Thursday, 12 May 2016

मंत्री मंडळ विस्तार २ : Hemant Joshi

ऑफ द रेकोर्ड पाक्शिकाचा हा अंक हाती पडेपर्यंत मंत्रीमंडळ
विस्तार आणि बदल झालेला असेल. साधारणत: १७ मे ते ३१ मे
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार
करतील, काही बदल देखील नक्कीच घडवून आणतील. काहींची
खाती काढून घेतल्या जातील, काही मंत्र्यांना नवीन खाती देण्यात
येतील, काहींना घरी बसविले जाइल तर काही नवीन चेहरे या मंत्री
मंडळ बदलत नक्कीच दिसणार आहेत, शिवसेना मंत्रीमंडळ बदल
आणि विस्तार करण्यास अद्याप उत्सुक नाही, राजी नाही, उद्धव
ठाकरे त्यावर निर्णय घेतील असे वाटत नाही. शिवसेनेने मंत्रिमंडळ
बदल आणि विस्तार केला तर शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर फुट
पडेल त्यामुळे बदल आणि विस्तारात उद्धव यांना फारसा रस नाही,
इंटरेस्ट नाही. दिवाकर रावते सोडले तर इतर ज्या दीपक सावंत
यांच्यासारख्या वादग्रस्त विधान परिषद सदस्यांना उद्धव यांनी मंत्री
करून ठेवले आहे ती खरी शिवसेनेतून निवडून आलेल्या विधान सभा
सदस्यांची मोठी नाराजी आहे. पंधरा वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर
एकतर कसेबसे सत्तेत आलो, सत्तेत नसतांना थेट लोकांमधून तसेही
आजकाल आमदार म्हणून निवडून येणे अतिशय कठीण असे काम,
पण प्रसंगी जीवाची किंवा घरादाराची चिंता पर्वा न करता आम्ही
विधान सभा निवडणुकीत निवडून आलो, सतत निवडून आलो आणि
मंत्रीपद मात्र निवडून येण्याची अजिबात शक्यता नसतांना मागल्या
दाराने आमदारकी म्हणजे विधान परिषद सदस्यत्व मिळविणाऱ्या आणि
मंत्री म्हणून कवडीचीही छाप न पडू शकलेल्या नेत्यांना तुम्ही मंत्री केले,
हे अजिबात योग्य केले नाही, अयोग्य केले, चुकीचे केले जणू आम्हाला
तुम्ही दगा दिला, धोका दिला असा अलीकडे अगदी थेट निरोप या राज्यातले
शिवसेनेचे लोकप्रतिनिधी उद्धव ठाकरे यांना पाठवितात अशी माझी माहिती
आहे, शिवसेनेतून निवडून येउन उपयोगी नाही त्यापेक्षा दुसरा एखादा दखल
घेणारा पक्ष बरा, या निर्णयावर अनेक नाराज आमदार येउन ठेपले आहेत त्यामुळे
मंत्री मंडळ विस्तार करतांना सध्या ज्या शिवसेना नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी मंत्री
करवून ठेवलेले आहे, त्यांना काढता येत नाही आणि चार दोन विधान सभा
सदस्यांना संधी दिली तर नाराज झालेले नक्कीच बाहेर पडतील अशी त्यांची
माहिती असल्याने उगाच भानगड नको म्हणून उद्धव हे आपल्या मंत्र्यांमध्ये काही
बदल घडवून आणतील असे आज तरी चित्र नाही, त्यांचा तसा विचार दिसत नाही.
भाजपा मध्ये देखील फार आलबेल आहे असे नाही, विविध राजकीय पक्षातून
भाजपा मध्ये सामील झालेले आणि नंतर भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेले
मला वाटते जवळपास २०-२५ आमदार आहेत, त्या सर्वांना एकतर मंत्रीमंडळात
स्थान हवे आहे किंवा महत्वाचे महामंडळ त्यांना आपल्या ताब्यात हवे आहे, होणार्या
मंत्री मंडळ बदल आणि विस्तारात त्यांचा विचार मोठ्या प्रमाणावर केल्या न गेल्यास
पुढल्यावेळी हे आज निवडून आलेले आमदार भाजपा मध्ये असतील असे वाटत नाही.
ते भाजपा सोडून जातील, त्यांच्यासाठी नक्कीच मंत्रीपद महत्वाचे आहे. मित्रहो,
राजेश क्षीरसागर, उदय सामंत, सुजित मिन्चेकर असे काही लोकप्रतिनिधी आहेत कि
त्यांना विधान सभा निवडणुकीच्या वेळी कोणत्या पक्षाचे तिकीट आणि कोणाची हवा,
हा विषय कधीच महत्वाचा राहिलेला नाही, त्यांना त्यांच्या मतदार संघात लोकमान्यता
आहे त्यामुळे राजेश क्षीरसागर यांच्यासारख्या इच्छुक आणि उत्सुक आमदारास
होणार्या, होऊ घातलेल्या मंत्री मंडळ विस्तार आणि बदलात जर स्थान मिळाले नाही
तर टपून बसलेल्या चंद्रकांत पाटलांच्या घोळक्यात ते सामील होतांना अजिबात मागला
पुढला विचार करणार नाहीत, इसपार कि उसपार या निर्णयावर सेना भाजपा मधले अनेक
आमदार येउन ठेपले आहेत, त्यांना मंत्री न केल्या गेल्यास या दोन्ही पक्षात राजकीय फुट
नजीकच्या भविष्यात मोठ्या प्रमाणावर पडेल यात अजिबात  शंका घेण्याचे कारण नाही.
मंत्री मंडळ विस्तार आणि बदल दोन टप्प्यात करा अशा स्पष्ट सूचना देवेंद्र फडणवीस
यांना करण्यात आल्या आहेत त्यानुसार दुसरा बदल आणि फेरफार २०१७ मध्ये करण्यात
येईल आणि पुढल्या बदलात  तुझे नाव नक्की आहे, असे शरद पवार छाप उत्तर देऊन
विद्यमान मुख्यमंत्री नेहमीप्रमाणे गालातल्या गालात हसून इच्छुक आणि उत्सुक
आमदारांच्या हाती वाटण्याच्या अक्षता देऊन त्यांना वाटेला लावतील.....
कोणत्याही व्यक्तीला असे कधी वाटते का कि माझी बायको आफ्रिकन देशातल्या
गोरिला छाप दिसणाऱ्या तरुणींसारखी असावी, ज्याला त्याला हेच वाटते बायको नाजूक
साजूक सुस्वरूप, गोरी गोमटी, श्रीमंत घरातली साक्षात माधुरी श्रीदेवी मधुबाला असावी
पण ते घडत नाही तद्वत विधान सभा आणि विधान परिषदेवर निवडून येणाऱ्या नियुक्त
झालेल्या सत्तेतल्या प्रत्येक आमदारास हेच वाटत असते कि मला नामदारकी मिळावी, मी
मंत्री किंवा किमान राज्यमंत्री तरी व्हावे पण प्रत्येकाच्या नशिबी राजयोग असतोच असे
नाही जसे पत्रकार राजन पारकर याच्या नशिबी विवाह योग जुळून आलेले नाहीत तेच
बहुसंख्य आमदारांचे होते, ते आमदार म्हणून सभागृहात येतात आणि आमदार म्हणूनच
सभागृहातून जातात. मिळाले त्यावर त्यांना समाधान मानावे लागते. माझ्या गावातले
म्हणजे जळगाव जामोद जिल्हा बुलढाण्याचे संजय कुटे नावे आमदार आहेत, असे
म्हणतात जी व्यक्ती पुण्यात किमान दहा वर्षे राहून दाखवते अशी व्यक्ती जगात कुठेही
राहू शकते. पुण्यात फक्त मुळचा पुणेकर स्वत:चे कपडे फाडून न घेता आरामात राहू
शकतो, बाहेरून पुण्यात राहायला आलेला माणूस दररोज रात्री झोपण्यापूर्वी बायकोकडून
किंवा जमेल आणि परवडेल त्यापद्धतीने एखादिकडून डोक्याला मसाज करवून घेतो.
आमचे जळगाव जामोद गाव हुबेहूब त्या पुण्यासारखे म्हणजे या गावातून जो आमदार
म्हणून निवडून येतो जगात कुठेही उभा राहिला तरी निवडून येईल. निवडणूक
लढविणाऱ्या उमेदवाराला किमान हाफ mad करून सोडायचे, आम्ही जणू तो पण केला
आहे आणि या अशा मतदार संघातून, जलंब विधान सभा मतदार संघातून डॉ संजय कुटे
सातत्याने तीन तीन वेळा निवडून येतात, आहे ना जगातले एक आश्चर्य, बघूया गिनीज
बुकवाल्यांना कधी वेळ मिळतो कुटे यांची नोंद घ्यायला. अर्थात कुटे ताण घालविण्यासाठी
नेमके काय करतात त्यावर अद्याप माझ्याकडे नेमकी माहिती उपलब्ध नाही....
यावेळी मंत्री मंडळ विस्तारात बुलढाणा जिल्ह्यातून भाऊसाहेब फुंडकर यांना पूर्णवेळ
मंत्री आणि संजय कुटे यांना राज्यमंत्रीपद दिल्या जाइल असे आज तरी ठरलेले आहे पण
मधेच मलकापूरच्या चैनसुख संचेती यांची माशी शिंकली तर मात्र कुटे आणि फुंडकर
या दोन मराठी नेत्यांचे काही खरे नाही. आम्ही विदर्भवासी लोकचांगे म्हणजे इतरांचे
चांगले आणि स्वत:च्या पायावर कुर्हाड मारून घेणारे आहोत. आमच्यातले बहुतेक
पुरुष बायकोचे पार चिपाड करून ठेवतात आणि शेतात मजुरी करायला येणाऱ्या
तरुणीची ज्यादा काळजी घेतात. संचेती यांच्याबाबतीत ते तसेच घडण्याची शक्यता
आहे म्हणजे उद्या नितीन गडकरी दबाव टाकतील कि शेटजी संचेती यांना मंत्री करा
आणि कुटे किंवा फुंडकर यांच्या हातात द्या वाटाण्याच्या अक्षदा.बघूया नजीकच्या
भविष्यात नेमके काय घडणार आहे ते, एक मात्र नक्की, मंत्रीमंडळ बदल आणि
विस्तार होणार हि आता काळ्या दगडावरची रेघ आहे....

Monday, 9 May 2016

मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली : Hemant Joshi

मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली :
शाळा महाविद्यालयातील मुलांना एखाद्या बागेत सहलीला नेले
कि नेमके काय घडते, अनुभव नक्कीच तुमच्यादेखील गाठीशी
आहेच. कोणी झाडावर चढते, काही मुले एकमेकांना वाकुल्या
दाखवतात, काही 'स्तब्ध पुतळा ' खेळ खेळतांना एकमेकांना
हसविण्यासाठी माकडाप्रमाणे एकमेकांकडे बघून हातवारे किंवा
हावभाव करतात, काही गाण्याच्या भेंड्या खेळतात, काही मुले
आणि मुली एकमेकांकडे बघून नुसतेच इशारे करतात, जुन्या
चित्रपटातला के एन सिंग नावाचा खलनायक इशारे करायचा
तसे, आम्ही मात्र यातले काहीही करीत नसू, आमची एक
शिक्षिका एकदम टकाटक होती, सहलीला गेलो कि तिच्याभोवती
पिंगा घालणे एवढे एकमेव काम आम्हा काही वात्रट मुलांचे असायचे,
येथे त्या शिक्षिकेचे नाव उघड करणे अवघड आहे, तिची मुलगी माझी
वाचक आहे कि. हे असे शाळा महाविद्यालयातल्या सहलीसारखे नेमके
दृश्य तुम्हाला सद्यस्थित असलेल्या मंत्रीमंडळात हमखास बघायला
मिळते, यापुढेही बघायला मिळेल. जर तातडीने मंत्रिमंडळ बदल आणि
विस्तार केल्या गेला नाही तर या सरकारचे काही खरे नाही. शाळेतल्या
सहलीसारखे चार दोन दिवाकर रावते, रणजीत पाटील, दस्तुरखुद्द
मुख्यमंत्री सोडले तर सहलीला आलेल्या माकडचेष्टा करीत सुटलेल्या
उनाड विद्यार्थ्यांसारखे त्यांचे वागणे सुरु आहे, मुख्यमंत्री त्यांना खाजगीत
झाप झाप झापतात, बाहेर पडले कि त्यांच्या माकडचेष्टा सुरु, त्यामुळे
बदल आणि विस्तार अत्यावश्यक आहे, काहींना घरी पाठवून काही नव्या
जुन्या चेहऱ्यांना संधी देणे अत्यावश्यक आहे. जसे सिगारेट पिल्यानंतर
माणूस हमखास लवकर मारतो, माहित असूनही आपल्यातले अनेक सिगारेट
ओढतात तसे यावेळी जर १९९५ सारखा बेधुंद कारभार केला तर पुन्हा पुढली
अनेक वर्षे सत्तेत येणे नाही हे ठाऊक असूनही अगदी अनुभवी मंत्री, आमदार
पैसे मिळविण्याच्या हव्यासापोटी वाट्टेल तो धुडगूस घालू लागलेले आहेत,
मतदारांची तीक्ष्ण नजर त्यांच्यावर असते आणि विरोधक देखील लेचेपेचे
नाहीत, ते अनुभवी आहेत, शरद पवार आहेत, नारायण राणे आहेत, त्यांना
नेमका गोंधळ कळतो, परिणाम त्यातून नक्कीच वाईट होतील....
काही मुली लग्नाच्या आधी एकदम खाली मान घालून बर्यापैकी संस्कार
जपणाऱ्या असतात, लग्नानंतर एकदम सुटतात, सनी लिओनि होतात. मंत्री
गिरीश महाजन मंत्री नव्हते तोपर्यंत हवेहवेसे वाटायचे, मंत्री झाले आणि एकदम
बदलले. एवढे बदलले कि त्यांचे जिल्ह्यातले राजकीय प्रतिस्पर्धी एकनाथ खडसे
यांना नकोसे वाटू झाले आहेत, पुढली चार दोन वर्षे, गिरीश महाजन यांचा सुरेश
दादा जैन कसा करता येईल त्यावर खडसे यांनी सारी कामे बाजूला ठेवून त्यावर
लक्ष नियंत्रित केल्यास फारसे आश्चर्य वाटून घेऊ नका कारण जळगाव जिल्ह्यात
गिरीश महाजन भाजपा वर्तुळात कमी,  सुरेशदादा गटात अधिक रमतांना दिसू
लागले आहेत, त्यांना भाजपा कार्यकर्ता प्रसंगी कमी महत्वाचा वाटतो पण कायम
राज्यसरकारला हाताशी धरून मराठी जनतेला लुटत आलेला पीव्हीसी पाइपवाला
अशोक जैन अधिक महत्वाचा वाटतो, असे अलीकडे त्यांच्याच पक्षातले कार्यकर्ते
म्हणतात. येथे मुंबईत मात्र बहुतेकवेळा भल्या पहाटे बंगल्यावर परतणारे
गिरीश महाजन हा सध्या तसा अभ्यासाचा, त्यांच्या पत्नीला चिंतेचा, काहींना
थट्टेचा आणि त्यांच्या स्टाफमध्ये चर्चेचा विषय आहे. असे वाटले होते महाजन
यांना संधी मिळाली कि ते त्या संधीचे सोने करून मोकळे होतील पण ते
घडतांना अद्याप दिसलेले नाही. जशी जळगाव जिल्ह्यात लोकांमध्ये खडसे
यांची क्रेझ आहे ती तशीच डिमांड नक्कीच महाजन यांना देखील आहे, त्यांनी
काही महिन्यांपूर्वी जे आरोग्य शिबीर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतले होते,
त्या शिबिराचे यश बघून खडसे यांच्या पायाखालची वाळू सरकली होती, पण
यश पचविता आले पाहिजे अन्यथा माणूस सुरेशदादा जैन होतो. मला आठवते
जळगाव जिल्ह्यात सतत ३० वर्षे सुरेशदादा जैन यांना जी लोकप्रियता लाभली
होती त्या आसपास देखील आजही महाजन अगदी खडसे देखील नाहीत पण
ज्या खडसे यांना सुरेशदादा, कीस झाड कि पत्ती समजले होते, पुढे त्याच
खडसे यांनी सुरेशदादा यांना राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणातून पूर्णत:
नामशेष करून सोडले, उद्या हि वेळ गिरीश महाजन यांच्यावर ओढवू नये कारण
खडसे यांच्यावर राजकीय मात करण्यासाठी महाजन यांनी नेमका दादागट हाताशी
धरून राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे, पण महाजन
यांनी एक ध्यानात घ्यावे, जे गुंड असतात, समाजविघातक असतात, त्यांचा केवळ
रात्रीच्या अंधारात राजकारणात उपयोग करवून घ्यायचा असतो, त्यांना चार चौघात
इज्जत दिली, मांडीवर घेतले कि ते तुमच्या अंगावरच ते हागून ठेवतात, घाण अंगावर
पडलेल्या नेत्यापासून जनता नाकाला पदर लावून कोसो दूर पळते, पुन्हा जवळ न
येण्यासाठी, तुमचा सुरेशदादा करवून घेऊ नका, नेमके आपण कुठे कुठे वावरतो
आणि आपल्या भोवती कोण कोण वावरते त्यावर विरोधकांची, जनतेची, मतदारांची
बारीक नजर असते त्यावर दबक्या आवाजात चर्चा होता होता एक दिवस एकदम
स्फोट होऊन अमुक एखादा आकशाला भिडलेला नेता क्षणार्धात धडकन जमिनीवर
कोसळतो, गांडीवर आपटतो....
खरे खोटे देव जाणे पण माहिती अशी कि एकनाथ खडसे यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींना
स्पष्ट शब्दात सांगितले आहे, माझ्याकाडली हवी तेवढी खाती काढून घ्या पण गिरीश
महाजन यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करा आणि जे खडसे यांना ओळखतात त्यांना
माहित आहे, खडसे राजकारणातले एकलव्य आहेत, त्यांनी अमुक एखाद्या गोष्टीची
मनाशी खुणगाठ बांधली कि ते हाती घेतलेले मिशन पूर्ण करून सोडतात.....
मित्रहो, जे लोखंड करू शकते प्रसंगी ते काम सोने करू शकत नाही. जे औदार्य
दाखविण्याची हिम्मत आई मध्ये असते ते काम बहिण, पत्नी, मैत्रीण किंवा अन्य
कुठ्लेही नाते असलेली स्त्री करू शकत नाही. कपड्यांना उठावदार दिसण्यासाठी
इस्त्रीच हवी, उशीखाली कपडा रात्रभर घडी करून ठेवला तरी फारसा उपयोग नसतो.
हत्तीणीला गाम्हन ठेवण्यासाठी हत्तीच हवा, माकडाच्या हातून हे काम शक्य नाही,
हत्तीणीच्या पाठीवर त्याने वर झाडावरून कितीही उड्या मारल्या तरी, तद्वत हा समाज
प्रगतीकी ओर न्यायचा असेल तर ध्येय समोर ठेवून वाटचाल करणारा नेता लोकांची
गरज असते, तुम्ही सत्तेचा दूरूउपयोग केवळ ऐय्याशी करण्यासाठी करताय, एकदा
का लोकांच्या ध्यानात आले कि नेतृत्वातले भले भले वृक्ष उन्मळून पडतात, हे कायम
ध्यानात ठेवून नेत्यांनी आपली वाटचाल सुरु ठेवावी.....

Friday, 6 May 2016

आम्ही सारे ब्राम्हण ३ : पत्रकार हेमंत जोशी


मला वाटते ब्राम्हण हि केवळ एक जात नसून ती एक वृत्ती आहे, वेगळ्या विचारांची प्रबृत्तीही आहे, ब्राम्हण हे पूर्वापार तप्स्येवर आधारित लोकांचा समूह आहे, धर्मावर आधारित कर्मठ लोकांचा तो एक विचार आणि आचार आहे. जे योग्य  नसेल, जे फसवे असेल, ज्याची इतरांकडून सतत थट्टा उडवल्या जात असेल ते ते, तेवढे ब्राम्हणांनी काढून टाकावे, इतर वाईट सवयींना न अंगीकारता, आपल्यातले जे उत्कृष्ट आहे ते आधी जसे मुक्तहस्ते इतरांना वाटत आलो ते तसेच पुढेही वाटत राहावे, हिंदू धर्माला जे मान्य नाही ते ब्राम्हण पाळायचे अशी सर्वदूर एक विचारसरणी पसरलेली असतांना जर ब्राम्हण आपले ब्राम्हणत्व सोडून नको त्या वाममार्गाला लागलेले असतील तर इतरांकडून तुमची टिंगल टवाळी होणे स्वाभाविक आहे. ज्याचा ब्राम्हणांना अभिमान होता ते उच्चार, विचार, आचार सोडून केवळ वाम मार्गाला लागलेला माणूस म्हणजे ब्राम्हण, असे जर दृश्य निर्माण होण्याचा वेग वाढलेला असेल तर लोकांच्या थट्टेचा विषय म्हणजे ब्राम्हण हे दृश्य बघायला यापुढे फारसा वेळ लागणार नाही. जे ब्राम्हण शुद्ध विचारांसाठी आणि आचरणासाठी कौतुकल्या जातात त्या ब्राम्हणांच्या लग्न समारंभात जर दारूचे पाट वाहत असतील आणि तेथल्या चविष्ट चिकन मटण इत्यादी मांसाहारी भोजनावर आधी तेथे जमलेले ब्राम्हणच तुटून पडत असतील तर आपण ब्राम्हण किती निर्लज्ज, आपण आपली लेव्हल कशी सोडली, हे वेगळे सांगण्याची गरज पडणार नाही. समजा आपल्या घरातल्या अमुक एखाद्या मुलाने किंवा मुलीने आंतरजातीय विवाह केला असेल तर हमखास जोर देऊन सांगा, आम्ही तुमच्याकडे येऊन पूजापाठ करणारे, आमच्याकाडल्या शुभसमारंभात दारू मटण प्रकार केले जाणार नाहीत, थोडेसे तर पावित्र्य राखावे आपल्या परंपरेचे,सुट्टीचा वार आल्यानंतर आज आमच्याकडे झक्कास मटणाचा बेत होता, हे सांगतांना ब्राम्हणांना लाज कशी वाटत नाही. हातभट्टी, देशी दारू, आणि दारूच्या कुठल्याही अड्ड्यावर जेव्हा ब्राम्हण तरुण आणि तरुणींची भीड मी बघतो, तळपायाची आग मस्तकात पोहोचते. सर्वाधिक व्यसनी कोण तर ब्राम्हण, असे येथे नमूद करतांना डोळ्यात अश्रू टपकतात. आणि उद्योग व्यवसायात मोठ्या प्रमाणावर उतरून जर ते क्षेत्र देखील ब्राम्हणांना गाजवून सोडायचे असेल तर आधी आपल्यात एकी हवी, एकमेकांसाठी धावून जाण्यासाठीची वृत्ती अंगी जोपासायला हवी. हा याजुर्वदी, तो ऋग्वेदी, हा कोकणस्थ, तो कऱ्हाडे अशा पोटजाती पुढे आणून मुठभर ब्राम्हणांनी जे आपापसात मोठ्या प्रमाणावर गटतट निर्माण करून आपल्याच हाताने जे स्वत:चे खच्चीकरण करवून घेतले आहे ते थांबवून आमच्यातल्या पोटशाखांना पूर्णत: फाटा देऊन ' आम्ही सारे ब्राम्हण ' एक आहोत हे या राज्याला दाखवून द्यायला हवे केवळ आपल्या कुटुंबापुरता विचार न करतात एकमेकांच्या हातात हात घेऊन जर मोठे व्यावसायिक होण्याची स्वप्ने बघितली तर आपल्यातही खूप मोठ्या प्रमाणावर, आणखी आणखी पेंढारकर, चितळे, म्हैसकर, इत्यादी नक्कीच निर्माण होतील. एक छान घडते आहे, अलीकडे बहुतेक घरातल्या ब्राम्हणांच्या पुढल्या पिढीला नोकरी करण्याचा कंटाळा आलेला आहे, बहुतेकांना व्यवसायाची आवड निर्माण झालेली आहे आणि हे आपल्या दृष्टीने श्रीमंत, समर्थ होण्यास एक चांगले नियोजन आहे फक्त एकमेकांनी हातात हात घालून एकमेकांसाठी त्या कच्छी गुजराथी ज्ञातीसारखी धावून जाण्याची प्रवृत्ती अंगी बाणायला हवी. ब्राम्हण म्हणजे मध्यमवर्गीय किंवा काटकसर करून जगणारे, हे जे आपल्याविषयी मत पसरलेले आहे, ते बदलून उद्योग व्यवसायातून मोठी उलाढाल साधून, आम्ही ब्राम्हण देखील तुमच्यासारखे कसे श्रीमंत, दाखवून द्यायला हवे....

जे सतत घडत आले म्हणजे इतरांनी आपल्यातले जे चांगले सदगुण होते ते हेरले आणि झटपट पुढे गेले, आम्ही ब्राम्हण मात्र नेमके उलटे, विरुद्ध वागलो, जे जे इतरांमध्ये वाईट होते नेमके तेवढे उचलले आणि ब्राम्हणांनी स्वतः  ह्रास करून घेतला, अजूनही वेळ गेलेली नाही, पूर्वजांमध्ये नेमके कायचांगले होते ते घरातल्या बुजुर्गांना विचारून शरीरातले वाईट तेवढे काढून टाका, पूर्वी आपण थोतांड करून इतरांना आपल्या पाया पडण्यासाठी भाग पाडत असू, जर चांगले विचार पुन्हा अंगिकारले तर मला खात्री आहे, इतर नक्की तुमच्या चरणाला स्पर्श करतील या राज्यातले त्यांचे आदर्श समजून, अन्यथा आजकाल ब्राम्हण हि शिवी आहे म्हटल्या जाते, इतर तुमच्या जडलेल्या वाईट सवयींची थट्टा करतात, अगदी तोंडावर तुम्हाला शिव्या हासडून मोकळे होतात....मनापासून आणखी एक सांगावेसे वाटते, एक संस्कार म्हणून प्रत्येक ब्राम्हण कुटुंबातील बालकांची मौंज केली जाते पण पुढे घडते काय, बहुतेक घरातली मुले पुढले काही दिवस जानवे गळ्यात घालतात नंतर खुंटीवर टांगून ठेवतात, मग त्यावर खर्च कशाला, एखाद्या विवाह सोहळ्यासारखा आम्ही ब्राम्हण व्रतबंधावर खर्च करतो पण ज्यासाठी खर्च होतो, पुढे तो संस्कार जर टिकून राहणार नसेल, बिना जानव्याचे आम्ही ब्राम्हण आयुष्याची वाटचाल सुरु ठेवणार असू तर ते खर्च हवेत कशाला कि मौंज म्हणजे एक थोतांड, इतरांकडून आणखी ब्राम्हणांना थट्टा करवून घ्यायची असते म्हणून हे घडते.....ब्राम्हण बंधू भगिनींनो थांबा आणि विचार करा....जाता जाता : विदर्भातल्या अकोल्यात विजय देशमुख नावे माझा एक मित्र आहे. मोदी यांचे स्वच्छता अभियान सध्या पडलेल्या दुष्काळात बाजूला ठेवा, तो म्हणाला, त्यावर मी सहमत आहे. मुद्दा असा कि तो सध्या खेड्यात शेतीवर राहायला गेला आहे, तेथे संडास असूनही तो आणि त्याचे मित्र शौच्यास गावाबाहेर जातात, कारण अगदी सरळ आहे. शौच्यास आटोपली कि संडासात पाच लिटर पाणी लागते आणि गावाबाहेर फक्त टमरेलमध्ये मावेल एवढे, पाणी वाचविण्याचा यापेक्षा अधिक चांगला मार्ग कोणता, गावाबाहेर गेल्याने एक माणूस चार ते साडेचार लिटर पाणी एकावेळी वाचवू शकतो शिवाय प्रत्येक व्यक्ती किमान दोन तीन वेळा तरी आत, संडासात जाऊन येते. मित्रहो, मला वाटते, राज्य सरकारने सारी कामे बाजूला ठेवून जाहिरात करावी, तात्पुरते स्वच्छता अभियान बाजूला ठेवूनजागोजाग जाहिरातीतून सांगावे, स्वच्छता अभियान गेले चुलीत, हगायला जाऊया नेहमीच्या खुद्डीत.....!! ( गावाबाहेर शौच्यास बसण्याची जागा म्हणजे खुद्डी ) पुढे जाऊन मी असे म्हणतो कि अमुक एखादा मंत्री लगबगीने हातात टमरेल घेऊन गावाबाहेर जातो आहे, अंगावर कुत्री भुंकत असतांना तो न घाबरता आपले ठिकाण गाठतो आहे, असे पोस्टर्स राज्य सरकारने छापल्यास ते अधिक 
प्रभावी ठरेल.....

आम्ही सारे ब्राम्हण २ : पत्रकार हेमंत जोशी

दोन तीन दिवस सतत मी माझ्या बेडरूम मध्ये शिरलो रे शिरलो कि दोन कावळे कर्कश ओरडून बेजार करायचे, खिडकीजवळ मी उभे राहण्याचा प्रयत्न केला तर अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करायचे,भटजींना फोन लावला, त्यांनी तुमचे पूर्वज अस्वस्थ आहेत म्हणून हे घडते आहे, सांगितले आणि उपाय सांगितले, खर्च सांगितला. जर मी अंधश्रद्धाळू असतो तर लगेच वेळ वय घालवून वर खर्च केला असता, जरा शोध घेतला, असे का घडते आहे, खरेच पूर्वज माझ्यावर नाराज असतील का, त्यावर, नंतर लक्षात आले, ते दोन कावळे म्हणजे तात्पुरते जोडपे होते, त्यांनी नुकताच पिल्लांना जन्म दिला होता, ती पिले माझ्या बेडरूमच्या वर जी पोकळी होती, तिथे खोपा करून ठेवली होती, मी त्या खोप्यावर हल्ला करेल त्या जोडप्याला वाटत होते म्हणून मी खिडकी जवळ जाण्याचा अवकाश, कावळे ओरडायचे...


ब्राम्हणांना त्यांच्या पूर्वजांनी जो सात्विक वारसा दिला, तो जपायला हरकत नाही पण या आधुनिक युगात थोतांड नको, लोकांना हे असे उगाचच काहीही सांगून पैसे मिळविणे नको. ब्राम्हण जगात जेथेही जातात, लाथ मारून पाणी काढतात, कुठल्याही क्षेत्रात यश मिळविणे त्यांना सहजशक्य असल्याने ज्यामुळे आपण बदनाम झालो, थट्टेचा विषय ठरलो, त्यापासून थोडेसे दूर जाणे केव्हाही उत्तम. अगदीच सारे सोडा म्हणजे भटजी, गुरुजी हा प्रकार बंद करा, म्हणू नये पण त्यातील जे काही प्रकार फसवे असतील, अशा प्रथा, असे प्रकार बंद व्हावेत. मित्रांनो, आम्हा ब्राम्हणांची एक गम्मत सांगू का, समजा अमुक एखाद्या तरुण भटजीचे महिन्याकाठी उत्पन्न लाखभर रुपये असेल, त्याला कोणीही पोटची पोरगी द्यायला तयार नसते पण अमुक एखादा तरुण एखाद्या खाजगी बँकेत अगदी कारकून म्हणून जरी नोकरीला असेल, त्याचे उत्पन्न जेमतेम
पाचपंचवीस हजारात असले तरी त्याच्या घरासमोर पोरींच्या पालकांची, मायबापांची रंग लागलेली असते. थोडक्यात, आजही आम्ही सारे ब्राम्हण नोकरी करणार्याला अगदी आनंदाने पोरगी देऊन मोकळे होतो पण उत्तम व्यवसायिक तरुणाला चिंता असते आपले लग्न होईल कि नाही आणि हे देखील घडायला नको. आधीच तसेही का कोण जाणे ब्राम्हण समाजात मुलींचे प्रमाण कमी आहे, त्यात तुम्ही इतर समाजातले, केवढ्या पोरींना गटवून घरी सून म्हणून नेलेले आहे. विशेषत: ग्रामीण भागातल्या ब्राम्हण व्यवसायिक तरुणांच्या लग्न समस्या मोठ्या गंभीर आहेत, फक्त ती मुलगी आहे, अशी खात्री पटली कि हे तरुण लग्नाला तयार होतात. एक गमतीदार प्रसंग आठवला. फार इस्ट ला असलेल्या देशांमध्ये गेल्यानंतर आंबट शौकिनांना अनेकदा हे कळतच नाही, समोरची व्यक्ती मुलगा आहे कि मुलगी, कल्याणकर आडनावाचा आमचा एक स्त्रीलंपट मित्र अनेकदा तिकडे जावून शेण खाउन येतो, एकदा तर संपूर्ण दिवस तो एका सुस्वरूप मुलीसंगे अख्खे Bangkok शहर फिरून आल्यानंतर त्याला रात्री फार उशिरा पलंगावर कळले कि ती मुलगी नाही, मुलगा आहे, मग सुटला हा सैरावैरा धावत...ब्राम्हणांची थोडी तारीफ पण करून बघतो. आम्ही ब्राम्हण समाजातील इतरांच्या भूलथापांना शक्यतो कधीही बळी पडत नाही. या देशातले नेतृत्व हळूहळू लबाड आणि भ्रष्ट नेत्यांच्या हाती जाते आहे हे जेव्हा ब्राम्हणांच्या ध्यानात आले,विदर्भातील आम्ही ब्राम्हणांनी संघ आणि जनसंघाची स्थापना करून राजकारणात आणि समाजकारणात उडी घेतली. या देशातले पावित्र्य आणि संस्कार कायम जपले जावेत म्हणून गावोगावी त्याकाळी संघशाखा उघडून तेथे विविध जाती धर्माचे उत्तम स्वयंसेवक निर्माण केले. संघ जनसंघ हा केवळ शेठजी आणि भटजींचा पक्ष ओळखल्या जातोय हे जेव्हा ध्यानात आले, इतर समाजातील तरुण वर्गाला आकर्षित करून त्यांच्या हाती संघाने, जनसंघाने पुढे भारतीय जनता पक्षाने सत्तेची दोरी दिली, केवळ त्यातून आजचा कॉंग्रेस प्रमाणे भाजपा हा सर्वधर्मीय राजकीय पक्ष म्हणून पुढे आला असे म्हटल्यास वावगे ठरू नये....खरे सांगू का, इतर सरळमार्गी नसतात, असे आम्ही म्हणणार नाही पण ब्राम्हण हे नक्कीच सरळमार्गी असतात. त्यांना त्यांच्या विचारांचा, आचारांचा अभिमान असतो. पुढे जाऊन सांगतो, आमची जी तरुण पिढी अभक्ष आणि दारूच्या नादी लागलेली दिसते त्यातून अशा तरुणांच्या घरातील वातावरण अतिशय तणावाचे असते. पतिव्रता स्त्रीच्या पोटी जणू वेश्या जन्माला आली असे आम्हाला हि अशी पिढी घरात जन्मली कि मनापासून वाटते, आमच्यासाठी हा प्रकार जिवंतपणी नर्क भोगण्यासारखा ठरतो. स्वातंत्राचा गैरफायदा घ्यावा, लबाड ढोंगी भ्रष्ट नेतृत्वाला सलाम ठोकावा, आम्हाला कधीही वाटत नाही. तुकडोबा, अण्णा हजारे, संत तुकाराम इत्यादी भलेही दुसर्या ज्ञातीतले पण त्यांच्या सत्यकथा हमखास ब्राम्हण घराघरातून सांगितल्या ऐकवल्या जातात....हे खरे आहे कि आमच्या वागण्याला धर्माची, आचारांची, सुविचारांची चौकट असते आणि आपण बरे आपले काम बरे, हे वागण्यावर ब्राम्हणांचा जोर असतो. आपले काम अगदी शंभर टक्के अभ्यासाने पूर्ण करण्यावर ब्राम्हणांचा विश्वास असतो मग तो शिक्षक असो, वकील, डॉक्टर, व्यवसायिक किंवा कुठल्याही क्षेत्रातला असो, अगदी सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी देखील, आम्ही सारे ' अविनाश धर्माधिकारी ' असतो....

आम्ही सारे ब्राम्हण : पत्रकार हेमंत जोशी

अलीकडे अनेक ब्राम्हण कुटुंबातील हे दृश्य, साध्या वरण भाताच्या जेवणाला आमच्यातले अनेक,म्हणजे आम्ही ब्राम्हण आपापल्या मुलांना पाठवतो आणि,दारू,मटणाच्या पार्टीला मात्र चेहऱ्यावर उगाचच गंभीर भाव आणून म्हणतो...


मलाच जावे लागेल, 
नाहीतर....
भाऊला राग येईल.....!! नेमके आम्ही ब्राम्हण कुठे कसे वाईट आणि कुठे किती चांगले,त्यावर तुम्हाला येथे सांगायचे आहे...तृप्ती देसाई हाजीआली दर्ग्यात घुसणार असल्याचे कळताच, सारे मुस्लिम एकवटले, मग तो समाजवादी अबू आझमी असो कि त्याच्या विरोधातला भायखळ्याचा आमदार, शिवसेनेचा हाजी अराफत असो कि अन्य कुठल्याही विचारांचा मुसलमान, सार्यांच्या तोंडून भाषा एकाच होती, आदेश मग ते कोणाचेहि येवोत, तृप्तीला आत जाऊ देणार नाही, आणि तिने जाण्याचा प्रयत्न केलाच तर तिला मारत मारत बाहेर काढू.आणि घडलेही तेच, जेव्हा तृप्ती तेथे गेली, दर्ग्याबाहेर अनेक मुसलमान त्यांच्या नेहमीच्या तयारीत होते म्हणजे काठ्या, चाकू, तलवारी हाती घेऊन तृप्तीच्या विरोधात आंदोलन करत होते, तिला त्यातून गाडीबाहेर पडण्याची देखील संधी मिळाली नाही. आणि मी हे जेव्हा केव्हा माहितीच्या अधिकारात मुंबईतल्या आयकर भवनात जातो, तिथल्या माझ्या उच्च अधिकारी असलेल्या मित्रांना हेच म्हणतो, हिंदूंच्या घरी तुम्ही रुबाबात धाडी घालता, भेंडी बाजार किंवा कुर्ल्यातल्या मुसलमानांच्या घरी कधी धाडी टाकल्या आहेत का, छोटा राजन अखेरीस शरण आला पण दाउद मसणात जाण्याची त्याची वेळ आलेली असली तरी भारतीयांच्या नाक्कावर टिच्चून तिकडे पाकिस्थानात अगदी उघड वावरतो आहे, मात्र येथे कौतुक त्या तृप्ती देसाईचे, तिने निदान हिम्मत तर दाखवली, दर्ग्यात घुसण्याची....या जगात मी अगदी मनापासून दोन लोकांवर प्रेम करतो आणि येथे ते तुम्हाला अगदी उघड सांगतांना मला दडपण नाही किंवा मी संकुचित विचारांचा, असे जरी तुम्ही म्हणालात तरी चालेल. मी फक्त आणि फक्त या राज्यातल्या मराठी  माणसांवर अगदी मनापासून प्रेम करतो आणि मी जातपात मानत नसलो तरी मला माझ्या ब्राम्हण जातीचा अभिमान आहे आणि मला वाटते, प्रत्येकालाच आपल्या जातीचा अभिमान वाटतो. परवा मला कोणीतरी सांगितले, मुख्यमंत्र्यांचा तो शीलवंत आडनावाचा खाजगी सचिव आहे ना, तो तेथे बसून फक्त त्यांच्या बौद्ध समाजातून येणाऱ्या लोकांची कामे करतो, त्यावर मी म्हणालो, त्यात गैर ते कसले, शेवटी कायम अडचणीत असणार्या त्या ज्ञातीतल्या लोकांचे देखील कोणीतरी तारणहार हवेतच कि,फक्त तो इतरांना त्रास देत नाही, तेवढे बघा...मी ब्राम्हण आणि मराठी लोकांवर प्रेम करतो याचा अर्थ इतरांचा दुस्वास करतो, असे अजिबात नाही. या राज्यातल्या मराठींना अजय संचयनि सारखे भामटे शेटजी जर कायम लुटून खात असतील तर मात्र मी अगदी उघड मराठी माणसाची बाजू घेतो. मराठींना लुटून खाणार्या कुठल्याही अमराठी माणसाची गय करायची नाही, अशी जणू मी शपथ घेतलेली आहे. आणि माझ्या ब्राम्हण ज्ञातीबिषयी सांगायचे झाल्यास जसे रामदास आठवले किंवा सुशीलकुमार शिंदे किंवा विनायक मेटे किंवा पुरुषोत्तम खेडेकर किंवा मुंडे परिवार किंवा भुजबळ कुटुंबीय किंवा अबू आझमी किंवा अण्णा डांगे इत्यादी त्यांच्या त्यांच्या ज्ञाती साठी अगदी उघड भूमिका मांडतात, पाठराखण करतात, भूमिका घेतात, ती तशी बरी वाईट भूमिका आपण का ब्राम्हणांसाठी मांडायची घ्यायची नाही, मनात विचार आला आणि समाजात पत्र पाठवून कळवले, मी तुमच्या आनंदात भलेही येणार नाही पण अडचणीत सापडलात तर अवश्य माझी आठवण करा, अर्ध्या रात्री धावत येईन, अर्थात मी या राज्यातला अगदीच common man , आपापल्या जातीचे नेतृत्व करणारे ते ते नेते फार मोठे आहेत त्यांच्यासमोर मी म्हणजे अमिताभसमोर एखादा अति सामान्य कलाकार पण मनातून ठरविले आहे कि याराज्यातल्या मराठी माणसासाठी आणि ब्राम्हणांसाठी वाट्टेल ते....मला राहून राहून एका गोष्टीचे आश्चर्य वाटते आणि वाईट देखील वाटते कि या राज्यात अनेक ' भुजबळ ' वृत्तीचे नेते असतांना ते अगदी मोकाट फिरताहेत आणि ज्या ज्ञाती जातीमुळे भुजबळ तुरुंगात गेले तो त्यांचा समाज त्यांच्यासाठी एकदाही रस्त्यावर उतरला नाही. भुजबळ यांनी आपल्या ज्ञातीसाठी घेतलेली उघड भूमिका त्यांना अधिक अडचणीची ठरली. कारण भ्रष्ट नेते तर अनेक होते, ते सेफ आहेत, भुजबळ मात्र आत आहेत आणि त्यांचा समाज मुग गिळून गप्प आहे. चालायचेच, सुखके सब साठी....आम्ही ब्राम्हण नेमके कसे आहोत म्हणजे लायक कसे आणि नालायक कुठे, त्यावर 
माझे पुढले लिखाण असेल....