Monday, 29 February 2016

आर्थिक आपत्तीत सापडलेल्या राज्याचे वित्तमंत्री!!


अलीकडे माझ्या एका मित्राला BMW कार विकत घ्यायची होती, आणि माझ्याच ओळखीच्या परराज्यातल्या माणसाला त्याची BMW विकायची होती, आम्ही मग ती कार बघायला गेलो, विकणारा अमराठी होता आणि विकत घेणारा मराठी होता. आपण मराठी म्हणजे बावळट, मूर्ख, अडाणी, व्यवहारशून्य, अक्कलशून्य अशी ठार समजूत आपल्याविषयी सर्वांनी करवून घेतली आहे, पण अनुभवातून समृद्ध शहाणे झालेले आम्ही मराठीदेखील बदललो आहोत हे अमराठी माणसाला अद्याप मान्य नसावे, त्या कार विकणाऱ्याचे देखील तेच झाले, ती पाच वर्षे जुनी असलेली आणि अपघातात सापडलेली कार पण तो त्या गाडीचे असे काही वर्णन करीत होता कि त्याने जणू सहा महिन्यांपूर्वी घेतलेली नवीन गाडी विकायला काढलेली आहे.....


मी सोबत होतो, त्याला हे माहित नसावे कदाचित कि मी माझी पहिली कार वयाच्या २१ व्या वर्षी घेतली होती, ज्या वयात, ज्या काळात कुठलाही मराठी तरुण आपली स्वत:ची सायकल स्वत:च्या पैशाने देखील विकत घेण्याच्या परस्थितीत नसायचा आणि अलीकडे मी विकत घेतलेली कार माझ्या आयुष्यातली ६६ व्या क्रमांकाची होती, स्वकौतुक करणारा मूर्ख म्हटल्या जातो म्हणून मी बढाया मारणे टाळत असतो पण याचा अर्थ असा नसतो कि मराठी माणसाला अजिबात अक्कल नसते. त्यामुळे तो कार विकणारा त्याच्या लंगड्या, फुटक्या, वापरलेल्या, जुन्या गाडीचे ज्या पद्धतीने वर्णन करीत होता, मला त्यावर हसू फुटत होते, मनात म्हणालो, ज्या पद्धतीने तो आपल्याला गाडीविषयी अतिशयोक्ती सांगतोय, हा आपल्या बापाला देखील उद्या अमुक एखाद्या स्त्रीशी संभोग कसा करायचा, शिकवायला मागे पुढे बघणार नाही. येथे हा किस्सा यासाठी सांगितला कि मी या राज्याचे मोस्ट फुडी पण अजिबात मूडी नसलेले वित्त मंत्री सुधीरभाऊ यांच्याविषयी नेमकी, सडेतोड वस्तुस्थिती सांगणार आहे, तुमच्यासमोर मांडणार आहे, सुधीरभाऊ मांडतांना त्या कार विकायला आलेल्या अमराठी शेठजीसारखे अतिरेकी वर्णन अजिबात मांडणार नाही, तुम्हाला सांगणार नाही. लोकांचे जाऊ दया, आजकाल बहुतेक मायबाप बिनधास्त जीवन जगणाऱ्या आपल्या मुलींचे लग्नाचे बघतांना, लग्न ठर्वितांना मागचा पुढचा विचार न करता, सांगून मोकळे होतात, आजपर्यंत आमच्या मुलीच्या आयुष्यात एकही पुरुषाने डोकावलेले नाही, वस्तुस्थिती वेगळी असते, तिने हमखास लग्नाआधी गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन केलेले असते, मायबापांना हे ठाऊक असूनही ते ठोकून देतात, त्यातून मग अनेकदा घटस्फोट होतात. मी सुधीरभाऊ यांच्याविषयी लिहितांना, त्यांच्या कार्यपद्धतीविषयी लिहितांना, थोडक्यात नेमके सुधीरभाऊ मी तुमच्यासमोर मांडणार आहे, या राज्यातल्या या अत्यंत यशस्वी नेत्याचे, भाजपच्या माजी प्रदेशाध्य्क्षाचे, मनमोकळ्या, फटकळ, बोलक्या, हसतमुख, बुद्धिमान, नेतृत्वात आणि मंत्री म्हणूनहि अनुभव समृद्ध वित्त मंत्र्याचे, उत्साही आणि उत्सवी नेत्याचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर म्हणून ओळखल्या जाणार्या घरातील, घराण्यातील या संघ स्वयंसेवकाचे नेमके वर्णन करणार आहे, त्यांच्यावीशी काही कटू तर काही 
अविस्मरणीय प्रसंग येथे सांगणार आहे....

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र उत्तम आहेत, त्यांनी मंत्री मंडळावर आणि प्रशासनावर हळूहळू पकड घेतली आहे, मेक इन इंडिया यशस्वी पार पडल्याने लागलेल्या अकस्मात आगीचे देखील माध्यमांनी किंवा विरोधकांनी भांडवल केले नाही, आग लागल्यानंतर देखील जीवाची, संकटाची पर्वा न करता, देवेंद्र घटनास्थळी जागेवरून हलले नाहीत, निर्माण झालेला गंभीर प्रसंग त्यांनी मोठ्या खुबीने आणि ताकदीने हाताळला, सर्वांनी त्यावर देवेंद्र यांचे अगदी तोंडभरून कौतुक केले....थोडक्यात सबकूछ बढीया है, पण एक मोठा पेच फडणवीस आणि राज्यातल्या भाजपा नेत्यांवर ओढवलेला आहे, ग्रामीण भागावर देवेंद्र किंवा त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांची आणि भारतीय जनता पक्षाची अजिबात पकड राहिलेली नाही. विधान सभा किंवा लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाविषयी राज्यातल्या ग्रामीण भागातही चांगले वातावरण निर्माण झाले होते, पण काळ जसजसा पुढे सरकला ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर भाजपपासून दूर झाला, भाजपाचे हे अपयश त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष घेतो आहे, ग्रामस्थ पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे आकर्षित होऊ 
लागलेला आहे, त्यानंतर ग्रामीण भागावर मोठ्या प्रमाणावर पकड घेतली आहे ती शिवसेनेने, कॉंग्रेसविषयी मात्र राज्यात फारशी कुठेही सहानुभूती नाही, नागपूरचा मोर्चा यशस्वी करून दाखविला म्हणजे राज्यात कॉंग्रेसची हवा निर्माण झाली आहे असे अशोक चव्हाण किंवा कॉंग्रेस नेत्यांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे, पोट मोठे दिसले म्हणून कोणतीही स्त्री गरोदर असते असे नाही, अनेकदा पोटात वायू भरला तरीही पोट फुगते, कॉंग्रेसचे ते तसे आहे, ती जमलेली गर्दी म्हणजे पोकळ हवा होती, या राज्यात कॉंग्रेस फारशी हवा नाही, अशोक चव्हाण यांना प्रदेशध्यक्ष म्हणून लोकप्रियता देखील नाही, राज्य लुटणाऱ्या नेत्यांना ग्रामस्थ चांगले ओळखून असतात. वारे वाहते तसे शरद पवार राजकीय निर्णय घेतात, भाजपा त्यांच्यावर का विसंबून राहते, समजत नाही, भाजपा नेत्यांनी आपले जासूस सहजच 
मुंबईतल्या राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात पेरावेत, भाजपाला मग कळेल, शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष दरक्षणी ज्या खुबीने ग्रामीण भागावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर पकड घेतोय, पवारांच्या या नियोजनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील आश्चर्याने तोंडात बोटे घालेल. दुर्दैवाची बाब म्हणजे प्रशासनावर देवेंद्रपेक्षा राष्ट्रवादी पक्षाच्या माजी मंत्र्यांची आणि शरद पवार यांची अधिक घट्ट पकड आहे, त्यांची पकड अजिबात ढिली किंवा सैल झालेली नाही, अधिकारी बांधले आहेत.पैसे कुठे आणि कसे फेकावेत राष्ट्रवादीतल्या हिशोबी नेत्यांना त्यावर सखोल अभ्यास आहे, त्यामुळे सेना भाजपच्या नेत्यांपेक्षा, मंत्रीमंडळापेक्षा, राष्ट्रवादीतल्या नेत्यांची आणि दलालांची मंत्रालयात आणि एकूणच प्रशासनात लोकमान्यता किंवा पैसा मिळवून देणारी कामे अगदी सहज होतात. शिवसेनेचे मंत्री, राज्यमंत्री मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांची कामे करून द्यायला फारशी उत्सुक नसतात, अशावेळी वसंत डावखरे किंवा प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे सर्वांना चालणारे हुकमी ' गावमामा ' शरद पवार यांच्याकडे आहेत, शरद पवार यांनी फक्त इशारा करायचा अवकाश, सेनेचे मंत्री देखील हातात हात घेऊन डावखरे किवा पटेल यांच्यासंगे झिम्मा फुगडी खेळून मोकळे होतात.....

ज्या वेगाने राज्यातल्या भाजपची ग्रामीण भागावर विधानसभा किंवा लोकसभा निवडणुका होण्यापूर्वी अलीकडच्या काही वर्षात पकड निर्माण झाली होती, नितीन गडकरी, दिवंगत गोपीनाथ मुंडे, सुधीर मुनगंटिवार किंवा देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने राज्यातले 
ग्रामीण मतदार पायपीट करून, जनसंपर्कातून भाजपाकडे आकर्षित केले होते, खेचले होते,ते वातावरण हळूहळू बदलत चाललेले आहे, अर्थात रावसाहेब दानवे यांचे प्रदेशध्यक्ष म्हणून असलेले लिंबू टिंबू नेतृत्व हे देखील भाजपापासून दूर जाणार्या ग्रामीण जनतेस कारणीभूत आहे. सुधीरभाऊ, देवेंद्र, नितीन गडकरी, दिवंगत गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन हे भाजपा मधले सोलो हिरो होतो, गर्दी खेचण्याची त्यांच्यात ताकद होती, दानवे म्हणजे भाजपा मधले ' आलोकनाथ ' फार ते गर्दीतले एक नेते म्हणून बघायला बरे वाटतात, सोलो हिरो म्हणून त्यांना आजही नाही आणि उद्या देखील मान्यता मिळणार नाही. सिनेमा दिलीपकुमारकडे बघून चालायचा, मध्येच येणारा मुक्री थोडावेळ हसण्याकरिता म्हणून बरा वाटायचा, भाजपात प्रदेशाध्यक्ष म्हणून सोलो हिरो, गर्दी खेचणारा नेता, जनतेचा आकर्षण ठरणारा नेता काळाची, राज्याची, पक्षाची गरज आहे, दानवे यांची ना मंत्री मंडळावर पकड आहे ना ग्रामस्थांना किंवा जालना जिल्हा सोडला तर इतर सामान्यांना त्यांची ओढ आहे, आकर्षण आहे....

आता एका अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो, मंत्रालयात लोकांची, विशेषत: कार्यकर्त्यांची गर्दी ओसरू लागलेली आहे कारण पूर्वी पक्षाचा स्थानिक नेता किंवा कार्यकर्ता आपापल्या भागातली कामे घेऊन यायचा आणि मंत्री त्याची कामे करवून द्यायचे, या मंत्र्यांनी मध्यस्थ असलेले कार्यकर्ते किंवा स्थानिक नेत्यांना बाजूला सारून थेट दलालांना ' येऊ द्या ' धोरण स्वीकारलेले असल्याने ग्रामस्थ आणि मंत्री किंवा भाजपातले बडे नेते, हि नाळ तुटू लागलेली आहे, जी बाब पक्षाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे, येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीत यापुढे भाजपाऐवजी ग्रामस्थांनी शिवसेना किंवा राष्ट्रवादी पक्षाला कल दिला, कौल दिला तर त्यात फारसे आश्चर्य वाटून घेऊ नका....लायकीचे मंत्री म्हणून ज्यांचे नाव घेतले जाईल त्यात सुधीरभाऊ नक्कीच उजवे, ते वेगळे कसे, पुढे येणारे लिखाण त्यावर पुरावा असेल...

साधा सरळ माणूस दारू विक्रीच्या व्यवसायात उतरणे या राज्यात, या देशात शक्य नाही, पुरून उरणारी बिलंदर माणसेच हा अनेकांच्या संसाराची राख रांगोळी करणारा व्यवसाय करू शकतात, ज्या श्रीकांत जिचकार यांना तुम्ही या देशातले सर्वात आदर्श तरुण म्हणून बघत होता त्यांचा तर दारूच्या ठोक विक्रीचा व्यवसाय होता, त्याकाळी त्यांचे royal drinks कंपनीचे प्रकरण खूप गाजले होते, जिचकार यांनी अबकारी खात्याचा महसूल बुडविला म्हणून त्यांना भला मोठा दंड आकारण्यात आला होता, जिचकार अस्वस्थ होते, पुढे 
त्यातून त्यांना शरद पवार यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर बाहेर लढले, ज्या शरद पवार यांना डॉ. जिचकार नेहमी पाण्यात पहायचे, सडकून अगदी उघड राजकीय विरोध करायचे तेच पवार नेमके त्यांच्या मदतीला धावून आले. माजी मंत्री अनिल देशमुख किंवा विधान परिषद उपसभापती वसंत डावखरे यांच्यासारखेच पुरून उरणारे नेते या व्यवसायात आहेत, साधी सज्जन माणसे या व्यवसायात तुम्हाला औषधाला देखील सापडणार नाहीत. जेथे दारू विक्री तेथे गुंडगिरी, हे सूत्र ज्यांना सांभाळता येते तेच हा व्यवसाय करू शकतात आणि या व्यवसायातल्या तब्बल ४५० बेरकी, काळा पैसा खेचणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यावसायिकांशी या राज्याच्या एरवी साधे सरळ हसतमुख वाटणाऱ्या मंत्र्याने, वित्त आणि वन खात्याच्या मंत्र्याने थेट पंगा घेतला आहे, असे धाडस, असा बेधडक निर्णय कि जो या मंत्र्याला जीवघेणा, आयुष्य उधवस्त करणारा निर्णय ठरू शकतो. होय! श्रीमान सुधीरभाऊ मुनगंटिवार यांनी त्यांच्या home district मध्ये,चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घडवून आणली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारू विक्री बंदीचा निर्णय झाल्याने एकाचवेळी ४५० व्यापार्यांना त्यांची दुकाने बंद करावी लागलीत, विशेष म्हणजे एकदा का अमुक ठिकाणी दारू बंदी आली कि कोर्ट कचेर्या करून फारसा उपयोग होत नाही, अमुक एखाद्या ठिकाणी केलेली दारू बंदी पुन्हा उठविल्या गेली असे कधी घडत नाही. उद्या पुन्हा एकदा यापुढे दस्तुरखुद्द सुधीरभाऊ यांना जरी वाटले कि चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी हटवावी, उठवावी, ते त्यांना स्वत:ला देखील अजिबात शक्य होणार नाही, अगदी देशाचे पंतप्रधान देखील हा निर्णय प्रसंगी बदलवू शकणार नाहीत, त्यामुळे या व्यवसायात असलेल्या अनेक गुंड, खतरनाक प्रवृत्तीच्या, वाम मार्गाने पैसे मिळविणाऱ्या कित्येक मवाली दुकानदारांच्या मार्गात सुधीरभाऊ एखाद्या काट्यासारखे आले आहेत, त्यांच्या पायात रुतले आहेत, त्यातून त्यांना आता या व्यवसायातल्या अस्वस्थ लोकांनी त्रास द्यायला केव्हाच सुरुवात केली आहे, आम्ही सुधीरभाऊ यांना जीवनातून उठवू, असे उघड निरोप त्यांना थेट येतात, वेगवेगळ्या पद्धतीने, अत्यंत खालच्या थरातून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची बदनामी करण्यात येते, दारू विक्रीचा व्यवसाय बंद केल्याने चंद्रपूर जिल्ह्यातले खतरनाक गुंड प्रवृत्तीची माणसे थेट नक्षलवाद परिसरात पोहचून म्हणे सुपारी देऊन आले आहेत, याची संपूर्ण कल्पना, तंतोतंत माहिती असूनही सुधीरभाऊ घ्यायला हवे तसे संरक्षण घ्यायला तयार नाहीत, पोलिसांनी देखील त्यांना सांभाळून राहा, सांगितलेले आहे, कल्पना दिलेली आहे, पण एरवी, वरकरणी हसतमुख आणि शांत दिसत असलेले सुधीरभाऊ मनातून आपल्या निर्णयावर खुश आहेत, जनतेला दिलेले हे खतरनाक वाचन पाळले म्हणून मनातून सुखावले आहेत, धमक्यांना ते भिक घालतांना अजिबात दिसत नाहीत आणि त्यांना बदनाम करण्यासाठी, राजकारणातून कायम स्वरूपी उठविण्यासाठी जे षड्यंत्र सतत रचण्यात येते आहे, त्यावर देखील ते अजिबात विचलित झालेले नाहीत. मुठभर जिल्हा उध्वस्त करणाऱ्या व्यापार्यांना खुश न करता मी कित्येकांचे संसार राखरांगोळी होण्यापासून वाचविलेले आहेत, ती सारी कुटुंबे माझ्या पाठीशी ठाम उभी असतांना मला राजकारणातून संपविणे कोणाच्या बापाला शक्य नाही, असे सुधीरभाऊ अगदी उघड सांगतात, आणि जीवाची पर्वा न करता, कामाला लागतात....

फडणवीस मंत्री मंडळात जे भाजपाचे मंत्री आहेत, त्यातले बहुतेक सारेच गडकरी गटाचे आहेत, पूर्वी भाजपामध्ये गडकरी आणि मुंडे असे दोन मोठे गट होते पण मुंडे गेले आणि त्यांचा गट अस्तित्वात राहिला नाही, पंकजा राजकारणात अगदीच लहान,अननुभवी आहेत, त्यांना त्याच्या वडिलांचा गट सांभाळणे सोडा पण यापुढे स्वत:चा मतदार संघ देखील व्यवस्थित सांभाळता आला तरी ते त्यांच्या राजकीय प्रवासाच्या दृष्टीने आशादायी ठरेल, ठरावे. पण सध्या एकमेव नितीन गडकरी जोमात आणि जोशात आहेत, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून अनेक आव्हाने पेलायची होती, आहेत त्यामुळे आताच ते आपला स्वत:चा पक्षात राजकीय दबाव आणू शकणारा गट उभा करतील वाटत नाही. पण एक बरे आहे, जरी विदर्भातले बावनकुळे किंवा राज्यातले खडसे यांच्यासारखे प्रभावी बहुतेक मंत्री गडकरी गटाचे असले तरी जे सुरुवातीला भाजपा मध्ये अस्वस्थ वातावरण होते ते पूर्णत: निवळलेले आहे म्हणजे जरी प्रभावी मंत्री अगदी उघड गडकरी यांचे नेतृत्व मानत असले तरी ते थेट फडणवीस यांना देखील, विरोधासाठी विरोध करतांना दिसत नाहीत, ते एकप्रकारे बरे झाले अन्यथा फडणवीस यांचा बहुतेक वेळ पक्षातली धुसफूस थांबविण्यात गेला असता....

उद्या जर फडणवीस केंद्रात त्या पर्रीकर यांच्यासारखे गेले तर मात्र या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी फारतर खडसे किंवा सुधीरभाऊ या दोघांपैकी एकाचाच नक्की विचार करण्यात येईल. अमुक एखादी पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून घेतली म्हणून पंकजा मुंडे यांना वाटत असेल कि आपण उद्याच्या मुख्यमंत्री, तर तो त्यांचा भ्रम ठरावा, असे असेल तर उद्या मी रणवीर कपूरच्या खुर्चीत बसून दीपिकाला डोळा मारायला कमी करणार नाही. विषय सुधीरभाऊ आहे आणि आपण उद्या आणखी मोठे होणार आहोत, त्यांना माहित आहे, ते त्यातून सावध असतात, त्यांचा अजित पवार होणार नाही, ते तसे अर्थमंत्री होणार नाहीत.त्यांचे निर्णय, त्यांची मंत्री म्हणून कामगिरी लक्षणीय आहे....

पत्रकार हेमंत जोशी 
(९३२३६६११५०, ९६१९६३११५०)

Sunday, 28 February 2016

Revenue Department PostingsTransfers mean a a lot to the officers of Revenue Department of Government of Maharashtra. The months of March-April-May are heart wrenching months for these bureaucrats ranging from  the ranks of Deputy Registrar to Deputy Collector. After this new Government was formed in November 2014 in Maharashtra, without any prejudice or any doubt when Minister Eknath Khadse took control of this department, I knew there will be a story in this for sure. In our political circles,  it is a known fact that every bureaucrat is close to some or the other Minister either through his old alliance or through his spread of friends in the Revenue Department. Today's Ministers, were in  opposition party for almost 15 years; so these MLA's use to come to Mantralay for their work since then. Hence for followups, meeting with bureaucrats was routine. This time frame was enough for the bureaucrats to gain trusts of the MLA's, ruling today.  For example, in Nagpur,  even a hotelier is close to the Chief Minister and even a Sales Tax officer knows Finance Minister Sudhir Mungantiwar personally.

So closeness to Ministers and MLA meant "usage of such contacts" for Transfers. Ideally, if any bureaucrat is placed in any posting, it is mandatory for him or her to stay at that post for a minimum period of 3 years. After completion of his tenure, Government has the option of placing him some place else depending on the manpower requirement and yes, how many recommendation letters he gets! But our bureaucrats are one step ahead! Not only many of them get themselves transferred at places of their choice, but also if the Government has given them a X posting, they never resume their charge there. Using influence and power of money these bureaucrats amongst themselves find another bureaucrat say Y who is wanting a placement in the same area where his X person was posted by the Government, now both of them pitch in to the department and exchange postings. But this is done at a price! Now hangon, this procedure is only for the people who want to get posted at cream posts outside the mantralaya. In the Mantralaya, there are two terms which are used by these bureaucrats to benefit themselves rather than the system. One is "Deputation" and the other is "Loan Basis".  In both the cases, the officer is required to return back to his/her parent department after the allotted time frame/work is completed. Son/Daughter in class 10th or 12th OR Parents have become old or alone, are the common reasons, I found these errant officers give whilst getting their transfers done.

Simple example to cite. One officer who has reputation of "no compromise" (believe me, he will only give the impression but will accept expensive gifts for his daughter and family) Atul Khanolkar was a normal Asst Commissioner at Sales tax based in Mumbai. If anyone reading this and is not familiar, Sales Tax comes under Finance Ministry. That means Khanolkar must possess knowledge anything related to finance. So he should work with department related to it, correct? But here, it is surprising that in the new Government once while I was taking rounds in mantralaya, I see Atul Khanolkar posted as an Officer on Special Duty (OSD) to Minister Chandrakant Patil. Now this Minister has departments like PWD, Co-operation and believe me nothing to do with Finance. So how did Atul Khanolkar come here? It seems he has come on "Deputation". Now this policy of loan basis and deputing someone anywhere needs to be reviewed. It is in the hands of the General Administraton Department. Bhagwan Sahay, an able IAS officer incharge of this GAD is forming a new policy on Deputation. Readers, you will be surprised to know that there are many many officers who till date have never gone back to their parent department citing Deputation as their reason.

Another example that can stated is that of Krishna Jadhav, now an Officer on Special Duty (OSD) to Industries Minister Subhash Desai is originally from Revenue Department. But as destiny unfolds, a very powerful Congress Neta also known as "dada" in Konkan happens to know Krishna Jadhav very well. Apparently Mrs. Dada also inaugurated a beauty parlour which Krishna Jadhav's wife opened years ago. Krishna Jadhav is basically from Revenue Department who as per his connections mentioned above never resumed his charge as Deputy Collector anywhere. He straight went to his political boss cum friend cum relative and joined MIDC. A revenue officer in MIDC ? again in MIDC  the CEO transferred him to some place else, again Mr. Jadhav went to the ex Industries Minister and straight away, ignoring CEO, got a plum posting as Regional Officer Mhape in Navi Mumbai. In short, coming originally from Revenue Department, never ever Krishna Jadhav has seen his parent department never gone outside Mumbai. Now Jadhav is posted with Minister as OSD. Here also Krishna Jadhav did not stop his antics. Again A sales tax officer Mr. Garje was appointed as Private Secretary to the Minister. But again the whole department was controlled by Jadhav. Apparently there was a rumour that the PS was only responsible for taking couriers. Also Mr. Garje's image was responsible for his sending off back to the MIDC.  Now ex RO-Mhape  Dilip Ghutte, who had served after Krishna Jadhav left as RO-Mhape, is now PS to the Minister. Both Ghutte and Jadhav are having a gala time and tarnishing the image of otherwise decent Subhash Desai. Very soon I will be exposing a a big scam done by these duo under the nose of clean Minister and CM with M/s RPG Life Sciences plot at Mhape.

How exchanges take place understand below:

Dr. S Savargaonkar: Now this gentleman has worked with our ex Chief Minister Prithviraj Chavhan as Private Secretary and also at MIDC as General Manager (PRO) when the President's rule was imposed in Maharashtra. When Prithviraj Chavhan government changed hands, this Dr Savargoankar got himself posted at MIDC. I fail to understand how a revenue department can go to MIDC? Then gentleman pays his visit to a Minister from Pune and gets a recommendation letter to transfer him elsewhere. Revenue Department, even though he hasn't completed 3 years at MIDC, based on the letter of Minister, now gives him a post of Deputy Collector Osmanabad. Now Dr. Savargaokar is not the one to take things what Government gives. He finds another way to avoid this posting and meets one Dr. Pradip Marwaale who is posted as Director-Mahsul Prabhodhini at Aurangabad. These two exchange more than words, I am sure! Apparently Dr. Marwaale is having some disease and is a regular traveller to Latur, his hometown. Now both come with up exchange offers. Dr. Savargaokar "Demands" government to put him in Aurangabad (his hometown) and shift Dr. Marwaale to Latur ( so that he can spend quality time with his parents). So Dr. Savargaonkar is now finally at Aurnagabad and Dr. Marwaale has been transferred to Latur. Post at Osmanabad which was officially vacant,  still remains so! Now apparently MIDC's post of Dr Savargaonkar is occupied by Rajendra Ahirwar (yes the same person who was Private Secretary to then Minister-Food & Civil Supply Anil Deshmukh ).

This is how arrangements in Revenue Department are made as per your contacts you can go to places. Also, this is not a tradition that has just started. It has existed in the system since ages, and if gossips are to be believed, Minister Eknath Khadse is trying to uproot the problem with his own hands. A new policy has been drafted to stop this errant babus who are not ready to leave plump positions even if they are transferred. Then what happens, good officers with more sound knowledge and guts remain somewhere in the far fetched Maharashtra leaving the state HO, at the mercy of these  errant officers.  Will also in my next blog, handover a list of such officers who from years are only on "Deputation". 

Monday, 22 February 2016

काय म्हणावे पंकजा यांना, कार्टी कि सुकन्या...?


महाराष्ट्रातील तमाम वंजारा समाजाचे दैवत म्हणजे भगवानबाबा आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे. विशेषत: गोपीनाथ मुंडे यांनी पाथर्डी, अहमदनगर

चा भगवानगड समृद्ध केला, त्यातून दरवर्षी जो मेळावा मुंडे हयात असतांना त्यांच्या नेतृत्वाखाली भगवानगडावर भरविल्या जायचा, त्या मेळाव्यातील गर्दी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्याला देखील मागे टाकायची. गोपिनाथ्जी यांना मृत्यू ओढविल्यानंतर २०१५ च्या मेळाव्याचे नेतृत्व त्यांच्या कन्येने म्हणजे पंकजा यांनी केले, विशेष म्हणजे या मेळाव्याला अलोट,  तुफान गर्दी वंजारा समाजाने केली होती, ज्या गर्दीने गोपीनाथजी यांनी भरविलेल्या सार्या मेळाव्यांचा उच्चांक मोडला पण पंकजा यांच्या नेतृत्वाखाली भरलेल्या या मेळाव्याला सर्व वाहिन्यांनी आणि वृत्तपत्रांनी प्रसिद्धी देणे टाळले, नेमके कोण सांगता येणार नाही पण पंकजा यांच्या एखाद्या राजकीय शत्रूने डाव साधला, हे मात्र १०० टक्के सत्य....
मित्रहो, अत्यंत महत्वाचे म्हणजे भाजपाचा प्रचंड व्याप सांभाळता सांभाळता दिन रात पायपीट करून संपूर्ण राज्यातील वंजारा समाजाला एकत्र आणून त्यांना ताकद देण्याचे मोठे काम फक्त आणि फक्त गोपीनाथ मुंडे यांनी केले, उगाच वंजारी समाजाने त्यांना देवघरात आणून बसविलेले नव्हते, नाही.... मला नेमके आठवते, पुतणे धनंजय यांनी सक्रिय राजकारणात येण्याची तयारी १९९५ पासूनच सुरु केली होती जेव्हा गोपिनाथ्जी या राज्याचे उपमुख्यमंत्री होते, गोपीनाथ यांचे बोट पकडूनच धनंजय राजकारणात आले, मोठे झाले, पुढे मात्र त्यांनी आणि पंडितराव मुंडे दोघांनीही गोपीनाथजी यांची साथ सोडली. सत्तेत वाट मिळाला नाही कि नेता मग तो कुठलाही असो, उतावीळ होतो, आणि तत्व किंवा प्रेम बाजूला ठेवून आपापसात चढाओढ निर्माण करतो, धनंजय आणि पंडितराव यांच्याबाबतीत नेमके तेच घडले....
थोडक्यात, धनंजय यांना राज्याचे राजकारण अजिबात नवीन नव्हते जेव्हा त्यांनी गोपीनाथजी यांना सोडून शरद पवार यांचे बोट धरले, अर्थात धनंजय हे गोपीनाथ यांची त्यांच्या समाजातलि जागा केव्हाच म्हणजे गोपीनाथ यांच्या मृत्युनंतर लगेच घेऊ शकले असते पण त्यांची एकमेव मोठी चूक म्हणजे त्यांनी शरद पवार यांच्याशी सलगी केली, मी पंकजा यांच्यावर केवळ चार ओळी विरोधात टाकल्या टाकल्या तर मला अतिशय तिखट प्रतिक्रिया ऐकून घ्याव्या लागल्या, पवार यांनी तर गोपीनाथ यांना कधीही सुखाने राजकारण करू दिले नाही, सतत त्यांचा हरप्रकारे राजकीय छळ
केला, त्यांना दरवेळी अडचणीत आणले, अनेकदा संकटात टाकले, मग आपल्या देवाला त्रास दिलेल्या शरद पवार यांना वंजारा समाज कसे जवळ घेईन, त्यांच्या मनात आपल्याविषयी अत्यंत राग आहे, हे पवारांना चांगले ठाऊक होते, हा समाज आपल्यापासून दूर आहे, हे शल्य पवार यांना सतत अस्वस्थ करायचे, हा समाज कसा जवळ करता येईल, गोपीनाथ यांच्यापासून किमान काही प्रमाणावर कसा तोडता येईल, हा विचार त्यांच्या कायम डोक्यात होता, आणि पवार यांना आयती संधी चालून आली, गोपीनाथ यांचा राजकीय वारसदारच अगदी अलगद पवारांच्या जाळ्यात आला, त्यांची मोहीम फत्ते झाली पण अद्याप ती मोहीम यशस्वी झालेली नाही कारण पवार यांच्याविषयी वंजारा समाजाला मनापासून, मनातून राग आहे, त्यामुळे धनंजय यांचे नेतृत्व गोपीनाथ यांची हुबेहूब नक्कल करणारे असले तरी त्यांची बसण्याची जागा चुकलेली आहे, त्यांनी पवार यांचे नेतृत्व मान्य करून सध्यातरी आपले राजकीय नुकसान करून घेतलेले आहे. धनंजय यांनी राष्ट्रवादी व्यतिरिक्त अन्य कुठल्याही पक्षात प्रवेश केला असता तर केव्हाच धनंजय यांनी पंकजा यांना मागे टाकले असते, कारण तुलनेत धनंजय हे दुसरे गोपीनाथ आहेत आणि पंकजा सामान्य वंजारा समाजाकडे हवे तसे ध्यान द्यायला, या समाजाची पाहिजे तशी दखल आणि काळजी घ्यायला तयार नाही, जसे हुबेहूब बाळासाहेब असूनही राजकीय चुकांमुळे राज ठाकरे मागे पडले आणि सामान्य उद्धव पुढे निघून गेले ते तसे पंकजा यांचे झाल्यासफारसे आश्चर्य वाटणार नाही, त्यांचा राजकारणात ' राज ठाकरे ' होऊ शकतो, जर त्या गोपीनाथ यांच्याप्रमाणे वंजारा समाजाला आपल्या परमेश्वर वाटल्या नाहीत तर....
वंजारा समाजातील, पुण्याजवळचा एक राजकीय जाणकार, राजकीय अभ्यासक, बुद्धिमान व्यावसायिक तरुण माझा मित्र आहे. गोपीनाथजी यांच्या मृत्युनंतर अत्यंत भावूक होऊन त्याने गोपिनाथ्जी यांचा राजकीय प्रवास असा संदर्भ पकडून एक दिनदर्शिका नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी काढली, उद्देश हाच, ती दिनदर्शिका वंजारा समाजाच्या घराघरात भिंतीवर लागेल आणि त्यानिमित्ते का होईना हा त्यांचा देव गोपीनाथ, त्याचे दर्शन दररोज सर्व समाजाला घडेल, मोठ्या कौतुकाने त्याने प्रत्यक्ष भेट घेऊन ती दिनदर्शिका पंकजा यांना भेट दिली, त्यांच्या हाती दिली, आश्चर्य म्हणजे पंकजा यांनी त्या १२ पानाच्या दिनदर्शिकेचे साधे एक पान देखील उलटून न बघता, आपल्या पिएकडे सोपविली, याच याच तरुणाने गोपीनाथजी यांचे जवळपास १००० पुतळे तयार केलेत, त्यातला एक पुतळा मुद्दाम पंकजा यांना भेट दिला पण दिनदर्शिकेप्रमाणे पुतळ्याचे देखील झाले. विशेष म्हणजे हा वंजारी तरुण एक विमान खरेदी करणार आहेत, ती बातमी त्यांनी जेव्हा फोनवर धनंजय यांना सांगितली, आधी धनंजय यांनी केंद्रे यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली, त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि वरून म्हणाले, काहीही मदत लागली तर हक्काने सांगा, मदत नक्की करता येईल. पंकजा यांचे हे असे वागणे सुरु राहिले तर मात्र त्यांना आयती मिळालेली लोकप्रियता घसरायला आता फारसा वेळ लागणार नाही....
गोपीनाथजी आणि मी कसे एकमेकांशी जिवलग होतो, हे मी न सांगता तुम्ही राहुल महाजन, मुकुंद कुलकर्णी, सुनील दत्ता राणे, अतुल भातखळकर इत्यादींना विचारा, ते त्यावर अधिक छान माहिती देतील. त्या माझ्या मित्राच्या मुलीला मी तीन वेळा तिच्या कार्यालयात भेटायला गेलो, ताटकळत उभे राहून पंकजा यांच्या, दुकान्दारीत अधिक रस असणार्या स्टाफने, माझी भेट घालून दिली नाही किंवा पंकजा यांना मी फारसा महत्वाचा वाटलो नसेल, विशेष म्हणजे तिन्ही वेळी मी माझे कार्ड त्यांच्या स्टाफला दिले, पण त्यांच्या कार्यालयातून आजतागायत मला बोलावणे आलेले नाही, गोपीनाथजी मात्र मी दूर कोपर्यात जरी उभा असलो तरी पटकन बोलावून घ्यायचे. धनंजय यांच्याशी देखील माझा फारसा परिचय नाही, त्यांना आजतागायत मी एकदाही भेटलेलो नाही, सांगण्याचा अर्थ असा कि धनंजय यांच्याशी मैत्री म्हणून पंकजा यांच्यावर टीका, असा प्रकार येथे नाही उलट आपल्या दिवंगत मित्राच्या कन्येचे राजकीय नुकसान होऊ नये असे मनापासून वाटले म्हणून शाब्दिक समाचार घेतला, ऐकणे अथवा न ऐकणे हे पूर्णत: पंकजा यांच्यावर अवलंबून आहे. पंकजा मला भेटल्या नाहीत म्हणून मी त्यांच्यावर टीका केली असेही अजिबात नाही, एवढ्या खालच्या पातळीवर मी कधीही एखाद्याचा बदला घेत नाही, माझी ती पद्धत नाही. बापाने भरपूर कमाई करून ठेवलेली आहे, तो मोह मंत्री म्हणून पंकजा यांनी टाळावा, सभोवताली दलाल नव्हेत तर मराठवाड्यातला सामान्य माणूस, मतदार संघातला कुठल्याही विचारांचा मतदार आणि वंजारा समाजातील बंधू तसेच भगिनी, निदान यापुढे तरी पंकजा यांच्या भोवताली दिसायला हवेत आणि मान वर करून न चालता, जमिनीवर चालणार्या सामान्य माणसाला सहकार्य करून पंकजा यांनी बापसे बेटी सवाई ठरावे....