Thursday, 2 March 2017

युतीची झाली माती २ : पत्रकार हेमंत जोशी


माझा प्रेमभंग झाला किंवा मित्राला हात उसने दिलेले पैसे बुडालेत म्हणून मी यादिवसात अस्वस्थ किंवा नाराज नाही, माझा गुरुदत्त झालेला नाही, म्हणजे माझी प्रेयसी उदय तानपाठक किंवा राजन पारकर किंवा आप्पा भानुशाली बरोबर निघून गेली, पळून गेली म्हणून मी दाढीचे खुंट उपटतो आहे असेही अजिबात नाही, उलट मित्र म्हणतात, तुझी एखादी प्रेयसी असलीच तर ती अजिबात पळून जाणार नाही उलट तूच एखाद्याची पळवून आणशील, त्यांचे माझ्याविषयीचे हे उदात्त विचार ऐकून मी मनाशी खुश होतो, त्या आनंदाच्या भरात मंत्रालयाच्या गच्चीवरून खाली उडी घ्यावी असेही मला वाटते. परवा मी आणि भाजपाचे नेते अरुण देव जुहू चौपाटीवर सकाळचा वॉक घेत असतांना माझा मोबाईल वाजला म्हणून मी दोन पावले मागे थांबून बोलायला लागलो, तेवढ्यात देवांना ओळखीची एक फक्कड बाई भेटली, हो, भाजपावाले या बाबतीत मोठे नशीबवान. माझे संभाषण संपले म्हणून मी देवांकडे गेलो तर विजेचा झटका बसावा एवढ्या वेगाने या वयातही त्या रुपवतिशी बोलणे थांबवून, माझी ओळख करून देणे तर दूरचे पण देव आधीपेक्षा अधिक झपाट्याने वॉक घ्यायला लागले. बघा तुम्ही, कशी निर्दयी, दुष्ट माणसें माझ्या परिचयाची आहेत ती...

वाचक मित्रहो, या दिवसात माझे मन, माझे डोके अस्वस्थ उदास नाराज वैतागलेले अस्थिर, भरकटलेले, दुख्खी, अशांत सैरभैर यासाठी आहे कि, मुंबईत मराठी माणसाचा टक्का मोठ्या प्रमाणावर घसरला आहे आणि राज्यात अभिमान वाटावा असे स्थान आम्ही मराठी निर्माण करू शकलो नाही त्याची खंत आहे. म्हणता येईल, हरलाय माझा महाराष्ट्र आणि हरलाय मराठी माणूस. अहो, कोणी म्हणतो भाजपा जिंकला, खरे असेल ते. कोणी म्हणतो सेनेच्या तोंडाशी आलेला मुंबई महापालिकेतील निख्खळ विजय भाजपाने खेचून आणला, अगदी खरे आहे पण हा विजय त्यांना मोठ्या प्रमाणावर मिळवून दिला, अमराठी मतदारांनी. उद्धव यांनी गुजराथी मते मिळविण्याचाप्रयत्न केला पण तो फोल ठरला. उद्धव ठाकरे यांचे उजवे हात हर्षल प्रधान व प्रधान यांचे खास मित्र अरविंद शाह यांच्या मुळेच हार्दिक पटेल मातोश्रीवर आले, उद्धव यांना बिलगले, मिठीत घेतले पण प्रधान यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही, गुजराथी मतदार सेनेपासून कोसो दूर पण मुंबईतल्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या पटेलांची देखील मते शिवसेनेला मिळाली नाहीत कारण त्यांना म्हणजे अख्ख्या गुजराथ्यांना त्यांच्या पंतप्रधानाला शिव्या घालणाऱ्या पक्षाला आणि या पक्षाच्या उद्धव ठाकरेंना मतदान करायचे नव्हते, पंतप्रधांनाना राज्यात, मुंबईत खाली मान घालावी लागेल, अशी कोणतीही भूमिका गुजराथी मतदाराला घ्यायची नव्हती. मात्र एक निश्चित प्रधानांनी हार्दिक पटेल यांना मुंबईत आणून देशातल्या भाजपामध्ये नक्कीच खळबळ उडवून दिली. मुंबईतला भाजपाचा महापालिका निवडणुकीत टक्का वाढला, मतदान वाढले, तेगुजराथ्यांनी केलेल्या एकगठ्ठा मतदानामुळे, वासुस्थिती अशी कि एखादा दुसरा अपवाद वगळता गुजराथी मते फक्त आणि फक्त भाजपाच्या उमेदवाराला मिळाली, इतरही अमराठी मते मोठ्या प्रमाणावर भाजपाला मिळाली, हे शिवसेनेचे पाप आहे, मी समजतो, मराठी मतदारांच्या जागा रिकाम्या करण्याचे पाप मुंबईतील शिवसेना शाखेतीळ जे प्रमुख असायचे त्यांनी केले, आजही करताहेत,किंबहुना या शाखा म्हणजे बांधकाम व्यवसायिकांना सहकार्य मदत सरंक्षण देणाऱ्या आहेत किंवा नाही, शिवसेना नेत्यांनी आणि प्रमुखांनी आत्मचिंतन केल्यास शंभर टक्के फक्त ' हो ' असेच उत्तर येईल. मुंबईतील मराठी मतदारांना, मराठी रहिवाशांना दोन ठिकाणी जाण्याची मराठी असूनही भीती वाटते, ती ठिकाणे म्हणजे पोलीस स्टेशन्स व त्यांच्या एकेकाळी हक्काच्या असलेल्या शिवसेना शाखा. या दोन्ही ठिकाणी न्याय मिळत नाही, अन्याय होतो, अनेकदा फसवणूक होते, असे मराठी माणसाला अलीकडे वाटू लागल्याने शिवसेना जरी चार दोन जागा ज्यास्त आल्याने, विजय आमचाच झाला, सांगत असली तरी अप्रत्यक्ष त्यांचा हा मोठा पराभव आहे, मराठी मतदारही झपाट्याने त्यांच्यापासून दूर होत असतांना, भाजपाने अमराठी हिंदू मतदार आपल्याकडे वळविण्यात त्याचवेळी यश मिळविले आहे....

शेवटी आम्ही मराठींनी काय मिळविले, काहीही नाही, केवळ आमचे नेते पैशांनी तेवढे मोठे झाले. कोणी म्हणतो, पार पडलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकीत भाजपा जिंकली, सेनेतले म्हणतात, मुंबईत आम्हीच जिंकलो, कोणाला वाटते त्यांनी मनसे किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वाट लावली, पण मला वैयक्तिक वाटते, राज्यातली, मुबईतली मराठी जनता आधी हतबल झाली, लुटल्या गेली आणि नंतर पराभूत झाली, हरली. या राज्यात, विशेषतः मुंबईतही जिंकलेत ते गुजराथी, मारवाडी, भैय्या, मद्रासी, सिंधी, पंजाबी आणि हो, मुसलमानही. हरला तो महाराष्ट्रातला मूळ पुरुष, मराठी माणूस. आम्ही एकत्र आलो नाही तर मुंबईत आणखी काही वर्षांनी मराठी माणसाला केवळ पर्यटक म्हणून मुंबईत यावे लागेल कारण मुंबई असो कि मराठीचे पुणेही, हिऱ्यांचे मार्केट गुजराथ्यांच्या हातात, सोन्या चांदीचा मोठा व्यापार मारवाडी माणसाच्या हातात, कपड्यांचा व्यवसाय मारवाडी, सिंधी आणि गुजराथ्यांनी व्यापलेला, लकडा मार्केट मुसलमानांच्या हातात, लाकडांच्या तस्करीतही तेच, अशी माझी माहिती, शेअर मार्केट गुजराथी, मारवाडी आणि अमराठींच्याच हातात, हॉटेल व्यवसाय वाट्टेल ती भेसळ खाऊ घालणाऱ्या शेट्टी मंडळींच्या हातात, स्टील मार्केट तेच, मारवाडी आणि गुजराथी, दारूचा धंदा पंजाबी, सिंधी, शेट्टी मंडळींच्या हातात, मच्छी मार्केटमधून मराठी कोळ्यांना हुसकावून लावणारे आणि हा धंदा व्यापणारे कोण तर मुसलमान आणि उत्तर प्रदेशातले. या राज्यातला, मुंबईतला आमच्या भरवशावर अतिश्रीमंत झालेला बांधकाम व्यावसायिक किंवा बडा कंत्राटदार कोण तर फक्त आणि फक्त अमराठी लुटारू व्यावसायिक. 

अत्यंत महत्वाचे सांगतो, माझ्या व्यवसायातले म्हणजे मीडिया क्षेत्रातले कुबेरछाप माणसें, पत्रकार, संपादक, खांडेकर छाप वाहिन्यांचे प्रमुख, वार्ताहर, वाहिन्यांत काम करणारे, तुम्हा आम्हा सामान्य माणसांना कधी वाहिन्यांवर तर कधी वृत्तपत्रातून भंपक गप्पा मारून, आम्हीच आदर्श कसे, बोलण्यातून किंवा लिखाणातून पटवून देण्याचा प्रयत्न करतात, या भंपक, मुखवटे धारण करून आदर्शाच्या गप्पा, ठप्प मारणाऱ्या या तमाम मंडळींमध्ये, पत्रकारांमध्ये ताकद तरी आहे का त्यांच्या शेटजी मालकांच्या मनाविरुद्ध भूमिका घेण्याची, नाकानें कांदे डोलणारे हे, दर्डा, सुभाषचंद्र, गोयंका, जैन अशा या कधी वाहिन्यांच्या तर कधी वृत्तपत्रांच्या शेटजी मालकांच्या मनाविरुद्ध वागण्याची यांच्यात एक टक्का तरी हिम्मत आहे का, निखिल वागळे यांनी भलेही एकेकाळी कर्ज काढून महानगर दैनिक चालविले असेल पण नंतरच्या काळात त्यांना देखील अमराठी शेठजींचीच चाटूगिरी करावी लागली, हे ज्वलंत उदाहरण तुमच्या आमच्या समोर आहे....

जातीभेद विसरून आम्ही मराठी एकत्र आलो आणि आम्हाला पुढे नेण्यासाठी एखादे पारदर्शी नेतृत्व लाभले तरच आम्ही मराठी राज्यात टिकून राहू, अन्यथा आज आमचे जे मुंबईत झाले, ते तसेच वाटोळे राज्यभर होईल, हि धोक्याची घंटा आहे....

No comments:

Post a comment