Wednesday, 2 November 2016

काका पुतणे आणि भांडणे 4 : पत्रकार हेमंत जोशी


राज्याचे परिवहन मंत्री श्रीमान दिवाकर रावते यांच्याशी दिलखुलास गप्पा, एक छान अनुभव असतो. नेते, पत्रकार दोघेही भावनाप्रधान असले कि दोघातल्या गप्पा अपेक्षाविरहित दिलखुलास देशप्रेमाच्या असतात, रावते देखील अति अति भावनिक, मी भावनाप्रधान नसतो तर मनापासून लिहूच शकलो नसतो, तुटून पडू शकलो नसतो...अलीकडे रावते म्हणाले, जेव्हा केव्हा रस्त्यात माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांची गाठभेट होते, मनापासून त्यांना वारंवार धन्यवाद देतो, ते असे मुख्यमंत्री कि त्यांनी आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा अंत्यविधी करण्या आम्हाला शिवाजी पार्क उपलब्ध करून दिले, देशात हे तेही आपल्या राज्यात दुसऱ्यांदा घडले म्हणजे लोकमान्य टिळकांचा अंत्यविधी गिरगाव चौपाटीवर करण्यात आला होता आणि दुसऱ्यांदा बाळासाहेबांच्या बाबतीत हे घडले....मित्रहो, फार कमी राजकारणी असे कि ज्यांच्याविषयी लिहितांना माझ्या लेखणीला देखील मनापासून आनंद होत असतो, तीही दुडूदुडू धावत असते, आपले मुख्यमंत्री तर पृथ्वीराज यांच्याही खूप पावले पुढे, पुढल्या वर्षी याच महिन्यात तुम्ही मला आपणहून फोन करून सांगाल, हाच मुख्यमंत्री पुढल्याही टर्मला सत्तेत हवा, त्यांनी आखलेल्या नेमक्या कामांचा रिझल्ट तुम्हाला पुढल्या वर्षभरात नक्की बघायला मिळेल...


असो, विषय आहे, राज्यातल्या राजकीय काका पुतण्यांचा आणि बंड घडून आलेले आहे आता रोह्याच्या सुनील तटकरे यांच्या घरात, सुनील यांच्यापासून त्यांचे भाऊ अनिल आणि अनिल यांची मुले अवधूत व संदीप, सारेच दुरावले आहेत, नेमके हे असे का घडते किंवा घडले त्यावर मी यथावकाश काही गुपिते तुमच्यासमोर फोडणार आहे....मला नाही वाटत, काल परवापर्यंत सर्वसामान्य कुटुंबातला सुनील मंत्री होताच ज्या पद्धतीने मतदारसंघाला साध्या घरातून चक्क महालात राहायला गेल्यानंतर त्याचा हा झपाट्याने झालेला आर्थिक काळा विकास यापुढे मतदार सहन करतील ते, यापुढे थेट लोकांतून निवडून येणे नक्कीच तटकरे यांना जड जाणार आहे, काळ्या संपत्तीतून मिळवलेली श्रीमंती, ज्याला त्याला तटकरे  यांच्याविषयी घृणा उत्पन्न करते, अनिल तटकरे आणि कुटुंबियाला देखील 
सुनील यांच्या या अशा बेधुंद वागण्यातूनच त्यांच्याविषयी मन कलुषित झाले  आहे, पुढल्या काही दिवसात अवधूत आणि संदीप हे दोघे पुतणे नक्की सुनील यांची अख्खी लक्तरे वेशीवर टांगून मोकळे होतील. आई वेश्या असली कि मुलांना समाजात वावरतांना लाज वाटते, त्यांच्या माना खाली जातात, इथे तर तटकरेंना काही वर्षांपासून शरद पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा थेट प्रदेशाध्यक्ष करून ठेवलाय, आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, हे सांगतांनापवारांच्या पक्षातल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची अवस्था, आई वेश्या असल्यासारखी नक्की होत असेल नाही का, पण पवारांना सांगेल कोण, वाघाच्या ओठांचा मुका कधी हरीण घेईल का, पवारांसमोर तुम्ही आम्ही सारे हरिणंच कि....

श्रीमान सुनील तटकरे यांच्या मुलाच्या हातात म्हणजे अनिकेत यांच्या हाती जेव्हा व्यवहाराची हळूहळू सारी सूत्रे पुतण्या अवधूत यांच्याकडून काढल्या जाऊन केवळ व्यवसायात अनिकेत यास प्राधान्य सुनील यांनी देण्यास सुरुवात झाली, अतिशय धाडसी आणि बेधडक अनिल आणि अवधूत तेथून सुनील तटकरे यांच्या बाबतीत मनातून प्रचंड दुखावले, धुसफूस सुरु झाली पण फारशी उघड्यावर येत नव्हती, पण दोघं भावात अलिकडल्या चार वर्षात फारसे चांगले संबंध नाहीत हे आम्हा माहिती घेण्यात माहीर असलेल्या मंडळींना माहित होते, जेव्हा अनिकेत नंतर सुनील तटकरे यांनी अवधूत आणि संदीप या दोघांनाही राजकीय परिघात न ओढता चक्क पोटच्या पोरीला म्हणजे आदिती यांना थेट राष्ट्रवादी कार्यालयात आणून बसविले, तेथे मात्र सारे संपले, ज्या अनिल तटकरे यांनी सुनील घडविताना सदा सतत कायम वयाने मोठे असूनही लक्ष्मणाची भूमिका घेऊन स्वतः मागे राहिले, अनिल यांनी आधी आपल्या थोबाडात मारून घेतल्या, नंतर ठरविले. यापुढे सुनील विरुद्ध राजकीय बंड करून मोकळे व्हायचे, त्याला मतदार संघात घरातूनच आव्हान निर्माण करायचे आणि सुनील कसा नवश्रीमंत झाला तेही लोकांना नेमके पुरावे देऊन ओरडून सांगायचे. मनाने सुनील आणि अनिल कुटुंबीय एकमेकांपासून नक्की दूर गेले आहेत आणि त्यातून मोठे राजकीय नुकसान तोळामासा प्रकृती असलेल्या सुनील तटकरे यांचे होणार आहे....

क्रमश:

1 comment:

  1. चुकीच्या गोष्टींवर सप्रमाण नक्की टीका करा, पण शब्दांचा खेळ खेळत असताना त्याच शब्दांच्या आडोशाने एखाद्या पक्षाची आणि पक्षप्रमुखाची सवंग बेमतलबी बदनामी करू नका.

    ReplyDelete