Thursday, 25 June 2015

भ्रष्टाचार केलाच पाहिजे!!

छगन भुजबळ लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. अजित पवार आणि सुनील तटकरे त्यातून बचावले, अस म्हटल तरी आता  चूक होणार नाही. हे आम्हा पत्रकारांना तेव्हाच समजले, जेव्हा मोदी साहेब बारामतीला गेले. या सगळ्या लेखाजोकात भुजबळांचा "बळी" दिला गेला. हो बळीच! "राजकीय सेटिंग" यालाच म्हणतात.  तुम्हाला या ब्लोग मार्फत आज थोडीशी वेगळी दिशा येथे देऊ इच्छितो.  विचार करा. पटेलच असे नाही!!

शेवटी भ्रष्टाचार ही समजाला लागलेली एक कीड आहे. माझ्या मतानुसार पुढली ५० वर्षे तरी आपल्याला, आपल्या स्वप्नातले सरकार बघता येणार नाहीय, हे निश्चितच. आमचे बाबा म्हणतात तसे. आपल्या कडे, म्हणजे महाराष्टात, हिटलर जन्माला आला पाहिजे. किवा किमान २५ वर्ष तरी हुकुमशाही हवी. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, जे कोणी पहिले ५०० लोक भ्रष्ट आहेत,  त्याना सरळ फाशी दिली पाहिजे. तरच आपणा सुधारू!! असे चालत राहिले तर मग कोणीही येवो, अगदी स्वतः  भगवान कृष्णाने मुख्यमंत्री पदाची जरी शपथ  घेतली, तरी आपणा सुधारणार नाही, हे तुम्ही अगदी पक्के मानून चाला. मागच्या महिन्यातील सलमान खान चे उधाहरण घ्या. पैश्यांच्या जोरावर तुम्ही दारू प्यायची, वाटेल तो धिंगाणा घालायचा, लोकांना मारायचे, आणि इन्स्पेक्टर ची भूमिका करून आम्ही कसे देशभक्त आहोत, हे सांगून मोकळे व्य्हायचे. काही अर्थ आहे का याला? जे सिनेमा जाणकार असतील किवा ज्यांचा कडे या "बीट" च्या  "ऑफ द रेकॉर्ड" बातम्या असतील त्यांना विचारा… किती भयंकर आहे हा सलमान खान? मग्रूर आणि व्यसनी. "बिंग ह्युमन" संस्थेची माहिती घ्या. पैसा कुठून येतो, कुठे जातो? कोणता "बाबा" राजकारणी यांच्या मर्फ़ात पैसे वेगवेगळे हॉटेल, पब मध्ये गुंतवणूक करतो? आमिष दाखवून कित्येक स्त्रियांचे आयुष्य हे लोक बरबाद करतात. मी फार जवळून बघतो. मी यांच्या परिसरात राहत असल्याने अनेक किस्से कानावार येत असतात . असो. विषय आहे  भ्रस्टाचाराचा! 

 कस असत, राजकारण  म्हटल कि भ्रष्टाचार, आणि, फक्त भ्रष्टाचार!  कारण एक मेकांवर पाय ठेऊनच इथे पुढे जायाच 


असत, हा जणू इथला " रूल "  आहे.  साम, दाम, दंड भेद हि सगळीच अस्त्रे  हमखास  वापरली  जातात.  पण हे सगळ करण्यापलीकडे खूप कमी नेते असतात, जे स्वतः  मोठे होत असताना, इतर लोकांनाही खूप मोठे  करत असतात. जे दिलदार असतात. ज्यांच्यात काही करण्याची उमेद असते, पण शेवटी हे लोकही " त्या " काळाचे सिस्टम मधून आलेले आहेत,  हे आपण लक्षात घेतले पाहिजे.  शरद पवार, कै. आनंद दिघे , छगन  भुजबळ, नारायण राणे, मनोहर जोशी, सुनील तटकरे, नितीन गडकरी, कै. गोपीनाथ मुंडे असे कितीतरी राजकारणी आहेत ज्यांच्या मोठ्या मनाबद्दल मी ऐकून आहे.  या लोकांनी जर भ्रष्टाचार केला आहे, तर याच लोकांनी महाराष्ट्र पण घडवला आहे, अगदी १० % का होईना , हे सत्य तुम्हाला मानवच लागेल. तुम्ही सांगा, कोण तुमच्यापैकी रोज १२ वाजता झोपून, सकाळी ४ वाजता उठता?  आणि दारात सकाळच्या ६ वाजे पासून लोकांची कामे करता?.  दिवसभर कामे करायची, तब्येतीकडे दुर्लक्ष करायचे, (रोग पचवायची किवा त्यावर मात करायची) संसाराकडे दुर्लक्ष करायचे आणि फ़क़्त आणि फक्त कामात राहायचे. दारोज 

अभ्यास करणे,  मीटिंग घेणे,  मह्तव्हाचे निर्णय घेणे, सत्ता टिकवण्यासाठी श्रम, आपल्याहून पुढे कोणी जात नाही 

याच्याकडे लक्ष, सतत टेन्शनस असतात या राजकारण्यांवर … कारण एकहि  चुकीचा निर्णय घेतला तर अख्खं महाराष्ट्र 
यांच्याच डोक्यावर येत!!  वर नमूद केलेला दिनक्रम आहे राष्ट्रवादीच्या अजित पवार यांचा. शरद पवार तर हे गेली ५० वर्ष करीत आहे. विचार टकले साहेबांना. पण याच अजित पवार याची दुसरी बाजू बघा…  सतत कामात असल्याने पवारांना मात्र पोराकडे दुर्लक्ष केले. नुसता पैसा कमवून, चालत नाही दादा.  पार्थ बघा कसा धिंगाणा घालत असतो.  मध्ये वाचले होते त्याच्या बद्दल.  आपल्याला एक गोष्ट मान्य करावी लागेल. भ्रष्टाचार सहन करण्याची  मानसिक तयारी करावी लागेल . हा काही सिनेमा नाही. कि आज विचार केला आणि आपण भ्रष्टाचार संपविला…  
कसे चालते ते बघा … समजा सरकार मध्ये  १०० रुपयांचे काम असत, त्याचे हे लोक (मंत्री, अधिकारी आणि कंत्राटदार) 
२०० रुपयांचे बिले लावतात  आणि १० रुपयांचे "खर काम" करतात. कधी कधी तर ते पण नाही करत.  म्हणजे  सरळ सरळ १९० रुपये राजकारणी, अधिकारी आणि कंत्राटदारच्या खिश्यात घालतात.  तुम्ही असे का नाही करात हो मंडळी ? 
कि बाबारे, जर १०० रुपयांचे काम करायचे असेल तर तुम्ही त्याचे बिल १२० रुपयांचे लावा, पण काम मात्र ९० रुपयांचे तरी करा. ती कामे दिसू द्या .यात जर तुम्ही दोन पैसे खालले तरी कोणी तुम्हाला काही म्हणणार नाही, हे प्रामणिक मत माझे आणि माझ्या काही व्यावसायिक मित्रांचे आहे.  आज आपल्याला प्रगती करायची आहे. तुम्हाला सांगतो, प्रत्येक माणूस आपली दुसरी पिढी परदेशात पाठवण्याच्या मार्गावर आहे. साल, भारताचे दिवस, आणि बाहेर का जायचे आम्ही? अख्खं जग इथे धंदा करायला येत आहे, आणि आपल्याकडे सुविधा नसल्याने/भ्रष्टाचारामुळे  आपणच बाहेर का जायचे?  नो। नेव्हर!! 

अहो भुजबळ यांनी जे पैसे कमाविले, त्यात मोठ्ठा वाटा आहे समीर भुजबळ याचा… लई महत्वाकांक्षी!! हाताशी अभियंते, सिंधी दलाल आजूबाजूला (सा. बां. विभागात हा एल. टी कोण हा लेख लोकसत्तेने दोन वर्षांपूर्वी छापला होता) , वयाची मस्ती, आपले कोण काय उपटणार हि भावना, समता परिषद च्या नावाने पवार यांना सतत ब्ल्याक्मेल, कोण खपवून घेणार होत? कोणत्या पक्षाने हे होऊ दिले असते?  आणि सगळ्यात वाईट काम भुजबळ कुटुंबीयने जर केले असेल तर ते कर्वेला दुखावून!! आहो ते कर्वे किती दिव्होटी होते तुमच्या कुटुंबां बद्दल? … एखाद्या धंद्यात लक्ष नाही घातले असते तर आज हि नाचक्की झाली नसती. तो तुमचा सी. ए. होता ना?  तुम्ही चड्डी कोणती घालता हे सुद्धा त्यांना माहित होते. बाहेर येणारच… पण आपला खरा सलाम बॉस देवेंद्र फडणवीस आणि श्रीमान प्रवीण दिक्षित यांना. एवढ्या मोठ्या नेत्याला संपविणे म्हणजे काय खेळ होता का? केवढे प्रेशर असेल त्यांच्यावर? पण साहेब आता तरी याच धाधाडीने भरपूर नावे आहेत ज्यांच्या कडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे… "आगे आगे देखो होता है क्या"? हि फडणवीसांची धमकी कोणासाठी होती? तरी अजित पवार, तटकरे, जयंत पाटील, सचिन अहिर, गणेश नाईक, शिवाजीराव मोघे, बाळासाहेब थोरात, मधुकर पिचड,  अनिल देशमुख तुम्ही सगळे जरा सगळ सगळ आटोक्यात घ्या बर… काहीही सांगू शकत नाही काय चालंय या दोन शूरवीर "ब्राह्माणाच्मनात ? एखाद वेळी गडकरी आणि खडसे साहेब तुम्ही सुद्धा जरा जपून वागा बर.  फडणवीस मोदींचे  लाडके आहेत   असे लोकच सांगतात.  

पैसे कमाविणारे लोक मला सांगतात कि अरे भाऊ पुढच्या पिढीची सोय करायची आहे… अहो पण  पैसा कमविणे पाप नाही, पण तुम्ही लोक असे कमविता कि जसे तुमची पुढची पिढी हि " नामर्द" च  होणार आहे…अमेरिकेत, किवा कोणत्या हि पश्चिम देशात एकदाचे पोर १८ वर्षांचे झाले कि त्याला घराच्या बाहेर काढले जाते. त्यानेच त्यांच आयुष्य सुधारत. आपला पोरगा सेट होई पर्यंत "ब्रेड बटर" द्या ना… कोण नाही म्हणतय?  इथे आपले  पोराचे पोर पण होऊ द्या तरी आपले कमविणे मात्र सुरूच राहिले पाहिजे, अशी स्मजूद आपले राजकारणी करतात आणि तेथेच  ते चूक करत आहेत, आपली पुढची पिढी "नपुंसक" बनवत आहेत!!!  आता लक्षात नाही येणार, पण जेव्हा हाच पोरगा तुमचा चावा घेईल, किवा एखादा व्यसनाधीन होऊन एखादा रोग पाछाडेल, तेव्हा वेळ मात्र निघून गेली असेल… पुत्र प्रेम असणे गैर नाही पण आपल्याच हाताने त्यांचा तुम्ही खून करत आहात हे लक्षात घ्या…इंग्रजीत एक म्हण आहे, " Anything in excess is Poison"

 तूर्त एवढंच !!!! 

STRICTLY OFF THE RECORD...

१. धडाडीच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी हाती घेतलेल्या कामांवर मंत्री खडसेंनी स्थगिती आणल्याबद्दल शिवशंकर भोई अजिबात जवाबदार नाहीत, असे गृहीत जरी धरल तरी कसे चालेल?  सरकारच्या वादग्रस्त भूखंडावर बांधण्यात आलेल्या बेलापूरच्या "फोरेस्त हिल" सोसायटीतील सारी घरे सील करण्याची कारवाई जोशी यांनी हाती घेतली होती. यावर खडसे यांनी स्टे आणाला.  एका दैनिकातील वृत्तानुसार त्या सोसायटीत भोई यांचा अलिशान सदनिका आहे. खडसे यांच्या पासून भोई , शिवाजी मोघेपासून प्रशांत अल्ल्याडवार ,अजित पवारांपासून सुरेश जाधव , तटकरे पासून महेश कुलकर्णी, पंकजा मुन्डेपासून सतीश मुंडे विभक्त का होऊ शकत नाही हे मला अध्याप समजलेले नाही.

२. प्रत्येकाला बांद्रा ( पूर्व ) येथील " एफडीए "  इमारत नक्कीच माहित असणार.  आता बरोब्बर त्याचासमोर ज्या ठिकाणी भलीमोठी  इमारत उभी आहे, त्याचा ही भूखंड अन्न व औषधे विभागाचाच होता  .. पण वरिष्ठ आय.ए.एस आणि आय.पी.एस अधिकाऱ्यांची घरे बांधण्याचे ठरले. त्या भूखंडावर "जास्मिन कोऑपरेटीव हाऊसिंग सोसायटी " बांधण्यात आली. आय. पी. एस एसपीएस यादव या सोसायटीचे मुख्य प्रमोटर आहेत. त्या सोसायटीच्या फ्ल्याटधारकांची यादी जेव्हा बघितली तेव्हा मला धक्काच बसला. माजी उपनगर जिल्हाधिकारी चिमणराव  संगीतराव आणि डॉ संजय चहांदे यांनी त्यांच्या कार्यकाळात (जिल्हाधिकारी असताना) एक एक सदनिका आपापल्या नावावर करून घेतली. असे किती तरी सनदी अधिकारी आहेत ज्यांच्या कडे असे सरकारी सदनिका आहेत, पण वास्तविक ते  त्या फ़्लतमध्ये न राहता जवळच्या कोर्र्टर मध्ये राहणे पसंद करतात . हे चुकीचे नाही का ? असो. एक निरीक्षण…  पाटलीपुत्र, वसुंधरा , जस्मिन या सर्व सोसायटीच्या आवारात जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला हमखास एखादी बँक तरी दिसेल किंवा एखादे शोप्पिंग सेंटर तर निश्चितच असेल. आपल्याला देखबाल दुरुस्ती खर्च सुद्धा येऊ नाही, म्हणून अधिकारी आधीच या धंद्यावाल्यांशी सेटिंग करतात… तिसरे निरीक्षण-- या अधिकाऱ्यांची घरे  रिकामे न ठेवता त्याला भाड्यावर दिले जाते.  बाजारभावापेक्षा कितीतरी कमी दराने आपले फ़्लट कॉर्पोरेट अधिकार्यां कडून चेकने येणारी रक्कम असते… उरलेली रक्कम नकद स्वीकारली जात असते.

३.  सनदी अधिकारी  सतीश गवई  यांची बदली झाल्यामुळे मंत्री प्रकाश मेहता भलतेच आंनदी आहेत . आता ते आपल्या सर्व मीटिंग मरीन ड्राईव येथील इंटर्कॉन्तिनेन्ताल हॉटेलमध्ये घेतात. पूर्वीच्या सरकारमध्ये डीलिंग एज्णट आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मिटिंग या हॉटेलमध्ये व्हायच्या. सम्राट ,स्टेटस .ओबेरोय, ट्रायदेण्ट हि हॉटेल्स लोकांच्या नजरेत असल्यामुळे इंटर्कॉन्तिन्टेल हॉटेल पसंद केल जायचं. प्रकाराभाईनी हे बदनाम हॉटेल का निवडल हो?

४. आगमी काही महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हटवून त्यांच्या जागी भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी यांची वर्णी मुख्यमंत्री पदावर लावली जाणार आहे, अशी मंत्रालयात जोरदार अफवा कोणीतरी पसरवत आहे. कोणत्या बेस वर हि अफवा उडवली जात आहे, आणि या बातमी मागे सुत्रधार कोण आहे, याचा  शोध घेतला पाहिजे.

५. जनतेसमोर येण्यापूर्वी मग ती साधी पत्रकार परिषद का असेना आपला मेकेअप करण्यासठी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी " कदाचित " एका व्यक्तीची नेमणूक केली आहे.  मी खडसे यांना इतके गोरे, केस व्यवस्थित सेट केलेले आणि भुवया काळे असलेले कधीच पहिले नाही.

६. मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे हे भर उन्हाळ्यात/ पावसाळ्यात कोट का घालून फिरतात हे मला कोणी सांगेल का?

७. पृथ्वीराज चव्हाण तसे भयंकर खुन्नस ठेवणारा व्यक्ती. शंकर भिसे नामक अधिकार्याची हि कहाणी.   गेली ८ वर्ष भिसेना एकही पद देण्यात आले नव्हते. कारण सांगू? शंकर भिसे हे दिवंगत विलासराव देशमुख यांच्या गोटातील माणूस. ते मुख्यमंत्री असताना त्यांचे भिसे स्वीय सहायक होते. नंतरच्या काळात विलासराव पदावरून हटले, अशोक चव्हाण आले. ते हटले, आणि अर्थातच भिसे यांना सुद्धा आपले पद सोडावे लागले.  स्वतः विलासराव एकदा अशोक चव्हाण मुख्यमंत्री असतना भिसेला पोस्टिंग द्या म्हणून भेटले होते. अशोक रावांनी काहीही केले नाही.  नंतर आलेल्या बाबांनी कसेबसे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्तपद दिले, पण निवडणूक आयोगाच्या चुकीच्या धोरणाने परत भिसेना एका दिवसात घरी पाठवण्यात आले. जे काम त्यांनी केलीत, जे नियमबाह्य होती, तरी या पृथ्वी बाबाने आपल्याच अधिकार्याची साथ नाही दिली. मग कसेबसे करून पुन्ह भिसे यांनी मात्र सगळी यंत्रणा कामला लावून जुन्या ओळखी काढून पृथ्वी बाबाला दिल्लीहून "मेसेज" दिला… आता भिसे एस. आर. ए मध्ये कार्यरत आहेत. सांगण्याचा उद्देश असा, कि आपलयाला वाटत असते, कि अधिकारी, पुढारी हे सगळ्या एक पठडीचे! पण असे नसते!! जो दिखता है, वैसा होता नही !!

Thursday, 18 June 2015

असाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर

कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्याकार्त्यानी त्यांना लांबच ठेवले. पण त्यामुळे या पत्रकारांना काहीच फरक पडला नाही. ते ज्याच्याशी पंगा घेतात, विरोधात लिहितात त्यांच्याकडून अथवा त्यांच्या बॉस कडून काय परिणाम होतील याची चिंता कधीच करत नाहीत. पण तुम्ही राजकीय वार्तांकण  आणि गुन्हेगारी वार्तांकण याची तुलना केली तर गुन्हेगारी वार्तांकण हे मला अधिक आव्हानात्मक वाटल आहे. दर दिवशी तुम्ही मंत्रालयात बसून राजकारणी, सरकारी अधिकार्यांची लफडी बाहेर काढली तर तुमचा खून होणार नाही! जास्तीत जास्त तुमच्यावर खटला दाखल केला जाइल. अगदीच फार फार तर नेत्यांच्या चाम्च्यांकडून तुम्हाला फोन वरून धमक्या येतील. माझ्या मतानुसार गुन्हेगारी वार्तांकण हे सर्वस्वी वेगळच आहे. जे पत्रकार सातत्याने ग्यन्स्टर, पोलिस, यांच्या विरोधा लिहितात त्यांना मी सलाम ठोकतो! अनेक वेळा त्यांना माहित असते कि जे आपण लिहितो, त्या मुले आपल्या जिवावर बेतू शकते. त्यात हि काही पत्रकार व्यक्तीक स्वार्थासाठी गुन्हेगारांच्या इतके जवळ जातात कि त्यांची त्यातून सुटका नसते. जे. डे, जीगना वोरा आठवतात ना? पण राजकीय वार्तांकनात तीच धडाडी दाखवणारे पत्रकार हि आहेत. भाऊ तोरसेकर, प्रवीण बर्दार्पुरकर, ज्ञानेश महाराव, प्रफुल  मारपकवार, हेमंत जोशी (माझे वडील), प्रवीण चुंचूवार, अतुल कुलकर्णी, यदु जोशी (माझे काका) संदीप आचार्य, किरण तारे, विवेक भावसार, धर्मेंद्र जोरे इत्यादी हे त्या पठडीतले पत्रकार! हे सर्व खर्या अर्थाने महाराष्ट्रातील लढवय्ये पत्रकार आहेत. कशाची हि अपेक्षा न बाळगता, निस्वार्थीपाने ते काम करत असतात. त्यांना लिहिताना, बोलताना मी ऐकले आहे. खरच जबरदस्त!! तसेच काहीसे माझे गुरु यजुर्वेदी राव व अनिल गलगली आहेत!

गुन्हेगारी वार्ताहराना भेटून, त्याच्याशी बोलून, त्याना जाणून घेण्याची जीग्न्यासा माझ्यात नेहमीच असते. त्यापैकी काहीजण खूपच मोठे आहेत. हुसेन झैदी हे त्यातले राजेच!! मी सचिन तेंडूलकरला ओळखतो पण त्याने मला ओळखले पाहिजे ना? पण झैदी साह्बे मला चांगलेच ओळखतात!! त्यांची Black Friday, Dongri to Dubai, Byculla to Bangkok, Headly & I, Mafia Queens of Mumbai अशी एकापेक्षा एक मुंबईतील गुन्हेगारी विश्व उलघडवून मादाणारी पुस्तके लिहिली. झैदी साहेबांनी बहुतेक सर्वच इंग्लिश मिडीया, पब्लिकेशन हौसेस मध्ये कामे केली आहेत. आपल्या हे महत्वपूर्ण योगदानाबद्दल झैदी साहेब शुक्रिया!!

गेल्या आठवड्यात केतन तिरोडकर यांना भेटण्याचा योग आला. तिरोडकर म्हणजे फायर ब्र्यांड! पत्रकार, कार्यकर्ता आणि लढवय्या असा अफलातून माणूस! आता ते माझे मित्र झाले आहेत. मला माहित आहे कि तुमच्या पैकी अनेकजण केतन तिरोडकर ओळखत असणार. त्यांची पार्श्वभूमी मला माहित आहे (विकिपिडीया जरूर वाचा). पण कसे माहित नाही जेव्हा प्रथम या सद्गृहास्ताना भेटलो, तेव्हा मी एकदमच भारावून गेलो. टाईम्स ऑफ इंडिया मध्ये पत्राकारीचे धडे घेतलेले तिरोडकर "आफ्टरनून" साठी अनेक वर्ष गुन्हेगारी वार्तांकन करत होते. पन्नाशीला झुकलेले तिरोडकर साहेब पहिल्याच भेटीत मला त्यांनी मंत्रमुग्ध केले. मुंबई च्या गुन्हेगारी विश्वावर अनेक वर्षे सातात्याने लिखाण करणार्या केतनजीना वार्तांकण करताना एकाचीच बाजू लावून धरणे मान्य नाही. ते म्हणतात " ज्या दिवशी पत्रकार केवळ एकाचीच बाजू, पक्ष घेतील, त्या दिवशी ती किवा तो अडचणीत येईल. प्रत्येक स्टोरी बाबत तरुण पत्रकाराने निपक्षपाती असायला हवे. त्या सोबत थोडीशी समय-सूचकता आणि निश्चित तर्कही हवाच! एखाद्याची बाजू घेण्याचे ठरवल्यावर त्याचे वाईट परिणाम भोगणार्या अनेक पत्रकारांची त्यांनी उदाहरणे दिलीत! सर्व काही माहित असणे आणि वस्तू निष्ठ वार्तांकण करणे या मध्ये गुन्हेगारी वार्तांकानाबाबत एक अस्पस्ट रेघ असते, तुम्ही गुन्हेगारी वार्ताहार असल्या मुळे नेहमीच सतर्क राहावे लागते. कारण तुम्ही कोणाला भेटत आहात, कोणाशी बोलत आहात, तुमचा सूत्र कोण आहे यावर बारकाईने लक्ष ठेवले जात असते. मी हे सर्व अनुभवले आहे. एका स्टोरी वर काम करताना माझ्यावर हल्ला हि झाला आहे. पण मी मागे सरलो नाही. मी प्मुंबाई पोलिस दलातील सुमारे ९०% कर्मचारी, अधिकार्यांना व्यक्तीशा ओलाखायचो. त्यांच्या साबोत माझे मित्रत्वाचे संबंध असायचे, पण त्या पैकी कोणाच्याही विरोधात माझ्याकडे जर स्टोरी असली तरी माझे संबंध त्या आड यायचे नाहीत. मी बिनधास्त ती छापायचो. प्रसंगी न्यायलातहि आव्हान द्यायचो."

कै. विजय साळसकर  हे केतन तिरोडकर यांचे जवळचे मित्र. आजही केतनजी आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंगात असलॆले अंडरवल्ड चे संबंध उघडकीस आणत असतात. ते फेसबुक वर हुम्खास स्वतः बसतात. तेथे तिरोडकर जि माहिती लिहितात त्यात ऑफ द रेकॉर्ड माहिती वाचू शकणारे यांना खूप घबाड मिळू शकते. प्रत्येक गुन्हेगारी वार्ताहराने आणि ज्यांना या विषयात रस आहे, त्यांनी त्याची ती माहिती वाचली पाहिजे.

सर आपल्याला भेटून खूप समाधान वाटले. आमच्या शुभेचा!!


ENGLISH TRANSLATION:

I know a very few journalist's who dare to bare all through their writings, without fear! There are times when these journos are kept at bay just because they know more than they need to by our rajyakartas! But these journos don't get bothered by that...they just write and write without fearing any consequences either from their bosses are on whom they have unleashed their mettle. But If you compare Political Beat to the one's doing Crime beat, my heart will skip that one extra beat for the later ones. You don't get killed man if your sitting at Mantralaya everyday. Maximum you can have a case on you, or at the most you will have listen to chamchas of the neta you have exposed on the phone! In my views, Crime Reporting is altogether a different ball game. Hats off to these hero's. Here continuously they deal with gangsters, police and not only they report, but many times they happen to rub them the wrong way by filing the "correct" stories. Remember J.Dey and Jigna Vora? But taking nothing away from my political beat colleagues and their courage at the same time. Read Bhau Torsekar, Praveen Bardapurkar, Dnyanesh Maharao, Prafulla Marpakwar, Hemant Joshi (my father) Pramod Chunchuwar, Atul Kulkarni, Yadu Joshi (my uncle), Sandeep Acharya, Kiran Tare, Vivek Bhavsar to know what I mean. These are my Maharashtra's warriors, in actual sense, working selflessly without any expectations. I have seen them talking and writing! Wow...just Wow!! Same goes my mentors cum Activists Shri Yajurvedi Roa and Anil Galgali. 

Anyways, I always had that curiosity to meet and know a lot of Crime Reporters. I know the legend though ---Hussein Zaidi....I know who is Sachin Tendulkar,  the whole world knows him,  but he should know me nah? Here Zaidi saab knows me, yes the same legend who has given us Black Friday, Dongri to Dubai, Byculla to Bangkok, Headly & I, Mafia Queens of Mumbai, and along with that he has worked with I guess all the leading publications in the English Media. Zaidi saab, shukriyaan for your such long contribution! 

Last week I added one more feather to my cap -the effervescent Ketan Tirodkar! A Journo, an Activist and a fighter, is now a friend!! 
I know not a lot of you must be amazed by the name I said, given his humble background (read wikipedia) but don't know why, when I met him for the first time I was in complete awe with this gentleman! A Times of India product went to cover Crime for "Afternoon" for a good amount of years. Nearing his 50's Tirodkar saab was more than warm to me in our first meet. Having interviewed the whose of who of our Mumbai Crime Scene, Tirodkar ji is of the firm believer of not fixing camps when your report. He says "the day any journalist takes camp, or sides, he or she is in trouble". He wants the younger lot of journos like us to be fair in our approach for any story. More than fair it needs to have a bit of common sense and a  definite logic attached. He did cite a lot of examples of journos who have met with dire consequences when they decided to take sides"... In crime reporting, it's a very thin line between knowing all and reporting about such facts. You have to be extra vigilant as even being a journo you are continuously monitored whom you meet, whom you talk to, who is your source etc... I have seen all. I have been attacked once for a story when I tried to take it to a logical end, but that didn't  deter me. I have the privilege to know almost 90% of the Mumbai Police given my reporting experience and perfect analysis, but if I have a story against them, I will not hesitate to challenge these guys in the courts, as well." Calling Late Vijay Salaskar as one of  his closest friends, Ketanji is on a march to expose a lot of underworld links to our everyday life even today. He is available on Facebook and a lot of stories can be filed if you just read "between the lines" information Ketanji writes. A must follower for every Crime Journo, or those who have liking towards the subject. Sir, it is a pleasure to know you! Please continue to do the good work....

Wednesday, 10 June 2015

Do you want to know how CORRUPT Divisional Commissioner's, Collector's, Additional Collector's make money? Read on...


तुम्हाला माहित आहे का शासनाला पर्यायाने राज्यातील जनतेला कोण लुटते? अहो! भ्रष्ट राजकारण हा एक भाग झाला पण तो अगदीच नगण्य आहे. त्यांना पैसे खाण्याची फारशी अक्कल नसते. पुन्हा पाच वर्षांनी त्यांना आपण बदलूही शकतो, पण वर्षानुवर्षे पदावर असलेले सरकारी अधिकारी चार हाताने खातात. दोन हाथ त्यांचे प्रत्येक्ष आणि इतर दोन हाथ अदृश्य! त्यातून खालले जाणारे दिसतही नाही!! आम्हा पत्रकारांचे काम अश्या अदृश्य दोन हातातून खालले जाणारे शोधण्याचे आहे. विभागीय आयुक्तांपासून ते तलाठ्या पर्यंत पैसे कसे खालले जातात माहित आहे का ? मग वाचा.

 केंद्र शासनाचा नागरी कमाल जमीन धारणा निरसित अधिनियम हा २२ मार्च १९९९ साली पारित झाला. या अधिनियमानुसार ज्याच्याकडे ५०० चौ. मीटर पेक्षा जास्त जमीन आहे, त्याची ती जास्तीची जमीन ( "सरप्लस जमीन" ) सरकाराने हस्तगत करायची. विभागीय आयुक्त, अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांनी मोजणी करून नोटीस काढायची. मग तलाठ्याने अतिरिक्त जमीन ७/१२ वर शासनाचे नाव चढवून सरकारने ती ताब्यात घ्यायची. अश्या जमिनीचा वापर मग स्वस्तात घरे देण्यासाठी, शाळा, इस्पितळे, उभारण्यासाठी करायचा असा केंद्र सरकारचा विधायक हेतू होता, पण प्रत्येक विधायक हेतूला हरताळ फासल्या शिवाय कोट्यावधी रुपये मिळत नाहीत. याची भ्रष्ट राजकारणी आणि सरकारी अधिकार्यांना चांगलीच कल्पना आहे. नागरी कमाल जमीन धारणा १९९९ साली जरी पारित झाला असला तरी तो राज्यात २००७ लागू झाला. काही वरिष्ठ अधिकारी तर हा कायदा आम्हाला माहीतच नाहीये म्हणून सरळ भू माफिया याना मदत करतात.  या कायदा अंतर्गत, अतिरिक्त जमिनी बाबत राज्यात कारवाई करण्यात आली. नोटीसा काढण्यात आल्या पण जमीनीच ताब्यात घेतल्या नाही, त्यामुळे लाखो हेक्टर जमिनी त्याच्या मूळ मालकाला परत मिळाल्या. नोटीस काढायची जमीन मालकाला घाब्रावायचे, मोजणी करायची, तेथेच सेटेल्मेंत करायची. मग तलाठ्याने केलेला ७/१२ तेथेच फाडून टाकायचा, हा जणू नियम झाला. जमीन ताब्यात घ्यायची नाही. मालकाला कोर्टात जायला सांगायचे. कोर्टात मग  विभागीय आयुक्त, अतिरिक्त जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांच्या कडून कोर्टात त्या जमिनीचा ताबा राज्य शासनाने घेतला नाही असे सांगितले जाते. त्याबरोबर कोर्ट ती जमीन मूळ मालकाला परत देते.

नागरी कमाल जमीन धारणा कायद्या अंतर्गत एक पळवाट आहे. ती अशी की नोटीस पाठवून ही जमीन सरकारने ताब्यात घेतली नाही कि ती मूळ मालकाला परत मिळते. त्या पळवाटेचा फायदा घेऊन विभागीय आयुक्त, अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या पासून ते तालाठ्यापर्यंत आणि नगरसेवकापासून ते आमदार खासदारांपर्यंत सर्वच भरमसाठ पैसा खातात.

अंबरनाथ च्या हद्दीत येणारा भायंदर पाड्यात या गावात ३८९० चौ. मी. आणि ३६०० चौ. मी अश्या दोन जमिनी नागरी कमाल धारणा कायद्या अंतर्गत ताब्यात घेण्यात आल्या. कागदोपत्री प्राधिकरणाचे नाव दाखल झाले.
तेथे सर्व सामान्यांना परवडेल अशा दारात घरे बांधण्यात येणार होती . जमिनीचे अतिक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी प्रधीकार्नामार्फात व्यवस्था करण्यात आली मात्र जमीन मालकाने उच्च न्यायालयाकडे दावा दाखल केला . त्याचा निकाल न्यायालयाने ३०मार्च २००९ रोजी दिला . त्यानुसार ७/१२ वरून राज्य शासनाचे नाव कमी झाले .एम एम आर डी ए प्राधिकरणाच्या ताब्यात दिलेल्या जमिनीवर कोणत्याही प्रकारे दावा अगर अर्ज असल्यास प्राधिकरणाला कळवावे असे अतिरिक्त जिल्हाधिकारी नागरी कमाल जमीन धारणा ठाणे यांना सदर जमिनीचा ताबा घेतल्यानंतर पत्राने कळविले होते पण दाव्याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकार्यांनी .एम एम आर डी ए ला कळविले नाही त्यामुळे दाव्यामध्ये.एम एम आर डी ए पक्ष झाला नाही . पुन्हा या प्रकरणात नागरी कमाल जमीन धारणा कायद्याचे कलम १० [५] अन्वये सरकार जमा झालेली जमीन कलम १० [६]  प्रमाणे शासन जमा झाल्याचे जाहीर होते असा युक्तिवाद अतिरिक्त जिल्हाधिकारी ठाणे यांनी करायला हवा होता मात्र  अतिरिक्त जिल्हाधिकारी अथवा सक्षम अधिकारी यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र सदर करताना उपरोक्त जमिनीचा प्रत्यक्ष ताबा शासने घेतला नाही असे नमूद केल्यामुळे न्यायालयाने भाईंदरपाडा या गावातील जमिनीबाबत अतिरिक्त जिल्हाधीकारीयांचे आदेश रद्द्द करून जमीन मूळ मालकाला परत करण्याचे आदेश दिले आहेत . 

ती जमीन मूळ मालकाला परत मिळाली देखिल. आता प्रतिज्ञापत्र तसे का दाखल केले? दाव्याबाबत एम एम आर डी ए ला का सांगितले नाही? हे खरे प्रश्न आहेत आमच्या सुज्ञ वाचकांना हे का झाले आता चांगलेच कळले असेल .

IN ENGLISH

IF you want an answer that how these bunch of corrupt Bureaucrats, Politicians in our Government make money and as to how their nexus exactly works, especially when it comes to the dealings or compromise in land matters, Read On!  Alright..A disclaimer! Not all Politicians and Bureaucrats I mention here, are corrupt!! 

SO FYI, let me tell you that this has to deal with the Politician-Builder-Land Bankers/Mafia nexus and their money laundering scheme. This blog will highlight as to how these corrupt Politicians and Bureaucrats straight away GIFTED 1000s of HECTARES of land to these land-bankers and builders and continue to do so. These gifted lands were meant for us people, we commoners! They were meant for building schools, affordable housings, colleges, hospitals, parks, but because of these politicians and bureaucrats no one dares to buy a house in Mumbai, Thane, Pune, Nashik and Nagpur today. These people have ended our dreams. 

Now just as these land-bankers and builders owned hectares of lands all for themselves either through ancestors or land grabbing, Government of India had made a law by the name Urban Land Ceiling Repel Act in March 1999. Maharashtra Government accepted in 2007. So, if anyone of these officers say, that they were not aware of any such law, we know it's a white lie! Anyways, as per the above law, any person living in the Urban areas having LAND for more than 500 sq.meter, his or her land was declared SURPLUS. As per the ACT the Divisional Commissioner, Collectors and Additional Collectors are suppose to send notices to these persons having surplus land under Section 10 (3) and 10 (5) of the ULC Act. In the notice it is mentioned that the excess land or surplus land you hold, needs to be given back to the Government obviously with a compensation. Then there was this hearing process, which would be held and accordingly decision would be taken that these Surplus land has to be given back to the Authorities. Simple right. Now, comes the twist!! In the same ACT, which our corrupt Politicians and Bureaucrats understood or found luck, I presume, was that there is a small condition that if the relevant authority fails to take FINAL POSSESSION of the land after serving notices and completing hearings, the land has to be given back to the Original owner, or to whom it belonged! Means, after serving notice, taking the hearing, getting Governments/Relevant Authority's name on the Property Card, IF THE TALATHI does not take the possession, by way of fencing or putting security, lands goes back to the original owner. Now a TALATHI is the last person in the Collector Pyramid.He will act as to what his bosses tell him. 

So these land bankers/mafia/builders use to run to Politicians after being served notices. These Politicians in turn instructed our Divisional Commissioners, Collectors and Addl. Collectors to stop the TALATHI TO TAKE THE POSSESSION. Money would be exchanged  in CRORES (if your land is in Mumbai, Pune, Thane and Nashik, obviously the settlement amount would be in crores) and the TALATHI would not take the possession. These land bankers use to go to the court show them the one defect of the ACT and get back their lands. POLITICIANS and BUREAUCRATS made money like this. Courts obviously looked at the ACT and asked the authority to surrender the surplus land to these goondas back. IN turn Courts and Audit Departments use to pull up the MMRDA, for recording lakhs of acres of lands as surplus but not taking the possession.

Now as per sources, there are 1000s and 1000s of hectares of SURPLUS lands even today at these Metro Cities. No Collector is ready to act on the Repel Act.  If you put an RTI asking for information in regards to this, you will be denied information on your face, sighting no records. In 2008 "Voltas" at Thane similarly TOOK back its land in prime location of THANE and developed it. Imagine 35 acres of land with MMRDA in prime location!

 Now if a TALATHI, trying to be honest,  took the possession of land ,if A LOT OF money was offered, he would tear the "possession receipts", saying we never took the possession in the court. IF you calculate these types of lands given back or not taken into Governments armory, this scam is bigger than the Coal Scam. Imagine 1000s of hectares of land just gulped down these land bankers/mafiosi builders. These guys either sold it or developed it and made a fortune. So when we see how these people or builders how they got rich overnight, this is the story. WHOM to blame?? 

Thursday, 4 June 2015

Maggi's Double Standards....

Maggi's double standards...

So as am back from my summer vacations, the newest controversy that gripped our otherwise ideal nation, was the Maggi controversy. I was zapped on learning that the actors who promoted this brand of Nestle, are summoned. It's time that I need some logical answers to this...

1. If Amitabh Bachchan, Priety Zinta and Madhuri Dixit are summoned by our authorities, then I feel another young talent Ranveer Singh who is promoting a Condom Brand needs to be behind bars!! Who has guaranteed a Condom's performance? Tomorrow God forbid, if your wife or girlfriend conceives, (after wearing that Condom), Ranveer Singh needs to be questioned folks!! It is not your p***s size, but surely the brand he promoted fooled you, isn't it? How on earth Sr. Bachchan, Dixit and Zinta are responsible for Maggie goofup? Did they anytime say in the advertisement, that this product contains ZYZee products, please use them, fall ill and we will yet promote it. No! Never did I hear them say that in that advert....I'm of the opinion that celebrities must observe caution whilst endorsing a brand, like a cigarette or a pan masala, but who on earth knew what were Nestle's intentions?

2. O...k if these actors are to be summoned, I also need the Media who telecast these advertisements in print and on TV,  to be a party to this. More than these celebrities, aren't these people also responsible for the same? Who is #Arnab to question Madhuri, when Times itself has fooled the BMC for years on their rentals.

3. Who is Arvind Kejriwal to summon Nestle authorities in front of his Delhi cabinet? The only decision in Maggies case can be taken by Commissioner of FASSAI. Where is the democracy? As per the FASSAI act, the Commissioner who sits in New Delhi will have to act as per Chapter 2 of Section 16 and Chapter 3 Section 18 and then accordingly these guys can be punished. By the way, why was Dr Harshvardhan who was the public health Minister shunted by the NAMO government?

4. If Nestle is wrong, why are others left? ITC and foreign insta packet noodles should be checked now.