Friday, 24 April 2015

Oh, I love Life! Thanks for everything! The good, the bad!!!

It's all fair when a friend loves you in real sense. Friendship shouldn't be bound by if's and but's . It doesn't see caste and creed. It's not about give and take. Either you give or you take. A true friend will never be the one screeming on top of his voice claiming what he can do for you. He will just act and get it done. He might not be with you in your best of times, but surely, he will be the first one to be present in your darkest hour. He will not be there to share a drink when you have others "crowding" with you , but he will be the one toasting that drink for you. But today friendship has altogether taken a new meaning. Friendship is about "how useful" the person is today? I'm a political journalist. I have a lot of crowd around me, who never invite me at their parties, but certainly am their best friend when when they need any kind of favours. I certainly have a friend in real sense who is a 47 year old gentleman, who would put to shame any 30 year, old given his attitude towards life, Vikash, I love you! I have a couple of 65 year old friends in Roasaheb and Bhau Torsekar, who are more than a guide to me, whom i can turn to as a son at any hour, and i certianly have my father and my wife as bestest of my friends who are there in all the times I need them and not viceversa. These people don't call me when they are in distress. These 5 people will never let me fall also. When i chose to enter Journalism after my MBA in International Business and Masters in Marketing from the UK, and after 4.5 years of Corporate job with six digit salary per month, these were the people who stood behind my decision. They have known my fears and tears and often been there for me through this journey of last 5 years in Journalism. Anyways, the problem arises when you have expectations...
 Friend's shouldn't care where you come from, what can you add to them, how many cars you drive, have you changed your brand or no....oh no....its all about accepting. Can i just accept today that my life is incomplete with these bunch of "avengers"? Oh yes, how can I forget my Alcoholics Anonymous Group whom we love to death, certainly these guys are my painkillers....
Important tip ... beware of friends or could I put them into the "crowd category" who just love you to death in happier times, but will not waste a single opportunity to tease you, mock you, demoralise you, if you just strike a wrong cord, even by mistake, with them ONCE....oh yes, given my happy go lucky nature, i have encountered them alot...im sure even you have....but don't let them put you down..correct the mistake you have done unintentionally, am sure things will be sorted. Your friends should understand that if you are keeping quite, it is not out of fear or the might has scared you, you are actually speaking a thousand words then and your fearing that in the heat of the moment, you might just loose someone close. Be giving, be simple, make them laugh but dont let them take you for granted. Follow the rule, " sab kuch sikha humne, naa sikhi hosiyaari, sach hai duniyaa waalon....hum hai anaari...."

Thursday, 16 April 2015

परत या, परत या! राणे साहेब सभागृहात परत या!!

मी सभागृहातला एक पत्रकार …सभागृहात आणि माझ्या मध्ये घडलेले काल्पनिक संभाषण ….

मा. राणे साहेब,

प्रथम, बांद्रातील निवडणूक लढवण्यासाठी ज्या हुरहुरीने आपण उभे राहिलात त्या करिता आपले जेवढे कौतुक केले पाहिजे, तेवढे कमी आहे. जिंकणे-हरणे हा शेवटी नशिबाचा खेळ आहे, परंतु, याही  कसोटीत तुम्ही त्याच जोमात उतरलात हे खरोखरच कौतुकास्पद आहे. तुम्हाला कदाचित निकाल काय लागणार हे आधीच माहित होते, पण तरीही, नारायण राणे हरू शकतो, दोन पावले मागे घेऊ शकतो, पण राणे संपू शकत नाही, हे तुम्ही  पुन्हा सिद्ध केलय. तुमच्या जिगरला आमचा सलाम!!

नारायण राणे हरले, पण तुम्हाला माहित आहे काहो,  की  नारायणराव तुमच्या हरल्याने सगळ्यात जास्त कोण दुखावले असेल? अर्थातच आपल्या महाराष्ट्राचे विधान मंडळांचे  सभागृह! अहो ते तुमची मागच्या नोव्हेंबर पासून वाट बघतेय! नागपूरला कसे-बसे सहन केले त्याने, पण या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याने लय आठवण काढली हो तुमची! तुमच्या बरोबर त्याने मला गुपचूप आर. आर. पाटील यांचे ही न येण्याचे कारण विचारले. जेव्हा आबांची बातमी दिली त्याला, अख्ख "सभागृहच" हादरल हो राणेसाहेब! असो. मग आपल सभागृह पुन्हा कासावीस झाल. आजाराने सेनेचे बाळा सावंत गेले ना! एकीकडे सभागृहात शोकप्रस्ताव मांडत असताना, सभागृहाला  गहिवरून जाताना, मी पहिले आहे. दुखाचे दिवस विसरायचे असतात. पोटनिवडणुक होणार असे कळले. तिकडे आबांची बायको, आणि इकडे सभागृहाचे लाडके तुम्ही आणि दुसरे लाडके बाळा सावंतच्या पत्नी निवडणूक लढतायेत, हे कळले. पण सभागृहाने जे सांगितले ते पटले हो, कि

" विक्रांत जरी सगळे आकडे, सगळी समीकरणे जरी राणेंच्या विरोधात आहे, मला राणे हवे इकडे यायला. कारण मी दोन अधिवेशनापासून  बघतोय, कि जर सेनेचे मंत्रीच काहीही बोलत नाही तिथे जर सावंत यांच्या पत्नी निवडून ही आल्या तर काय बोलू  देणार हो ही मंडळी? मतदारांना कसा न्याय मिळणार .? राणे तसे बिनधास्त आहेत, कोणाला घाबरत नाही. आणि झालय काय, कि आता विरोधकच उरले नाही अशी संभावना झालीय. कॉंग्रेसचे तर माझ्या खालच्या घरात तर दाणादाण   झालीय. विरोधी पक्ष पद जरी असल, तरी मी विखेंची तुलना रामदास कदम, नारायण राणे, आणि खडसे यांच्याशीच करणार नाही का ? स्वाभाविक आहे तास करणे माझे… जेव्हा ह्या तिघांपैकी कोणीही  काहीही बोलायला उभे राहीचे, मी सुद्धा ऐकत राहायचो.तो काळ नाही राहिला आता. नुकत्याच  आटोपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फ़क़्त एकदा कामकाज माझ्या खालच्या घराचे बंद पडले. त्यात हि सेनेने साथ दिली या विरोधकांना म्हणून! इकडे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा वेगवेगळे चित्र दिसले. भुजबळा यांना साथ द्यायला कोणीही नाही. अजित पवार येण्यासाठी यायचे, तिकडे कॉंग्रेस मध्ये पृथ्वीराज चव्हाण हे पण बोलायला उठायचे नाही, नशीब तासभरासाठी का होईना, यायचे बर बाबा। सगळ्या विषयांवर अभ्यास असल्यावरही थोरात पुढाकार घेत नसत, वाडेडडीवर आक्रमक असायचे, पण ते ही या वेळी शांत, वर्षा गायकवाडला कोणी बोलू द्यायचे नाही, गोपाल अग्रवाल, त्यांच्याबद्दल न बोललेच बरे, प्रणिती नुसती काही न काही खात बसायची, सौ. चव्हाण ह्या तर आपला नवरा अजूनहि मुख्यमंत्री आहे तशाच मिरवायच्या. कोणाला हि कोणाची गरज नसल्या सारखेच वागत होते.
तिकडे सरकारमध्ये हि तसेच. रावते आणि कदम शांत बसू शकतात हे मला याच वेळी कळले. सुभाष देसाई तर पाव्हण्या सारखेच वागत होते. अशा वातावरणात कोण विचारणार या बाळा सावंतच्या  विधवेला? जेव्हा यांचे आतले वादविवाद मिटतील तेव्हा कुठे, माझ्या अंगणात माझ्या महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेला न्याय मिळेल. काय म्हणतात रे तुम्ही? मिली जुली सरकार…हा …बरोबर आहे. राणे आणि भुजबळ हे विरोधकांचे सचिन आणि सेहवाग होते. सरकारमध्ये असताना ही! माझ्या वरच्या घरात मात्र विरोधक लई मस्त. काय चालवतो रे वरचे घर,  तटकरे! कमाल आहे. धनंजय वर आपण जाम खुश!   पण खालच्या अंगणात जर राणे असते, तर तुफान मजा आली असती. इथे देवेंद्र नावाचा माझा मुख्यमंत्री एवढा हुशार की , त्याला किवा त्याच्या सरकाराला कोणीही कचाट्यात पकडू शकले नाही.
आता टीव्हीवाले म्हणतात कि राणे कदाचित नितेशला राजीनामा द्याला सांगतील आणि कुडाळमधून पुन्हां निवडणूक लढवतील  …काय  रे विश्लेषण तुम्हा पत्रकारांचे ? राणेंना सांगा असे केल्यास पुन्हा तिसर्यांदा पडाल. कसेबी करून आमदार व्हायचे हे लोकानां लक्षात येईल…. ते त्याना आवडणार नाही. राणे हे अतिशय हुशार आणि अनुभवी आहेत. मला सुद्धा त्यांची गरज आहे, पण ईगो मध्ये आणून चालणार नाही…. वाट बघायची ती त्या क्षणाची. नितेशच्या पाठी मागे उभे रहा. सल्ला जर  घ्यायचा असेल तर मोबदल्यात कशाची अपेक्षा न ठेवणारया भाऊ तोरसेकर सारख्या लोकांचे घ्या…मानो या ना मानो, तुम्ही लोकांशी थोडेसे दूर झालात. आमदार काय कार्यकते सुद्धा तुमच्या जुहु मधील आलिशान घरात यायला कचरतात, त्यात  तुमचे १०-१० अंगरक्षक….आता वाटत, की कॉंग्रेसपेक्षा तुम्ही मनसे पक्ष निवडला असता तर कदाचित तुम्ही माझ्या घरात पहिल्या बाकावर दिसले असता …शेवटी जाता जाता, कृपया कोणावरही  हरण्याचे खापर फोडू नका… तुम्ही बलवान आहात, कोणताही अशोक पर्व तुम्हाला हलवू शकणार नाही "
तूर्त एवढंच!!

Saturday, 11 April 2015

OFF THE RECORD Budget Session Highlights Part 3

१. राष्ट्रवादीच्या  एका माजी आमदाराने अहोरात्र कष्ट करून जळगाव जिल्ह्यात एक धरण बांधायला घेतले. अपक्ष निवडून आल्यामुळे आणि मोबदल्यात काहीही न घेतल्याने २००९ सालचे हे आमदार तात्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकदम लाडके. पण या कष्टकरी आमदारालासुद्धा २०१४ च्या निवडणुकीत मोदीलाटेत हार पत्करावी लागली. असो, परवा विधान भवनात ते माजी आमदार भेटले. एरवी हसतमुख असणारे हे आमदार थोडेसे नाराज दिसत होते. नुकतेच अजित दादांची भेट घेऊन आले असावे. नंतर सूत्रांकडून माहिती घेतली . माजी आमदार आले होते दादांकडून एक पत्र घ्यायला. केबिन मध्ये शिरताच अजित पवार यांनी या आमदाराशी नेहमी जसे बोलतात त्याच प्रमाणे प्रेमाने बोलले, आदरतिथ्य केले. येण्याचे कारण विचारले. धरणा करीता  थोडेफार पैसे मिळावे म्हणून  दादांच्या पत्राची गरज होती. दादांनी हे आधीच ओळखले होते. "कोणाला पत्र द्यायचे सांगा?" "दादा गिरीश महाजन यांना". होत्याचे नव्हते झाले." जगाच्या पाठीवर कोणाला ही  सांगा , मी लगेच पत्र देतो, पण गिरीशला मात्र मी नाही लिहिणार" दादा ठामपणे म्हणाले. 
              माजी आमदाराचे नाराजीचे कारण मला कळले होते . पण अजित दादा, अहो गिरिश महाजन यांनी नुकतीच सिंचन विभागाची  कागदपत्र सोपवली आहेत, चौकशी अजून कोणालातरी करायला सांगितली आहे हो! गिरीषभाऊचा  काय संबंध?  एकदा डुख धरले कि झाले, कोण समजावणार तुम्हाला ? गिरीष भाऊ पिस्तुल ठेवतात पण सांगितले कीच चालवतात… पण वाचकहो, ताज्या बातमीनुसार माजी आमदाराने दादांकडून मग थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले। 

२. मंत्री विनोद तावडे यांनी मोदी जॅकेट घालणे का बंद केले?
अ. पंतप्रधान नरेंद्र मोदी घालतात म्हणून
ब. बायकोने सांगितले म्हणून .
क. की आता केशव उपाध्ये ही घालतात म्हणून…

३. मागे चार एक दिवसअगोदर मुंबई  भाजपच्या एका "राईसइटर" आमदाराला आपल्या  थोरल्या भावामुळे तोंडाघशी पडण्याची वेळ आली होती. खबर अशी की, आमदार महोदय बोरीवली येथे एका सोसायटीमध्ये राहतात. तेथे राहणाऱ्या एका स्त्रीने या आमदाराच्या मोठ्या भावाच्या कानाखाली लगावून दिली. साधा एक भाजीवाला बिल्डिंगमध्ये येउन भाजी कसा काय विकतो, हे या बाईला पटले नाही. सगळे तिची समजूत काढण्यात मग्न असताना आमदाराचा भाऊपण समजावण्यात व्यस्त झाला. पण काय घडले कोणाला ठाऊक,  काही समजण्यापूर्वी या बाईने
आमदाराच्या भावाला कानाखाली लगावली. दुसऱ्या दिवशी आमदार भेटले. प्रकरणाबद्दल विचारले. "ती बाई वेडी आहे. बिल्डिंगमध्ये थोडेही काही
घडले की ती सरळ मारामारी करायला लागते. म्हणून तिला समजवण्या पलीकडे काहीपण करता येत नाही" असे आमदारला सावध केले. आमदार बाबा तुम्ही सध्या खूप समाजकरणात व्यस्त असतात. जरा बिल्डिंग मध्ये सांभाळून येत जा …हवालदार असू द्या नेहमी सोबत… 

४. नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात परत उतरले आहेत. कितीही म्हटले तरी तसा मतदारसंघ नवीन. आज मतदान सुद्धा आटोपले.  जर त्यांच्या आसपास असणाऱ्या लोकांशी जर तुम्ही बोलले, तर समजेल की आजकाल राणेंना एकूणच सर्व प्रकारच्या माणसांनी घेरलेले आहे. मग त्यात बांद्रामध्ये राहणारे काही काँग्रेसी नेते असतील, काही विश्लेषक असतील,  काही नवीन जुने मित्र असतील, पण गम्मत म्हणजे हे सगळे लोक राणेंना कोणीही तंतोतंत माहिती दिली नाही . पण पाकीट मात्र मोठे घेतले आहे. असो. चालत. पण माहितीनुसार, ज्या दिवशी नितेश राणे ओवासी यांना भेटायला गेले, त्याच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेचा एक मोठा नेता, जो आता मंत्री आहे, तोही भेटला. राणेंची ओवसीला "म्यानेज" करण्याची खेळी शिवसेनेच्या नेत्याने हाणून पाडली. राणेजी जरा संभालके, हर "कदम" पे धोका है!! शेवटी रामसुद्धा १४ वर्षानंतर वनवासातून परतले होते. तुम्ही जॉर्ज फर्नांडीस व्हा… इंदिरा गांधी यांनी त्यांना हरवण्यासाठी लाख प्रयत्न केले… ते चार वेळा हरले, पण शेवटी मात्र फिनिक्स पक्षासारखे त्यांनी भरारी घेतली आणि कधीही पुन्हा मागे वळून पाहिले नाही. 

५. बातमी एका जाधव नामक क्लास वन अधिकाऱ्याची! सध्या महाशय कोकण भवनात काम करतायेत. पण माहितीनुसार  जाधवांच्या घरी
वातावरण नेहमीच तापलेले  असते. जाधव हा परभणीच्या एका कॉंग्रेस माजी आमदाराचा जावई. श्रद्धा नामक मैत्रीणीमुळे आपले जाधव साहेब आता एका आशिकासारखे वागतांना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.  एरवी अंगाला  वास येणारा जाधव आता कपड्यांना सेंट लावतो , चकचकीत दाढी करतो… साहेबांनी चांगलेच पैसे खर्च करून सांताक्रूझला एक अलिशान दुकान श्राद्धाला  "भेट" म्हणून उघडले आहे… अगदी इर्लाला जसे अल्फा आहे तसे… आणि असे ऐकले आहे, की जमीनी सुद्धा  आता श्रद्धाताईच्या नावावर आहे. अहो जाधव, तुमच्या सांताक्रूझच्या दुकानात "कैलाश" जीवन मिळत का हो?

६. मिळाल्या माहितीनुसार विधान भवनात जो मेन पोर्च  आहे त्याचे नामांकरण करायचे आहे. मी लगेचच सुचविले, "जितेंद्र आव्हाड चौक" …