Monday, 16 January 2017

धर्माच्या नावे : पत्रकार हेमंत जोशी


मला आठवते मुंबईतील काँग्रेस नेते श्रीमान कृपाशंकर सिंह राज्यमंत्री असतांना त्यांच्या देवभोळ्या पत्नीने अतिशय चांगला उपक्रम हाती घेतला होता, मद्य विकणाऱ्या ज्या ज्या दुकानांची किंवा हॉटेल्सची नावे देवांची आहे ती त्यांनी बदलण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न केले होते, जसेकी प्रभू रामचंद्र देशी बार, शिवशंकर विदेशी दारू विक्रीचे दुकान इत्यादी, विशेष म्हणजे मिसेस सिंह यांना त्यात 
त्यावेळी बऱ्यापैकी यश मिळाले होते....

सांगण्याचा हेतू असा कि आपण आपला हिंदू धर्म आणि आपल्या देव देवता याबाबत फारसे स्वाभिमानी नाही, धर्माची किंवा देव देवतांची विटंबना आपण फार सिरियसली घेत नाही. इतर धर्मांना हे हिंदू राष्ट्र अति महत्व देते जसे कि अन्य कुठल्याही देशात नाहीत पण भारतात तब्बल तीन लाख मस्जिदी आहेत. आणखी महत्वाचे म्हणजे अमेरिकेतल्या वॉशिंग्टन मध्ये २४ चर्च आहेत, लंडन मध्ये ७१ चर्च आहेत, विशेष म्हणजे इटलीच्या मिलन शहरात ६८ चर्च आहेत पण एकट्या दिल्ली शहरात तब्बल २७१ चर्च आहेत, भारतात किती 
असतील कल्पना करा, स्वतःला सेक्युलर समजणाऱ्यांनी माझ्या या माहितीवर जरा थोबाड उघडले तर बरे वाटेल....

यापूर्वीच मी म्हणालो होतो, लेखी सांगितले आहे कि माझा कोणताही राजकीय पक्ष नाही किंवा कोणत्याही संघटनेसाठी मी काम करीत 
नाही पण तुम्हीच सांगा, उठसुठ या देशातले किंवा या राज्यातले तमाम हिंदू, सनातन किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करून मोकळे होतात. संघ आणि सनातन धर्मावर बंदी घालण्यासाठी आम्ही हिंदूच अधीक आग्रही आणि आक्रमक असतो पण मुसलमानांच्या इसिस या संघटनेवर बंदी आणा किंवा इसिसचा विरोध करणारा एक तरी मुसलमान या देशात कुठल्याही कोपऱ्यात आपण दाखवावा....

आणखी एका गोष्टीचा मला अतिशय मनापासून राग येतो, आली ईद कि लगेच आमचे हिंदू नेते उठसुठ इफ्तार पार्ट्या देतांना जागोजाग 
फुशारक्या मिळवतांना या देशात आणि राज्यात आपण सारेच बघतो, एखाद्या मुसलमान नेत्याने या राज्यात होळीची किंवा दिवाळीची पार्टी तुम्हा आम्हाला दिल्याचे कधी बघितलेत का ? काश्मिरात भारतीय तिरंगा जाळणे नित्याचेच झाले पण एखाद्या मुसलमानाने म्हणजे या देशातल्या मुसलमान नागरिकाने तिकडे काश्मिरात सैनिक मारल्यानंतर इकडे भारतात पाकीस्थानचा झेंडा जळताना तुमच्या बघण्यात आहे का, उलट राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर आम्ही का उठावे अशी बांग देणारे कितीतरी मुसलमान आपण दरदिवशी चित्रपटगृहात बघतो, आणि खाली मान घालून आम्ही कट्टर भारतीय हे सारे सहन करतो, तुमची आमची हि सभयता कि गांडूगिरी..? हाजीअलीच्या दर्ग्याचे दरदिवशी दर्शन घेणारे कितीतरी हिंदू, एखादा मुसलमान मला दर्शनानिमित्ते सिद्धी विनायक मंदिरात लीन झाला, 
औषधाला तर दाखवावे. एवढेच काय अमुक एखाद्या दर्ग्याचे दर्शन,कितीतरी हिंदू डोक्यावर विशिष्ट मुसलमान टोपी घालून ढुंगण वर करून घेतात, अमुक एखाद्या मुसलमानाने मंदिरात आधी दर्शन घेतले नंतर कपाळावर गंध लावले, एखादे उदाहरण तुमच्याकडे असेल तर 
पुराव्यादाखल सांगा कि...

आपण आजपर्यंत, श्रीराम बूट भांडार, शंकर छाप तंबाखू, गाय छाप विडी, बजरंग पान भांडार, गणेश छाप विडी, लक्ष्मी छाप फटाके, माँ दुर्गा बार अँड रेस्टॉरंट, अशी देवादिकांची नावे वाचतो पण अल्लाह छाप गुटका, खुदा छाप विडी, पाईगम्बर छाप तंबाखू अशी नावे कधी तुमच्या वाचण्यात नक्कीच आलेली नसतील, मला वाटते हिंदूंनी हा वास्तविक कायमस्वरूपी सबक शिकावा कि आपल्या धर्माचा नेमका मान कसा ठेवल्या जातो ते.....

इतर धर्मांना नावे ठेवण्यात अर्थ नाही, आपण आपल्या धर्माचे पालन करणे आवश्यक असते. अत्यंत महत्वाचे म्हणजे, संख्यने कमी होतोय आमचा जगभरातला हिंदू कारण हम दो हमारा एक असे मर्यादित कुटुंब ठेवण्यात आम्ही स्वतःला अति सभ्य सुशिक्षित सुसंस्कृत समजतो आणि ते नेमके चुकीचे आहे, योग्य आहेत ते शंकराचार्य, जे वारंवार आवाहन करतात, संतान वाढवा, मोठ्या प्रमाणावर हिंदूंनो मुले जन्माला घाला. आता भारतीय हिंदूंची आर्थिक स्थिती पूर्वीसारखी दरिद्री दळभद्री नाही, शंकराचार्यांचे तुम्ही ऐकायलाच हवे. सुशिक्षित हिंदूंनी अधिक मुले एकदा जन्माला घालायला सुरुवात केली कि इतर आपोआप त्यांचे अनुकरण करतील, हिंदूंची संख्या भरमसाठ होणे गरजेचे आहे, याआधी आमचे धर्मांतर मोठ्या प्रमाणावर झाले असल्याने हिंदूंची संख्या अतिशय रोडावली आहे, हि बाब सच्चा हिंदूंच्या मनाला नक्की खटकणारी आहे. याठिकाणी तुमच्या परखड उत्तराची मला अपेक्षा आहे...

No comments:

Post a comment