Friday, 6 May 2016

आम्ही सारे ब्राम्हण ३ : पत्रकार हेमंत जोशी


मला वाटते ब्राम्हण हि केवळ एक जात नसून ती एक वृत्ती आहे, वेगळ्या विचारांची प्रबृत्तीही आहे, ब्राम्हण हे पूर्वापार तप्स्येवर आधारित लोकांचा समूह आहे, धर्मावर आधारित कर्मठ लोकांचा तो एक विचार आणि आचार आहे. जे योग्य  नसेल, जे फसवे असेल, ज्याची इतरांकडून सतत थट्टा उडवल्या जात असेल ते ते, तेवढे ब्राम्हणांनी काढून टाकावे, इतर वाईट सवयींना न अंगीकारता, आपल्यातले जे उत्कृष्ट आहे ते आधी जसे मुक्तहस्ते इतरांना वाटत आलो ते तसेच पुढेही वाटत राहावे, हिंदू धर्माला जे मान्य नाही ते ब्राम्हण पाळायचे अशी सर्वदूर एक विचारसरणी पसरलेली असतांना जर ब्राम्हण आपले ब्राम्हणत्व सोडून नको त्या वाममार्गाला लागलेले असतील तर इतरांकडून तुमची टिंगल टवाळी होणे स्वाभाविक आहे. ज्याचा ब्राम्हणांना अभिमान होता ते उच्चार, विचार, आचार सोडून केवळ वाम मार्गाला लागलेला माणूस म्हणजे ब्राम्हण, असे जर दृश्य निर्माण होण्याचा वेग वाढलेला असेल तर लोकांच्या थट्टेचा विषय म्हणजे ब्राम्हण हे दृश्य बघायला यापुढे फारसा वेळ लागणार नाही. जे ब्राम्हण शुद्ध विचारांसाठी आणि आचरणासाठी कौतुकल्या जातात त्या ब्राम्हणांच्या लग्न समारंभात जर दारूचे पाट वाहत असतील आणि तेथल्या चविष्ट चिकन मटण इत्यादी मांसाहारी भोजनावर आधी तेथे जमलेले ब्राम्हणच तुटून पडत असतील तर आपण ब्राम्हण किती निर्लज्ज, आपण आपली लेव्हल कशी सोडली, हे वेगळे सांगण्याची गरज पडणार नाही. समजा आपल्या घरातल्या अमुक एखाद्या मुलाने किंवा मुलीने आंतरजातीय विवाह केला असेल तर हमखास जोर देऊन सांगा, आम्ही तुमच्याकडे येऊन पूजापाठ करणारे, आमच्याकाडल्या शुभसमारंभात दारू मटण प्रकार केले जाणार नाहीत, थोडेसे तर पावित्र्य राखावे आपल्या परंपरेचे,सुट्टीचा वार आल्यानंतर आज आमच्याकडे झक्कास मटणाचा बेत होता, हे सांगतांना ब्राम्हणांना लाज कशी वाटत नाही. हातभट्टी, देशी दारू, आणि दारूच्या कुठल्याही अड्ड्यावर जेव्हा ब्राम्हण तरुण आणि तरुणींची भीड मी बघतो, तळपायाची आग मस्तकात पोहोचते. सर्वाधिक व्यसनी कोण तर ब्राम्हण, असे येथे नमूद करतांना डोळ्यात अश्रू टपकतात. आणि उद्योग व्यवसायात मोठ्या प्रमाणावर उतरून जर ते क्षेत्र देखील ब्राम्हणांना गाजवून सोडायचे असेल तर आधी आपल्यात एकी हवी, एकमेकांसाठी धावून जाण्यासाठीची वृत्ती अंगी जोपासायला हवी. हा याजुर्वदी, तो ऋग्वेदी, हा कोकणस्थ, तो कऱ्हाडे अशा पोटजाती पुढे आणून मुठभर ब्राम्हणांनी जे आपापसात मोठ्या प्रमाणावर गटतट निर्माण करून आपल्याच हाताने जे स्वत:चे खच्चीकरण करवून घेतले आहे ते थांबवून आमच्यातल्या पोटशाखांना पूर्णत: फाटा देऊन ' आम्ही सारे ब्राम्हण ' एक आहोत हे या राज्याला दाखवून द्यायला हवे केवळ आपल्या कुटुंबापुरता विचार न करतात एकमेकांच्या हातात हात घेऊन जर मोठे व्यावसायिक होण्याची स्वप्ने बघितली तर आपल्यातही खूप मोठ्या प्रमाणावर, आणखी आणखी पेंढारकर, चितळे, म्हैसकर, इत्यादी नक्कीच निर्माण होतील. एक छान घडते आहे, अलीकडे बहुतेक घरातल्या ब्राम्हणांच्या पुढल्या पिढीला नोकरी करण्याचा कंटाळा आलेला आहे, बहुतेकांना व्यवसायाची आवड निर्माण झालेली आहे आणि हे आपल्या दृष्टीने श्रीमंत, समर्थ होण्यास एक चांगले नियोजन आहे फक्त एकमेकांनी हातात हात घालून एकमेकांसाठी त्या कच्छी गुजराथी ज्ञातीसारखी धावून जाण्याची प्रवृत्ती अंगी बाणायला हवी. ब्राम्हण म्हणजे मध्यमवर्गीय किंवा काटकसर करून जगणारे, हे जे आपल्याविषयी मत पसरलेले आहे, ते बदलून उद्योग व्यवसायातून मोठी उलाढाल साधून, आम्ही ब्राम्हण देखील तुमच्यासारखे कसे श्रीमंत, दाखवून द्यायला हवे....

जे सतत घडत आले म्हणजे इतरांनी आपल्यातले जे चांगले सदगुण होते ते हेरले आणि झटपट पुढे गेले, आम्ही ब्राम्हण मात्र नेमके उलटे, विरुद्ध वागलो, जे जे इतरांमध्ये वाईट होते नेमके तेवढे उचलले आणि ब्राम्हणांनी स्वतः  ह्रास करून घेतला, अजूनही वेळ गेलेली नाही, पूर्वजांमध्ये नेमके कायचांगले होते ते घरातल्या बुजुर्गांना विचारून शरीरातले वाईट तेवढे काढून टाका, पूर्वी आपण थोतांड करून इतरांना आपल्या पाया पडण्यासाठी भाग पाडत असू, जर चांगले विचार पुन्हा अंगिकारले तर मला खात्री आहे, इतर नक्की तुमच्या चरणाला स्पर्श करतील या राज्यातले त्यांचे आदर्श समजून, अन्यथा आजकाल ब्राम्हण हि शिवी आहे म्हटल्या जाते, इतर तुमच्या जडलेल्या वाईट सवयींची थट्टा करतात, अगदी तोंडावर तुम्हाला शिव्या हासडून मोकळे होतात....मनापासून आणखी एक सांगावेसे वाटते, एक संस्कार म्हणून प्रत्येक ब्राम्हण कुटुंबातील बालकांची मौंज केली जाते पण पुढे घडते काय, बहुतेक घरातली मुले पुढले काही दिवस जानवे गळ्यात घालतात नंतर खुंटीवर टांगून ठेवतात, मग त्यावर खर्च कशाला, एखाद्या विवाह सोहळ्यासारखा आम्ही ब्राम्हण व्रतबंधावर खर्च करतो पण ज्यासाठी खर्च होतो, पुढे तो संस्कार जर टिकून राहणार नसेल, बिना जानव्याचे आम्ही ब्राम्हण आयुष्याची वाटचाल सुरु ठेवणार असू तर ते खर्च हवेत कशाला कि मौंज म्हणजे एक थोतांड, इतरांकडून आणखी ब्राम्हणांना थट्टा करवून घ्यायची असते म्हणून हे घडते.....ब्राम्हण बंधू भगिनींनो थांबा आणि विचार करा....जाता जाता : विदर्भातल्या अकोल्यात विजय देशमुख नावे माझा एक मित्र आहे. मोदी यांचे स्वच्छता अभियान सध्या पडलेल्या दुष्काळात बाजूला ठेवा, तो म्हणाला, त्यावर मी सहमत आहे. मुद्दा असा कि तो सध्या खेड्यात शेतीवर राहायला गेला आहे, तेथे संडास असूनही तो आणि त्याचे मित्र शौच्यास गावाबाहेर जातात, कारण अगदी सरळ आहे. शौच्यास आटोपली कि संडासात पाच लिटर पाणी लागते आणि गावाबाहेर फक्त टमरेलमध्ये मावेल एवढे, पाणी वाचविण्याचा यापेक्षा अधिक चांगला मार्ग कोणता, गावाबाहेर गेल्याने एक माणूस चार ते साडेचार लिटर पाणी एकावेळी वाचवू शकतो शिवाय प्रत्येक व्यक्ती किमान दोन तीन वेळा तरी आत, संडासात जाऊन येते. मित्रहो, मला वाटते, राज्य सरकारने सारी कामे बाजूला ठेवून जाहिरात करावी, तात्पुरते स्वच्छता अभियान बाजूला ठेवूनजागोजाग जाहिरातीतून सांगावे, स्वच्छता अभियान गेले चुलीत, हगायला जाऊया नेहमीच्या खुद्डीत.....!! ( गावाबाहेर शौच्यास बसण्याची जागा म्हणजे खुद्डी ) पुढे जाऊन मी असे म्हणतो कि अमुक एखादा मंत्री लगबगीने हातात टमरेल घेऊन गावाबाहेर जातो आहे, अंगावर कुत्री भुंकत असतांना तो न घाबरता आपले ठिकाण गाठतो आहे, असे पोस्टर्स राज्य सरकारने छापल्यास ते अधिक 
प्रभावी ठरेल.....

No comments:

Post a comment