Wednesday, 8 February 2017

OFF THE RECORD review on todays headlines...

OFF THE RECORD review on todays headlines...

1. BJP's Parag Shah is richest candidate worth Rs. 690 crore 
 प्रत्येक पेपर मध्ये आज ही बातमी वाचली... रु.६९० कोटींचा मालक पराग शहा भाजप तर्फे निवडणुकीत उभा राहणार.  पडलेला प्रश्न.. ज्याच्याकडे पैसे आहेत त्याने निवडणुकीत उभ राहू नये का? पण सांगतो पराग शहा निवडून येवो कि नाही पुढच्या निवडणुकीसाठी किंवा याच निवडणुकीत त्याला आता काही खास जणांना "फायनयांस" जरूर करावा लागणार... एकतर एखाद दोन उम्मेदवारांना निवडून आण्याची जबाबदारी किंवा एखाद पेपर किंवा चॅनेलला सांभाळण्याची... पैसे तर खर्च करावेच लागणार...  मोहित खांबोज आठवतो ना? तोही होता भाजप तर्फे निवडणुकीच्या रिंगणात. पडला, पण आजतागायत फक्त मुंबई युवा चीफ चे गाजर त्याच्या हातात देऊन त्याकडून पैसे लाटले जातात.. अर्थात मोहितचे ही काय जात...  म्हणतात बुवा कि मोहीतचा संपूर्ण पैसा हा काँग्रेसच्या कृपाशंकरचा आहे... असो. एका पेपरमध्ये वाचले पराग शहा म्हणतो कि हे ६९० कोटी मी २२ वर्षांच्या मेहनतीने कमविले. मला प्रश्नच पडला... आज गणपतराव देशमुख हे ५५ वर्ष झालीत आमदार आहेत, बिचारे कफ्फलक आमदार म्हणून ओळखले जातात, "जणता राजा" शरदचंद्र पवार यांना राजकारणात जवळपास ५० वर्ष उलटून गेलीत, पवार साहेबांकडे तर फक्त २ कोटींच जमले.. काय बोलावं? म्हणतो २२ वर्षात ६९० कोटी कमवले... अजून एक गुपित इथे उघड करतो...  जो जे नेहमी डिकलेर करत असतो, त्याच्याकडे नेहमी तेवढेच दुप्पट पैसे असतात... म्हणजे आपले पराग शहा हा कमीत कमी १००० कोटींचा मालक असेल... त्याला निवडणुकीला शुभेच्छा... बघा आता मुंबई मिरर कशी मस्त मुलाखत घेते त्याची!! 

2. BJP & Sena's war of words 
सेनेने मुंबईचे असे केले, भाजपने असे केले, खंजीर खुपसणे, मुंबईची पाटणा करणे--- आता मित्रहो, नुसती मजा बघत रहा... सेना आणि भाजप आता एक दुसऱ्यांचे नुसते कपडे फाडणार... आता एकमेकांवर थुकणार, पण जसे निकाल जाहीर होतील तसे लगेच हेच दोघे ह्याच थुकी परत चाटणार... भाषण, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे, ह्याला तुम्ही खरं  तर मनोरंजन म्हणून बघा.. जे हे राजकीय नेते बोलतात तसे काहीही कधीच घडत नसत. या लोकांची कातडी लई जाड असते.. यात खरी कसोटी असते ती  कार्यकर्त्यांची! निवडणुकीत कार्यकर्ता "सांभाळणे" हा प्रत्येक पक्षाचा जणू अधिनियमच असतो. मग हे लोक रक्त उफाळणारे वक्तव्य करतात आणि इकडे कार्यकर्ते भिडतात... त्यांना थोडीच पुढचे दिसत असते.. तसेच सामान्य माणसाचे... ट्रेन मध्ये प्रवास करणारा हा सर्व साधारण माणूस! बिचारे दिवसभर पोटासाठी वाट्टेल तेवढी मेहनत करवून घरी येत असतो, आणि मग पेपर मध्ये हे सगळे वाचतो...मन विचिलित करणारे हे राजकीय नेते विधान करतात. मग सामानय माणूस चिडतो, आणि त्या बूथ मध्ये जाऊन तरी सुद्धा शिवसेनेलाच मत देतो... कारण काय सांगू का? शिवसेना एकाच पक्ष आहे जो सामान्य माणसाची नस/ पल्स ओळखतो... उद्धव ठाकरे भाषणात हेच बोलतात जे आपण सगळ्यांना आवडते.. शिव्या देणे..धमकी देणे... पण एक सांगतो, जे जे काही राजकीय नेते बोलले आहेत ते तसे कधीच वागत नसतात.... म्हणून या सगळ्या घोषणाबाजी मध्ये बिलकुल पडू नका... कोणीही वाईट नसत...उद्या यांच्याकडेच आपले काम पुनः पडणार आहे...  

3. मुंबईचे पाटणा केले-मुख्यमंत्री 
अगदी खरे बोलले देवेंद्र फडणविस! खरंच मुंबईचे पाटणा केले हो ठाकरे कुंटुंबाने! हे बघा, मी पत्रकार म्हणून किंवा तुम्ही अधिकारी किंवा नेते म्हणून सगळंच आतला ओळखता.. कोण किती पाण्यात आहेत ते... हेच उद्धव आणि राज आपल्याला अगदी पहिल्यापासून आठवतात... अगदी प्रकरणे सुद्धा... पण एका सामान्य माणसाच्या अँगल मधून विचार करा..तेच ते फेरीवाले, तेच ते परवाने घेण्यासाठी पैसे मोजणे, फूटपाथ गायब, मुजोर अधिकारी आणि यामुळे आमच्या मुंबईची झालेली दयनीय अवस्था... ती झोपडपट्टी, ते पिण्याचे पाण्याचे हाल, कुठेपण कोणीही राहतात, शिस्त नाहीच --नुसतं रामभरवश्यावर आपली मुंबई चालली आहे... गेली २५ वर्ष तुम्हीच काय सगळ्या पक्षांनी या शहराची नुसती वाट लावून ठेवली आहे.. एक गोष्ट सांगा उद्धवजी, ज्यात तुम्ही पारदर्शकता ठेवून कामे केलीत..मग ते पेंग्विन असोत की शहराचे विस्कटलेले ट्रॅफिकचे धोरण, मरतो तो फक्त सामान्य मुंबईकर... जो अनिल परब तुमच्याकडे आहेत, एखाद रावते किंवा सुभाष देसाई सोडले, तर तुमचा शिवसैनिक नुसता राकट आणि गुंडगिरी करत असतो... त्याच्या चेहर्याकडे बघून शाखेत जावेसे वाटत नाही... सगळयांना एकच हवं असत--पैसा!! इतकी गरिबी असताना कसा आणि कोण सैनिक शाखेत फुकट काम करणार? संध्यकाळी काय जेवायचे हे त्याला उमजत नाही-- मग तो करतो, दलाली! मग त्यामधून तयार होतो एखादा नगरसेवक जो आपल्या वॉर्डाचा नुसता बलात्कार करतो...जर यातली एकही गोष्ट खोटी असेल, मला एक वॉर्ड दाखवावा जिथे सगळं परफेक्ट आहे... आयुष्यात कधी विरोधात लिहिणार नाही... मीच म्हणत आलोय, मुंबईला सेनेशिवाय पर्याय नाही, पण तुम्हीच तुमचे पर्याय उभे करत आहेत... हिंदुत्व सेनेमुळेच टिकले आहे, आम्ही तुम्हे रक्षण करतो--अहो बस्स झाले !! आता यावेळी निवडून आलात तर खरं कामे करून दाखवा... शरम वाटते मला... (डोळ्यात अश्रू)

४. महाराष्ट्राच्या इतिहासतील अकार्यक्षम, हतबल मुख्यमंत्री --खासदार राहुल शेवाळे
हे कोण म्हणतंय बघितले का--आपले कार्यक्षम आणि डॅशिंग खासादार शिवसैनिक राहुल शेवाळे--- अरे शेवाळे सोडून द्या सगळ्यांचे... जरा तुम्ही आत्मचिंतन करा.. तुम्ही स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष असताना माझा एका गुजराथी मित्र (सॉरी मित्रा, प्रकरण लिहितोय) तुझ्याकडे एक प्रकरण कमिटी मध्ये पास करून घेण्यासाठी आला... तुमचे सगळे ठरले.. फक्त पैसे कुठे पोचवायचे त्याबद्दल माझा मित्र वाट पाहत होता.. तुम्ही त्याला एका मंदिरात बोलावले... तुम्ही तेथे नव्हताच.. मग मित्राला फोन केलात आणि म्हणाला कि कोणाचे लक्ष नसताना "ती बॅग " मंदिराच्या पुजाऱ्याला देण्यास सांगितली... महिन्याभरात तुम्ही ती नसती कमिटी मध्ये ठेवली आणि त्यात मित्राच्या बाजूने निकाल लावून घेतला... जो माणूस देवाच्या मंदिरात दलालीचा पैसा ठेवतो आणि तो इतरांना हतबल आणि अकार्यक्षम कसे काय बोलू शकतो? 


OFF THE RECORD review on todays headlines...

1. BJP's Parag Shah is richest candidate worth Rs. 690 crore 
Read about BJP's richest fielded candidate Parag Shah worth Rs. 690 crore in all papers today. So what? I mean, can't rich people enter politics? But will surely tell you something. If Parag Shah wins or no is not a matter anymore, but he surely will be used! Used to finance couple of other fielded corporators or manage some newspapers or channels. He has to spent! Hope you people remember who Mohit Kamboj is?  Yes, the same millionaire who had fought one of the elections on BJP's ticket & lost. Mohit is currently heading the youth wing of BJP for Mumbai. But with this one carrot he is been used extensively.  But how does Mohit care. Allegedly, they say all of Mohit's money is that of Congress's Krupa bhaiya. Back to the new kid on the block Parag Jain..Apparently read in one of the papers today that Parag claims his 22 years of hard work for collection of such huge monies. I mean on one hand we have MLA like Ganpatrao Deshmukh who is the assembly for 55 years now and Maharashtra's veteran Sharad Pawar who even after spending more than 50 years in politics have gathered only Rs. 2 crore. Which business gives Rs. 690 crores in 22 years? I'm ready to waste my years. Also readers, one more thing-person who "declares" the amount has definitely exactly double the amount hiding somewhere...Our wishes to Parag Bhai!

www.vikrantjoshi.com
www.offtherecordonline.com

2. BJP & Sena's war of words
Sena did this to Mumbai, BJP did this, Mumbai has become Patna, we have been backstabbed--now for the next 20 days these will be the headline gatherers.. Now commoners like us, this is entertainment and nothing beyond. Please note, once the results are out, these parties will hug each other and end their so called animosity and will be ready to rule us again. Believe me when I say this, nothing of what these people say, actually happens. But all these sharp usage of words in speeches are actual testing times for the real followers of these netas--- the karyakarta's. See to keep their karyakarta's happy is the foremost agenda these days for all the parties. They have to keep them happy or else who will work? Who will go door to door with the neta? Once they are happily managed (food & free flow of alcohol) any "aadesh" from the boss.. and that's it...Why & how will they think of being used? Anyway, these netas also know how and what to speak. Such are their hair-raising slogans it motivates the karyakarta's in the wrong sense. Why only  karyakarta's, don't at times we get affected? We love the way Raj or Uddhav give dhamki's publicly...we love the way they know our pulse... It is actually we speaking our minds on that stage fearlessly......They exactly know what our mind is thinking and they speak the same. Such great is their study. But what do we do? We control  our emotions as we aren't paid servants right? But still we vote for such people. So at the end this is just a battle for tabloids to fill in spaces. Don't get emotional and believe me don't speak against them, tomorrow you might have a work or two with one of them !!

3. Mumbai has become Patna--CM Fadnavis
Yes, what wrong did CM Fadnavis say? Mumbai is actually Patna in every lateral sense. Don't take this wrong, but as a journalist or a leader or a bureaucrat don't we know what actually happens in the city? How mudded is this political water? But for once lets think from a common mans view. His basic understanding of politics is --everywhere there is corruption, any ward any office and so on...He curses the traffic everyday, he cannot walk on the footpath, his grounds have been confiscated, his drainages are in bad shape and his roads condition is in doldrums. Right from the Penguins purchased to polish the Prince's ego, to the overall municipal facilities, the common man is tired...but mind you for last 25 years he has gone to the same booth and voted for the same party who is responsible for this--ShivSena. If you minus Ravate or one Subhash Desai, tell me why should I visit Shahka's for any help? The Sainik's sitting there are meant for only making money but yes--with confirmation of our work. One of these ugly looking guys become our corporator and for years rape our ward. Tell me one ward Uddhavji, where you claim PERFECTION. I swear, if I find any, will stop writing against you or the party in this lifetime. It is me who is the strongest supporter of Sena in Mumbai, but on what basis? The hinduism carrot is there, but how about making Mumbai--Mumbai again... (tears)

४. महाराष्ट्राच्या इतिहासतील अकार्यक्षम, हतबल मुख्यमंत्री --खासदार राहुल शेवाळे
Look who is talking? The dashing MP from Sena Rahul Shewale -I think its time for some retrospection Shewale. My friend is going to kill me for spilling this. This Gujju friend of mine had some file to be cleared in the Standing committee where Shewale was chairman till 2014. Obviously Shewale was approached. Deal was fixed, but where to deliver the bag was mystery for my friend. One day he gets a call and he is summoned to a temple with "the bag". No where Mr. Shewale or any of his staff or friend are there at the spot. A call comes and the bag has been asked to handover to the pujari of the temple...I was like...what?? So Mr Shewale, the man who uses GOD to make money, he speaking about anything is like a prostitute claiming being a virgin every night to her customer. 

No comments:

Post a comment