Sunday, 3 April 2016

जातीने ब्राम्हण आणि वृत्तीने रावण : भाग -१ पत्रकार हेमंत जोशी

भल्या सकाळी मी उठतो अगदी साडे चार पाच वाजता, त्यानंतर एकही क्षण विश्रांती न घेता सतत अख्खा दिवस अंगावर घेतो, जेवण सुद्धा भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्यांसारखे घेतो म्हणजे अगदी उभ्या उभ्या, रात्र केव्हा होते कळत नाही, आणि एकदा का उजाडले कि दिवस केव्हा संपतो,कुठे संपतो, केव्हा संपला, विचार करायला वेळ मिळत नाही. कदाचित आयुष्यातल्या काही प्रसंगांची आठवण होऊ नये त्यातून व्यसनांकडे वळता कामा नये म्हणून कायम मी स्वत:च स्वत:ला व्यस्त ठेवत आलो असावे...


अनेकांना भेटणे राहून जाते, कधी वाटते शापूरजी पालनजीच्या दिनकर महल्ले यांच्याशी जाऊन खिदळत ठेवणाऱ्या गप्पा माराव्यात, कधी वाटते, माझ्या अतिशय यशस्वी उद्योजक मैत्रिणी रेखा चौधरी, यशोमती ठाकूर,कांचन अधिकारी, पुण्याची शलाका घैसास इत्यादी देखण्या कर्तुत्ववान मैत्रिणींशी गप्पा माराव्यात, त्या भेटल्यानंतर मनमुराद हसावे, कधी वाटते, पन्हाळा गाठावे आणि ज्यांनी मला घडविले त्या वसंतराव कुलकर्णी यांना जाऊन भेटावे, कधी वाटते अनंत तरे यांच्या बंगल्यात बसून फक्कड गप्पा माराव्यात आणि वहिनींच्या हातचे अन्न चाखावे, तर कधी वाटते, शेखर चन्ने, गजानन गिरी यांच्यासारख्या नावाजलेल्या, आवडलेल्या, आयुष्य उंचीवर नेउन ठेवणाऱ्या शासकीय अधिकारी मित्र्नाशी थकेपर्यंत विविध गप्पा माराव्यात, अनुभव शेअर करावेत, तर कधी मनात विचार येतो, भाऊ तोरसेकर, प्रफुल्ल मारपकवार, जितेंद्र गोस्वामी, गजानन देसाई, मनोज माडगुळकर, हेमंत टकले,धनंजय मुंगळे, जयराज साळगावकर, अभिनेते मोहन जोशी इत्यादी सडेतोड मते मांडणाऱ्या आवडत्या मित्रांशी बोलत सुटावे, त्यांच्यासंगे जेवावे, लांब कुठेतरी या अशा अनुभवी मित्रांसंगे फिरून यावे, कदाचित तुम्हाला खोटे वाटेल पण मनसोक्त गप्पा मारता याव्यात म्हणून मी मुद्दाम वर्षातून एकदा जयराज साळगावकर यांना अमेरिकेत गाठतो, बघूया यावर्षीहि तसा योग येतो का...?पण आवडत्या, नामांकित लोकांशी गप्पा, हे असे केवळ मनात ठरवतो, काहीच जमत नाही, हे असे ठरविणे म्हणजे उडत उडत आकाशाला गवसणी घालण्यासारखे किंवा पतंगराव कदम यांच्या खिशातून पावली काढण्यासारखे किंवा अजित पवार यांना मनमुराद हसतांना बघण्यासारखे किंवा दगड धोंड्यांना दोरा बांधण्यासारखे किंवा मल्ल्याच्या मुलीचे स्थळ मला सांगून येण्यासारखे किंवा पाण्याची-वार्याची मोट बांधण्यासारखे किंवा पत्रकार राजन पारकरने अमुक एखादी मुलगी पसंत करण्यासारखे किंवा आमच्या यदुने, पत्रकार यदु जोशीने अमुक एखाद्या मित्राशीहि मनमोकळ्या गप्पा मारण्यासारखे, इत्यादी इत्यादी....ज्यांना भेटून खूप खूप खूप अगदी मनसोक्त बोलावेसे अनेकदा वाटते त्यातलीच एक माझी अत्यंत चांगली, हसरी, बोलकी, उत्साही, उत्सवी, देखणी, धाडसी मैत्रीण अभिनेत्री मैथिली जावकर. माझी मैथिलीशी पहिली ओळख करून दिली ती अभिनेते मोहन जोशी यांनी, माटुंग्याला यशवंतराव नाट्यगृहात मी, मोहन जोशी, हेमंत टकले आणि आमदार 
उदय सामंत नाट्यक्षेत्रातल्या या दिग्गज मित्रांशी गप्पा मारत होतो, तेवढ्यात तेथे मैथिली आली आणि मोहन जोशी यांनी आमची एकमेकांशी ओळख करून दिली, त्यादिवशी कसलीशी मिटिंग संपल्यानंतर तिला मी माझ्या गाडीत लिफ्ट दिली, पूर्वी मी ज्या सात बंगला परिसरात अलीकडल्या गल्लीत राहत असे, तेथेच पलीकडल्या गल्लीत मैथिली राहायची, आजही ती तेथेच राहते, मी पुढे जुहु गार्डन जवळ राहायला आलो त्यामुळे अनेकदा आठवण होऊन देखील पूर्वीसारखे वारंवार मैथिलीशी भेटी झाल्या नाहीत, आम्ही किमान तीन वेळा एकत्र परदेश प्रवासात होतो, माझे मित्र जयंत म्हैसकर यांनी नाट्यसंमेलन आणि मिफ्ता हे कार्यक्रम परदेशात स्पोन्सर केल्याने मला पण या फिल्मी मंडळींना जवळून बघता आले, त्यांच्यासंगे जाणे झाले....मैथिली जावकर उत्तम नर्तिका आहे, तिला छान अभिनय येतो, तिने कुठलासा सिनेमा काढतांना अनेकदा मला आलेल्या अडचणी सांगितल्या आहेत, ती एक प्रथितयश अभिनेत्री आहे, या क्षेत्रात ज्या तडजोडी करून पुढे जावे लागते त्या तिने न केल्याने आज तिला प्रथितयश अभिनेत्री म्हणावे लागले, अन्यथा मैथिली खूप पुढे गेली असती. मैथिली अत्यंत हसतमुख, गप्पिष्ट, गोड तरुणी, पहिल्या पाच मिनिटात अगदी अनोळखी व्यक्तीलादेखील ती आपलेसे करून सोडते, मग आंबटशौकीन माणसाला वाटते, पोरगी पटली रे पटली, पण ते घडणे शक्य नाही, तिची loyalty ठरलेली आहे, त्यात बदल होणे शक्य नाही, इतर कोणीही तिला गटवु, पटवु, फसवू शकणार नाही, मी हे अगदी छातीठोकपणे सांगू शकतो, नेमके हे असेच नावात ' गणेश ' असून आणि जातीने ' ब्राम्हण ' असून रावणासारख्या वागलेल्या भाजपा युवा नेत्याचे म्हणजे त्या गणेश पांडे याचे झाले. हसायला, बोलायला, वागायला, मैत्री करायला, अगदी मनमोकळी मैथिली, त्यालाही गप्पांच्या ओघात वाटले, चीज चालू है, पण ते तसे नव्हते, पांडे याने जेव्हा मर्यादा ओलांडल्या, तो तिच्याशी अश्लील, विभात्स धंदे करायला गेला, तोपर्यंत त्याला हे ठाऊक नसावे, मैथिली एकदा का चवताळलि कि किती खतरनाक आहे, ती एकुलती एक असूनही तिच्या आई वडिलांना वाटते ती त्यांची झाशीची राणी आहे, एवढी मैथिली पराक्रमी आणि न घाबरणारी आहे, पांडे तेथेच चुकला, आणि राजकीय करिअरची चिंता, काळजी, पर्वा न करता मैथिलीने त्याला त्याची जागा दाखवून दिली, गणेश पांडेला तिने घाम फोडला जेव्हा तो तिच्याशी अश्लील वागला....मैथिलीला अलीकडे दोन तीन वर्षांपूर्वी राजकारणात उतरायचे होते, तेव्हा या राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत होती, तरीही तिने भाजपाची निवड केली, तिला या पक्षात अधिक सेफ वाटते, तेव्हा ती मला म्हणाली होती, आणि तिने भाजपामध्ये आपले ग्लामर बाजूला ठेवून एक कार्यकर्ती म्हणून काम करायला सुरुवात केली. पण विकृत माणसे अमुक एखाद्या राजकीय पक्षात असतात आणि भाजपा मध्ये ते नाहीत. असे जर तिने या पक्षातून बाहेर पडलेल्या मनीषा कायंदे यांना विचारले असते त्यावर मनीषाताई यांनी सापुरावा त्यावर कित्येक नेते येथेही कसे विकृत, तिला सांगितले असते, माझेच चुकले, तिने भाजपामध्ये येण्यापूर्वी मी तिची भेट मनीषा कायंदे यांच्याशी घालून द्यायला हवी होती, त्यांनी तिला कसे कोणापासून सावध असावे, सांगितले असते.
अपूर्ण..

No comments:

Post a comment