Wednesday, 13 May 2015

One more Bhujbal troubles PWD...the difference...its a lady this time!


आदरणीय आनंद कुलकर्णी साहेब,

मला  फक्त एकदा सांगा, किती वेळा तुमच्या प्रेमात आम्ही पडायचे? एका पेक्षा एक जे धाडसी निर्णय तुम्ही सार्वजनिक  बांधकाम विभागात जे घेत आहात, आम्ही सगळेच, होय, पत्रकार सुद्धा, भांबावून गेलो आहोत. "धाडसी" या करिता, कारण या विभागात जे कोणालाही न जुमानता निर्णय घेतात, त्याची फौलादाची छाती असते, असे मला नेहमीच वाटते.   या विभागात तुमचा दरारा आहे, याला कोणीही नाकारू शकतच नाही.  असॊ. वाचकहो, काही "धाडसी" निर्णय येथे मुद्दाम सांगतो. नॉर्थ बॉम्बे डिविजन (उत्तर मुंबई विभाग) मध्ये कार्यकारी अभियंता म्हणून कुलकर्णी साहेबांनी पि. के. पाटील यांच्या जागेवर वाळके नामक महिलेची निवड केली आहे. हो, हा तोच विभाग जेथे वांद्रे सारखे नाजूक इलाके आहेत. काही महिन्यांपूर्वीच येथे खूप काही घडले होते. म्हणून हा विभाग तसा संवेदनशील आहे. मला पक्के ठाऊक आहे, वाळके ताई साहेबांच्या या निर्णयावर खर्या उतरतील. झाले असे की, गेल्या ४ महिन्यांपासून कुलकर्णी साहेब यानी मंत्रालयात काम करणारी  वाळके  नामक अधिकारी हिच्यावर  बीओटी सारख एक महत्व्हाची जबाबदारी दिली होती, त्यावर ते स्वतः जातीपुर्वक लक्ष ठेवून होते। अगदी पारदर्शक पणे  वाळके ताईने हे काम पार पाडले आणि बक्षीश म्हणून  कुलकर्णी  साहेबांनी तिला ही  पदोन्नति दिली, असे म्हटले जाते. दूसरा निर्णय  म्हणजे, आर. टी. पाटील, जे नाशिकचे कार्यकारी अभियंता होते, त्यांचे तात्पुरता निलंबन! पाटील यांची कुलकर्णी साहेबांनी  ट्रासंफर केली होते, पण महाशय काही तेथून जाण्याच्या मूड मध्ये नव्हते.

पण हे काय  साहेब , एकीकडे तुमचा आदरयुक्त दरारा आणि दुसरीकडे भुजबळ नामक अतिहुशार "बाई"  अधिकारी. मॅडम ह्या उपअभियंता म्हणून हॉस्पिटल उपविभाग, प्रेसिडेन्सी ला कार्यरत होत्या. त्यांची बदली तुम्ही वाळके ताईच्खालीम्हणजे वांद्रे २ ला उपविभागात केली. पण आपल्या भुजबळ मॅडम तेथे जायलाच तयार नाहीत. चक्क सुट्टी टाकली आहे  त्यांनी! मिळाल्या माहितीनुसार भुजबळ मॅडम आपली ऑर्डर बाधीत झाली पाहिजे या करिता त्या अतोनात प्रयत्न करत आहेत. शासकीय हॉस्पिटलच्या एका डीनला त्या दररोज साकडे घालत आहेत. डीन मुख्यमंत्री यांच्याकडे भुजबळ मॅडम ची शिफारस घेऊन जाणार असेही ऐकले. पण काळजी करू नये कुलकर्णी साहेब, त्या "लहान" श्या डीन  वर लई "डोळा" आहे माझा! भुजबळ मॅडम यांचा नवरा पण शासकीय सेवेत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत आहे. आले होते ना दोघे नवरा -बायको शिफारस घेऊन तुमच्या केबिन मध्ये? चांगल केलत हाकलून त्यांना साहेब तुम्ही. मिस्तर भुजबळ सुद्धा त्या दिवशी शासन खर्चावर, कोणालाही न कळवता, बायकोच्या पोस्टिंग साठी मंत्रालयात वावरत होते. असे काय आहे साहेब कि हे सारे अभियंते खुर्चीला सोडायलाच तयार नसतात? भुजबळ मॅडम याना आता जायचे आहे ते प्रेसिडेन्सी मध्ये एका क्रीम उप विभागात… हो, तेथेच जेथे एक उपभियांताचे पदोनात्ती होऊन तो "सुखवस्तू" म्हणजेच कार्यकारी अभियंता होणार आहे. १५ लाखांचे मोबाईल घेणारा हाच तो अभियंता! जाउदया विषयांतर नको…मागच्या ब्लोग मध्ये सविस्तर लिहिले होते या विषयावर!

बदल्या करताना तुम्ही  विचार केला असेल, कि दोन स्त्रिया मिळून ऐतिहासिक कामे करतील, पण कोण समजावेल त्या भुजबळ मॅडमला  हे ? काही सवयी  मोडताच येत नाहीत. नुसता सूड घ्याचा म्हणून तुम्ही बदल्या नाही करत आहात. तुम्हाला  विभागाची भिघाडलेली इमेज बदलायची आहे. पण  असू द्या. भुजबळ मॅडम स्त्री आहे, म्हणून दुसरा न्याय नको. जे आर. टी. पाटील बद्दल तुम्ही भूमिका घेतली तीच इथेही घ्या. मला जर कोणी विचारले, तर किमान दोन वर्ष तरी मंत्र्याने सुद्धा तुमच्या मध्ये लक्ष घातले नाही पाहिजे. भुजबळ मॅडमला एकतर खूप दूर फेका किवा त्यांना निलंबित तरी करावे अशी किमान आशा बाळगतो…आणि तुमच्या सवईनुसार पुढच्या ३दिवसात या प्रकरणाला मार्गी लावाल याची मला आशाच नव्हे तर संपूर्ण खात्री आहे.
 तूर्त एवढाच!

तुमचा आणि सा. बा. चा सच्चा मित्र,

विक्रांत हेमंत जोशी

ENGLISH TRANSLATION BELOW:


Respected Shri Anand Kulkarni,

Sir, how many times should I be in awe with you? You continue to impress us with so many decisions that are so courageous, yes, In PWD, if one takes a bold decison, they are bound to be courageous! Bravo sir !! For readers, the latest decision Anand ji has taken is putting a lady officer incharge of the ever sensitive North Bombay Divison as an EXectuive Engineer. Miss Walke a charismatic engineer, has replaced PK Patil, and she has a daunting task of leading from the front. But we are sure, the trust which You have laid on Miss Walke, will not be compromised. Another landmark dicision of your's was the suspension of RT Patil an Executive Engineer from Nashik, iust beacuse he did not take charge where he was transferred. 

But sir, what is heart wrenching, that one side when a lady officer like Miss Walke has stepped up and taken the responsibility to head the North Bombay division, another lady whom you have put under Miss Walke, has just  ignored your order left, right and center. This certain Mrs Bhujbal was working in capacity of a Deputy Engineer Hospital Subdivision under Presidency Division. It is learnt that she was transferred to Bandra 2 Subdivsion under North Bombay Divison and it seems Madam Bhujbal is in no mood to join there. She has gone on a holiday! If my sources are to be believed, Mrs Bhujbal is in no mood for transfer. In fact had Mrs. bhujbal joined under Miss Walke, it would been a historic moment, and these ladies would have shown the PWD true power of women by working with conviction, in the sensitive north bombay division. But instead, Mrs. Bhujbal who was very much confortable sitting on one chair without anyone disturbing, earning money, and caring a dam about the happenings. She is so miffed with you, God bless her for this, that she has approached her long time "friend",  a dean of a famous and reputed Government Hospital in South Mumbai. This dean is in process of approaching our beloved CM Devendra Fadnavis to cancel her order. Dean "Small Man" be careful, we also have our "eyes" on you! Also, i have learnt that Mrs Bhujbal's husband, an influential Supretendant Engineer at the MGP, is trying all his resources to put his wife in the comfortable enviornment of south sub-division. Both husband wife met you for the transfer to be held back, which I learnt has left you red faced. 

Sir, i have observed that whosoever is not following your orders or not falling in line are straight away suspended. But you are not the one who will just haphazardly transfer anyone. If they fit the bill, they are due for transfer after completion of their tenure, you will take the step and yes without caring about any consequences. PWD is certainly feeling the tremors of your presence. Please take this Mrs Bhujbal on task and my request is to send her to some remote area or atleast SUSPEND...She is no less than a crooked mind. Prove your detractors  that There exists no sex inequality in your books. If RT Patil can be suspended for insubordination then, even Mrs Bhujbal can be....In my words, atleast for a year or two, PWD should run on the rule, "Anand Kulkarni's way or the Highway"...and yes, please dont get bothered by the Minister.

Yours sincerely,


Vikrant Hemant Joshi  

Monday, 4 May 2015

Friendship in PWD, and Bureaucracy's need of the hour!!

१) मागच्या ब्लॉगमध्ये  मी मित्रत्वाबाबत विचार मांडले होते. ज्यांनी कोणी ते वाचले नाहीत त्यांनी कृपया माझा तो  ब्लॉग  अगोदर पहावा.
असो ! या वेळी मी सरकारी मैत्री कशी असते हे तुम्हाला सांगतो. राजेश वर्धन नावाची एक व्यक्ती आहे. त्यांचे हाजीअली येथील प्रतिष्टीत हिरा पन्ना शॉपिंग सेंटरमध्ये मोबाईल, इलेक्ट्रोनिक वस्तूंचे मोठे दुकान आहे. गेली १६ वर्षे ते आपले दुकान इमाने चालवतात. वर्षाची आर्थिक उलाढाल काही कोटींची. दक्षिण मुंबईत दुकान असल्याने त्यांना राज्यातल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांशी घरोबा करण्याची संधी मिळाली. पण तीच संधी  कशी त्यांच्या जीवावर बेतली आहे हे पुढे वाचा. त्यांच्या दुकानात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचा राबता असायचा. पाटलापासून चौबेपर्यंत, गायकवाड, जाधव ते मलिकनेर असे अधिकारी त्यांच्या दुकानात यायचे. ते वर्धन यांचे भरोसेमंद ग्राहक होते. रामगिरी या सरकारी बंगल्यावर वर्धन नेहमी जात. मालाची डिलिवरी घेऊन. हा प्रतिष्ठित बंगला कधी काळी राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रांना राहण्यासाठी दिला जायचा. 
पण वेळेचे महात्म्य मोठे असते. वेळ चांगली असेल तर सर्वच जवळ असतात आणि ती खराब झाली की आपली सावलीही सोडून जाते. वर्धन यांच्याबाबतही असेच झाले. वर्धन यांना धंद्यात मोठा फटका बसला. आर्थिकदृष्ट्या ते खचले आणि त्यांना सर्वजण टाळू लागले. अगदी  सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारीही. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एका अधिकाऱ्याने (मराठी मध्ये याचे भाषांतर केलेत, तर लगेच नाव सापडेल "Most Comfortable God") वर्धन यांच्या कडून २०१३-१४ साली, आपली बायको, मुलगा आणि काही नातेवाईकांसाठी १५ लाख रुपयांचे मोबाईल खरेदी केले होते. अर्थात उधारीवर. गेल्या वर्षी त्याने त्यापैकी ७ लाख रुपये दिले. पण तो डोमकावळा बाकीचे पैसे गडप करायला बघतोय. वर्धन त्याच्याकडे पैसे मागायला गेला तर तो म्हणतो कसा,  अगोदर एलओसी येउदे, गेल्या २ वर्ष्यापासून मी कोणालाही पैसे दिले नाहीत, ती आल्यावर मी तुला पैसे देतो. यात दोन गोष्टी आहेत, एकतर त्या अधिकाऱ्याने सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी ते मोबाईल खरेदी केले. कारण एलओसी ही  कंत्राटदार किंवा पुरवठादार यांना पैसे देण्यासाठी वापरतात नाही तर तो अधिकारी वर्धन यांना मूर्ख बनवत असावा. आता वर्धन हे खात्याचे अतिरिक्त प्रमुख श्री. आनंद कुलकर्णी यांना भेटणार आहेत, असे कळते. आनंद कुलकर्णी यांची खात्यात मोठी जरब आहे. ते काही सकारात्मक बदल खात्यात करताहेत असे कळते. पदावर आल्या बरोबर त्यांनी पाच अभियंत्यांना निलंबित करून चुणूक दाखवली आहे. 

२) तुमच्या लिखाणाची फेसबुक आणि इतर सोशल मिडियावर लिंक देणे कधीही चांगले. मी तसे करतो. राज्यातील अनेक पत्रकार ब्लॉग  लिहितात आणि सोशल मिडियाचा चांगला वापर करतात. आपले मुख्यमंत्रीही त्याचा वापर योग्य करतात. पण एकच अट  आहे मानली तर, तुम्ही जे लिहिता ते सर्वाना समजणाऱ्या भाषेत असावे. काही दिवसांपुर्वी एका चनॆलच्या ब्युरो चीफ्ने तिचे लिखाण  टाकले ते चक्क गुजरातीत होते. आहो ताई,  आ सू  छे ?

3) सनदी अधिकारी आणि मंत्रालयातील प्रशासन अधिकारी यांच्या बदल्या हा तर दररोज चर्चेचा विषय बनलाय. मंत्री आस्थापनेवर मागील १० वर्षात ज्यांनी कामे केली आहेत, त्यांना शासन निर्णयानुसार काम करता येणार नाही, असा निर्णय नवीन सरकाराने घेतला होता. पण जर तुम्ही प्रत्येक मंत्र्याकडे डोकावलात, तर तुम्हाला ओळखीचे चेहरे जे मागच्या सरकार मध्ये कित्येक वर्षापासून ठाण मांडून बसले आहेत, ते भेटतीलच. शासन निर्णयाची सगळे नियमे या अधिकार्यांनी धाब्यावर बसवली आहेत. पण जे आता बाहेरून आलेत, त्यांना पण प्रशासन कसे चालते, हे काळात नाही. मग काय, पुन्हा सगळी कामे ठप्प पडणार. गती संथ होणार. हेच आपल्या राज्याची अधोगतीचे कारण आहे. नेमका माणूस, नेमक्या ठिकाणी जाताच नाही.  आता उद्हारण घ्या एम.आय. डी. सी या विभागाचे. भूषण गगराणी हे त्या विभागाचे सी. ई. ओ म्हणून काम बघतात. त्यांच्या खालचे पद हे आबा जर्हाड यांना दिले आहे. कशी कमाल आहे बघा या सरकाराची. जर्हाड यांचे मूळ विभाग काय आहे ?  उद्योग विभागाशी त्यांचा काय संबंध? कृषी विभागातले (माझ्या माहितीनुसार) जर्हाड उद्योग विभागात काय दिवे लावणार? त्यांनी भलेहि नवी मुंबई मध्ये आयुक्त असताना, किवा ठाण्यामध्ये जिल्हाधिकारी असताना सुंदर काम केले असेल, पण हि आबांची , लोकांची व त्या विभागाच्या  सी. ई. ओ वर अन्याय नाही का? जो पर्यंत आबा, गगराणी यांच्याकडून सगळ  शिकतील, तो पर्यंत सगळ्यात मोठी हानी होते ती वेळेची आणि न घेतलेल्या निर्णयाची. विभागाची प्रगती आबा नवीन असल्याने थोडी का होईना मंदावते, गगराणी यांनी सगळी कामे आबांना जरी सांगितलीत, तरी माहिती घेऊन त्यावर विचार करून, सल्ला घेऊन, निर्णय घ्यायला वेळ लागताच असेल ना? त्याच ठिकाणी जर विभागाच्याच माणसाला पदोन्नती दिली असती तर कामे लवकर झाली असती.  याच प्रमाणे डॉक्टर अनिल महाजन हे पशुंचे डॉक्टर ना? ते विधी मंडळाच्या उपसभापतींकडे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू आहेत. ठीक आहे यांच्या कडे आबा असताना विधी मंडळाचा अनुभव असेल, पण मला काळत  नाही कि हे लोक मूळ विभागात जात का नाहीत? आता सार्वजनिक बांधकाम विभागात चंद्रकांत पाटील यांनी खाजगी सचिव म्हणून श्रीनिवास जाधाव यांना घेतले. चला तुमचा आवडता असेल, ते आपण मान्य करू. माणूस हि तसा बारा आहे. पण हे काय? अतुल "खा"नोलकर हे तर विक्रीकर भवनात होते ना हो दादा? हे कसे काय तुमचे विशेष कार्यकारी अधिकारी? याच खानोलकरला मंत्रालयात आणायचा जर हट्टच तुम्ही धरला होता, तर त्याला वित्त विभागात किवा त्याचा आवडत्या माहिती तंत्र न्यान विभागात पाठवायचे ना? तुमच्या दोन्ही महत्त्वाच्या पदावर दोघांपैकी एक ही तळागळातला नाही. त्यात तुमचे खाते नाजूक. नशीब आनंद कुलकर्णी आणि तुमचे स्वभाव सारखे! सांगण्याचे कारण म्हणजे, कि ज्या पदावर जो माणूस असेल, तर त्या विभागाची कामे लवकर होतील, शासन समृद्ध होईल.

ABOVE ARTICLE  IN ENGLISH BELOW: 

Some days ago, it was on purpose I wrote my philosophical thought on Friendship. That who didn't read it, below is the link...

Oh, I love Life! Thanks for everything! The good, the bad!!! http://www.vikrantjoshi.com/2015/04/oh-i-love-life-thanks-for-everything.html

1. Anyways, the reason for writing about friendship was to make you understand how in our Government friendship has altogether a different meaning. Take the case study mentioned below of our very own PWD...Rajesh Vardhan a mobile, electronics and accessories vendor has his shop at Heera Panna Shopping centre at Hajiali. Heera-panna was the first actual Mall for imported goods in Mumbai.  Rajesh Vardhan owns this shop and is in electronics business since last 16 years. Being close to South Mumbai, Rajesh has earned the privilege of knowing the who of PWD. The best part is that his turnovers is approx in some crores per annum and guess what, our Engineers are his biggest contributors. Right from all Patil’s, to the Choube’s, to the Gaikwad’s, to the Jadhav’s, to the Bedse’s and to the Malikner’s, all have been and continue to be his faithful clientele. He boasts of visiting Ramgiri for deliveries also during "those" times. Ramgiri is a government bungalow at the prestigious Malabar Hill often designated to the Cabinet Minister of our Government. 
But now, as they say, when bad times come, everyone eludes you; howsoever powerful and influential you are. Rajesh was no God and in the past few years, Rajesh went through a rough patch financially.  All these big names just forgot to take his calls, from the mobiles used from his shop! A lot of Engineers who Rajesh money. A certain Engineer from South division called "Most comfortable God" (please do the Marathi translation) had purchased electronics and mobiles worth Rs, 15 lakhs in 2013-14 for his son, family and his peers. "Most comfortable God" paid Rajesh Rs 7 lakhs last year and now for the pending 8 lakhs this officer is giving upsurd reasons to Rajesh for non-payment. "Most comfortable God" says, "let the LOC come, since past 2 years I haven’t paid anyone, and then only I will pay you". What! Rajesh believed in this officer for a good couple of years, but now a lot of water has flown below the bridge. No signs of payment for the pending 8 lakhs. Two things are concluded, with this kind of statement made. Either PWD has purchased these mobiles via this officer as LOC is used to pay contractors or suppliers. OR this officer is straight away fooling Rajesh. Now what I have heard is that Rajesh is planning to approach Additional Chief Secretary Anand Kulkarni....the most terror officer in PWD. Heard he is making some tremendous changes in the system, which will send shivers down the spine of this department. He has already begun his journey by suspending 5 Engineers just a few days back.

2. It is good to give links of your write ups on Facebook, Whatsapp and any other social media site. I do it. Al lots of journalists across Maharashtra are blogging and using social media perfectly. In fact any decision, or announcements, our CM and other Ministers are also using social media extensively. The only condition is, that the write up should be in the language that everyone understands. On Facebook a dashing Bureau Chief of a channel had uploaded her article which was written in Gujrati. Madame, aa soo che ?

3. A lot has to be thought on the various transfers happening in and around Mantralaya at various levels. Be it class 1 or IAS. Now take the example of MIDC. Bhushan Gagrani is the CEO of MIDC. Now in the reshuffle of IAS, CM posted Aabasaheb Jarhad as JT. CEO. Now those who know, Jarhad’s background is totally different, his postings have been everywhere but anything related to Industries Department. What am I saying is that we should have officers who are from one department and maximum can be in the related departments? Like if Jarhad is from Agricultural Department, he should be placed in Rural Development, or department related to Agriculture. No offence to anyone, but what will Jarhad contribute to MIDC? Can Bhushan Gagrani be entirely dependent on Aaba Jarhad? No, never...so now not only Gagrani’s but entire MIDCs performance goes for a toss. Now Jarhad has done some fabulous work whilst Collector at Thane and Commissioner at Navi Mumbai. My whole point is why doesn’t our CM see basic department of the officer, his experience, his service book and appoint him accordingly. This was IAS example. I don’t understand what is Dr. Anil Mahajan doing working under Dy Speaker Vasant Davkhare? He is a VET right...and Davkhare, the deputy speaker of legislative council....also what is Atul Khanolkar who is posted as OSD to Minister of PWD, Co-operation, Marketing and Textiles? Khanolkar's earlier posting was with Sales Tax....his appointment would have been understood with the Finance Department. Before these guys understand department, get hold, a lot of time is wasted. Efficiency is affected! Friday, 1 May 2015

Shaadi ke side effects...

तुमचे लग्न केव्हा अयशस्वी असते .?

पुरुष यांच्या करिता…

१. जेव्हा तुम्ही घाणेरड्या मसाज पार्लरला नेहमीच भेट देता, तेव्हा…
२. जर तुम्ही तुमच्या बायकोचे सर्वात चांगला मित्र, अर्थातच बेस्ट फ्रेंड, नसता तेव्हा…
३. तुमच्या प्रत्येक परदेश दौर्यात जेव्हा तुम्हाला गोरया मैत्रिणीचा सहवास हवाहवासा वाटतो. मग त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागले तरी चालतात.
४. जर तुमच्या आयुष्याची तुलना नेहमीच तुम्ही इतरांशी करता तेव्हा. नेहमी मित्राचीच बायकोतले गुण हिच्यात का नाही म्हणून रागावता तेव्हा…
५. या धर्तीवर जगणारी प्रत्येक नार कडे तुमची विकृत नजर असते तेव्हा.…हिन्दॆ मध्ये त्याला "ठरकी" म्हणून ओळखले जाते.
६. बर्याच जणांना आपल्या बायोकेचे फोटो फेसबुक वर टाकायला आवडत नाही…. बिलिव मी, हा गुण खूप मोठा दुर्गुण आहे, याचा अर्थ तुम्हाला तुमच्या बायकोची लाज वाटत आहे.
७. विम्जीकल सारखे वागणे, बायको पोराना मारत सुटणे, तेव्हा तुम्ही सर्वात जास्त अयशस्वी आहात.
८. आईचे जास्तीचे ऐकून बायकोशी त्या हिशोबाने वागणे.
९. दर दुसर्या दिवशी पुरुष मित्रां बरोबर प्यायला बसता तेव्हा।
१०. आणि, जेव्हा तुम्ही सासर्याची प्रोपार्टी आणि पैसा बघून लग्न करता तेव्हा  आणि
११. टंच बायकोला समोर करून, आपले काम समोरच्याकडून काढून घेता तेव्हा…

आणि स्त्रियांसाठी लग्न अयशस्वी असते जेव्हा…

१. तुम्ही घरातल्या आणि नवरयाच्या प्रत्येक गोष्टी आपल्या आईला सांगता तेव्हा…
२. जेव्हा तुम्ही घरातल्या एकमेव "कमावता पुरुष " होता आणि नवरा आळसा पाई घरी बसतो तेव्हा…
३. संडे च्या दिवशी तुम्ही नवर्याला सोडून किट्टी पार्टीला जाता तेव्हा…
४. जेव्हा बहिणीचे आणि मैत्रिणीचे आयुष्य सुखवस्तू  वाटते तेव्हा…
५. जेव्हा तुम्ही पोर पैदा करण्याचे मशीन बनता तेव्हा…
६.  तुम्हाला कोणा न कोणा सोबत आपल्या मनातले बोलणे स्वाभाविक आहे. पण जेव्हा तुम्ही प्रत्येकच वेळी जर हे केलात तर बर नस्त.
७. जेव्हा तुम्ही एक काय दोन घर खाली लग्न करून येता, अर्थातच संसारात वरचष्मा अस्तो. आणि जर तुम्ही इगो आणला तर सगलेच सम्पते.
८. तुमची सटकते जेव्हा नवरा ६ महिन्यातून एकदा सासरी येतो तेव्हा. मात्र तुम्ही मात्र सासू सासर्यांचे दररोज हागे धुणे करणे अपेक्षित अस्त.
९. तुम्ही संसार फक्त मुला बाळांसाठी रेटता तेव्हा…
१०. आणि जेव्हा स्त्री नुसती घरी बसून जाड होत असते आणि इकडे नवरयाचे लक्ष दुसरी कडे आकर्षित होते तेव्हा.

How Happily are you married? 
For a Husband..
1. If you often visit dodgy Massage Parlors, you are definitely not happily married...
 2. If you are not "a buddy" of your wife, you are certainly not happily married.
3. If you travel abroad often and indulge in "white skinned" lies you are not happily married...unless your partner is having an acute illness. 
4. If you compare your lifestyle with your best friend, you are not happily married..
5. If you have an eye with lust for every living being that is female, you are not happily married....
6. If you refuse to upload/ show your marital pictures to your friends or on social network sites, 
you are not happily married..
7. If you are a whimsical, always ready to fight (hit) your wife and children, you are not happily married...
8. If you listen to your Mommy all the time, you are not happily married
9. If you love your guy friends and find a reason to go out every alternate day without your partner, you are not happily married.
10. If you have super rich in-laws, and you married for that reason, you will never be happily married..

For a wife..

1. If you tell each and everything to your mother or your sister of that of your husband's, you are surely not happily married.
2. If you are the sole bread earner and your partner is just "lazy" to earn the livelihood, believe me you are not happily married.
3. If you have friends who invite you to kitty parties and lunches and brunches and YOU go on a Sunday without hubby, you are not happily married.
4. If you are more educated, come from a more financially sound family and earn a lot more than your hubby, you are bound to have an upper hand in the marriage, though you many not say so, you will surely influence the kids more. 
5. If you are just reduced being sex slave of your husband, and a kid producing machine, you are not happily married.
6. Fights and arguments in a marriage are common. But even sharing with someone is a must...as i said above, sharing too much will also spoil the game, you need to vent out, also..
7. If you compare your best friends life with your's, you will surely be sad...
8. If you are dragging the marriage and "adjusting" just for your children, my dear you are so not happily married.
9. If you make your husband do what is beyond his EGO and self respect, you are not happily married..e.g not all husbands like to visit in-laws everyday. Though you as a wife are expected to bloody stay with in alws, listen to them and be a STRONG women after that....haha...watta joke nah!
10. If you sitting at home, growing fat and lazying around, very soon my dear you will end up having problems in your marriage...