Wednesday, 13 April 2016

व्यक्तिविशेष ४ : अजित पवार--पत्रकार हेमंत जोशी


दिसायला तो किरकोळ, काहीस नाजूक वाटतो, त्याचे खाणे जेवणे देखील भातुकलीच्या खेळासारखे पण आतून तो मनाने संभाजी म्हणजे पराक्रमी आणि शरीराने एकदम तंदुरुस्त, काटक आहे, त्याला देवाने वाघासारखी डरकाळी फोडणारा आवाज बहाल केला आहे त्यामुळे, कोण आहे रे तिकडे, त्याने म्हणण्याचा अवकाश कि ऐकणार्याची गाळण उडते. अलीकडे तो काहीसा मनाने हिरमुसला असला तरी एरवी तो अत्यंत कडक, कणखर, करारी, खंबीर, जोमदार, दमदार, प्रभावशाली,प्रभावी, शक्तिशाली, धाडसी, प्रचंड कुवतीचा, दिलदार मनाचा, पोलादी, बुलंद, चैतन्य आणि उत्साहाचा झरा आहे, तो एक अपटूडेट, टापटीप, स्वच्छतेचा भोक्ता, बुद्धिमान, भरभक्कम असा या राज्यातल्या प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहे. वास्तविक त्याच्या वाटेला एरवी कोणाची जाण्याची हिम्मत होणार नाही पण एखाद्या पैलवानाची मुलगी जर स्वत:च आपला हात टवाळखोर तरुणांच्या हातात देणार असेल तर तिचा हात दाबण्याची संधी कोण कशी सोडेल, हे असे त्या एरवी राजासारखा रुबाब असणार्या नेत्याचे झाले आहे म्हणजे त्याच्या वाटेला जाण्याची या राज्यात कोणाचीही हिम्मत झाली नसती पण त्याने स्वत:हून नको त्या नको एवढ्या अजिबात गरज, आवश्यकता नसतांना चुका केल्या आणि तो त्याने जपलेला प्रभाव अलीकडे प्रभावहीन ठरला, एरवी वाघ सिंहासारखा जगणारा हा नेता केलेल्या अक्षम्य चुकातून शेळीच्या भूमिकेत जगतो, बघून कधी त्याचा राग येतो तर कधी मनाला अतिशय वाईट वाटते. आणि हा नेता कोण असेल तुमच्या आतापर्यंत लक्षात आलेच असेल, असून असून असणार कोण, अजित पवार यांच्याशिवाय असे पराक्रमी, अंगावर चालून जाणारे नेतृत्व आहे कोण....अजितदादा यांना वाटत असेल मी त्यांना शत्रू मानतो पण मी काय या राज्याचा महाराणा प्रताप आहे कि दादांशी पंगा घेऊन दंगा करेल, अजिबात शक्य नाही. त्यांच्यावर लेखणीतून मात्र अनेकदा उलटतो कारण अगदी मनापासून एक धाडसी नेतृत्व म्हणून मला ते भावतात त्यातून त्यांचा घसरत चाललेला पाय, मनाला यातना व्हायच्या, इतर कोणीही बोलण्याची किंवा लिहायची फारशी हिम्मत दाखवायचे नाहीत पण मी मात्र जेथे जेथे संधी मिळेल त्यांच्यावर मनसोक्त टीका करून मोकळा झालो, अजितदादा मला शत्रू समजत असतील त्यातून त्यांनी मला हमखास टाळले आहे पण जे मी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत, लिहित होतो, नेमके तेच घडले, अजितदादा अजिबात आवश्यकता नसतांना नको त्या ठेकेदारांच्या नादी लागून मागे पडले, आज भलेहि त्यांचे राजकीय अस्तित्व काही प्रमाणात जाणवत असेल पण शरद पवार जसे सत्तेत असले किंवा नसले तरी त्यांचे या राज्यात कधीही महत्व कमी झाले नाही, त्या काकांपेक्षादेखील अजितदादा अधिक प्रभावी या राज्यात ठरले असते आणि पैसा काय, तो खरोखरी मिळविणे दादांना महत्वाचे नव्हते, त्यांच्या काकांनी तो केव्हाही त्यांना बहाल केला असता, पण दादांचे व्यवहार चुकले, प्रेम म्हणून शरद पवार यांनी त्यांच्यावर पांघरून घातले खरे पण त्यांनी पुढला धोका ओळखून म्हणजे पुतण्याच्या बाबतीत आपला गोपीनाथ मुंडे होऊ नये हे लक्षात घेऊन शरदराव यांनी घरातूनच दादांना स्पर्धा निर्माण केली, सुप्रिया यांना राजकारणात नंतर आधी समाजकारणात उतरवून त्यांचे या राज्यात महत्व वाढविले, दादांच्या ते लक्षात आले, काका आपल्याला देखील सोडणार नाहीत, त्यांच्या ते ध्यानात आले, त्या दोघात नक्की बिनसेल, वाटत होते पण दादा चार पावले मागे आले आणि एक मोठा होणारा वाद तेथेच संपला, नंतरच्या काळात अर्थात दादांचे अधिक लक्ष राज्याच्या तिजोरीतून वैयक्तिक मालमत्ता कशी जमा करता येईल,त्यावर होते, हळू हळू त्यातून पुन्हा एकदा या राज्यात शरद पवार हेच अधिक प्रभावी ठरले आणि संधी चालून आलेली असतांना दादा यांना आता पुढली काही वर्षे तरी मान खाली घालून राजकारण करण्याची हि वेळ त्यांच्यावर येउन ठेपलेली आहे. गरज असेल तेवढे पैसे हवेत ते एरवी शरद पवार यांना देखील मान्य असावे, त्यांनी दिल्लीला प्रयाण केल्यानंतर अगदी मनापासून राज्याच्या नेतृत्वाची धुरा अजितदादा यांच्याकडे सोपविली होती पण दादांचे केवळ भूखंड आणि राज्यातल्या तिजोरीच्या श्रीखंडावर लक्ष आहे, त्यांना लक्षात आले, नाईलाजाने मग पुन्हा एकदा काका राज्यातल्या राजकारणावर आणि राज्यातल्या त्यांच्या राजकीय पक्षात लक्ष घालू लागले.....अजितदादा यांनी नको तो मोह आवरला असता तर तरुण पिढीच्या रांगेत एक ते दहा ते आणि राज ठाकरे हे दोघेच उरले असते म्हणजे दोघांनीही काकाची गादी परफेक्ट वारसदार म्हणून सांभाळली असती, पण दोघांनीही नको त्या चुका केल्या आणि त्यांच्या काकाच्या नावाचा फायदा दोन्हीकडे त्या त्या काकांच्या पोटच्या पुढल्या पिढीला झाला, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे पुढे निघून गेले. एखाद्या प्रेयसीने धोका दिल्यानंतर तिच्या प्रियकराला जे अतीव दु:ख होते तसे या राज्यातल्या जनतेचे झाले, ते अजितदादावर एक धाडसी, लोकांना मनापासून मदत करणारा नेता म्हणून प्रेम करायचे पण दादांनी आम्हा सार्यांना धोका दिला, ते स्वत:साठी ज्यादा जगले त्यातून त्यांनी पैसा भलेही मिळविला पण जमविलेला जनता नामक खजिना तूर्तास मात्र त्यांनी गमावला आहे.....

व्यक्ती विशेष ३ : जयंत पाटील आणि धनंजय मुंडे--पत्रकार हेमंत जोशी


तुम्ही हा लेख वाचून संपवेपर्यंत राज्यातील बजेट अधिवेशनाचे सूप वाजलेले असेल. हे अधिवेशन प्रामुख्याने दोन नेत्यांमुळे माझ्या कायम स्मरणात राहील. हे दोनही नेते विशेष म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत, पहिले माजी मंत्री सांगलीचे जयंत पाटील आणि दुसरे आहेत तरुण नेते श्रीमान धनंजय मुंडे, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते....

एखाद्या गोष्टीचा म्हणे योग यावा लागतो, जे जेव्हा नशिबात असते ते तेव्हाच मिळते, कितीही प्रयत्न केलेत तरी म्हणजे पत्रकार राजन परकर विवाहबंधनात अडकण्यासाठी कमी प्रयत्न करीत असेल का, पण नाही जमले अजून त्याचे, मी त्याला अनेकदा म्हणालो 
देखील कि माझ्या ओळखीच्या मुलीशी लग्न करशील का म्हणून, पण तो साफ नकारदेतो, त्याला उगाचच वाटत असावे कि त्याचे माझ्या ओळखीच्या मुलीशी लग्न झाले तर तो सकाळी घराबाहेर पडल्यानंतर मी त्याच्या घरी गप्पा मारायला जात राहीन, असे काही 
नसते हो, पण त्याला सांगावे कोणी. एकदा बुटावर लघवि सांडायला लागल्यानंतर लग्न करण्यात काहीही उपयोग नसतो. जयंतराव यांचेही नेमके तेच झाले, त्यांना तो योग जुळून आला नाही. जयंत पाटील यांना नेमके जे हवे होते ते मिळविण्यासाठी त्यांना आजचा दिवस बघावा लागला म्हणजे जयंत पाटील यांना या राज्यात त्यांच्या पक्षाचे नेतृत्व करायचे होते, पक्षातला मोठा नेता असे नाव गाजवून सोडायचे होते पण जेव्हा जयंत पाटील यांचा राजकीय उदय होऊन ते मंत्री झाले नेमके त्याचवेळी त्यांच्या स्पर्धेत जे दोन तरुण उतरले होते त्यांनी जयंतरावांना जणू कोपच्यात बसवून ठेवले होते, नाही म्हणायला त्या दोघांच्या बरोबरीने जयंतराव देखील तोडीचे मंत्री होते, वित्त सारखी महत्वाची खाती त्यांच्याकडे होती पण सांगलीतलेच एक आर आर आबा पाटील आणि दुसरे श्रीमान अजितदादा या दोघांत 
जयंतराव कुठेतरी काहीसे कमी पडत असल्याने त्यांना नेत्यांच्या हव्या त्या रांगेत बसण्याची कधी संधी चालून आलीच नाही, पण या अधिवेशनात तो योग जुळून आला, नागपूरपेक्षा हे बजेट अधिवेशन जयंत पाटलांनी आपल्या भाषणातून दणाणून आणि गाजवून सोडले, त्यांच्या सभागृहातील कामगिरीवर आणि भाषणांवर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देखील अनेकदा अस्वस्थ झाले, त्यांना स्वत:ला जयंत पाटलांच्या भाषणांची अनेकदा दाखल घ्यावी लागली आणि जयंत पाटील यांना हा योग जुळून आला कारण आता आर आर आबा नामक त्यांचे पक्षातले स्पर्धक देवाघरी निघून गेले आहेत आणि नको त्या भानगडी करून ठेवल्यामुळे अजित पवार यांच्यातला सभागृहातला ' दादा ' तूर्तास तरी इतिहास जमा झाला आहे, या दोहोंपैकी एक जरी स्पर्धेत असता तर जयंतरावांना पुन्हा एकदा मागच्यारांगेत बसून समाधान मानावे लागले असते आणि टाळ्या म्हणून टेबल वाजवण्याचे नेहमीचे काम त्यांना करावे लागले असते. यापुढे मात्र जेव्हा केव्हा राष्ट्रवादी सत्तेत येईल मुख्यमंत्रीपदाचे दोन दावेदार असतील एक जयंतराव आणि दुसरे 
धनंजय मुंडे....मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, मी याठिकाणी जे सांगतो तेच उद्या खरे ठरेल, धनंजय मुंडे उद्या नेतृत्वात काका गोपीनाथ यांच्या दोन पावले पुढे असतील, हि संधी तूर्तास तरी पंकजा यांनी गमावलेली आहे, त्या सत्तेत असून कुठेतरी वागण्यातून किंवा अनुभवत कमी पडल्या, अल्लड ठरल्या, नेमका त्यांच्या या उणीवांचा फायदा शरद पवार यांनी करवून घेतला त्यांनी उद्याचा गोपीनाथ मुंडे आजच आपल्या घरी आणून ठेवला. माणसे ओळखावीत ती शरद पवार यांनीच, म्हणून मी नेहमी सांगतो कि उद्या जर मुख्यमंत्री राष्ट्रवादीतून करायचा ठरले म्हणजे मतदारांनी तसे ठरविले तर मुख्यमंत्री पदास लायक अनेक दुसर्या फळीतले नेते शरद पवार यांच्या भात्यात असतील, इतर पक्षात ते अभावाने आढळते.....फार पूर्वी म्हणजे धनंजय अगदीच बाळबोध असल्यापासून काकांचे बोट पकडून या 
मंत्रालयात येतांना मी बघितले आहेत, त्यांची ती पावले मी १९९५ दरम्यान ओळखली होतीकि हा तरुण गोपीनाथ यांचा राजकीय वारसदार असेल म्हणून, आज तेच घडले आहे, बजेट अधिवेशन धनंजय यांनी गाजवून सोडले आहे, त्यांचे वागणे, बोलणे, माणसे जोडणे, काम करण्याची पद्धत, कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आश्वासक करण्याची पद्धत, लिहून आणलेला कागद समोर न ठेवता सभागृहात किंवा सभेच्या ठिकाणी प्रभावी भाषण करण्याची कला, रुबाबदार वागणे आणि राहणीमान, सारे काही त्या गोपीनाथ मुंडे यांची आठवण करून देणारे, विशेष म्हणजे गोपिनाथ्जी गेल्यानंतर अत्यंत पराक्रमी असा वंजारा समाज, जो काहीसा त्यांच्या जाण्याने सैरभैर झाला होता, आता ती कसर नक्कीच काही प्रमाणात धनंजय यांनी भरून काढली आहे, उद्या हा समाज संपूर्ण त्यांच्या पाठीशी उभा राहिल्यास आम्हाला फारसे आश्चर्य वाटणार नाही, कारण आज हा समाज मोठ्या प्रमाणावर फक्त आणि फक्त पंकजा यांचे नेतृत्व मानतो, त्यांच्या लाडक्या नेत्याशी म्हणजे गोपीनाथजी यांच्याशी धनंजय आणि त्यांचे पिताश्री पंडितराव यांनी वैर केल्यामुळे तूर्तास हवा तेवढा प्रतिसाद वंजारा समाजातून धनंजय यांना नाही. अर्थात पंकजा यांनी योग्यवेळी लोकप्रियतेला धक्का पोहोचण्याचा हा धोका ओळखून आता याक्षणापासून त्यांचे स्वत:चे नेतृत्व कसे वृध्धींगत होईल, मोठी काळजी घ्यायला हवी, चालून आलेली संधी त्यांनी गमावल्यास पंकजा यांना पुन्हा समाजातले आजचे त्यांचे स्थान मिळविणे नक्कीच खूप कठीण जाईल. धनंजय यांनीही एक सावधगिरी बाळगावी म्हणजे हलक्या कानाचे राहू नये, अमुक एखाद्याला आधी जवळ घ्यायचे नंतर एखाद्याने त्यांच्या कानात काही सांगून टाकले कि लगेच जवळ घेतलेल्या कार्यकर्त्याला दूर करायचे, त्यांनी आपल्या स्वभावातला हा दोष तातडीने काढून टाकावा, त्यांचे काका समोरच्या माणसाला त्याच्या गुण दोषांसहीत स्वीकारायचे, म्हणून कार्यकर्ते त्यांच्यापासून कधीही दूर गेले नाहीत....

Tuesday, 12 April 2016

स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि हिरवे दिसे नेत्यांना २ : पत्रकार हेमंत जोशी

बायकांच्या घोळक्यात कायम रमणाऱ्या राशीचाक्रकार उपाध्येबुवांच्या पद्धतीने सांगायचे झाल्यास मीन राशीची माणसे कायम द्विधा मन:स्थितीत असतात म्हणजे नेमका कोणता निर्णय घ्यावा यावर त्यांचा कायम गोंधळ असतो म्हणजे बायकोला गजरा घेऊन जायचा कि त्याआधी मैत्रिणीला चुंबनाचा आहेर करून घरी जायचे किंवा ' तूच माझी राणी ' हे नेमके कवेत घेतल्यानंतर प्रेयसीला म्हणायचे कि बायकोच्या केसात गजरा खोवतांना तिला म्हणायचे असा त्यांच्या मनाचा कायम गोंधळ असतो आणि याच गोंधळात ते बायकोला प्रेयसीच्या नावे आवाज देऊन नंतर पुढले दोन तीन दिवस तिच्या हातचा भरभरून मार खातात. राहुल गांधी असोत कि सोनिया गांधी किंवा कॉंग्रेसचे इतर बोलणारे नेते, त्यात मौनिसिंग उर्फ मनमोहनसिंग यांना कृपया गृहीत धरू नये, थोडक्यात कॉंग्रेसमध्ये बोलणारे जे नेते आहेत, मला वाटते त्यातले बहुतेक मीन राशीचे असावेत कारण बोलतांना, भाषण करतांना कायम त्यांच्या मनाचा गोंधळ उडालेला असतो म्हणजे एकीकडे ते म्हणतात, नरेंद्र मोदी हुकुमशहा आहेत आणि त्याचवेळी ते हे देखील बोलून मोकळे होतात कि भाजपवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हुकुमत आहे, त्यांनी नक्की करायला नको का कि त्यांना कोणावर निशाणा साधायचा आहे, साराच गोंधळ. समजा केंद्रातल्या किंवा राज्यातल्या भाजपा सरकारवर संघाचा प्रभाव आणि दबाव आहे तर हे ते सांगू शकतील का किंवा सपुरावा स्पष्ट करतील का कि केंद्रात मनमोहनसिंग पंतप्रधान असतांना जशा प्रत्येक निर्णयाच्या नसत्या हुकुमावरून जशा सोनिया, वद्रा किंवा राहुल यांच्या नजरेखालून गेल्याशिवाय त्यावर पंतप्रधान सही करणे शक्य नव्हते ते तसे येथे घडले का किंवा घडते का कि अमुक एखादी केंद्रातली किंवा राज्यातली फ़ाइल संघ मुख्यालयातून हिरवा कंदील दाखविल्या गेल्याशिवाय बाहेर पडलेली नाही, आणि हे असे वागणे अत्यंत धडाकेबाज नरेंद्र मोदी यांच्या हातून घडणे शक्य आहे का....? हे असे एकदा जरी त्यांना संघ मुख्यालयातून सांगितल्या गेले तर मोदी उठतील आणि राजीनामा देऊन बाहेर पडतील. फक्त एकदा जेव्हा मोदी यांच्या लक्षात आले होते कि नितीन गडकरी हे संघाच्या तालावर नाचून त्यांना त्रास देऊ बघता आहेत मग मोदी यांनी आधी गडकरी यांना अध्यक्षपदावरून खाली खेचले, संघाला किंवा भागवत यांना नको तिथे नाक न खुपसण्याचा दिला दिला, गडकरी आणि भागवत वरम्ल्यानंतर मग याच गडकरी यांचे मोदींनी राजकीय पुनर्वसन केले त्यांना केंद्रात महत्वाचे स्थान देऊन दाखवून दिले कि गाढवाच्या मागून आणि माझ्या पुढून जाण्याचा प्रयत्न केलात तर लाथ बसेल.तेच पुढे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत त्यांनी पक्षाच्या बैठकीत अगदी जाहीर सांगून टाकले होते. मुंडे हयात असते तर तेच या राज्याचे मुख्यमंत्री केल्या गेले असते, आता ते हयात नाहीत त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस हेच असतील. आणि घडलेही तेच, विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी घेतलेला तो निर्णय असल्याने मुख्यमंत्री म्हणून अनेक इच्छुक होते पण तोंडातून त्यावर एकानेही साधा शब्द काढला नाही कि मला मुख्यमंत्री करा अन्यथा त्यांचा देखील ' गडकरी ' झाला असता....वर दिलेले संदर्भ हेच सांगतात कि भाजपवर संघाचा प्रभाव किती हे नेमके सांगणे कठीण पण या पक्षावर नरेंद्र मोदी यांची हुकुमत आहे, प्रभाव आहे, आणि हाच नेमका टीकेचा मुद्दा पुढे करून कॉंग्रेस नेत्यांनी गमावलेली सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करावा, उगाच त्यांनी आपली मन:स्थिती द्विधा ठेवू नये, हसे होते....

स्वाभिमानी संघटना आणि हिरवे हिरवे दिसे नेत्यांना १: पत्रकार हेमंत जोशी


कामगार श्रीमंत झाला किंवा नाही मला फारसे त्यातले ठाऊक नाही कारण मंत्रालयात किंवा कुठल्याही मोक्याच्या कमाईच्या ठिकाणी 

मला कामगार कधीही दिसला नाही, दिसत नाही त्यामुळे या राज्यात कामगार गरीब कि श्रीमंत, मला नेमके सांगता येणार नाही पण याच कामगारांचे नेते मात्र नक्की कामगारांच्या भरवशावर श्रीमंत झाले  असावेत, आहेत हे मी ठामपणे सांगू शकतो कारण विजय चौगुले, 
सचिन अहिर, दिवंगत बाबुराव रामिष्टे, भाई जगताप, विजय कांबळे, शशिकांत शिंदे, सुर्यकांत महाडिक, दिवंगत अशोक पोहेकर, दिवंगत गुलाब जोशी इत्यादी बहुसंख्य कामगार नेत्यांना मी ते श्रीमंत होत गेले, बघत आलोय. भाई जगताप यांची गाठ जशी नेहमी पंचतारांकित हॉटेल मध्ये कामगारांसोबत नव्हे तर विविध व्यावसायिकांबरोबर ते गप्पा मारतांना किंवा तेथील पदार्थांवर ते ताव मारतांना पडते तशी माझी जेव्हा केव्हा शेतकऱ्यांचा पुळका असलेले नेते खासदार राजू शेट्टी यांच्याशी देखील चार पाच वेळा गाठ पडली ती पंचतारांकित हॉटेल मध्येच....एक मात्र नक्की कामगार श्रीमंत झालेत किंवा नाही मला माहित नाही पण मी स्वत: एक शेतकरी असल्याने हमखास सांगू शकतो कि ज्यांचे कुटुंब केवळ शेतीवर अवलंबून आहे तो शेतकरी मात्र अजिबात श्रीमंत नाही, माझ्यासारखे काही पूरक उत्पन्न आहे म्हणून दोन घास व्यवस्थित खातात पण आमच्या विदर्भात ज्यांच्याकडे २५-३० एकर शेती आहे तो देखील दोन वेळेचे पोटभर अन्न मिळेल किंवा नाही या चिंतेत असतो. मधला १९९५ ते २००० हा कालावधी सोडल्यास १९९० ते २०१५ या दरम्यान राज्याचे सिंचन खाते फक्त आणि फक्त आपल्या हक्काच्या माणसाच्या हाती कसे असेल हेच शरद पवार यांनी बघितले आणि कायम हे खाते या राज्यातल्या अतिशय भ्रष्ट ठरलेल्या उजव्या डाव्या हात समजल्या जाणार्या नेत्यांच्या मंत्र्यांच्या हाती पवार यांनी हे अत्यंत महत्वाचे असे सिंचन खाते सोपविले मग ते अनेक वर्षे अजित पवार आणि त्यांचे मेव्हणे डॉ. पद्मसिंह पाटील किंवा अजितदादा यांचा पेंद्या सुनील तटकरे किंवा शरद पवार यांचा सांगकाम्या भारत बोंद्रे यांच्याकडे होते, अर्थात १९९५ च्या दरम्यान युतीकडे सत्ता असतांना या खात्याची जबाबदारी ज्या महादेव शिवणकर यांच्याकडे होती त्यांनी किंवा तद्नंतर अल्पकाळ ज्यांच्याकडे या खात्याची जबाबदारी ज्या एकनाथ खडसे यांच्याकडे आली होती त्यांनी किंवा गेल्या वर्षभरापासून श्रीमान गिरीश महाजन यांनी हे बुडीत असे सिंचन खाते भरभराटीला आणले असे अजिबात नाही, गिरीश महाजन अद्याप बदनाम व्हायचे आहेत पण महादेव शिवणकर यांनी त्यांच्याकडे असलेल्या याच सिंचन खात्यात घोटाळे केले म्हणून त्यांच्याकडून हे खाते काढून घेण्यात आले होते, एकनाथ खडसे तद्नंतर सिंचन खात्याचे मंत्री झाले. मी वर्सोव्यात राहत असतांना आमच्या समोरच्या इमारतीत आठवीत शिकणारी एक अत्यंत देखणी, उफडी हिंदू मुलगी राहत होती, एक दिवस कुठल्याशा कारणाने तिचे आईवडिलांशी भांडण झाले म्हणून ती जुहु समुद्र किनारी रडत बसली. तिची 


हि अवस्था नेमकी एका दलालाने हेरली आणि तिला फूस लावून, या अत्यंत खानदानी, सुस्वरूप मुलीला त्याच्या घरी नेउन डांबूनठेवले आणि पुढल्या चार पाच दिवसात त्याने त्या मुलीला पाकिस्थानात विकले, या मुलीचा बाप सैरावैरा झाला, तो एयर इंडियात मोठ्या हुद्द्यावर होता, सतत चौदा वर्षे पोटच्या पोरीला वेड्यासारखा जगभर शोधत होता, आम्ही त्याच्या पाठीशी होतो, शेवटी चौदा वर्षानंतर ती मुलगी स्वत:च मोठ्या खुबीने भारतात परतली पण तेव्हा तिच्या आयुष्याचा पार चुराडा झाला होता, तिचे तीन वेगवेगळ्या पुरुषांशी विवाह उरकले होते आणि त्यांच्यापासून तिला दोन तीन मुले होती. एका अत्यंत देखण्या मुलीची जशी त्या पाकिस्थान्यांनी वाट लावली ते तसेच या राज्यातल्या सुंदर अशा सिंचन खात्याची पवार गटातल्या नेत्यांनी, मंत्र्यांनी, ठेकेदारांनी पुरती वाट लावून ठेवली, १९९० 

नंतर झालेल्या सार्याच्या सार्या सिंचन खात्याच्या मंत्र्यांनी या खात्याकडे केवळ वेश्या म्हणून बघितले, एखाद्या सुंदर दिसणाऱ्या वेश्येच्या शरीराचा जसा चोथडा विकृतीने पछाडलेले ग्राहक करून ठेवतात ते तसेच सिंचन खात्याचे बारा वाजविण्याचे काम हे खाते ज्या ज्या 
म्हणून मंत्र्यांकडे होते त्यांनी या खात्यातील विशेषत: अभियंत्यांना आणि सचिवांना हाताशी धरून केले, एकही मंत्री धुतल्या तांदळासारखा नव्हता आणि शरद पवार यांच्या माणसांनी तर या खात्याची नागपुरातलीफार गंगा जमना करून ठेवली.....
या लेखाचा विषय आहे, वाहिनीत काम करणारा गोडबोल्या मंगेश चिवटे,त्याचा भाऊ, राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत आणि त्यांनी वेठीस धरलेली शेतकरी संघटना, सत्य पुढल्या भागात....

Sunday, 10 April 2016

गिरीश ' कुबेर आणि भिकेची डोहाळे ' लागलेला लोकसत्ता :पत्रकार हेमंत जोशी

धडपड करूनहि हवे ते क्रीम पोस्टिंग मिळत नाही, निवृत्त होईपर्यंत आता मिळते आहे त्या पोस्टिंगवर समाधान मानावे असा सारासार विचार लेखक आणि प्रशासकीय अधिकारी विश्वास पाटील यांनी करून सतत सवंग प्रसिद्धीच्या मागे लागलेल्या या नवश्रीमंत प्रशासकीय अधिकार्याने जणू पिंजर्यातल्या मास्तरच्या भूमिकेत शिरून म्हणजे आपण कोण आहोत हे भान विसरून ढोलकीच्या तालावर एकदा पुन्हा त्यांचा मूळ स्वभाव या कार्यक्रमानिमित्ते मराठी जगतासमोर आणला आहे. या कार्यक्रमात नजरेतून किंवा बोलण्यातून आपण या राज्याचे जबाबदार प्रशासकीय अधिकारी आहोत, याचे त्यांना विस्मरण होत असावे. खरे आहे ते, माणूस कुठेही असला किंवा बसला तरी आपला मूळ स्वभाव, शरीरात भिनलेली वृत्ती कधीही विसरत नाही, कुत्राच्या शेपटीसारखे ते असते. मागे एक चुटका तुम्हाला सांगितला होता कि शहरातल्या पोरी एकदम चालू अशी खुणगाठ मनाशी बांधलेला तरुण एका खेड्यातल्या तरुणीशी लग्न केल्यानंतर जेव्हा हनिमून साजरा करण्यासाठी तिला काश्मीरला नेतो, ७-८ दिवस तेथे मजेत घालविल्यानंतर ती त्याला विचारते, आपण सारे काही बघितले पण तुमचे ते हनिमून काय ते बघितलेच नाही, तिच्या या इनोसंट वाटलेल्या प्रश्नावर तो तिला म्हणतो, अग, रात्री जे काय चालायचे ना, त्यालाच हनिमून म्हणतात, आणि हे ऐकताच ती फिदी फिदी हसत म्हणते, आधीच सांगायचं कि, मी अन गावचा अनंत पाटील शेतात भेटलो कि हेच...थोडक्यात माणसाची वृत्ती त्याच्या वागण्यातून नेहमी उमटते, तो कुठेही पोहोचला तरी. लोकसत्ता या राज्यातले मोठ्या खपाचे मोठे दैनिक आहे, त्याचा वाचकवर्ग मोठा आहे, लोकसत्तेत छापून आलेल्या बातमीचा हवा तो परिणाम साधल्या जातो. वयानुपरात्वे अनेक संपादक या वृत्तपत्रात आले, निवृत्त झाल्यानंतर नवीन आले. त्या त्या संपादकांचे विश्वास पाटील यांच्यासारखे होते म्हणजे अंगात त्यांच्या जे गुण अवगुण होते, ते त्यांच्या लिखाणातून उतरायचे आणि त्यांच्या त्या वृत्तीनुसार लोकसत्ता दैनिकाचे रूप रंग बदलायचे अर्थात ते अपेक्षितच असते, सोडून गेलेला जुना प्रियकर हुबेहूब नवीन प्रियकरासारखा कसा असेल...? म्हणजे उद्या समजा 

चौफुल्याच्या नंदाबाई जवळकर लोकसत्तेच्या संपादक झाल्या तर नक्कीच त्या, लावणी आणि लावणीच्या नादि लागून बरबाद झालेले अनेक कसे श्रेष्ठ, मराठी माणसाला आपल्या लिखाणातून जवळकरबाई नक्कीच पटवून देतील किंवा समजा सुनील तटकरे उद्या या वृत्तपत्राचे संपादक झालेत तर लोकसत्ता दैनिकातून वारंवार अशा माणसांना प्रसिद्धी देण्यात येईल कि जे काळ्या पैशांच्या माध्यमातून नवश्रीमंत झाले आहेत. अर्थ असा कि जेव्हा लोकसत्तेचे संपादक अरुण टिकेकर होते तेव्हा हे दैनिक वाचतांना अनेकांना अनेकदा असे वाटायचे कि कोणीतरी आपल्याला सुनील शेट्टीचा डोक्यावरून गेलेला ' भाई भाई ' सिनेमा बघायला बसविलेले आहे किंवा माधव गडकरी संपादक असतांना महिन्यातून एखादी भानगड तरी ते बाहेर काढतील, ठरलेले असायचे, कुमार केतकर संपादक असतांना लोकसत्तेचा लोगो एकदिवस हाताचा पंजा होतो कि काय, अनेकांच्या मनात तशी पाल चुकचुकून जायची. सध्या गिरीश कुबेर लोकसत्तेचे संपादक आहेत, त्यांची लेखणी अर्थ विषयाकडे कायम झुकलेली असते. व्यापार, अर्थकारण असे बोजड विषय त्यांच्या आवडीचे, आणि आपल्याला जे आवडते तेच मराठी वाचकांना आवडायला हवे, असे कुबेरांना वाटत असावे. जसे पिणाऱ्या माणसाला वाटते, समोर बसलेल्या माणसाने देखील घ्यावी....स्वाभाविकपणे लोकसत्ता दैनिकाचे हे हिटलरछाप संपादक दररोज न चुकता त्यांच्या आवडीचे ' अर्थकारण ' लोकसत्तेची अनेक पाने वापरून वाचकांवर लादतात, इतरही विषय ते मांडतात पण असे विषय म्हणजे दारूच्या बाटलीसोबत चार पाच शेंगदाणे घेऊन बसल्यासारखे....

लोकसत्ता त्यामुळे बहुतेक वेळा बोजड, डोईजड, डोक्यांवरून जाणार्या विषयांना वाहून घेतलेले वृत्तपत्रे अलीकडे कुबेर संपादक झाल्यानंतर वाटू लागलेले आहे, विशेष म्हणजे कुबेर यांचा चेहरा जसा कायम आक्रस्ताळा वाटतो तसे त्यांचे लिखाण देखील म्हणजे असे वाटते कुबेर विनाकारण अमुक एखाद्या व्यक्तीवर किंवा विषयावर तुटून पडलेले आहेत. त्यांचा नेमका स्वभाव कस वाटतो त्यावर फार पूर्वी उद्धव ठाकरे यांचे अलिकडले ' नार्वेकर ' हर्शल प्रधान यांने सांगितलेला एक चुटका सांगतो...अमुक एखादी व्यक्ती जर निर्जन ठिकाणी ठेवली तर त्या व्यक्तीमध्ये कसे कसे बदल घडतात त्यावर अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांना अभ्यास करायचा असतो म्हणून ते तीन वेगवेगळ्या पुरुषांना समुद्राच्या मध्यभागी एका निर्जन बोटीवर ठेवायचे असे ठरवितात. ठरल्याप्रमाणे ते पहिल्या माणसाला सांगतात, सहा महिने त्या बोटीवर राहतांना तुला काय हवे आहे, तो म्हणतो, खूप खूप खायला ठेवा, त्याची मागणी मान्य केली जाते, त्याला त्या निर्जन ठिकाणी असलेल्या बोटीवर ठेवून बोटीचे दर बंद करून शास्त्रद्न्य परत फिरतात, सहा महिन्यानंतर जेव्हा बोटीचा दरवाजा उघडल्या जातो, तो माणूस अगदी जाडजूड होऊन बाहेर पडतो. नंतर दुसर्याला विचारतात, तुला काय हवे आहे, तो म्हणतो, मला दारू हवी आहे, त्याचीही इच्छा पूर्ण करण्यात येते, सहा महिन्यानंतर जेव्हा बोटीचे दार उघडल्या जाते तेव्हा अतिशय खंगलेल्या अवस्थेत तो माणूस बाहेर पडतो कारण दारू ढोसून ढोसून त्याचे लिव्हर निकामी होते आणि तो खंगतो. शेवटी तिसर्या व्यक्तीला विचारल्यानंतर तो म्हणतो, अपुनको तो सिगारेट्स मंगता है, त्याचीही इच्छा पूर्ण करण्यात येते, सिगारेट्सचे कित्येक कार्टून्स त्या बोटीवर ठेवल्यानंतर त्याला आता ढकलून दरवाजा बंद करण्यात येतो, सहा महिने उलटल्यानंतर जेव्हा बोटीचा दरवाजा शास्त्रद्न्य उघडतात, बाहेर आलेला तो माणूस जवळच पडलेला एक लोखंडी रॉड हातात घेऊन शास्त्रज्ञांना बडवायला लागतो. ते विचारतात, आम्हाला का मारतो आहेस त्यावर मारता मारता तो म्हणतो, बोटीवर माचीस, आगपेट्या का ठेवल्या नाहीत हरामखोरांनो...? हा असा वैतागला माणूस मला सांगा तुम्हाला त्या गिरीश कुबेर यांच्यात दिसत नाही का....कायम चिडलेले, जणू प्रेयसी दुस्र्यासंगे पळून गेलेली आहे असा चेहरा करून बसलेले ते वाटतात. आपण तेवढे चांगले, शुद्ध, क्लीन, नीट, सरळमार्गी आणि उरलेले अख्खे मराठी विशेषत: राजकारणी एकदम वाईट, असा काहीसा अपसमज करून ते दिवसभर वावरतात, असे नाही का वाटत गिरीश कुबेर यांच्याकडे बघितल्यानंतर....


कुबेर आणि भिकेचे डोहाळे लागलेला लोकसत्ता २ : 
बबनराव नावाचे एक नेते आहेत, त्यांनी दारू सोडली, सिगारेट सोडली, चिकन-मटन खाणे सोडले थोडक्यात कुठलेहि अभक्ष 
भक्षण करणे सोडले, सगळ्या वाईट गोष्टी सोडल्या...कुणासाठी, 
आईसाठी..........नाही,
बापासाठी..........नाही, 
बायकांपासून झालेल्या मुलांसाठी.....नाही, नाही...
पहिल्या बायकोसाठी..........नाही, 
दुसर्या बायकोसाठी..........नाही,
मग काय..........
मुंबईत नव्याने ठेवलेल्या बाईसाठी..........अजिबात नाही.
मराठवाड्यातल्या गर्लफ्रेंड साठी.........शक्यच नाही.
मग कोणासाठी..........
.....
.....
.....
.....
.....
फक्त आणि फक्त 
मुळव्याधीसाठी..........!! 
थोडक्यात, 
जिभेचे चोचले बुडाला टोचले...


तसेच लोकसत्ता दैनिकाचे लोकप्रिय ठरलेले होते ते रुपडे बदलवून जेथे तेथे फक्त आणि फक्त अर्थकारण, असे सामान्य मराठी माणसाला न रुचणारे, मनापासून अजिबात न आवडणारे रुपडे कुबेर संपादक म्हणून येताच कोणासाठी बदलविण्यात आले,वाचकांसाठी....

नक्कीच नाही, केवळ आणि केवळ दस्तुरखुद्द गिरीश कुबेर यांना त्या विषयाची आवड आहे म्हणून....
नशीब आमचे, कुबेर यांना नाच गाणे, लेडीज बार, तमाशे इत्यादी वाईट ठरलेली व्यसने नाहीत किंवा या अशा विषयात त्यांना 
रस नसावा, अन्यथा....
शासनाने दिलेला मोक्याचा भूखंड नेमक्या कारणासाठी म्हणजे केवळ वृत्तपत्र चालविण्यासाठी न वापरता, त्या भूखंडाचा मतलबी वापर करणारे, त्यातून महिन्याकाठी करोडो कमाविणारे आम्ही मराठी वाचक ' गोयंका ' नाहीत, त्यामुळे सतत अर्थकारण डोक्यात न ठेवता, आमचा कल बौद्धिक भूक भागविण्याकडे असतो, त्यामुळे लोकांचे हे वृत्तपत्र आता केवळ गोयंका छाप वृत्तीच्या शेठजी लोकांसाठी हल्ली हल्ली छापल्या जाते कि काय, मनास शंका येऊ लागलेली आहे....केतन तिरोडकर यांच्यासारखा एखादाच बेधडक RTI Activist न्यायलयात किंवा शासकीय दरबारी विचारण्याची हिम्मत ठेवेल कि या राज्यात विशेषत: मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यात शासनाने जे मोक्याचे भूखंड, वृत्तपत्र चालविणाऱ्या विविध शेठजी वृत्तीच्या, असे अर्थात काही मराठीतले देखील शेठजी वृत्तीचे आहेत, तेही येथे स्पष्ट करतो, वृत्तपत्र मालकांना शासनाने अल्प दरात उपलब्ध करून दिले होते, आज नेमके त्या जागेवर काय चालते म्हणजे फक्त आणि फक्त तेथे वृत्तपत्राचे कार्यालय आहे कि ज्या कारणासाठी हे भूखंड देण्यात आले होते ते कार्यालय कुठेतरी स्वस्त जागेत स्थलांतरित करून शासनाने स्वस्तात उपलब्ध करून दिलेल्या भूखंडांवर वृत्तपत्र मालकांनी बक्कळ पैसा मिळवून देणार्यांना अशा जागा भाड्याने दिल्या आहेत.....माझी माहिती तर अशी आहे कि काही वृत्तपत्र मालकांनी शासनाने दिलेले भूखंड बिल्डर्स मंडळींना विकून त्यातून करोडो रुपये पदरात पडून घेतलेले आहेत....!! बघूया नेमक्या विषयाची हिंट दिल्यानंतर कोण असा मायचा लाल पुढे येउन या अशा वृत्तपत्र मालकांना तुमची नेमकी जागा कोणती, दाखवून मोकळा होतो...दुसर्या सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण किंवा स्वत: फाटकी चड्डी नेसून, इतरांना न चुकता, तुझी फाटकी तुझी फाटकी, सांगत फिरतो, त्याला अलीकडे, मला वाटते एखाद्या वृत्तपत्राचा मालक किंवा संपादक म्हटल्या जाते. इतरांनी फक्त वाईट धंदे करावेत आणि वृत्तपत्रात काम करणार्यांनी ते करू नयेत असे मी अजिबात म्हणणार नाही पण एखादा गुंड जसे कबुल करतो कि होय, मी गुंड आहे तसे वृत्तपत्रात काम करणाऱ्या मंडळींनी देखील सांगून टाकावे कि होय, आम्ही वाईट वृत्तीची माणसे आहोत तरीही आम्ही तुम्हाला ज्ञान पाजणार आहोत म्हणजे विषय संपतो....

आमच्या वृत्तपत्र सृष्टीत आबा माळकर किंवा भाऊ तोरसेकर यांच्यासारखे बोटावर मोजण्याएवढे जे काही निरपेक्ष वृत्तीने पत्रकारिता करतात, अशा मंडळींकडे देखील अनेकदा उगाचच संशयाने बघितल्या जाते थोडक्यात पूर्वी फोर्हास रोडवर राहणाऱ्या चांगल्या घरातल्या स्त्रियांकडे देखील जसे संशयाने बघितल्या जायचे किंवा या परिसरात राहणाऱ्या घरंदाज घरातल्या मुलींचे लग्न जुळवतांना त्यांच्या मायबापाला जो मानसिक त्रास विनाकारण व्हायचा ते तसे आमच्यातल्या अनेकांचे या अशा ढोंगी प्रवृत्तीमुळे होते. जसे पतंगराव कदम यांनी हो, मला दोन तीन बायका आहेत, अगदी जाहीर सांगून देखील त्यांना मतदारांनी वर्षानुवर्षे निवडून दिले, लोकमान्य नेता अशी लोकप्रियता त्यांना मिळाली किंवा डी वाय पाटील देखील दोन दोन बायका करून या देशात राज्यपाल झाले तसे आमच्यातल्या बद्माशांनी अगदी जाहीर सांगून मोकळे व्हावे कि आम्ही वाईट आहोत तरीही आम्ही तुम्हाला ज्ञानाचे डोस पाजणार आहोत, आम्ही मराठी वाचक मनाने सुधृड आहोत, तुमची वाईट वृत्ती खपवून घेऊ वरून तुमच्या लिखाणावर फिदा राहू पण तुम्ही ढोंग पांघरून वरून उगाच डांगोरा पिटत फिरू नका, लोकसत्ताच्या गोखले आडनावे संपादकाला दोन बायका होत्या तरीही ते संपादक, मला वाटते, आजतागायत झालेल्या संपादकांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय होते.आम्ही चांगले आहोत, असा विनाकारण डांगोरा पिटत राहू नका, तुम्ही आहात तसे स्वीकारायला मराठी वाचक तयार असतो. लोकमत दैनिक सर्वाधिक खपाचे आहेच कि. सज्जन आहोत, खोटे सांगू नका, सब्कुछ दिखता है....या अशा बाबतीत मला निखिल वागळे यांची भूमिका कायम पटत आलेली आहे म्हणजे मी स्वत: असो किंवा भाऊ तोरसेकर यांच्यासारखा निर्भीड वृत्तीचा पत्रकार, अनेकदा आम्ही वागळे यांची त्यांनी आयुष्यात केलेल्या चुकांवर खिल्ली उडवलेली आहे किंवा नेमक्या चुका सपुरावा वाचकांसमोर मांडल्या आहेत, पण आमचे सत्य लिखाण वागळे यांनी आजतागायत कायम अतिशय खिलाडू वृत्तीने स्वीकारले, लोकांचे दोष कायम उघड करणारे निखिल त्यांची उघडी पडली म्हणून कधीही अस्वस्थ होतांना दिसले नाहीत. नीलकंठ खाडिलकर यांनी देखील कधी इन्कार केला नाही कि ते बातम्या छापण्याचे पैसे घेत नाहीत, तरीही नवाकाळ टिकून आहे, लोकांना कळते, वृत्तपत्र चालविण्यासाठी पैसा लागतो, फक्त त्यांना ढोंगी पत्रकार रुचणारे नसतात, त्यांचा मग ' मोतेवार ' होतो. तोंडात विष्ठा ठेवून श्रीखंड चघाळतोय, सांगत फिरू नये, वास्तव सांगावे...

Friday, 8 April 2016

व्यक्तिविशेष २ : डॉ. रणजीत पाटीलमी शाळेत असतांना जरा अतीच होतो, अजूनही आहेच, पण तेव्हा मला आठवते त्याप्रमाणे शाळेतला, गावातला, कदाचित 
पंच्क्रोशीतला सर्वाधिक आगावू विद्यार्थी म्हणून माझी अगदी सहज गिनीज बुकात नोंद झाली असती. मला पंडितराव पुराणिक म्हणून शिक्षक होते, आता ते निवृत्त आहेत. माझ्या आगावू स्वभावाचे आणखी एक गुपित सांगतो, मी पत्रकार म्हणून अभिनेता गोविंदासारखे वागलो, म्हणजे गोविंदाने काय केले, त्याने स्वत:चा असा अभिनय कधी केलाच नाही, त्याने इतर नावाजलेल्या, गाजलेल्या अभिनेत्यांची सतत हुबेहूब नक्कल केली, आणि तो प्रचंड यशस्वी झाला, मी पण तेच केले, 
ज्यांच्या मी जवळून या ना त्या निमित्ताने संपर्कात आलो किंवा किमान त्यांनी केलेले लिखाण वाचले त्या सर्वांची म्हणजे भाऊ तोरसेकर, अनिल थत्ते, व.पु. काळे आणि आचार्य अत्रे यांच्या लिखाणाची, इत्यादी मान्यवर लेखकांची भ्रष्ट नक्कल केली आणि माझी गाडी निकल पडी. हे सारे लिखाणातले ' दिलीपकुमार ' होते, मी ' राजेंद्रकुमार ' झालो, आणि तुम्हाला ते ठाऊक आहेच, दर्शक राजेंद्रकुमारच्या सिनेमाला  अधिक गर्दी करायचे.....एका महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो, मला जे वाटते ते तुम्हालाही वाटते का,बघा, म्हणजे मला असे वाटते माझे जे अतिशय बुद्धिमान आई वडील होते,ते आज हयात नाहीत पण माझ्यासारख्या अल्पशिक्षित मुलाकडून ते वर स्वर्गात बसून लिहून घेत असावेत, अन्यथा जेमतेम दहावी पास माणसाला, विविध संदर्भ घेऊन उभ्या राज्याशी लिखाणातून पंगा घेणे अशक्य आहे. 
नक्कीच आई वडिलांची अद्भुत शक्ती तुमच्याकडून त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करवून घेत असावी, तुमचे मत अवश्य कळवा...तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, आचार्य अत्रे यांचे दोन नातू माझे फेस बुक फ्रेंड्स आहेत, त्यातले एक हर्ष देशपांडे तर अमेरिकेतले अत्यंत यशस्वी उद्योजक आहेत. अशी माणसे फेसबुक वर जरी फ्रेंड्स असलीत तरी वेगळे समाधान मनाला मिळते, आतून आनंद होतो....ज्यांची ज्यांची मी लिखाणात भ्रष्ट नक्कल करतो त्यातलेच एक माझे वर उल्लेख केलेले शिक्षक, श्रीयुत पुराणिक सर, आता ते जवळपास ८० आहेत पण मी त्यांच्या संपर्कात असतो, वडिलांशी गप्पा मारल्याचे समाधान मिळते. सर मला इंग्रजी शिकवायचे, एकदा मला त्यांनी विचारले, ज्या माणसाला ऐकू येत नाही, त्याला तू काय म्हणशील...? मी पडलो आगावू, पटकन उत्तरलो, काहीही म्हणा सर, त्याला कुठे ऐकू येते.....? याठिकाणी माझे दुसरे एक शिक्षक गोविंद देशपांडे असते तर त्यांनी माझा कान बधिर होईपर्यंत मारले असते पण पुराणिक सर स्वत: देखील विनोद सांगता सांगता अमुक एखादा धडा सोपा करून शिकवायचे, माझ्या या उत्तरावर ते दिलखुलास हसले आणि इतर विद्यार्थीही....अलीकडे खूप दिवसानंतर पुराणिक सरांना फोन केला असता ते म्हणाले, आपल्या शिक्षण संस्थने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली आहे आणि तालुक्यात गाजते आहे, खूप विद्यार्थी आहे, राज्यमंत्री रणजीत पाटील आमच्या पाठीशी उभे राहिले नसते तर हि शाळा उभी करणे कठीण गेले असते, मी मनोमन सुखावलो आणि मनातल्या मनात रणजीत पाटलांना धन्यवाद, अगदी मनापासून दिले. कारण आमच्या शाळेला आणि ती देखील रणजीत पाटीलांची मदत, हि बाब तशी एरवी मनाला फारशी हजम करणारी ठरली नसती कारण शाळा संघाची वरून बामणांची, आज जरी रणजीत, पाटील भाजपामध्ये असलेत तरी त्यांच्या घराण्याचा मूळ पिंड कॉंग्रेसचा, त्यामुळे सहसा अमुक एखादा कॉंग्रेस विचारांचा पाटील फारशा आस्थेने आमच्या शिक्षण संस्थेकडे बघत नसतो, पण रणजीत पाटील हे उच्चशिक्षित व्यक्तिमत्व त्यापलीकडे विचार करणारे, त्यांची आमच्या शाळेला त्या उदात्त विचारातून मदत झाली, त्यांचे आमच्या गावावर उपकार झाले....अमुक एखादे मंत्रिमंडळ नव्याने अस्तित्वात आले कि साधारणत: पहिल्या सहा महिन्यांत माझ्या ते लक्षात येते, मुख्यमंत्री नेमका कसा आहे आणि मंत्रिमंडळातील कुठल्या सदस्याचे काय भवितव्य असेल, आणि माझे अंदाज कधीही चुकलेले नाही, चुकत नाहीत, रणजीत पाटील हे अत्यंत, सर्वाधिक यशस्वी राज्यमंत्री असतील हे मी तुम्हाला पहिल्या सहा महिन्यातच लेखी म्हणालो होतो. नेमके घडले देखील तसेच, रणजीत पाटील राज्यमंत्री असूनही अतिशय लोकप्रिय आहेत, त्यांची काम करण्याची वेगळी अशी पद्धत आहे, जी सर्वांना भावते म्हणून त्यांच्याकडे लोकांचा, अडचणीत सापडलेल्या कार्यकर्त्यांचा, सर्व पक्षातल्या आमदारांचा, विविध विचारांच्या राजकीय नेत्यांचा, अडचणीत सापडलेल्या गावाकडल्या अगदी खेडूत लोकांचा, अधिकार्यांचा, प्रत्येक, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळीचा अक्षरश: अवती भोवती लोंढा असतो, ते कुठेही असोत म्हणजे अकोल्यात त्यांच्या घरी किंवा कार्यालयात, येथे मंत्रालालयात किंवा त्यांच्या मुंबईतल्या घरी, किंवा अमुक एखाद्या जाहीर कार्यक्रमात, थोडक्यात रणजीत पाटील नजरेला पडले रे पडले कि त्यांच्या सभोवताली भीड इकठ्ठा होते,सतत सर्वसामान्य लोकांचा देखील गराडा असतो, शेवटच्या माणसाचे समाधान होईपर्यंत न थकता, न थांबता, रणजीत पाटील जातीने प्रत्येकाला अटेंड करतात आणि समाधान झाले कि चहा पाजून म्हणजे वर्हाडी आदरातिथ्य करून घरी जा आता, सांगतात. अनेकदा हे बघतांना असे जाणवते कि एखाद्या दिवशी रणजीतबाबू यांच्याकडे काम करणारे श्रीमान म्हस्के, चव्हाण, रुमाले इत्यादी कर्मचारी, अधिकारी बेशुध्द पडतात कि काय, कारण रणजीत पाटील यांना अंगात जणू समाजसेवा करण्याचा दैवी उत्साह संचारला आहे आणि तो त्यांच्या स्टाफच्या देखील अंगात शिरलेला असावा, त्यांना वाटत असावे, त्यातून ते त्यांच्याकडून देखील प्रचंड सहकार्याची अपेक्षा करतात आणि त्यांचा स्टाफ देखील अपेक्षाविरहित मिठाला जागतो....रणजीत पाटील हे तसे अकोला विदर्भातले अतिशय गाजलेले आणि नावाजलेले अस्थिरोग तद्न्य, त्यांची दररोजची डॉक्टर म्हणून प्रक्टिस काही लाखात असायची, पण त्यांच्या डोक्यात समाजसेवेचा किडा घुसला आणि सुखाचा जीव या अशा कटकटीत टाकून त्यांनी डॉक्टरी व्यवसायावर लाथ मारली, राजकारणात आले येथेही लगेच यशस्वी ठरले, पदवीधर मतदार संघातून निवडून आले, आमदार झाले आणि आता नामदारही...
अपूर्ण :

Wednesday, 6 April 2016

व्यक्तिविशेष १ : डॉ. उदय निरगुडकरआपल्यातले जे कोणी मुंबईत राहायला आहेत, त्यांना गावाकडून आलेल्या पाहुण्यांकडून एक फरमाईश हमखास असते, सिनेमात 

काम करणार्यांना आम्हाला बघायचे आहे....मी तर पत्रकार त्यामुळे आलेल्या, येणाऱ्या पाहुण्यांना वाटते, प्रशांत दामले माझ्या घरी गाद्या घालायला होता, रमेश भाटकर माझ्या घोड्याची देखभाल करायला असावा, सिनेमात येण्यापूर्वी रीमा लागू माझ्या मुलांना शिकवण्या द्यायला येत असावी, काही काम मिळत नसतांना हेलन मला नृत्य शिकवायला येत असावी, वास्तविक असे काहीही नसते म्हणजे राजकारणावर लिहिणाऱ्या पत्रकाराचा तसा चित्रपटसृष्टीशी फारसा कधी संबंध येत नाही आणि मुंबईत राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाचा तर दुरान्वयेही सिनेमात काम करणाऱ्या नटनात्यांशी ओळख नसते, काही काम पडत नाही, त्यामुळे आलेले पाहुणे जेव्हा तुम्हाला विचारतात कि त्यांना सिनेमात काम करणार्यांना बघायचे आहे तेव्हा त्यांना म्हणावे, नटरंग सिनेमात अमुक एका नृत्यात अमृताच्या मागे उभ्या राहून ज्या आठ दहा मुली नाचायला आहेत,त्यातली एक माझ्या ओळखीची आहे, चल, तिची भेट घालवून देतो किंवा तमुक एका सिनेमात शक्ती कपूर जेव्हा अभिनेत्रीवर बलात्कार करतो, बाहेर जे चार पाच गुंड उभे असतात, त्यातल्या एकाला मी ओळखतो, आपण त्याला जाऊन सही मागुया. २४ तास ऑन ड्यूटी या मराठी सिनेमात ज्याने गृहमंत्र्याचा रोल केला आहे, चला त्याला भेटूया, पण येथे तुमची फजिती होणार नाही कारण ती दोन मिनिटाची प्रदीर्घ, आयुष्यातली पहिली आणि शेवटची भूमिका खरोखरी वठवली आहे, पत्रकार उदय तानपाठक यांनी. अर्थात हि अशी उत्तरे दिलीत कि मला नाही वाटत आलेले पाहुणे तुमच्याकडे आग्रह धरतील, नट नट्या दाखवा म्हणून...मित्रहो, तुम्ही अगदीच तरुण असाल तर आजच ठरवा कि एक आकर्षण म्हणून अमुक एखाद्याला बघायचे आहे असे सांगण्यापेक्षा लोकांनी तुम्ही कसे मोठे आहात हे बघण्यासाठी धडपड करायला हवी. राजकीय नेत्यांची पुढली पिढी जेव्हा जेव्हा आपली स्वत:ची ओळख निर्माण करते, मला वाटते तो खरा स्वालंबी नेता आणि त्याचे कामातून मोठे झालेले नेतृत्व. क्षेत्र मग ते कुठलेही असो, बाप से बेटा सवाई ठरावे, बापाची ओळख सांगत फिरण्यापेक्षा तुमच्या कर्मातून बापाची ओळख व्हायला हवी असे तुम्ही कार्य करायला हवे....


तुम्हाला कदाचित माहित नसेल पण शब्दप्रभू, नामांकित, अग्रगण्य, बहाद्दर, बहाद्दूर,वस्ताद, वाकबगार, मुरब्बी, अभ्यासू, शब्द्पंडीत, लोकमान्य, लोकप्रिय, धुरंधर, निष्णात, नावाजलेले पत्रकार श्रीमान कुमार केतकर यांनी या राज्यातल्या विविध वृतपत्रांमध्ये मोठ्या पदावर काम केलेले आहे. विशेषत: त्यांची लोकसत्ता मधली संपादक म्हणून कारकीर्द अविस्मरणीय. ज्या बोटावर मोजण्याएवढ्या मंडळींनी लोकसत्ता वृत्तपत्र गाजवून सोडले त्यातले पहिल्या पाचातले एक श्रीमान कुमार केतकर, येथे त्यांचा उल्लेख यासाठी कि कुमार जेव्हा अमुक एखाद्या वृत्तपत्रातून बाहेर पडतात ते पुन्हा त्या वृत्तपत्रात नोकरी म्हणून पाउल ठेवत नाहीत आणि हा किस्सा त्यांनी स्वत: मला सांगितलेला आहे. त्यांच्या पुढे आणखी एक पाउल त्यांच्या एका प्यारा दुश्मनचे, म्हणाल तर ती व्यक्ती आणि कुमार या दोघात अनेकदा काही तात्विक मतभेद होतात पण त्यांचेही तेच म्हणजे एकमेकात त्यांचे पटत नाही आणि त्यांना एकमेकांशिवाय करमतहि नाही, अजब गजब दोस्ती त्या दोघांची, पण जेव्हा त्या दबंग व्यक्तिमत्वाला एकाचवेळी सिंगापूरला मोठ्या हुद्द्याची नोकरी पकडायची कि येथे मुंबईत आलेली संधी धरून ठेवायची, प्रश्न पडला तेव्हा त्याने बायकोच्याही आधी सल्ला घेतला कुमार केतकर यांचा आणि कुमार त्यांना म्हणाले येथेच राहा, आभाळाला गवसणी घालून येशील, त्यांनी तो सल्ला मानला, कुमार म्हणले तेच खरे ठरले, आज जगातला असा एकही मराठी माणूस, व्यक्ती नसेल जो झी वाहिनीच्या उदय निरगुडकर यांना ओळखत नाही. झी वृत्त वाहिनी जगात अनेक ठिकाणी दिसते आणि आवडीने बघितल्या जात असल्याने जो तो दर्शक हमखास उदय निरगुडकर यांना बघतो, आणि आपोआप हा चेहरा त्या सार्यांच्या लक्षात राहतो, थोडक्यात उदय यांनी आपल्या मित्रांचा सल्ला त्यावेळी ऐकला आणि सिंगापूरच्या एका मोठ्या 

विद्यापीठात चालून आलेले कुलगुरूपद त्यांनी नाकारले, जेव्हा नाकारले तेव्हा झी पेक्षा तेथे त्यांना आणि त्यांच्या डॉक्टर असलेल्या पत्नीला कितीतरी अधिक वेतन मिळणार होते पण आमच्या व्यवसायात उतरलेले हे महाशय म्हणजे सिनेमातले जणू राजकुमार, निरगुडकर म्हणजे स्वत:च्या मस्तीत जगणारा मस्त कलंदर, त्यांनी पैसा नव्हे करिअर कायम महत्वाचे मानले, त्यात त्यांनी आणि त्यांच्या उच्चशिक्षित कुटुंबाने कायम रस घेतला, आज ते एखाद्या सध्या गाडीतून फिरत असतील पण त्यांचे नाव पदरी शंभर गाड्यांचा ताफा ठेवणाऱ्या उद्योग्पतीपेक्षा खूप मोठे आहे, नावाजलेले उदय निरगुडकर खरोखरी एक अफलातून माणूस आहे, त्यांच्याशी बातचीत, गप्पा 

म्हणजे त्या त्या वेळी सापडलेला तो एक खजिना असतो. त्या खजिन्यात जगातल्या विविध अनुभवांचा साठा आहे कारण जेवढे तुम्ही तुमच्या सासरी गेला नसाल त्यापेक्षा कितीतरी अधिकवेळा उदय निरगुडकर यांनी जग पालथे घातलेले आहे, त्यांचे वय फारसे नसले तरी ते एक अनुभव समृध्द असे व्यक्तिमत्व आहे, उदय स्क्रीनवर वयाने काहीशे मोठे वाटतात पण प्रत्यक्षात....कतरिना कैफने जर उद्या त्यांना मागणी घातली तर फारसे आश्चर्य वाटून घेऊ नका, आणि कुमार केतकर असोत कि उदय निरगुडकर किंवा आम्ही स्वत: its God gift आम्ही वयापेक्षा अधिक तरुण दिसतो आणि आहोतही कारण आमचे मन प्रसन्न आहे.....


वर जे मी तुम्हाला म्हणालो म्हणजे उदय हे केतकर यांच्यापेक्षा आणखी काही पावले पुढे, उदय यांनी आजतागायत जगभरात विविध क्षेत्रात काम केलेले आहे, विशेष म्हणजे ते अमुक एखाद्या क्षेत्रातली नोकरी जेव्हा सोडतात, पुढल्या नोकरीचे कामकाज,पूर्णत: भिन्न असते. आमच्या पत्रकारितेत म्हणजे झी वाहिनीचे सर्वेसर्वा म्हणून रुजू होण्यापूर्वी त्यांचे या राजकीय क्षेत्राशी अजिबात देणे घेणे नव्हते, विलासराव जेव्हा त्यांना म्हणाले, वर्षा बंगल्यावर या, तेव्हा उदय म्हणाले, हा बंगलाकुठे आहे, असा हा आयुष्यभर विविध आव्हान स्वीकारून त्यात हमखास यश मिळविणारा अफलातून अत्यंत तल्लख, बुद्धिमान माणूस. सलाम त्याच्या कर्तुत्वाला हजारवेळा....

शिस्त, निर्व्यसनी वृत्ती, सतत नवीन शिकण्याची जिद्द, परमेश्वराने बहाल केलेली तल्लख बुद्धी, हजरजबाबी स्वभाव, बोलण्याची उत्तम कला, टापटीप राहण्याची सवय, माणसे ओळखण्याची शैली, जगभरात कुठेही जाण्याची मानसिकता, मित्र जोडण्याची वृत्ती, इतरांना मनापासून सहकार्य, मदत करण्याची मानसिकता, इत्यादी विविध गुणांच्या भरवशावर जगभरातल्या मराठी माणसात श्रीमान उदय 

निरगुडकर यांना पोहोचणे शक्य झाले. जेव्हा उदय यांनी झी वाहिनीची सूत्रे या क्षेत्रातला शून्य अनुभव असतांना देखील स्वीकारली offtherecord सांगतो, तेव्हा या वाहिनीचे आर्थिक गणित बिघडलेले होते आणि कर्मचार्यांना जेमतेम पगारवर समाधान मानावे लागत होते, उदय आले आणि बघता बघता झी वाहिनी आर्थिक भरभराटीला केवळ उदय यांच्या आर्थिक नियोजनामुळे आली,परवा मला आमचा लाडका सुनील घुमे सांगत होता, निरगुडकरसाहेब येथे रुजू झाल्यानंतर आम्हाला जी वेतनवाढ झाली, निरगुडकर यांनी आमचे हे 

केलेले काम विसरता येणे अशक्य. विशेष म्हणजे जवळपास ८०० कर्मचारी, अधिकारी, पत्रकार आणि इतर येथे काम करतात, त्या सार्यांना निरगुडकर नावानिशी ओळखतात, आवाज देतात, मी म्हणालो तेच खरे, उदय यांची बुद्धिमत्ता, त्यावर करावे तेवढे कौतुक कमी...ह्या चार ओळी त्यांच्यावर पुरेशा नाहीत, मला ठाऊक आहे, म्हणून जेव्हा केव्हा माझ्या लिखाणातून या राज्यातल्या सर्वगुणसंपन्न व्यक्तींचा उल्लेख मी करेन तेव्हा तेव्हा हमखास उदय निरगुडकर हे नाव लिहितांना मला मनापासून आनंद होईल....

In English by Vikrant Joshi


He is the man who after coming 1st in his 12th examination, dint know what to do. He chose Chemistry. Became a Chemical Engineer and today is leading Maharashtra's no 1 channel along with a newspaper. He is a proud grandson of grandfather, who on just one advice from the great Lokmanya Tilak didn't have sugar all his life till he passed away in 1987. He is the man who even at 46, will give any young actor/anchor a run for his money with his sheer enthusiasm about life. He is the man who loves chemistry and knows his reactions even at this age which he learnt in Class 12. He is the man, who came to Mumbai to give his father news about his achievements whilst he graduated from Pune, but as soon as he left for Pune again, his father had left him forever. He is the man who knows many foreign languages, has travelled the world (America 86) a zillion times and whose passport is the size of dictionary. He is man who has changed his career path in 5 Industries; Not before, he mastered them and acquired greatness. He is the man whose son has rejected London School of Economics admission just because it dosen't have a football ground, but has admissions from the top Universities of the World. He is the man who has entries in his personal dairies, whom he met some 10 days ago, what the opposite person as wearing and what were his views on a situation or a person he had spoken about then. He is a record keeper. He has collection of  Indian Classical Music CD's that if you start today, it will get over after 3 years. He has a room full of record 13000 books. When this man speaks even the most powerful person in our State, just listens. He is the man who finally got his Doctorate in 2006 after Mother nature failed it twice. He is the Man to his lady, who is a leading cardiologist in Thane. He is the man who came to NSCI and being a Maharshtrain Brahmin gave a lecture on English classical music to the Christians and Parsis. He is the man who has successfully come in the IT Industry, conquered it and left it at a salary where a normal person even dreams to earn. He has travelled India on roads wherein very few of us might have ever heard of. He is the man, whose family consists of 18 Doctors. He is the man who has dedicated his weekends to the IIM and the IIT's for lecturing. He is the man at the age of 26 travelled to many countries with late Pramod Mahajan not as a political analyst, but as an IT professional. He is the man who was offered a 'job' of a DEAN at Singapore (with a very FAT salary) but one lecture wherein Zee honcho Subhash Goyal attended changed his life. In 2012, the world of Marathi News, which was Wagle dominated got a man with emphatic voice and articulate analysis on Politics. He is none other than Dr. Uday Nirgudkar! Wow!! Is he real??

Yes my friends, he is! Pleasure was all mine when my father asked me on a boring ongoing sessions day at Vidhan Bhavan to come and join me at Zee's office in Worli. I along with dad were meeting Dr. Uday Nirgudkar. I thought it will be a very formal meeting, but I didn't know when the time clock shifted from 5pm to 720pm. Generally when I and dad meet, it is we who take the dominance in speaking, but we were so awestruck by this gentleman's achievements, that we hardly spoke. Shahrukh's FAN movie is about to release. I think more than SRK, of whose I'm diehard fan, my ideologies have changed. Yes, I admit, people of this intelligence and giving nature do exists in this world. Mind you he is selfless! When Doctor took the reigns of this marathi news channel Zee 24 taas, the channel was in doldrums both financially and the content. Today, the channel has topped the charts in terms of TRP's and the salaries of 800 employees, whom by the way doctor knows by names, has increased 3 times. So a great achiever, a scholar, mentor to many and a great philosopher. He believes in bringing in change. Recently when ZEE group acquired DNA in 2007, Doctor was given the responsibility of heading the print also, which he is doing with equal attention. So Maharashtra is not all about film-stars, cricketers, and the scams, it is also about having people like Dr Uday Nirgudkar's in the society. May you grow from strength to strength Doctor!!

Sunday, 3 April 2016

Is Suicide the answer, really??

It's been 2 days since television actress Pratyusha Banerjee ended her life. Being a reporter and in the groups of various networks of social media platforms, only in a couple of hours I had got the news of Pratyusha. Immediately, a close friend of mine, who was very friendly with her once upon a time, called and sobbed like a baby. We spoke for almost 30 minutes that day. He was unconsolable but what he spoke about this 'filmy' people opened flood gates in front of me. Then speaking to various television personalities (yes, they did spill the beans) over two days now gave me a more clearer picture of this "Big Picture" these actors reside in.

Pratyusha was on drugs. Yes, she was depressed. Yes, she was the small town girl who had temper problems. Yes, she was alcoholic. Yes, she sniffed cocaine at parties. Though not a regular, but even one gram a day, that costs Rs. 4000 is enough for you to move into isolation. Fame at 19 with all the adulation brings in an attitude wherein whatever you touch turns gold. As they say, success is easier to get in comparison to the way you  handle it. You should be able to digest Success. Success dosen't mean you are invincible. Today, if you are a part of these circuits cross your heart and tell me, what  all goes in these filmy parties? Alcohol and Cocaine flow as if there is no tomorrow. Women who are 'alone' are are ready to 'mingle' with people whom they think are their career boosters. Men ogle at these 'alone' ladies and try and become super hero's for them for that night. The conversations are all about material in nature. They discuss their brands, make fun of those who carry the first copies and at the end reach the bed with an unknown species. This is the life for them. Now for those who haven't struck the bell, for them, this is all what 'filmy parties' are all about. Now to reach there, you have to compromise. Compromise not necessarily mean sleeping with everyone but it also compromising the ethics and culture you have been bought up with. Coming from a place called Jharkhand in India, wherein forget about holding a cigarette in your hand, talking to elders in a loud voice is being treated as ill mannerism, Pratyusha had gone way ahead. Her parents not living in with her and boyfriend taking the place, sums up the whole thing. I mean, where are we heading? People might argue about the statement I'm making, but hey folks, are you fully westernised yourself? Why do you visit temples and seek blessings, seek karmic advice, when your businesses suffer or your career goes downward? Westerner's don't do this. Period! Don't be hypocrites.

This is a big bubble these actors live in. I just went through a post of actor Ejaz Khan who himself said, he has tried to commit suicide couple of times. Jaju,  a former manager of Priyanka Chopra in today's paper has claimed Priyanka did attempt this more than once. I mean where are these guys heading? Can't depression be just treated as another illness. You can get cured just by medicines.  Gurudutt, Parveen Babi, Jiya Khan, Divya Bharti were all depressed who found solace in one or the other vices. The lifestyle of these filmi people is also not very much understood by me. The main fear these actors live in "fear of identity" in simple words, fear of someone not recognising me if I walk into a room. Why this complex friends? I mean, Ratan Tata who is the biggest and richest business person in our country often travels on weekends to Alibaug from the Gate of India. He stands in the queue and believe apart from one single help, no one accompanies him. He doesn't have this fear of identity. He travels in a boat wherein the most common man is surrounds him. I agree, our Indian minds are tilted more towards a Bollywood or a television celebrity but why don't you learn to handle success, failure or adulation? And mind you, if you think you are the star, just talk to the cameraman, extra's or even the spot boy. He will clear you mind if you think your are successful on your own. I'm really planning to write to this NGO's, Police and social groups as to start am agitation on these television and bollywood parties. You will be surprised to know how many skeletons come out of this closet. You will see, whom you feel are actors how they beg for that one gram of cocaine and one last peg of that scotch. Another example to cite is that of Bollywood actor Hrithik Roshan. Hasn't he made a mockery of himself in the papers? Allegedly, the whole group of Hrithik, his ex-wife Sussane, current flame Kangana Ranaut, papa Roshan, friends Arjun Rampal his wife Mehr Jessai, and all the other names are into drugs. Papa Roshan, Jeetendra and Rishi Kapoor are well known in hotel Sun-N-Sand for things which you haven't even imagined they can do at this age. 

Small time actors struggle through out their often compromising on their family and trying to make it big in this game. Pratyusha was amongst them. She was broke. Her fame didn't allow her to do regular jobs. Not fame, her ego I could say. So no money flowing in. Allegedly the boyfriend who is now in the custody, was not willing to share the little money they got for doing a series called "Power Couple" (which also saw Arbaaz's and Mailaka's skeletons coming out of the closet). This led to fights and the ex flame of Pratyusha's boyfriend just added fuel to the fire. But not all is that bad or not everybody is an addict in this industry. I mean, I only can point out to Akshay Kumar who single handedly is fighting the reigning Khan's for decades now and still remains to be at the top. Oh that reminds, just try and get into a party which Salman Khan hosts or throws on sets. You will hate him after that. This is not the end, my friends. Till there is a fight for fame and fear of identity in the minds of these actors, suicides will continue. Pratushya just gave up. 

 

कडू आणि कटू सत्य: पत्रकार हेमंत जोशी


विदर्भ अचलपूर मतदारसंघातल्या वसुधाताई देशमुख २००५ दरम्यान लागलेल्या विधान सभा निवडणुकांआधी या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राज्यमंत्री होत्या. त्यांचे अचलपूर मतदार संघात चांगले काम होते, त्या विधानसभा निवडणुकीत पराजित होतील असे मतदारांना अजिबात वाटत नव्हते पण एक दिवस निवडणुकीपूर्वी मला त्या म्हणाल्या, यावेळेची निवडणूक मला खूप काम करूनही कठीण जाईल असे वाटते कारण आमच्या भागात बच्चू कडू याची एखाद्या 
फिल्मी हिरोसारखी लोकप्रियता आहे, त्याचा धाडसी स्वभाव या मतदार संघात आकर्षणाचा विषय ठरला आहे, नेमके घडलेही तेच, प्रचंड काम करूनही वसुधाताई त्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्या आणि बच्चू कडू केवळ तरुण मतदारांच्या भरवशावर निवडून आले, आमदार झाले.धाडस नेमके कोठे आणि कसे वापरावे याचे देखील एक तंत्र असते आणि ते तंत्र अत्यंत संयमाने वापरावे लागते, जेव्हा केव्हा आम्ही त्या मंत्रालय किंवा शासकीय कार्यालयात जातो, तेथले वातावरण बघून मनस्वी राग, संताप येतो, खरेच मनाला वाटते, कानाखाली आवाज काढावा पण अमुक एखाद्याशी वाद घालणे किंवा खडसावून बोलणे वेगळे आणि शिव्या देणे किंवा मारहाण करणे अगदी वेगळे, कायदा हाती घेणे केव्हाही अयोग्य, जो अलीकडे कडू यांनी हाती घेतला, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भाऊराव गावित यांना मारहाण केली. विशेष म्हणजे गावित हे मुख्यमंत्री कार्यालयातच बसतात, जर तेथेच अधिकारी असुरक्षित असेल तर इतर ठिकाणी वातावरण केवढे दहशतीचे असेल?आमदार बच्चू कडू यांनी गावित यांना मारहाण करून मोठी चूक केली कारण गावित यांना मी अतिशय जवळून ओळखतो, वास्तवात गावित हे तसे अतिशय शांत स्वभावाचे पण तेवढेच कणखर अधिकारी, व्यक्तिमत्व. ते जेव्हा शांतपणे उत्तर देतात तेव्हा त्यांच्या देहबोलीवरून उगाचच वाटते, ते उद्धट उत्तरे देत आहेत, पण तसे अजिबात नसते, भेटणाऱ्या प्रत्येक अगतिक असतो, कारण गावित यांचे टेबल हे असेच महत्वाचे आहे, सहज शक्य असेल तर गावित नक्कीच 
अमुक एखाद्याला सहकार्य करतात पण अगदीच नियमबाह्य असेल तर समोरचा कितीही मोठा असला तरी ते आपल्या भूमिकेवर ठाम असतात, म्हणून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील अगदी मनापासून आवडतात...मी गावित यांना अगदी जवळून यासाठी ओळखतो कि गेली दहा वर्षे एका मिशनवर आम्ही सारे जणू एकत्र लढत होतो म्हणजे गावित, मी, माझ्यासारखे आणखी एक दोन RTI ACTIVIST आणि मुख्यमंत्री आणि ते मिशन होते, वर्षनुवर्षे विविध मंत्र्यांकडे ठाण मांडून बसलेल्या स्टाफची हकालपट्टी करणे, त्याना त्यांच्या नेमक्या खात्यात पाठवून देणे, आणि हे अतिशय कठीण असे काम जर भाऊराव गावित यांच्यासारखा खंबीर, धाडसी, जिगरबाज, आमिषांना बळी न पडणारा अधिकारी नसता तर कधीच शक्य झाले नसते त्यामुळे गावित यांना कडू यांच्याकडून मारहाण झाल्यानंतर हाकलल्या गेलेले आजी माजी मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक, खाजगी सचिव, विशेष कार्यकारी अधिकारी आणि इतर स्टाफ मनापासून खुश झाला असेल, त्यांनी पेढे वाटले असतील....आजी माजी मंत्र्यांकडे काम करणारा कोट्याधीश झालेला स्टाफ काढणे तसे अतिशय कठीण असे काम होते, ते कोणालाही दाद देत नसत, हे शक्य झाले कारण देवेंद्र फडणवीस यांनी गावित यांच्या मागे कणखरपणे उभे राहून त्यांना हिम्मत दिली, तोलामोलाची साथ दिली.....अर्थात एवढे कठीण असे काम करूनही विविध छुप्या मार्गाने काढल्या गेलेले अनेक आजही पुन्हा विविध मंत्र्यांकडे घुसलेले आहेत, त्यातल्या अनेकांना ना जनाची, ना मनाची, केवळ पैसा खोर्याने ओढणे, हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. एकदा तर गावित यांना रांडदिवे का रणदिवे आडनावाच्या विविध आमदार, मंत्र्यांकडे अगदी उघड दलाली करणाऱ्या पिएने सरळ सरळ तब्बल एक कोटी रुपयांची लालूच दाखविली होती, अर्थात जो पिए दररोज विविध शासकीय अधिकार्यांना न चुकता लेडीज बार मध्ये नेतो, पंचवीस तीस हजार रुपये त्यांच्यावर उधळतो, त्याला आपले पद टिकविण्यासाठी एक कोटी रुपये म्हणजे वेटरला टीप देण्यासारखे होते पण गावित कधीही कुठल्याही अमिषाला बळी पडले नाहीत म्हणून मुख्यमंत्री विविध आजी माजी मंत्र्यांकडील माजोरड्या,भ्रष्ट, व्यसनी शासकीय कर्मचार्यांना, अधिकार्यांना त्यांच्या ओरिजनल खात्यात पाठविण्यात यशस्वी ठरले, हि मेहनत आणि हे यश नक्कीच गावित यांचे. एकदा तुम्ही गावित यांना भेटून विचारा, आपले मंत्र्यांकडे असलेले स्थान टिकविण्यासाठी त्यांना कोणी कोणी आणि किती देऊ केले होते, ऐकून तुम्ही तोंडाचा आ वासाल, आश्चर्याने तोंडात बोटे घालाल....एका सच्च्या आणि लढवू, धाडसी अधिकार्याला जर त्याच्या प्रामाणिक कामाची हि अशी मारखावू पावती मिळणार असेल तर मला नाही वाटत, गावित यापुढे फार काळ त्या आव्हान देणाऱ्या पदावर काम करतील, ते बदली करवून घेतील आणि शांत जीवन जगतील. बच्चू कडू अमुक एखाद्या प्रामाणिक सरकारी कर्मचार्यासाठी गावित यांच्याकडे गेले असते तर कदाचित कडू यांना लोकांची सहानुभूती मिळाली असती पण ज्या अशोक जाधव यांच्या स्वत:च्या मालकीच्या सदनिका मुंबई शहरात आहेत, त्या सदनिका भाड्याने देऊन जाधव जेव्हा शासकीय वसाहतीत राहण्याचा चुकीचा आग्रह धरतात, अशावेळी कडू यांनी गावित यांच्या नव्हे तर जाधव यांच्या थोबाडात ठेवून द्यायला हवी होती. अत्यंत महत्वाचे म्हणजे जाधव यांचा दुरान्वयेहि कडू यांच्या अचलपूर मतदार संघाशी संबंध नसतांना त्यांना जाधव यांच्यावर एवढे प्रेम का उतू यावे, मनात संशय निर्माण होतो. मला हे कळतनाही अनेक आमदार आपला मतदार संघ सोडून इतर दुरदुरच्या मतदार संघातल्या लोकांची कामे मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांकडे का घेऊन जातात, मंत्री आणि मुख्यमंत्री जे काय समजायचे समजतात आणि कुत्सित हसून अशी कामे इच्छा नसतांना देखील करून देतात, त्यावर अपवाद फडणवीस किंवा दिवाकर रावते यांच्यासारखे, मतदार संघ सोडून घेऊन आलेले काम बघताच मुख्यमंत्री, परिवहन मंत्री किंवा अगदीच एक दोन मंत्री असे काही त्या आमदाराला धारेवर धरतात कि विचारू नका, त्यावर आमदार 
बोंडे तुम्हाला मनातले सांगतील.....

जातीने ब्राम्हण आणि वृत्तीने रावण: भाग ३--पत्रकार हेमंत जोशी


जगभरातील माझे मराठी वाचक मित्रहो, आधी अत्यंत महत्वाची अशी सूचना तुम्हाला करतो तदनन्तरच पुढल्या लिखाणाला सुरुवात करतो. सूचना अशी कि, दिवसातून किमान आठ दहा माणसे मला अशी भेटतात कि जे मला त्यांच्या भ्रमणध्वनीवर टेप केलेले इतरांचे बोलणे पुरावा म्हणून ऐकवून दाखवतात. माझी आई मला सर्वश्रेष्ठ होती, तिची शपथ घेऊन सांगतो, सतत ३६ वर्षे मी या अशा आक्रमक पत्रकारीतेत आहे पण कधीही पुरावा म्हणून कुठल्याही व्यक्तीचे बोलणे मी टेप करून ठेवलेले नाही, अमुक एखादा तुमच्याशी अत्यंत विश्वास ठेवून बोलत असतो, आणि तुम्ही त्याचे बोलणे आधी टेप करून ठेवता आणि 
नंतर तेच बोलणे भांडवल म्हणून वापरता, हि अतिशय नीच अशी बाब आहे, एवढी खालची स्टेप तुम्ही गाठू नका आणि आपले बोलणे समोरचा नक्की टेप करून ठेवणार आहे, हे यापुढे ध्यानात ठेवा, स्वत:वर विनाकारण संकट ओढवून घेऊ नका, विशेषत: पत्रकार, नेते, अधिकारी, व्यापारी या अशा खालच्या पातळीवर उतरून तुम्हाला अगदी सहज जाळ्यात ओढतात, 
कृपया सावध राहा....मैथिली जावकर प्रकरणात कौतुक त्या देवेंद्र फडणवीस यांचे नक्कीच करावे लागेल कारण मैथिलीची तक्रार त्यांच्याकडे येताच, त्यांनी क्षणाचा विलंब न लावता, मुंबई भाजपाध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या भ्रमणध्वनीवर बोलणे न करता सरळ मेसेज केला, पांडे यांचे कृत्य वाईट आहे, त्यावर कडक निर्णय घेऊन पांडे प्रकरणाचा छडा लावा....पक्षातली स्त्री सुरक्षित असली पाहिजे यावर नेहमी फडणवीस आग्रही असतात आणि त्यांना अगदी सहज शक्य असूनही, कुठल्याही लैंगिक विकृतीपासून ते कटाक्षाने चार हात लांब असतात, अमृता हीच पत्नी, प्रेयसी आणि मैत्रीण मानून तिचे कायम कौतुक करतात, स्त्री मग ती कुठल्याही वयाची असो, देवेंद्र जेथे तेथे ती सुरक्षित असते....काही संकेत पाळायचे असतात, जे गणेश पांडे यांनी अजिबात पाळले नाहीत. मैथिली प्रकरणात आपली पोल उघडली हे जेव्हा त्याच्या लक्षात आले तो उठला आणि त्याने ' एबीपी माझा ' वाहिनी गाठली, तेथे त्याने मैथिलीचा फोटो हाती घेऊन जगासमोर दाखवला वरून तिचे नाव देखील जाहीर केले. वास्तविक पुढल्या काही दिवसात मैथिली राज्य कार्यकारणीवर येणार होती पण ऐनवेळी विनाकारण वादग्रस्त ठरलेल्या मैथिलीचे नाव ऐनवेळी वगळण्यात आले अशी माझी माहिती आहे. सध्या मैथिली खूप खूप भेदरली आणि घाबरलेली आहे, ती म्हणते, गणेश पांडे गुंड प्रवृत्तीचा नेता आहे, माझ्या जीवाला धोका आहे, असे मला वारंवार वाटते, मात्र मैथिलीचे काय सुरु आहे, त्यावर विचारपूस करायला भाजपामधल्या नेत्यांना वेळ नाही. स्वत:ला विकून जर तिला श्रीमंत व्हायचे असते तर २४ वर्षे चित्रपट आणि नाट्यसृष्टीत काम करणाऱ्या मैथिलीला से कमविणे सहज शक्य होते पण तिने आपले पाउल कधीही वाकडे पडू दिले नाही त्यामुळे ती आजही आई वडिलांच्या अगदी छोट्याशा सदनिकेत राहते आणि ४-२ लाख रुपयांच्या स्वस्त कारमधून फिरते, ज्या कारचे होर्न सोडून सगळे वाजते कारण त्या कारमध्ये मी बसलेलो आहे, मैथिली जेव्हा कार चालविते तेव्हा जीव मुठीत धरून बसावे लागते, शी इज अ वेरी फास्ट ड्रायव्हर.....!! वास्तविक मैथिलीला पांडे प्रकरण वाढवायचे नव्हते पण तिने केलेली लेखी तक्रार जाणूनबुजून व्हायरल केल्या गेली त्यानंतर पांडे याने वाहिनीवर तोंड उघडले आणि केवळ माफिनाम्यावर मिटू शकणार्या प्रकरणाचे विनाकारण गांभीर्य वाढविण्यात आले.
पांडे म्हणतो तिला त्याचा राजकीय विरोधक संजय पांडे याने पैसे देऊन प्रकरण उघड करण्यास मदत केली पण मला नाही वाटत, मैथिली अशी खालची स्टेप गाठून स्वत:ला बदनाम करून सोडेल, आणि गणेश पांडे म्हणतो ते खरे असेल तर उद्या मैथिली मग त्याच्याकडून देखील पैसे घेऊन केलेली तक्रार मागे घेईल. भविष्यात समजा मैथिलीने केलेली तक्रार मागे घेतली तर आम्ही काय म्हणायचे कि तिने गणेश पांडेकडून पैसे घेतलेत....पुन्हा सांगतो, ती हि अशी असती तर केव्हाच श्रीमंत होऊन भारी किमतीच्या कार्समधून फिरली असती आणि महागड्या बंगल्यात राहायला गेली असती....एक मात्र बरे झाले ज्यांचा नेते म्हणून भाजपशी दुरदुरपर्यंत संबंध नव्हता अशा युवकांना सामील करून गणेश पांडे याने जी ७० लोकांची कार्यकारणी केली होती,आता ती कार्यकारणीच बरखास्त करण्यात आली. यापुढे आशिष शेलार यांनी नवी कार्यकारणी तयार करतांना सावधगिरी बाळगावी....जे या राज्यातल्या कॉंग्रेसचे झाले म्हणजे तीव्र इच्छा असूनही असंख्य स्त्रिया बहुसंख्य लैंगिक विकृती असलेल्या नेत्यांमुळे कॉंग्रेसपासून दूर राहणे पसंत करीत होत्या, नजीकच्या भविष्यात भाजपाचे देखील तेच होईल, पांडे, महाजन, मुंडे, चव्हाण अशी फक्त चार दोन प्रकरणे उजेडात आलीत, इतर येत नाहीत किंवा आली नाहीत पण पूर्वीसारखे भाजपामध्ये देखील तरुण स्त्रियांना काम करतांना सुरक्षित वाटत नाही, संघ संस्कारातून तयार झालेल्या भाजपमध्ये हे असे विकृत वातावरण तयार होताकामा नये कारण सुशिक्षित, उच्चशिक्षित, घरंदाज स्त्रिया, तरुणी मोठ्या प्रमाणावर या पक्षात कार्यरत आहेत, पण अलीकडे त्या द्विधा मन:स्थितीत वावरतांना दिसतात, पांडे प्रवृत्ती हि अशी फैलता कामा नये, आगे धोका है....आम्ही मराठी कमालीचे गांडू कारण हा गणेश पांडे कधी पोलिसांवर हात उगारतो तर कधी शालीन, कुलीन मराठी तरुणीला लैंगिक विकृतीच्या जाळ्यात ओढायला बघतो, मैथिलीच्या जागी एखादी लेचीपेची तरुणी असती तर ती सरेंडर झाली असती किंवा आत्महत्या करून मोकळी झाली असती. मराठी पोलिसांना सोडले नाही, मराठी तरुणीला सोडले नाही उद्या हा पांडे मराठी पत्रकारांवर देखील हल्ले करायला कमी करणार नाही, वरून त्यालाच पोलिसांचे चोवीस तास संरक्षण आहे. पांडे हा ब्राम्हण आहे, असे ब्राम्हण बघितलेत कि मनाला वाटते, का जन्म घेतला ब्राम्हण म्हणून....