Thursday, 12 May 2016

मंत्री मंडळ विस्तार २ : Hemant Joshi

ऑफ द रेकोर्ड पाक्शिकाचा हा अंक हाती पडेपर्यंत मंत्रीमंडळ
विस्तार आणि बदल झालेला असेल. साधारणत: १७ मे ते ३१ मे
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार
करतील, काही बदल देखील नक्कीच घडवून आणतील. काहींची
खाती काढून घेतल्या जातील, काही मंत्र्यांना नवीन खाती देण्यात
येतील, काहींना घरी बसविले जाइल तर काही नवीन चेहरे या मंत्री
मंडळ बदलत नक्कीच दिसणार आहेत, शिवसेना मंत्रीमंडळ बदल
आणि विस्तार करण्यास अद्याप उत्सुक नाही, राजी नाही, उद्धव
ठाकरे त्यावर निर्णय घेतील असे वाटत नाही. शिवसेनेने मंत्रिमंडळ
बदल आणि विस्तार केला तर शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर फुट
पडेल त्यामुळे बदल आणि विस्तारात उद्धव यांना फारसा रस नाही,
इंटरेस्ट नाही. दिवाकर रावते सोडले तर इतर ज्या दीपक सावंत
यांच्यासारख्या वादग्रस्त विधान परिषद सदस्यांना उद्धव यांनी मंत्री
करून ठेवले आहे ती खरी शिवसेनेतून निवडून आलेल्या विधान सभा
सदस्यांची मोठी नाराजी आहे. पंधरा वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर
एकतर कसेबसे सत्तेत आलो, सत्तेत नसतांना थेट लोकांमधून तसेही
आजकाल आमदार म्हणून निवडून येणे अतिशय कठीण असे काम,
पण प्रसंगी जीवाची किंवा घरादाराची चिंता पर्वा न करता आम्ही
विधान सभा निवडणुकीत निवडून आलो, सतत निवडून आलो आणि
मंत्रीपद मात्र निवडून येण्याची अजिबात शक्यता नसतांना मागल्या
दाराने आमदारकी म्हणजे विधान परिषद सदस्यत्व मिळविणाऱ्या आणि
मंत्री म्हणून कवडीचीही छाप न पडू शकलेल्या नेत्यांना तुम्ही मंत्री केले,
हे अजिबात योग्य केले नाही, अयोग्य केले, चुकीचे केले जणू आम्हाला
तुम्ही दगा दिला, धोका दिला असा अलीकडे अगदी थेट निरोप या राज्यातले
शिवसेनेचे लोकप्रतिनिधी उद्धव ठाकरे यांना पाठवितात अशी माझी माहिती
आहे, शिवसेनेतून निवडून येउन उपयोगी नाही त्यापेक्षा दुसरा एखादा दखल
घेणारा पक्ष बरा, या निर्णयावर अनेक नाराज आमदार येउन ठेपले आहेत त्यामुळे
मंत्री मंडळ विस्तार करतांना सध्या ज्या शिवसेना नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी मंत्री
करवून ठेवलेले आहे, त्यांना काढता येत नाही आणि चार दोन विधान सभा
सदस्यांना संधी दिली तर नाराज झालेले नक्कीच बाहेर पडतील अशी त्यांची
माहिती असल्याने उगाच भानगड नको म्हणून उद्धव हे आपल्या मंत्र्यांमध्ये काही
बदल घडवून आणतील असे आज तरी चित्र नाही, त्यांचा तसा विचार दिसत नाही.
भाजपा मध्ये देखील फार आलबेल आहे असे नाही, विविध राजकीय पक्षातून
भाजपा मध्ये सामील झालेले आणि नंतर भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेले
मला वाटते जवळपास २०-२५ आमदार आहेत, त्या सर्वांना एकतर मंत्रीमंडळात
स्थान हवे आहे किंवा महत्वाचे महामंडळ त्यांना आपल्या ताब्यात हवे आहे, होणार्या
मंत्री मंडळ बदल आणि विस्तारात त्यांचा विचार मोठ्या प्रमाणावर केल्या न गेल्यास
पुढल्यावेळी हे आज निवडून आलेले आमदार भाजपा मध्ये असतील असे वाटत नाही.
ते भाजपा सोडून जातील, त्यांच्यासाठी नक्कीच मंत्रीपद महत्वाचे आहे. मित्रहो,
राजेश क्षीरसागर, उदय सामंत, सुजित मिन्चेकर असे काही लोकप्रतिनिधी आहेत कि
त्यांना विधान सभा निवडणुकीच्या वेळी कोणत्या पक्षाचे तिकीट आणि कोणाची हवा,
हा विषय कधीच महत्वाचा राहिलेला नाही, त्यांना त्यांच्या मतदार संघात लोकमान्यता
आहे त्यामुळे राजेश क्षीरसागर यांच्यासारख्या इच्छुक आणि उत्सुक आमदारास
होणार्या, होऊ घातलेल्या मंत्री मंडळ विस्तार आणि बदलात जर स्थान मिळाले नाही
तर टपून बसलेल्या चंद्रकांत पाटलांच्या घोळक्यात ते सामील होतांना अजिबात मागला
पुढला विचार करणार नाहीत, इसपार कि उसपार या निर्णयावर सेना भाजपा मधले अनेक
आमदार येउन ठेपले आहेत, त्यांना मंत्री न केल्या गेल्यास या दोन्ही पक्षात राजकीय फुट
नजीकच्या भविष्यात मोठ्या प्रमाणावर पडेल यात अजिबात  शंका घेण्याचे कारण नाही.
मंत्री मंडळ विस्तार आणि बदल दोन टप्प्यात करा अशा स्पष्ट सूचना देवेंद्र फडणवीस
यांना करण्यात आल्या आहेत त्यानुसार दुसरा बदल आणि फेरफार २०१७ मध्ये करण्यात
येईल आणि पुढल्या बदलात  तुझे नाव नक्की आहे, असे शरद पवार छाप उत्तर देऊन
विद्यमान मुख्यमंत्री नेहमीप्रमाणे गालातल्या गालात हसून इच्छुक आणि उत्सुक
आमदारांच्या हाती वाटण्याच्या अक्षता देऊन त्यांना वाटेला लावतील.....
कोणत्याही व्यक्तीला असे कधी वाटते का कि माझी बायको आफ्रिकन देशातल्या
गोरिला छाप दिसणाऱ्या तरुणींसारखी असावी, ज्याला त्याला हेच वाटते बायको नाजूक
साजूक सुस्वरूप, गोरी गोमटी, श्रीमंत घरातली साक्षात माधुरी श्रीदेवी मधुबाला असावी
पण ते घडत नाही तद्वत विधान सभा आणि विधान परिषदेवर निवडून येणाऱ्या नियुक्त
झालेल्या सत्तेतल्या प्रत्येक आमदारास हेच वाटत असते कि मला नामदारकी मिळावी, मी
मंत्री किंवा किमान राज्यमंत्री तरी व्हावे पण प्रत्येकाच्या नशिबी राजयोग असतोच असे
नाही जसे पत्रकार राजन पारकर याच्या नशिबी विवाह योग जुळून आलेले नाहीत तेच
बहुसंख्य आमदारांचे होते, ते आमदार म्हणून सभागृहात येतात आणि आमदार म्हणूनच
सभागृहातून जातात. मिळाले त्यावर त्यांना समाधान मानावे लागते. माझ्या गावातले
म्हणजे जळगाव जामोद जिल्हा बुलढाण्याचे संजय कुटे नावे आमदार आहेत, असे
म्हणतात जी व्यक्ती पुण्यात किमान दहा वर्षे राहून दाखवते अशी व्यक्ती जगात कुठेही
राहू शकते. पुण्यात फक्त मुळचा पुणेकर स्वत:चे कपडे फाडून न घेता आरामात राहू
शकतो, बाहेरून पुण्यात राहायला आलेला माणूस दररोज रात्री झोपण्यापूर्वी बायकोकडून
किंवा जमेल आणि परवडेल त्यापद्धतीने एखादिकडून डोक्याला मसाज करवून घेतो.
आमचे जळगाव जामोद गाव हुबेहूब त्या पुण्यासारखे म्हणजे या गावातून जो आमदार
म्हणून निवडून येतो जगात कुठेही उभा राहिला तरी निवडून येईल. निवडणूक
लढविणाऱ्या उमेदवाराला किमान हाफ mad करून सोडायचे, आम्ही जणू तो पण केला
आहे आणि या अशा मतदार संघातून, जलंब विधान सभा मतदार संघातून डॉ संजय कुटे
सातत्याने तीन तीन वेळा निवडून येतात, आहे ना जगातले एक आश्चर्य, बघूया गिनीज
बुकवाल्यांना कधी वेळ मिळतो कुटे यांची नोंद घ्यायला. अर्थात कुटे ताण घालविण्यासाठी
नेमके काय करतात त्यावर अद्याप माझ्याकडे नेमकी माहिती उपलब्ध नाही....
यावेळी मंत्री मंडळ विस्तारात बुलढाणा जिल्ह्यातून भाऊसाहेब फुंडकर यांना पूर्णवेळ
मंत्री आणि संजय कुटे यांना राज्यमंत्रीपद दिल्या जाइल असे आज तरी ठरलेले आहे पण
मधेच मलकापूरच्या चैनसुख संचेती यांची माशी शिंकली तर मात्र कुटे आणि फुंडकर
या दोन मराठी नेत्यांचे काही खरे नाही. आम्ही विदर्भवासी लोकचांगे म्हणजे इतरांचे
चांगले आणि स्वत:च्या पायावर कुर्हाड मारून घेणारे आहोत. आमच्यातले बहुतेक
पुरुष बायकोचे पार चिपाड करून ठेवतात आणि शेतात मजुरी करायला येणाऱ्या
तरुणीची ज्यादा काळजी घेतात. संचेती यांच्याबाबतीत ते तसेच घडण्याची शक्यता
आहे म्हणजे उद्या नितीन गडकरी दबाव टाकतील कि शेटजी संचेती यांना मंत्री करा
आणि कुटे किंवा फुंडकर यांच्या हातात द्या वाटाण्याच्या अक्षदा.बघूया नजीकच्या
भविष्यात नेमके काय घडणार आहे ते, एक मात्र नक्की, मंत्रीमंडळ बदल आणि
विस्तार होणार हि आता काळ्या दगडावरची रेघ आहे....

No comments:

Post a comment