Friday, 2 June 2017

लोकमत आणि लोकसत्ता २ : पत्रकार हेमंत जोशी

लोकमत आणि लोकसत्ता २ : पत्रकार हेमंत जोशी 

पूर्वीचा हा किस्सा आहे, जळगावला नियमित व्यायाम करून कुस्त्या खेळणारा आनंद नामें माझा एक मित्र होता, एकदा तिवारी आडनावाच्या एका कंजूष मित्राने आम्हाला जेवण्यासाठी हॉटेलमध्ये नेले, मी आणि तिवारी शाकाहारी, पुढल्या दहा मिनिटात आमची जेवणे उरकलीत, आनंद चा खुराक जबरदस्त होता, त्याने २० चपाती आणि चार प्लेट चिकन संपविल्यानंतर कंजूष तिवारी त्याला न राहवून म्हणाला, आनंद बीच बीच में पानी भी पिया कर....त्यावर आनंद खालची मानही वर न करता म्हणाला, क्यू नहीं क्यू नहीं....खाने का बीच समय आया कि वो भी पी लुंगा, दो बिसलेरी मंगा के रखना प्लिज....लागोपाठ १५ वर्षे सत्तेत असतांना, गावित किंवा तटकरे सारख्या बहुतेक त्या काळातल्या सर्वच मंत्र्यांना अनेकदा विचारावेसे वाटे कि काळे धन कमावण्याचा कंटाळा आला कि जनतेला तेवढे सांगा, अर्थात उत्तर त्या आनंदसारखेच आले असते, कंटाळा आला कि सांगू कि....

लोकसत्ता दैनिकातील १७ मे च्या अंकातील बातमीनुसार एअर इंडियाची आर्थिक स्थिती सध्या अतिशय हलाखीची आहे, करण्यात आली आहे म्हणजे एअर इंडियाचे अध्यक्ष अश्विनी लोहाणी यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते कि, एअर इंडियावर असलेला कर्जाचा मोठा बोजा हे सर्व समस्यांचे मूळ आहे, एअर इंडियावर ४८ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि त्यांनी हे खापर युपीए सरकारच्या धोरणावर पर्यायाने त्याकाळचे या खात्याचे मंत्री प्रफुल्ल पटेल त्यांच्यावर फोडले आहे, वाचकहो, आणि हीच वस्तुस्थिती आहे, या शरद पवारांना कधी कळलेच नाहीं कि राज्याचे किंवा देशाचे वाटोळे करणाऱ्या सवंगड्यांना दूर कसे ढकलायचे, उलट पवार त्यांना अधिक बिलगत गेले पर्यायाने कधी अजितदादा सारख्या अतीभ्रष्ट मंत्र्यांनी या राज्याला आणि प्रफुल्ल पटेलांसारख्या केंद्रीय मंत्र्यांनी या देशाला लुटण्याचे लुबाडण्याचा मोठे पाप करून ठेवले. अशावेळी जेव्हा केव्हा प्रतिभाताई पाटलानंतर शरद पवार यांचेही नाव राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत आहे असे ऐकतो, आपला मुक्काम एक दिवस नक्की वेड्यांच्या इस्पितळात हलवावा लागणार आहे, असे त्यावेळी राहून राहून आम्हाला, आमच्या मनाला वाटते...

खाजगी विमान कंपन्यांना ताकद देऊन एअर इंडिया संपविण्याचे जे पाप ज्या हरामखोर प्रफुल्ल पटेलांनी केले आहे त्या पटेलांचे उदात्तीकरण जर दर्डा यांचे लोकमत करणार असेल तर दर्डा यांना गमतीने जे ' दरोडा ' म्हटले जाते तेच त्यांचे आडनाव त्यांना यापुढे अधिक शोभून दिसेल असे म्हणता येईल. खाजगी विमान कंपन्यांना आधुनिक आणि देखणे विमानतळ हि त्यांची गरज लक्षात घेऊन प्रफुल्ल पटेल यांनी देशातले सारे एअर पोर्ट्स देखणे चकचकीत अत्याधुनिक करून सोडलेत आणि त्या खर्चाचा बोझा सरकारवर टाकून वर स्वतः किती मलिदा फस्त केला हे लवकरच भारतीयांना कळणार आहेच, महत्वाचे म्हणजे एअर इंडियाला दिवाळखोरीत ढकलण्याचे काम पाप प्रफुल्ल पटेल या व्यापारी वृत्तीच्या नेत्याने पवार आणि सोनिया यांना हाताशी धरून केले आहे. एक नक्की सांगतो, शरद पवार यांनी हि जी पापी पिल्लावळ मोठी केली त्याची मोठी खंत आज त्यांना आयुष्याच्या उतरणीवर नक्की आहे किंवा ते तसे अलीकडे खाजगीत अनेकदा बोलून दाखवीत असल्याचे माझी माहित आहे, सच्चा सवंगडी दत्ता मेघे केवळ प्रफुल्ल पटेलांच्या कान भारण्यावरून सत्तेत असतांना शरद पवारांनी काहीशा आर्थिक लोभातून आणि लाभातून म्हणजे प्रफुल्ल पटेलांच्या सांगण्यावरून अडगळीत नेऊन ठेवला खरा, पण आज त्यांना त्या प्रकारचे नक्की मनापासून वाईट वाटत असावे. एकेकाळी पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आमच्या विदर्भातही दिमाखात वावरत होता पण पट्टीचे शिलेदार पवारांनी केवळ पटेलांच्या प्रेमापोटी अडगळीत टाकले, त्यांना अपमानित करण्यात आले, त्याचा मोठा फायदा भाजपाला झाला, विदर्भात आता राष्ट्रवादी औषधाला तेवढी शिल्लक आहे. एकाचवेळी सोनिया गांधी आणि शरद पवार या दोघांनाही अतिशय धूर्तपणे खेळवून एअर इंडीआयला मातीमोल करून सोडणाऱ्या प्रफुल पटेलांचे लोकमतने उदात्तीकरण का करावे म्हणजे पर्यायाने आमच्या संस्कारक्षम सरळमार्गी मराठी माणसात या अशा भामट्या नेत्याला लोकमतने संजीवनी देऊन हिन पातळी का गाठावी, डोके सुन्न करणारा हा प्रकार आहे...
अपूर्ण :

No comments:

Post a comment