Thursday, 7 July 2016

OFF THE RECORD--Vikrant Joshi

१)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सध्या ‘जितम्..जितम्..’ अशी परिस्थिती आहे. जे कोणी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते ते बाहेर फेकलेगेले आहेत. त्याची सुरुवात अर्थातच पंकजा मुंडे यांच्यापासून झाली. बहुजन समाजाचा मोठा पाठिंबा असलेल्या पंकजा मुंडेंवर चिक्की घोटाळ्याचा आरोपलागला आणि त्यांना स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याच शैक्षणिक पात्रतेबद्दल प्रश्‍नचिन्ह उभे राहिले.त्यामुळे जोराने पळणार्‍या तावडेंच्या पायात क्राम्प आला आणि ते जागेवरच स्तब्ध झाले. मग काय ते कोणताही गाजावाज न करता मुख्यमंत्र्यांना शरण गेले असे आता खाजगीत बोलले जात आहे. अजून एक बडे मंत्री एकनाथ खडसे,फडणवीसांच्या गतीने स्पर्धेत धावत होते. पण दाऊदचा फोन, पुण्यातील बोसरीएमआयडीसी जमिनीचा घोटाळा, याने त्यांच्या वेगाला इतका लगाम लावला की,त्यांना केवळ स्पर्धेतूनच नव्हेतर मंत्रीपदातूनही बाहेर पडावे लागले.मुख्यमंत्र्यांचे अजून एक विदर्भीय सहकारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीयांचे जवळचे मित्र, सुधीर मुणगंटीवार यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे जोरदार दावेदार म्हणून पाहिले जात होते.  पण सध्या तेही अडचणीच्या मार्गावर आहेत. त्यांच्या चंद्रपूरमधील मोठ्या फार्म हाऊसचे फोटो सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आज नाहीतर उद्या त्यांना त्याचे उत्तर  हे द्यावेच लागणार आहे. अमित शहा यांचे जवळचे सहकारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील हेही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात होते. मात्र बंद दरवाजाच्या मागेत्यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या टीमबद्दल बरेच काही बोलले जात आहे. आता तुम्हीच मला सांगा, ही मुख्यमंत्री फडणवीसांसाठी जितम्..जितम् अशी स्थिती नाही का?

२) राज्यमंत्री विद्या ठाकूरही सध्या जोरदार आहेत. त्या सध्या परदेशात सुट्टीच्या निमित्ताने हवा पालट करत आहेत. त्यांच्या गैरहजेरीत आम्ही हामजकूर देतोय. आमच्या सुत्रांवर विश्‍वास ठेवाल तर, वार्षिक सदस्यत्त्व सहलीला सुट्टी घेऊन निघण्यापूर्वी त्यांनी एका आठवड्यात मराठवाड्यातील ५५ ते ६० सुनावणी पूर्ण केल्या. त्यांच्या कार्यालयातील ३ ओएसडींपैकी एकओएसडी मेडिकल दुकाने, असोसिएशन आणि विद्या ठाकूर यांचे पती जयप्रकाश याच्यात मधस्थीचे काम करतो. विद्या ठाकूर या मंत्री असल्या तरी त्यांचे पती जयप्रकाश त्यांचेच त्यांच्या खात्यावर नियंत्रण आंहे. दोन दलाल म्हणा किंवा ब्रोकर, हे गैरमार्गाने मिळवलेली संपत्ती जमिनींमध्ये गुंतवण्याचे काम करत आहेत. संपूर्ण ठाकूर कुटुंबच त्यांचे खाते नियंत्रित करत असल्यामुळे त्यांच्या खात्यातील कर्मचारीही मंत्रीमहोदयांवर कमालीचे नाराज आहेत. विद्या ठाकूर यांचे पीए मिलिंद पवार यांना हा नवा पदभार स्वीकारून तीन महिने उलटले आहेत. पण त्यांना एकही पैसा देण्यात आलेला नाही किंवा नेमणूक पत्रही मिळालेले नाही. ते आता एक आमदाराला जॉईन होणार असल्याचे समजते. जयप्रकाशही रंगेल असल्याची चर्चा आहे. त्यांचे प्रेम म्हणे  एस. व्ही. रोड, गोरेगाव येथील व्हिनस मेडिकल सेंटरमध्ये फुलतेय, असे सांगितले जाते.


1. CM Devendra Fadnavis seems to be on a roll. Those who were in the competition for the CM post have now been put to rest. It started with Pankaja Munde who had mass following of the Bahujan Samaj, but she got entangled in the Chikki scam. Next in line was another aspirant, Education Minister Vinod Tawde. But the bipolar views on the validity of his educational qualification  put him out of the race. They say he silently surrendered to the CM and himself withdrew from the race. Another heavy weight minister in line was Eknath Khadse. The whole wide world saw him getting embarrassed over the Dawood phone call controversy and the Bhosri Land scam in MIDC Pune. Khadse was asked to resign. Other fellow Vidharbian, Union Minister Nitin Gadkari's close aid Sudhir Mungantiwar who was surely the next CM candidate is now in trouble over various photographs circulating in the social media of his huge farm-house built at Chandrapur. Today or tomorrow, he will be answerable. Next in line, as per what information we possess is Amit Shah's close aide PWD Minister Chandrakantdada Patil. A lot of talks are happening behind the closed doors about the ethics of the PWD minister's team. 

2. State Minister Vidya Thakur seems to be on a  role. The Minister is busy vacationing abroad as we put this information. If our sources are to be believed, before leaving for her annual "membership" vacation, the Minister conducted and cleared 55 to 60 hearings of the Marathwada region in a week. Apparently it is heard one of the 3 OSD's present at the Minister office is a liasioner between the medical shop's, the Association and the Minister's husband Jayprakash, who in a way is controlling the entire Ministry. Vidya Thakur literally shakes even if she has to reply to a query in the Vidhan sabha. As most cases, here also the money dosen't reach Thakur family directly. There are two brokers/dalaal's who work day-in and day -out for sourcing of lands and investing this ill gotten wealth. The staff's at the Ministers office are also crying foul about the stingy nature of the entire Thakur family. Milind Pawar, one of the PA who has resumed office 3 months ago, is neither been paid till now nor has he received his appointment order. Last heard he is waiting to join some MLA. Jayprakash is also known to be quite a casanova. His lady love is working at his Unnat Nagar SV Road Goregaon located Venus Medical Centre.