Wednesday, 28 June 2017

पवारांचे अधःपतन : पत्रकार हेमंत जोशी

पवारांचे अधःपतन : पत्रकार हेमंत जोशी 


माझे मित्र असलेले, अलीकडे एक प्रशासकीय अधिकारी मुद्दाम येऊन मला भेटले, हेमंत, मला बदली हवी आहे, मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालता येईल का, त्यांच्या या वाक्यावर मी अवाक झालो, तातडीने मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर यांना फोन लावला, बदलीचे प्रयोजन सांगितल्यावर त्यांनीही पलीकडे कपाळाला हात लावून घेतला, अर्थात पुढल्या काही दिवसात म्हैसकरसाहेब म्हाडा मध्ये रुजू झाल्याने पुढे हा विषय त्यांच्याकडे लावून धरता आला नाही, मंत्र्यांकडून कामे करवून घ्यायची वरून अमाप समाप पैसे मिळविताना दादागिरीही करायची, पत्रकारितेतील मी हलकट हरामखोर नीच अरविंद ठाणेकर नव्हे, त्यामुळे जेथे पैसे खातोय असा अजिबात संशय देखील येणे अशक्य, अशांची कामे मात्र मी हिरिरीने करतो, त्यामुळे हे बदलीचे काम सांगणाऱ्या अति सज्जन देवभक्त देशभक्त प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीचे काम मी करवून घेतांना पैसे घेतले हा आरोप होणे शक्य नव्हते, त्यामुळे त्यांच्या बदलीसाठी धडपड करतांना काहीही वाटणार नव्हते....

आता मी आणि म्हैसकर साहेब यासाठी अवाक झालो कि या प्रशाकीय अधिकाऱ्याला निवृत्त व्हायला जेमतेम दिड वर्ष उरलेले म्हणून माननीय 
मुख्यमंत्री कार्यालयातून त्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्याच्या ठिकाणी पोस्टिंग देण्यात अगदी अलीकडे देण्यात आले होते. आले, ते प्रशासकीय अधिकारी देखील अत्यानंदाने आपल्या मूळ शहरात रुजू झाले होते. विशेष म्हणजे हे महाशय अजिबात अजिबात पैसे न खाणारे, आणि पोस्टिंग जेथे झाले होते ते तर अमाप समाप पैसे मिळवून देणारे, या खात्यात कुठलीही कामे न करता फक्त आणि फक्त पैसे कसे आणि किती खायचे त्यावर ओळख असेल तर दुसरे एक प्रशासकीय अधिकारी राजीव जाधव यांना विचारा, या खात्यातील अंदाधुंद दरोडे त्यावर ते डॉक्ट्रेट मिळवू शकतील. त्यामुळे या खात्यात ते सज्जन सुसंस्कृत प्रशासकीय अधिकारी केवळ दोन महिन्यांच्या कालावधीतच कंटाळले, म्हणाले, अहो, सकाळी कार्यालयात पाय ठेवत नाही तोच केबिन बाहेर वर्षानुवर्षे आमच्या खात्याला लुटणारे कंत्राटदार तहान मांडून बसलेले असतात, त्यांना कसेबसे बाहेर घालवत नाही तोच इकडे आमच्या खात्याच्या मंत्र्याच्या अतिशय उद्धट उर्मट मुलाचा आणि त्या मुलास मदत करणाऱ्या आमच्या मंत्र्याच्या स्वीय सहाय्य्कचा आणि खाजगी सचिवांचा फोन एवढा खणाणतो कि विचारू नका, नको त्या कामात मी त्यांच्या सांगण्यावरून निर्णय घ्यावे, हे तिघेही एवढा दबाव आणतात कि विचारू नका, अशावेळी मनाला वाटते, सरळ दीर्घ रजा टाकावी आणि घरी निघून जावे, आम्ही हा प्रकार माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर तर घातला आहे आता अर्थात आमच्या हाती वाट पाहणे आहे कि मुख्यमंत्री त्यावर नेमका कुठला आणि कसा निर्णय घेताहेत ते.....

आयुष्यातील चुकीचे निर्णय कोणते, त्यातून झालेली बदनामी आणि नुकसान, यावर अजूनही श्री शरद पवार चिंतन मनन करून पुन्हा अशा चुका होणार नाहीत याची जर काळजी घेणारच नसतील तर वारंवार ठरवून केलेल्या एखाद्या नामचीन गुन्हेगाराच्या पंक्तीला बसण्यातला हा प्रकार, जो मी पुढे मांडतोय. एखादी चूक एखाद्या वेळी एखाद्याच्या हातून घडू शकते पण पुनःपुन्हा तेच ते आणि तेच ते, शी, सारे काही सामान्य माणसाला समजण्यापलीकडले पवारांचे हे वागणे ....

अलीकडे म्हणजे १४ जून रोजी अतिशय वादग्रस्त असे प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख जे पूर्वी शरद पवार मुख्यमंत्री असतांना त्यांचे खाजगी सचिव होते, ते निवृत्त झाले, त्यांच्या भ्रष्टाचार्यांच्या असंख्य कथा जेव्हा केव्हा मी एका कर्तव्यत्पर आयपीएस अधिकाऱ्याकडून ऐकल्या आहेत किंवा आरटीआय आक्टिविस्ट विजय कुंभार यांच्या कडूनही ऐकल्या आहेत त्या देशमुखांचा सत्कार जेव्हा शरद पवार यांच्या हस्ते सेवापूर्ती निमित्ते करण्यात आला, भाषणातून पवार म्हणाले, प्रभाकर देशमुखांनी राजकारणात यावे, वाचल्यानंतर नेहमीप्रमाणे कपाळावर हात मारून घेतला. पवारांना माहित आहे, सभोवताली त्यांनी जे बहुसंख्य अतिशय विषारी असे नग पाळले, ज्यातून उभा महाराष्ट्र नागडा करण्याचे पाप पवारांच्या या तमाम बगलबच्चयांनी केले, या अशाच वृत्तीच्या, प्रवृत्तीच्या लोकांना जर पवार पुनःपुन्हा राजकारणात किंवा सत्तेत आणण्याचे स्वप्न बघत असतील तर काय म्हणावे पवारांना आणि कोणत्या शब्दात हणावे या बुजुर्ग नेत्याला...? अतिप्रचंड ताकदीचे नेते हे शरद पवार, ज्यांना उठताबसता फक्त खाणे तेवढे ठाऊक, अशा मंडळींना पवार यांनी जवळ करणे किंवा ज्या आजूबाजूच्या लोकांनी, माजी मंत्र्यांनी, देशमुखछप अधिकाऱ्यांनी पवारांना अडचणीत आणून येथे मुंबईत आणून बसविले तेच शरद पवार जर या अशा लुटारू वृत्तीच्या अधिकाऱ्यांना नेत्यांना दलालांना भ्रष्टाचार्यांना पुन्हा एकवार आपल्या कवेत घट्ट पकडत असतील तर हेच म्हणता येईल, खरे दोषी शरद पवार हेच आहेत आणि त्यांनाच खाजवून खाजवून खरूज काढायची आहे....

हा लेख संपवितांना एक अतिशय महत्वाच्या बातमीकडे वळतो. माझा हा लेख तुम्ही जपून ठेवा, राष्ट्रपती पदाची निवडणूक आटोपल्यानंतरच्या काही दिवसात आपल्या या राज्यात मोठी खळबळ माजणार आहे, अनेक माजी मंत्री आणि नेते तुम्हाला तुरुंगात गेल्याचे बघायला मिळणार आहे, आणखी महत्वाचे म्हणजे राज्यातले कित्येक राजकारणातील नामवंत घराणी भाजपा मध्ये जाताहेत, तुम्हाला बघायला मिळेल......जेव्हा पवार अगदी जाहीर भाषणातून सांगतात कि विधान परिषदेचे अध्यक्ष राम राजे नाईक निंबाळकर व माजी प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख यांची जोडी साताऱ्याच्या दृष्टीने योग्य दिसते, देशमुख यांच्या पाठीशी शक्ती उभी करावी, त्यांनी राजकारणात यावे, शिवाजी महाराजांच्या साताऱ्यातले 
हे घसरलेले राजकारण मनाला उबग आणते....शी....!!

No comments:

Post a comment