Wednesday, 12 October 2016

तावडे सर्वांना आवडे 7 : पत्रकार हेमंत जोशी


विनोद तावडे अष्टपैलू आहेत, राजकीय चतुर नक्कीच आहेत पण लबाड 
नाहीत, चटपटीत बोलतात पण मोजके वायफळ नाही, ते तल्लख तडफदार 
रोखठोक बुद्धिमान आहेत, व्यवहारकुशल नक्कीच आहेत पण कंजूष नाहीत,
शब्दज्ञानी धोरणी निपुण कार्यप्रवीण कल्पक डोकेबाज, शास्त्र कलेत रमणारे, 
विद्यासंपन्न, विद्वान, व्यासंगी, सुशिक्षित,दर्दी, धुरंधर, वस्ताद, वाकबगार, 
राजकीय मुरब्बी, सावध, गुणाढ्य, चाणाक्ष, समंजस, समजूतदार, हुन्नरी, 
डोकेबाज सारे काही आहेत पण तावडे उठसुठ विनाकारण संशयी अविचारी, 
घातकी, मारक, गद्दारी करणारे, अतिधूर्त, शब्द न पाळणारे, केवळ फेकाफेकी 
करून वेळ मारून नेणारे, बोलघेवडे, एखाद्याची पाठ फिरताच त्याला शिव्या 
घालणारे नेते नाहीत. समजा अमुक एखादी राजकीय चूक त्यांच्याकडून घडली 
तर ते मनाशी नेमके ठरवून पुन्हा अशी चूक हातून घडणार नाही, याची तंतोतंत 
काळजी घेतात. मंत्री झाल्यानंतर कळत नकळत किंवा अजाणतेपणाने त्यांच्या 
हातून ज्या चुका झाल्या, त्या पुन्हा न करण्याची त्यांनी खबरदारी घेतली त्यामुळे 
अमुक एखाद्या ठिकाणी गेलेले स्थान त्यांनी पुन्हा मिळविले. सुरुवातीला माननीय 
मुख्यमंत्र्यांच्या मनात त्यांचे फारसे जवळचे स्थान नसावे, तावडे यांनी कृतीतून मग 
ते सिद्ध केले कि मला संधी मिळो अथवा न मिळो पण तुम्हाला मिळालेल्या संधी 
आड मी एखाद्या स्पर्धकांप्रमाणे वारंवार येणार नाही त्यातून मंत्रिमंडळातले जे 
काही सदस्य मुख्यमंत्र्यांना आपल्या जिवाभावाचे वाटतात त्यात तावडे हेही एक...
अमुक एखादा मतदार तावडेंच्या दाराशी तासंतास आधी ताटकळत बसला नंतर 
तसाच निघून आला किंवा तावडेंना शिव्याशाप देत आल्या पावली माघारी फिरला 
असे ना कधी घडते ना कधी घडले. मतदार पुढ्यात आला किंवा अमुक एखादा माणूस 
नेमके काम घेऊन आला कि त्याची जात, तो पक्षाचा कार्यकर्ता कि विरोधातला, अमुक 
कि तमुक असा कुठलाही संशय न घेता बोरिवली स्टेशन जवळ असलेल्या त्यांच्या 
अद्ययावत कार्यालयात जाणाऱ्याला योग्य मार्गदर्शन, पत्र किंवा हवे ते सहकार्य नक्की 
मिळते त्यासाठी तावडेंच्या मतदाराला मंत्रालयाचे उंबरठे विनाकारण झिजवावे लागत 
नाहीत, सतत 36 वर्षे राजकारणात आणि समाजकारणात त्यांनी झोकून दिल्याने त्यातून 
आलेला प्रदीर्घ अनुभव त्यामुळे त्यांच्यातला परिपकव नेता घडला असे वारंवार सर्वांना 
वाटत राहते. मुंबईकरांना नक्की आठवत असेल तावडे यांनी सतत 9 वर्षे जो उपक्रम 
राबवला होता तो प्रकार म्हणजे दरवर्षी आषाढीला, होय, श्रीमान विनोद तावडे ज्येष्ठ 
नागरिकांना न चुकता आषाढी एखादशीला केवळ 50 रुपयात पंढरपूरला अख्खी ट्रेन 
करून न्यायचे, त्यांना वाऱ्यावर सोडून न देता स्वतः तावडे आणि त्यांचे निवडक साथीदार 
सोबतीने प्रवास करून जणू दरवर्षी अशा हजारो ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद मिळवायचे. 
या अशा जवळपास विनामूल्य विविध सहलींचे उपक्रम राबवणारे तावडे हे पहिले नंतर 
त्यांच्या या उपक्रमाची विविध नेत्यांनी नक्कल करून मते पदरात पडून घेतली, तावडेंना 
मात्र त्यावेळी कधी डोक्यातही नव्हते कि अमुक एखादी निवडणूक लढवावी लागणार 
आहे, सारे काही त्यांनी राबविले सामाजिक भान ठेवून, म्हणून त्यांना कायम उपाधी 
मिळत गेली कार्यसम्राट आणि कार्यक्रमसम्राट म्हणून...
अनेक म्हणतात, सांगणारे सांगतात कि शिवाजी पार्कवर गर्दीचे उच्चांक मोडणारे आम्ही, 
ऐकतांना हसू येते किंवा किव करावीशी वाटते अशा थापा मरणाऱ्यांची कि गर्दीचे विक्रम 
त्यांनी मोडीत काढले त्यावर पण वस्तुस्थिती फार वेगळी आहे. श्रीमान नरेंद्र मोदी जेव्हा 
गुजराथचे मुख्यमंत्री झाले होते त्यांचा मुंबईकर नागरिकांतर्फे शिवाजी पार्कवर जाहीर 
सत्कार भाजपाने घडवून आणला होता आणि या भव्य दिव्य अवाढव्य महाकाय भव्यतम 
सत्कार कार्यक्रम यशस्वी करण्याची जाबाबदारी पक्षाने विनोद तावडे यांच्यावर टाकली 
होती, त्या सत्कार समारंभाला जमलेली अलोट गर्दी ना कधी जमली होती ना कधी 
भविष्यात जमेल, मी नाही, जाणकार सांगतात, अनुभवी रहिवासी म्हणतात....

No comments:

Post a comment