Wednesday, 11 January 2017

OFF THE RECORD review on some of todays headlines....


ऑफ द रेकॉर्ड--बातमी मागची बातमी!! 

1. FDA seizes Rs. 2L tampered food packets meant for 6 month old. 
काय म्हणायचे या निचतेला? महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे जेव्हा राज्यपाल मोहयदयांसोबत फोटो खेचण्यात गर्क होत्या तेव्हा अन्न व औषध विभागाने वसई मध्ये एका मोठ्या दलालाच्या ऑफिस मध्ये धाड मारून माल जप्त करत होते. त्यामागची हकीकत अशी की, वसई-विरार महानगर कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांचे या भागाचे इन्स्पेक्शन सुरु होते. एका गाळाचे शटर त्यांना अर्धवट बंद दिसले. जेव्हा ते आत शिरले, त्यांनी बघितले की तेथील मजूर मायक्रो-न्यूट्रिएंटने (गहू, भाजलेले कड-धान्य, आणि साखर यांचे मिश्रण) भरलेल्या पाकिटांवरून एका विशिष्ट रसायनाने काहीतरी खोडत होते. नंतर असे कळले, कि हे मजूर त्या पाकिटांवरची कालावधी समाप्ती तारेखला (एक्सपायरी डेट-- ही पाकीट डिसेंबर २०१६ मध्ये बाद झाली होती) मिटवून नवीन तारखा टाकत होती. ही पाकिटं अंगणवाड्यांसाठी असून लहान मुलं --म्हणजेच ६ महिने ते ३ वर्षांसाठी करिता होती..  लगेचच या अधिकाऱ्यांनी जवळच्या पोलिस स्टेशनला सूचित केले. पोलिसांनी छापा टाकला आणि हा माल जप्त  करून आता तो माल अन्न व औषध विभागाला तपासणीसाठी पाठवला गेला आहे. ह्या खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे आहेत. मला अजिबात पटणार नाही, जर पंकजाताई म्हणतील कि मला याची काहीच कल्पना नव्हती...कारण हेच उत्तर असणार आहे... अंगणवाडी मध्ये कोण काय माल पुरवतो याची संपूर्ण यादीच मंत्र्यांकडे आणि खात्याच्या सचिवांकडे असते... अहो, तुमचा चमचा जो या सगळ्या प्रकरणात तुमचा साथीदार होता, किंवा तात्कालीन खाजगी सचिव होते, तेच डॉ. नरेश गिते या भागाचे आयुक्त आहेत ...  चिक्की घोटाळा, मग आता या आय. सी. डी. एस. मध्ये सुद्धा लक्ष केंद्रित करून या ताईला काय सध्या करायचे आहे काहीच कळायला मार्ग नाही. आग ताई, तुला भ्रष्टाचारच करायचा आहे ना?  अनेक मार्ग आहेत, तुमच्या अंतर्गत खूप विभाग आहेत...  लहान,  चिमुकली,  कुपोषित, आदीवासी मुलं ज्यांना जेमतेम खायला भेटतं, त्यांच्याशी संबंध असलेल्या एकही विभागात तुम्ही लक्ष घालू नका..कळकळीची विनंती... काळ हा फार बलवान आहे.... मुख्यमंत्री प्रत्येक वेळी वाचवायला नाही येणार...


2. NCP reaches out to Congress for pact 
काय झालं सचिन अहिर? कालच आम्ही लिहिल्या प्रमाणे मुंबई राष्ट्रवादी नेत्यांना आता पक्षात अजिबात महत्व उरलेले दिसत नाही. कालच्या सकाळ पेपर मध्ये "कॉफी विथ सकाळ" याअंतर्गत आपले मुंबई राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर गप्पा मारायला होते. "काँग्रेसला फाजील आत्मविश्वास" असे विधान ते करून गेले... आणि आजच्या बातम्या वाचा... राष्ट्रवादी आगमी निवडणुकांसाठी पूर्ण प्रयन्त करत आहे काँग्रेसशी हात मिळवणीकरिता...ताटकरेंचे शर्तीचे प्रयत्न सुरु झालेत... याचा अर्थ सचिन अहिर यांना कदाचित बंद दरवाज्यात घडलेल्या घडामोडी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते देत नसावे.... आणि वरून सचिन भाऊंची मैत्री हरलेला आणि बुजलेल्या संजय दिना पाटीलशी... आणि हो, आघाडी सरकार असताना भुजबळांच्याही अहिर जवळ मानले जायचे... (प्रसाद लाड मुळे)... म्हणूनच का राष्ट्रवादी तुम्ही कर्तव्यशील सचिन अहिरांना मुद्दाम दूर ठेवता का? सचिन भाऊ, कालही मी म्हटले होते, की काँग्रेस शिवसेनेला ही मागे टाकून राज्यात दुसऱ्या नंबरवर आहे..त्यांना कमी लेखून कसे चालणार... आत्मविश्वास कदाचित तुमचा फाजील आहे... 

3. Now actual test for Fadnavis & Uddhav: BMC & ZP elections
नुकत्याच आटोपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्राम पंचायती निवडणुकींमध्ये भाजपला सरशी मिळाली.....आता खरी मजा येणार....जिल्हा परिषद आणि इतर महानारपालिका यांच्या निकालावरून  २०१९ मध्ये कोण परत विधान सभेवर बाजी मारेल यावरून कळणार... मुंबई महानगरपिलॆवर कोण येतं यावर कधीच महाराष्ट्राचे चित्र अवलंबून नसते... जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणूक हे पक्षांचे भवितव्य ठरवत असतात...सेना हुशार... बघाल त्यांना माहीत आहे कि मुंबई मध्ये लोकांना पोलीस स्टेशन नसेल तर चालते, पण शिवसेनेच्या शाखा हव्या... त्यांना त्यांचे यश मुंबई मध्ये १००% मिळणार हे पक्के माहीत आहे... ते भाजपशी युती करणार नाहीत...कल्याण डोंबिवली फॉर्मुला वापरण्यात येईल...आधी लत्तररे काढायची आणि मग युती करायची... पण सेनेला माहीत आहे, की महाराष्ट्रात मात्र आपले फारसे चालत नाही.. तिथे मात्र मुकाट्याने भाजपशी युती करावी लागणार... असो... हे राजकारण आहे... तुम्हाला माहीत आहे का याअगोदर भाजपला यश कसे व का मिळाले? पर्वा मी बुलढाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याशी बोललो... तिथे तशी काँग्रेसच्या सानंदाची चलती होती..भाऊसाहेब फुंडकर आणि संजय कुटे दुसऱ्या नंबरवर....  शेतकरी म्हणाला कि भाऊ आम्हाला वाटते या नोटबंदीमुळे जे काही पैसा सरकारकडे आता जमा झाला आहे, त्यामुळे आता आमच्या प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये २ लाख रुपये शासन जमा करणार... म्हणून आम्ही भाजप बरोबर आहोत... आणि आपले प्रदेश अध्यक्ष यांनी तर १५,००० येणार असायची घोषणा सुद्दा करून गेलेत कि... हे ऐकून मी गाराचं पडलो... जय हो... भाजप हा तर प्रचार नाही करत ना ? 


4. "Suspicious" bank lockers under I-T dept's scanner 
मला इतर ठिकाणचे माहीत नाही... पण मी प्रत्येक्षात अनुभवलेली गोष्ट सांगतो... बँकेचे नाव इथे घेणार नाही... पण बँक ही राष्ट्रीयकृत आहे... आपल्या बँकांशी आपले फार जिव्हाळयाचे संबंध असतात... मी एकाच बँकेत गेली कित्येक वर्ष काही ना काही कामांसाठी जात असतो... तिथला भौगलिक परिसर सोडा तिथला प्रत्येक स्टाफ मला नावाने ओळखतो... अगदी कॅशियर पासून ते चपराशी पर्यंत... ८ नोव्हेंबर रोजी नोटीबंदीची घोषणा झाली.. प्रत्येक आठवड्याला पैसे काढायला मी बँकेत जायचो... सगळी लोक ओळखीची... तर खूप वेळ काही रांगेत उभा नाही राहायचो....ओळख होती ना... पुन्हा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मी बँकेत गेल्याचे आठवते... पण यावेळी बँकेत कॅशियरच्या बरोबर एक नवीनच इसम बसलेल्या मी बघितला... नेहमीचा असल्याने आणि त्यात पत्रकार मग माणसाची ओळख करून घेणे हा आपला स्वभाव.. पण रिस्पॉन्स नाही मिळाला... शरीर आणि चेहरा बघितला तेव्हाच मला शंका आली... तो माणूस डिपार्टमेंटचा होता... आणि आजही तो तिथे आहे... म्हणून आजची ही हेडलाईन... बॉस ते मोदी आहेत...त्यात गुजराथी... त्यात संघवाला...जिथे आपली विचार करण्याची शक्ती संपते, तिथे मोदींची सुरु होते... प्रत्येक बँकेत इनकम टॅक्सचे अधिकारी कर्मचारी म्हणून रुजू आहेत, किंवा त्यांचे बारीक  ऑबसेर्व्हशन सुरु आहे... 1. "Suspicious" bank lockers under I-T dept's scanner 
I don't know about others; but will narrate my own personal experience here. I shall name the Bank but letting you all know, its a nationalised one! We all share one personal equation with the Bank we do our business with. It's an emotional relationship. Forget the corners of the bank, from the cashier to the peon, we know everybody's name & vice-versa. 8th November came. Note ban was imposed. As a normal citizen would stand in bank queue's and was doing my transactions. Days passed. on the 15th or the 16th day of the note ban when I entered my bank, and when I reached my cashier, I saw a different person accompanying my regular cashier. Being a Journalist, an also a very social person, I happened to smile at that person. But I knew, he is surely the Bank employee cut. His body language, his clothing, his attitude everything was different. The person was surely from the Department. No guess here from which? Obviously the Income Tax Department. What I feel, since days & months now, the IT is watching us very closely. They all have been summoned in the banks they feel important. Be it nationalised or private. Hence this headline...They know it all!!2. FDA seizes Rs. 2L tampered food packets meant for 6 month old. 
What to say & what to do? When the social media was flooded with photos of Pankaja Munde & Hon Governor for a function, the same time Food & Drug Department was raiding one of the department the Minister controls.. It so happened that the Vasai Virar Corporation's officers were on inspection duty in Vasai area. They observed one single shutter of a gala was half shut. They went inside. It was later found that the workers there were applying an adhesive to food packets which contained micro-nutrients. They were erasing the expiry date of the packet that were already expired in December 2016 & printing new ones. The packets contained nutrients for children aged from 6 months to 3 years. These packets were been designed with new expiry dates & were scheduled to be delivered to Anganwadi's. Where has this department of Integrated Child Development Scheme (ICDS) come to? The Minister Pankaja Munde is already been in the news for corruption in this department along with the chikki scam. This is the worst area in which you can think of money to be earned. These are food packets for the malnourished, tribal and poor children. Corruption or intention to earn from such things will absolutely abhorred. Anyway, Ill not be surprised if Pankaja Munde distances herself from the vendor. In fact for your information her partner in crime & the person who served as Private secretary in initial days is  posted in the same area as the Municipal Commissioner-Dr Naresh Gite. It will not be a surprise if this episode will be played down. 3. NCP reaches out to Congress for pact 
What happen Sachin Ahir? Don't the big bosses of your party consult you before making any announcements to the press or is it you have been purposely kept aside? Yesterday in a Marathi daily, you had said that Congress is having nothing but over confidence about themselves... but my friend, Congress is already in the second position in the recently concluded local governing bodies elections...plus if it was nothing but in the second position read todays newspapers. Your State Party chief Sunil tatakre is extending an olive branch to the Congress for fighting together in Maharashtra & Mumbai. Sachin Bhau, as I rightly said yesterday, this is happening owing to your close knit friendship with Sanjay Dina Patil & your old friendship with Chagan Bhujbal, when the later was in power, whom the party is distancing itself. 

4. Now actual test for Fadnavis & Uddhav: BMC & ZP elections
This will be the actual test of  Devendra Fadnavis. District Council & Corporation elections in various cities will be a litmus test for the no 1 party of our state-the BJP. A lot of permutation combination will now be worked out ..See as I said, Shivsena is playing a devils advocate here. They will never come together with the BJP in Mumbai as they know there is no alternative to Sena here.  After the results when they need someone to partner them, obviously it will be BJP... Ditto KDMC formula will be applied, if I can predict the way things are going now... But for rest of Maharashtra, where Sena is not strong on in No 2 or even 3rd place, they will fight together with the BJP. Anyways the contention is how are BJP becoming no 1 at this pace? I happen to speak with a farmer from my hometown, Buldhana district. He told me since the "note ban" took place, we all are expecting here that once BJP is in power our accounts will be automatically credit with Rs. 2 lacs...and when I asked him about his sources, he named Raosaheb Danve has already mad such statements, but in stead of Rs. 2 lacs he has promised Rs. 15,000 per person. Now thats what I call strategy. No comments:

Post a comment