Friday, 19 August 2016

बुवाबाजी आणि पत्रकारिता मुंबईची 3 :पत्रकार हेमंत जोशी

स्वतःला राजकीय गुरु म्हणविणारे स्वयंघोषित राष्ट्रसंत भय्यू महाराज नेमके कोण कुठले आहेत हे माझ्या बहुतेक वाचकांना माहित नसल्याने गेल्या दोन तीन दिवसात जगभरातून मला निरोप आले, म्हणून भय्यू महाराज नेमके कोण, सांगतो किंवा विस्ताराने पत्रकार अविनाश दुधे यांच्या लेखातून नेमके भय्यू महाराज कळतीलच...
ब्राम्हणेतर समाजात गावकऱ्याला नेमका देव कशात आहे हे समजावून सांगण्याचे काम तुकडोजी महाराजांनी केले म्हणून त्याकाळी लोकांनी त्यांना उत्स्फूर्त राष्ट्रसंत हि पदवी उपाधी बहाल केली, भय्यूमहाराजांना हि राष्ट्रसंत उपाधी कोणी चिटकवली कि स्वतःच चिटकवून घेतली.भय्यूमहाराजांना आधी युवराष्ट्रसंत अशी उपाधी चिटकवल्या गेली होती, अलीकडे हि राष्ट्रसंत मध्ये कधी केव्हा कशी परावर्तित झाली न उलगडणारे हे कोडे. अनेक स्त्रिया तरुणी कशा स्वतःलाच हेमा जया कतरीना करीना डिट्टो लता आशा सुनिधी पिटी उषा समजतात त्यातल्याच हा उपाधी चिटकविण्याचा प्रकार दिसतो. मी पण उद्यापासून स्वतःला सचिन पिळगावकर हि उपाधी लावून घेतो म्हणजे harmless flirt म्हणून तमाम तरुणी मला देखील बिलगून मोकळ्या होतील....लोकांनी उत्स्फूर्त म्हणायला हवे तुम्ही डिट्टो रफी आहात किंवा राजकारणात असाल तर शरद पवार आहात नरेंद्र मोदी आहात, चित्रपटसृष्टीत असाल तर राजेश खन्ना अमीर सलमान अक्षय नाना पाटेकर आहात, उठसुठ विविध नेत्यांसंगे फोटो काढून आणि ते छापून आणून अमुक एखादा राष्ट्रसंत होत नाही, गाडगेबाबा अण्णा हजारे राष्ट्रसंत तुकडोजी महात्मा फुले गजानन महाराज इत्यादी समाजसेवी संतांनीकधी मोहन भागवतांबरोबर तर कधी नितीन गडकरी किंवा उद्धव ठाकरे यांच्यासंगे किंवा यांच्यासारख्या त्याकाळी असलेल्या नामवंतांबरोबर फोटो काढून मी कसा नेते किंवा मंत्र्यांचा राजकीय गुरु असा हास्यास्पद देखावा निर्माण केला नाही. ऐश्वर्य प्रकरणात नको तेवढी बदनामी झाल्यानंतरही नको त्या नालायकांना मातोश्रीवर थेट किचनपर्यंत प्रवेश देण्याची हौस अजून ठाकरे कुटुंबाची फिटलेली दिसत नाही....आमचे मुंबईकर मीडिया अलीकडे या भय्यूमहाराजांना चिकटले, अचानक एकत्रित विविध वृत्तपत्रे आणि वाहिन्यांना भय्यू महाराजनविषयी खूप काही लिहावे किंवा का बोलावे वाटले बघून वाचून मी मनाशी 'अर्थपूर्ण ' खूपवेळा हसत होतो. काही विदर्भ मराठवाड्यातल्या पत्रकारांनी अगदी 15 वर्षांपूर्वी मनापासून या भय्यू महाराजांना उचलून धरले होते कारण विदर्भ मराठवाड्यातल्या विशेषतः शेतीवर अवलंबून असलेल्या तरुणांना नापिकी आणि बेरोजगारीमुळे एकप्रकारे मोठ्या प्रमाणावर नैराश्य आले होते, पैसे नसल्याने आणि कर्जबाजारी झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांच्या घरातल्या तरुण मुली वय उलटूनही लग्न न उरकल्याने घरी बसून असायच्या, तरुण वर्ग त्यातून दारू आणि सिगारेटच्या मोठ्या प्रमाणावर आहारी गेला होता, आजही अमुक एखाद्या घरात मुलगी देतांना विदर्भ मराठवाड्यातील बापाला होणारा जावई श्रीमंत नसला तरी चालतो पण निर्व्यसनी असावा यावर त्याचा कटाक्ष असतो. आमच्या विदर्भात जेवढी गर्दी शाळेत किंवा मंदिरात नसते तेवढी खचाखच गर्दी दारूच्या गुत्त्यावर किंवा दारू प्यायला मिळणाऱ्या हॉटेल्स मध्ये असते, या अशा तरुण पिढीचे नैराश्य घलवून त्यांना चांगल्या कार्यात भय्यू महाराज गुंतवून ठेवतील अशी किमान अपेक्षा त्यांच्याकडून होत्या म्हणून आम्ही अनेक मीडियावाले त्यांना त्याकाळी सहकार्य करीत असू पण ते त्यांच्याकडून घडले नाही, आजही त्यांच्या इंदोरला सुखलिया परिसरात असलेल्या आश्रमात तुम्ही 

चार दिवस सामान्य भक्त म्हणून भेट द्या, पुन्हा त्या गोंधळी आणि संशयी वातावरणात जाण्याची तुमची इच्छा होणार नाही. भक्तांना ताटकळत ठेवायचे, मग जमलेले भक्त देखील अनुभवी भक्तांबरोबर टवाळक्या करतांना तुम्हाला दिसतील. देवाचे कुठलेही नामस्मरण नाही, कुठलाही सत्संग नाही, कोणतेही सुविचार घेऊन माणूस तेथून बाहेर पडत नाही, एकमेकांना पद्धतशीर उल्लू बनविण्याचा कार्यक्रम तेथे सुरु असतो. व्हीआयपी भक्त दिसला रे दिसला कि त्याला दादा आणि बाबा, सामान्य भक्त आशेपोटी दुरून येतो आणि उल्लू बनून किंवा निराश होऊन तेथून बाहेर पडतो. कुठल्याही असूयेपोटी हे लिखाण नाही, वस्तुस्थिती सांगतो. अमुक एखाद्या संतांच्या आश्रमात तेच ते भक्त कायम रिपीट होतात कारण त्यांना हवा असतो तो परमेश्वर तेथे त्यांना त्या संतांच्या रूपात बघायला मिळत असतो, येथे असे काही नाही. विनाकारण वेळ पैसे वाया घालविला यांच्या सान्निध्यात आलेले तुम्हाला हमखास सांगतील. मला समजत नाही कि मोहन भागवत किंवा उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी सारख्या जगप्रसिद्ध लोकप्रिय नेत्यांना कळत नाही का कोणत्या बुवाला जवळ घेतोय ते, अहो, तुम्ही भय्यू महाराजांबरोबर पाच मिनिटे फोटो सेशन करून मोकळे होता, पण भय्यू महाराज तुम्हाला जवळचे त्यातून म्हणजे त्यांच्यामार्फत तुमच्याशी जवळीक साधण्यासाठी किंवा विविध पदे पदरात पडून घेण्यासाठी तुमचे नेते त्यांना सारी कामे बाजूला 
ठेवून त्या इंदोरला जाऊन बिलगून बसतात कि, म्हणून सांगतो हि चूक शरद पवारांनी कधीही केली नाही त्यांनी कोणत्याही चालू उथळ लबाड बुवा बाबा सांगे फोटो काढून मी तुमचा भक्त आहे सांगितले नाही उलट आपल्या नेत्यांना किंवा नातेवाईकांना वेळोवेळी शरदराव किंवा अजितदादांनी दिली ती समज, त्यामुळे सुरुवातीला किचन पर्यंत प्रवेश देणारे वळसे पाटील किंवा सुनील तटकरे सारखे नेते भय्यू महाराजांना बाहेरच्या बाहेर राम राम श्याम श्याम करून मोकळे होतात, ते हसतात हे डोळा मारून मोकळे होतात. तेच त्या नाणीजच्या नरेंद्र महाराज यांचे, हे कोकणातल्या नेत्यांना वापरून घेतात आणि कोकणातले चतुर नेते निवडणुकीत हवा तसा त्या नरेंद्र बुवाचा वापर करून घेतात. आधीच ठरविले असते तर दर दिवशी उत्स्फूर्त विविध वाहिन्यांवर चर्चेत वाट्टेल तेवढी बडबड करणारे विविध राजकीय पक्षाचे नेते नरेंद्र किंवा भय्यू पेक्षा अधिक यशस्वी बुवा बाबा झाले असते. अजित सावंत विजय कुंभार भाई जगताप हुसेन दलवाई इत्यादी यशस्वी बाबा बुवा होऊ शकतात, आणि माझे स्पष्ट मत आहे कि ज्ञान असो अथवा नसो वाहिन्यांवर उत्स्फूर्त बोलणारे नेमकी छाप पाडून मोकळे होतात, त्यांना कोणत्याही विषयांवर बोलाल्याला सांगा लगेच मेकअप करून ते स्क्रीनवर येतात. उद्या जर मासिक पाळीचे फायदे आणि तोटे या विषयावर जरी बोलायला सांगितले तरी ते स्वतः स्त्री रोग तद्न्य असल्यासारखे वाट्टेल ती बडबड करून मोकळे होतील. बुवाबाजीच्या धंद्यात देखील मूर्ख मजबूर भक्तांवर फक्त छाप पडायची असते. अजित सावंत तर सर्वाधिक यशस्वी ठरले 
असते, आहेतही ते दिसायला एखाद्या चमडी बाबासारखे. जरा चार पोरी त्यांच्या ओळखीतून मग आमच्याही भोवती फिरल्या असत्या कारण आम्ही देखील अजित सावंत सारख्या वाहिन्यांवर येणाऱ्या नेत्यांचे ' संजय यादव ' झालो असतो कि.....संजय हा भय्यू चा उजवा हात, म्हणून उल्लेख केला.....अपूर्ण

No comments:

Post a comment