबविण्यासाठी शासनाने कडक भूमिका घेतली आहे. वाटेल तशी फीवाढ व विद्यार्थी-पालकांवर लादण्यात येणारे अतिरिक्त खर्च यांच्याविरोधात शाळा प्रशासनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वय, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक स्थान यापलीकडे जाऊन शिकण्याची इच्छा बाळगणार्या प्रत्येकाला शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणे हे आमचे धोरण आहे. त्यासाठी राज्यात मुक्त विद्यालये सुरु करण्याची योजना आखण्यात आली आहे....

संघ भाजपा आणि वसंतराव भगवंतांच्या संस्कारातून म्हणजे विद्यार्थी परिषदेच्या जडणघडणीतून पुढे गेलेले विनोद तावडे, बोलतील एक आणि करतील भलतेच या हीन दीन वृत्तीचे नक्कीच नसावेत किंवा नाहीत त्यामुळे त्यांनी वर जे काय म्हटलंय, ते तसेच सध्या नक्की शिक्षण खात्यात घडते आहे, तावडे शिक्षण मंत्री म्हणून चांगले आहेत. राजेंद्र दर्डा यांच्यानंतर तावडे म्हणजे एखाद्या पीडितेवर बलात्कार करणारा नंतर त्या पीडितेला हळुवार चुचकारून सांभाळून पुढे तिच्याशी लग्न करून तिला समाजात मनाचे स्थान देणारा हा जो त्या दोघातला फरक असतो, येथेही या दोघांच्या बाबतीत नेमके असे, आधीच्या सरकारात शिक्षण खात्याची रांड केल्या गेली, तावडे 
तिला पुन्हा माणसात आणताहेत...छान...!! 

तावडे पुढे जे सांगताहेत ते तर अगदी जाहीर दाद द्यावी असे, तावडे म्हणाले, विद्यमान रात्रशाळांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे, मी जातीने शिक्षणाचा दर्जा एकसारखा राहील त्यासाठी सतत प्रयत्न करतोय. महत्वाचे म्हणजे गेल्या १५ वर्षात त्यांच्या अनेक समस्यांचे अजिबात निराकरण करण्याचा साधा प्रयत्न देखील केल्या गेला नाही, ते काम तातडीने आम्ही हाती घेतले आहे. सर्वांना उत्तम आणि समान शिक्षण हे माझे नक्की ध्येय आहे, रात्रशाळा बंद पडणार नाहीत याची पुरेपूर काळजी आम्ही 
घेतो आहे. महत्वाचा मुद्दा असा कि शिक्षकांच्या भरतीमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे कुशल उत्तम कार्यक्षम शिक्षकांच्या नोकरीच्या संधी हुकतात, हा भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हावा आणि शिक्षकांची भरती निव्वळ गुणवत्तेवर व्हावी, यासाठी केंद्रीय पद्धत आम्ही येथेही सुरु करतो आहे. देव करो, तावडेंच्या प्रयत्नांना यश मिळो..मुख्यमंत्री महोदय तेवढे ते औकाफ खात्याचे बघा अन्यथा काही दिवसानानंतर 
विनोद तावडे डोळ्यात सुरमा घालून मंत्रालयात दिसल्यास फारसे आश्चर्य वाटणार नाही...
तूर्त एवढेच.

कोण कसे : तावडे असे: पत्रकार हेमंत जोशी


कोण कसे : तावडे असे: पत्रकार हेमंत जोशी 
मित्रहो, आंधळं प्रेम म्हणजे काय...? 
उत्तर सोप्प आहे, 
ती आपली होणार नाही हे 
ठाऊक असूनही, 
फेसबुकवरील तिच्या डीपी कडे 
भिक्कारयासारखे बघणे म्हणजे 
आंधळं प्रेम....!! 
नेत्यांच्या, मंत्र्यांच्या बाबतीतही तेच, भेटणाऱ्याने फक्त ताटकळत राहायचे, मंत्र्याकडे एकटक बघत राहायचे भेटीसाठी आसुसले व्हायचे याला म्हणतात जनतेचे एकतर्फी प्रेम पण ते प्रेम फारकाळ टिकत नाही, एकदा का जनतेने पाठ फिरवली कि जनतेचे मन हे सनी देओलच्या ढ़ाई किलो हातासारखे असते म्हणजे पुढारी पुन्हा आयुष्यातून उठत नाही, सार्वजनिक जीवनातून उठ जाता है...

जे जनतेच्या मनातले ओळखतात, जे सामान्य माणसात रमतात, त्यांना प्रेमाने जवळ घेऊन विचारपूस करतात, शक्य असेल ती मदत करतात, आज या उद्या या परवा बघू जमले तर करतो शक्य असेल तर नक्की करतो अशी बीनभरवशाची भाषा वापरून भेटणाऱ्या लोकांना हाती पोकळ वचनांचे लॉलीपॉप न देता खरीखुरी मदत करतात ते नक्की आयुष्यातली अनेक वर्षे नेतृत्व नेता म्हणून मोठे होतात, त्यांच्यातलाच एक 
म्हणजे राज्याचे शालेय शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण क्रीडा आणि युवक कल्याण औकाफ तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे. त्यांना मी मासिक पाळी जाण्यापूर्वी म्हणजे उशीर लग्न झालेल्या मुलीची उपमा देतो कारण तावडे नेते म्हणून फॉर्म मध्ये आले आणि २००० साली युतीचे राज्य गेले त्यामुळे तावडे यांना मंत्री होण्यासाठी पुढली तब्बल १५ वर्षे वाट बघावी लागली, ते दिसतात तेवढे तरुण पण नेते म्हणून भाजपच्या सिनियर रांगेतले तावडे आहेत, मध्यंतरीच्या काळात युती सत्तेत नसल्याने तशी मंत्री होण्याची संधी तावडेंना उशिरा चालून आलेली आहे पण संधीचे बऱ्यापैकी सोने करण्यात ते नक्कीच यशस्वी ठरले आहे, एकाच वेळी अनेक वाद्ये वाजविणाऱ्या वादकासारखे तावडे, म्हणजे त्यांना त्यांचा बोरिवली विधान सभा मतदारसंघ संभाळायचा असतो त्याचवेळी मी परफेक्ट मंत्री कसा हे देखील केवळ दिखाव्यातून नव्हे तर मंत्रालयात राबून आणि जनतेत रमून दाखवायचे असते, महत्वाचे म्हणजे त्यांच्याकडे कोकणचे, मुंबईचे, कधी कधी उभ्या राज्याचेही लोकनेतृत्व म्हणून बघितल्या जाते, त्यातही त्यांना कमी आहोत हे दाखवायचे नसते प्लस भाजपच्या अंतर्गत संघटना घडामोडीत देखील त्यांना कायम सहभाग करून घेतल्या जाते, आणि तावडे हे सारे एन्जॉय करतांना दिसतात, ते थकलेभागले, गायब झाले असे कधी घडत नाही, नेतृत्व म्हणजे त्यांना चढलेली नशा, लहान वयापासून जडलेले हे सामाजिक व्यसन, आता त्यांना त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कोणीही या जडलेल्या व्यसनातुन बाहेर काढणे अशक्य, उद्या अगदी एखादी अभिनेत्री जरी डोळा मारून म्हणाली, सोडा हे सारे आणि चला आपण कुठेतरी दूर निघून जाऊ, तरीही शक्य नाही. त्यांना समाजकारणाच्या आणि राजकारणाच्या व्यसनाने जखडले आहे, हे असे व्यसन अनेकांनी लावून घ्यावे, ये दाग अच्छे लगते है...

आक्रमक केव्हा व्हायचे, चार पावले मागे केव्हा सरकायचे, कुठे शांत बसायचे, समोरच्याला कसे शांत करायचे, प्रसंगी विरोध कसा करायचा किंवा पुढल्या क्षणी एखाद्या कट्टर विरोधकाला देखील कसे आपलेसे करायचे, बोलीभाषेतून एखाद्याला क्षणार्धात कसे जिंकायचे हे तावडे यांना छान जमते त्यामुळे असे नेते राजकारणात टिकून राहतात, सुरुवातीला वाटले होते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणारे विनोद तावडे पुढे मंत्री झाले आणि फारशी महत्वाची खाती देखील त्यांच्याकडे आली नाहीत, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ खाते विनोद तावडे यांच्याकडे देणे म्हणजे बकरा बळी देतांना पूजेला दादासाहेब धर्माधिकारींना किंवा पांडुरंगशास्त्री आठवले यांना बोलाविण्यासारखे किंवा मुलबाळ न होणाऱ्या स्त्रीला सहकार्य करण्यासाठी प्रसंगी वीर्य दान करण्यासाठी करण कपूरला पाचारण करण्यासारखे, पण तावडे यांनी तेथेही, कमी महत्वाच्या खात्यांमध्येही मी कमी नाही, खाते मग ते कोणतेही असो, त्यातही मी वेगळी छाप मारू शकतो, त्यांच्या पक्ष श्रेष्ठींना दाखवून दिले, विशेष म्हणजे जे खडसे यांचे चुकले ती चूक तावडे यांनी केली नाही, चाणाक्ष तावडे यांना आपले जुने सहकारी देवेंद्र फडणवीसांची राजकीय ताकद मुख्यमंत्री म्हणून कशी मोठी ठरू शकते, माहित होते, त्यांनी ते ताडले होते त्यातून तावडेंनी फडणवीस यांच्याशी कुठलीही कटुता अगदी सुरुवातीपासून न ठेवता आवश्यक तो सन्मान त्यांना दिला, फायदा नक्की झाला, फडणवीस आणि तावडे यांचे हे मधुर संबंध, तावडे आपली राजकीय छाप त्यातून मारून मोकळे झाले, त्यांचे नेतृत्व मंत्री झाल्यावर मग अधिकच बहरले....

मला वाटते खूप वर्षानंतर म्हणजे मधुकरराव चौधरीनंतर या राज्याला तावडेंच्या रूपात असा शिक्षण मंत्री मिळाला कि तो या राज्यातल्या प्रत्येक विद्यार्थाला आपला वाटतो एवढे तावडे विद्यार्थीमय होतात, सतत या ना त्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात असतात आणि हे असे संपर्कात राहणे त्यांना अजिबात नवीन नाही, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आधी पूर्णवेळ कार्यकर्ते नंतर प्रमोट होऊन विद्यार्थ्यांचे नेते म्हणून ते तसेही सतत विद्यार्थ्यांच्या गराड्यात पडलेले, त्यांच्या विधान सभा परिघातही तेच, स्टुडंट बेस प्रोग्रॅम राबविण्यावर त्यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सतत कटाक्ष असतो, तावडेंच्या या अशा बिद्यार्थिप्रिय नेतृत्वातून ते आपोआप घराघरात पोहोचतात, ज्या त्या विद्यार्थ्यांच्या घरातले ते चर्चेचा, कौतुकाचा विषय ठरतात, तावडें यांची त्यातून या राज्यातली लोकप्रियता वाढत गेली आहे. राजयातल्या मराठा नेत्यांनी कसे लोकप्रिय व्हावे ठरावे हे विदर्भ, मराठवाडा, खान्देश किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा नेत्यांनी कायम, नेहमी सतत कोकणातल्या या अशा मराठा नेत्यांकडून शिकत जावे मग ते कधी नारायण राणे असतील तर कधी विनोद तावडे किंवा आशिष शेलार....
अपूर्ण :