Tuesday, 11 October 2016

तावडे सर्वांना आवडे 5 : पत्रकार हेमंत जोशी

विनोद तावडे मतदारसंघात फिरतात तेव्हा बोरिवली कांदिवली परिसरात केरळ 
अवतरले आहे कि काय बघणाऱ्या नवख्याला वाटावे. केरळचा लोकप्रिय 
नृत्यप्रकार म्हणजे कैकोट्टीकली, मुख्यतः केरळातील स्त्रिया हा प्रकार 
सादर करतात. आठ ते चौदाजणी एकाच सुरात टाळ्या वाजवितात. ओणम 
प्रसंगी बहुदा हे नृत्य सादर केले जाते. विशेष म्हणजे डोंबिवली येथील 
सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल मैदानात 9 नोव्हेंबर 2012 रोजी 2643 
स्त्रियांनी पंधरा मिनिटे हे नृत्य सादर करून जागतिक विक्रम करून गिनीज 
बुक मध्ये त्याची नोंद झाली. तावडेंच्या बाबतीत तर बोरिवलीत केरळ नेहमी 
अवतरते म्हणजे ते जेव्हा एखाद्या समूहाला कुठल्याशा कार्यक्रमानिमित्ताने 
सामोरे जातात, जमलेल्या लोकांचे आनंदाच्या भरात ' कैकोट्टीकली ' सुरु 
होते, जमलेले सारे एका तालात टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करतात. 
एखाद्या वेळी अमुक एखादे काम तावडे यांना स्वतःला लहान वाटते पण 
जनतेच्या लोकांच्या मतदारांच्या दृष्टीने ती त्यांना चालून आलेली पर्वणी 
म्हणजे सुवर्णसंधी असते. कोकणातल्या मराठीची येथे संख्या खूप मोठी, 
कोकणी माणूस हमखास वर्षातून चार दोन वेळा प्रसंगी कर्ज काढेल पण 
गावाकडे कसेही करून जाऊन येतो, सामान्य कोकणी माणसासाठी, तसेही 
सामान्य लोकांसाठी राज्य परिवहन महामंडळाची बस उर्फ एसटी म्हणजे जीव 
कि प्राण, एसटीचा सुखकर प्रवास जो कोणी घडवून आणेल त्याला प्रवासी 
मनापासून आशीर्वाद देऊन मोकळे होतात. सध्या असे दरक्षणी आशीर्वाद 
भाग्याला येतात त्या परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या वाटयाला, ह्या 
भन्नाट मंत्र्याच्या डोक्यातही सतत काहीतरी चांगले नवीन सुखदायक असे 
एसटी मध्ये घडवून आणण्यासाठी त्यांच्या डोक्यात किडा वळवळत असतो 
आणि रावते त्यावर झेप, निर्णय घेऊन आणि घेतलेल्या निर्णयांची अंमबजावणी 
करून मोकळे होतात, त्यांच्यानंतर तेच या राज्याला मिळालेले एकमेव योग्य 
असे परिवहनमंत्री, 1995 मध्ये देखील दिवाकर रावते हेच परिवहन खात्याचे 
मंत्री होते. क्रांती, परिवर्तन इत्यादी शब्द आवडणारा हा मंत्री....
एकदा वडील श्रीधरअण्णा विनोद तावडेंना म्हणाले, तुझा मतदार दूरवर कुठेतरी 
एसटी पकडण्यासाठी डेपो मध्ये जातो, घाम गाळून अख्खे कुटुंब कशीबशी 
एसटी पकडून गावाला जातात, नोकरी करून कोकणी माणूस घरी येतो, लगेच 
दूरवर डोक्यावर सामान घेऊन बस पकडायला गर्दीत कसाबसा बस पकडतो, 
येथे मुंबईत आल्यानंतर देखील दूर कुठेतरी हे आपले प्रवासी उतरतात आणि 
त्रास, ताप, मनस्ताप सहन करीत कसेबसे घर गाठतात, विशेष म्हणजे 
थकून भागून आलेले हे प्रवासी कामावरही जातात. तुझे मतदार तेथे दूर जाऊन 
बस पकडत बसल्यापेक्षा तूच बसडेपो येथे बोरिवलीत घेऊन ये कि, कल्पना 
अति कठीण होती पण विनोदजींना देखील हि भन्नाट कल्पना आवडलेली, 
त्यांनी स्वतः त्यावर मग पाठपुरावा सुरु केला आणि कठीण असे हे काम वडील 
हयात असतांनाच त्यांना करून दाखविली. कांदिवली चारकोप परिसरातले ते 
सुप्रसिद्ध असे बेस्ट आगार, साऱ्याच मुंबईकरांना ते माहितीचे, श्रीमान विनोद तावडे 
यांनी वेगळी किमया करवून दाखवली, बेस्ट आगारातच त्यांनी एसटीला डेपो साठी 
परवानगी मिळवली, आणि सामान्य माणसाच्या डोळ्याचे पारणे फेडले, मतदार 
तावडेंवर खुश आहेत, मंत्री तावडे दिसले रे दिसले कि त्यांच्या मतदारसंघात हमखास 
कांदिवली बोरिवली परिसराने वेढलेल्या त्यांच्या विधान सभा परिक्षेत्रात कैकोट्टीकली 
साजरा होतो. मतदार मनापासून त्यांच्यावर त्यांच्या कणखर नेतृत्वावर नेतृत्व प्रेम 
करतात. कांदिवली चारकोप परिसरात विनोदजी तावडे यांनी उभे करवून दाखवलेले 
हे एसटी आगार, दूर कुठेतरी परळ किंवा मुंबई सेंट्रलला जाऊन एसटी बस पकडण्याचा 
त्रास जवळपास अंधेरी ते दहिसर परिसरातील साऱ्यांचा कमी झाला, विक्रमी असे हे 
काम, कुठलाही गाजावाजा न करता त्यांनी हा डेपो लोकार्पण केला....

No comments:

Post a comment