Thursday, 22 December 2016

घेवारेला आवरारे ५ : पत्रकार हेमंत जोशी

वाममार्गाचा अवलंब करून १९९० नंतर म्हणजे अचानक जमिनींना, स्थावर मालमत्तेला गगनभिडु भाव आल्यानंतर सर्वाधिक फायदा मोठ्या प्रमाणावर या राज्यातील शासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि अनेक कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात करवून घेतला. असे म्हटल्या जाते कि दुकान असो कि मकान, शेती असो कि मोकळे भूखंड, एक सोडून एक म्हणजे अमुक एक मालमत्ता अन्य एखाद्या व्यक्तीची असेल तर लगेच त्या शेजारची मालमत्ता हि शासनात काम करणाऱ्या व्यक्तीची नामे किंवा बेनामी असते. आणि हे प्रकार आम्हाला फार जवळून माहित असतात पण जातीपातीच्या राजकारणात वाढलेले हे राज्य, अशा अधिकाऱ्यांचा आजतागायत कोणीही बाल देखील बाका करू शकलेले नाही पण सुदैवाने आता तो दिवस दूर नाही ज्यांनी कोणी विशेषतः शासनातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी जी अमाप समाप संपत्ती, मालमत्ता जमविलेली आहे, दडवलेली आहे, लपवलेली आहे, अन्य आप्तेष्ट, मित्र, भागीदार किंवा नातेवाईकांच्या नावे करवून ठेवली आहे, त्यांना नववर्षात आयकर खात्याकडून, प्रसंगी ईडी कडून मोठ्या चौकशांना सामोरे जावे लागणार आहे. नगररचनाकार दिलीप घेवारे सारखे अनेक भामटे बिलंदर गेल्या काही दिवसांपासून फारतर महिन्या दोन महिन्यांपासून आटोकाट प्रयत्न करताहेत, मिळविलेली संपत्ती आमचे पाप नाही हे सांगण्यासाठी पण आयकर विभाग किंवा सक्त वसुली संचनालयाला त्यांना चौकशीला सामोरे जातांना आजचा नव्हे तर मागील २० वर्षांचा नेमका हिसाब 'किताब द्यावा लागणार आहे, हे मला अलीकडे आयकर विभागाचे आयुक्त असलेले माझे एक मित्र, त्यांनी सविस्तर समजावून सांगितले आहे. त्यामुळे ओळखीतुन आणि जातीच्या भरवशावर दादागिरी करणाऱ्या या राज्यातल्या काळा पैसा जमा करणाऱ्या अनेकांना नागडे करण्याची किमयानरेंद्र मोदी यांनी करवून दाखवली आहे....श्रीमान रणजित पाटीलांनी सभागृहात भलेहि मीरा भायंदरच्या या बिलंदर नागररचनाकाराला म्हणजे भ्रष्ट दिलीप घेवारेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न हिवाळी अधिवेशनात नितेश राणे यांनी प्रश्न विचारल्यानंतर केला असेल, पण दिलीप घेवारे याची आता मोठ्या चौकशीतून सुटका नाही. त्याने आजपर्यंत ज्यांची ज्यांची तोंडे विविध मार्गांनी बंद केली, तेच आता त्याला रस्त्यावर आणतील....

आमचे मित्र रणजित पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात नितेश राणे यांना नागपुरातल्या सभागृहात उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, त्यामागील नेमके सत्य म्हणाल तर बिंग मी फोडणार आहेच पण माननीय मुख्यमंत्र्यांना देखील घेवारे यांना पाटलांनी वाचविल्याचा अतिशय राग आलेला आहे अशी माझी माहिती आहे, खरे तर ज्या दिवशी २८ खाजगी विकासकांना बनावट शासकीय परवानग्या देऊन सरकारी जमिनी घोटाळा घडवून आणल्याचे प्रकरण विधान परिषदेत आमदार नितेश राणे यांनी उचलून धरले, जर रणजित पाटील यांनी सभागृहात उडवाउडवीची उत्तरे देण्याचा केविलवाणा आणि प्रामाणिक शासनाला लाज आणणारा प्रकार पाठीशी घातला नसता तर त्याचक्षणी दिलीप घेवारे याच्या पायाखालची वाळू सरकली असती, त्याला मोठ्या चौकशीला नजीकच्या काळात सामोरे जावे लागले असते पण रणजित पाटलांच्या सभागृहातील संशयास्पद भूमिकेचा घेवारेला फायदा मिळाला, त्याला त्यादिवशी वाटले कि आपल्यावर आलेले हे संकट दूर झाले म्हणून पण आम्ही ते होऊ देणार नाही, आज ना उद्या घेवारे गजाआड जाईल हि काळ्या दगडावरची रेषा आहे....

मीरा भायंदर परिसरात राहणाऱ्या नेत्यांची लोकांची मानसिकता आता एवढी गांडू झालेली आहे का कि कोणी एक सामान्य अधिकारी सतत २२ वर्षे त्यांच्या उरावर बसून त्यांना लूट लूट लुटतो तरीही मीरा भायंदरकर मूग गिळून बसतात. नरेंद्र मेहता असोत कि गिल्बर्ट मेंडोन्सा, हे सारेच बिनीचे नेते बिल्डर असल्याने त्यांना घेवारे सारखा महहरामी आणि महाचोर अधिकारी सभोवताली हवे आहेत,पण कुठे गेलेत ते विवेक पंडित यांच्यासारखे झगडणारे आणि अत्याचाराविरुद्ध लढणारे नेते कि त्यांनीही घेवारे प्रकरणी बांगड्या भरणे पसंत केले आहे. मीरा भायंदर महापालिकेत गोरगरिबांना युएलसी अंतर्गत घरे बांधण्याच्या असलेल्या जागांच्या धोरणाला अक्षरश: हरताळ फासून घेवारे आणि कंपूने त्यासाठी राखीव असलेली जागा २८ खासगी विकासकांना बनावट ना हरकत प्रमाणपत्र देऊन विकल्याचा घेवारे आणि कॅम्पचा हा आजवरचा सर्वात मोठा जमीन घोटाळा आहे आणि या घोटाळ्याचा सूत्रधारफक्त आणि फक्त दिलीप घेवारे हा नगररचनाकार असून त्याला या घोटाळ्यातून कोट्यवधी रुपये मिळाल्याची आमची माहिती आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, कृपया एखाद्या भाजपा नेत्याच्या सांगण्यावरून घेवारे यास पाठीशी न घालता अद्याप मोकाट असलेल्या घेवारेला पोलिसांच्या ताब्यात देऊन नेमके सत्य उजेडात आणा, घेवारे याची केस अधिक बळकट होण्यासाठी मी त्याच्याविषयीची आणखी काही गंभीर पुरावे आपल्यासमोर सादर करायला तयार आहे, घेवारे यास कृपया मोकाट सोडू नका हि हात जोडून विनंती....
क्रमश:

No comments:

Post a comment