Sunday, 3 April 2016

जातीने ब्राम्हण आणि वृत्तीने रावण: भाग २--पत्रकार हेमंत जोशी.


अलीकडे मला पत्रकार उदय तानपाठकचा फोन आला होतो, म्हणाला,तुला ठाऊक आहे का कि टक्कल पडलेले अनेक पुरुष आपल्या विजारीचे खिसे फाटके का ठेवतात....? ठाऊक नाही, मी म्हणालो.मग त्याने मला जे नेमके कारण सांगितले, त्यानंतर पुढले काही तास मी फक्त आणि फक्त हसत होतो. उत्तर खूप अश्लील आहे,ते त्यालाच तुम्ही फोन करून विचारा...पण मला हे कळत नाही कि डोक्याला टक्कल पडलेले बहुसंख्य पुरुष नकली केसांचा विग का वापरतात. माझ्या मते केसांचा विग वापरून उलट ते अधिक विचित्र दिसायला लागतात, त्यापेक्षा टक्कल पडलेला पुरुष अधिक बुद्धिमान, धूर्त आणि कर्तुत्ववान असतो असे स्त्रियांना वाटते त्यामुळे त्यांना टक्कल पडलेले पुरुष देखील मनापासून आवडतात, उगाचच टक्कल पडलेल्यांची जी धडपड असते कि नकली केसांचा विग वापरून आपण स्त्रियांना आकर्षक करतो,त्यांनी आधी मनातला गैरसमज काढून टाकावा. विशेष म्हणजे नकली केसांचा विग वापरून बहुसंख्य पुरुष विदुषकासारखे दिसतात, पाठ वळताच सारे त्यांना हसतात, एकदा आमच्या घरी सुभाष नावाचा एक विग वापरणारा मित्र आला होता, विक्रांत लहान होता,त्याच्याशी मस्ती करता करता याने त्याचा विग खेचताच तो विग अक्षरश: चक्रासारखा गोलाकार फिरून सोफावर पडला, त्यानंतर तो मित्र पुन्हा कधी घरी आला नाही....कृपया पुरुषांनी विग वापरणे बंद करावे. तुम्हाला हे कदाचित माहित नसेल कि माजी मंत्री मनोहर नाईक त्यांच्या खोलीबाहेर पडल्यानंतर डोक्यावारली CAP कधीही काढून बाजूला ठेवत नाहीत, कारण मी सांगतो, त्यांच्या डोक्याला भले मोठे टेंगुळ आहे,जे प्रत्यक्षात भयावह आणि विचित्र दिसते म्हणून मनोहर नाईक कॅप डोक्यावरून कधीही काढून ठेवतांना तुम्हाला आढळणार नाहीत. थोडक्यात ते CAP ला ते कधीही GAP देतांना दिसणार नाहीत....अनेकांना वाटते मी देखील अमिताभ बच्चनसारखा केसांचा विग वापरतो म्हणून, त्यावर मोठ्या खुबीने माझे केस आजपर्यंत कोणी आणि कितींनी ओढून बघितले त्यावर अगदी व्यापक मी माझ्या आत्मचरित्रात लिहिणार आहे....नकली विग काढल्यानंतर जसे प्रेयसीला तिच्या प्रियकराचा असली चेहरा दिसतो आणि ती किंचाळते ते तसे माझे झाले आहे, मैथिली जावकर बाबत हिडीस प्रकार ऐकल्यानंतर मला देखील किंचाळायला झाले पण मी किंचाळलो नाही हा प्रकार होळी दरम्यान घडला म्हणून मनाशी ठरविले या हिडीस विकृत अश्लील प्रकारावर लिखाणातून बोंब ठोकायची आणि नेमके सत्य तुमच्यासमोर मांडायचे....कालपर्यंत जेव्हा गणेश पांडे भाजपा युवा मोर्चाचा मुंबई अध्यक्ष होता, त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईतील तरुण पुरुष स्त्रिया पदाधिकारी ४,५,६ मार्च ला कार्यकारणीच्या बैठकीसाठी ट्रेनने मथुरेला गेले होते, जातांना वाटेतच या विकृत उत्तर भारतीय अध्यक्षाने ट्रेन मध्येच पोर्न फिल्म लावून भ्रमणध्वनी मधून निघणारे अश्लील आवाज मोठे ठेवले होते, विशेष म्हणजे ज्या भाजपाला आपण संस्कारांच्या बाबतीत साकारात्मात्क समजतो त्यातले हे पांडे आणि त्याचे त्या ट्रेन मध्ये असलेले सवंगडी, पदाधिकारी सरहास त्या सार्वजनिक ठिकाणी नियम धाब्यावर ठेवून मद्यपान करीत बसले होते, पांडेला चढल्यानंतर त्याने भ्रमणध्वनीवर मोठ्या आवाजात लावलेली ब्ल्यू फिल्म मैथिलीच्या बर्थखाली तो भ्रमणध्वनी आणून ठेवला आणि आपले मराठी तरुण पदाधिकारी त्याच्या या विकृत प्रकावर मुग गिळून बसले होते. मैथिली जावकरला तर रस्त्यातच वाटले होते, माघारी फिरावे पण तिने धीराने मराठी नसलेल्या या विकृत पांडेच्या हिडीस प्रकाराला तोंड दिले. मथुरेत देखील तोच प्रकार, ज्या ठिकाणी हि मंडळी उतरली होती तेथे गणेश पांडे आणि त्याचे काही मित्र दारू ढोसून मोठ्याने पोर्न फिल्म लावून बसले होते, एखाद्या हिंदी चित्रपटातील खलनायकाला शोभेल एवढे विकृत हा गणेश पांडे अख्ख्या रात्रभर मैथिलीशी वागला होता, त्याने तिला म्हटले, तुला विनोद तावडे यांनी सोडले पण मी सोडणार नाही, मै गणेश पांडे हु, तुझे छुके रहूंगा, तुरुंगात गेलो तरी....अर्थात त्याने तावडे यांच्याविषयी असे अश्लील उदगार का काढावेत म्हणजे तावडे देखील त्यातलेच आहेत, अशी त्याची खात्री होती कि काय म्हणून तो असे त्यांच्याबाबतीत बोलला असावा, खरे खोटे भाजपा मधले इतर पदाधिकारी सांगतील. मध्यंतरी विनोद तावडे यांचे वडील इकडे मुंबईत असतांना ते तिकडे थायलंडला होते, वडील गेले तेव्हाही ते तेथेच होते, हा फोटो फेसबुक व्हायरल झाला होता, माझ्या फेसबुक वर देखील तो टाकण्यात आला होता, तावडे हे फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील, त्यांनी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी बदनाम होणार नाही, नाव खराब होणार नाही त्यावर सतत सावध राहायला हवे, ते घडतांना दिसत नाही, नजीकच्या काळात तावडे अमुक एखाद्या भानगडीत अडकलेत तर मला फारसे आश्चर्य वाटणार नाही, विशेष म्हणजे भाजपामध्ये आजकाल एकमेकांना बदनाम करण्याची जणू स्पर्धा लागलेली दिसते, मैथिलीने जे पत्र आशिष शेलार यांना लिहिले होते, ते गुप्त राहायला हवे होते, पण ते घडले नाही, मैथिलीची बदनामी करणारे हे पत्र देखील शेलार यांच्या कार्यालालायातून कि भाजपा मुंबई मुख्यालयातून असेच राज्यभर व्हायरल करण्यात आले....मैथिलीने जी तक्रार केली आहे त्यानुसार, दारू चढल्यानंतर मैथिलीचा हात धरून जेव्हा पांडे याने अश्लील बोलायला सुरुवात केली, मैथिलीने हात झटकटाच पांडे म्हणाला,"इस मराठनमे बहोत दम है, बेड पे मजा आयेगी," एवढे अश्लील उद्गार त्याने काढूनही या राज्यातले मराठी आणि भाजपा पदाधिकारी एखाद्या षंढ माणसासारखे शांत आहेत, तिकडे गणेश पांडे उजळमाथ्याने फिरतोय आणि आम्ही मराठी मुग गिळून गप्प बसलोय, अशा गुंड प्रवृत्तीच्या विकृत अमराठी नेत्याला मराठी माणसाची मर्दानगी भर रस्त्यावर त्याला खेचून दाखवायला हवी होती, दुर्दैवाने अद्याप ते घडले नाही, पण हे असेच सहन केले तर मैथिलीवरओढवलेला प्रसंग उद्या कुठल्याही मराठी स्त्रीवर ओढवू शकतो हे ध्यानात ठेवा. मैथिलीची आई सीकेपी आहे, मैथिली मराठी आहे तरीही राज आणि उद्धव ठाकरे यांनी एक अवाक्षर तोंडातून काढलेले नाही. मग कौतुक करावे ते आशिष शेलार यांचे, गणेश पांडे हा त्यांच्या गटाचा असूनही त्यांनी गणेशला त्याची जागा दाखवून दिली, त्याची पदावरून आणि सदस्य म्हणून हकालपट्टी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील सभागृहात अतिशय कठोर भूमिका घेतली....मैथिली जावकरने तिच्या पक्षाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना जी लेखी तक्रार दिली ती माझ्या हाती आहे, तुम्ही ती वाचून काढलीत तर नक्कीच दात ओठ खात तुम्ही गणेश पांडे यांच्या अंगावर धावून जाल. विशेष म्हणजे भाजपा मधला आणखी विकृत प्रकार असा कि मैथिलीने केलेली लेखी तक्रार कुठल्यातरी विकृताने व्हायरल केली, त्यात हात कुठल्यातरी बड्या नेत्याचा आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे, ते सत्य देखील भाजपा नेत्यांनी शोधून काढणे गरजेचे आहे, हे असे जर वारंवार भाजपामध्ये घडणार असेल तर मोठ्या प्रमाणावर स्त्रियांचा भरणा असलेला हा पक्ष,भविष्यात या पक्षात काम करावे किंवा नाही त्यावर विशेषत: तरुण स्त्रिया विचार करतील, त्यापेक्षा घरी राहणे त्या पसंत करतील....बहुसंख्य तरुण महिला व पुरुष कार्यकर्ते जमलेले असतांना सर्वांदेखत एकत्र जमून दारू ढोसणे, ब्ल्यू फिल्म बघणे, अश्लील बोलणे, विकृत शारीरिक अंगलट करणे, अमुक एखाद्या तरुणीला खेचून आणण्याचा प्रयत्न करणे, हे असे संस्कार भाजपा नेत्यांनी त्यांच्या तरुण पदाधिकार्यांना शिकविलेले आहेत का, अर्थात हे असे या राज्यात देखील सर्हास सुरु असते, मग ते दिवंगत अण्णा जोशी असोत कि मधु चव्हाण, असे अनेक विकृत प्रकार मला माहित आहेत पण मी आजच तोंड उघडणार नाही कारण ज्यांनी या राज्यात संघ आणि जनसंघ जन्माला घातला, पुढे मोठा केला त्यात एक माझा बाप देखील होता, म्हणून संयम बाळगतोय, अन्यथा अनेक भाजपा नेत्यांची मला चड्डी सोडणे अगदी सहज शक्य आहे, एक लक्षात ठेवा, तुम्हाला आठवत नसेल पण बरखा प्रकरण बाहेर काढण्याची सुरुवात माझ्यापासून झाली होती....भाजपा नेत्यांनी लाज बाळगावी, स्त्रियांशी कसे वागावे त्यावर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर Mungantivar किंवा रणजीत पाटील यांच्यासारख्या नेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, आपला ' बबनराव ' होणार नाही याची 
काळजी घ्यावी....

No comments:

Post a comment