Monday, 22 August 2016

प्रकाश मेहता पराभूत पत्रकारिता

कधी कधी आपल्या एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू असतात. एखाद्या विवाहित पुरुषाला प्रेयसींसंगे एकांत मिळाला कि एका डोळ्यात हसू आनंद असतो पण त्याचवेळी नागपूरकर राऊतांना जसे नागडे आणि उघडे प्रेयसींसंगे पकडल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या डोळ्यात अश्रू आले, ज्या विवाहित पुरुषांचे विवाहबाह्य संबंध आहेत त्यांचेही तेच होते, आणि बायकोने अमुक एखाद्या नवऱ्याचे लफडे पकडले नाही असे एकही घर या राज्यात नसावे. बायको मग ती वडगाव बुद्रुकची असो कि मलबार हिलवर राहणाऱ्या बंगल्यातली, स्त्रियांची त्यात मास्टरी असते, कितीही लपवून ठेवा, नवऱ्याला रंगेहाथ पकडलेले नाही अशी बाई बायको मी बघितलेली नाही. यात अपवाद माझे घर, आमच्या घरी संशय घेण्याचे माझे भ्रमणध्वनीवर आलेले मेसेजेस गुपचूप वाचण्याचे काम माझा मोठा मुलगा विक्रांत करतो. एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आणणारे असे अनेक तुमचे आमचे आयुष्यातले प्रसंग येथे सांगता येतील रेखाटता येतील. जसे हागवणीचा त्रास झाला कि एका डोळ्यात अश्रू असतात तसेच सुखरूप आणि इनर कपडा कुठेही रस्त्यात ओला न करता घरी आलो कि दुसऱ्या डोळ्यात हसू असते, जग जिंकल्याचा आनंद अशावेळी मनाला होतो. मित्रहो, माझा सल्ला ध्यानात ठेवा, हागवणीचा त्रास झाल्यानंतर भर रस्त्यात कितीही पादायाला झाले तरी कंट्रोल उदय कंट्रोल, म्हणत म्हणत पण फारशी झपझप पावले न टाकता घरी या,अशा नाजूक क्षणी धावपळ करीत घरी येणे तुमची भर रस्त्यात फजिती त्यातून होण्याची अधिक दाट शक्यता निर्माण होते. अशावेळी रस्त्यात तुम्हाला अगदी माधुरी दीक्षित जरी भेटली तरी तिच्याशी गप्पा मारण्याचा मोह आवरा, येणारे संकट टाळण्यासाठी....
वाचकमित्रहो,  यावेळी याक्षणी माझ्या एका डोळ्यात हसू आहे आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत. हसू आनंद यासाठी कि अलीकडे माझ्या दोन वाचकांनी माझ्या एका डोळ्यात हसू आनंद आनंदाश्रू आणले आहेत. माझी एक नियमित तरुण महिला वाचक या राज्यातल्या एका प्रख्यात विख्यात नामवंत विचारवंत लेखन विश्वात अग्रगण्य कुटुंबातली अतिशय बुद्धिमान आणि उत्तम व्यावसायिक खूप शिकलेली ती तरुणी आहे, तिने आंतरधर्मीय अमराठी उच्चशिक्षित तरुणाशी लग्न केले आहे, जेव्हा केव्हा ती माझे लिखाण वाचते, नवरा तिला सांगतो, आता हे मला हिंदी किंवा इंग्रजीत समजावून सांग आणि ती  आळस न करता हे काम नियमित करते, ते तिने मला अलीकडे प्रत्यक्ष भेटीत सांगितले. दुसरा प्रसंग औरंगाबादला केटी नावाचा माझा एक सरदारजी, कंत्राटदार असलेला मित्र आहे, त्याच्या घरात सारे असंख्खलीत मराठीत बोलतात, त्याचा एकुलता एक उच्चशीक्षीत ईशान नावाच्या मुलाने मला पात्र लिहिले, मजकूर असा, काही वर्षांपूर्वी वडिलांनी मला, ऑफ द रेकॉर्ड ऑन लाईन रेफर केला, अनेकदा मी आपले अंक वाचतो. सर, मला असे आवर्जून सांगावेसे वाटते कि आपली भाषाशैली मला खूप प्रभावित करते. अगदी सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने एक सामाजिक संदेश पोहोचवायचा असेल किंवा कुठल्याही गैर सामाजिक वृत्तीला टीका
करायची असेल, आपण त्यात महारथी. हा उपक्रम आपल्या हाताने वर्षानुवर्षे चालत राहावा हि देवचारणी प्रार्थना...
या बोलक्या प्रतिक्रिया आल्यानंतर माझ्यासारख्या हळव्या मनाच्या डोळ्यात हसू आनंद दाटून येत नसेल, असे कसे होईल. आणि माझ्या दुसऱ्या डोळ्यात या क्षणी अश्रू आसू दु:ख यासाठी कि सर्वगुणसंपन्न असे घुटकाफेम मंत्री प्रकाश
मेहता, ज्यांनी अगदी उघड एका पत्रकाराचा, साम वाहिनीवर काम करणाऱ्या मिलिंद तांबे नामक प्रतिनिधींचा महाडला खुलेआम अपमान केला, तो अपमान या राज्यातल्या साऱ्याच वृत्तपत्रे आणि वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी मेहता यांना
फारसे धारेवर न धरता सहन केला आणि प्रकरण ' अर्थपूर्ण ' शब्दात सांगायचे झाल्यास पुढे दुसऱ्याच दिवशी दाबल्या गेले. मी मागल्या अंकात म्हणालो तेच, म्हातारी मेल्याचे आता दु:ख आहे कारण काळ सोकवणार आहे, पत्रकारांची
प्रतिनिधींची चार चौघात रांड केली तरी हरकत नाही ते गप बसविणे एकदम सोपे आहे हे मेहता यांनी एकप्रकारे सिद्ध केले आहे, आता कोणीही उठेल आणि आम्हाला थोबाडात मारून मोकळा होईल....

पुढल्या दोन दिवसात निघणारा माझा अंक यासाठी वाचा कि, मेहता प्रकरण केवळ दाबल्या गेले असते तर कदाचित मला फार वाईट वाटले नसते पण केवळ प्रकरण ' मिटवून ' मेहता आणि त्यांचा तथाकथित भाजपामधला कंपू थांबला नाही
तर त्यांनी जगभरातल्या मराठी वाचकात आम्हा मीडियावर विविध लेख टाकून पद्धतशीर बदनामी केलेली आहे, मेहता कॅम्पमधून जे टीका करणारे लेख आम्हा मीडियावर
टाकण्यात लिहिण्यात आलेले आहेत त्या साऱ्या लेखांची भाषा एकसारखी आहे, याचा अर्थ एखाद्या उत्तम लेखकाकडून ते प्रोफेशनली लिहून घेतल्या गेलेले आहेत.
हे सर्व लेख मी माझ्या ताज्या पाक्षिकात घेतले आहेत, फक्त एक लेख माझ्या नजरेआड झाला ज्यात अनेक मान्यवर, मीडिया मधल्या अनेकांची आर्थिक लफडी
मांडलेली होती, मला काही माझ्या या क्षेत्रातले म्हणाले, तो आर्थिक भानगडी मांडणारा लेख वाचल्यानंतरच मीडिया मधल्या बहुतेकांची एक्सवायझेड फाटली आणि त्यांनी मेहता प्रकरण बाजूला टाकले, तो लेख कोणाकडे असेल तर अवश्य
मला पाठवा, बघूया त्या लेखाचा समाचार कसा घेता येईल ते, नेत्यांच्या या अशा धमक्यांना कधीही घाबरायचे नसते, विचलित व्हायचे नसते.....

मेहता प्रकरण अगदी सहज मीडिया ने बाजूला टाकले, म्हणून माझ्या दुसऱ्या  डोळ्यात अश्रू आले, मीडियाचा पराभव हा देशाला घातक असतो, आमचे तोंड दाबल्या जाते,
हा संदेश मुळात खूप वाईट वातावरण निर्माण करतो, देशभक्त पत्रकार या अशा पराभवातून मोठ्या प्रमाणावर नैराश्येच्या आहारी जातात.....

Friday, 19 August 2016

बुवाबाजी आणि पत्रकारिता मुंबईची : पत्रकार हेमंत जोशी

 उद्या समजा शरद पवारांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन रामदास आठवलेंचे नेतृत्व स्वीकारले तर किंवा एकनाथ शिंदे यांनी राजकारण सोडून, एक शाम रफी के नाम कार्यक्रमात गायला सुरुवात केली तर किंवा नीलम गोर्हे यांनी राजकीय सन्यास घेऊन ब्रह्मकुमारी आश्रमात पांढरी साडी नेसून कायमचा आसरा घेतला तर किंवा अमिताभने अभिनय सोडून भेलपुरीची गाडी टाकली आणि जया 
त्याला तेथे कांदे सोलून चिरून द्यायला बसली तर किंवा अनिल अंबानी ची पोरगी मराठी रात्र शाळेत शिकायला पाठवल्या गेली तर किंवा रतन टाटा यांनी अर्धा किलो टमाटे घेतांना घासाघीस केली तर किंवा अविनाश भोसले गिरगावातल्या चाळीत सकाळी हाती टमरेल घेऊन रांगेत उभे दिसले तर....हे जसे सारे आपल्याला विचित्र वाटेल ते तसे अलीकडे माझ्या मनाचे झालेले आहे म्हणजे मुंबईतले जे विविध वाहिन्यांवर प्रमुख भूमिकेत संचलन करतात किंवा मुंबईतून जी वृत्तपत्रे निघतात, ज्यांनी आजतागायत कायम प्रखर उघड सतत बुवाबाजीला विरोध केला आहे त्यांनी अलीकडे जेव्हा आपल्या वाहिन्यांवरून आणि वृत्तपत्रातून इंदोरस्थित भय्यू महाराजांना आपल्या वाहिनीवर किंवा वृत्तपत्रातून भय्यू महाराज या व्यक्तीवर कुठलीही माहिती न घेता केवळ स्वतःभय्यू महाराज सांगताहेत मी ग्रेट असामान्य कसा, विश्वास ठेवून त्यांना जी वायफळ वारेमाप प्रसिद्धी दिली ते बघून वाचून, कुठे चाललाय आपला महाराष्ट्र असे माझे मन 
त्यावर मलाच विचारायला लागले. अत्यंत ढोंगी बालिश आणि चालू माणसाला विशेष म्हणजे बुवाला अशी प्रतिष्ठा देणे योग्य नाही, आधी त्यांना जवळून बघणारे, बघितलेले नंतर सोडून गेलेले जे या राज्यात मला माहित असणारे काही प्रतिष्ठित आहेत, मी मुंबईतल्या मीडियाला त्यांच्याकडे घेऊन जातो, त्यांना विचारा भय्यू महाराज काय गौडबंगाल आहे, तुम्हाला त्यांच्या तोंडून नेमके भय्यू महाराज समजल्यानंतर मग लिहा नेमके त्यांच्यावर, शरद पवार आणि अजित पवार वेडे आहेत का कि त्यांनी कधीही भय्यू महाराजांना जवळ केले नाही, उलट पवारांच्या घरातले किंवा त्यांच्या पक्षातले जे कोणी महाराजांच्या नजदिक गेले होते, त्यांचे ब्रेन वॉश करून भय्यू महाराजांपासून दूर नेण्याचे पुण्य या काका पुतण्याने किंवा अकलूजच्या मोहिते पाटील घराण्याने केल्याची माझी माहिती आहे, विजयसिंह मोहिते पाटलांच्या एका बंधूंचे अलीकडे निधन झाले, ते भेटले कि भय्यू महाराज विषय काढायचा अवकाश, त्यांच्या तोंडून 
येणारे किस्से मला तोंडात बोटे घालण्यास भाग पडायचे....अर्थात चूक माझी झाली होती, मी सुद्धा भय्यू महाराजांच्या चतुर बोलण्यावर एकेकाळी असाच इम्प्रेस झालो होतो, पण त्यांच्यापासून दूर गेलेले आणि आधी खूप खूप जवळ असलेले काही प्रतिष्ठित भक्त मला भेटले, त्यांनी मला नेमके भय्यू महाराज समजावून सांगितले आणि मी अवाक झालो, किस्से ऐकून स्तंभित झालो. मी जसा भय्यू महाराजांच्या दिवंगत पत्नीच्या माहेरच्या नातेवाईकाला भेटलो तसे तुम्हीही त्यांना गाठा आणि ऐका, नेमके कसे आहेत भय्यू महाराज, मला खात्री आहे, ज्या वेगाने सुद्न्य आणि स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या मुंबईकर मीडियाने त्यांना प्रसिद्धी दिली, दुप्पट वेगाने ते विरोधात जातील. एकीकडे दाभोलकर यांच्यासारख्या बुवाबाजी विरोधात लढणाऱ्या समाजसेवींचीहत्या झाली, त्यांच्यावर हल्ले झाले कि मुंबई मीडिया बुवाबाजी आणि अंधश्रद्धेवर तुटून पडते पण त्याचवेळी जर आम्ही मुंबईकर मीडियाने भय्यू महाराजांसारख्या बुवांचे 
उदात्तीकरण लोकांसमोर केले तर दोषी आम्ही मीडिया आहोत, त्यातून उद्या असे अनेक लबाड भय्यू महाराज जन्माला येतील, जी चूक माझी झाली कधीकाळी, मीडिया मुंबई, कृपया ती चूक तुम्ही करू नका, अनिरुद्ध बापू, भामटा नरेंद्र महाराज किंवा लबाड भय्यू, 
कधीही मोठा करू नका, अशा मंडळींना प्रतिष्ठा मिळेल कृपया असे करू नका....मी तर पुरावे मांडणार आहेच पण श्याम मानव, ज्ञानेश महाराव तसेच पत्रकार अविनाश दुधे, अनिल गावंडे, पत्रकार पुरुषोत्तम आवारे पाटील इत्यादी मंडळींना तुम्ही मुंबईकर मीडिया, भय्यू महाराज नेमके कसे, विचारा, नंतर ठरवा, यापुढे भय्यू महाराजांना प्रसिद्धी द्यायची किंवा नाही, भय्यू महाराजांची लबाडी ओळखणारे तर मला असेही म्हणाले, मुंबई मीडियाला मोठी सुपारी मिळालेली दिसते, महाराजांना प्रतिष्ठा मिळवून देण्याची, त्यावर मी म्हणालो, एवढी स्वस्त आहे का मुंबईची मीडिया, सहज कोणालाही विकल्याजाणारी, आणि असे जर घडणार असेल तर उद्या त्या पाकड्या नाईकला देखील आम्ही मुंबई मीडिया देवत्व देऊन मोकळे होऊ.....
आणि तसेही भय्यू महाराजांना नेमके ओळखणे अतिशय सोपे आहे, तुमच्यातल्या एखाद्या तरुण आणि सुंदर दिसणाऱ्या महिला पत्रकाराला बेमालूम, संकटात सापडलेली एक भक्त म्हणून इंदोरच्या आश्रमात भय्यू महाराज आणि यादव सारख्या त्यांच्या खास 
भक्तांच्या संगतीत आणि भय्यू महाराजांच्या ताफ्यात इंदोरबाहेर अन्यत्र कुठेही प्रवासात सतत आठ दिवस पाठवा, विदारक सत्य बाहेर पडले नाही तर मी पत्रकारितेतून बाजूला होईल. भय्यू महाराजांची मुलाखत घेऊन किंवा छापून मोकळे झाला आहेत ना, आता खऱ्या आईचे दूध प्यायला असाल तर त्याच पद्धतीने पत्रकार अविनाश दुधे, शिर्डीचे बाळासाहेब जाधव इंदोरचे वेडी ठरविल्या गेलेली एक तरुणी आणि मी सांगेन त्या स्त्री पुरुषांच्या मुलाखतीही तुम्ही मीडिया घेण्याची हिम्मत दाखवा, मला खात्री आहे, नेमके भय्यू महाराज कसे या राज्याला कळतील. आणि हो, भय्यूमहाराज तुम्हीही जे मिळाले आहे त्यात आता सुख माना, उगाच स्वतःचा गाजावाजा करून झाकली मूठ सव्वा लाखाची उघडू नका, हात जोडून तुम्हाला विनंती. तो नरेंद्र आणि अनिरुद्ध कसे गप बसले आहेत, बुवाबाजीच्या विरोधात लढणाऱ्या मान्यवरांचे खून झाल्यानंतर, तुम्ही तेच करा, चमकेशगिरी सोडून द्या, पोटच्या एकुलत्या एक पोरीकडे तिच्या आईच्या पश्चात लक्ष द्या.....अपूर्ण

बुवाबाजी आणि पत्रकारिता मुंबईची 2 :पत्रकार हेमंत जोशी


मराठी त्यातल्या त्यात आमचा वर्हाडी माणूस तास कमालीचा संशयी. मला वाटते 1995 ची ती विधान सभा निवडणूक असावी. विदर्भातल्या अकोल्यात ती निवडणूक चांगलीच गाजली, कारण त्यादरम्यान अगदी किरकोळ आणि पोराटोरांची वाटणारी शिवसेना आणि सेनेचे त्यावेळेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव गावंडे जिल्ह्यात प्रस्थ असलेले बाबासाहेब धाबेकर यांच्यासमोर उमेदवार म्हणून सर्व बाजूंनी अगदीच किरकोळ, बाबासाहेबांना त्यादरम्यान पराभूत करणे म्हणजे अमिताभ ऐवजी प्रमुख भूमिकेत दीपक करंजीकरांना घेण्यासारखे किंवा धाबेकर यांच्यासमोर गुलाबराव म्हणजे नितीन गडकरी यांच्यासमोर पराग सराफ पण सेनेने आव्हान स्वीकारले होते, 
गावंडे विरुद्ध धाबेकर अशी ती लढत होती, गुलाबरावांसाठी ते आव्हान होते जणू एखाद्या मच्छरासमोर स्ट्रॉंग कीटकनाशक उभे होते. गुलाबरावांना कळतहोते, निवडणूक जिंकणे फार मोठे आव्हान आहे, ना पैसे ना मुबलक कार्यकर्ते, अर्थात मतदारांना काँग्रेस नकोशी झाली होती म्हणून त्यांचा ओढा खुपसा भाजप सेने युतीकडे होते, मात्र विदर्भ म्हणजे काँग्रेसचा हुकमी एक्का त्यात उमेदवार तगडा, अमुक एखाद्या कुस्तीच्या आखाड्यात दिलीप प्रभावळकर दारासिंग समोर जिंकतील का, असा काहीसा गोंधळ अकोल्यात होता पण 
उत्साही शिवसैनिकांनी ते आव्हान स्वीकारले होते, समोर पराभव दिसत असतांना अतिशय संशयी, जुन्या विचारांना पकडून असलेल्या आमच्या विदर्भातल्या या मतदारसंघात गुलाब गॅंगकडून एक पुडी विशेषतः बाया बापड्यांमध्ये, बुजुर्ग मतदारांत अशी सोडण्यात आली कि बाबासाहेब प्रचार करतांना डोळ्यावर सतत जो कला गॉगल घालतात त्यातून समोरची स्त्री किंवा कुठलीही व्यक्ती नागडी दिसते. म्हणता म्हणता हा प्रसार अख्य्या मतदारसंघात झाला, कानोकानी बातमी गेली आणि मतदारांनी बाबासाहेबांकडे किंवा त्यांच्या सभांकडे पाठ फिरवली, व्हायचा तो परिणाम झाला केवळ त्या काळ्या काचांमुळे बाबासाहेब निवडणुकीत पराभूत झाले, गावंडे निवडून आले,
पुढे या राज्याचे वादग्रस्त सिंचन राज्यमंत्री म्हणून गाजले, त्या निवडणुकी दरम्यान बाबासाहेब समोर यायचा अवकाश, बायका धूम ठोकून आत पाळायच्या,कडी लावून दार आतून बंद करून घ्यायच्या, अगदी म्हाताऱ्या बायका सुद्धा पिटी उषाच्या वेगाने धावत आत जायच्या, नजरेआड व्हायच्या, मुळात बाबासाहेबांची अकोला जिल्ह्यातली प्रतिमा तशी रंगेल नेता म्हणून चर्चेतली, त्यामुळे काहीशा 
अडाणी अज्ञानी असलेल्या त्याकाळच्या मतदारांनी विश्वास ठेवला आणि त्यांच्याकडे पाठ फिरवली, बाबासाहेसाब निवडणुकीत साफ उताणे झाले...कुठलाही बुवा प्रसिद्धीच्या झोतात या अशा पद्धतीने येतो, अवतीभोवती हे बुवा पगारावर काही खुशमस्करे आणि प्रचारक पेरून ठेवतात, जमलेल्या गर्दीला मग हे प्रचारक सतत सांगतात, हा बाबा साक्षात परमेश्व्राचा अवतार आहे, गर्दी आपोआप वाढत जाते, भय्यू महाराज त्यातलेच, संकटात सापडलेल्या कुठल्या भक्ताला त्यांनी बाहेर काढले, काही उदाहरणे देतील का, पण प्रचार आणि 
प्रसार कसा करायचा, हे तंत्र भय्यू महाराजांना नेमके ठाऊक आहे, माझे नेत्यांशी कसे संबंध, विविध फोटो छापून आणायचे आणि आपले उखळ पांढरे करून घेण्याची त्यांची पद्धत, वास्तविक या राज्यातले बुवाबाजीच्याविरोधात जे लढा देतात त्या सर्वांनी म्हणजे श्याम मानव, मुक्ता दाभोलकर, प्रशांत लीला रामदास, प्रमोद चुंचूवार, आवारे पाटील, अविनाश दुधे इत्यादींनी जे महाराजांचे कुभांड अगदी जवळून जाणून आहेत या सर्वांनी नेमके भय्यू महाराज कसे लोकांसमोर मांडायला हवे, हे लबाड व्यक्तिमत्व संपवायला हवे. भय्यू महाराजांना नेमके जाळ्यात कसे ओढायचे वाटल्यास मी सांगतो, बघा नक्की लोकांसमोर येईल ते कसे ढोंगी आहेत ते. जे काय भय्यू महाराजांच्या गोटातून पसरविण्यात येते कि ज्या राजकीय पक्षाला भय्यू महाराज जवळचे, त्या पक्षाकडे या राज्यातला मराठा समाज उचलून धरतो, हा प्रचार साफ खोटा. असे अनेक मराठा समाजातले समाजसेवी मी तुम्हाला दाखवू शकतो जे निरपेक्ष या समाजाची सेवा करतात आणि त्या त्या भागात त्यांचा प्रभाव आहे.आणि भय्यू महाराजांमुळे अमुक एखाद्या राजकीय पक्षाकडे या राज्यातला मराठा समाज ओढल्या जातो, खरे असते तर चतुर शरद पवार यांनी एक मिनिट सुद्धा भय्यू महाराजांना कडेवरून किंवा डोक्यावरून खाली उतरविले नसते. हर्षवर्धन पाटील असोत कि वळसे पाटील, मोहन भागवत असोत कि नितीन गडकरी किंवा नरेंद्र मोदी किंवा उद्धव ठाकरे, किंवा असे कितीतरी या राज्यातले भय्यू महाराज यांना फोटो काढू देणारे नेते, नेमके भय्यू महाराज कसे हे आधी जाणून घ्या मग 
त्यांच्याबरोबर फोटोसेशन करा, बघणारे प्रभावित होतात, त्यांना भय्यू महाराज त्यातून खरोखरी देव वाटतात. भाजपाची ती पद्धत आहे, हिंदुत्वाचा प्रभाव कायम ठेवण्यासाठी संघ किंवा भाजप साधू संतांना नेहमी प्रोत्साहन प्रसिद्धी देतात पण त्यातले नेमके कोणते चांगले त्यांनी खात्री करून घ्यायला हवी. होते काय लोकांना दिसते तुम्ही सारे नेते भय्यू महाराजांचे भक्त आहेत, विविध माणसे आपली खाजगी 
कामे घेऊन जातात कि त्यांच्याकडे एखाद्या नेत्याकडे घेऊन जातात त्यापद्धतीने.....पत्रकार अविनाश दुधे यांनी नेमके भय्यू महाराज कसे सत्य आपल्या लिखाणातून मांडले आहे, त्यावर पुढला भाग...अपूर्ण !

बुवाबाजी आणि पत्रकारिता मुंबईची 3 :पत्रकार हेमंत जोशी

स्वतःला राजकीय गुरु म्हणविणारे स्वयंघोषित राष्ट्रसंत भय्यू महाराज नेमके कोण कुठले आहेत हे माझ्या बहुतेक वाचकांना माहित नसल्याने गेल्या दोन तीन दिवसात जगभरातून मला निरोप आले, म्हणून भय्यू महाराज नेमके कोण, सांगतो किंवा विस्ताराने पत्रकार अविनाश दुधे यांच्या लेखातून नेमके भय्यू महाराज कळतीलच...
ब्राम्हणेतर समाजात गावकऱ्याला नेमका देव कशात आहे हे समजावून सांगण्याचे काम तुकडोजी महाराजांनी केले म्हणून त्याकाळी लोकांनी त्यांना उत्स्फूर्त राष्ट्रसंत हि पदवी उपाधी बहाल केली, भय्यूमहाराजांना हि राष्ट्रसंत उपाधी कोणी चिटकवली कि स्वतःच चिटकवून घेतली.भय्यूमहाराजांना आधी युवराष्ट्रसंत अशी उपाधी चिटकवल्या गेली होती, अलीकडे हि राष्ट्रसंत मध्ये कधी केव्हा कशी परावर्तित झाली न उलगडणारे हे कोडे. अनेक स्त्रिया तरुणी कशा स्वतःलाच हेमा जया कतरीना करीना डिट्टो लता आशा सुनिधी पिटी उषा समजतात त्यातल्याच हा उपाधी चिटकविण्याचा प्रकार दिसतो. मी पण उद्यापासून स्वतःला सचिन पिळगावकर हि उपाधी लावून घेतो म्हणजे harmless flirt म्हणून तमाम तरुणी मला देखील बिलगून मोकळ्या होतील....लोकांनी उत्स्फूर्त म्हणायला हवे तुम्ही डिट्टो रफी आहात किंवा राजकारणात असाल तर शरद पवार आहात नरेंद्र मोदी आहात, चित्रपटसृष्टीत असाल तर राजेश खन्ना अमीर सलमान अक्षय नाना पाटेकर आहात, उठसुठ विविध नेत्यांसंगे फोटो काढून आणि ते छापून आणून अमुक एखादा राष्ट्रसंत होत नाही, गाडगेबाबा अण्णा हजारे राष्ट्रसंत तुकडोजी महात्मा फुले गजानन महाराज इत्यादी समाजसेवी संतांनीकधी मोहन भागवतांबरोबर तर कधी नितीन गडकरी किंवा उद्धव ठाकरे यांच्यासंगे किंवा यांच्यासारख्या त्याकाळी असलेल्या नामवंतांबरोबर फोटो काढून मी कसा नेते किंवा मंत्र्यांचा राजकीय गुरु असा हास्यास्पद देखावा निर्माण केला नाही. ऐश्वर्य प्रकरणात नको तेवढी बदनामी झाल्यानंतरही नको त्या नालायकांना मातोश्रीवर थेट किचनपर्यंत प्रवेश देण्याची हौस अजून ठाकरे कुटुंबाची फिटलेली दिसत नाही....आमचे मुंबईकर मीडिया अलीकडे या भय्यूमहाराजांना चिकटले, अचानक एकत्रित विविध वृत्तपत्रे आणि वाहिन्यांना भय्यू महाराजनविषयी खूप काही लिहावे किंवा का बोलावे वाटले बघून वाचून मी मनाशी 'अर्थपूर्ण ' खूपवेळा हसत होतो. काही विदर्भ मराठवाड्यातल्या पत्रकारांनी अगदी 15 वर्षांपूर्वी मनापासून या भय्यू महाराजांना उचलून धरले होते कारण विदर्भ मराठवाड्यातल्या विशेषतः शेतीवर अवलंबून असलेल्या तरुणांना नापिकी आणि बेरोजगारीमुळे एकप्रकारे मोठ्या प्रमाणावर नैराश्य आले होते, पैसे नसल्याने आणि कर्जबाजारी झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांच्या घरातल्या तरुण मुली वय उलटूनही लग्न न उरकल्याने घरी बसून असायच्या, तरुण वर्ग त्यातून दारू आणि सिगारेटच्या मोठ्या प्रमाणावर आहारी गेला होता, आजही अमुक एखाद्या घरात मुलगी देतांना विदर्भ मराठवाड्यातील बापाला होणारा जावई श्रीमंत नसला तरी चालतो पण निर्व्यसनी असावा यावर त्याचा कटाक्ष असतो. आमच्या विदर्भात जेवढी गर्दी शाळेत किंवा मंदिरात नसते तेवढी खचाखच गर्दी दारूच्या गुत्त्यावर किंवा दारू प्यायला मिळणाऱ्या हॉटेल्स मध्ये असते, या अशा तरुण पिढीचे नैराश्य घलवून त्यांना चांगल्या कार्यात भय्यू महाराज गुंतवून ठेवतील अशी किमान अपेक्षा त्यांच्याकडून होत्या म्हणून आम्ही अनेक मीडियावाले त्यांना त्याकाळी सहकार्य करीत असू पण ते त्यांच्याकडून घडले नाही, आजही त्यांच्या इंदोरला सुखलिया परिसरात असलेल्या आश्रमात तुम्ही 

चार दिवस सामान्य भक्त म्हणून भेट द्या, पुन्हा त्या गोंधळी आणि संशयी वातावरणात जाण्याची तुमची इच्छा होणार नाही. भक्तांना ताटकळत ठेवायचे, मग जमलेले भक्त देखील अनुभवी भक्तांबरोबर टवाळक्या करतांना तुम्हाला दिसतील. देवाचे कुठलेही नामस्मरण नाही, कुठलाही सत्संग नाही, कोणतेही सुविचार घेऊन माणूस तेथून बाहेर पडत नाही, एकमेकांना पद्धतशीर उल्लू बनविण्याचा कार्यक्रम तेथे सुरु असतो. व्हीआयपी भक्त दिसला रे दिसला कि त्याला दादा आणि बाबा, सामान्य भक्त आशेपोटी दुरून येतो आणि उल्लू बनून किंवा निराश होऊन तेथून बाहेर पडतो. कुठल्याही असूयेपोटी हे लिखाण नाही, वस्तुस्थिती सांगतो. अमुक एखाद्या संतांच्या आश्रमात तेच ते भक्त कायम रिपीट होतात कारण त्यांना हवा असतो तो परमेश्वर तेथे त्यांना त्या संतांच्या रूपात बघायला मिळत असतो, येथे असे काही नाही. विनाकारण वेळ पैसे वाया घालविला यांच्या सान्निध्यात आलेले तुम्हाला हमखास सांगतील. मला समजत नाही कि मोहन भागवत किंवा उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी सारख्या जगप्रसिद्ध लोकप्रिय नेत्यांना कळत नाही का कोणत्या बुवाला जवळ घेतोय ते, अहो, तुम्ही भय्यू महाराजांबरोबर पाच मिनिटे फोटो सेशन करून मोकळे होता, पण भय्यू महाराज तुम्हाला जवळचे त्यातून म्हणजे त्यांच्यामार्फत तुमच्याशी जवळीक साधण्यासाठी किंवा विविध पदे पदरात पडून घेण्यासाठी तुमचे नेते त्यांना सारी कामे बाजूला 
ठेवून त्या इंदोरला जाऊन बिलगून बसतात कि, म्हणून सांगतो हि चूक शरद पवारांनी कधीही केली नाही त्यांनी कोणत्याही चालू उथळ लबाड बुवा बाबा सांगे फोटो काढून मी तुमचा भक्त आहे सांगितले नाही उलट आपल्या नेत्यांना किंवा नातेवाईकांना वेळोवेळी शरदराव किंवा अजितदादांनी दिली ती समज, त्यामुळे सुरुवातीला किचन पर्यंत प्रवेश देणारे वळसे पाटील किंवा सुनील तटकरे सारखे नेते भय्यू महाराजांना बाहेरच्या बाहेर राम राम श्याम श्याम करून मोकळे होतात, ते हसतात हे डोळा मारून मोकळे होतात. तेच त्या नाणीजच्या नरेंद्र महाराज यांचे, हे कोकणातल्या नेत्यांना वापरून घेतात आणि कोकणातले चतुर नेते निवडणुकीत हवा तसा त्या नरेंद्र बुवाचा वापर करून घेतात. आधीच ठरविले असते तर दर दिवशी उत्स्फूर्त विविध वाहिन्यांवर चर्चेत वाट्टेल तेवढी बडबड करणारे विविध राजकीय पक्षाचे नेते नरेंद्र किंवा भय्यू पेक्षा अधिक यशस्वी बुवा बाबा झाले असते. अजित सावंत विजय कुंभार भाई जगताप हुसेन दलवाई इत्यादी यशस्वी बाबा बुवा होऊ शकतात, आणि माझे स्पष्ट मत आहे कि ज्ञान असो अथवा नसो वाहिन्यांवर उत्स्फूर्त बोलणारे नेमकी छाप पाडून मोकळे होतात, त्यांना कोणत्याही विषयांवर बोलाल्याला सांगा लगेच मेकअप करून ते स्क्रीनवर येतात. उद्या जर मासिक पाळीचे फायदे आणि तोटे या विषयावर जरी बोलायला सांगितले तरी ते स्वतः स्त्री रोग तद्न्य असल्यासारखे वाट्टेल ती बडबड करून मोकळे होतील. बुवाबाजीच्या धंद्यात देखील मूर्ख मजबूर भक्तांवर फक्त छाप पडायची असते. अजित सावंत तर सर्वाधिक यशस्वी ठरले 
असते, आहेतही ते दिसायला एखाद्या चमडी बाबासारखे. जरा चार पोरी त्यांच्या ओळखीतून मग आमच्याही भोवती फिरल्या असत्या कारण आम्ही देखील अजित सावंत सारख्या वाहिन्यांवर येणाऱ्या नेत्यांचे ' संजय यादव ' झालो असतो कि.....संजय हा भय्यू चा उजवा हात, म्हणून उल्लेख केला.....अपूर्ण

बुवाबाजी आणि पत्रकारिता मुंबईची 4 :पत्रकार हेमंत जोशी


येथे सुरुवात एका लघुकथेने करतो. 
हॅलो, 
तहसीलदार कुरणे का 
तुम्ही....? 
पलीकडून फोन.
हो..हो..मीच कुरणे..
तहसीलदार दिवसभराचा 
गल्ला मोजत म्हणाले.
पुन्हा पलीकडून आवाज. 
अहो, मी गांधी वृद्धाश्रमातून 
मिसेस देशपांडे बोलतेय..
आज वर्तमानपत्रातून हरविलेल्या 
तुमच्या कुत्र्याची जाहिरात आणि 
फोटो बघितला...
तुमचा टॉमी आमच्याच आश्रमात 
आलाय कालपासून आणि तुमच्या 
आईशी खेळतोय, सारखी मस्ती 
करतोय...
आपण या आणि घेऊन जा बरे 
तुमच्या कुत्र्याला....!! 
बरे झाले मला मूलबाळ नाही, 
मिसेस देशपांडे फोन ठेवता ठेवता 
मनाशी म्हणाल्या...
आणि या अशा जीवन समस्या या राज्यात या देशात अनेकांसमोर ठाण मांडून असतात. देव दिसत नाही, साथीला सहकार्याला मदतीला कोणी नाही नेमका त्यावेळी मनाचा तोल जातो मन सावरायला आणि समोर कोणी दिसत नाही म्हणून जो तो बुवाच्या नादि लागतो. देव बदनाम होतो, बुवा मजा मारून मोकळा होतो....
प्रसंग काही वर्षांपूर्वीचा, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कृषी मंत्री शांत आणि सयंमी भाऊसाहेब फुंडकर, आमच्या खामगावचे, जेथे माझीही शेती आहे, एक दिवस त्यांच्या कुटुंबात नको ते घडले, त्यांचा 8-10 वर्षांचा पुतण्या शुभम अचानक खेळता खेळता बेपत्ता झाला, विदर्भातल्या बलाढ्य नेत्याचा पुतण्या शुभम असा एकाकी बेपत्ता व्हावा, अख्ख्या विदर्भात खळबळ माजली. पोलिसांची, कार्यकर्त्यांची सर्वांची शोधाशोध सुरु झाली. भय्यू महाराजांचा भाऊसाहेबांना बुवा भय्यूचा परमेश्वरी अवतार म्हणून फोन, भाऊसाहेब निश्चिन्त राहा, शुभमच्या जीवाला कोणताही धोका नाही, तो चार दिवसात नक्की परत येणार आहे आणि पुढले चार दिवस भय्यू महाराजांचे सतत हे असे भाऊसाहेबांना म्हणजे मंत्री फुंडकरांना आपणहून सतत फोन, काळजी करू नका, तो येतोय, त्याच्या जीवाला अजिबात धोका नाही. शेवटचा फोन जेव्हा भय्यू महाराजांचा भाऊसाहेबांना आला कि काळजी करू नका अगदी पुढल्या काही तासात शुभम सहीसलामत परत येतोय, हा आलेला फोन भाऊसाहेबांनी आदळून खाली ठेवला, कारण......

तेव्हा शुभमचे प्रेत त्यांच्यासमोर पडलेले होते, त्याचा नरबळी देण्यात आला होता. भय्यूमहाराजच्या या थापाड्या फोन्स आधी भाऊसाहेब देखील या बुवाचे भक्त होते, बुवाशी जवळीक साधून होते, पुढले काय ते भाऊसाहेबांना विचारले तर बरे होईल, अशा एक ना अनेकांना थापा, अशा किमान मोठ्या,धक्कादायक शंभर थापा मला तोंडपाठ आहेत, भय्यू महाराजांनी मला आव्हान दिले तर नक्की त्या मारलेल्या थापा मी पुराव्यांसहित नक्की मांडेन....

दुसरा एक किस्सा 2002 मधला, बहुदा तारीख 13 जून असावी. पावसाळी अधिवेशन सुरु होते आणि त्यावेळेचे विधान सभेतील विरोधी पक्ष नेते श्रीमान नारायण राणे यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार बाहेर पडून विलासराव यांच्या विरोधात मतदान करण्याची दाट शक्यता होती, मोठी नामुष्की त्यामुळे शरद पवार आणि विलासराव देशमुखांवर त्यातून ओढवली असती, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जवळपास सात आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढला होता त्यामुळे काँग्रेस ने विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी मतदानाआधी आपले आमदार बंगलोरला तर राष्ट्रवादीने आपले आमदार इंदोरला पंचतारांकित हॉटेल मध्ये हलविले होते. मंत्री असलेल्या अनिल देशमुखांना भय्यू महाराजांनी निरोप पाठवला, घेऊन या तुमच्या आमदारांना आमच्या वाड्यावर. अनिलबाबूंनी आमदारांना भेटीसाठी म्हणून साऱ्या आमदारांना घेऊन भय्यू महाराजांच्या बंगल्यावर आगेकूच केली, ते तेथे पोहोचले आणि केंद्रात मंत्री असलेल्या शरद पवारांना हे कळताच त्यांनी फोनवरून अनिलबाबूंची बिनपाण्याने केली आणि आमदारांना परत घेऊन या आत्ताच्या आता, फर्मान सोडले, अर्थात सारे आमदार लगेच हॉटेल मध्ये परतले. पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्याच रात्री आपल्या आमदारांची रवानगी बंगलोरलाच केली. भय्यू महाराज नाजूक क्षणी काय गोंधळ घालतील, मला वाटते पवारांना कल्पना आली असावी आणि त्यांनी तो कठोर निर्णय घेतला...
आधीचे जनतेने आपणहून उपाधीत केलेले राष्ट्रसंत तुकडोजी मूर्तीपूजेला महत्व देणारे होते का, नाय नो नेव्हर. त्यांनी अडाणी अशिक्षित लोकांमध्ये जनजागृती आणली आणि जीवन कसे जगावे व कसे पुढे जावे हे शेतकरी शेतमजूर आणि इतर गोरगरिबांना शिकविले. हे भय्यू महाशय तर स्वतःच राष्ट्रसंत म्हणवून घेतात आणि त्यांच्या इंदोरच्या आश्रमात तर देवपूजेतून लुटालुटीला सतत प्राधान्य देतात. भक्तांकडून पूजेच्या तटाचे जे पैसे लुटले जातात ते कोणाच्या खिशात जातात न सांगितलेले बरे, विशेष म्हणजे पुन्हा पुन्हा तेच ते पूजेचे सामान आश्रमातून भक्तांना भरमसाठ भावाने विकल्या जाते. 
मस्त धंदा हा बुवाबाजीचा.....अपूर्ण..