Wednesday, 31 May 2017

संघ शिक्षा वर्ग आणि तुमची आमची मुले : पत्रकार हेमंत जोशी


संघ शिक्षा वर्ग आणि तुमची आमची मुले : पत्रकार हेमंत जोशी 

पोलीस अधिकारी गणोरे यांच्या घरात हत्याकांड घडले आणि काळे धन मिळविणाऱ्यांच्या घरात ते घडले नाही एवढाच काय तो फरक पण बहुतेक ठिकाणी वातावरण तेच असते जे गणोरेच्या घरात होते, आईचा खून करून अगदी सहज त्यांचा मुलगा दोन लाख रुपये रोख घेऊन पळाला. जेमतेम वेतन असणारे गणोरे महागड्या भाड्याच्या सदनिकेत राहत होते, पत्नी लंडनहून अमाप पैसे खर्च करून शिकून आली होती आणि त्यांच्या घरात दोन लाख रुपये असे काही पडले होते जसे एखाद्या शेतकऱ्याच्या घरात धान्याचे पोते पडलेले असते. जे गणोरेच्या घरातले वातावरण होते, काळे पैसे मिळविणाऱ्या प्रत्येक कुटुंबाच्या घरातले वातावरणही हुबेहूब असते,वेळ निघून गेलेली असते आणि पश्चातापाशिवाय काहीही मागे उरलेले नसते. गणोरेचें तुमचे आमचे सेम असते, प्रत्येक घरातले वातावरण प्रमोद महाजनांच्या घरासारखेच असते आणि हे घडू नये असे तुम्हाला वाटत असेल तर जात पात धर्म पक्ष सारे काही विसरून आधी माझ्या उद्या प्रसिद्ध होणाऱ्या अंकात ' राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ शिक्षा वर्ग ' हा लेख आधी वाचा नंतर तो पाठ करून इतरांना सांगा आणि तुमच्या घरातल्या पुढल्या पिढीला किमान बारावीपर्यंत संघ शाखेत आणि संघ शिक्षा वर्गात अवश्य पाठवा, तुमची पुढली पिढी तुम्ही मिळविलेल्या काळ्या पैशांमुळे देखील बिघडणार नाही याची खात्री देतो...
 
मी पत्रकार आहे, देशभक्त पत्रकार आहे, ना माझी कोणती जात आहे ना माझा कुठला राजकीय पक्ष आहे, त्यामुळे मी ब्राम्हण आहे, माझा इतिहास संघाचा आहे असा कोणताही संदर्भ जोडून हे लिखाण डोक्यात घालू नका. पण मी हाडाचा पत्रकार असल्याने, राजकीय क्षेत्रात पत्रकारिता मी करीत असल्याने अगदी २४ तास माझा या क्षेत्रातील काळे धन कामविणाऱ्या मंडळींशी अगदी जवळून संबंध येतो आणि हे आवाहनही मी त्याच लोकांना केले आहे ज्यांच्या घरी सतत काळे धन जमा होते....

आजच कुठेतरी वाचण्यात आले कि प्रणव रॉय आणि अरुंधती रॉय हे दोघेही चुलत बहीण भाऊ हिंदुविरोधी भूमिका यासाठी घेतात कि त्या दोघांच्या आया ख्रश्चन होत्या आणि तेच संस्कार त्या दोघांवर झाल्याने ते सतत हे असे हिंदुविरोधी बरळत सुटतात. अशा बदमाशांकडे दुर्लक्ष करून नेमके उत्तम हिंदू संस्कार आपल्या पुढल्या पिढीसाठी कोठून चांगले मिळतील आणि पुढली पिढी बरबाद होण्यापासून कशी वाचेल त्यावर ध्यान द्यावे, अजिबात वाईट नाही जर श्री श्री रविशंकर किंवा रामदेव बाबा किंवा संघ शिक्षा वर्ग इत्यांदीच्या सान्निध्यात येऊन तुमची पुढली पिढी संस्कारक्षम होऊन तुम्हाला समाधान देणार असेल....

उद्याचा अंक अवश्य वाचा आणि सर्वांना वाचायला सांगा..(अंकासाठी वेबसाईटची लिंक: www.offtherecordonline.com)

No comments:

Post a comment