Tuesday, 14 February 2017

OFF THE RECORD review on some of todays headlines....

ऑफ द रेकॉर्ड

१. Congress Corporator killed by 8 masked assailants in Bhiwandi 
मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी मुंबईचे पाटणा केले या वक्तव्यावर उद्धव ठाकरे भलतेच चिड्ले होते.  म्हणाले होते, सगळे विसरेल पण मुंबईची पाटणाशी तुलना कधीच खपवून घेणार नाही आणि ती केलेली विसरणार नाही... पण काय चाललंय तुमच्याच मुंबईच्या आजूबाजूला? कधी भिवंडी, कधी-मीरा रोड, कधी ठाणे तर कधी नवी-मुंबई? कोणीही येत आणि मारून टाकत... पाटणा मध्ये हेच तर घडत.. गुंडगिरी, मुजोरपणा, गरिबी, काहीच विकासकामे नाहीत, अतिक्रमण, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा--सावत्र वागणुकीमुळे या शहरांचा कधीच विकास झाला नाही, होणार नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. मुंबई पण एकेकाळी अशीच होती ना? पण आपण शिकलो, प्रशासन आणले, शहराला वेळीस वळण आपण सगळ्यांनी लावले...यालाच शहरीकरण म्हणतात ना? तेव्हाच आज अख्ख्या जगात मुंबईचा बोलबाला आहे कि नाही.. 
मला वाटते, आपल्या मुंबई मुळेच आजूबाजूंच्या आपल्या या छोट्या शहरांची वाट लागलीय आहे.. आपण वाढलो पण या अगदीच लागून असणाऱ्या लहान भावाकडे मात्र तुम्ही आणि आम्हीपण साफ दुर्लक्ष केल.... भावंडांना छळण्यात आनंद मिळतो का तुम्हला? (हा टोमणा फक्त शहरांपुरताच)...  तुम्ही सांगा, मोजून किती वेळेला या शहरांमध्ये गेलात?...भूमिपुत्र न तुम्ही आणि तुमचे सैनिक? मग का हा फरक? आता कृपया यात भाजपला ओढू नका..ठाण्यात इतके वर्ष तुमचीच सत्ता होती ना...बघा जमले तर... 

www.vikrantjoshi.com
www.offtherecordonline.com

२. Uddhav trying to usurp Mayor Bungalow -Raj Thackrey 
अगदी खरं  बोलले राज ठाकरे... सीसीटीव्ही फुटेजेस मागावा आणि या बंगल्यात ३१ डिसेंबरला, होळीला आणि दिवाळीला काय काय घडतं ते पहा... विश्वास होणार नाही बघून..  प्रिन्स आपल्या पेज थ्रीच्या मित्र मैत्रिणींना अगदी अगत्याने बोलावून नुसती इथे मजा मारताना दिसतील... काय काय चालत ते तुम्ही फुटेजेस बघितले कि कळेल...पण एक मात्र खरं... बंगल्याचा वापर योग्य आणि वैधानिक होत नाही...  

३. या आरोपांना सेना भीक घालत नाही--राहुल शेवाळे 
खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना आपली संपत्ती जाहीर करावी या विधानावर शिवसेना चांगलीच खळवळली दिसते... या आरोपांना आम्ही भीक घालत नाही असे काल पत्रकार परिषद घेऊन राहुल शेवाळेंना बोलावे लागले... भीक नाही घातली तर प्रेस कॉन्फरन्स कशाला राहुल जी? त्यात काही तथ्य आहे का? बरं तुम्ही किरीटच्या एका सी.ए ला फोडून बाजूला  बसवले आणि त्या प्रसिद्धी भुक्या माणसाने किरीट सोमय्यांवर आरोपांचा पहाडा वाचला... खरा शिवसैनिकाने हे नसते केले... तो म्हणाला असता, या भाऊ कोणत्याभी माणसाला घेऊन तपासायला--आम्ही तयार आहोत... हा मर्द शिवसैनिक आजही प्रत्येक शाखेत तसाच वागतो... बिनधास्त... तुम्ही तर उलट या प्रेसमुळे बॅकफूटवर दिसले... दाल में कुछ काला है क्या? 

४. अमितमुळे निवणुकीत लक्ष नाही--राज ठाकरे 
राज ठाकरेंच्या मुलाला, अमितला, लीलावती हॉस्पिटल मध्ये घशाची बियॉप्सी करून घ्यावी लागली असे सोशल मीडियावर वाचण्यात आले... बियॉप्सी का करतात? जर कॅन्सरचे लक्षण असले तर... राज ठाकरे स्वतः चेन स्मोकर... अगदी घरात पितात... जर घरात कोणी इतक्या बिड्या पिट असेल तर सहाजिकच आहे, त्यांचा परिणाम घरच्यांना भोगावा लागतो.. अप्रत्यक्ष धूम्रपानाचा!!  एकतर अमित स्वतः सिग्रेटी फुंकत असावा किंवा बापामुळेच पोरावर ही नामुष्की आली, असेच म्हणता येईल...पण जर माहीमच्या एका काट्यावरच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर, निवडणुकीला यश २००% मिळणार नाही हे राज ठाकरेंना अगदी माहीत आहे...लाज राखण्यासाठी हा खेळ राज यांचाच असावा असेही तेथील लोक बोलत होते... पण मला नाही पटलं--कोणीही या थराला नाही जाणार... पोटच्या पोरा बद्दल असे कोणीपण बोलणार नाही... जर हे असत्य असेल, मग हा निचतेचा अगदी कहर आहे...  जे ही असो, अमितला आमच्या शुभेच्छा आणि तो लवकर यातून बरा हो यासाठी देवचरणी प्रार्थना!  

OFF THE RECORD review on some of todays headlines...

1. Congress Corporator killed by 8 masked assailants in Bhiwandi 
In between, when the rallies of Sena-BJP were taking centre stage of political news in Maharashtra, one particular comment on Mumbai becoming Patna by the Chief Minister was not at all taken in good spirit by Uddhav Thackrey. This was an insult of Mumbai, and the people staying here Thackrey had quipped. But friends and UT, in the name of sons of soil i.e. Shivsena--what is going in and around Mumbai? Anyone comes and just kills. Don't these things happen in Patna regularly? Then why was our CM wrong? UT you and your party have been in power at the Corporation in Mumbai & Thane since ages. What have you done? How many times have you visited likes of Mira road, Virar, Thane city, Navi Mumbai, Bhiwandi & other neighbours? Tell me why will it grow? Time & again, this is what I feel, these cities are been given step brotherly treatment by the corporation and the government. We blame encroachments, illegalities, usurping of lands in these cities. When have you given the best  administrators to these cities? Whosoever comes just rapes them and goes...How will they develop? What facilities are provided to these people? So due to this these cities are nothing but adda's for the goons and land of illegal activities. Murders here are common. Take it in your hand UT and send your best forces here...See the changes...Once upon a time, even Mumbai was like this but will able administration and WILL of the politicians, today Mumbai is a world class city. 

www.vikrantjoshi.com
www.offtherecordonline.com

२. Uddhav trying to usurp Mayor Bungalow -Raj Thackrey 
Very rightly said by Raj Thackrey! Just call for the CCTV footages of this place and check as to what happens here at Holi, Diwali & 31st December. They say, the prince invites all his page 3 regular's and creates a havoc. If you don't believe me, call for the footages and see the happening parties. The usage of the Mayor Bungalow is undoubtedly--unparliamentary...

३. या आरोपांना सेना भीक घालत नाही--राहुल शेवाळे 
Shivsena seems to be in a panic mode, after Kirit Somaiya asking the Shivsena chief for declaration of his income and making it public. Shivsena has and will not pay any heed to this, MP Shewale said in a press conference yesterday. If no heed, then why the Press, Mr Shewale? Real Shivsainiks don't do this.. They would have challenged Kirit Somaiya to send anyone and check whatever they wanted. Still this practice of "machoism" is only shown by a sainik, be it anyone...Are we not following the "not scared of anything" formula UT? Why the hitch then?  

४. अमितमुळे निवणुकीत लक्ष नाही--राज ठाकरे  
Amit Thackrey was admitted to Lilavati Hospital for a throat biopsy claimed various social media posts circulated day before. Why is biopsy done? To check the possibilities of cancer. Ok we all know Raj himself is a chain smoker. Is Amit a victim of passive smoking of his own father? Or is he a chain smoker as well? Whatever it is, our best wishes to young boy of the family.  But someone in Mahim was quipping about it being a stunt of Raj Thackrey himself to hide the fate of his party that it will face on 23rd February. But I did not believe this... Which father will stoop to this level? If so, then this is the ultimate low I have experienced in this lifetime...

No comments:

Post a comment