फुक्काची बदनामी : पत्रकार हेमंत जोशी
अलीकडे आमदार मंदाताई चित्रेंना कोरियामधून एक स्त्री
कुठलेसे काम घेऊन भेटायला आली..
तू या वयातही एवढी स्लिम सडपातळ कशी गं,
मंदाताईंनी न राहवून तिला विचारले..
नथिंग स्पेशल, मी फक्त तीन चमचे
भात खाते...
अच्छा...मग ठीक आहे..
मला नाही हे जमायचे...
मी तर बिर्याणी करता करता, शिजली कि
नाही म्हणून बघायला तीन चमचे तोंडात टाकते....!!
आणखी एक चुटका :
पुण्यातले, मंत्री दिलीप बोंबले लहान असतानाचा
हा किस्सा...
मला संस्कृत शिकवा, गोखले गुरुजींकडे
त्यांनी मनातली इच्छा व्यक्त केली..
का...गोखल्यांनी विचारले.
बोंबले : स्वर्गात गेलो तर देवांची हि भाषा,
ती समजायला हवी म्हणून...
गोखले तिरसटपणे : आणि नरकात गेला तर...?
त्यावर बोंबले : पुण्यात काय उपटायला राहिलेलो
नाही....हरामखोरा...
शिव्या येतात कि मला...नरकात गेलोच
तर सगळ्यांची आय माय नाही....
चुटके संपले पण पुढला विषय मात्र गमतीने घेऊ नका, व्हेरी सिरीयस...
मला वाटते मागे फार पूर्वी एकदा माझ्याबाबतीत घडलेला एक किस्सा तुम्हाला मी सांगितलं होता, वाटल्यास पुन्हा एकदा रिपीट करतो. सध्या मी सांताक्रूझ पश्चिमेला राहतो, यापूर्वी वर्सोव्याच्या सात बंगला परिसरातील ज्या इमारतीत राहत असे माझे सख्खे शेजारी उच्चशिक्षित मुस्लिम कुटुंब होते, माझ्या आणि त्यांच्या घरातल्या स्त्रियांचे एकमेकांकडे नियमित जाणे येणे होते, घरोबा होता, एवढा घरोबा कि सांताक्रूझला राहायला आल्यानंतर आम्ही त्यांना आमची एक सदनिका बाजारभावापेक्षा कमी किमतीत विकली होती, त्यांच्या आनंदाला त्यावेळी पारावार उरलानव्हता. मात्र एकदा काय झाले, या मुस्लिम कुटुंबातील स्त्रियांनी एकदा अचानक आमच्याशी बोलणे बंद केले. कुठलेही भांडण किंवा वाद नाहीत, हे असे का घडले, त्यांना विश्वासात घेऊन विचारल्यानंतर मिसेस चौहानम्हणाल्या, हेमंत जोशी म्हणे मंत्र्यांना बायका पुरावतात. हे ऐकून अंगावर वीज पडावी तसे झाले पण त्यांना आणखी विश्वासात घेऊन विचारले असता मिसेस चौहान म्हणाल्या, आपल्याच इमारतीतल्या अमुक एका जोडप्याने आम्हाला हे सांगितले, आणि खरे यासाठी वाटले कि त्या जोडप्याचाही मंत्रालयाशी संबंध येतो....मग मी एक केले, माझे काही अंक त्यांना वाचायला दिले, पुन्हा एकदा उद्या बोलूया त्यांना सांगितले. रात्री मग त्या साऱ्यांनी ते अंक मराठीत असल्याने सावकाश सामूहिक वाचले आणि दुसरे दिवशी अगदी सकाळी त्यांच्यातले बुजुर्ग येऊन म्हणाले, जो माणूस मंत्र्यांची एवढी फाडून ठेवतो, तो हे असले धंदे करणे अशक्य. आम्हाला माफ करा, आणि संबंध पूर्ववत झाले. उपर देर है अंधेरी नहि, ज्या अतिशय चिप कुटुंबाने आमची हि अशी गचाळ पद्धतीने बदनामी केली होती, बघा, जे घडू नये ते त्या कुटुंबात घडले, त्यांचे एकुलते एक मूल पुढल्या दोन महिन्यात अचानक देवाघरी गेले. आईची शपथ, आम्हाला मात्र त्यावेळी रडू थांबवत नव्हते. अर्थात माझे कुटुंब त्यावेळी नक्की डिस्टर्ब् झाले होते, मला मात्र या अशा फ़ुक्काच्या बदनामीची सवय झाली आहे. आक्रमक लिहितो त्यामुळे पित्तपत्रकारिता करतो, हि नाहक बदनामी तर नेहमी वाटयाला आलेली, हेमंत जोशी कुठे सापडतो, त्यावर तर अनेकांची बारीक नजर, पण घर असो कि माझे मुंबईतले कार्यालये, किंवा आमच्या कार्स, दारे सर्वांसाठी सतत सताड उघडी असतात, जे जवळ येतात त्यांना नेमके लक्षात येते, आम्ही बाप बेटे वेगळे कसे अर्थात माणसाची नजर आणि नियत साफ असली कि फारशी काळजी करायची नसते, जळणारे त्यांचे काम करतात....
हा विषय यासाठी कि हा असाच प्रसंग फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यातच त्यांच्या काही जिवलगांवर ओढवला होता, त्यांचे नागपुरातले काही मित्र आणि घरातलेच एक सदस्य मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेल मध्ये काही रशियन वेशांसंगे नको त्या अवस्थेत पोलिसांना सापडले आणि शरद पवार यांनी त्या साऱ्यांना पोलिसांच्या तावडीतून अलगद बाहेर काढले, हि ती बातमी त्यावेळी वाऱ्यासारखी सर्वदूर पसरली होती, जी नावे त्या प्रकरणी सांगितल्या जात होती, ती नावे मला ठाऊक असूनही याठिकाणी मी मुद्दाम टाळतोय. पण या बातमीने नेमके झाले असे कि त्या चारही तरुणांच्या घरातले वातावरण एवढे बिघडले कि घटस्फोटापर्यंत आले होते, त्यातल्या एका तरुण नेत्याची आई तर हट्टाला पेटली होती कि त्याने राजकारण सोडून द्यावे....आता पुढला अत्यंत अत्यंत महत्वाचा मुद्दा असा कि हे प्रकरण वास्तवात घडले होते का....अजिबात अजिबात अजिबात नाही, असे काहीही घडले नव्हते. मला त्यावर अलीकडे मिळालेली माहिती अशी कि, नागपुरातल्या ज्या एका नीच लबाड हलकट थर्डग्रेड बदमाश नेत्याला फडणवीस किंवा त्यांच्या या मित्र कंपूने कुठल्याशा महत्वाच्या निवडणुकीत चारी मुंड्या चीत केले होते, पराभूत केले होते त्या बास्टर्ड नेत्याने नागपुरातील एका कायदे जाणाऱ्या नामवंत व्यक्तीला हाताशी धरून अतिशय नियोजनपूर्वक असा हा कट रचला होता, यशस्वीपणे राबवून तो मोकळा झाला होता. अर्थात फुकाची बदनाम झालेली हि मंडळी जेव्हा या बदनामीच्या मुळाशी गेली, तेव्हा त्यांना नेमके नाव आणि नेमके सत्य समजले होते. विलासराव देशमुख आणि रीमा लागू आज हे दोघेही हयात नाहीत पण त्या दोघांचेही याच पद्धतीने घडलेले कि न घडलेले दादरच्या एका हॉटेलातले प्रकरण ९० च्या दशकात असेच विलासरावांना बदनाम करून मोकळे झाले होते. विलासराव मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून एका पावरबाज नेत्याने ते पसरविले होते, असे खाजगीत हमखास त्याकाळी सांगलीतल्या जाई. दिवंगत माधव गडकरी यांनी तर हे लफडे लोकसत्तामधून बेधडकपणे त्याकाळी मांडल्याचे मला आठवते. हे प्रकरण ज्या नेत्याकडून का मंत्र्यांकडून पसरविले होते, मराठवाड्यातलया त्या त्याकाळच्या मंत्र्यांचे, नेत्याचे बाबतीत पुढे नेमके तेच घडले,तदनंतर तो पैलवान नेता ना कधी मंत्री झाला, ना कधी निवडून आला, तेच ते, देर है अंधेर नहीं...
महत्वाचे म्हणजे, देवेंद्र फडणवीस यांना अतिशय नियोजनपूर्वक अडचणीत आणण्याचे बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र सध्या यशस्वी होतांना दिसते आहे, आश्चर्य म्हणजे त्यांना राजकारणातून घालवू पाहणारे ना सेनेचे आहेत, ना विरोधी पक्षातले, ते आहेत त्यांच्याच मंत्री मंडळातले दोन बिलंदर मंत्री, आणि एक माजी मंत्री, त्यांच्याच भाजपाचे....काळजी करू नका, जेव्हा मम् वाटेल कि त्या मंत्र्यांचे, नेत्यांचे वागणे आणि
डावपेच अति झाले आहेत, सारे पुरावे आणि त्या मंत्र्याची लफडी मी समोर आणून मोकळा होईन....डोन्ट वरी...
No comments:
Post a comment