Monday, 29 February 2016

आर्थिक आपत्तीत सापडलेल्या राज्याचे वित्तमंत्री!!


अलीकडे माझ्या एका मित्राला BMW कार विकत घ्यायची होती, आणि माझ्याच ओळखीच्या परराज्यातल्या माणसाला त्याची BMW विकायची होती, आम्ही मग ती कार बघायला गेलो, विकणारा अमराठी होता आणि विकत घेणारा मराठी होता. आपण मराठी म्हणजे बावळट, मूर्ख, अडाणी, व्यवहारशून्य, अक्कलशून्य अशी ठार समजूत आपल्याविषयी सर्वांनी करवून घेतली आहे, पण अनुभवातून समृद्ध शहाणे झालेले आम्ही मराठीदेखील बदललो आहोत हे अमराठी माणसाला अद्याप मान्य नसावे, त्या कार विकणाऱ्याचे देखील तेच झाले, ती पाच वर्षे जुनी असलेली आणि अपघातात सापडलेली कार पण तो त्या गाडीचे असे काही वर्णन करीत होता कि त्याने जणू सहा महिन्यांपूर्वी घेतलेली नवीन गाडी विकायला काढलेली आहे.....


मी सोबत होतो, त्याला हे माहित नसावे कदाचित कि मी माझी पहिली कार वयाच्या २१ व्या वर्षी घेतली होती, ज्या वयात, ज्या काळात कुठलाही मराठी तरुण आपली स्वत:ची सायकल स्वत:च्या पैशाने देखील विकत घेण्याच्या परस्थितीत नसायचा आणि अलीकडे मी विकत घेतलेली कार माझ्या आयुष्यातली ६६ व्या क्रमांकाची होती, स्वकौतुक करणारा मूर्ख म्हटल्या जातो म्हणून मी बढाया मारणे टाळत असतो पण याचा अर्थ असा नसतो कि मराठी माणसाला अजिबात अक्कल नसते. त्यामुळे तो कार विकणारा त्याच्या लंगड्या, फुटक्या, वापरलेल्या, जुन्या गाडीचे ज्या पद्धतीने वर्णन करीत होता, मला त्यावर हसू फुटत होते, मनात म्हणालो, ज्या पद्धतीने तो आपल्याला गाडीविषयी अतिशयोक्ती सांगतोय, हा आपल्या बापाला देखील उद्या अमुक एखाद्या स्त्रीशी संभोग कसा करायचा, शिकवायला मागे पुढे बघणार नाही. येथे हा किस्सा यासाठी सांगितला कि मी या राज्याचे मोस्ट फुडी पण अजिबात मूडी नसलेले वित्त मंत्री सुधीरभाऊ यांच्याविषयी नेमकी, सडेतोड वस्तुस्थिती सांगणार आहे, तुमच्यासमोर मांडणार आहे, सुधीरभाऊ मांडतांना त्या कार विकायला आलेल्या अमराठी शेठजीसारखे अतिरेकी वर्णन अजिबात मांडणार नाही, तुम्हाला सांगणार नाही. लोकांचे जाऊ दया, आजकाल बहुतेक मायबाप बिनधास्त जीवन जगणाऱ्या आपल्या मुलींचे लग्नाचे बघतांना, लग्न ठर्वितांना मागचा पुढचा विचार न करता, सांगून मोकळे होतात, आजपर्यंत आमच्या मुलीच्या आयुष्यात एकही पुरुषाने डोकावलेले नाही, वस्तुस्थिती वेगळी असते, तिने हमखास लग्नाआधी गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन केलेले असते, मायबापांना हे ठाऊक असूनही ते ठोकून देतात, त्यातून मग अनेकदा घटस्फोट होतात. मी सुधीरभाऊ यांच्याविषयी लिहितांना, त्यांच्या कार्यपद्धतीविषयी लिहितांना, थोडक्यात नेमके सुधीरभाऊ मी तुमच्यासमोर मांडणार आहे, या राज्यातल्या या अत्यंत यशस्वी नेत्याचे, भाजपच्या माजी प्रदेशाध्य्क्षाचे, मनमोकळ्या, फटकळ, बोलक्या, हसतमुख, बुद्धिमान, नेतृत्वात आणि मंत्री म्हणूनहि अनुभव समृद्ध वित्त मंत्र्याचे, उत्साही आणि उत्सवी नेत्याचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर म्हणून ओळखल्या जाणार्या घरातील, घराण्यातील या संघ स्वयंसेवकाचे नेमके वर्णन करणार आहे, त्यांच्यावीशी काही कटू तर काही 
अविस्मरणीय प्रसंग येथे सांगणार आहे....

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र उत्तम आहेत, त्यांनी मंत्री मंडळावर आणि प्रशासनावर हळूहळू पकड घेतली आहे, मेक इन इंडिया यशस्वी पार पडल्याने लागलेल्या अकस्मात आगीचे देखील माध्यमांनी किंवा विरोधकांनी भांडवल केले नाही, आग लागल्यानंतर देखील जीवाची, संकटाची पर्वा न करता, देवेंद्र घटनास्थळी जागेवरून हलले नाहीत, निर्माण झालेला गंभीर प्रसंग त्यांनी मोठ्या खुबीने आणि ताकदीने हाताळला, सर्वांनी त्यावर देवेंद्र यांचे अगदी तोंडभरून कौतुक केले....थोडक्यात सबकूछ बढीया है, पण एक मोठा पेच फडणवीस आणि राज्यातल्या भाजपा नेत्यांवर ओढवलेला आहे, ग्रामीण भागावर देवेंद्र किंवा त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांची आणि भारतीय जनता पक्षाची अजिबात पकड राहिलेली नाही. विधान सभा किंवा लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाविषयी राज्यातल्या ग्रामीण भागातही चांगले वातावरण निर्माण झाले होते, पण काळ जसजसा पुढे सरकला ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर भाजपपासून दूर झाला, भाजपाचे हे अपयश त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष घेतो आहे, ग्रामस्थ पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे आकर्षित होऊ 
लागलेला आहे, त्यानंतर ग्रामीण भागावर मोठ्या प्रमाणावर पकड घेतली आहे ती शिवसेनेने, कॉंग्रेसविषयी मात्र राज्यात फारशी कुठेही सहानुभूती नाही, नागपूरचा मोर्चा यशस्वी करून दाखविला म्हणजे राज्यात कॉंग्रेसची हवा निर्माण झाली आहे असे अशोक चव्हाण किंवा कॉंग्रेस नेत्यांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे, पोट मोठे दिसले म्हणून कोणतीही स्त्री गरोदर असते असे नाही, अनेकदा पोटात वायू भरला तरीही पोट फुगते, कॉंग्रेसचे ते तसे आहे, ती जमलेली गर्दी म्हणजे पोकळ हवा होती, या राज्यात कॉंग्रेस फारशी हवा नाही, अशोक चव्हाण यांना प्रदेशध्यक्ष म्हणून लोकप्रियता देखील नाही, राज्य लुटणाऱ्या नेत्यांना ग्रामस्थ चांगले ओळखून असतात. वारे वाहते तसे शरद पवार राजकीय निर्णय घेतात, भाजपा त्यांच्यावर का विसंबून राहते, समजत नाही, भाजपा नेत्यांनी आपले जासूस सहजच 
मुंबईतल्या राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात पेरावेत, भाजपाला मग कळेल, शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष दरक्षणी ज्या खुबीने ग्रामीण भागावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर पकड घेतोय, पवारांच्या या नियोजनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील आश्चर्याने तोंडात बोटे घालेल. दुर्दैवाची बाब म्हणजे प्रशासनावर देवेंद्रपेक्षा राष्ट्रवादी पक्षाच्या माजी मंत्र्यांची आणि शरद पवार यांची अधिक घट्ट पकड आहे, त्यांची पकड अजिबात ढिली किंवा सैल झालेली नाही, अधिकारी बांधले आहेत.पैसे कुठे आणि कसे फेकावेत राष्ट्रवादीतल्या हिशोबी नेत्यांना त्यावर सखोल अभ्यास आहे, त्यामुळे सेना भाजपच्या नेत्यांपेक्षा, मंत्रीमंडळापेक्षा, राष्ट्रवादीतल्या नेत्यांची आणि दलालांची मंत्रालयात आणि एकूणच प्रशासनात लोकमान्यता किंवा पैसा मिळवून देणारी कामे अगदी सहज होतात. शिवसेनेचे मंत्री, राज्यमंत्री मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांची कामे करून द्यायला फारशी उत्सुक नसतात, अशावेळी वसंत डावखरे किंवा प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे सर्वांना चालणारे हुकमी ' गावमामा ' शरद पवार यांच्याकडे आहेत, शरद पवार यांनी फक्त इशारा करायचा अवकाश, सेनेचे मंत्री देखील हातात हात घेऊन डावखरे किवा पटेल यांच्यासंगे झिम्मा फुगडी खेळून मोकळे होतात.....

ज्या वेगाने राज्यातल्या भाजपची ग्रामीण भागावर विधानसभा किंवा लोकसभा निवडणुका होण्यापूर्वी अलीकडच्या काही वर्षात पकड निर्माण झाली होती, नितीन गडकरी, दिवंगत गोपीनाथ मुंडे, सुधीर मुनगंटिवार किंवा देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने राज्यातले 
ग्रामीण मतदार पायपीट करून, जनसंपर्कातून भाजपाकडे आकर्षित केले होते, खेचले होते,ते वातावरण हळूहळू बदलत चाललेले आहे, अर्थात रावसाहेब दानवे यांचे प्रदेशध्यक्ष म्हणून असलेले लिंबू टिंबू नेतृत्व हे देखील भाजपापासून दूर जाणार्या ग्रामीण जनतेस कारणीभूत आहे. सुधीरभाऊ, देवेंद्र, नितीन गडकरी, दिवंगत गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन हे भाजपा मधले सोलो हिरो होतो, गर्दी खेचण्याची त्यांच्यात ताकद होती, दानवे म्हणजे भाजपा मधले ' आलोकनाथ ' फार ते गर्दीतले एक नेते म्हणून बघायला बरे वाटतात, सोलो हिरो म्हणून त्यांना आजही नाही आणि उद्या देखील मान्यता मिळणार नाही. सिनेमा दिलीपकुमारकडे बघून चालायचा, मध्येच येणारा मुक्री थोडावेळ हसण्याकरिता म्हणून बरा वाटायचा, भाजपात प्रदेशाध्यक्ष म्हणून सोलो हिरो, गर्दी खेचणारा नेता, जनतेचा आकर्षण ठरणारा नेता काळाची, राज्याची, पक्षाची गरज आहे, दानवे यांची ना मंत्री मंडळावर पकड आहे ना ग्रामस्थांना किंवा जालना जिल्हा सोडला तर इतर सामान्यांना त्यांची ओढ आहे, आकर्षण आहे....

आता एका अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो, मंत्रालयात लोकांची, विशेषत: कार्यकर्त्यांची गर्दी ओसरू लागलेली आहे कारण पूर्वी पक्षाचा स्थानिक नेता किंवा कार्यकर्ता आपापल्या भागातली कामे घेऊन यायचा आणि मंत्री त्याची कामे करवून द्यायचे, या मंत्र्यांनी मध्यस्थ असलेले कार्यकर्ते किंवा स्थानिक नेत्यांना बाजूला सारून थेट दलालांना ' येऊ द्या ' धोरण स्वीकारलेले असल्याने ग्रामस्थ आणि मंत्री किंवा भाजपातले बडे नेते, हि नाळ तुटू लागलेली आहे, जी बाब पक्षाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे, येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीत यापुढे भाजपाऐवजी ग्रामस्थांनी शिवसेना किंवा राष्ट्रवादी पक्षाला कल दिला, कौल दिला तर त्यात फारसे आश्चर्य वाटून घेऊ नका....लायकीचे मंत्री म्हणून ज्यांचे नाव घेतले जाईल त्यात सुधीरभाऊ नक्कीच उजवे, ते वेगळे कसे, पुढे येणारे लिखाण त्यावर पुरावा असेल...

साधा सरळ माणूस दारू विक्रीच्या व्यवसायात उतरणे या राज्यात, या देशात शक्य नाही, पुरून उरणारी बिलंदर माणसेच हा अनेकांच्या संसाराची राख रांगोळी करणारा व्यवसाय करू शकतात, ज्या श्रीकांत जिचकार यांना तुम्ही या देशातले सर्वात आदर्श तरुण म्हणून बघत होता त्यांचा तर दारूच्या ठोक विक्रीचा व्यवसाय होता, त्याकाळी त्यांचे royal drinks कंपनीचे प्रकरण खूप गाजले होते, जिचकार यांनी अबकारी खात्याचा महसूल बुडविला म्हणून त्यांना भला मोठा दंड आकारण्यात आला होता, जिचकार अस्वस्थ होते, पुढे 
त्यातून त्यांना शरद पवार यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर बाहेर लढले, ज्या शरद पवार यांना डॉ. जिचकार नेहमी पाण्यात पहायचे, सडकून अगदी उघड राजकीय विरोध करायचे तेच पवार नेमके त्यांच्या मदतीला धावून आले. माजी मंत्री अनिल देशमुख किंवा विधान परिषद उपसभापती वसंत डावखरे यांच्यासारखेच पुरून उरणारे नेते या व्यवसायात आहेत, साधी सज्जन माणसे या व्यवसायात तुम्हाला औषधाला देखील सापडणार नाहीत. जेथे दारू विक्री तेथे गुंडगिरी, हे सूत्र ज्यांना सांभाळता येते तेच हा व्यवसाय करू शकतात आणि या व्यवसायातल्या तब्बल ४५० बेरकी, काळा पैसा खेचणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यावसायिकांशी या राज्याच्या एरवी साधे सरळ हसतमुख वाटणाऱ्या मंत्र्याने, वित्त आणि वन खात्याच्या मंत्र्याने थेट पंगा घेतला आहे, असे धाडस, असा बेधडक निर्णय कि जो या मंत्र्याला जीवघेणा, आयुष्य उधवस्त करणारा निर्णय ठरू शकतो. होय! श्रीमान सुधीरभाऊ मुनगंटिवार यांनी त्यांच्या home district मध्ये,चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घडवून आणली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारू विक्री बंदीचा निर्णय झाल्याने एकाचवेळी ४५० व्यापार्यांना त्यांची दुकाने बंद करावी लागलीत, विशेष म्हणजे एकदा का अमुक ठिकाणी दारू बंदी आली कि कोर्ट कचेर्या करून फारसा उपयोग होत नाही, अमुक एखाद्या ठिकाणी केलेली दारू बंदी पुन्हा उठविल्या गेली असे कधी घडत नाही. उद्या पुन्हा एकदा यापुढे दस्तुरखुद्द सुधीरभाऊ यांना जरी वाटले कि चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी हटवावी, उठवावी, ते त्यांना स्वत:ला देखील अजिबात शक्य होणार नाही, अगदी देशाचे पंतप्रधान देखील हा निर्णय प्रसंगी बदलवू शकणार नाहीत, त्यामुळे या व्यवसायात असलेल्या अनेक गुंड, खतरनाक प्रवृत्तीच्या, वाम मार्गाने पैसे मिळविणाऱ्या कित्येक मवाली दुकानदारांच्या मार्गात सुधीरभाऊ एखाद्या काट्यासारखे आले आहेत, त्यांच्या पायात रुतले आहेत, त्यातून त्यांना आता या व्यवसायातल्या अस्वस्थ लोकांनी त्रास द्यायला केव्हाच सुरुवात केली आहे, आम्ही सुधीरभाऊ यांना जीवनातून उठवू, असे उघड निरोप त्यांना थेट येतात, वेगवेगळ्या पद्धतीने, अत्यंत खालच्या थरातून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची बदनामी करण्यात येते, दारू विक्रीचा व्यवसाय बंद केल्याने चंद्रपूर जिल्ह्यातले खतरनाक गुंड प्रवृत्तीची माणसे थेट नक्षलवाद परिसरात पोहचून म्हणे सुपारी देऊन आले आहेत, याची संपूर्ण कल्पना, तंतोतंत माहिती असूनही सुधीरभाऊ घ्यायला हवे तसे संरक्षण घ्यायला तयार नाहीत, पोलिसांनी देखील त्यांना सांभाळून राहा, सांगितलेले आहे, कल्पना दिलेली आहे, पण एरवी, वरकरणी हसतमुख आणि शांत दिसत असलेले सुधीरभाऊ मनातून आपल्या निर्णयावर खुश आहेत, जनतेला दिलेले हे खतरनाक वाचन पाळले म्हणून मनातून सुखावले आहेत, धमक्यांना ते भिक घालतांना अजिबात दिसत नाहीत आणि त्यांना बदनाम करण्यासाठी, राजकारणातून कायम स्वरूपी उठविण्यासाठी जे षड्यंत्र सतत रचण्यात येते आहे, त्यावर देखील ते अजिबात विचलित झालेले नाहीत. मुठभर जिल्हा उध्वस्त करणाऱ्या व्यापार्यांना खुश न करता मी कित्येकांचे संसार राखरांगोळी होण्यापासून वाचविलेले आहेत, ती सारी कुटुंबे माझ्या पाठीशी ठाम उभी असतांना मला राजकारणातून संपविणे कोणाच्या बापाला शक्य नाही, असे सुधीरभाऊ अगदी उघड सांगतात, आणि जीवाची पर्वा न करता, कामाला लागतात....

फडणवीस मंत्री मंडळात जे भाजपाचे मंत्री आहेत, त्यातले बहुतेक सारेच गडकरी गटाचे आहेत, पूर्वी भाजपामध्ये गडकरी आणि मुंडे असे दोन मोठे गट होते पण मुंडे गेले आणि त्यांचा गट अस्तित्वात राहिला नाही, पंकजा राजकारणात अगदीच लहान,अननुभवी आहेत, त्यांना त्याच्या वडिलांचा गट सांभाळणे सोडा पण यापुढे स्वत:चा मतदार संघ देखील व्यवस्थित सांभाळता आला तरी ते त्यांच्या राजकीय प्रवासाच्या दृष्टीने आशादायी ठरेल, ठरावे. पण सध्या एकमेव नितीन गडकरी जोमात आणि जोशात आहेत, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून अनेक आव्हाने पेलायची होती, आहेत त्यामुळे आताच ते आपला स्वत:चा पक्षात राजकीय दबाव आणू शकणारा गट उभा करतील वाटत नाही. पण एक बरे आहे, जरी विदर्भातले बावनकुळे किंवा राज्यातले खडसे यांच्यासारखे प्रभावी बहुतेक मंत्री गडकरी गटाचे असले तरी जे सुरुवातीला भाजपा मध्ये अस्वस्थ वातावरण होते ते पूर्णत: निवळलेले आहे म्हणजे जरी प्रभावी मंत्री अगदी उघड गडकरी यांचे नेतृत्व मानत असले तरी ते थेट फडणवीस यांना देखील, विरोधासाठी विरोध करतांना दिसत नाहीत, ते एकप्रकारे बरे झाले अन्यथा फडणवीस यांचा बहुतेक वेळ पक्षातली धुसफूस थांबविण्यात गेला असता....

उद्या जर फडणवीस केंद्रात त्या पर्रीकर यांच्यासारखे गेले तर मात्र या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी फारतर खडसे किंवा सुधीरभाऊ या दोघांपैकी एकाचाच नक्की विचार करण्यात येईल. अमुक एखादी पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून घेतली म्हणून पंकजा मुंडे यांना वाटत असेल कि आपण उद्याच्या मुख्यमंत्री, तर तो त्यांचा भ्रम ठरावा, असे असेल तर उद्या मी रणवीर कपूरच्या खुर्चीत बसून दीपिकाला डोळा मारायला कमी करणार नाही. विषय सुधीरभाऊ आहे आणि आपण उद्या आणखी मोठे होणार आहोत, त्यांना माहित आहे, ते त्यातून सावध असतात, त्यांचा अजित पवार होणार नाही, ते तसे अर्थमंत्री होणार नाहीत.त्यांचे निर्णय, त्यांची मंत्री म्हणून कामगिरी लक्षणीय आहे....

पत्रकार हेमंत जोशी 
(९३२३६६११५०, ९६१९६३११५०)

No comments:

Post a comment