Monday, 22 August 2016

प्रकाश मेहता पराभूत पत्रकारिता

कधी कधी आपल्या एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू असतात. एखाद्या विवाहित पुरुषाला प्रेयसींसंगे एकांत मिळाला कि एका डोळ्यात हसू आनंद असतो पण त्याचवेळी नागपूरकर राऊतांना जसे नागडे आणि उघडे प्रेयसींसंगे पकडल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या डोळ्यात अश्रू आले, ज्या विवाहित पुरुषांचे विवाहबाह्य संबंध आहेत त्यांचेही तेच होते, आणि बायकोने अमुक एखाद्या नवऱ्याचे लफडे पकडले नाही असे एकही घर या राज्यात नसावे. बायको मग ती वडगाव बुद्रुकची असो कि मलबार हिलवर राहणाऱ्या बंगल्यातली, स्त्रियांची त्यात मास्टरी असते, कितीही लपवून ठेवा, नवऱ्याला रंगेहाथ पकडलेले नाही अशी बाई बायको मी बघितलेली नाही. यात अपवाद माझे घर, आमच्या घरी संशय घेण्याचे माझे भ्रमणध्वनीवर आलेले मेसेजेस गुपचूप वाचण्याचे काम माझा मोठा मुलगा विक्रांत करतो. एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आणणारे असे अनेक तुमचे आमचे आयुष्यातले प्रसंग येथे सांगता येतील रेखाटता येतील. जसे हागवणीचा त्रास झाला कि एका डोळ्यात अश्रू असतात तसेच सुखरूप आणि इनर कपडा कुठेही रस्त्यात ओला न करता घरी आलो कि दुसऱ्या डोळ्यात हसू असते, जग जिंकल्याचा आनंद अशावेळी मनाला होतो. मित्रहो, माझा सल्ला ध्यानात ठेवा, हागवणीचा त्रास झाल्यानंतर भर रस्त्यात कितीही पादायाला झाले तरी कंट्रोल उदय कंट्रोल, म्हणत म्हणत पण फारशी झपझप पावले न टाकता घरी या,अशा नाजूक क्षणी धावपळ करीत घरी येणे तुमची भर रस्त्यात फजिती त्यातून होण्याची अधिक दाट शक्यता निर्माण होते. अशावेळी रस्त्यात तुम्हाला अगदी माधुरी दीक्षित जरी भेटली तरी तिच्याशी गप्पा मारण्याचा मोह आवरा, येणारे संकट टाळण्यासाठी....
वाचकमित्रहो,  यावेळी याक्षणी माझ्या एका डोळ्यात हसू आहे आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत. हसू आनंद यासाठी कि अलीकडे माझ्या दोन वाचकांनी माझ्या एका डोळ्यात हसू आनंद आनंदाश्रू आणले आहेत. माझी एक नियमित तरुण महिला वाचक या राज्यातल्या एका प्रख्यात विख्यात नामवंत विचारवंत लेखन विश्वात अग्रगण्य कुटुंबातली अतिशय बुद्धिमान आणि उत्तम व्यावसायिक खूप शिकलेली ती तरुणी आहे, तिने आंतरधर्मीय अमराठी उच्चशिक्षित तरुणाशी लग्न केले आहे, जेव्हा केव्हा ती माझे लिखाण वाचते, नवरा तिला सांगतो, आता हे मला हिंदी किंवा इंग्रजीत समजावून सांग आणि ती  आळस न करता हे काम नियमित करते, ते तिने मला अलीकडे प्रत्यक्ष भेटीत सांगितले. दुसरा प्रसंग औरंगाबादला केटी नावाचा माझा एक सरदारजी, कंत्राटदार असलेला मित्र आहे, त्याच्या घरात सारे असंख्खलीत मराठीत बोलतात, त्याचा एकुलता एक उच्चशीक्षीत ईशान नावाच्या मुलाने मला पात्र लिहिले, मजकूर असा, काही वर्षांपूर्वी वडिलांनी मला, ऑफ द रेकॉर्ड ऑन लाईन रेफर केला, अनेकदा मी आपले अंक वाचतो. सर, मला असे आवर्जून सांगावेसे वाटते कि आपली भाषाशैली मला खूप प्रभावित करते. अगदी सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने एक सामाजिक संदेश पोहोचवायचा असेल किंवा कुठल्याही गैर सामाजिक वृत्तीला टीका
करायची असेल, आपण त्यात महारथी. हा उपक्रम आपल्या हाताने वर्षानुवर्षे चालत राहावा हि देवचारणी प्रार्थना...
या बोलक्या प्रतिक्रिया आल्यानंतर माझ्यासारख्या हळव्या मनाच्या डोळ्यात हसू आनंद दाटून येत नसेल, असे कसे होईल. आणि माझ्या दुसऱ्या डोळ्यात या क्षणी अश्रू आसू दु:ख यासाठी कि सर्वगुणसंपन्न असे घुटकाफेम मंत्री प्रकाश
मेहता, ज्यांनी अगदी उघड एका पत्रकाराचा, साम वाहिनीवर काम करणाऱ्या मिलिंद तांबे नामक प्रतिनिधींचा महाडला खुलेआम अपमान केला, तो अपमान या राज्यातल्या साऱ्याच वृत्तपत्रे आणि वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी मेहता यांना
फारसे धारेवर न धरता सहन केला आणि प्रकरण ' अर्थपूर्ण ' शब्दात सांगायचे झाल्यास पुढे दुसऱ्याच दिवशी दाबल्या गेले. मी मागल्या अंकात म्हणालो तेच, म्हातारी मेल्याचे आता दु:ख आहे कारण काळ सोकवणार आहे, पत्रकारांची
प्रतिनिधींची चार चौघात रांड केली तरी हरकत नाही ते गप बसविणे एकदम सोपे आहे हे मेहता यांनी एकप्रकारे सिद्ध केले आहे, आता कोणीही उठेल आणि आम्हाला थोबाडात मारून मोकळा होईल....

पुढल्या दोन दिवसात निघणारा माझा अंक यासाठी वाचा कि, मेहता प्रकरण केवळ दाबल्या गेले असते तर कदाचित मला फार वाईट वाटले नसते पण केवळ प्रकरण ' मिटवून ' मेहता आणि त्यांचा तथाकथित भाजपामधला कंपू थांबला नाही
तर त्यांनी जगभरातल्या मराठी वाचकात आम्हा मीडियावर विविध लेख टाकून पद्धतशीर बदनामी केलेली आहे, मेहता कॅम्पमधून जे टीका करणारे लेख आम्हा मीडियावर
टाकण्यात लिहिण्यात आलेले आहेत त्या साऱ्या लेखांची भाषा एकसारखी आहे, याचा अर्थ एखाद्या उत्तम लेखकाकडून ते प्रोफेशनली लिहून घेतल्या गेलेले आहेत.
हे सर्व लेख मी माझ्या ताज्या पाक्षिकात घेतले आहेत, फक्त एक लेख माझ्या नजरेआड झाला ज्यात अनेक मान्यवर, मीडिया मधल्या अनेकांची आर्थिक लफडी
मांडलेली होती, मला काही माझ्या या क्षेत्रातले म्हणाले, तो आर्थिक भानगडी मांडणारा लेख वाचल्यानंतरच मीडिया मधल्या बहुतेकांची एक्सवायझेड फाटली आणि त्यांनी मेहता प्रकरण बाजूला टाकले, तो लेख कोणाकडे असेल तर अवश्य
मला पाठवा, बघूया त्या लेखाचा समाचार कसा घेता येईल ते, नेत्यांच्या या अशा धमक्यांना कधीही घाबरायचे नसते, विचलित व्हायचे नसते.....

मेहता प्रकरण अगदी सहज मीडिया ने बाजूला टाकले, म्हणून माझ्या दुसऱ्या  डोळ्यात अश्रू आले, मीडियाचा पराभव हा देशाला घातक असतो, आमचे तोंड दाबल्या जाते,
हा संदेश मुळात खूप वाईट वातावरण निर्माण करतो, देशभक्त पत्रकार या अशा पराभवातून मोठ्या प्रमाणावर नैराश्येच्या आहारी जातात.....

No comments:

Post a comment