Tuesday, 4 April 2017

अधिकाऱ्यांची ऐशीतैशी १ : पत्रकार हेमंत जोशी

अधिकाऱ्यांची ऐशीतैशी १ : पत्रकार हेमंत जोशी 

एक अतिशय महत्वाचे वाक्य लक्षात ठेवा. येणाऱ्या पैशांचे नेमके काय करायचे हे ठाऊक नसतांनाही स्वतःला बुद्धिमान समजून जो शासकीय अधिकारी आणि पुढारी हट्टाने घरात पैसे आणून ओततो,त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा सर्वनाश ठरलेला असतो. जास्त खाल्ल्याने जसे अजीर्ण होते तेच पैशाचेही होते, अति पैसे खाल्ल्याने अख्या कुटुंबाला अजीर्ण होते आणि अशा अजिरण्याची विषबाधा घरभर पसरून असे कुटुंब जिवंतपणी मेलेले असते. म्हणून प्रत्येकाने वाम मार्गाने येणाऱ्या पैशांचा अतिरेक अतीलोभ नेहमी टाळावा, काळा पैसे मिळविणाऱ्यांचे घर आणि कुटुंब नेहमी अस्थिर असते, बाहेर ते दाखवतात तो मुखवटा असतो, अति काळे धन मिळविणाऱ्यांचे कुटुंब असली चेहरा, चिंताक्रांत चेहरा लपवून ढोंगी चेहऱ्याने वावरत असतात. मी येथे मंत्रालयात बघितले आहे त्या सुनील पाटलांचे काहीसे उन्मत्त बेधुंद वागणे, अधिकार आणि जात या राज्यात माणसाला बेधुंद करून सोडते, पण लक्षात ठेवा सत्ता, जात, अधिकार, पैसे हे सारे अनेकांना क्षणिक मस्तीचा आनंद देऊन जातातही पण लक्षात ठेवा जातीच्या आधारावर आणि काळ्या पैशातून आलेली मस्ती, बेधुंदी, मग्रुरी सारे काही अल्पकाळ टिकणारे असते, सुनील पाटील पोटच्या पोराच्या बेधुंद वागण्यातून लोकांना नेमका दिसला पण काळे धन मोठ्या प्रमाणावर घरी नेणारा प्रत्येक माणूस सुनील पाटीलच एक दिवस होतो, असतो. ज्या कुटुंबासाठी काळी कमाई तुम्ही आम्ही करतो, ते त्यातून सुखी होतात का, अजिबात नाही. एक अत्यंत महत्वाचे लक्षात ठेवा, पुढली पिढी वाढविताना, घडविताना हि पिढी नेमक्या कोणत्या मुलांशी मैत्री ठेवून आहे त्यावर अतिशय करडी नजर ठेवा कारण पाकिस्थानी विचारांचे जे असंख्य मुसलमान तरुण आपल्या सभोवताली मुक्तपणे आणि बेधुंद वावरत असतात, ते तुमच्या मुलांना हमखास वाईट व्यसने लावण्यात गुंतलेले असतात. ड्रग्सच्या धंद्यात हे असे पाकधार्जिणे मुस्लिम तरुण फार मोठ्या प्रमाणावर आहेत, आणि ज्यांना ड्रग्ज घेण्याचे व्यसन लागले ते घर संपले असे समजायचे. ज्या दिवशी सुनील पाटील किंवा इगतपुरीच्या त्या ओल्या पार्टीत सापडलेले शासकीय अधिकाऱ्यांची मुले यापुढे व्यसनातून बाहेर पडतील तो दिवस, मिस्टर गांगुर्डे तुम्हा कुटुंबासाठी अतिशय आनंदाचा दिवस ठरेल. श्रीमान गांगुर्डे यांनी राज्याच्या, ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कोणतीही कामे न करता ती केवळ कागदोपत्री दाखवून काळे धन आयुष्यभर घरी नेले असेल पण तेच काळे धन, अमाप पैसे तुमचे तोंड काळे करून मोकळे झाले, असे म्हणता येईल. सारेच मुसलमान वाईट किंवा मुसलमानांची सारीच तरुण पिढी वाईट असे मी म्हणणार नाही पण पाकिस्थानी विचारांचे सारेच तरुण मुसलमान आम्हा हिंदूंना संपविण्याचा जणू विडा घेऊन जगात असतात, परवा मला सांताक्रूझ पोलीस स्टेशन मधला एक अधिकारी सांगत होता, येथे मुंबईत ज्यांच्याविरुद्ध विविध देशद्रोही, समाजविघातक गुन्हे दाखल होतात त्यातले ८० टक्के हे या पाकधार्जिण्या मुस्लिम तरुणांविरोधात असतात आणि हाच टक्का इतरही पोलीस स्टेशन मध्ये आढळतो, आपली तरुण पिढी एकदा का या पाकधार्जिण्या मुस्लिम तरुणांच्या टोळक्यात अडकली कि आपल्या कुटुंबाचे वाटोळे झाले म्हणून समजायचे, प्रशासकीय अधिकारी सुनील पाटलांचा मुलगा अलीकडे ज्या इगतपुरी ड्रॅग प्रकरणात पकडल्या गेला, ती ओली पार्टी अरेंज करणारे होते ते मुस्लिम तरुणच. अत्यंत महत्वाचे म्हणजे जे मुस्लिम सुशिक्षित आणि समजूतदार आहेत, ज्यांना हिंदुस्थान विषयी प्रेम आहे असे मुस्लिम सज्जन मायबाप त्यांच्याच समाजातल्या या पाकधार्जिण्या आणि वाईट कृत्यांमध्ये सामील होणाऱ्या मुसलमान तरुणांपासून आपल्याही अपत्यांना कोसो दूर ठेवतात, अशा वाममार्गाला लागलेल्या तरुण तरुणींपासून दूर ठेवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. या मुंबई शहरात दरदिवशी तुमच्या आमच्या अंगावर बिनदिक्कत मोटर सायकल घालून बेधुंदपणे जे पुढे निघून जातात, त्या पाकधार्जिण्या मुस्लिम तरुणांचा बंदोबस्त निदान यापुढे तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या योगी आदित्यनाथ यांची नक्कल करून करावा अशी त्यांना कळकळीची नम्रपणे विनंती आहे. एक लक्षात घ्या, येथे या लेखात प्रशासकीय अधिकारी सुनील पाटील किंवा कार्यकारी अभियंता गिजाभाऊ गांगुर्डे यांचे निमित्त पुढे आले पण तुम्ही आम्ही म्हणजे तुमच्या आमच्यातले काळे धन मोठया प्रमाणावर घरी आणणारे सारेच सुनील पाटील किंवा गिजाभाऊ गांगुर्डे म्हणजे आपल्यातल्या बहुतेकांच्या घरातले हे असेच बिघडलेले आणि व्यसनांच्या आहारी गेलेले वातावरण फक्त ते पकडल्या गेले म्हणून बदनाम झालेत, तुम्ही आम्ही देवाकडून पकडल्या जाणार आहोत आणि देवाची काठी आवाज करीत नाही पण अशी काही जोरात बसते कि काळे पैसे मिळविणाऱ्यांचे कुटुंब पुन्हा तोंड वर काढत नाही....

अपूर्ण :

No comments:

Post a comment