Friday, 19 August 2016

बुवाबाजी आणि पत्रकारिता मुंबईची : पत्रकार हेमंत जोशी

 उद्या समजा शरद पवारांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन रामदास आठवलेंचे नेतृत्व स्वीकारले तर किंवा एकनाथ शिंदे यांनी राजकारण सोडून, एक शाम रफी के नाम कार्यक्रमात गायला सुरुवात केली तर किंवा नीलम गोर्हे यांनी राजकीय सन्यास घेऊन ब्रह्मकुमारी आश्रमात पांढरी साडी नेसून कायमचा आसरा घेतला तर किंवा अमिताभने अभिनय सोडून भेलपुरीची गाडी टाकली आणि जया 
त्याला तेथे कांदे सोलून चिरून द्यायला बसली तर किंवा अनिल अंबानी ची पोरगी मराठी रात्र शाळेत शिकायला पाठवल्या गेली तर किंवा रतन टाटा यांनी अर्धा किलो टमाटे घेतांना घासाघीस केली तर किंवा अविनाश भोसले गिरगावातल्या चाळीत सकाळी हाती टमरेल घेऊन रांगेत उभे दिसले तर....हे जसे सारे आपल्याला विचित्र वाटेल ते तसे अलीकडे माझ्या मनाचे झालेले आहे म्हणजे मुंबईतले जे विविध वाहिन्यांवर प्रमुख भूमिकेत संचलन करतात किंवा मुंबईतून जी वृत्तपत्रे निघतात, ज्यांनी आजतागायत कायम प्रखर उघड सतत बुवाबाजीला विरोध केला आहे त्यांनी अलीकडे जेव्हा आपल्या वाहिन्यांवरून आणि वृत्तपत्रातून इंदोरस्थित भय्यू महाराजांना आपल्या वाहिनीवर किंवा वृत्तपत्रातून भय्यू महाराज या व्यक्तीवर कुठलीही माहिती न घेता केवळ स्वतःभय्यू महाराज सांगताहेत मी ग्रेट असामान्य कसा, विश्वास ठेवून त्यांना जी वायफळ वारेमाप प्रसिद्धी दिली ते बघून वाचून, कुठे चाललाय आपला महाराष्ट्र असे माझे मन 
त्यावर मलाच विचारायला लागले. अत्यंत ढोंगी बालिश आणि चालू माणसाला विशेष म्हणजे बुवाला अशी प्रतिष्ठा देणे योग्य नाही, आधी त्यांना जवळून बघणारे, बघितलेले नंतर सोडून गेलेले जे या राज्यात मला माहित असणारे काही प्रतिष्ठित आहेत, मी मुंबईतल्या मीडियाला त्यांच्याकडे घेऊन जातो, त्यांना विचारा भय्यू महाराज काय गौडबंगाल आहे, तुम्हाला त्यांच्या तोंडून नेमके भय्यू महाराज समजल्यानंतर मग लिहा नेमके त्यांच्यावर, शरद पवार आणि अजित पवार वेडे आहेत का कि त्यांनी कधीही भय्यू महाराजांना जवळ केले नाही, उलट पवारांच्या घरातले किंवा त्यांच्या पक्षातले जे कोणी महाराजांच्या नजदिक गेले होते, त्यांचे ब्रेन वॉश करून भय्यू महाराजांपासून दूर नेण्याचे पुण्य या काका पुतण्याने किंवा अकलूजच्या मोहिते पाटील घराण्याने केल्याची माझी माहिती आहे, विजयसिंह मोहिते पाटलांच्या एका बंधूंचे अलीकडे निधन झाले, ते भेटले कि भय्यू महाराज विषय काढायचा अवकाश, त्यांच्या तोंडून 
येणारे किस्से मला तोंडात बोटे घालण्यास भाग पडायचे....अर्थात चूक माझी झाली होती, मी सुद्धा भय्यू महाराजांच्या चतुर बोलण्यावर एकेकाळी असाच इम्प्रेस झालो होतो, पण त्यांच्यापासून दूर गेलेले आणि आधी खूप खूप जवळ असलेले काही प्रतिष्ठित भक्त मला भेटले, त्यांनी मला नेमके भय्यू महाराज समजावून सांगितले आणि मी अवाक झालो, किस्से ऐकून स्तंभित झालो. मी जसा भय्यू महाराजांच्या दिवंगत पत्नीच्या माहेरच्या नातेवाईकाला भेटलो तसे तुम्हीही त्यांना गाठा आणि ऐका, नेमके कसे आहेत भय्यू महाराज, मला खात्री आहे, ज्या वेगाने सुद्न्य आणि स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या मुंबईकर मीडियाने त्यांना प्रसिद्धी दिली, दुप्पट वेगाने ते विरोधात जातील. एकीकडे दाभोलकर यांच्यासारख्या बुवाबाजी विरोधात लढणाऱ्या समाजसेवींचीहत्या झाली, त्यांच्यावर हल्ले झाले कि मुंबई मीडिया बुवाबाजी आणि अंधश्रद्धेवर तुटून पडते पण त्याचवेळी जर आम्ही मुंबईकर मीडियाने भय्यू महाराजांसारख्या बुवांचे 
उदात्तीकरण लोकांसमोर केले तर दोषी आम्ही मीडिया आहोत, त्यातून उद्या असे अनेक लबाड भय्यू महाराज जन्माला येतील, जी चूक माझी झाली कधीकाळी, मीडिया मुंबई, कृपया ती चूक तुम्ही करू नका, अनिरुद्ध बापू, भामटा नरेंद्र महाराज किंवा लबाड भय्यू, 
कधीही मोठा करू नका, अशा मंडळींना प्रतिष्ठा मिळेल कृपया असे करू नका....मी तर पुरावे मांडणार आहेच पण श्याम मानव, ज्ञानेश महाराव तसेच पत्रकार अविनाश दुधे, अनिल गावंडे, पत्रकार पुरुषोत्तम आवारे पाटील इत्यादी मंडळींना तुम्ही मुंबईकर मीडिया, भय्यू महाराज नेमके कसे, विचारा, नंतर ठरवा, यापुढे भय्यू महाराजांना प्रसिद्धी द्यायची किंवा नाही, भय्यू महाराजांची लबाडी ओळखणारे तर मला असेही म्हणाले, मुंबई मीडियाला मोठी सुपारी मिळालेली दिसते, महाराजांना प्रतिष्ठा मिळवून देण्याची, त्यावर मी म्हणालो, एवढी स्वस्त आहे का मुंबईची मीडिया, सहज कोणालाही विकल्याजाणारी, आणि असे जर घडणार असेल तर उद्या त्या पाकड्या नाईकला देखील आम्ही मुंबई मीडिया देवत्व देऊन मोकळे होऊ.....
आणि तसेही भय्यू महाराजांना नेमके ओळखणे अतिशय सोपे आहे, तुमच्यातल्या एखाद्या तरुण आणि सुंदर दिसणाऱ्या महिला पत्रकाराला बेमालूम, संकटात सापडलेली एक भक्त म्हणून इंदोरच्या आश्रमात भय्यू महाराज आणि यादव सारख्या त्यांच्या खास 
भक्तांच्या संगतीत आणि भय्यू महाराजांच्या ताफ्यात इंदोरबाहेर अन्यत्र कुठेही प्रवासात सतत आठ दिवस पाठवा, विदारक सत्य बाहेर पडले नाही तर मी पत्रकारितेतून बाजूला होईल. भय्यू महाराजांची मुलाखत घेऊन किंवा छापून मोकळे झाला आहेत ना, आता खऱ्या आईचे दूध प्यायला असाल तर त्याच पद्धतीने पत्रकार अविनाश दुधे, शिर्डीचे बाळासाहेब जाधव इंदोरचे वेडी ठरविल्या गेलेली एक तरुणी आणि मी सांगेन त्या स्त्री पुरुषांच्या मुलाखतीही तुम्ही मीडिया घेण्याची हिम्मत दाखवा, मला खात्री आहे, नेमके भय्यू महाराज कसे या राज्याला कळतील. आणि हो, भय्यूमहाराज तुम्हीही जे मिळाले आहे त्यात आता सुख माना, उगाच स्वतःचा गाजावाजा करून झाकली मूठ सव्वा लाखाची उघडू नका, हात जोडून तुम्हाला विनंती. तो नरेंद्र आणि अनिरुद्ध कसे गप बसले आहेत, बुवाबाजीच्या विरोधात लढणाऱ्या मान्यवरांचे खून झाल्यानंतर, तुम्ही तेच करा, चमकेशगिरी सोडून द्या, पोटच्या एकुलत्या एक पोरीकडे तिच्या आईच्या पश्चात लक्ष द्या.....अपूर्ण

No comments:

Post a comment