Thursday, 10 March 2016

काय चाललय या राज्यात : पत्रकार हेमंत जोशी


आपण मराठी कायम स्वाभिमानाच्या गप्पा मारतो आणि या राज्याला हमेशा लुटून खाणार्या अमराठीव्यापारी,दलाल,व्यावसायिकांसमोर सतत झुकतो, लाचार होतो, नतमस्तक होतो. एखादा मराठी व्यापारी कार्यकर्ता सामान्य माणूस   काम घेऊन आला तर त्याला आपल्यातले सत्ताधीश टाळतात वरून चार ज्ञानाच्या गप्पा मारून त्याला वाटेला लावतात पण तेच काम एखादा अमराठी दलाल किंवा व्यावसायिक घेऊन आला तर लगेच त्याला बसायला खुर्ची मोकळी करून देतो, त्याचे काम लगेच तेथल्या तेथे करून देतो. आपले राज्यकर्ते, नेते, अधिकारी हे असेच आहे, जे काम आपण मराठी माणसाचे टाळलेले असते नेमके तेच काम एखादा चतुर, गोडबोल्या,
पैसे खाऊ घालणारा अमराठी दलाल घेऊन आला कि क्षणाचाहि विलंब न लावता त्याचे काम करवून देतो. या राज्यात एक मोठा दलाल आहे, तो नागपुरातला आहे, विदर्भातला आहे, तो कायम भाजपा मध्ये असला तरी कुठलाही पक्ष सत्तेत असतांना त्याला फरक पडत नाही, अजय संचयनी हे ते नाव आहे. सेना आणि भाजपाच्या मंत्र्यांना, राज्यमंत्र्यांना आणि या राज्यातल्या सरकारी खात्यात काम करणाऱ्या सर्व अधिकार्यांना या राज्याच्या एका प्रमुख नेत्याने सख्त ताकीदच सर्वांना देऊन ठेवण्यात आलेली आहे, जाड्या लबाड राज्य लुटणाऱ्या या हरामखोर अजयचे कुठलेही काम असो, त्याच्या कामांना प्राधान्य देऊन तातडीने त्याच्या कामांचा निपटारा करा. थोडा 
अवधी द्या, खादाड भामट्या लुटारू अजयचे सारे कारनामे नक्की येथे मांडेन....अर्थात असे अनेक अमराठी अजय संचयनी आपल्या या राज्यात सत्तेवर ते असोत वा नसोत आम्हा मराठींना कायम वर्षानुवर्षे लुटून खाताहेत. या सर्वांचे इत्यंभूत पुरावे माझ्याकडे असतात, पण सारे पुरावे मांडायचे ठरविले तर माझा नक्कीच खून होईल, अर्थात जेवढे शक्य आहे बेधडक तुमच्यासमोर मी मांडत आलोय. अगदी परवा मुख्यमंत्री कार्यालयातल्या एका प्रशासकीय अधिकार्याला मी म्हणालो, तुम्ही किंवा पैसे खाण्यात ' करिअर ' करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शपथ घेतलेली आहे काय कि अजय संचयनी याला अमुक एखाद्या कामात प्रत्येक आठवड्यात भरमसाठ 
पैसे मिळवून दिल्याशिवाय नवीन आठवड्याच्या कामांना सुरुवात करायची नाही. आणि हे जे काय तुमचे अगदी उघड पैसे खाणे सुरु आहे, तो पैसा तुम्हाला पचेल असे वाटते का, मग मी त्यांना एका दरदिवशी करोडो रुपये मिळविणाऱ्या प्रशासकीय अधिकार्याचे उदाहरण दिले. ह्या प्रशासकीय अधिकार्याने सरकारी खात्यात गेले कित्येक वर्षे कमाईचे अनेक ' झेंडे ' रोवले, प्रचंड प्रमाणावर आलेला कित्येक गोण्या पैसा त्याने कुणा ' दिवाण ' आडनावाच्या बांधकाम व्यवसायिकाकडे गुंतविला, त्याने गुंतविलेल्या त्याच्या काळ्या
पैशांची कुणकुण आयकर खात्याला लागली होती,पण प्रकरण मिटविण्यात आले. आता महत्वाचे सांगतो, सतत बांधकाम व्यवसायांना विविध परवानग्या देणाऱ्या खात्यात व्यस्त असलेल्या या अधिकार्याने आलेला जो काळा पैसा दिवाण नामक लबाड व्यावसायिकाकडे 
गुंतविला होता, आज तो पैसे किंवा त्यावरील व्याज किंवा नफा देण्यात तो बांधकाम व्यावसायिक पूर्णत: असर्माथ आहे कारण गेल्या काही वर्षांपासून बांधकाम व्यवसायात या देशात, आपल्या राज्यात मोठी मंदी आल्याने, सदनिका खरेदी करायला ग्राहक पुढे येत नाही,
दिवाण देखील इतर बांधकाम व्यावसायिक जसे अडचणीत आहेत तसा आर्थिक अडचणीत सापडलेला आहे, मित्रहो, काळा पैसा मोठ्या प्रमाणावर गुंतविलेल्या या अधिकार्याला गेल्या दोन वर्षात नीटशी झोप देखील लागलेली नाही, लागत नाही, कारण नफा देणे किंवा गुंतविलेल्यापैशांवर व्याज देणे तर दूर पण गुंतविलेली कोट्यावधी रुपयांची रक्कम देखील या अधिकार्याने वारंवार मागणी करूनहि त्या बांधकाम व्यवसायिकाने परत करण्यास असमर्थता दर्शविलि आहे, अब भूल जावो तुम्हारा पैसा, असे एखाद्या दिवशी त्याने या अधिकार्याला सांगितले तर मला फारसे आश्चर्य वाटणार नाही....श्रीमान विश्वास पाटील यांच्याविषयी मी बरे काय सांगावे, जे काय सांगायचे आहे ते सारे आत बाहेर केव्हाच त्यांच्या बंधूनी लोकसत्त्ता रविवारच्या पुरवणीतून मांडले आहे, विश्वास पाटील यांची खर्या अर्थाने चड्डी सोडली आहे, तुम्हाला विश्वास पाटील यांच्याविषयी आणखी व्यापक माहिती हवी असेल, तर या राज्याच्या मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना विश्वासात घेऊन विचार, त्यांना तर विश्वास कुठल्या दिवशी कोणत्या रंगाची चड्डी घालतात, माहित असते. विश्वास पाटील यांच्या भावाने अगदी अलीकडे मांडले कि इकडचे तिकडचे चौर्यकर्म करून विश्वास आपली पुस्तके पूर्ण करतात, तुम्हा वाचकांना म्हणून सांगतो, हे मी अनेक बर्षांपुर्वी माझ्या लिखाणातून मांडले होते, कोणी तेव्हा लक्ष दिले नाही, आमचे वृत्तपत्र लंगोटी आहे म्हणून घडले असावे कदाचित.....प्रशासकीय अधिकारी आणि लेखक विश्वास पाटील यांचे जे झाले तेच इतर सर्वांचे आज,उद्या होणार आहे. त्यांनी आलेल्या कमाईतून हिंदी चित्रपट काढला, त्यांच्या घरातल्यांनी देखील तो सिनेमा बघितला नसेल, असा तो रद्दड चित्रपट होता, दणक्यात आदळला. आम्ही किंवा आमच्यातले जे तुम्हा सामान्य माणसाला लुटून खाणारे आहोत ना, आमचा फक्त वक्त चांगला असू शकतो, अंत कधीही चांगला असू शकत नाही. हपापाचा माल कुठल्या तरी मार्गाने नेहमी गपापा होतो....शिवाजी असो कि संभाजी, पूर्वीच्या या राजांनी आपले मराठी ' झेंडे ' अटकेपार नेले पण आजचे सरकारी खात्यातले असे ' संभाजी ' जेव्हा सरकारी खात्यातील मोक्क्याच्या जागा कायम अडवून पैसे अमापसमाप मिळवितात, त्यांना ते स्वत:ला क्षणिक बरे वाटते पण आम्ही मराठी या अशा सतत राज्य लुटणाऱ्या अधिकार्यांकडे केवळ एक वेश्या म्हणून बघत असतो, आमचे शिव्या शाप आणि बददुवा त्यांना मिळत असतात. काळी कमाई मनाचे स्वास्थ्य नक्कीच बिघडवते. अनेक वर्षे सतत या मंडळीविरुद्ध लढा देतांना मी अजिबात थकलो नाही, घाबरलेलो नाही, थोडी वाट पहा, शेवटची लढाई अशी लढेल कि पुन्हा या राज्यात पैसे खाण्यात एखादा प्रशासकीय अधिकारी आपले ' करिअर ' करणार नाही, तशी हिम्मत करणार नाही. अमुक एखादा पुरावा मांडतांना आम्हाला अनेक बंधने येतात, दबाव येतात, निरोप येतात, त्यावर मार्ग काढीत काढीत या राज्याला कायम लुटणाऱ्या लोकांविरुध्ह आम्ही लढा देतो, यश 
किंवा अपयाशीची फारशी चिंता न करता. दबाव, धमक्या, निरोप, लालूच हे शब्द आता नित्याचेच झाले आहेत, हे शब्द जणू अंगवळणी पडलेले आहेत....

विषयांतर करतो, अलीकडे मला भेटायला ठाण्याचे दिलीप जयसिंग्पुरे आले होते, जयसिंगपुरे हे शिवसेना नेते अनंत तरे यांचे हनुमान आहेत, तरे सत्तेत असोत अथवा नसोत, दिलीप त्यांना सोडून कधीही कुठे गेले नाहीत जसे अकोल्याचे अनिल काळे, ते वकील आहेत, त्यांची वकिली छान चालायची, पण काळे हे मंत्री दिवाकर रावते यांच्या संपर्कात आले आणि रावतेमय झाले, त्यांनी आपला प्रोफेशन बाजूला ठेवला आणि रावते यांच्या संगे स्वत:ला शिवसेनेत झुकून दिले, कुठल्याही पदाची किंवा पैशांची अपेक्षा न ठेवता ते सतत सावली सारखे रावते यांना साथ देत आले आहेत, कार्यकर्ता हा असा असावा...तर दिलीप मला म्हणाले, हेमंजी, मी काही आवडीचे चित्रपट जसे अनेक वेळा बघितले आहेत तसे तुमचे अंक मी हातात पडल्यानंतर नेहमी अनेक वेळा वाचून काढतो, अनेक जुने अंक तर मी मुद्दाम जपून ठेवलेले आहेत. काही वर्षांपूर्वी मला माझा एक वाचक सिंगापूरला भेटला होता, तो देखील तेच म्हणाला होता, अनेक मला भेटले कि आवर्जून सांगतात, आम्ही तुमच्या लिखाणाचे पारायण करतो. मला वाटते, हीच माझ्या आयुष्यातली खरी कमाई, अनेकदा वाटते, एखाद्या गुन्ह्यात स्वत:ला अडकवून घ्यावे म्हणजे तुरुंगात तरी शांत बसून आणखी खूप खूप लिहिता येईल, शांत डोक्याने साचलेले अनेक विचार मांडता येतील, अनेक बाबतीत असलेले माझे ढोंगी मन देखील मला एकदा तुमच्यासमोर मोकळे करायचे आहे, नक्की मांडेन, जगलो वाचलो तर....

No comments:

Post a comment